🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 @combinementortop Channel on Telegram

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

@combinementortop


Revansiddha Kadam [PSI 2020 Open General Rank 45 ]

Rohit Jadhav [PSI 2020 Open General Rank 48]

आम्हा दोघांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या हक्काचं व्यासपीठ..!!🌿

I'd - @Combinementortop1

🚨COMBINE MENTOR OFFICIAL🚨 (Marathi)

🚨COMBINE MENTOR OFFICIAL🚨 या टेलीग्राम चॅनलवर आपला स्वागत आहे! या चॅनलवर पुढील सदस्यांच्या समुदायात उच्च शैक्षणिक पूर्वसर्ग आहे. Revansiddha Kadam [PSI 2020 ओपन जनरल रँक 45] आणि Rohit Jadhav [PSI 2020 ओपन जनरल रँक 48] ह्या दोघांनी प्रथम प्रयत्नात यश साधलं आहे. या चॅनलवर हरेक विद्यार्थ्याच्या हक्काचा व्यासपीठ आहे. ज्व्हालंच्या तुमच्या विद्यार्थ्याना समर्थन करण्यासाठी आपल्याला या चॅनलवर जॉइन करायला आवडेल. जॉइन करण्यासाठी @Combinementortop1 या आयडीवर संपर्क साधा आणि सुमारे एक्निस शिका, तुमच्या उच्च शैक्षणिक लक्ष्यांचे साधन करा!

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

13 Jan, 06:39


https://jqskuw.on-app.in/app/home?orgCode=jqskuw&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

App Link👆🏻

Combine Mentor च्या झालेल्या 6 टेस्ट आपल्या COMBINE MENTOR OFFICIAL या App वर Upload केल्या आहेत... Free Material मध्ये जाऊन Download करून वेळ लावून सोडवा.. 🌿❤️

प्रतिक्रिया कळवा 😊

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

13 Jan, 05:42


🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 pinned «https://youtu.be/pmFOvWOYdOc?si=9bkkXKdFNfCkWAt_ संयुक्त गट ब आणि क पूर्व -मुख्य परीक्षा 2025 अत्यंत महत्वाची बुकलिस्ट.. 🌿 चांगली बुकलिस्ट असणं हे एक यशाचं गमक आहे..!!😊 PSI रेवण कदम..»

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

13 Jan, 03:03


बघून घ्या.. 😊
#Important

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

12 Jan, 10:41


https://youtu.be/pmFOvWOYdOc?si=9bkkXKdFNfCkWAt_

संयुक्त गट ब आणि क पूर्व -मुख्य परीक्षा 2025
अत्यंत महत्वाची बुकलिस्ट.. 🌿

चांगली बुकलिस्ट असणं हे एक यशाचं गमक आहे..!!😊

PSI रेवण कदम..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

11 Jan, 14:57


https://youtube.com/shorts/vrx1IXmdbV0?si=VigTRZmzvk1BTr_Y

परवा चंद्रपूरमध्ये असताना एका आपल्या विद्यार्थी मित्राने हा व्हिडीओ काढला... आवडला म्हणून Share करतोय..!!❤️

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

11 Jan, 08:22


परीक्षेसाठी शेवटचे 20 दिवस राहिलेत...एक एक दिवस सरतोय आणि तुम्ही पास होण्याच्या दिशेने जात आहात... शेवटचे दिवस अधिक महत्वाचे असतात... जेवढा वेळ मिळतोय तो सगळा अभ्यासात कामी लावा.. पुन्हा हे दिवस कधीच येणार नाहीत..काहीही झालं तरी भरकटू नका..बाकी मी आहेचं सोबत ❤️

Maximum Revision+Maximum Practice = Result

वर दिलेलं सूत्र लक्षात ठेवा, तेचं तुम्हाला मुख्य परीक्षेला घेऊन जाईल..!!🌿

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

10 Jan, 08:26


🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 pinned «https://youtu.be/V-MeEVS2eqE?si=jJsaVfan0LKF1KDg स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करताना ही गोष्ट तुमचा भयंकर वेळ वाचवू शकते?? 🌿 नक्की subscribe करा ❤️»

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

10 Jan, 05:02


संयुक्त गट ब आणि क परीक्षा 2025 साठी महत्वाची बुकलिस्ट याबाबत YouTube वर लवकरच Video घेऊन येतोय..!!🌿

👉चांगली बुकलिस्ट आपल्याकडे असणं हे एक यशाचं गमक आहे... ढीगभर पसारा वाचण्यापेक्षा प्रत्येक विषयासाठी एक चांगलं पुस्तक वारंवार वाचलं की निकाल लवकर येत असतो... विशेषतः पहिलाच Attempt असणाऱ्या मुलांसाठी महत्वाचा Video असेल.

YouTube Subscribe करून ठेवा 👇

https://youtube.com/@combinetop?si=DmQZjheetVPEWiCY

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

10 Jan, 02:41


बघून घ्या..!!🌿

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

09 Jan, 15:56


https://youtu.be/V-MeEVS2eqE?si=jJsaVfan0LKF1KDg

स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करताना ही गोष्ट तुमचा भयंकर वेळ वाचवू शकते?? 🌿

नक्की subscribe करा ❤️

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

08 Jan, 14:57


काही प्रतिक्रियांना उत्तर द्यायला शब्द मिळतं नाहीत..!!
वर्षभर जी मेहनत घेतली त्याची ही पोचपावती.. कुणाच्या प्रतिक्रिया पाठवू न कुणाच्या नाही इतक्या प्रतिक्रिया तुम्ही दिल्यात. 🌿
पोरांचं भलं होतंय यातचं भयंकर आनंद आहे.. ❤️
या वर्षी जिंकूनच बाहेर पडायचं..✌️

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

08 Jan, 11:57


थोडं थांबा... सगळं मनासारखं होईल 😊❤️

#clerk result soon

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

08 Jan, 08:53


🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 pinned «https://youtu.be/CPYv0tWVOfQ?si=UwMptNsZHDU1p_6z 👉🏻टेस्ट पेपरला कमी मार्क्स आल्यामुळे पूर्व परीक्षेची भीती वाटतं आहे??काय करायचं??🌿 👉मला किती मार्क्स यायचे?? परीक्षा होईपर्यंत ही सिरीज अशीच सुरु ठेवूयात. PSI रेवण कदम Please Subscribe❤️»

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

08 Jan, 05:44


https://youtu.be/CPYv0tWVOfQ?si=UwMptNsZHDU1p_6z

👉🏻टेस्ट पेपरला कमी मार्क्स आल्यामुळे पूर्व परीक्षेची भीती वाटतं आहे??काय करायचं??🌿

👉मला किती मार्क्स यायचे??

परीक्षा होईपर्यंत ही सिरीज अशीच सुरु ठेवूयात.

