HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR @historybymundesir Channel on Telegram

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

@historybymundesir


UPSC/MPSC/ SET/NET/PET/PSI/STI/ASO गट ब व क (Pre+Main) व इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे 🎯🎯 GS Notes and इतिहास विषयाच्या नोट्स
📝 दर्जेदार Pdf नोट्स.
🌹 (मार्गदर्शक:- Professor Ravi Munde Sir.) 🌹
🏆 (M.A. History & English,B.ed) 🏆

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR (Marathi)

इतिहासाच्या नोट्सवर एक नवीन दृष्टिकोन! 'HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR' चॅनलवर आपले स्वागत आहे. ह्या चॅनलवर, UPSC/MPSC/ SET/NET/PET/PSI/STI/ASO गट ब व क (Pre+Main) व इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे तयारीसाठी दर्जेदार GS नोट्स आपल्याला मिळणार आहेत. सहयोगाचा उंच असल्यामुळे, ह्या नोट्स चॅनलवर आपण व्यासपीठासाठी तयारी करू शकता. 'historybymundesir' या चॅनलवर, Professor Ravi Munde Sir यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विषयाच्या नोट्सची पीडीएफ आपल्याला मिळतील. त्यामुळे आपण नोट्स वाचून परीक्षेच्या तयारीच्या अभ्यासात मदत करू शकता. या चॅनलवर, Professor Ravi Munde Sir यांचे M.A. History & English, B.ed असल्यामुळे त्यांच्याकडून मिळणारे नोट्स विशेष मान्यता असल्याचं नक्की करून घ्या. तयार राहा, इतिहासातील मार्गदर्शन करणारे नोट्स येतील 'HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR' चॅनलवर!

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

14 Jan, 15:10


ऑनलाईन बॅच सामान्यज्ञान(GK) by Y. T.Munde Sir

विशेष ऑफर
    https://hrtmj.on-app.in/app/oc/405323/hrtmj?utm_source%3Dtelegram%26utm_medium%3Dtutor-course-referral-tg%26utm_campaign%3Dcourse-overview-app

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

14 Jan, 14:09


अंकगणित व बुद्धिमत्ता  ऑनलाईन बॅच by Y. T. Munde Sir
   
26 जानेवारी 2025 पर्यंत विशेष ऑफर
https://hrtmj.on-app.in/app/oc/462070/hrtmj?utm_source%3Dtelegram%26utm_medium%3Dtutor-course-referral-tg%26utm_campaign%3Dcourse-overview-app

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

14 Jan, 06:37


दादासाहेब फाळके पुरस्कार.pdf

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

14 Jan, 06:32


सूत्रावर आधारित प्रश्न

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

13 Jan, 06:00


सांकेतिक भाषा

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

11 Jan, 05:01


लयबद्ध मालिका

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

08 Jan, 13:09


Hi, Download RTO Exam app to prepare for Driving Licence Test:
Google Play: https://play.google.com/store/apps/details?id=com.pavansgroup.rtoexam

App Store: https://apps.apple.com/in/app/rto-driving-licence-test-india/id1535426974

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

10 Dec, 06:42


Number puzzles

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

06 Dec, 02:53


🌺 डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🌺

📝 पूर्ण नाव :डॉ. भिमराव रामजी सकपाळ.

🌹 जन्म :- 14 एप्रील 1891

जन्मस्थान :- महू, इंदौर मध्यप्रदेश

💐 मृत्यु :- दिर्घ आजारामुळे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतील आपल्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

👱‍♂ वडिल :- रामजी मालोजी सकपाळ

👩‍🦳 आई :- भीमाबाई मुबारदकर

👩‍🦰 पत्नी :- पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906-1935)
दुसरी पत्नी: सविता आंबेडकर (1948-1956)

शिक्षण :- एलफिन्सटन हायस्कुल, बाॅम्बे विश्वविद्यालय
1915 एम.ए. (अर्थशास्त्र)
1916 मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयातुन PHD
1921 मधे मास्टर ऑफ सायन्स
1923 मध्ये डाॅक्टर ऑफ सायन्स

🏛 संघ :- समता सैनिक दल, स्वतंत्र श्रम पार्टी,अनुसुचित जाति संघ
राजनितीक विचारधारा: समानता

📜 प्रकाशन :- अस्पृश्य आणि अस्पृश्यता यावर निबंध जाति का विनाश (द एन्नीहिलेशन ऑफ कास्ट)
विजा ची प्रतिक्षा ( वेटिंग फाॅर अ विजा )

📃 1920 ला ’मुकनायक’ हे वृत्तपत्र सुरू करून त्यांनी अस्पृश्यांच्या सामाजिक आणि राजकिय युध्दाला सुरूवात केली.

