आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये @apligrampanchayat Channel on Telegram

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

@apligrampanchayat


चॅनल उद्देश ग्रामपंचायती मार्फच राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती सर्वसामन्यांपर्यंत पोहचावी व आपल्या अधिकाराविषयी जागरूकता निर्माण व्हावी व ग्रापंचायतीतील भ्रष्टाचार कमी व्हावा हा आहे. व्हाट्सअप
👇 https://whatsapp.com/channel/0029VaHftKjDTkK6ctgcpw0l

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये (Marathi)

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये टेलीग्राम चॅनल हे एक अद्वितीय स्पेस आहे ज्यात आपल्याला ग्रामपंचायतीच्या विविध कामांबाबत माहिती मिळेल. यात जनतेला ग्रामपंचायत संबंधित माहिती, कामगारांचे कर्तव्ये, आणि कायमस्वरूपीचा अपडेट्स प्राप्त होईल. या चॅनलवर ग्रामपंचायतीच्या कामाच्या प्रक्रियेवर, प्रोजेक्ट्स वर आधारित अपडेट्स देण्यात आल्या आहेत. जर आपल्याला गावाची वास्तविकता आणि विकासाच्या कामांबाबत अधिक माहिती हवी असली तर ह्या चॅनलवर सह कनेक्ट राहू शकता. आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये चॅनल जॉइन करा आणि गावाच्या विकासात भागीदारी करण्याची संधी घ्या!

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

13 Feb, 13:38


#uddeshblogs


OPTOUT का ?🌿

एक शेतकरी बाप साधारण लाखभर रुपयासाठी  सालगडी म्हणून दुसऱ्याच्या शेतात आपल्या पत्नीसह वर्षभर राबराब राबतो.पोरगं पुण्यात एमपीएससी करतंय त्याला महिन्याला किमान ८ हजार रुपये लागतात.व्यवस्थित कॅलक्युलेशन केलं तर हा हिशोब जातो ९६ हजारावर.
उरतात ४ हजार रुपये
गणिताचा पदवीधर आहे मी
हा हिशोब अजून लागलेला नाहीय
माझी डिग्री काय कामाची.

पण एक पोरगं महसूल सहाय्यक होतय
३५- ४० हजार कमावतय.ते कळकटमळकट कपड्यात नाही तर इन्शर्ट केलेल्या प्लेन कपड्यावर.
शासन दर महिन्याला त्याच्या आयुष्यासाठी जमापुंजी काढून ठेवतय.
बापाला गावच्या कार्यक्रमात मानाची खुर्ची मिळतीय,हळदी कुंकवाला आईच कपाळ भरतय शुभेच्छांनी.
आणि हो आयुष्यभराचं समाधान राहतंय आपण बदल घडवला याचं.

एक नोकरी माणसासाठी इतकी गरजेची असते…

ती नोकरी तुम्हाला आधीच मिळाली असेल आणि महसूल सहाय्यक ही दुसरी संधी असेल आणि घ्यायच्या विचारात नसाल तर हात जोडून विनंती आहे OPTOUT करा.तीच संधी दुसऱ्या गरजूला मिळूदे..

आणि हो तुमच्या सामाजिक संवेदना अजूनही जीवंत आहेत हे मला माहितीय🙂

©उद्देश

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

09 Feb, 03:36


https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc7V377jpTQiLkAcSy5QeYrCFtbqb9oyySVirY_aobiR7aSiw/viewform

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

09 Feb, 03:34


#Advt.

🌺 दीपस्तंभ फाउंडेशन, मनोबल 🌺

📌 MPSC गट ब मुख्य परीक्षा

🧩 दिव्यांग, अनाथ ,ट्रान्सजेंडर,आर्थिक दृष्ट्या दुर्बल (सर्व जात प्रवर्गातील) विद्यार्थ्यांना विनामूल्य ऑनलाईन व निवासी मुख्य परीक्षा मार्गदर्शन जळगाव व पुणे येथे...

