GS Research Center Pune @gsresearchcenterpune Channel on Telegram

GS Research Center Pune

@gsresearchcenterpune


सर्व स्पर्धा परीक्षासाठी आवश्यक असणाऱ्या संपूर्ण सामान्य ज्ञानाची (General Studies) मोफत तय्यारी करून घेतली जाईल.
# सर्व सरळसेवा +कंबाईन गट ब +गट क

आमचा धक्का.. तुमचा विजय पक्का..!

GS Research Center Pune (Marathi)

GS Research Center Pune च्या Telegram चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे! या चॅनलवर सर्व स्पर्धा परीक्षासाठी आवश्यक असणाऱ्या संपूर्ण सामान्य ज्ञानाची (General Studies) मोफत तय्यारी करण्याची संधी आहे. या चॅनलवर सर्व सरळसेवा, कंबाईन गट ब, गट क साठी मदतीच्या संधी उपलब्ध आहेत. आमच्या संघाचा धक्का आपल्याला तुमच्या विजयासाठी प्रेरित करणार आहे. त्याचबरोबर, हा चॅनल सर्व उमेदवारांसाठी उपयुक्त आहे, ज्यामध्ये अभ्यास, मार्गदर्शन, टिप्स आणि इतर महत्वाच्या माहितीशी सर्व उपलब्ध आहे. आपल्याला ह्या Telegram चॅनलवर जाऊन सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या नेटिंग, संघ आणि सराव अन्य उपयुक्त माहिती दिली जाते. कोणत्याही विषयावर अभ्यास करण्याची संधी आहे, तर तुम्ही GS Research Center Pune चॅनलवर जाऊन पहा.

GS Research Center Pune

03 Jan, 11:16


# Descriptive

GS Research Center Pune

03 Jan, 10:40


सोसून किती कष्ट, धरलास स्त्री शिक्षणाचा ध्यास...
पुण्यकर्माने तुझ्या झाला आमचा हरेक क्षेत्रात विकास ..
कार्याची महंती तुझ्या वर्णावी काय...
थोर तुझे उपकार माझे सावित्री माय...!💐

GS Research Center Pune

03 Jan, 10:37


FDI गुंतवणुकीत महाराष्ट्र No.1 राज्य
MH
KT
GJ

GS Research Center Pune

02 Jan, 13:15


# Descriptive 😄

GS Research Center Pune

26 Dec, 18:03


भारताचे माजी पंतप्रधान, एक हिरा आज भारताने गमावला..
त्यांचं आर्थिक क्षेत्रातील कार्य अखिल भारतीय जनतेच्या मनात सदैव राहील..
भावपूर्ण श्रद्धांजली🙏💐
Manmohan Singh 🙏🏻

GS Research Center Pune

23 Dec, 19:08


Bata do na 😂

GS Research Center Pune

21 Dec, 19:25


DEPT. PSI admit card Available ..

Download ..

https://mpsconline.gov.in/candidate/main#

GS Research Center Pune

20 Dec, 12:39


Share 5_6280584368326971966.pdf

GS Research Center Pune

20 Dec, 12:38


Share 1b9d156a-c2d0-4b8a-9c81-bd3c88edab22.pdf

GS Research Center Pune

20 Dec, 12:37


जा. क्र. 133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

GS Research Center Pune

20 Dec, 05:54


डिजिटल अरेस्ट म्हणजे काय रे भाऊ??

