Subhash Shelke - सुभाष शेळके @suvishelke Channel on Telegram

Subhash Shelke - सुभाष शेळके

@suvishelke


प्रशासकीय सुधारणा | नोकरभरती | भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र |

Subhash Shelke - सुभाष शेळके (Marathi)

आमच्या समाजात भ्रष्टाचाराची काळजी ठेवून व समाजाला सुधारण्याच्या मार्गाने जागरूक करण्यात मदत करणारा 'सुभाष शेळके' हे टेलीग्राम चॅनल चालू झालं आहे. या चॅनलवर आपल्याला मिळणार आहेत प्रशासकीय सुधारणा, नोकरभरती, आणि भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र याच्याच विषयावर अपडेट्स. सुभाष शेळके हे एक व्यक्ती नसून आपल्याला सकारात्मक संदेशांचे व सुधारणा सुचना देतात. त्यांच्या समर्थनाने महाराष्ट्राचे समृद्ध, भ्रष्टाचारमुक्त व कायद्याने व्यवस्थित झालेले आनंदीत जीवन प्राप्त होईल.

Subhash Shelke - सुभाष शेळके

30 Sep, 03:53


मागेल त्याला सौर कृषी पंप...

शेत जमिनीच्या क्षेत्रफळानुसार 3 ते 7.5 अश्वशक्ती क्षमतेचे पंप मिळणार.

त्यासाठी शेतकऱ्यांना फक्त 10% रक्कम भरावी लागणार.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना फक्त 5% रक्कम भरावी लागणार.

शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून अनुदानाच्या स्वरूपात मिळणार.

गेल्या दोन आठवड्यात राज्यभरातील विक्रमी 1 लाख 22,421 शेतकऱ्यांनी यासाठी ऑनलाईन अर्ज केलेत.

ऑनलाईन अर्ज लिंक

https://offgridmtsup.mahadiscom.in/AGSolarPumpMTS/PMKusumCons?uiActionName=getA1Form

Subhash Shelke - सुभाष शेळके

25 Sep, 06:14


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा नावाला विरोध....

Subhash Shelke - सुभाष शेळके

24 Sep, 12:51


राज्यसेवा 2024 मध्ये जागा वाढवायच्या असतील तर सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे राहील...

अन्यथा 457 जागांमध्ये एकाही जागेची वाढ होणार नाही.

बरीच लोकं महसूल आणि गृह विभागाच्या जागा 2025 मध्येच जाव्यात म्हणून खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहेत.

सरकारला 2024 पूर्व परीक्षा निकाल लागेपर्यंत 2025 साठी मागणीपत्रके न देता ती 2024 साठीच अतिरीक्त म्हणून देता येणे सहज शक्य आहे.

यासाठी सर्वांची एकजूट महत्वाची आहे...

🔥🤝

Subhash Shelke - सुभाष शेळके

24 Sep, 09:40


राज्यसेवा 2024 मध्ये जागा वाढ करण्यासाठी महसूल विभागाला जागे करून त्या व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांना न्याय देऊ आणि बेरोजगार युवकांना राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी महसूल मधील रिक्त होणाऱ्या 100%जागांची भरती याच जाहिरातीत आणण्यासाठी सर्व मिळुन प्रयत्न करुया.

राज्यसेवा 2024 जागा वाढीसाठी सर्व समित्या, टेलेग्राम चालक मालक संघटना आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी एकत्र येण्याची गरज आहे.

Subhash Shelke - सुभाष शेळके

24 Sep, 09:00


सरपंच, उपसरपंचांचे मानधन दुप्पट

सरपंचांना ग्रामपंचायतीच्या वर्गवारीनुसार सहा, आठ आणि दहा हजार रूपये तर उपसरपंचांना दोन, तीन आणि चार हजार रूपये मिळणार.

राज्यात सुमारे 28 हजार ग्रामपंचायती आहेत.

Subhash Shelke - सुभाष शेळके

23 Sep, 12:33


राज्यसेवा 2024 मध्ये गृह आणि महसूल सहीत शेकडो जागा वाढवायच्या असतील तर सर्वात पहिले 2025 साठीची सर्व मागणीपत्रके थांबवायला लागतील.

आणि हे काम एकट्या दुकट्याचे नाही एवढे पण लक्षात ठेवा!

🤝

Subhash Shelke - सुभाष शेळके

23 Sep, 12:24


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

1 डिसेंबर रोजी आयोजीत होणार.

सरकारला विनंती आहे कोणत्याही परिस्थितीत 2025 साठीची मागणीपत्रके न पाठवता 2024 साठी अतिरीक्त जागांची मागणीपत्रक द्यावे.

Subhash Shelke - सुभाष शेळके

23 Sep, 05:27


मेरा रेशन 2.0 ॲप

रेशनकार्ड संदर्भातील सर्व कामे आणि माहिती इथे मिळेल.