✴️ वैशिष्ट्ये -

🔹 2 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा यात प्रथम उत्तर तालिकेने मुख्य परीक्षेत पात्र ठरण्याची शक्यता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी
🔹 महाराष्ट्रातील अतिशय तज्ञ मार्गदर्शक व बेस्ट सेलर पुस्तकांचे लेखक यांचे मार्गदर्शन

🔹 अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2025

🔹 रजिस्ट्रेशन साठी खालील लिंक वर फॉर्म भरा..
👇👇👇
CLICK HERE

🔹 नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक - 9890406717(व्हाट्सअप मेसेज करावा)

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

04 Feb, 17:13


https://youtu.be/YGzURjH4XjM?si=r-DXG2CTMsbh6iLh

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

26 Jan, 05:43


देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा. गणराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!🇮🇳❤️

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

23 Jan, 05:25


https://youtu.be/b6Pqp62Mbds?si=bdu8UEbdDC7KOi1e

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

23 Jan, 05:23


https://youtu.be/36nPUZdlsjU?si=n3axHV-_XcoJA8WQ

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

13 Jan, 06:19


महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
➡️नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकार आयुक्तांना असतो

➡️गरज भासल्यास ग्रामपंचायत स्थापन करण्याचा किंवा बरखास्त करण्याचा अधिकारही राज्य सरकारला आहे

➡️ग्रामपंचायत हा पंचायत राजमधील सर्वात खालचा  भाग आहे

▪️ग्रामपंचयत अध्यक्ष =सरपंच 
▪️कार्यकारी प्रमुख =सरपंच
▪️सचिव=ग्रामसेवक 
▪️ग्रामसभा =एकूण 4
▪️ग्रामपंचायत सभा=12
▪️ग्रामसभेचे अध्यक्षपद=सरपंच
▪️ ग्रामपंचायत सदस्य = 7 ते 17
━━━━━━━━━━━━━━━━━━
*एकूण ग्रामसभा *
✔️26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस
✔️1 मे महाराष्ट्र दिवस
✔️15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस
✔️2 ऑक्टोबर गांधी जयंती

किमान लोकसंख्या 500
लोकसंख्या 1500 असेल =7 सदस्य संख्या
लोकसंख्या 1501 ते 3000=9 सदस्य संख्या
लोकसंख्या 3001 ते 4500 =11 सदस्य संख्या
लोकसंख्या 4501 ते 6000 =13 सदस्य संख्या
लोकसंख्या 6001 ते 7500 =15 सदस्यसंख्या
लोकसंख्या 7501ते 17 सदस्य संख्या

500 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर "गट ग्रामपंचायत " स्थापण केली जा
💥💥💥💥💥💥💥💥💥💥

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

12 Jan, 02:58


शंभूराजांना आणि शिवरायांना घडवणारी हीच ती जननी
स्वाभिमानाचे, स्वातंत्र्याची ही साक्षात माय भवानी
गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार करणारी हीच ती राजमाता
अन्यायाविरुद्ध लढणारी हीच ती जिजाऊ माता
याच मातेने स्वराज्याची ज्योत प्रज्वलित केली
धन्य ही महाराष्ट्र भूमी, या भूमीत रणरागिनी जन्माला आली
जिजाऊ मासाहेब म्हणजे अखंड स्वराज्याची सावली
जिच्यामुळे स्वराज्याचे स्वप्न साकार झाले धन्य ती जिजाऊ माऊली
हीच ती माता जिने रचली स्वराज्याची गाथा
म्हणून आजही झुकतो मासाहेब तुमच्या चरणी माथा
सामर्थ्याचा एक दीपस्तंभ आहात जिजाऊ तुम्ही
सदैव तुमच्या चरणी नतमस्तक राहू आम्ही...
_✍️Rutuja mapare

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

10 Jan, 02:13


https://youtu.be/x6Z60fV-Q00?si=MXkdvfGTKaPod6Ky

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

09 Jan, 08:08


लोकलच्या गर्दीत चेंगरणारे, ऑटोचे पैसे वाचवायला बससाठी रांगेत उभे राहणारे, कांदा महाग आहे म्हणून कमी खाणारे, चप्पल तुटली तरी त्यावर महिने काढणारे, हॉटेलमधलं परवडत नाही म्हणून वडापाव खाणारे,   प्रत्येक सेकंदाला-मिनीटाला स्वतःच्या इच्छा मारत काटकसर करणाऱ्या  १ लाख २५ हजार मुंबईकरांचे  हजार कोटींपेक्षा जास्त पैसे या स्कीम मध्ये कायमचे गेलेयत. मुंबईतल्या ३१ वर्षीय प्रदीप वैश्य या भाजीवाल्याने १३ कोटी ४८ लाख या टोरेस स्कॅममध्ये गमावले आहेत.