GS Research Center Pune

20 Dec, 01:21


Batch 124 PSI
Passing out Parade 😍

#MPA

https://www.youtube.com/live/SQFbMT7fyF8?feature=shared

GS Research Center Pune

19 Dec, 11:49


Answer key आणि कट ऑफ

नमस्कार मी भारत पांढरे सध्या PSI पदावर कार्यरत असून माझी MPSC 2022 मधून DYSP पदी निवड झाली आहे.
      राज्यसेवा पूर्व परीक्षेची  answer key आलेली आहे. कट ऑफ बद्दल चर्चा सुरू आहेत. प्रत्येक टेलिग्राम चॅनेल, यूट्यूब चैनल तज्ञ मंडळी वेगवेगळे कट ऑफ बद्दल अंदाज सांगत आहेत आणि काही जण अजून दोन-तीन दिवसात सांगतील. परंतु या सर्व चर्चांमध्ये न राहता मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करावी. याबद्दल एक अनुभव शेअर करतो. 2022 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला first answer key नुसार नुसार माझा फक्त 100 स्कोर होता. तेव्हा पण cut off 110-115 दरम्यान लागेल या चर्चा सुरू होत्या. Second answer key नुसार माझा स्कोर वाढून 106.5 झाला व cut off पण 106.5 इतकाच लागला. तेव्हा एका नावाजलेल्या Telegram channel च्या admin सोबत cut off का एव्हढा जास्त सांगितला म्हणून वाद देखील झाला होता. तेव्हाच त्यांना सांगितलं होतं येणाऱ्या निकालमध्ये मी DYSP होणार म्हणून. First key आल्यानंतर सुरुवातीला 10-15 दिवस study  होत नव्हता. नंतर ठरवलं की नापास झालो तरी हरकत नाही पण study करायचा. स्वतःवर विश्वास ठेवला व इतर चर्चांमधून स्वतःला अलिप्त ठेवून अभ्यास सुरू केला व mains ला  first key नुसार 472 score आला आणि शेवटी DYSP पदावर निवड झाली. मी जर self belief ठेवला नसता तर मी कधीच पास झालो नसतो. सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की तुमचा स्कोर कितीही असू देत तुम्हाला जर पुढे अभ्यासच करायचा असेल तर तुम्ही वायफळ चर्चांमध्ये वेळ वाया न घालवता राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करावी. शेवटची objective exam आहे. इश्क है तो रिस्क है असं म्हणून study सुरू करा. ओम शांती ओम चित्रपटातलं शाहरुख खानचा डायलॉग तुम्हाला आठवत असेलच "अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है” . 🏆🏆
#cut_off
#answer_key
#prediction
          भारत पांढरे (DYSP 2022).

GS Research Center Pune

19 Dec, 11:47


भारतातील 57 वा व्याघ्र प्रकल्प बनला "रतापाणी"
मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यात भारतातील विंध्य पर्वतरांगात स्थित रतापाणी व्याघ्र प्रकल्प आहे

GS Research Center Pune

19 Dec, 05:17


🔥ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ने ब्रेन रॉट हा शब्द वर्षातील शब्द (वर्ड ऑफ द इयर) निवडला आहे....

GS Research Center Pune

18 Dec, 09:23


#Clerk 2023

GS Research Center Pune

18 Dec, 09:14


महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023

लिपिक टंकलेखन + कर सहायक  Court Cases तारखा

1⃣पहिली तारीख - 8 ऑगस्ट

2⃣दुसरी तारीख - 14 ऑगस्ट

3⃣तिसरी तारीख - 30 ऑगस्ट

4⃣चौथी तारीख - 30 सप्टेंबर

5⃣पाचवी तारीख - 14 ऑक्टोबर

6⃣सहावी तारीख - 29 ऑक्टोबर

7⃣सातवी तारीख - 13 नोव्हेंबर

8⃣आठवी तारीख - 9 डिसेंबर

9⃣नववी तारीख : 18 डिसेंबर

1⃣0⃣दहावी तारीख - 6 जानेवारी 2025

GS Research Center Pune

16 Dec, 11:56


BMC लिपिक २०२४ Response Sheets उपलब्ध.

लिंक :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

GS Research Center Pune

16 Dec, 08:48


1998 पद्म श्री
2002 पद्म भूषण
2023 पद्म विभूषण

GS Research Center Pune

06 Dec, 19:05


अभिनव नवभारत इन्स्टिटयूट पुणे -द्वारे
Approach building test Series Course -


संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क ( COMBINE prelim test series)

* आयोगाच्या धरती वर प्रश्नपत्रिका असतील -

* 1 डिसेंबर पासून दर रविवारी एक प्रश्नपत्रिका घेतली जाईल.

* कोर्स घेतल्यानंतर pdf स्वरूपात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाईल. एकूण 5 test घेतल्या जातील.

* निवड झालेल्या अधिकाऱ्यांमार्फत प्रश्नपत्रिका सेट केली जाईल.

* विडिओ lecture च्या माध्यमातून अधिकाऱ्यांमार्फत प्रश्नपत्रिका विश्लेषण app मध्येच दिले जाईल -

* विश्लेषण देत असताना आयोगाचे संबंधित pyq देखील सोबत घेतले जातील.