PSI रेवण कदम

Please Subscribe❤️

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

07 Jan, 14:25


धडपडावं लागतं रे... आयुष्यातली 4 वर्ष अशी असतातचं की त्यावेळी जीव जाईपर्यंत मेहनत करावी लागते तर इतरांपेक्षा वेगळं आणि सन्मानाचं आयुष्य जगायला मिळतं आणि तुझ्या आयुष्यातले आत्ता ते दिवस सुरु आहेत असं समज... तूला त्रास होतोय..?? तूला सारखी भविष्याची चिंता वाटतेय??..मी कुणाचं वाईट केलं नाही आणि माझ्यासोबतचं नेहमी वाईट का होत आहे?? असे प्रश्न तूला सारखे त्रास देत असतील... अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासोबत या गोष्टी सुरूच असतात म्हणून काय रडत बसायचं का?? सहज सोडून द्यायचं सगळं??? हे बघ तुझ्याकडे दोनचं गोष्टी आहेत एक तर आहे ते स्वीकारायचं नाहीतर भिडायचं... आत्ता तू ठरव की तूला काय करायचं आहे?? आणि होउदे ना काय त्रास व्हायचा तो कधी ना कधी तो होणारच आहे...मला एकचं वाटतं की तू आहे त्या परिस्थितीमध्ये भिडायला पाहिजे आणि हो भिडलं की जिंकणं सोपं होतं हे मला माहिती आहे... माझ्या शब्दाचा किमान एवढा तरी मान तू राखशील याची मला खात्री आहे..!!🌿❤️

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

07 Jan, 12:46


🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 pinned «https://youtube.com/shorts/patm3XHfC_Y?si=BSh0FEaxXJKngDJ6 2 फेब्रुवारी गट ब पूर्व परीक्षेत चांगले मार्क्स येण्यासाठी आणि Time Management होण्यासाठी काय करायचं?? 👉4-5 मुद्दे सांगितले आहेत तेवढे बघून घ्या..!!🌿❤️ PSI रेवण कदम»

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

07 Jan, 08:03


https://youtube.com/shorts/patm3XHfC_Y?si=BSh0FEaxXJKngDJ6

2 फेब्रुवारी गट ब पूर्व परीक्षेत चांगले मार्क्स येण्यासाठी आणि Time Management होण्यासाठी काय करायचं??

👉4-5 मुद्दे सांगितले आहेत तेवढे बघून घ्या..!!🌿❤️

PSI रेवण कदम

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

06 Jan, 12:50


ऊर्जानिर्मिती
#भूगोल
#IMP

https://t.me/combinementortop

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

04 Jan, 12:59


पेपरच्या दिवशी कसं होईल असं सारखं वाटतंय ना?? पेपरमध्ये वाचलेलं आठवेल की नाही हे तर नक्की वाटत असेल तूला... असो मी तूला खात्रीने सांगतो की तू जो अभ्यास करतोय ना तो व्यवस्थित आठवणार आहे तूला त्यामुळे आठवेल की नाही हा विचार सोडून दे.. फक्त Revision कशा जास्त होतील, Practice कशी जास्त होईल, Fact पाठांतर कसं जास्त होईल आणि दिवसातील जास्तीत जास्त वेळ अभ्यासात कसा जाईल याची अधिक काळजी घे...परीक्षा होईपर्यंत एवढी काळजी घेतलीस ना तर मी आत्ताही सांगेन की तू पास आहेस.. बाकी तुमचा आत्मविश्वास अजून वाढावा यासाठी परीक्षेच्या आधी मी येईलचं तुमच्यासोबत बोलायला... तू फक्त अभ्यासाची काळजी घे बाकीची तुझी सर्व काळजी घ्यायला मी आहेचं..!!❤️🌿

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

04 Jan, 11:54


🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 pinned «https://youtu.be/1GKH1BGvQNk?si=_tOL5hZI4SPxA0P0 Combine पूर्व परीक्षेसाठी कोणताही विषय Option ला ठेवायची गरज नाही?? 🌿 मागच्या वर्षी दिलेल्या Interview मध्ये पूर्व परीक्षेबाबत सांगितलं होतं..बघून घ्या..!! @रेवण..»

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

04 Jan, 09:54


https://youtu.be/1GKH1BGvQNk?si=_tOL5hZI4SPxA0P0

Combine पूर्व परीक्षेसाठी कोणताही विषय Option ला ठेवायची गरज नाही?? 🌿

मागच्या वर्षी दिलेल्या Interview मध्ये पूर्व परीक्षेबाबत सांगितलं होतं..बघून घ्या..!!

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

02 Jan, 06:34


हे वर्ष आपलंच आहे..!!🌿❤️
@समाधान..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

01 Jan, 14:50


तुमच्या उत्तुंग यशाने या वर्षी तुमचं आणि तुमच्या आई-वडिलांचं आयुष्य समृद्ध व्हावं याचं नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा..यावर्षी गुलाल अंगावर घ्यायचा आहे पोरांनो..!!🌿❤️

@तुमचा रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

01 Jan, 02:04


🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 pinned «https://www.youtube.com/live/1TlWFdK0lLk?si=tGP_HyUmbmCTrPdO 2024 वर्षाला निरोप देताना..!! थोडं परीक्षेबाबतही बोललोय..!! ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी झोपताना ऐकून घ्या ❤️»

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

31 Dec, 16:14


https://www.youtube.com/live/1TlWFdK0lLk?si=tGP_HyUmbmCTrPdO

2024 वर्षाला निरोप देताना..!!

थोडं परीक्षेबाबतही बोललोय..!!

ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी झोपताना ऐकून घ्या ❤️

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

31 Dec, 12:51


आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे...दिवसभर अभ्यास केलाच असेल तुम्ही... पण आत्ता थोडा वेळ स्वतःला दया... Session ऐकायला यायच्या आधी काही तरी आवडीचं करा... जसं की आवडीचं काहीतरी खा, काहीतरी ऐका, काहीतरी बघा, आवडीच्या व्यक्तीशी बोला.. जे आवडतंय ते करा... सगळं तेव्हाच होत राहिलं जेव्हा आपण आनंदी असू..बाकी Session मध्ये बोलूच.. 😊❤️

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

31 Dec, 11:57


2024 ला निरोप देताना... थोडंसं बोलणं गरजेचं आहे...बाहेर काय सुरु आहे आणि आपण काय करतोय आणि ते कशासाठी??आणि मी असल्यावर टेन्शन काय आहे तुम्हाला??? आज रात्री 8.45 वाजता बोलूयात...!!