🏬 1920 ला कोल्हापुर संस्थानातील माणगाव येथे झालेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेत त्यांनी सहभाग घेतला.

🏣 1924 ला त्यांनी ’बहिष्कृत हितकारणी सभे’ची स्थापना केली. दलित समाजात जागृती पसरवण्याचा या

📑 1927 मधे ’बहिष्कृत भारत’नावाचे पाक्षिक सुरू केले.

🌅 1927 ला महाड या गावी चवदार पाण्याकरता सत्याग्रह करून येथील चवदार तलाव अस्पृश्यांना पिण्याकरता खुला करून दिला.

💎 1927 साली जातिव्यवस्थेचा पुरस्कार करणा.या ’मनुस्मृती’ चे त्यांनी दहन केले.

🖌 1928 ला गव्हर्नमेंट लाॅ काॅलेज मधे त्यांनी प्राध्यापक म्हणुन काम केले.

🛕 1930 साली नाशिक येथील ’काळाराम मंदिरात ’अस्पृश्यांना प्रवेश देण्याकरता त्यांनी सत्याग्रह केला.

🗼1930 ते 1932 या काळात इंग्लंड येथे झालेल्या गोलमेज परिषदेला ते अस्पृश्यांचे प्रतिनीधी बनुन उपस्थित राहिले त्या ठिकाणी त्यांनी अस्पृश्यांकरता स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली.

🎙 1932 ला इंग्लंड चे पंतप्रधान रॅम्स मॅक्डोनाल्ड यांनी ’जातीय निर्णय’ जाहिर करून आंबेडकरांची मागणी मान्य केली.

🕯पुढे त्या अनुषंगाने महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यात 25 डिसेंबर 1932 ला एक करार झाला. हा करार ‘पुणे करार’ या नावाने ओळखला जातो. या करारानुसार डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र मतदार संघाचा हट्ट सोडावा आणि अस्पृश्यांकरता कंपनी कायद्यात आरक्षीत सीट्स असावयास हव्यात असे मान्य झाले.

🏢 1935 ला डॉ. आंबेडकरांना मुंबई च्या गव्हर्नमेंट लाॅ काॅलेज येथे शिक्षक म्हणुन निवडले गेले.

🏤 1936 ला सामाजिक सुधारणांकरता राजकिय आधार असावयास हवा म्हणुन त्यांनी ’इंडिपेंडंट लेबर पार्टी’ स्थापना केली.

1942 ला ’शेड्युल्ट कास्ट फेडरेशन’ या नावाच्या पक्षाची स्थापना केली.

🏛 1942 ते 1946 या काळात त्यांनी गव्हर्नर जनरल यांच्या कार्यकारी मंडळात ’श्रम मंत्री’ बनुन कार्य केले.

🏫 1946 ला ’पिपल्स एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली.

🧿 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणुन काम केले. त्यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेत भारतीय राज्य घटनेचा मसुदा तयार केला.

📝  भारतीय राज्य घटना बनविण्यात योगदान दिले म्हणुन’भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार’ या शब्दांनी त्यांचा यथोचित गौरव करण्यात येतो.

🖋 स्वातंत्र्या नंतर पहिल्या मंत्री मंडळात त्यांनी कायदे मंत्री म्हणुन कार्य केले.

🏞 1956 ला नागपुर येथील ऐतिहासीक कार्यक्रमात आपल्या 5 लाख अनुयायांसोबत त्यांनी बौध्द धर्माची दिक्षा घेतली.

📝 डॉ. भिमराव आंबेडकरांची पुस्तकं – BR Ambedkar Books
📚 पहिला प्रकाशित लेख: भारतातील जाती: त्यांची प्रणाली, उत्पत्ती आणि विकास (Castes in India : Their Mechanism, Genesis and Development)

📕 ईव्होल्युशन आॅफ प्रोव्हिन्शिअल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया
जातीचा विनाश (Annihilation of Caste)

📘 हु वर द शुद्राज (Who were the Shudras?)

