महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई) @mahashaktipeeth Channel on Telegram

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

@mahashaktipeeth


महाराष्ट्रातील सर्व देवी स्वरूपांच्या भक्तांसाठी एकमेव शक्तिपीठ - श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम
गुरु रेवती (माई)
शक्तिपिठाधीश, आध्यात्मिक गुरु
आंतरराष्ट्रीय वास्तुतज्ञ, समाज सेविका
फोन 01169272882 | व्हाटसप्प - 7028177950
Website - www.mahashaktipeeth.org |

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई) (Marathi)

महाशक्तीपीठ एक एकमेव शक्तिपीठ आहे ज्यात अशी सर्व देवी स्वरूपांच्या भक्तांसाठी उपलब्धता आहे, ज्यातील मुख्य ध्येय श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम आहे. यात गुरु रेवती, किंवा 'माई' हे शक्तिपिठाधीश, आध्यात्मिक गुरु आहेत. या चॅनलद्वारे आंतरराष्ट्रीय वास्तुतज्ञ आणि समाज सेविका म्हणून परिचित आहे. जर आपणाला त्यांच्याशी संपर्क साधायचं असेल तर तुमचं फ़ोन क्रमांक 01169272882 किव्हा व्हाट्सअ‍ॅपवर 7028177950 वर संपर्क साधू शकता. त्यांचा वेबसाइट www.mahashaktipeeth.org वर जाऊन त्यांच्या विविध सेवांबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात.

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

07 Nov, 09:12


या 10 वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे..!

(मंदी जाणवण्याची कारणे)

1. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट फोन व प्रत्येक वर्षी नवीन घेणे.
2. वाढदिवस, ॲनिवर्सरीमध्ये अनावश्यक खर्च व दिखावा.
3. जीवनशैली बदलामुळे खर्चाचे प्रमाण वाढले.
4. मुलांचं शिक्षण, शाळा, क्लास फी यामध्ये वाढ. (1ली पासून क्लास लावणे ही फॅशन जीवघेणी आहे)
5. घरातील जेवणापेक्षा बाहेरील हॉटेलचा खर्च. यात खोटी प्रतिष्ठा.
6. व्यक्तिगत खर्च, ब्यूटी पार्लर, सलून, ब्रँडेड कपडे, पार्टी, गेट टूगेदर इत्यादी.
7. लग्न तर आहेच, पण प्रतिष्ठेसाठी साखरपुड्यावरही भरमसाठ खर्च.
8. कर्जांचे व्याज फेडणे.
9. खाण्यापिण्यात बदलामुळे मेडिकल खर्चात वाढ. यामुळे अनावश्यक खर्चात वाढ होऊन, पगार कमी खर्च जास्त होत आहे. परिणामी, तणाव तणाव तणाव.
10.लोक, नातेवाईक काय म्हणतील या भीतीपायी कर्तव्य भावनेपाई पैशाचा चुराडा.
11. पार्टी कल्चरमुळे अक्षरशः लाखो तरुण, कुटुंबे जिवंतपणी नरक भोगताहेत. (उदा. घड्याळ घेतलं-द्या पार्टी, गाडी घेतली-द्या पार्टी, सायकल घेतली-द्या पार्टी, कपडे, दागिने, वस्तू घेतली-द्या पार्टी, 2-5शे रुपये पगार वाढला-द्या पार्टी,)
12. आपण दुसऱ्यावर पैसे खर्च नाही केले किंवा वेळ दिला नाही तर मला खांदा द्यायची वेळ येईल तेव्हा कोण येईल मदतीला? या एका भीतीपायी सामान्य माणूस आयुष्यभर, पिढ्यानपिढ्या कुजतोय.

अनावश्यक खर्च कमी करा! गरज अन्न, वस्त्र, निवारा आहे आणि इच्छा स्वप्नं अनंत... आहेत त्यांचा अंत..... नाही... !

"लिमिटेड होतं तेच बरं होतं" ...

पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा.....