डाऊनलोड करण्यासाठी लिंक.


https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.onenationonecard

Subhash Shelke - सुभाष शेळके

23 Sep, 04:43


राज्यसेवा परीक्षा 2022

#MPSC ने अंतीम निकाल जाहीर करून या उमेदवारांच्या शिफारशी तातडीने सरकारकडे कराव्यात.

अधिकारी म्हणून निवड झालेल्या लोकांची व्यवस्था एवढी बेकार हालत करत असेल तर सामान्यांची काय व्यथा!?

आज दुपारी ठीक 2 वाजता पत्रकार भवन पुणे याठिकाणी याबाबत पत्रकार परिषद आयोजीत केली असून सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहून सहकार्य करावे हि कळकळीची विनंती..

Subhash Shelke - सुभाष शेळके

23 Sep, 04:13


राज्यसेवा 2024 जागावाढ

महसूल विभागातील अपर जिल्हाधिकाऱ्यांची IAS तर उपजिल्हाधिकाऱ्यांची अपर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती राजमार्ग ठरेल.

24 अपर जिल्हाधिकारी IAS बनतील तर 86 उपजिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी बनतील.

सरकारने मनावर घेतले तर दोन्हीही मुद्दे याच आठवड्यात सुटू शकतात.

Subhash Shelke - सुभाष शेळके

22 Sep, 08:32


राज्यसेवा जागावाढ, गट ब आणि क जाहिरात तातडीने प्रसिद्ध होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे हा श्रेयवादाचा विषय नाही तर बेरोजगार भावी अधिकाऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे!

याची जाणीव सर्वांना असेल अशी अपेक्षा..!

Subhash Shelke - सुभाष शेळके

22 Sep, 04:26


कळकळीची विनंती...

PSI 2022 मधील ज्या उमेदवारांची यापूर्वी PSI पदावर किंवा इतर तत्सम पदावर निवड झाली असल्यास किंवा PSI 2022 मधुन रुजू होणार नसल्यास 'Opting Out' करून सहकार्य करावे.

तुमचे Opting Out एका कुटुंबाचे आयुष्य सुखकर करून त्यांचे स्वप्न पूर्ण करील.

बेरोजगारीची वेदना तुम्ही पण जाणत आहात!

Subhash Shelke - सुभाष शेळके

21 Sep, 02:23


केंद्रीय निवडणूक आयोगाचा विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी 27, 28 सप्टेंबरला मुंबई दौरा.

पूर्व इतिहासानुसार त्यानंतर पुढील 8 दिवसात आचारसंहिता जाहीर केली जावू शकते.

Subhash Shelke - सुभाष शेळके

20 Sep, 14:38


बिहार लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा 1929 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली.

Subhash Shelke - सुभाष शेळके

20 Sep, 04:04


RTO ऑनलाईन सेवा..

शिकाऊ, पक्के लायसन्स, पत्ता बदल, डूप्लीकेट लायसन्स या सुविधा फेसलेस उपलब्ध.

आधार वरील OTP आधारे वरील सेवांचा लाभ घेऊ शकता.

त्यासाठी कोणत्याही दलालाला पैसे देण्याची गरज नाही.

पक्क्या लायसन्स साठी तुम्हाला फक्तं वाहन चांगले चालवता यायला हवे.

https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/sarathiHomePublic.do?stCd=KA

टिप - 99% कामे दलालांना पैसे दिल्याशिवाय होत नाहीत या गोष्टीचा अजिबात विरोध करत नाही.

Subhash Shelke - सुभाष शेळके

20 Sep, 03:38


#UPSC एका वर्षात भरती प्रक्रिया पूर्ण करते तर केंद्र सरकार निवड झालेल्या अधिकाऱ्यांना साधारणपणे दरवर्षी 1 सप्टेंबरला मसुरीमध्ये प्रशिक्षणासाठी रूजू करून घेते.

दुसरीकडे #MPSC मधून निवड झालेल्या उमेदवारांना दोन दोन वर्षे नियुक्त्या मिळत नाहीत.

राज्यसेवा 2022 मधील 623 उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्यात.

Subhash Shelke - सुभाष शेळके

19 Sep, 05:54


#UPSC #MPSC किंवा कोणत्याही सरकारी नोकरीची तयारी पुर्ण वेळ करून ३-४ वर्षांचा कालावधी झाला असेल आणि हाताशी कोणतीही पोस्ट नसेल तर तुम्हाला काम करून अभ्यास करण्याची गरज आहे. घरुन पैसे न घेता कोणतीही पार्ट टाईम नोकरी करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनून अभ्यास करा.

काळाची गरज आहे!

Subhash Shelke - सुभाष शेळके

18 Sep, 09:17


वडिलोपार्जित जमिनीचे निःशुल्क वाटप...

तहसिलदारांकडे जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ८५ नुसार अर्ज करु शकता.

सर्वांना नोटिसा पाठवून सर्वांची सहमती असल्याची खात्री करून जमीन वाटपाचा आदेश काढतील.

वाटणीच्या आदेशावर तलाठ्याला अंमलबजावणी करावी लागेल.

दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची गरज नाही.

4,870

subscribers

341

photos

52

videos