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

31 Dec, 11:25


https://youtube.com/shorts/D3FbyQLAlks?si=SsjNhy66g_6ND7fL

आज वर्षाचा शेवटचा दिवस..वर्षभरात तुमच्या रूपाने मिळालेल्या कमाईचा हिशोब मांडतोय पोरांनो...वर्षभरात खूप आशीर्वात मिळवले जे आयुष्यभर पुरतील..खूप सारं प्रेम सर्वांना... कायम उभा आहे तुमच्यासोबत..!!❤️🌿

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

30 Dec, 15:19


दिवसभर चांगला अभ्यास केल्याचं समाधान रात्री झोपताना मिळायला हवं आणि हो बाप गावाकडणं पाठवत असलेल्या पैशाला तुमच्यकडून रोजच्या- रोज न्याय देता यायला हवा पोरांनो... लय मेहनतीने पैसे येतात रे गावाकडून एवढं मला माहिती आहे.. तुम्हाला येतं असलेल्या प्रत्येक रुपयामागं आई-बापाच्या रक्ताचा एक-एक थेंब आठलेला असतो.. त्या प्रत्येक थेंबाची परतफेड फक्त तुमच्या यशामुळे होऊ शकते..भयंकर अभ्यास करा लेकरांनो..!!🌿❤️

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

29 Dec, 08:29


काय बोलू..!!🌿
खूप आभार पोरांनो आणि खूप सारं प्रेम ❤️

https://youtube.com/@combinetop?si=ZJnMJ4HHV3GIGG-5

👆YouTube Channel
मोजक्याच गोष्टी देतोय पण त्या बऱ्याच फायद्याच्या असतात..😊!!

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

28 Dec, 15:31


मेहनतीचं यश..!!
यावेळी बरीच पोरं मुख्य परीक्षेला दिसतील..!! ❤️
@Mentorship

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

28 Dec, 06:22


शेवटचे काही दिवस आहेत तुमच्याकडे...हेच दिवस तुम्हाला मुख्य परीक्षेला पाठवू शकतात...जोरदार अभ्यास सुरु असुद्या... तसा तुमचा अभ्यास झालाच आहे फक्त आहे त्या अभ्यासात सातत्य राहूद्या.. सातत्याने आत्मविश्वास वाढतो... आज जास्त काही सांगायचं नाहीये मला फक्त मुख्य परीक्षा तुमची वाट बघतेय इतकंच..!!🌿❤️

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

27 Dec, 10:00


हे बघून घ्या फायद्याच आहे आणि प्रतिक्रिया कळवा 🌿😊

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

27 Dec, 04:06


🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 pinned «https://youtu.be/-uO-a8XnAtw?si=g7slhfuyDYPR6zXi 👉2 फेब्रुवारीला होणाऱ्या पूर्व परीक्षेची तयारी कशी करायची?? 👉किती Revision करायच्या?? 👉टेस्ट पेपर सोडवायचे का?? 👉🏻काय करायचं नाही?? 👉परीक्षेच्या दृष्टीने फायद्याचं आहे, बघून घ्या?? PSI रेवण कदम.. 1.5…»

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

26 Dec, 15:56


https://youtu.be/-uO-a8XnAtw?si=g7slhfuyDYPR6zXi

👉2 फेब्रुवारीला होणाऱ्या पूर्व परीक्षेची तयारी कशी करायची??

👉किती Revision करायच्या??

👉टेस्ट पेपर सोडवायचे का??

👉🏻काय करायचं नाही??

👉परीक्षेच्या दृष्टीने फायद्याचं आहे, बघून घ्या??

PSI रेवण कदम..

1.5 च्या Speed ने ऐका.. समजेल आणि वेळ वाचेल 😊

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

25 Dec, 14:26


COMBIBE MENTOR OFFICIAL

संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024

TEST- 2


Join- https://t.me/combinementortop

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

24 Dec, 12:52


नागपूरकर तुमच्या प्रेमापुढे शतशः नमन..!!🌿
एवढा प्रतिसाद मिळेल याची कल्पना केली नव्हती...सांगली ते नागपूर जवळपास 800 किलोमीटरचं अंतर आहे आणि इतक्या लांबपर्यंत आपला परिवार आहे हे बघून खूप आनंद झाला..
तुम्ही सर्वांनी येऊन आम्ही एकटे नाहीत याची जाणीव करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ❤️

तुम्हा सर्वांना बराच वेळ द्यायचा होता पण वेळेअभावी तो कमी पडला.. लवकरच पुन्हा नव्याने भेटू.. 😊

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

24 Dec, 09:17


🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 pinned «आज सायंकाळी 4.30 वाजता.. ❤️ सर्वांनी वेळेत पोहचा.. 🌿😊»

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

24 Dec, 04:29


आज सायंकाळी 4.30 वाजता.. ❤️
सर्वांनी वेळेत पोहचा.. 🌿😊

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

23 Dec, 15:15


नागपूरकर Aspirant's बऱ्याच प्रतीक्षेनंतर उद्या आपण भेटतोय.. 🌿❤️

ठिकाण - झिरो माईल फ्रीडम पार्क, नागपूर.

वेळ - सायंकाळी ठीक 4.30 वाजता.

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

23 Dec, 08:09


गडबडून जायचं काही कारण नाही.. सगळं व्यवस्थित आहे.. जानेवारीला होणारी परीक्षा फेब्रुवारीमध्ये होतेय इतकंच...आत्ता जसा अभ्यास सुरु आहे तसाच सुरु राहूद्या.. मिळालेल्या वेळेला संधी म्हणून बघा तरचं जिंकणं सोपं आहे..लढेंगे भी और जितेंगे भी..!!🌿
मी सोबत आहे..❤️

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

21 Dec, 15:46


दोघेही आईच्या पदराखालचे कर्जबाजारी..!!🌿❤️

धन्य झाली माता..!!

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

20 Dec, 12:21


आज पहिल्यांदाच वर्दीवरचा फोटो ग्रुपवर टाकतोय... तोही सोबत..!!
तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हा प्रवास पूर्ण करू शकलो..!!🌿

उद्यापासून आयुष्याचा नवीन प्रवास सुरु होतोय, त्याही प्रवासात तुम्ही सर्वजण सोबत असाल याची आम्हाला मनापासून खात्री आहे.. जगाच्या पाठीवर आम्ही कुठही जावो पण तुमचं बोट कधीही सोडणार नाही..!!❤️

1)रोहित जाधव - मुंबई शहर

2) रेवणसिध्द कदम - नागपूर परीक्षेत्र

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

20 Dec, 00:10


Batch 124 PSI दीक्षांत संचलन..!!🌿❤️

7.30 वाजता live सुरु होईल..

https://youtube.com/live/SQFbMT7fyF8?feature=share

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

19 Dec, 16:04


आज झालेलं session.. 🌿

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

19 Dec, 15:34


Live stream finished (34 minutes)

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

19 Dec, 15:00


Live stream started

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

19 Dec, 15:00


Live stream scheduled for

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

19 Dec, 13:41


Session 8.30 वाजता घेऊया..🌿

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

19 Dec, 11:37


महाराष्ट्र पोलीस अकॅडमिमधून जाता जाता.. बोलूया आज रात्री 9 वाजता..

👉 अकॅडमि मधून आज शेवटचं Session.

👉ट्रेनिंगचा आजचा शेवटचा दिवस..

👉एक वर्ष कसं होतं??

👉इथून पुढे काय??