-एकदम श्रीमंत सॉफिस्टिकेटेड नाव दिलं..
-जागोजागी, चकचकीत भुरळ पाडणारे ऑफिस उघडले
-असामान्य वाटावं असं कंपनीचं नाव ठेवलं
-चकचकीत, मोठा बिजनेस भासावा अशी वेबसाईट
-एकदम मोठ्या उद्योगाचा आपण भाग होतोय हे पटवून दिलं
- कंपनीत विश्वास बसावा म्हणून अनेक विदेशी चेहरे
-सोने, हिरे, चांदीत गुंतवणूक करत असल्याचं भासवलं
-गुंतवणूकीवर दर आठवड्याला परताव्याचं आमिष दिलं.
- ६ लाखांच्या गुंतवणूकीवर आठवड्याभरात ६ टक्के व्याज
- ६ लाखाहून अधिक गुंतवणूकीवर ११ टक्के व्याज
- म्हणजे वर्षाला ५२० टक्के. एका लाखाचे ६ लाख
-  एक लाख रुपये गुंतवणूक केली तर मोईसॅनाईट स्टोनच्या (लॅब निर्मीत हिरे) पेंडंटवर 10 हजार रुपयांची सूट दिल्याचं दाखवलं.
- तसेच ज्वेलरीच्या गुंतवणुकीवर देखील 6 टक्क्यांचा परताव्याचं आमिष दिलं
- सुरुवातीला काही जणांनी पैसे गुंतवले, आठवड्याला परतावा यायला लागला. पैसे येतायत हे दिसल्यावर सगळे आपल्या नातेवाईक, मित्रांनाही पैसे टाकायला सांगू लागले.यातूनच मुंबईत जागोजागी टोरेसची चैन उभी राह्यली.

कंपनी गुंतवणूकदारांना त्यांच्याकडे असलेले खडे, ज्वेलरी डिस्काउंटमध्ये द्यायची. गुंतवणूक केलेल्या या ज्वेलरीच्या रकमेवर आठवड्याला परतावा मिळायचा. ही ज्वेलरी, खडे परदेशी आहेत, असं कंपनी सांगायचीहळू हळू आठवड्याला ६ टक्क्यांऐवजी ११ टक्के परतावा कंपनी द्यायला लागलीमग लोभापायी सामान्य माणसं आणखी पैसे टाकायला लागली.  अवघ्या 4000 रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती.

ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवारदरम्यान त्याचा परतावा द्यायची. मग कंपनीने उच्चभ्रू इमारतीत घरे, गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा दिला . त्यामुळे गुंतवणुकदारांचा विश्वास बसला. म्हणून अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये टोरेस कंपनीत गुंतवले.

हेच बघून वर उल्लेख केलेल्या प्रदीप कुमार वैश्य या भाजीवाल्याने १३ कोटी ४८ लाख गुंतवले. आपल्या नातेवाईक मित्रमंडळीसह ३८ लोकांचे पैसेही त्याने यात गुंतवले.मिळालेला परतावा परत टोरेस कंपनीकडे सगळे गुंतवत होते कारण एकच ते म्हणजे आणखी लोभ, हव्यास, ग्रीड, मोह...

शेवटी याचा शेवट व्हायचा तोच झाला... एक सकाळ उजाडली आणि कंपनीने फसवणूक केल्याचं लक्षात आलं.. कंपनीने दिलेले दागिने पण नकली असल्याचं कळलं. कोट्यधीश होण्याची स्वप्न बघणारे एका रात्रीत देशोधडीला लागले. 

लोकलचे धक्के खात, कपडे पिळावे इतका घाम गाळून कमवलेला पैसा मुंबईकरांनी  सानपाडा, दादर,भाईंदर अश्या विविध भागातल्या ब्रांचमध्ये जात गुंतवला... कोणी घर गहाण ठेवलं, कोणी विकलं, कोणी कर्ज काढलं, कोणी पैसे उधार घेतले, कोणी दागिने विकले. श्रीमंत होण्याची स्वप्न बघत, कोणी हक्काच्या घराचं स्वप्न बघत, कोणी कर्जमुक्त होण्याचं स्वप्न बघत टोरेसमध्ये पैसे गुंतवले.. आणि आता ही स्वप्न पुर्ण होणं तर दुरच पण अनेकांची झोप सुद्धा एका चुकीच्या निर्णयाने हिरावून घेतलीये.  गरिबीच्या खाईत लोटलंय. होतं नव्हतं सगळं गेलंय.... 