* विश्लेषण देत असताना पर्यायी कट मेथड आणि इतर काही महत्वाच्या aproach बिल्डिंग ट्रिक्स दिल्या जातील -

* 10 डिसेंबर पर्यंत कोर्स घेणाऱ्या मुलांसाठी 499 चा कोर्स 399/- मध्ये उपलब्ध असेल -

* course link- https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.zcaza

* अधिक माहितीसाठी संपर्क - PSI संतोष पवार सर - 9158916841, 7038456869

GS Research Center Pune

30 Nov, 16:08


राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी सर्व परीक्षार्थी मित्रांना मनापासुन शुभेच्छा .... तुम्ही वर्षभर प्रामाणिक कष्ट केलेले आहेत...आता फक्त त्याचं execution बाकी आहे....संयमाने दोन्ही पेपर सोडवा...🌿

Keep calm, stay cool....!

All d very best....
You are going to Rock it 🤟💪

विजयी भव....!😍❤️🔥🔥🔥

GS Research Center Pune

28 Nov, 15:13


@GSResearchCenterpune

GS Research Center Pune

27 Nov, 06:13


अभिनव नवभारत इन्स्टिटयूट पुणे -द्वारे
Approach building test Series Course -


संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क ( COMBINE prelim test series)

* आयोगाच्या धरती वर प्रश्नपत्रिका असतील -

* 1 डिसेंबर पासून दर रविवारी एक प्रश्नपत्रिका घेतली जाईल.

* कोर्स घेतल्यानंतर pdf स्वरूपात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाईल. एकूण 5 test घेतल्या जातील.

* निवड झालेल्या अधिकाऱ्यांमार्फत प्रश्नपत्रिका सेट केली जाईल.

* विडिओ lecture च्या माध्यमातून अधिकाऱ्यांमार्फत प्रश्नपत्रिका विश्लेषण app मध्येच दिले जाईल -

* विश्लेषण देत असताना आयोगाचे संबंधित pyq देखील सोबत घेतले जातील.

* विश्लेषण देत असताना पर्यायी कट मेथड आणि इतर काही महत्वाच्या aproach बिल्डिंग ट्रिक्स दिल्या जातील -

* 10 डिसेंबर पर्यंत कोर्स घेणाऱ्या मुलांसाठी 499 चा कोर्स 399/- मध्ये उपलब्ध असेल -

* course link- https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.zcaza

* अधिक माहितीसाठी संपर्क - PSI संतोष पवार सर - 9158916841, 7038456869

GS Research Center Pune

23 Nov, 11:38


बरं ते...EvM वर मला ज्या उमेदवाराला मतदान करायचं होतं...त्याच्यासमोरचे बटन नीट दाबले गेले नाही....तर मग मी न्यायालयात जाऊ शकतो का??

म्हणे,आम्हाला खराब आला होता...😅

👩‍💻🧑‍💻 key....😏

GS Research Center Pune

23 Nov, 11:33


राज्यसेवा 8 दिवसांनी पिछाडीवर

अराजपत्रित गट-ब 45 दिवसांनी पिछाडीवर

गट-क 71 दिवसांनी पिछाडीवर

🔥🔥🔥🔥🔥

GS Research Center Pune

21 Nov, 00:30


कोकणातील औद्योगिक प्रकल्प

GS Research Center Pune

19 Nov, 04:43


मिस युनिव्हर्स 2024 चा खिताब मिस डेन्मार्क म्हणजेच व्हिक्टोरिया कजेर

• ७३ मि. यूनिवर्स पुस

भारतीय मिस युनिवर्स खेळाडू :

• यावेळी मिस युनिव्हर्स 2024 चा खिताब मिस डेन्मार्क म्हणजेच व्हिक्टोरिया कजेर हिने मिळवला आहे.

• सुष्मिता सेन (1994)

• लारा दत्ता (2000)

• हरनाज़ संधू (२०२१)

• पहिली रनरअप नायजेरियाची चिडिन्मा अदेत्शिना,

• दुसरी रनरअप मेक्सिकोची मारिया फर्नांडा बेल्ट्रान, तर

• तिसरी रनपअप थायलंडची ओपल सुचता चुआंगश्री ठरली आहे.