👉5 जानेवारीच्या परीक्षेच्या दृष्टीने चर्चा करूया..

सोबत -  1)रेवणसिध्द कदम ( PSI 2020 Rank 45)


आज रात्री 9 वाजता..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

19 Dec, 10:53


महाराष्ट्र पोलीस अकॅडमि मधील आज शेवटचा दिवस.. उद्यापासून नवीन प्रवासाला सुरवात..!!🌿❤️

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

19 Dec, 04:59


परीक्षेचा शेवटचा काळ फार महत्वाचा असतो हे मी नेहमी सांगतो...टिकून रहा.. अडचणी येत राहतील तू मार्ग काढून चालत रहा.. काहीही झालं तरी थांबू नको.. मोठया गोष्टी सहज मिळत नसतात हे मी तूला नव्याने सांगायला नको...पूर्व परीक्षा पास होण्यासाठी जीवाचं रान कर बस्स..मी तुझ्या निकालाची खूप मनापासून वाट बघतोय..!!🌿❤️

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

04 Dec, 13:56


परीक्षेला शेवटचे 30 दिवस राहिले आहेत... तुम्हाला जाणीव करून देतोय फक्त.. राहिलेल्या दिवसात काय करायचं आणि काय नाही हे वारंवार सांगितलंय मी.. आत्ता नाही तर मग कधी करणार आहात??... अभ्यासाची काळजी घ्या बाळांनो बस्स इतकंच 🌿

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

04 Dec, 06:32


https://youtu.be/8jV9eqfXCHk?si=nFE0xKr-DNe2Bjga

1)राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये आलेल्या अर्थशास्त्राच्या प्रश्नांची उत्तरे काय??

2)न येणारे प्रश्न कसे सोडवायला हवे होते??

3) 5 जानेवारीच्या गट ब पूर्व परीक्षा 2025 ला या Lecture चा फायदा होईल.

Lecture by PSI रोहित जाधव.


Subscriber करून परिवाराचा भाग नक्की व्हा ❤️😊

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

03 Dec, 12:35


राज्यसेवा पूर्व परीक्षा होऊन 2 दिवस झाले आहेत आत्ता.. किमान उद्यापासून तरी अभ्यासाला लागा...5 जानेवारी हा आपल्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे... जास्त काही सांगणार नाही पण वेळ घालवू नका इतकंच.. 🌿❤️

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

03 Dec, 07:53


https://youtu.be/KJDhUJymbTw?si=Nc15uq22CRpe_BtI

राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली आत्ता पुढे काय??

ज्यांना पेपर अवघड गेलाय त्यांनी काय करायचं??

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 नापास झाल्यानंतर मी काय केलं होतं??

1.5 च्या स्पीडने ऐकून घ्या ❤️

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

30 Nov, 12:54


उद्या राज्यसेवेचा पेपर आहे तुझा.. थोडं दडपण आलं असेल.. खूप काय काय विचार करत असशील हे मला माहिती आहे... काहीही असो तू उद्याचा पेपर ताकदीने देशील असा विश्वास मला वाटतो.. घाबरू नकोस... तुझा अभ्यास झाला असेलचं आत्ता फक्त आत्मविश्वास कमी होऊ देऊ नको... पास-नापास हा नंतरचा भाग आहे पण पेपर देताना पास व्हायचं आहे या Attitude ने पेपर दे.. स्वतःचे 100% दे इतर कसलाही विचार करू नको... स्वतःला शांत ठेव..बाकी पेपर वरून आल्यावर चर्चा करू.. मनापासून शुभेच्छा आहेत तूला... जिंकून ये ❤️

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

29 Nov, 15:16


https://youtu.be/cPYrmLOjFrM?si=LoRtHmJLjKPcKEas

दिवसभराची Election duty संपवून संगमनेरमधील सरस्वती अभ्यासिका या ठिकाणी 5 जानेवारीला होणाऱ्या गट ब पूर्व परीक्षेच्या निमित्ताने Session घेतलं होतं...🌿
मुलांची परीक्षा तोंडावर असल्यामुळे कोणत्याही गोष्टीचा विचार न करता रात्री 8 वाजता जाऊन session घेतलं... Session ऐकून घ्या..परीक्षेच्या दृष्टीने फायद्याचं आहे.❤️
1.5 च्या Speed ने ऐका.. व्यवस्थित समजेल आणि वेळ वाचेल.

Subscribe आठवणीने करा आणि परिवाराचा भाग व्हा. 😊

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

27 Nov, 16:21


अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे खचल्यासारखं होतं आपल्याला आणि आपल्याकडून काही चांगलं होईल का? असं नेहमी वाटतं.. काहीच करू वाटत नसेल तर या ओळी एका..उभारी येईल 🌿❤️

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

25 Nov, 13:41


सामोर उभ्या ठाकलेल्या परीक्षेचं तूला जसं टेन्शन येतंय तसं प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला येत असतं हे विसरू नको पण जो स्वतःला सावरेल आणि खंबीरपणे उभा राहील असा प्रत्येक पोरगा मुख्य परीक्षेला पात्र होणार आहे एवढं मात्र नक्की...आयोगाला मुख्य परीक्षेसाठी मोजकीच मुलं हवी आहेत आणि त्यात तूला बसायचं आहे असा प्रयत्न तू नेहमी करत रहा.. दिसायला गोष्टी अवघड असल्या तरी त्या मुळात अवघड नसतात फक्त धीर सोडू नको.. मला माहिती आहे की सध्या तू खूप विचारात असतोस, सारखा भावनिक होतोस आणि इतर बऱ्याच गोष्टी होत असतील तुझ्यासोबत याची जाणीव आहे मला... आणि ज्या यशात अडचणी नाहीत ते यश कसलं बरं ?? जितक्या जास्त अडचणी तितकं मोठं यश असतं बघ... असो काहीही असलं तरी 5 जानेवारी पर्यंत टिकून रहा..किमान आई -बापासाठी तरी टिकून रहा... 3-4 वर्षांपासून अभ्यास करत आहेस ना?? तूला नाही का वाटत की पास होऊन बाहेर पडावं आणि या पेक्षा अजून वेगळं आयुष्य जगावं?? सामोरं मोठी संधी आहे ती गमवू नको एवढंच मला वाटतं... अजून किती वर्ष तेचं- तेचं करत बसणार आहेस याचा विचार कर... वाढणारं वय आणि जात असलेली वेळ नेहमी डोळ्यासमोर ठेव... या क्षेत्रातलं वास्तव कधी विसरू नको आणि हो ताकदीने हात-पाय हालवल्याशिवाय इथं काहीही मिळणार नाही हेचं खरं आहे.. बाकी तू समजूतदार आहेसचं... तूला खूप शुभेच्छा.. 🌿❤️

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

24 Nov, 17:24


गट ब पूर्व 2024
40 दिवस 🌿

1.5 च्या Speed ने ऐका... व्यवस्थित समजेल आणि वेळ वाचेल.