📗 द अन्टचेबल्स: ए थीसिस आॅन द
ओरिजन आॅफ अनटचेबिलिटी (The Untouchables : Who were They and why they became untouchables)

🖋 थाॅटस् आॅन पाकिस्तान (Thoughts on Pakistan)

🖌 द बुध्द अॅण्ड हिज धम्म (The Buddha and His Dhamma)
बुध्द या कार्ल माक्र्स (Buddha Or Karl Marx)

📜 1990 ला त्यांना मरणोत्तर भारतरत्न या भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आलं आहे.
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

30 Nov, 03:59


महत्वाचे युद्ध 1.pdf

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

28 Nov, 12:47


भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या स्मृतिदिनी आज मुंडे करिअर अकॅडमी संचलित अक्षरा मुलींची अभ्यासिकेचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला.अत्याधुनिक सर्व सुविधा युक्त असलेल्या या अभ्यासिकेचा सर्व मुलींनी फायदा घ्यावा.👍🏆🙏🥳💐कंधार-लोहा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत🇮🇳👏

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

28 Nov, 09:43


तैनाती फौज व खालसा धोरण.pdf

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

28 Nov, 02:30


🌺 महात्मा ज्योतिबा फुले  🌺

मूळ आडनाव – गोह्रे, कटगूण, सातारा

🌹 जन्म – 11 एप्रिल 1827,

💐 मृत्यू – 28 नोव्हेंबर 1890

📝 1869 – स्वतः कुळवाडी भूषण ही उपाधी लावली.

🌷 1852 – पुणे, विश्रामबाग वाड्यात मेजर कॅँडीच्या हस्ते सत्कार.

21 मे 1888 – वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी.

📜 युक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक.

  महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन परिचय :-

आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फूले यांना ओळखले जाते. फुले यांचे घराने मूळचे सातार्‍यापासून 25 मैल अंतरावर असलेले कटगून हे गाव होते.

📝 महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण :-

फुले यांच्या काळात ब्राम्हनेत्तर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. गोविंदरावांणी 1834 मध्ये ज्योतीबांना मराठी शाळेत घातले. परंतु फुले यांचे शाळेत जाने काही उच्चवर्णीयांना आवडले नाही कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे त्यांचे म्हणणे होते. अशाही परिस्थितीत महात्मा फुलेनी 1834 ते 1838 हे चार वर्ष कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. चौथे वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कालावधिपर्यंत महात्मा फुलेंचे शिक्षण थांबले. 1841 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पुन्हा गोविंदरावांनी स्कॉटिश कमिशनर यांच्या ईग्रजी शाळेत घातले.

🌼 विवाह :-
महात्मा फुले 13 वर्षाचे असतांना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय 8 वर्षाचे होते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.

📋  संस्थात्मक योगदान :-
🏬 3 ऑगस्ट 1848– पुणे येथे भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.

🏢 4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.

🏣 1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.

🏤 1855 – प्रौढांसाठी रात्र शाळा.

1863 – बालहत्या प्रतिबंधक गृह.

⛺️ 1877 – दुष्काळपिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प.

🗼 10 सप्टेंबर 1853 – महार, मांग इ. लोकांस विद्या शिकवणारी संस्था.

⛲️ 24 सप्टेंबर 1873 – सत्यशोधक समाजाची स्थापना.

🏩 व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना.

🏭 1880 – म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.

📋 महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन :

📒 1855 – ‘तृतीय रत्न‘ नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).

📕 1868 – ‘ब्राम्हणांचे कसब‘

📙 1873 – ‘गुलामगिरी‘ हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्‍या लोकांना अर्पण केला.

🗞1873 – अस्पृश्यता निवारणाचा पहिला कायदा.

📖 1 जानेवारी 1877 – ‘दीनबंधू‘ मागासलेल्या दिनाच्या दु:खाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केली.

📰 1880 पासून लोखंडे यांनी दिनबंधुचे व्यवस्थापन सांभाळले.

🗓 1883 – शेतकर्‍यांचा आसूड हा ग्रंथ.

📙 1885 – इशारा सत्सार “The Essense Of Truth” सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. या ग्रंथास विश्व कुटुंब वादाचा जाहीर नामा म्हणतात.

📙 अस्पृश्यांची कैफियत.

🎙शिवाजी महाराजांचा पोवाडा. 