टी.व्ही.वर 1-2 channels होती व तीपण लिमिटेड वेळेसाठी. रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची व घरातील लोकं एकतर झोपायला जायची, नाहीतर "छान गप्पा मारायची"....

दोन चाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते, बुकिंग केल्यावर वर्षादीड वर्षाने वाहन मिळायचे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती.. "प्रवासाचा आनंद मिळायचा" ....

गोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे, तेपण लिमिटेड. त्यामुळे "स्थूलतेचे प्रमाण कमी होते".....

शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा. त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक "जडण घडण नीट व्ह्यायची"...

बहुतांश ठिकाणी वर्किंग अवर्स लिमिटेड होते, संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोहोचून "कुटुंबासाठी वेळ द्यायची"......

अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या लिमिटेड होत्या. त्यामुळे आपले आयुष्य खूप सुखी होते......

........... पण आता सगळंच "अनलिमिटेड" झालंय....
आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच "लिमिटेड" झालंय !!
बाबा तुमच्या लहानपणी आणि आता आमच्या लहानपणी काय काय बदल झालेले वाटतात"?

बेटा काळ खूप बदलला बघ...

तेव्हा पोरांच्या छातीच्या बरगड्या दिसायच्या आणि पोट अगदी पाठीला टेकलेले दिसायचे. आता चौथीपाचवीच्या पोरांचीपण सुटलेली पोटे दिसतात.

तेव्हा पोरं दिवसभर खेळून खेळून रात्री बिछान्यावर अंग टाकले की गाढ झोपत. आता पोर दिवसभर बसून 'कॉम्प्युटर गेम्स' खेळून रात्री late night movies एन्जॉय करत जागत बसतात.

तेव्हा आमच्या घरात फक्त आजी आजोबांना डोळ्याला चष्मा असायचा. आता दुसरीची मुलं नाकावरील चष्मे सावरत शाळेत बसतात.

तेव्हा वडिलांचा आम्हाला फार धाक असायचा. आता पोरं नाराज होऊ नयेत म्हणून त्यांचे डॅड त्यांना ते म्हणतील तेव्हा हॉटेलात नेऊन ते म्हणतील ते खाऊ घालतात.

तेव्हा आम्हाला कधीतरी सणावाराला केलेली पुरणपोळी *गोड* लागायची. आता मुलांना दररोज झोपेतून उठल्यावर आई मागे लागून खाऊ घालते ते अंजीर, पिस्ते, मनुका पण बेचव लागतात.

तेव्हा आमच्या वाढदिवसाला आई एखादा बेसनाचा लाडू हातावर ठेवायची. आता मुलांच्या वाढदिवसाला तोंडाला फासण्यासाठी एक आणि खाण्यासाठी एक असे दोन मोठे केक्स लागतात.

मुळात काय की,

तेव्हा आम्हाला फार काही मिळत नसतानाही आनंदात जगता यायचं.

आता

बरंच काही मिळत असूनही "आनंदी जीवन कसे जगावे" यांवरील "सेमिनर्स' अटेंड" करावे लागतात.

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

06 Nov, 02:27


. देवघर

देवघर बनवताना व पूजा करताना :-------
काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे :--------

१ } देवघर वरून नेहमी चपटे असावे.

२ } देवघर ईशान्य कोपर्‍यात असायला पाहिजे.

३ } हे शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असायला पाहिजे.

४ } देवघरात कुलदेवता, देवी, अन्नपूर्णा, गणपती, श्रीयंत्राची स्थापना करायला पाहिजे.

महत्वाची सूचना :--------

५ } तीर्थक्षेत्रांतून विकत घेतलेल्या वस्तू देवघरात ठेवणे टाळायला हव्यात.

६ } पारंपरिक मूर्तींचीच पूजा केली पाहिजे.

७ } मुर्तींची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावर बसून पूजा केली पाहिजे.

८ } देवघरातील मूर्ती ४ इंचाहून जास्त उंच नको.

