या शेवटच्या पण अतिशय महत्त्वाच्या काळासाठी काही important मुद्दे लक्ष्यात राहुद्या ,
१. खूप जणांना अस वाटतं की माझ्या बराचश्या गोष्टी विसरल्या आहेत, जे की खूप common आहे, हे अभ्यास करण्याऱ्या ८०-९०% students ना वाटत असते, त्यामुळे relax रहा, या अशा वाटण्यामुळे तुमचं काही नुकसान होणार नाही हे नक्की,मात्र तुम्ही या गोष्टी बद्दल relax रहावे.
२. सर्व विषयाची base बुक्स १ किव्वा २ असतील, तर या १० दिवसात ती एकदा चांगली नजरेखालून घाला.१ दिवशी १ subject किव्वा science आणि current साठी २ दिवस असा प्लैन करू शकता.
३.प्लॅन मधे २६ ते ३० नोव्हेंबर मधे खालील घटक वाचा,
- current affairs , पोलिटी संपूर्ण, भूगोल-संपूर्ण , MH इतिहास- तात्याचा ठोकळा, लोकसंख्या etc.
४. या दिवसा मधे revise करताना काय आठवतंय किव्वा नाही याचा जास्त विचार न करता फक्त नजर फिरवत रहा, exam मधे options बघून ते विसरलेले असेल तरी नक्की आठवते.
५.जागरण करणे टाळा, ६-७ तास पूर्ण झोप घ्या, काही लोकांना शेवटच्या काही दिवसात झोप नीट लागत नाही, त्यांच्यासाठी advise असा आहे की, झोप लेट लागत असेल, तर झोपताना च उशिरा झोपा, झोप का नाही लागत म्हणून घड्याळ पाहत पैनिक होऊ नका,उलट असा विचार करा की ‘मी डोळे मिटून फक्त पडून राहीन, झोप नाही लागली तर चालेल’
मग आपोआप लागेल झोप आणि ‘१ दिवस नाही झोप झाली तरी काय फरक नाही पडणार’ असा विचार करा,म्हणजे त्याचं पण टेन्शन येणार नाही.
६. आपण भरपूर दिवस abhyas केलेला आहे, आपण जर रिलैक्स राहिलो तर त्या अभ्यासाचे utilization चांगले करून घेता येईल, रिलैक्स म्हणजे डोकं शांत ठेवणे,जेवढे शक्य आहे ते वाचत राहणे.
७. एखाद्या पुस्तकाची एखादी रिव्हिजन कमी झाली, किव्वा प्लानिंग प्रमाणे झाली नाही, तरी panic होण्याची गरज नाही, आधी वाचलेले आहे, So be confident for that.
८. या काळात abhyas थोडा कमी झाला तरी चालेल मात्र, mindset perfectly positive आणि confident असावा, नेहमी एक गोष्ट लक्ष्यात ठेवा आपला बुक्स चा अभ्यास म्हणजे १००% abhyas नाही, तुमचा exam कडे पाहण्याचा, प्रश्ना ना face करण्याचा positive इंटेंट हा सुद्धा खूप महत्वाचा रोल निभावत असतो.
९. १० दिवसात आता फक्त आयोगाचे राज्यसेवा पूर्व चे पेपर पाहा, सोडवत रहा,रोज १ केला तरी चालेल,म्हणजे लॉजिक विसरणार नाहीत, आणि exam ला थोडं comfortable फील होईल.
१०.ज्यावेळी tension येईल तेव्हा, ज्या कोणत्या पण देवावर तुमची श्रद्धा असेल, त्याला आठवा,तुम्ही १००% चांगले कष्ट घेतले आहेत,आणि ‘माझा देव माझ्या सोबत आहे, तो मला काहीही अडचण येऊ देणार नाही ‘हे कायम सब consious माइंड मधे वाटत राहिलं पाहिजे, मग भीती वाटणार नाही.(नास्तिक असाल तर,तुम्ही चांगल्या लोकाबरोबर कृतज्ञ ची भावना ठेवली असेल ती आठवत रहा.)
❇️ Your potential is infinite,
Believe in yourself and
No obstacle can stand in your way.
💢 All the best 💯👍