कंपनीचा मालक युक्रेनला पळून गेलाय. यातून एक रुपया सुद्धा रिकव्हर होईल असं वाटत नाही.

बाबांनो आतातरी शहाणे व्हा. घरबसल्या झटपट पैसा मिळत नसतो. श्रीमंत होण्यासाठी पैसा कमवण्याईतकच तो सावधपणे जपणं देखील आवश्यक असतं.  नाहीतर प्रत्येकवेळी श्रीमंतीची स्वप्न दाखवत तुम्हाला नागडं करायला आणखी एक स्कॅम येईल.

- सौरभ कोरटकर

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

07 Jan, 06:32


जळगांव _पाणंदरस्ते_परिपत्रक.pdf

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

02 Jan, 03:19


तलाठी.pdf♦️तलाठी यांनी सरकारी स्वतः च्या कामासाठी खाजगी व्यक्ती ठेवला असेल तर कारवाई होणार..

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

27 Dec, 08:59


*"घटना साताऱ्याची आहे"...…सर्वांनी "आवर्जून" बघावी.....* 📌नवीन फ्रॉड आहे 👆🏻👆🏻फोन पे डुप्लिकेट
Ballance पण दाखवत आणि ट्रान्सफर झालेले पण दाखवते पण पैसे कट होत नाहीत
सावधान👇👇👇☝️https://t.me/apligrampanchayat

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

25 Dec, 07:14


💯

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

22 Dec, 10:02


दोन पाय आणि हात गमावल्यावर सुरज ने बॉडी बिल्डिंग मध्ये यश कसे संपादन केले ते निश्चितच बघा.❣️https://t.me/apligrampanchayat
❤️❤️
👇 https://whatsapp.com/channel/0029VaHftKjDTkK6ctgcpw0l

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

20 Dec, 04:43


♦️डिजिटल अरेस्ट म्हणजे काय..
https://t.me/apligrampanchayat

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

12 Dec, 06:17


https://www.bbc.com/marathi/articles/ced8n45pez2o

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

12 Dec, 03:06


*मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे.https://whatsapp.com/channel/0029VaHftKjDTkK6ctgcpw0ल

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

12 Dec, 02:25


बेला ग्रामपंचातीत महिला सरपंचानी केलेली काम एकदा नक्क्की पहा प्रत्येकाला गावात पोहचवा.
https://t.me/apligrampanchayat

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

10 Dec, 13:59


केंद्र सरकारने PAN कार्डच्या नव्या आवृत्तीची घोषणा केली आहे, PAN 2.0.
परंतु यासाठी तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही. सरकार नवीन अपडेटेड PAN कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर पाठवेल.

महत्त्वाचे: PAN कार्ड अपडेट करण्यासाठी जर कोणी फोन, मेसेज, किंवा ई-मेल पाठवले, तर त्याला उत्तर देऊ नका. कोणतीही माहिती किंवा OTP शेअर करू नका.

नाही म्हणजे नाही.
जागरूक राहा, सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा...

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

06 Dec, 09:36


बाबासाहेब 🙏💙
✍️"6डिसेंबर 1956ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या जगातून निघून गेले पण त्यांचे विचार आजही जिवंत आहे आणि जिवंत राहतील या आकाशात जोपर्यंत चंद्र, सूर्य आणि तारे आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार असतील... इतिहासाच्या पानापानावर आणि भारताच्या संविधानावर एक नाव सोनेरी अक्षराने लिहल्या गेलं ते.. म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवास कोटी..
कोटी प्रणाम विनम्र अभिवादन...
🙏🙏🙏🙏🙏💙
बाबासाहेब आंबेडकर याचे विचार हेच आमचे आचार होवो हिच सदिच्छा...!
🙏🙏🙏🙏🙏

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

05 Dec, 09:56


https://whatsapp.com/channel/0029VaHftKjDTkK6ctgcpw0l
*मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळवावा ?*

मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र. : ८६५०५६७५६७

Email id:- [email protected]

राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांच्या यादीत अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे.