मिस युनिव्हर्स

• स्थापना : 28 जून 1952

• मुख्यालय : न्यूयॉर्क (यूएसए)

• ठिकाण : एल. साल्वाडोर (जोस अडोल्फो पिने हेना)

GS Research Center Pune

19 Nov, 04:40


महाराष्ट्र जनगणना -२०११ - संक्षिप्त

GS Research Center Pune

16 Nov, 13:22


वास्तव कट्टाचे संपादक आणि विद्यार्थी चळवळीतील किरण निंभोरे सर यांचे आवाहन -

GS Research Center Pune

16 Nov, 12:00


*का येतात बच्चू कडू कायम निवडून - ऐका स्पर्धा परीक्षा विद्यार्थी यांच्या प्रतिक्रिया*
https://youtu.be/DBo7lnJ4jZs?si=OD0ug9aB3qREO84P

GS Research Center Pune

16 Nov, 08:08


MPSC STUDENT RIGHT ASSO चे महेश बडे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन -

GS Research Center Pune

16 Nov, 07:44


सचिन ढवळे सर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन -

GS Research Center Pune

14 Nov, 05:55


जो बनना है जल्दी बनो,
कही ख़्वाब का स्वेटर तैयार हो और पता चले सर्दी का मौसम ही बदल गया।

GS Research Center Pune

14 Nov, 05:54


❇️IMP news for Exam

हॉकी मधील सर्वोत्तम खेळाडू  पुरस्कार 2024
👉  हरमनप्रीतसिंग आणि श्रीजेश यांना


संजीव खन्ना हे सोमवारी (दि. 11 नोव्हेंबर) देशाचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील.


'मृदगंध जीवनगौरव पुरस्कार' पुरुषोत्तम
बेर्डे यांना जाहीर.
👉 26 नोव्हेंबरला रंगणार 14 वा 'मृदगंध
पुरस्कार सोहळा

मतदानासाठी 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य.

न्यायमूर्ती भूषण गवई नालासा चे अध्यक्ष

GS Research Center Pune

14 Nov, 05:52


न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?

GS Research Center Pune

13 Nov, 10:29


जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

GS Research Center Pune

13 Nov, 07:40


युवकांचा आवाज
बच्चुभाऊ कडू..!!

युवकांसाठी संजीवनी असणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी आपण काम केले आहे. आता पोलीस भरतीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. स्पर्धा पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत. अचलपूर आणि चांदूरबाजार येथे पोलीस भरतीसाठी मैदानी व्यवस्था करणार आहोत. तब्बल 18000 पोलीस भरती होणे बाकी आहे, ती कशा पद्धतीने करता येईल यासाठी आम्ही शर्तीने प्रयत्न करू.




*🚨आमदार बच्चू कडू यांच्याशी जुळण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..*
https://bacchukadu.in/whatsapp/

आमदार बच्चू कडू यांचे इतर अपडेट्स मिळवण्यासाठी..

*फेसबुक पेज -*
https://www.facebook.com/share/1K4beyzDE8/

*इन्स्टा पेज-*
https://www.instagram.com/bacchukaduformaharashtra

🔥टीम
*महाराष्ट्रासाठी बच्चू कडू*

GS Research Center Pune

13 Nov, 06:41


9/12 फायनल

GS Research Center Pune

13 Nov, 06:38


Clerk next hearing ..

9/12/2024

GS Research Center Pune

04 Nov, 18:14


👉 NCERT Biology Imp Concepts.pdf

GS Research Center Pune

03 Nov, 16:50


सदाशिव पेठेच्या बाहेर पण खूप मोठं जग आहे पोरांनो....

५ वर्ष अभ्यास केल्यानंतर तुला STI पोस्ट भेटली नंतर पण राज्यसेवा पोस्ट साठी तू सारखी सुट्टी टाकून तू अभ्यास केला.

पुन्हा ३ वर्षानंतर तू उपशिक्षणाधिकारी झाला.
पुन्हा तेच चालू झालं.

पुन्हा सुट्टी टाकून तू राज्यसेवा मधून वर्ग १ चे पद मिळवण्यासाठी तू मागील ४ वर्ष झाले सुट्टी टाकून सदाशिव पेठेत अभ्यास करत असतो.
अंदाजे तुझ वय ३४-३५ झालं आहे ....