📜 महात्मा ज्योतिबा फुले यांची वैशिष्ट्ये

थॉमस पेनच्या “The Rights Of Man” या पुस्तकाचा प्रभाव.

💐 1864 – पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.

⌛️ 1868 – अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.

🌹 1879 – रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला.

2 मार्च 1882 – हंटर कमिशन पुढे साक्ष.

👦 ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले.

उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय.

📝 सत्यशोधक समाजाचे ब्रीद – ‘सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी‘

सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन या शब्दात गौरव केला.
🌺🌸🌼🌻🌞🌾💐🌷🌼🎄

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

12 Nov, 10:33


RAVI MUNDE-1.pdf

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

08 Nov, 08:15


आमचे मित्र विठ्ठल बडे सर यांचे पोलीस भरती ग्रंथ भाग 1 हे पुस्तक 40% सवलतीच्या दराने उपलब्ध .
मूळ किंमत:- 680 रु, ऑफर किंमत:-400 रु.

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

22 Oct, 06:54


🌺 सुखदेव रामलाल थापर 🌺

🌹जन्म :-१५ मे १९०७ नौघरा, लुधियाणा (पंजाब)

👩‍🦳 आई :- श्रीमती राल्ली देवी.

👱‍♂ वडील :-श्री. रामलाल थापर.

⛲️ संघटना :- ‘नौजवान भारत सभा".

🌹 मृत्यु :-२३ मार्च १९३१.

⛳️ सुखदेव यांचा उल्लेख हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेचे एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून होतो. या संघटनेखेरीच ते पंजाब प्रांतातील इतरही संघटनांचे कार्यकर्ता होते. भारतमातेला इंग्रजांच्या तावडीतून आझाद करणे हा त्यांचा एकमात्र हेतू.

🏨 कालांतराने काही क्रांतीकारकांनी मिळून ‘नौजवान भारत’ सभेची स्थापना केली. सुखदेव हे या संघटनेचे सदस्य होते. ते लाहोर येथील नॅशनल कॉलेज येथे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी जात होते. तिथे  भारताच्या समृद्ध इतिहासाबद्दल तेथील विद्यार्थ्यांना माहिती देण्याचे व मार्गदर्शन करण्याचे कार्य करत होते.

💣 ब्रिटीश अधिकारी सौन्डर्सची हत्त्या, सेन्ट्रल असेम्ब्ली मधील बॉम्बस्फोट इ. प्रकरणांत दोषी ठरवून सुखदेव थापर, भगतसिंग आणि शिवराम राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली...

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

22 Oct, 06:54


🌹 भगतसिंग 🌹

जन्म १९०७ च्या २८ सप्टेंबर रोजी बंगा येथे झाला.

📝भगतसिंगांच्या जन्माच्या वेळी सरदार किशनसिंग आणि सरदार अजितसिंह यांची जेलमधून सुटका झाली, म्हणून हा मुलगा भाग्यवान आहे असे जाणून आजीने त्याचे नाव भगतसिंग ठेवले.

🎯 जालियनवाला बागेचे हत्याकांड भगतसिंग यांच्या मनावर खोल परिणाम करून गेले होते. प्रसिद्ध क्रांतिकारक भगवतीचरण हे कॉलेजात भगतसिंगांच्या पुढे २ वर्षे होते तर सुखदेव हे त्यांचे वर्गमित्र होते.

📜 वीर सावरकरांचा प्रसिद्ध ग्रंथ 'दि इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डेन्स - १८५७' भगतसिंगांना तोंडपाठ होता. घरच्या लोकांनी लग्न ठरवल्यावर त्यांनी घर सोडले.

🔮 देशसेवेचे व्रत घेतल्यामुळे आपण लग्न करू शकत नाही असे वडिलांना कळवून त्यांनी त्यांची क्षमा मागितली. कानपूरला आल्यावर 'बलवंतसिंग' या नावाने त्यांनी अनेक लेख लिहिले. अनेक धाडसी सत्कार्यात ते सक्रिय होते. 