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

24 Nov, 16:54


Thank You सर्वांना 😊❤️

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

24 Nov, 16:53


Live stream finished (1 hour)

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

24 Nov, 16:23


900+🥹❤️

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

24 Nov, 16:13


Currunt बाबत सांगतो... Wait

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

24 Nov, 15:48


800+ Live....😇🤝

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

24 Nov, 15:31


कसे आहात??🌿😊

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

24 Nov, 15:30


https://t.me/combinementortop?livestream=b56a6568052ce9163f

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

24 Nov, 15:30


Live stream started

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

24 Nov, 15:30


Live stream scheduled for

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

24 Nov, 14:46


बरोबर 9 ला सुरु करूया.. वही-पेन सोबत ठेवा.
तुमचे प्रश्न Comment मध्ये लिहा.

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

24 Nov, 05:23


5 जानेवारीला होणाऱ्या गट ब पूर्व परीक्षेबाबत पुढील मुद्यावर आज रात्री 9 वाजता सविस्तर बोलूया.. 🌿

1) राहिलेल्या 40 दिवसाचे नियोजन कसं हवं?

2) किती Revision व्हायला पाहिचेत??

3) टेस्ट पेपर कधीपर्यंत सोडवायचे आणि किती सोडवायचे?? टेस्ट पेपरला किती स्कोर यायला पाहिजे??

4) अभ्यास करतोय पण ते विसरल्यासारखं वाटतंय तर कसं होईल??

5) अजून आत्मविश्वास कमी वाटत आहे??

6) परीक्षा जवळ येतेय तस-तसं दडपण वाटत आहे??

7) यावेळी काही करून पास व्हायचं आहे या विचाराने अधिक भीती वाटते??

8) राहिलेल्या 40 दिवसात काय करायचं आणि काय करायचं नाही?? Mentality कशी असायला पाहिजे??

9)त्याचबरोबर 1 डिसेंबर ला होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेला कसं सामोरं जायचं? Gs चा पेपर कसा सोडवायचा?? C-SAT चा पेपर सोडवताना काय काळजी घ्यायची??

10) पुढील 40 दिवसांसाठी आजचं Session महत्वाचं आहे.

सोबत -  1)रेवणसिध्द कदम ( PSI 2020 Rank 45)

     2) रोहीत जाधव (PSI 2020 Rank 48)

वेळ - आज रात्री ठीक 9 वाजता 🌿

@शेवटचा घाव..!!
❤️

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

22 Nov, 14:54


आयुष्याची 35 वर्ष झाल्यानंतर कळतं की 25 व्या वर्षी काय करायला पाहिजे होतं..!!🌿

#आवडलेलं
@वास्तव..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

22 Nov, 09:59


2025 मध्ये होणाऱ्या परीक्षेच्या तारखा आल्या आहेत... काळजी करू नका.. सविस्तर लवकरच बोलूया 🌿

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

21 Nov, 03:06


इथूनपुढे काय..? 🌿

1)परीक्षेचा दिवस सोडला तर आजपासून आपल्याकडे 45 दिवस आहेत..

2) इथून पुढे आपल्या किमान 3 Revision होणं अपेक्षित आहे.

3) Previous Year Question वारंवार वाचून झाले पाहिजेत.

4) किमान 10 ते 15 टेस्ट पेपर सोडवून झाले पाहिजेत.

5) Time Management, Temperament Management आत्तापासूनचं चांगलं करून घ्यायचं आहे.

6) आपली पेपर सोडवण्याची पद्धत कशी असणार आहे हे ठरवणं महत्वाचं आहे.( कोणत्या विषयापासून सुरवात करायची वगैरे.)

7)पेपर सोडवताना Gs किती वेळात संपवायचं आहे आणि Math-Reasoning ला किती वेळ द्यायचा आहे याचा plan तयार असायला हवा.

8) मागच्या परीक्षेत झालेल्या चुका आपण सुधारल्या का?? याकडे लक्ष दया.

9) दिवसभराचं नियोजन एकदम Busy हवंय तुमचं.. प्रत्येक तासाचं नियोजन ठरलेलं असावं.

10) सगळ्यात महत्वाचं की 1 मिनिटही वेळ विनाकारण इकडं-तिकडं जाऊ देऊ नका.

11) केल्यावर सगळं-सगळं होतं हे मी अगदी विश्वासाने सांगेन फक्त काहीही झालं तरी राहिलेले दिवस कुठंचं कमी पडू नका.. एकदम महत्वाचे दिवस सुरु आहेत.

12) आणि हो सगळीकडे आत्ता निवडणुकांचं वातावरण आहे.. अभ्यास सोडून या चर्चा करत बसू नका.. याचं सरकार येईल.. तोच निवडून यायला पाहिजे.. त्यानं ही-ही कामं केली.. असले प्रकार खूप होतात मुलांच्यामध्ये हे मला माहिती आहे त्यामुळे अशा चर्चापासून लांब रहा.विनाकारण वेळ जातो त्यामध्ये. 🌿

खूप खूप शुभेच्छा..!!❤️

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

20 Nov, 11:34


आपल्यासाठी अधिकारी पद हे केवळ पोट भरण्याचं साधन नाहीये तर आयुष्यभर मिळणाऱ्या सन्मानाचं प्रतिक आहे...🌿❤️

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

19 Nov, 04:47


पोरांच्या मनात जे स्थान मिळतंय याचं भयंकर समाधान वाटतंय आज.. निशब्द 🌿
@कायम सोबत ❤️

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

18 Nov, 07:35


आहे त्या परिस्थितीमध्ये अभ्यासात गुंतून रहा.. अभ्यासापेक्षा परिस्थितीला मोठं करण्यात काहीचं अर्थ नाही... थोडेचं दिवस राहिलेत परीक्षेला.. भरकटू नका... नको त्या विचारात गुंतू नका..आई-बाप डोळ्यासमोर ठेवा.. "हे पण दिवस निघून जातील" हे वाक्य कठीण परिस्थितीमध्ये भयंकर बळ देतं..लगे रहो.!!🌿❤️

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

17 Nov, 13:22


https://youtu.be/Yn-8lslJPsU?si=1PnnuQUXSUxosfsP

रोहित सरांची ही मुलाखत विविध ठिकाणी 3 लाख पेक्षा अधिक मुलांनी बघितली आहे म्हणून आपल्या YouTube चॅनेलवर नव्याने टाकत आहे..10 मिनिटांची मुलाखत आहे पण पूर्ण परीक्षेचं सार त्यामध्ये सांगितलं आहे...फायदा होण्यासारखी मुलाखत आहे🌿

नक्की Subscribe करा..जोडून रहा ❤️

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

16 Nov, 13:41


चालू घडामोडीच्या अशा नोट्स तयार असतील तर शेवटच्या काळात बराच फायदा होतो आणि आत्मविश्वास टिकून राहतो 🌿