खर तू तुझं बाकी आयुष्य कधी जगणार
आपले कुटुंब, मित्र, नातेवाईक यांच्यासाठी कधी वेळ देणार...

मित्रांनो खरचं आयुष्य एकदाच आहे, जगून घ्या..

IPS, IRS होऊन पण खुश नाहीत म्हणून IAS चा अभ्यास करणारी पोर पाहिली आहेत मी....

खरचं IAS झाल्यावर तरी माणूस खुश असतो की नसतो हे शोधलं पाहिजे ..

आपण कधी तरी कोणत्या गोष्टीवर समाधान मानणार आहेत की नाही.......

कुठे तरी आपण आपलं आयुष्य जगणं सोडून देतोय....

मरता मरता कोणी तरी म्हणून गेलं...
जगायचं राहून गेलं.....

अनामिक ...............

( ज्यांना अजून कोणतीच नोकरी नाही त्यांच्यासाठी ही पोस्ट नाही. )

GS Research Center Pune

02 Nov, 08:59


मंत्र्याची संपती..

सर्वात श्रीमंत मंत्री तानाजी सांवत असून त्यांची एकून संपत्ती २१८.१ कोटी रुपये आहे.
..

GS Research Center Pune

31 Oct, 02:42


आकाश कंदीलाच्या रंगीत प्रकाशात..बोचऱ्या थंडीच्या झोंबणाऱ्या पहाटे..सडा शिंपणाचं अलंकृत वस्त्र नेसलेल्या अंगणात..तुळशीच्या पदरी तेवत राहणारी पणती.
काही वेळाने सूर्य उगवणारच असतो..तत्पूर्वीच्या अंधाराला मागे सरायचं बळ फक्त त्या पणतीकडे असतं..ते बळ सबंध जनांना देणारा सण..❤️
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

GS Research Center Pune

30 Oct, 17:17


Share State board Economy imp.pdf

GS Research Center Pune

30 Oct, 17:17


🟢   इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये  🟢

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले


◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन


◾️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड

◾️स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता


◾️राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम


◾️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह


◾️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.


◾️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.


◾️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष


◾️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन


◾️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी


◾️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी


◾️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय


◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले
‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक

◾️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी


◾️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर


◾️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार


◾️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”
– गारेट ब्रिटीश इतिहासकार.


◾️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु


◾️क्रांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.


◾️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.


◾️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.


◾️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे


◾️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.


◾️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही. 
भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक


◾️इंग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी

◾️असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.

◾️सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.

◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक


◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना


◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स

GS Research Center Pune

30 Oct, 17:12


👉 NCERT Biology Imp Concepts.pdf

GS Research Center Pune

30 Oct, 06:33


MPSC मध्ये संघर्ष का अटळ आहे?

👉जाहिरात येण्यासाठी संघर्ष
👉फॉर्म भरण्यासाठी संघर्ष
👉वेबसाईट नीट चालत नाही म्हणून सारख आयोगाला कॉल करण्यासाठी संघर्ष
👉परीक्षा वेळेवर घेण्यासाठी संघर्ष
👉Ans key वेळेत येण्यासाठी संघर्ष
👉न्यायालयीन प्रोसेस मुळे संघर्ष
👉केस मिटण्यासाठी संघर्ष
👉मेरिट लिस्ट लागण्यासाठी संघर्ष
👉निकाल लागण्यासाठी संघर्ष

एवढा संघर्ष करून बोटावर मोजण्या इतकेच पास होतात. आणि भोगलेला संघर्ष पुन्हा सुरू होतो.

इतर आयुष्यात येणारे problems वेगळे च.

MPSC ने स्वतः मध्ये सुधारणा करणे खूप गरजेचे !

GS Research Center Pune

29 Oct, 18:02


# statutory bodies.pdf
@GSResearchCenterpune

GS Research Center Pune

29 Oct, 18:01


Share Geo NCERT Maps (legend) compilation (1) (1).pdf

GS Research Center Pune

29 Oct, 15:33


*PSI पदांच्या 1000+ जागासाठी, Mpsc Clerk 2000+ जागा , पोलीस भरती 15000 जागा तसेच इतर काही विषय आपण घेणार आहोत* ..
*मोठ्या प्रमाणात श्रीगोंदा मधील मुलांनी हजर राहावे,बच्चूभाऊ election झाले की आपले काम करतील** . 🙏

GS Research Center Pune

29 Oct, 15:23


PSI पदांच्या 1000+ जागासाठी व इतर काही विषय आपण घेणार आहोत.. मोठ्या प्रमाणात श्रीगोंदा मधील मुलांनी हजर राहावे.
यात पोलीस भरती 15000 साठी प्रयत्न करू.