*जास्तीतजास्त शेअर करा, गरजू रुग्णांपर्यंत पर्यंत पोहोचवा!*

■ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
१. अर्ज ( विहीत नमुन्यात)
२. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
३. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला.
(रु. १.६० लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)
४. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक
५. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
६. संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
७. अपघातग्रस्त रुग्णांसाठी चङउ रिपोर्ट आवश्यक आहे.
८. प्रत्यारोपण रुग्णांसाठी नढउउ / शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.
९. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.

● अर्थसहाय्याची मागणी ई मेल व्दारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात (वाचनीय) पाठवावी.

Email id:- [email protected]

● व त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडे टपालाव्दारे तात्काळ पाठविण्यात यावेत.

■ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नांवे.

१. कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष २ ते ६),
२. हृदय प्रत्यारोपण
३. यकृत प्रत्यारोपण
४. किडणी प्रत्यारोपण
६. बोन मॅरो प्रत्यारोपण
५. फुफ्फुस प्रत्यारोपण
७. हाताचे प्रत्यारोपण
८. हिप रिप्लेसमेंट
९. कर्करोग शस्त्रक्रिया
१०. अपघात शस्त्रक्रिया
११. लहान बालकांचे शस्त्रक्रिया
१२. मेंदूचे आजार
१३. हृदयरोग
१४. डायलिसिस
१५. अपघात
१६. कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)
१७. नवजात शिशुंचे आजार
१८. गुडघ्याचे प्रत्यारोपण
१९. बर्न रुग्ण
२०. विद्युत अपघात रुग्ण

या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी उपरोक्त तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र. : ८६५०५६७५६७


संपर्क क्र. ०२२-२२०२६९४८ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अंगीकृत असलेल्या रुग्णालयांची सविस्तर माहिती व रुग्णालयांची यादी वेबसाईटवर आहे.

आपले नम्र,
मंगेश नरसिंह चिवटे,
कक्ष प्रमुख,
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, तथा विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय.
फोन - ९६१९९५१५१५
संपर्क - ०२२ - २२०२५५४०
https://whatsapp.com/channel/0029VaHftKjDTkK6ctgcpw0l

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

05 Dec, 09:56


https://whatsapp.com/channel/0029VaHftKjDTkK6ctgcpw0l

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

25 Nov, 03:07


नक्की पहा एक प्रयोग असाही. अशाच माहितीपूर्ण व्हिडीओ साठी चॅनेल ला लवकरच जॉईन व्हा. सर्वांना शेअर करत राहा

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

23 Nov, 13:37


https://youtu.be/Qa3hn4osimU?si=nz01_UA73ds-edEV

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

19 Nov, 15:59


*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*

निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझं गाव विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहीलं

गावाला घडवण्याचे अमीष दाखवुन
गावं *मटन आणि दारुत* बुडवताना पाहीलं
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी
*माझं गाव विकताना पाहील*

इतक्या दिवस साड्या ओढणारं
अचानक साड्या वाटताना दिसलं
मटनाच्या तुकड्यात दारुच्या बाटलीसाठी
गरीबाला मी लाचार होताना पाहिलं,
रात्री मी *माझं गाव विकताना पाहिलं*

पैश्या पुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला
पुन्हा गरीब बिचारा गरीबचं राहिला...
त्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ
मी माझ्या डोळ्यांनी पाहीला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

गरिबांना पायदळी तुडवणारा
आता त्यांच्या पाया पडताना दिसला
गरिबांच्या झोपडीकडे जाताना
त्याचे जोडे केवढे घासले पण
वरवरच्या प्रेमाचा डाव
मी त्याच्या तोंडावर पाहीला,
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

लोकशाही ढाब्यावरच बसवून
त्याने तोडलेत गरीबांचे लचके
आज दडपशाही मतदानाला आणली
गावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी
त्या फुकट वाटलेल्या *दारुनेच* धुतली

त्या वाहणा-या विषारी *दारुत*
आज माझं गावही वाहिलं,
*मटनाच्या* रस्स्यापाई पुन्हा पाच वर्ष गरीबच राहीलं,,,

निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझ गावं विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
*बरबाद* होताना पाहिलं.....!

