मराठी सुविचार ✨ @suvichar_marathi Channel on Telegram

मराठी सुविचार

@suvichar_marathi


रोज मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट सुविचार पाहण्यासाठी जॉईन करा.
👇 𝕛𝕠𝕚𝕟 𝕟𝕠𝕨 👇

📢 For any type of advertisement contact at -
@MarathiAdmin_bot

मराठी सुविचार (Marathi)

आपल्याला आवडतं सुविचार, मराठीतून! आमच्या Telegram चॅनेलला जॉईन करा आणि प्रतिदिन आपल्याला मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट सुविचार मिळतील. सुविचार म्हणजे सोपया शब्दांत सशक्तीकरण आणि प्रेरणा. आपल्याला आपल्या दिवसाचे शुभारंभ सुनिते असावं, तर आमच्या Telegram चॅनेलला जॉईन करा. तर आपल्याला अद्भुत सुविचारांची खास मिळेल. त्यांसोबत, जे कोणाच्याला माहिती अथवा उत्तरावरून आवडतील, तर त्या सुविचारांचे लगेच आमच्या चॅनेलवर जोडलेल्या समाचारातून ताकद मिळेल. त्यांच्या सोबत जोडलेल्यांना, आम्ही वर्षातून वर्ष सुविचारांच्या उत्कृष्टतेची देईल खास घोषणा. सुविचार म्हणजे घरच, कार्यालयात प्रेरणा या तुमच्या फोनमध्ये! आता टेलीग्रामवर मराठी सुविचाराच्या समृद्धतेचा आनंद घेऊन बघा. तुमच्यासोबत सुविचारांनी तुमच्या जीवनात झोपावं वेळ देउन आम्ही एक सुखद आणि प्रेरणात्मक अनुभव देणे लवकर. आमच्या Telegram चॅनेलला आज जॉईन करा आणि अद्वितीय सुविचारांचा आनंद घेऊन जागरूक व्हा!

मराठी सुविचार

11 Oct, 02:03


जेव्हा एखादा माणूस यशस्वी होतो तेव्हा अनेक अनोळखी लोक त्यांच्या सोबत जवळीक साधायला बघतात पण तोच माणूस अपयशी झाला तर जवळचे लोक सुध्दा अनोळखी होतात.
@suvichar_marathi

मराठी सुविचार

03 Oct, 06:31


जबाबदारीचे ओझे खांद्यावर पडल्याशिवाय आयुष्य काय आहे कळत नाही.
@suvichar_marathi

मराठी सुविचार

02 Oct, 06:31


चांगल्या गोष्टी घडत नसतात तर त्या घडवाव्या लागतात, त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात.
@suvichar_marathi

मराठी सुविचार

01 Oct, 06:32


वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका.
@suvichar_marathi

मराठी सुविचार

30 Sep, 06:33


नावामुळे असलेली ओळख तर ओळखीचे देखील विसरतात मात्र स्वभावामुळे आणि कर्तृत्वामुळे झालेली ओळख अनोळखी देखील विसरत नसतात.
@suvichar_marathi

मराठी सुविचार

29 Sep, 06:33


कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाहीत.
@suvichar_marathi

मराठी सुविचार

28 Sep, 06:32


माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकती वरून ठरत नसतो तर तो विचारांवरून ठरत असतो.
@suvichar_marathi

मराठी सुविचार

27 Sep, 06:33


जीवनात सुखाच्या व्याख्या खूप आहेत. पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे हे, आयुष्यातील खरे सुख आहे.
@suvichar_marathi

मराठी सुविचार

26 Sep, 06:33


वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच.
@suvichar_marathi

मराठी सुविचार

25 Sep, 12:33


माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो, तो तर तेव्हा मोठा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो.
@suvichar_marathi

मराठी सुविचार

11 Sep, 15:46


सकारात्मक राहिल्यास आलेली संकटे, समस्या सगळ्यांचा सामना निर्भयपणे करता येतो.
@suvichar_marathi

मराठी सुविचार

03 Sep, 11:00


सरळ सरळ जे आहे ते सांगण्याचं धैर्य आपल्यात हवं त्यातून जी नाती टिकतील ती टिकतील जे सोडावं लागेल तिथं इलाज नाही.
@suvichar_marathi

मराठी सुविचार

02 Sep, 07:27


बऱ्याचदा पाहिजे तसं आयुष्य जगता येतं नाही, कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीकडे गहाण ठेवावे लागतात.
@suvichar_marathi

मराठी सुविचार

18 Aug, 08:18


देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होत मग तो मान असो प्रेम असो किंवा वेळ.
@suvichar_marathi

मराठी सुविचार

10 Aug, 11:39


वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा भविष्य फार धूर्त आहे ते फक्त आश्वासन देतं खात्री नाही.
@suvichar_marathi

मराठी सुविचार

06 Aug, 07:50


माणूस कधीही आपण समोरच्याशी कसं वागलो ते पाहत नाही पण समोरचा आपल्याशी कसं वागत आहे ते नेहमी लक्षात ठेवतो.
@suvichar_marathi

मराठी सुविचार

05 Aug, 17:40


मोठे निर्णय घेताना भीती वाटणे साहजिकच आहे पण केवळ भीतीमुळे निर्णय न घेणे मात्र चुकीचे आहे.
@suvichar_marathi

मराठी सुविचार

01 Aug, 06:32


चांगल करूनही काही लोकं तुम्हाला वाईटच समजत असतील तर तो तुमचा दोष नाही कदाचीत तुम्हाला ओळखण्याइतपतचा बुध्यांक त्यांच्याकडे नाही.
@suvichar_marathi

मराठी सुविचार

29 Jul, 18:26


खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेवून येतात पण खूप लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.
@suvichar_marathi

मराठी सुविचार

26 Jul, 13:20


आयुष्यात कोणतीच व्यक्ती व्यस्त नसते फक्त आपण किती महत्त्वाचे आहोत त्यानुसार आपल्याला ती व्यक्ती वेळ देत असते.
@suvichar_marathi

12,627

subscribers

1

photos

3

videos