GS Research Center Pune

29 Oct, 12:08


*स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे कायम प्रश्न मार्गी लावणारे आपले आदरणीय बच्चूभाऊ कडू उद्या आपल्या श्रीगोंदा नगरीत येत आहे, तरी श्रीगोंदा नगरीतील ज्या ज्या मुलांच्या काही मागण्या असतील त्यांनी नक्की उपस्थित राहा - बच्चूभाऊंशी संवाद साधता येईल* -😊*

GS Research Center Pune

29 Oct, 09:07


@GSResearchCenterpune

GS Research Center Pune

29 Oct, 06:17


🙏🏻

GS Research Center Pune

28 Oct, 16:50


टेळीग्राम यडमिन ला घंटा काही माहित नसतं.... फक्त तापलेल्या तव्यावर आपले सब्स्क्रिबर भाजून घेता.... आज उदया खुप सुळसुळाट होईल.... शेळीग्राम लोकांच्या पोस्ट चा...
सावधान!! सावधान!!

# Clerk GML

GS Research Center Pune

23 Oct, 05:49


● महात्मा गांधी

- जन्म: 2 ऑक्टोबर 1869, मृत्यू: 30 जानेवारी 1948
- 1893 ते 1915 दक्षिण आफ्रिकेत (21 वर्षे)
- 9 जानेवारी 1915 वयाच्या 45 व्या वर्षी गांधींचे दक्षिण आफ्रिकेतून भारतात (बाॅम्बे) आगमन. याचवर्षी अहमदाबाद येथे सत्याग्रह आश्रमाची स्थापना
- गांधी युग 1917 ते 1947
- 9 जानेवारी: प्रवासी भारतीय दिवस
- 2 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय अंहिसा दिन

● चंपारण्य सत्याग्रह (बिहार) 1917
- बिहारमधील निळ उत्पादक शेतकरी वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- पहिला सविनय कायदेभंग
- स्थानिक नेता राजकुमार शुक्ल

● अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा (गुजरात) 1918

- पहिले उपोषण / भूक हरताळ
- कापड गिरणी मालकांविरोधात

● खेडा सत्याग्रह (गुजरात) 1918

- पहिले असहकार आंदोलन
- सरकारविरोधी

● रौलट सत्याग्रह 1919

- नागरी स्वातंत्र्यावर गदा आणत असलेल्या रौलट कायद्याविरोधात
- पहिले जन आंदोलन (Mass Strike)

- जालियनवाला बाग हत्याकांडाच्या (13 एप्रिल 1919) निषेध म्हणून गांधींनी कैसर - ए- हिंद ही पदवी परत केली.
- 1919 मध्ये दिल्लीत ऑल इंडिया खिलाफत समितीचे पहिले अध्यक्ष म्हणून गांधीजींची निवड

● असहकार चळवळ

- जून 1920 अलाहाबादमध्ये खिलाफत समितीत हा ठराव पास झाला
- काँग्रेसचे कोलकत्ता अधिवेशन ( सप्टेंबर 1920) आराखडा मंजूर
- काँग्रेसचे नागपूर अधिवेशन (डिसेंबर 1920) काँग्रेसची मान्यता
- चौरीचौरा घटना (16 एप्रिल 1922) असहकार चळवळ स्थगित

- 1924 बेळगावमध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद गांधींकडे (पहिले आणि एकमेव)
- 1930 तत्कालीन व्हाईसराॅय लाॅर्ड इर्विनकडे गांधीजींनी 11 मुद्द्यांची मागणी केली.