लाला लजपत राय यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. त्यांना मारणार्‍या स्कॉटचा बदला घेत असताना साँडर्स तावडीत सापडल्याने साँडर्सला उडविण्यात आले. या प्रकरणात सर्वजण फरारी झाले. क्रांतिकारकांचे म्हणणे काय आहे हे जाहीररीत्या सर्वांना समजावे यासाठी त्यांनी एक योजना आखली. 'पब्लिक सेफ्टी' बिलाविरूद्ध देशभर संताप व्यक्त होत होता. या बिलावर सेंट्रल असेंबलीत चर्चा चालू असताना बटुकेश्वर दत्त आणि भगत सिंह यांनी असेंबलीत बाँब फेकून गोंधळ उडवून दिला. स्वतःहून अटक करून घेतली. कोर्टात आपली बाजू प्रभावीपणे मांडली. कोर्टाने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा फर्मावली.

🌹 २३ मार्च १९३१ ला 'इन्कलाब झिंदाबाद' च्या घोषणा देत ते तिघेही हसत हसत फासावर चढले.
🪢🪢🪢🪢🪢🪢🪢🪢🪢🪢🪢🪢

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

22 Oct, 06:54


🌺 शिवराम हरी राजगुरू 🌺 

🌹 जन्म : खेड-पुणॆ, २४ ऑगस्ट १९०८.

🥀  मृत्यू : लाहोर, २३ मार्च १९३१.

🌸 हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात फाशी गेलेले क्रांतिकारक होते.

🌼 ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते.

🌷 डॉक्टर हर्डीकर यांच्या सेवा दलामध्ये असतानाच त्यांचा संबंध हा हिंदुस्तान रिपब्लिकन पार्टी या क्रांतिकारी संघटनेशी आला. 

💐 चंद्रशेखर आझाद, भगत सिंग आणि सुखदेव अशा क्रांतिकारकांच्या सहवासात आल्याने ते सशस्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले. 

🍁 लाला लजपत राय यांच्यावर साँडर्स नावाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी लाठीहल्ला केला, त्यात जखमी होऊन ते मरण पावले.

🔫 त्याचा बदला घेण्यासाठी १७ फेब्रुवारी १९२८ रोजी राजगुरू, भगतसिंग यांनी लाहोर येथे साँडर्सवर गोळ्या घालून त्यांना ठार केले.

🎄 नॅशनल बँकेची लूट, क्रांतिकारक जोगेश चंद्रा चॅटर्जी यांची सुटका यांतही राजगुरूंचा सहभाग होता,

🥀 २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग व सुखदेव, राजगुरु यांना फाशी देण्यात आली........
=======================

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

19 Oct, 16:38


RAVI MUNDE-1.pdf

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

15 Oct, 04:31


इतिहास - सराव पेपर.pdf

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

15 Oct, 02:14


HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR:
🌹 APJ Abdul Kalam  🌹

पूर्ण नाव :- अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम

🌹 जन्म :- १५ ऑक्टोबर १९३१
रामेश्वरम, तामिळनाडू.
📋 वाचन प्रेरणा दिन

💐 मृत्यू :- २७ जुलै, २०१५ (वय ८३)
शिलाँग, मेघालय.

📝 अवुल पाकीर जैनुलाब्दीन तथा ए.पी.जे अब्दुल कलाम  हे  भारताचे माजी राष्ट्रपती तसेच एक अभियंता तसेच  एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते.

🚀 प्रामुख्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे काम केले.
🛸 भारताच्या नागरी अंतराळ कार्यक्रमात आणि लष्करी क्षेपणास्त्र विकासाच्या प्रयत्नांमध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. अशा प्रकारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासावर केलेल्या कामामुळे ते भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले.

🎯 त्यांना "पीपल्स प्रेसिडेंट" (जनतेचे राष्ट्रपती) म्हणून व्यापकपणे संबोधले जाते

📝 राष्ट्रपतीपदानंतर कलाम हे शिक्षण, लेखन आणि सार्वजनिक सेवेच्या नागरी जीवनात परतले.

🗞भारतरत्नसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचे ते प्राप्तकर्ते होते

📒 शिक्षण : श्वार्ट्‌झ (Schwartz) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी (१९५४).

🏢 नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली (१९६०).

🔭 १९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.

🔮१९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.

🚀 १९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर (ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.

🎯 १९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.
✈️ १९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक

🛰 १९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)
🎖१९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त

🥏 १९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.
🌍 १९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती.

🏤 रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.
🛰 १९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.
🛰 १९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.