९ } देवघरात नाचणारे गणपती, तांडव करत असलेले शंकर, वध करताना कालिका आदी मुर्ती किंवा फोटो ठेवू नये.

१० } देवघरात महादेवाची लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजे.मूर्तीच्या स्वरूपात नाही.

पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असायला पाहिजे.दिवा आग्नेय कोपर्‍यात {देवघराच्या} असायला पाहिजे.

पाणी उत्तरेकडे ठेवायला पाहिजे.

पूजेत शंख-घंटीचा उपयोग जरूर करावा.

निर्माल्य-पुष्प-नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केले
पाहिजे. ते घरात ठेवणे वर्जित आहे.

पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपर्‍यात शिंपडायला पाहिजे.

नैवैद्य नेहमी गोड वस्तूंचा दाखवावा.

खंडित झालेल्या मूर्तींचे विसर्जन केले पाहिजे.

विसर्जनाच्या अगोदर त्यांना नवैद्य दाखवावा.

देवघर व देव्हारा कसा व कोणत्या दिशेला असावा याचे मार्गदर्शन.

प्रत्येक कुटुंबाच्या घरी देव्हारा असणे अत्यावश्यक आहे ज्या घरात देव्हारा नाही ते घर आध्यात्मिक दृष्टया स्मशानवत आहे.

आपल्या आई-वडिलांपासून मुलगा जरी स्वतंत्र रहात असेल तरी त्याला आपल्या नवीन कुटुंबात स्वतंत्र देव्हारा असणे आवश्यक आहे.

देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारे असुरी
जीवनच असते.*

ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा प्रत्यक्ष लक्ष्मी नारायणाचाच संसार असतो.

ज्या घरात ईश्वराची नित्य पूजा अधिष्ठान होत नाही,
ते एक प्रकारे चतुष्पादाचा म्हणजे पशुतुल्य संसारी
जीवनच असते. कुटुंबाचे सर्व व्यवहार हे ईश्वर साक्षीनेच

व्हावेत. ईश्वराचे अधिष्ठान हे ईशान्य दिशेला असल्यामुळे देव्हाऱ्याची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यातच असावी.

वास्तुच्या ईशान्य कोपऱ्यात देव्हाऱ्याचे तोंड पश्चिमेस
असले तरी चालते. ईशान्य कोपरा शक्य नसल्याल, पूर्व पश्चिम तोंड करुन देव्हारा चालेल. परंतु शक्य तो ईशान्य कोपऱ्यात देवारा अतिशय योग्य आहे.

कोपराच हवा. देव्हारा वास्तुच्या अगर त्या खोलीच्या
दक्षिण भिंतीजवळ अगर नैऋत्य कोपऱ्यात केव्हाही असू नये असल्यास अति पीड़ा उद्भवतात देव्हारा क्षयनगृहात सुद्धा नसावा जर शक्य नसेल तर
निदान देव्हाऱ्या समोर तात्पुरत्या लाकडी पार्टिशनची
व्यवस्था कायमस्वरूपी करावी.

पूजा घराच्या वर अगर खाली शौचालय अजिबात नसावे देवाचे फ़ोटो दक्षिण भिंतीला लावू नयेत पशु, पक्षी महाभारताचे युद्धप्रसंगाची चित्रे लावू नयेत.

देव्हाऱ्याचे अगदी समोर तिजोरी नसावी पूजाघराच्या
प्रवेशद्वारासमोर देवाचे फ़ोटो अजिबात लावू नयेत.

पूजाघरास उंबरठा अवश्य असावा. आपण फ्लॅट मध्ये राहत असाल तर तो भिंतीवर बसवू शकता फक्त त्याच्या खाली लाकडी फळी टोकून घेणे

देव्हाऱ्याच्या वरती निर्माल्य माळा असू नयेत. तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ असु नये.

पूजाघर भिंतीत कोरुन करु नये. अगर देव्हारा संपुर्ण
भिंतीत चिकटवुन ठेवू नये. पूजा घरात अड़ळीच्या वस्तु ठेवू नयेत प्राचीन मुर्त्यांचे भग्न अवशेष पूजाघरात ठेवू नये.