● दांडी यात्रा

- मिठाचा कायदा मोडण्यासाठी
- 79 अनुयायांची पहिली तुकडी, 14 महाराष्ट्रायीन नेत्यांचा समावेश
- 12 मार्च ते 5 एप्रिल 1930 दांडीयात्रा, अंतर 240 मैल
- 6 एप्रिल 1930 मिठाचा कायदा मोडला

● गांधी इर्विन करार 1931
- दुसर्या गोलमेज परिषदेला गांधी उपस्थित राहणार
- संविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली
- काँग्रेसच्या कराची अधिवेशनात या कराराला समर्थन मिळाले.
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- 1931 संविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू ही चळवळ पुन्हा 1934 मध्ये मागे घेण्यात आली.

● पुणे करार 1931
- रॅम्से मॅकडाॅनल्डच्या जातीय निवड्याला विरोध म्हणून पुण्याच्या येरवडा कारागृहात गांधींचे आमरण उपोषण
- यावरूनच गांधी आणि आंबेडकर यांच्यात 24 सप्टेंबर 1932 ला हा करार झाला
- दलितांची स्वतंत्र मतदार संघाची तरतूद रद्द केली.

● वैयक्तिक सत्याग्रह

- 1933 मध्ये सुरूवात
- 14 व 16 सप्टेंबर 1940 काँग्रेसच्या मुंबई बैठकीत घोषणा
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- 13 ऑक्टोबर 1940 वर्धा येथे विनोबा भावे यांना पहिले वैयक्तिक सत्याग्रही
- पंडित नेहरू दुसरे वैयक्तिक सत्याग्रही

● चले जाव

- काँग्रेसचे मुंबई अधिवेशनात 8 ऑगस्ट 1942 रोजी ठराव मंजूर
- महत्त्वाच्या नेत्यांना अटक झाल्यामुळे भूमीगत स्वरूप प्राप्त
- सी. राजगोपालचारी सूत्र (CR Formula): गांधी आणि जिनांची मिटिंग

GS Research Center Pune

23 Oct, 02:11


The 2024 Nobel Prize winners are:

Chemistry
David Baker, Demis Hassabis, and John M. Jumper for their work on machine learning with artificial neural networks

Literature
Han Kang for their poetic prose that confronts historical traumas and exposes the fragility of human life

Peace
Nihon Hidankyo for their efforts to achieve a nuclear weapons-free world

Economics
Daron Acemoglu, Simon Johnson, and James A. Robinson for their studies of how institutions are formed and affect prosperity

Physiology or Medicine
Victor Ambros and Gary Ruvkun for their discovery of microRNA and its role in post-transcriptional gene regulation

GS Research Center Pune

22 Oct, 17:47


Vedio #2018
सरकार बदलले.... वर्ष बदलली.... माणसं ही तीच आहे.... आणि परिस्थिती पण अजून आहे तशीच... विचार करून मतदानं करा... ज्यांनी आपली दुःख जाणली... स्वार्था पलीकडे जाऊन mpsc च्या पोट्याची काम केली... त्यांचा विचार करा शिका मागच्या अनुभवातून.... आपलं परकं समजून घ्या.... तुमचं एक मत तुमच्या भविष्यातल्या अडचणी दूर करणाऱ्या साठी...
काही नी काम काहीच केली नाही... फक्त बोलघेवडे... गर्दीचा फायदा करून घेत होते.... पण काही पडदया मागून पोरांचे प्रॉब्लेम तळमळीनं सोडवत होती...

GS Research Center Pune

22 Oct, 17:29


_*कधी कधी जोंधळ्याच्या शेतातील वेड्या पाखरांकडे बघतांना आयुष्याचा भास होतो बहुतांशी पाखरं अपयशाच्या बुजगावण्यांना घाबरून संधीच्या शेतात उतरतच नाहीत आणी शेतातील बुजगांवणी खोटी आहेत हे कळे पर्यंत संधीचा हुरडा संपून पिकांची मळणी झालेली असते पंखात धग आणी चोचीत रग असे पर्यंत बुजगावण्यांना घाबरायचे काम नाही आणी हे दोन्ही संपल्यावर जगण्यात काही अर्थ नाही !!*_

GS Research Center Pune

21 Oct, 15:59


♦️टेलिग्राम वर वेगवेगळ्या पद्धतीच्या लिंक शेअर होत आहे अशा लिंक ओपन करू नका आपल्या contact मधील कोणीही पाठवली तरी.. लिंक वर क्लिक करणे टाळा..


open करू नका...