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

16 Nov, 04:04


काही प्रतिक्रिया भयंकर भावतात.. 🥹❤️🌿
#Mentorship

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

15 Nov, 07:26


टेस्ट सिरीज बाबत काही प्रतिक्रिया पाठवतोय.. वाचून घेऊ शकता 🌿

आयोगाचा पेपर देताना जी धडधड होते तिचं धडधड COMBINE MENTOR चा टेस्ट पेपर देताना अनेक मुलांची होते.. यातच आपलं यश आहे.
#Seriousness

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

15 Nov, 07:23


आपल्या COMBINE MENTOR OFFICIAL चा 8 डिसेंबर ला पूर्व परीक्षेसाठीचा शेवटचा 6 वा टेस्ट पेपर होतोय.. परीक्षा देण्याआधी त्याची प्रॅक्टिस भयंकर महत्वाची असते.. अनेकांनी Msg केले होते म्हणून आजच्या दिवस ऍडमिशन सुरु करत आहे🌿( पहिले 5 टेस्ट पेपर आणि त्याचे सविस्तर Explanation available आहे)
वैशिष्ट्य:-

1) आयोगाशी मिळता-जुळता पेपर काढण्याचा प्रयत्न केला आहे.

2) न येणारे प्रश्न कसे सोडवायचे यावर काम केलंय.

3) आयोग ज्या टॉपिकवर प्रश्न विचारते तो पूर्ण भाग कव्हर केला आहे.

4) आयोगाच्या Anskey चा विचार करून Anskey बनवली आहे.

5) टेस्ट पेपरच्या Pdf ची प्रिंट काढू शकता.

Fees - 399/-

👉8605430497(Phonepe /Gpay)

I'd -
@Combinementortop1 याचं I'd ला तुमचं नाव, जिल्हा आणि Payment Screenshot पाठवा शकता.🌿

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

14 Nov, 11:56


Comfort Zone च्या बाहेर गेल्याशिवाय स्वतःची वेगळी ओळख बनवता येत नाही हे अनेकांनी सिद्ध केलंय..आजूबाजूला सगळं मनासारखं वातावरण असेल तर स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचे विचार अनेकदा डोक्यात येत नाहीत आणि वेगळी ओळख हवी असेल तर होणारा त्रास, येणाऱ्या अडचणी, संघर्ष, कष्ट, मान-अपमान हे गोड मानून घ्यावचं लागेल..चांगला दागिना बनवायचा असेल तर आधी त्याला तापवावं लागतं, अगीच्या झळा सोसाव्या लागतात तेव्हा त्याचा सुंदर दागिना तयार होतो आणि मग माणसं त्या दागिन्याला स्वतःपेक्षा जास्त जपतात..असचं आपल्या आयुष्याचं असतं..तुम्हाला समजलं असेल की मला काय म्हणायचं आहे ते..!!🌿❤️

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

13 Nov, 12:44


https://youtu.be/yrSe_xXq_RU?si=S4vWgPL8wFqwc20a

PSI झाल्यानंतर मागच्या वर्षी ही मुलाखत दिली होती... म्हणून आपल्या COMBINE MENTOR OFFICIAL वरती टाकत आहे...वेळ काढून नक्की बघा... जे बोललोय ते अगदी खरं बोललोय आणि तुमच्या फायद्याचं बोललो आहे...मुलाखती मधून दोन चार गोष्टी जरी समजल्या तरी तुमचा हा प्रवास बराच सोपा होऊन जाईल याची खात्री आहे.. 🌿

तुमच्या सर्वांसाठीचं नव्याने YouTube या Platform वरती थोड्याचं दिवसात आम्ही दोघंही येतोय... तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे.
Subscribe नक्की करा..!!❤️
YouTube परिवाराचा भाग नक्की व्हा. 😊

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

12 Nov, 13:07


कटू आहे पण हेचं खरं वास्तव आहे..!!🌿

1) अभ्यास करताना विनाकारण serious न होता Sincere होऊन अभ्यास करत चला.

2)  एखादी गोष्टीला वेळ देत असताना स्वतःला नेहमी विचारा की त्याचा अभ्यासासाठी काय फायदा आहे.

3) पूर्व परीक्षा चांगल्या मार्क्सने पास व्हायची असेल तर वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टींपासून लांब राहायला पाहिजे... दोन्ही दगडावर पाय ठेवून पुढं जायचं म्हणालात तर नुकसान होऊ शकत... सध्याची वेळ भयंकर महत्वाची आहे.

4) तयारीचा काळात आपला महत्वाचा वेळ इतरांना देणं टाळा... नाही म्हणायला शिकायला हवं... आपली माणसं समजून घेतात त्यामुळे त्यांना वेळ दिला नाही म्हणून ती तुमच्यावर नाराज होणार नाहीत.

5) Social media, relationship, जास्तीचे मित्र या सर्व गोष्टींमध्ये जास्त वाहवात जाऊ नका..परीक्षा होईपर्यंत स्वतःच्या मनावर कंट्रोल आणायला हवा..बरेचदा या गोष्टींची सुरवात छान वाटते पण नंतर महत्वाचा वेळ गेल्यामुळे पश्चताप होतो.

6)दिवसातला जेवढा वेळ अभ्यास करत आहात तो मन लावून आणि जीव ओतून करा..स्पर्धा मोठी हे विसरून चालणार नाही.. Fight द्यायची तर पूर्ण ताकदीने द्यायची.

7)अभ्यास करताना आपल्याला कंटाळा येतो हे मी पण मान्य करतो आणि कंटाळा येणं हे कधी तरी ठीक आहे..रोज रोज कंटाळा येणं म्हणजे आपण आजचं नापास झाल्यासारखं आहे...कंटाळा आला तर थोडा वेळ ब्रेक घ्या, अराम करा आणि परत अभ्यासाच्या ठिकाणी येऊन बसा.

8) tension घेऊन अभ्यास करण्यापेक्षा process ला enjoy करत अभ्यास केला तर खरंच अभ्यास खूप छान होतो... पुढचा विचार न करता चांगला अभ्यास करून रोजचा दिवस कसा success होईल याकडे लक्ष दया... परीक्षेचा दिवस तुमचा असेल..!!❤️

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

11 Nov, 11:30


👆पुस्तकाची sample copy बघू शकता🌿

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

11 Nov, 11:20


आयोगाचे सर्व प्रश्न टॉपिक नुसार सोडवण्यासाठी उत्तम पुस्तक आहे... आत्ता पर्यंत आलेला आयोगाचा प्रत्येक प्रश्न यामध्ये Explain केलाय...कुठलाही प्रश्न सोडला नाही..अभिषेक सरांची प्रचंड मेहनत आहे या पुस्तकामागे.. फायदा होईल असं पुस्तक आहे...खूप साऱ्या शुभेच्छा 💐

https://lotusbookdepo.com/product/sampurn-ankganit-sankheki-ani-bhumitisah-pyq-2009-to-2023-by-educulture-by-abhishek-thigle