आणि रात्री *मी गांव माझं विकताना पाहिलं*

🙏 एक मतदार 🙏

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

15 Nov, 04:18


https://youtu.be/Du16-GsdBZg?si=0QDeISGD3DCd586G
https://t.me/apligrampanchayat
https://whatsapp.com/channel/0029VaHftKjDTkK6ctgcpw0l

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

10 Nov, 10:58


#voting ❤️https://t.me/apligrampanchayat
https://whatsapp.com/channel/0029VaHftKjDTkK6ctgcpw0l

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

10 Nov, 07:47


https://youtu.be/_aCNrEZ1ccU?si=sB5Y4itmTZVfKR4g

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

08 Nov, 16:17


🎋🌱🌿 कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्याच्या हेतूने एक मोठे पाऊल म्हणून सरकार शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणे युनिक ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्याला *शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी* असे म्हणतात.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*शेतकरी ओळखपत्रासाठी आवश्यक पात्रता*
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- शेतकऱ्याकडे जमिनीचा मालकी हक्क असावा
- शेतकऱ्याचे नाव  ७/१२ उताऱ्यावर असणे आवश्यक

*उद्देश आणि फायदे:*
- यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होईल
- शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती फार्मर आयडी मध्ये एकत्र केली जाईल
- त्यामुळे कोणत्याही शेतीविषयक योजनेच्या फॉर्म भरताना सोयीस्कर होईल.
- सर्व माहिती एकत्र असल्यामुळे यापुढे सर्व ठिकाणी सर्व कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही
- भविष्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक
- सध्या तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर त्यासाठी यापुढे फार्मर आयडी असणे आवश्यक उदाहरणार्थ किसान सन्मान योजना
- थोडक्यात शेतकरी ओळखपत्र च्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो.
- शेतकरी योजनांमधून लोन सारख्या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक

📑 *शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्र:* 📃
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर
👇👇👇👇👇👇👇
*कृषी विभागाच्या महाडीबीटीवरील योजना व कृषी विभाग अंतर्गत चालवणाऱ्या सर्व योजनांची माहिती मिळवण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की ग्रुपला जॉईन व्हा यावर सर्व योजनांची माहिती पुरवली जाणार आहे

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

27 Oct, 04:35


येणाऱ्या काळात मतदान करतांना या विडिओ चा विचार अवश्य करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेयर करा. 👉.https://t.me/apligrampanchayat

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

20 Oct, 05:13


https://youtu.be/_VwIqQpR0Yc?si=xPx0lAYt51CtiME0

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

20 Oct, 05:11


https://youtu.be/_VwIqQpR0Yc?si=7fWZoKTvohn0BgKa

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

20 Oct, 05:05


https://youtube.com/playlist?list=PLACnmlVQztOi1KUbRR_y4kmjVyWo9MNya&si=DrcGgxrXS62PNLYp

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

20 Oct, 05:02


https://youtu.be/TljSlfMsZpU?si=WHRQ7NG41SSZe9j3

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

18 Oct, 02:52


https://youtu.be/hjyySc9nLYM?si=Jw3GoJduSozkba_s

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

02 Sep, 02:10


आम्ही नागरिक त्या कृषीप्रधान देशाचे... जिथल्या 63.80% लोकसंख्येची उपजीविका ही शेती आहे... आम्हाला अभिमान त्या जनावरांचा जो निम्मा शेतकऱ्यांचा भार जो आपल्या खांद्यावर घेतो... आम्हाला अभिमान त्या शेतकऱ्यांचा जो जनावरांना सुद्धा देवाची उपमा देतो... आम्हाला अभिमान त्या भारत देशाचा जो सर्व मुलूख मिळून पोळा हा सण साजरा करतो...!
#शब्द_मनाचे

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

01 Sep, 02:27


महाराष्ट्र_शासनाच्या_सर्व_योजना_edited1.pdfhttps://whatsapp.com/channel/0029VaHftKjDTkK6ctgcpw0l
👇👇👇
https://t.me/apligrampanchayat

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

28 Aug, 13:35


28 ऑगस्ट ला रात्री telegram बंद होईल....
जे कोणी what's up join केल नसेल ते करून घ्या.👍😍💯👇👇👇👇👇👇👇👇https://whatsapp.com/channel/0029VaHftKjDTkK6ctgcpw0l

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

27 Aug, 14:13


JEE-NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांच्या संच मिळवण्यासाठी योजना योजनेची लास्ट मुदत 15/09/2024 आहे.https://t.me/apligrampanchayat
https://whatsapp.com/channel/0029VaHftKjDTkK6ctgcpw0l

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

26 Aug, 14:46


उद्या यदा कदाचित Telegram बंद पडल्यास आपल्या कार्यात अडथळा नको म्हणून सदर व्हॉटसअप चॅनल बनवले आहे.