👉 ते तुम्ही open केले की ते तुमच्या contacts मधे असणाऱ्या सर्व सदस्यांना फॉरवर्ड होत आहे ....

ओपन करू नका

GS Research Center Pune

21 Oct, 15:58


Telegram वर सध्या असल्या काही प्रकारचे message येत आहेत. ते Open करू नका. Contacts मधील सर्वांना आपोआप send होत आहेत., असे समजले आहे. अजून पण काही वेगळे aspects असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
#be_aware
#be_alert

GS Research Center Pune

21 Oct, 03:00


💢आयुष्यात निवड खूप महत्वाची असते म्हणून ती योग्य असावी

उत्तम उदाहरण म्हणजे अर्जुनाने दहा लाखांची नारायणी सेना सोडून कृष्णाला निवडले...


स्पर्धा परीक्षेत देखील या निवडीच महत्व खूप आहे ते काही वर्ष गेल्यावर कळत असतं...
MPSCCORNERTM

GS Research Center Pune

17 Oct, 12:51


महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गांस प्रतिबंध) अधिनियम, २०२४ व सदर अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकासंदर्भातील अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/acts_regulations/32

GS Research Center Pune

16 Oct, 17:54


"मी योद्धा आहे , जखमांची भीती बाळगून भागायचं नाही . जन्माबरोबर सुरु झालेलं हे युद्ध अखेरच्या क्षणापर्यंत मला लढलं पाहिजे .त्यातच माझ्या जीवनाचं यश सामावलं आहे ".- कर्ण
("राधेय " - रणजित देसाई)

GS Research Center Pune

16 Oct, 16:01


सुप्रीम कोर्टाने लेडी ऑफ जस्टिस म्हणजे न्यायदेवीची नवीन मूर्ती समोर आणली आहे.

New Era Of Judiciary
Under Hon. CJI Mr. D.Y. Chandrachud


👏🏻👏🏻👏🏻🇮🇳🇮🇳

GS Research Center Pune

16 Oct, 14:12


MPSC:
जा. क्र. ०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब संयुक्त चाळणी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45

सहायक प्राध्यापक (पदार्थ विज्ञान), महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ संवर्गाच्या चाळणी परीक्षेकरीताचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.  
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18

जा.क्र. ०५०/२०२४ नगर रचनाकार ,महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्य निर्धारण सेवा गट-अ - अनुभवासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोग़ाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

जा. क्र. ११४/२०२३ विविध विषयातील सहायक प्राध्यापक / ग्रंथपाल / शारीरिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील  शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

जा. क्र. ११५/२०२३ विविध विषयांतील अधिव्याख्याता, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब (महाविद्यालयीन शाखा) -  SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील  शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

GS Research Center Pune

16 Oct, 06:43


कोजागिरी पौर्णिमा...

GS Research Center Pune

15 Oct, 15:59


आज रात्री 9:30  वाजता  app वर IPC प्रकरण 18,20,20A,22,23 वर pyq analysis होईल -सर्वांसाठी lecture मोफत असेल -
https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.zcaza

GS Research Center Pune

15 Oct, 14:50


आयुक्त, समाज कल्याण, पुणे व आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे यांच्या आस्थापनेवरील गट-अ व गट-ब संवर्गातील पदांच्या सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणेबाबत

GS Research Center Pune

14 Oct, 15:05


भावपूर्ण श्रद्धांजली 💐

अतुल परचुरेने त्याच्या अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर रंगभूमी, छोटा पडदा, मालिका विश्व सगळंच गाजवलं. परचुरे यांना कर्करोग झाला होता. कापूस कोंड्याची गोष्ट, नातीगोती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, व्यक्ती आणि वल्ली या नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका चर्चेत राहिल्या. द कपिल शर्मा शो या कार्यक्रमातही अतुल परचुरे यांनी बराच काळ काम केलं. अलिबाबा आणि चाळिशीतले चोर हा अतुल परचुरेंचा शेवटचा सिनेमा ठरला.

GS Research Center Pune

14 Oct, 15:04


वाजवा माझ्याही यशाचा डंका देवा एवढे तरी भाग्य दे...

मिरवावी आनंदाने माझी आई एवढं तिला सौभाग्य दे...

- काव्य स्वर

2,908

subscribers

3,173

photos

275

videos