पुस्तकासाठी - 9021747391

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

09 Nov, 11:35


कसा दिवस चाललाय हे कळत पण नसेल तूला आत्ता...प्रत्येक तासाचं नियोजन बनवुन ठेवलं असशील...परीक्षेचा दिवस सारखा डोळ्यासमोर दिसत असेल तूला... काय होईल आपलं आणि कसं होईल याचा विचार दिवसभरात सारखा मनात येत असेल तुझ्या...सगळ्यांची परिस्थिती सारखीच आहे बघ..सकाळी उठल्यापासून रात्री झोपर्यंत तुझी पास होण्याची धडपड दिसतेय मला...खूप मनातून वाटत असेल तूला की कधी एकदा पास होऊन या सगळ्यातून बाहेर पडतोय...सगळ्यांना असचं वाटत असतं नेहमी कारण 2-3 वर्षांपासून अभ्यास सुरु असतो आणि अभ्यासाव्यतिरिक्त आयुष्यात दुसरं काहीच नवीन नसतं त्यामुळे नको नको वाटायला लागतं सगळं...पण आपण पास होत नाही तोपर्यंत आपल्या मनासारखं काहीच होत नाही इथं हिचं गोष्ट खरी आहे... दिवस बदलायचे म्हंटलं की एवढं सहन तर करावचं लागतं आणि सगळं कितीही अवघड वाटतं असलं तरी त्यातून वाट आपल्यालाचं काढावी लागणार आहे एवढं मात्र निश्चित आहे... बाकी घेतलयस मनावर अधिकारी व्हायचं तर कशाला मागे हटायचं राव... आणि हे बघ डाव कधीही पलटता येतो यावर विश्वास ठेव फक्त आत्तापासून 5 जानेवारी च्या दुपारी 12 वाजता पेपर जमा होत नाही तोपर्यंत तलवार खाली ठेवायची नाही.. 🌿 ❤️

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

05 Nov, 16:48


इथून पुढं परीक्षा होईपर्यंत रोजचा दिवस नव्याने साजरा करायला हवा पोरांनो... अभ्यासातला उत्साह कायम टिकवून ठेवा.. कंटाळा येऊ देऊ नका आणि आलाच तर थोडा वेळ ब्रेक घेऊन पुन्हा अभ्यासाला बसा... दिवसेंदिवस स्वतःच्या अभ्यासामध्ये सुधारणा करत गेल्यास उत्साह टिकून राहतो आणि आत्मविश्वास भयंकर वाढतो.. अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला पूर्व परीक्षा पास होऊन मुख्य परीक्षा द्यायची इच्छा आहे परंतु प्रत्येक जण मुख्य परीक्षा देऊ शकणार नाही हे वास्तव आहे..खरंतर कमी चुका करणारा विद्यार्थीचं मुख्य परीक्षा देईल असा माझा विश्वास आहे.. वेळ आहे तोपर्यंत होत असलेल्या चुका सुधारत चला...जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा... Revision करा... PYQ तोंडपाठ ठेवा.. बाकी जोरात मेहनत घ्यावी लागणार आहे हे आपल्याला चांगलंचं माहिती आहे आणि काही झालं तरी अभ्यासात ब्रेक येऊ देऊ नका बस्स..!🌿

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

03 Nov, 04:11


दिवाळी संपलीये पोरांनो... आत्ता परतीच्या प्रवासाला लागा..घरच्यांसोबत दोन-चार दिवस काढले की घरातून पाय निघत नाही आपला.. घर सोडताना भयंकर रडायला येतं प्रत्येकाला पण पुढच्या वर्षी दिवाळीला समाधानाने यायचं असेल तर आज घर सोडावं लागेल ना??.. इथं त्याग केल्याशिवाय काहीचं मिळत नाही हे मी वारंवार सांगत असतो..असो आत्ता कसलाही विचार करू नका.. परीक्षा तोंडावर आहे..ताकदीने परीक्षा द्यायची आहे एवढंच सध्या डोळ्यासमोर असावं तुमच्या... लगे रहो 🌿❤️

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

01 Nov, 14:47


जिथं आपल्याला समाधान मिळतं तिचं आपली खरी लक्ष्मी असते आणि Combine Mentor परिवार हा आमच्या सर्वात जवळचं समाधानाचं आणि आनंदाचं ठिकाण आहे.. ❤️
सर्वांनां लक्ष्मीपूजनच्या फार मनापासून शुभेच्छा... 🌿

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

31 Oct, 15:43


आजूबाजूला सगळीकडे दीपावलीचं वातावरण आहे तरीही अनेकजण लायब्ररी मध्ये माना खाली घालून अभ्यास करत आहेत हे जवळून बघतोय मी आणि याचं फळ येत्या काळात नक्की पहायला मिळेल तुम्हाला असा विश्वास आहे मला...खरतर दिवाळी हा आपल्या सर्वांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे अनेकजण आज दीपावली साठी घरी आले असतील... मला एकचं म्हणायचं आहे की फार गुंतून राहू नका या सगळ्यात.. 2-3 दिवसात परतीच्या प्रवासाला लागा.. आपल्यासाठी फार फार महत्वाचे दिवस सुरु आहे सध्या... घरचांसोबत चार दिवस काढले की घरातून पाय निघत नाही आपला हे तितकंच खर आहे आणि दिवाळीच्या निमित्ताने सध्या आजूबाजूला कितीही सुखाचं वातावरण दिसत असलं तरी आपली खरी परिस्थिती वेगळी आहे हे माहिती आहे तुम्हाला...त्यामुळे आपल्याला पुन्हा अभ्यासाच्या ठिकाणी जावं लागेल आणि मान खाली घालून शांतपणे अभ्यास करावा लागेल...प्रत्येक दिवाळी Aspirant म्हणून साजरी करायची का आपण??.. किमान पुढची दिवाळी तरी अधिकारी म्हणून साजरी करायला नको का पोरांनो आपण??.. वेळ वाया घालवू नका आणि वेळेत अभ्यासला लागा इतकंच सांगायचं आहे मला आज.. 🌿❤️

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

29 Oct, 13:30


🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 pinned an audio file

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

28 Oct, 15:27


PSI Training चा शेवटचा दिवस असा असतो..!!🌿❤️

https://t.me/combinementortop

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

27 Oct, 03:51


परीक्षा तोंडावर आली आहे आणि नेहमीपेक्षा तुझी जास्त धडपड सुरु आहे हे दिसतंय मला... दिवस कधी सुरु झाला आणि कधी संपला हे कळतंही नसेल तूला...सकाळी गडबडीने आवरून कधी एकदा अभ्यासाला बसतोय अशी अवस्था असेल तुझी आत्ता...दिवसाचं टार्गेट पूर्ण करायचं आहे म्हणून नाष्टा आणि जेवणसुद्धा गडबडीने उरकत असशील हे माहितीये मला...रविवार असतानाही त्याचं उत्साहाने अभ्यासला बसतोय तू आत्ता कारण यावर्षी पास व्हायचं आहे तूला..झोपतानाही दिवसाभरात जे वाचलंय ते सगळं तुझ्या डोक्यात फिरत असेल याची खात्री आहे मला..ही सगळी लक्षणं पास होणाऱ्यांची आहेत बघ.. थोडेचं दिवस राहिलेत आत्ता.. टिकून रहा आणि धडपड.. फक्त सोडू नको बस्स..!!🌿❤️