तेव्हा विविध योजना याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी जॉईन करून ठेवा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029VaHftKjDTkK6ctgcpw0l

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

26 Aug, 13:58


टेलिग्राम हा प्लॅटफॉर्म विषयी आपण सद्धया साशंक आहोत त्यामुळे
या पुढे या माध्यमातून जोडलेले राहुयात..

https://whatsapp.com/channel/0029VaHftKjDTkK6ctgcpw0l
जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रासोबत नक्की Share करा..

सोबत आहोत सोबत राहू.. 🙏🙏❤️

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

26 Aug, 05:36


याला म्हणतात परिवर्तन सलाम रोहित रक्षिता भाऊ बहिणीच्या जोडीला.

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

25 Aug, 03:44


कालची संभाजीनगर मध्ये अभ्यास करणाऱ्या दत्ताची दुःखद घटना 😢
4-5 वर्षापासून एकदम प्रामाणिक अभ्यास करणारा मुलगा.. MPSC च्या आजपर्यंत 10 ते 15 मुख्य परीक्षा दिल्या.. घरची परिस्थिती एकदम बेताची... आई वडील शेतकरी.. तरीपण संघर्ष करत अभ्यास परिस्थितीशी दोन हात करून अभ्यास चालू होता...2020 psi mains la 5 दीवस असताना भाऊ दिल्ली त upsc mains ची तयारी करतांना pneumonia झाला अंगावर काढल आणि भाउ वारला.. तरीपण दत्ता ने मुख्य परीक्षा देउन थोडया मार्क्स ने रिझल्ट गेला.. तरीपण न खचता अभ्यास चालु ठेवला.. आत्ता तलाठी cha निकाल आला गावात सत्कार झाला सगळ झालं पण भ्रष्ट system mule 8 दिवसांनी तलाठी ची दुसरी लिस्ट लागली आणि त्यात दत्ताच नाव गेले परंतु ते पण दुःख विसरून  क्लर्क टायपिंग पास झाला आता त्याचा रिझल्ट  पण येणारं पण दत्ताच नाही राहिला तो रिझल्ट बघायला 😢( कदाचित लवकर रिझल्ट लागला असता तर तो ह्या मानसिक तणावातून वाचला पण असता)
हया सगळ्यांमध्ये दत्ता ने सगळ्या गोष्टींचा त्रास करुन घेतला पण कुणाकडे व्यक्त नाही झाला.. जीवाला त्रास करून घेतला.. आणि तो आजारी पडला.. तब्ब्येतिकडे दुर्लक्ष करून ताणतणावात राहिला आणि दत्ता जीवाला मुकला... एवढं बर नसताना पण अंगावर काढल आणि काल पर्यंत लायब्ररीत च होता .. त्याला लायब्ररी तच heart attack आला 😞सांगायचं एकच की MPSC सगळ काही नाही आहे ... स्पर्धा परीक्षा ने एकाच घरातील दोन भावांचा जीव घेतला.. कुणाचे काही नाही गेले पण त्या माऊलीचे 2 पोटाचे गोळे गेले .आज काय वेळ आली त्यांच्यावर आपण विचार पण नाही करू शकत..काय स्वप्न असतील त्यांचे...
म्हणुन मित्रांनो व्यक्त व्हा.. त्रास नाही करून घायचा.. आपण आहोत तर सगळ आहे ... आपल्या मागचे आई बाप शेवटपर्यंत आपल दुःख सोबत घेऊन जातात .. MPSC सगळ नाही .. तब्ब्येतीची काळजी घ्या..
RIP Datta..💐
तूझ्या संघर्षापुढे तुझी क्लर्क पोस्ट पण क्लास 1 असती आमच्या साठी .. पण तुच नाहीं राहिलास 😕😞

आपली ग्रामपंचायत आपले कर्तव्ये

23 Aug, 09:18


🙎🏻‍♂️ *(Mukhyamantri Yojana Doot Bharti Apply Online) राज्यात ५०,००० जागांसाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ पदांची मेगा भरती, असा करा ऑनलाईन अर्ज* 👇🏻
https://www.msdhulap.com/mukhyamantri-yojana-doot-bharti
—————————————

3,721

subscribers

222

photos

101

videos