देव्हाऱ्यात कमीत कमी मूर्ति अगर तसबिरी असाव्यात कुलदेवीचा टाक, मुर्ति अथवा तसबीर, इष्टदेवतेचा फ़ोटो अगर मूर्ती, लंगडा बाळकृष्ण, नंदी व नागविरहित शंकराची पिंड काळ्या दगडाची किंवा पारद शिवलिंगअसावे, एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती पुजेत असू नये त्या दोन्ही एकही कार्य करीत नाही. मात्र एकाच देवतेची मूर्ती व तसबीर {फोटो} असेल तर हरकत नाही.

दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे {वंशज नसलेले घराणे} देव देवघरात अजिबात पुजा करू नये. ते सर्वच विधिवत विसर्जन करुन नवीन देव करावेत. सोन्याचे देव असतील तरीही विसर्जन करावे. नाही तर पूजकाची सुद्धा वंशबूडी होते.

देव्हाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फ़ोटो पुजू नयेत घराचे वातावरण स्मशानवत होईल. कारण भगवान शंकराचे सगुणरूप स्मशानातच तांडवनृत्य स्वरुपात मानले जाते.

संसारी माणसाने मारुतीची देव्हाऱ्यात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता { धोका } असते.

देव्हाऱ्यात शनिचि सुद्धा पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय अतिउदास राहते.

घरात मारुतिचा फ़ोटो कुठेही असल्यास चालेल पण
देव्हाऱ्यात नको.

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

01 Nov, 04:07


अमावस्येच्या दिवशीच का बरे करतात लक्ष्मीपूजन...

आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन का करतात?

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे. लक्ष्मी ही संपत्तीची देवता तर कुबेर हा संपत्ती-संग्राहक असल्याचे मानले जाते. पैसा खर्च कसा करावा हे अनेकांना कळत नाही, त्यामुळे पैसा त्यांच्याजवळ शिल्लक रहात नाही. कुबेर ही देवता पैसा कसा राखावा हे शिकविणारी आहे असे मानले जाते. म्हणून या पूजेकरता लक्ष्मी व कुबेर या देवतांचे पूजन केले जाते. यासोबतच घरामध्ये सुखशांती आणि धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते.
लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत

श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.
आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री केर का काढतात?

आश्विन अमावास्येला सूक्ष्म स्वरूपात गतीमान होणारी त्रासदायक स्पंदने जागृत होतात आणि पुन्हा पूर्ण वायूमंडलात गतीमान होण्यास सुरुवात होते. केर काढल्यामुळे घरात शिरलेले त्रासदायक घटक आणि वायूमंडलात गतीमान असणारी त्रासदायक स्पंदने घराच्या बाहेर फेकले जातात. त्यामुळे घराचे पावित्र्यही टिकून रहाते असे मानले जाते म्हणून आश्विन अमावास्येच्या रात्री घरातील केर काढतात....