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

25 Oct, 06:32


हा बऱ्याच दिवसांपासूनचा तुझा प्रवास सुरु आहे बरोबर ना??आणि तूला एका इच्छितस्थळी पोहचायचं आहे... तू त्या ठिकाणी पोहचण्यासाठी रोज धडपडतोय, पडतोय आणि पुन्हा उठून नव्याने प्रवास करतोय...असा तुझा प्रवास नियमितपणे सुरु आहे हे मी बघतोय... हा प्रवास करताना बऱ्याच अडचणी तूला येऊन टकरा देत आहेत,तू तुझ्या इच्छितस्थळी पोहचू नये म्हणून त्या अडचणी खूप जास्त प्रयत्न करत आहेत पण तू मात्र त्या अडचणींना बळी पडू नको.. कधी कधी अशा अडचणीतून तूला मार्ग काढावा लागेल तर कधी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढं निघून जावं लागेल... हा तुझा प्रवास काही चार-सहा महिन्यांचा नाहीये त्यामुळे छोट्या छोटया गोष्टीत आणि अभ्यासाव्यतिरिक्त इतर ठिकाणी किती गुंतून राहायचं राहायचं हे तूला ठरवायला हवं... घरातून अभ्यास करायला आपल्याला आयुष्यातले फक्त 3-4 वर्ष मिळतात आणि अशा दिवसात जर वेळ वाया घालवत राहिलात तर पुन्हा तुमच्या पाठीशी कोणीही उभं राहत नाही हे वास्तव आहे... मला एकचं सांगयच आहे की अभ्यासासाठी मिळालेल्या 4 वर्षामुळे पूर्ण आयुष्य अधिकारी म्हणून जगायला मिळत असेल तर आपण का अभ्यास करायला नको?? का नाही त्याग करू शकतं आपण थोडा तरी?? का चार वर्ष आपण लांब राहू शकत नाही सर्व गोष्टींपासून?? समजतंय ना सगळं ??🌿

@तू गाव कशासाठी सोडलंस हे कायम ध्यानात ठेव..!❤️

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

23 Oct, 12:41


सध्या फक्त राहिलेले 75 दिवस ताकदीने जोर लावायला पाहिजे... परीक्षेची तारीख नसल्यामुळे मागच्या काही महिन्यात अनेकांचा बराच वेळ वाया गेलाय... असो पण तुम्ही आत्ताही नव्याने अभ्यासाला जोर लावला तरी पूर्व परीक्षा पास होणं कठीण नाही.. मागच्या परीक्षेत कोणत्या चुकांमुळे आपण नापास झालो हे लिहून काढा आणि तुम्ही जिथं अभ्यासाला बसता तिथं चिटकवून ठेवा कारण अभ्यास कमी असल्यामुळे आपण नापास होत नाही तर आपण करत असलेल्या छोटया छोटया चुका आपल्याला नापास करतात...त्यामुळे कुठल्याही परिस्थिती मध्ये चुका होणार नाहीत याची व्यवस्थित काळजी घ्या... बाकी सध्या सगळी ताकद फक्त अभ्यासात ओतायला पाहिजे एवढचं कळतंय मला...आणि हो निकालाचा दिवस भयंकर सुंदर असतो पोरांनो.. किमान तो दिवस डोळे भरून बघायचा असेल तर धडपड करा... 🌿❤️

@रेवण..

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

23 Oct, 03:26


जे राहिलेत ते आज जॉईन होऊ शकतात. 🌿

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

22 Oct, 09:21


🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨 pinned «1)Admission चा आज शेवटचा दिवस...❤️ 2)ज्यांनी admission घेतलं आहे आणि private ग्रुप ला add व्हायचे राहिले असतील त्यांनी @Combinementortop1 या I'd ला msg करा.. 🌿 3) गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024..75 day's Revision Target..शेवटचा घाव ✌🏻 4) आज रात्री पहिलं…»

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

22 Oct, 04:37


1)Admission चा आज शेवटचा दिवस...❤️

2)ज्यांनी admission घेतलं आहे आणि private ग्रुप ला add व्हायचे राहिले असतील त्यांनी
@Combinementortop1 या I'd ला msg करा.. 🌿

3) गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024..75 day's Revision Target..शेवटचा घाव ✌🏻

4) आज रात्री पहिलं Lecture होईल.. ज्यांचं admission बाकी आहे ते आज करून घेऊ शकतात 🌿

#Record break

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

21 Oct, 07:06


उद्या रात्री पहिलं Session होतंय... कोणी राहिलं असेल तर जॉईन होऊ शकता.. 🌿
@Combine पूर्व परीक्षा 2024 ❤️

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

20 Oct, 12:51


आज खूप भावनिक आहे मी.. काय व्यक्त होऊ हे सुचत नाहीये मला... शतशः आभार व्यक्त करतो पोरांनो तुमचे... वर्षभरापासून भयंकर प्रेम दिलंय तुम्ही सर्वांनी... हे सगळं फक्त तुमच्या प्रेमामुळे उभं राहिलंय.. फक्त तुमच्या प्रेमामुळे... कायम तुमच्या ऋणात राहू ❤️

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

20 Oct, 11:13


अभ्यास करणाऱ्या प्रत्येक चेहऱ्याची अधिकारी होण्याची इच्छा असते पण मोजक्याच चेहऱ्यांच्या इच्छेमागे प्रामाणिक धडपड असते आणि या धडपडीचा शेवट भयंकर तेजस्वी असतो...फक्त शेवटचे काही दिवस राहिलेत परीक्षेला... अभ्यासावर तुटून पडा रे पोरांनो तुटून पडा..! 🌿❤️

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

20 Oct, 07:13


Admission करताना काल बऱ्याच मुलांना अडचण आली होती ते आज करून घेऊ शकतात... कोणालाही मागे सोडणार नाही..
गट ब पूर्व परीक्षा 2024❤️✌🏻
Thank You So Much
🌿

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

19 Oct, 10:04


23 ऑक्टोबर पासून..🌿
शेवटचा घाव..✌🏻❤️

Contact -
@Combinementortop1

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

18 Oct, 16:56


गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024
मेंटरशिप प्रोग्रामबाबत सर्वकाही.. 🌿

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

18 Oct, 16:34


सहजच मेंटरशिप बाबत आलेल्या मुलांच्या काही प्रतिक्रिया पाठवतोय 🌿❤️

🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

18 Oct, 16:10


Live stream finished (40 minutes)

45,823

subscribers

304

photos

20

videos