🥏 १९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री
व डी.आर.डी.ओ.चे प्रमुख या नात्याने त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टॅंक) हा रणगाडा व लाइट कॉंबॅट एरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

📜 १९९४ : 'माय जर्नी ' हा कवितासंग्रह प्रकाशित.
🗞 २५ नोव्हें. १९९८ : भारतरत्‍न हा पुरस्कार प्राप्त.
🧿 २००१ : सेवेतून निवृत्त.
🔮 २००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक.

👨‍👧‍👧 ते विद्यार्थ्यांना सांगेल की पाच वाक्य नेहमी स्वतःशी बोलत रहा –

1⃣  मी सर्वात बेस्ट आहे.
2⃣ मी हे काम करू शकतो.
3⃣  चॅम्पियन होतो आणि आहे.
4⃣ देव नेहमी माझ्या सोबत आहे.
5⃣ आजचा दिवस माझा आहे.

📝 ग्रंथ संपदा  :-१) अदम्य जिद्द,२) इग्नाईटेड माईंड : अनशिलिंग पावर विदिन इन इंडिया,३) इंडिया २०२० : व्हिजन फाँर द न्यु मिलनियम ,४) इंडिया माय ड्रीम
५) इन व्हिजन अँण्ड इम पाँवर्ड नेशन फाँर सोसायटल ट्रान्सफाँरमेशन,६) विंग्ज आँफ फायर,७) टर्निंग पाँईंट,८) दिपस्तंभ


💐 27 जुलै 2015 रोजी शिलॉंग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये लेक्चर देण्यासाठी ते गेले असताना त्यांना काही अस्वस्थ वाटू लागलं थोडी विश्रांती घेतल्यावर त्यांना थोडा बरही वाटलं त्यांनी लेक्चर द्यायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात ते स्टेजवरच कोसळले कलाम यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं पण संध्याकाळी सात वाजून 45 मिनिटांनी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा निधन झालं.

कलाम साहेब आज आपल्यात नाहीत पण ते आपल्यासाठी आपल्या देशासाठी जे काही करून गेलेत त्यासाठी आपल्या देशाच्या पुढच्या अनेक पिढ्या त्यांच्या ऋणी राहतील सर्वांच्या लाडक्या असलेल्या या भारतरत्नाला अखंड भारताचा सलाम.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो..

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

09 Oct, 06:38


नाना जगनाथ शंकरशेठ- New Notes

HISTORY NOTES BY RAVI MUNDE SIR

09 Oct, 04:46


थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या

📜● आधुनिक मनू : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

📝● दलितांचा मुक्तीदाता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔮● कर्मवीर : भाऊराव पायगोंडा पाटील

🪴● आधुनिक भगीरथ : भाऊराव पायगोंडा पाटील

🌍● महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिग्टन : भाऊराव पायगोंडा पाटील

🏵● महर्षी : धोंडे केशव कर्वे / विठ्ठल रामजी शिंदे

🌷● राष्ट्रसंत : तुकडोजी महाराज

🌾● हिंदुस्थानच्या कुषक क्रांतीचे जनक : पंजाबराव देशमुख

🪐● महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचे आद्यप्रवर्तक : लोकशाहीवादी गोपाळ हरी देशमुख

🚑● धन्वंतरी : डॉ. भाऊदाजी लाड

📒● राजर्षी : शाहू महाराज

🏢● वस्तीगृहाचे आद्यजनक : शाहू महाराज

🗼● सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष : शाहू महाराज

⛲️● असंतोषाचे जनक : लोकमान्य टिळक

🎡● जहाल राजकारणी : लोकमान्य टिळक

📃● मराठी भाषेचे शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर

📑● आधुनिक गद्याचे जनक : विष्णुशास्त्री चिपळूणकर

📈● निबंधकार : विष्णुशास्त्री चिपळूणकर

📉● मराठी भाषेचे शिल्पकार : विष्णुशास्त्री चिपळूणकर

● क्रांतीसिंह : नाना पाटील

🗡● सेनापती : पांडुरंग महादेव बापट

🛡● सार्वजनिक काका : गणेश वासुदेव जोशी

🧿● मराठी भाषेतील पाणिनी : दादोबा पांडुरंग तर्खडकर

🏺● महाराष्ट्रातील पहिले धर्मसुधारक : दादोबा पांडुरंग तर्खडकर

🖌● महाराष्ट्रातील मार्टिन ल्युथरकिंग : महात्मा ज्योतीबा फुले
📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋📋

5,365

subscribers

740

photos

26

videos