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

29 Oct, 04:34


अमृतसिद्ध कलश स्थापन विधी

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

29 Oct, 00:59


धनत्रयोदशी चे महत्व
२९ ऑक्टोंबर ला धनतेरस आहे. धनतेरसच्या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरी तिची पूजा केली जाते. धन्वंतरी देवता आरोग्याची देवता म्हणून ओळखली जाते. समुद्रमंथन समुद्रमंथन झालं होतं त्या वेळेला 14 रत्न बाहेर आले होते. त्यात 14 रत्नांमधलं धन्वंतरी देवता हे पाचवं रत्न आहे. धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता आहे म्हणून या दिवशी धन्वंतरी ची पूजा केली जाते.
धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवता आणि लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा केली जाते. जे काही आपल्या घरात धन आहे पैसा आहे डाग दागिने आहेत त्याची पूजा आपल्याला लक्ष्मीपूजन च्या दिवशीच करायची असते.
धन्वंतरी देवतेची पूजा कशी करायची. सगळ्यात मोठे धन म्हणजे सुदृढ आरोग्य. आणि आपल्याकडे सुदृढ आरोग्यच नसेल. तर आपण समृद्ध कसे असणार. आणि आयुष्यात आपण सगळं काही कमवू शकतो पण आरोग्यानेच साथ नाही दिले तर आपण ते कमवू शकतो का?. धन्वंतरी देवतेला प्रार्थना करायची की आयुष्यात मलाच काय कोणालाच कुठली व्याधी नको. सर्व सुखी राहू दे सर्वांचे शरीर न करता करायची आहे. फोटो नसेल त्यांनी सुपारी मांडावी. सुपारी ची पूजा करायची. या दिवशी चांदी जर खरेदी केली तर खूप चांगलं असतं. आणि शक्यतो घरातल्या गृहलक्ष्मीला किंवा छोट्या कन्येला आईला. तुमच्या घराची कोणी स्त्री असेल तर तिला चांदी द्यावी. धन्वंतरी देव तिला हळदीकुंकू वाहायचे आहे तिला फुल धूप दीप दाखवायचा आहे. धन्वंतरी देवतेला प्रार्थना करायचे आहे. की माझं शरीर सुदृढ राहू दे कुठलाही आजार मला नको होऊ दे.
या सोबत धने जिरे हळद जे काही कडधान्य घरात असतील ज्या काही डाळी असतील तांदूळ साखर हेही या पूजेत मांडले जातं. त्याची पूजा केली जाते.
धन्वंतरी च्या पूजेमध्ये गुळ आणि धन्यांचा प्रसाद चढवला जातो. नंतर धन्वंतरी देवतेला प्रार्थना करायची आहे की मला उत्तम आरोग्य लाभू दे. शरीर माझं सुदृढ राहू दे. इतर सर्वांचे शरीर सुदृढ राहू दे त्यांनाही कुठले आजार नाही झाले पाहिजेत. झाली तुमची धन्वंतरी ची पूजा संपन्न.

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

26 Oct, 20:58


🚩www.mahashaktipeeth.org

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

26 Oct, 02:54


🌹 *सोलापुर दाते पंचांगानुसार दिपावली मुहूर्त* 🌹

*वसुबारस*
२८ ऑक्टोबर २०२४ , सोमवार

*धनत्रयोदशी, यमदीपदान*
२९ ऑक्टोबर २०२४ , मंगळवार

*नरक चतुर्दशी*
३१ ऑक्टोबर २०२४ , गुरुवार

*लक्ष्मीकुबेर पूजन*
१ नोव्हेंबर २०२४ , शुक्रवार

*लक्ष्मीपूजन मुहूर्त*
१ नोव्हेंबर २०२४ , शुक्रवार
*दु. ३ ते ५:१५, सायं. ६ ते ८:३०, रात्री ९:१० ते १०:४५*

*वहीपूजन मुहूर्त*
२ नोव्हेंबर २०२४ , शनिवार
*पहाटे ४:१० ते ६:४०, सकाळी ८ ते १०:५०*

