गोड नको पण किमान बोलूया...🌿
आपलं बोलणं सहज आणि ओघवतं असावं.त्याला अहंकाराचा लवलेष नसावा.लोकं योग्य ट्रिटमेंट चे दावेदार आहेत आणि त्यांना ती मिळावी असं मला वाटतं.बोलणं इथे कामी येतं.गोड बोलणं म्हणजे नेमकं काय हे मला माहित नाही पण किमान बोलणं गरजेचं आहे.आपल्या आसपास हल्ली बोलायला जागा नाहीय.मुळात आपल्या कोणाकडे वेळ नाहीय.मागच्या वर्षी आजी गेली,मुळात ती गेल्याची सल आहेच पण त्याहीपेक्षा आम्ही शेवटच्या काळात बोलू शकलो नाही याची सल जास्त आहे.पुस्तकं आणि स्वप्नांनी आपल्याला इतकं घेरलय की सवड नाहीय आपल्याला एकमेकांसोबत बोलायला.शेवटचं खदखदून हसलेलं आठवत नाहीय.आईबापाशी मनोसोक्त मारलेल्या गप्पा विरळ झाल्या आहेत.मैत्रीत आपण अती जजमेंटल झालोय.पूर्वीसारखं भरभरून बोलणं होत नाहीय.यात व्यक्त न झालेला एखादा मित्र फासावर लटकला तर त्यात कौतुक काय.
मित्रांनो खांदा बनुया,एकमेकांच्या पाठीवरचा हात बनुया, आधार बनुया...
आणि हो
किमान बोलूया
सगळं गोड गोड आपोआप होत जाईल..
©उद्देश