*यमद्वितीया (भाऊबीज)*
३ नोव्हेंबर २०२४ , रविवार

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

25 Oct, 02:09


सासू सासरे नको//मग अनाथ मुलाशी लग्न
मुलींनो,
१.तुम्ही तुमच्या आईबापाच्या काळजाचा तुकडा असता तसा तुमचा नवराही खूप लाडाकोडात वाढलेला असतो. त्यालाही कळा देऊनच आईने जन्माला घातलेला असतो. तुम्हाला वाटतं तसं गटाराच्या बाजूने उचलून आणलेला नसतो.
२. लग्नापर्यंत तो ही शिक्षण, करिअर, मित्रपरिवार यात छान बिझी असतो. तेव्हा संसार करायचा त्याचा अनुभव तुमच्यासोबतच सुरु होतो.
३. आईबापाच्या संसारात तुमचा जितका नॉमिनल रोल असतो तितकाच त्याचाही असतो. त्याला सगळंच समजायला हवं ही अपेक्षा आणि त्याला काहीच समजत नाही हा तर्क दोन्ही अतिरेकी आहेत.
४. तुमची पाळी आल्यावर लगालगा तो तुमच्या उशापायथ्याशी बसेल, डोकं हातपाय चेपून देईल अशी अपेक्षा करु नका. लाखो मुलांना असा काही त्रास असतो हे माहीत नसतं. कारण त्यांच्या आईला(कदाचित् ) तेवढा त्रास झालेला नसतो. तेव्हा गेट व्होकल. तोंड उचकटून सांगायचं, अमुक कर किंवा तमुक कर. सांगायचंही नाही आणि केलं नाही म्हणून तोंड पाडून बसायचं हे जमणार नाही.
५. नव-याची आर्थिक लायकी काढताना, आपल्या बापाने आपल्याला काय लाईफस्टाईल दिलीय ते बघावं. आपण आपल्या हिमतीवर काय करु शकतो ते आजमावावं आणि मग विषय काढावा.
६. तुम्ही जसं उंची, अनुरुपता, पगार, स्थावर जंगम इस्टेट, घरातलं स्थान बघून लग्न करता तसं तो रुप, रंग, फिगर वगैरे बघून करतो. व्यवहार आहे तो. इमोशनल व्हायची गरज नाही. तुम्ही ठोकून वाजवून लग्न करणार आणि त्याने बघताक्षणी हो म्हणावं असं होत नसतं.
७. तुम्हाला तुमची प्रिय आहे तशी त्यालाही त्याची आई प्रिय आहे. तुमच्या आईला जसा लेकीच्या संसारात इंटरेस्ट असतो तसा त्याच्या आईलाही असतो. मुलगा म्हणजे काही देवीला सोडलेलं कोकरु नव्हे, विसरुन जायला. तो मजेत आहे न, त्याला काही त्रास नाही न हे वेळोवेळी त्याचे आईबाप चेक करणारच.
८. सासूसासरे नक्कोच असतील तर अनाथ मुलाशी लग्न करावं.
९. तुम्ही तासनतास आईशी बोलणार आणि तो दहा मिनीटं बोलला कि तुमचा जळफळाट होणार हे चालणार नाही. तुम्ही यायच्या खूप आधीपासून आई आहे त्याच्या आयुष्यात. तेव्हा शांत रहा. या मुद्द्यावरुन फालतू ब्लॕकमेंलिंग करु नका.
१०. आईबरोबरच मित्र, मैत्रिणी ही त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग असणार. त्या बाबतीत अडवणूक नको.
११. दळण, लाँड्री, स्वयंपाक, आला गेला, स्वच्छता, आर्थिक बाबी, प्रवासाचं नियोजन इ.इ. बाबींत परफेक्ट नॉलेज असणाराच नवरा हवा असेल तर विधुराशी किंवा घटस्फोटीत मुलाशी लग्न करावं. त्यांना नक्कीच जास्त अनुभव असतो.
१२. आणि परत एकदा, आपलं काय म्हणणं असेल ते समोरुन सांगावं. मुलांना आईने ‘ मनातलं ओळखून दाखव बरं ‘ सारखे फालतू गेम्स शिकवलेले नसतात. आणि हो, तुमच्या आईला त्याच्याकडून मान हवा असेल तर तुम्हीही त्याच्या आईशी नीट वागा.

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

24 Oct, 02:40


गुरुमंत्र मुखे यस्य तस्य सिद्धयन्ति नानया ।
दीक्षाय सर्वकर्माणी सिद्धयन्ति गुरुपुत्रके ।



म्हणजेच ज्याच्या मुखात गुरुमंत्र असतो, त्याची सर्व कर्मे सिद्धीस जातात, इतरांची नव्हे. दीक्षा घेतल्याने शिष्याची सर्व कार्ये सिद्धीस जातात.

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

22 Oct, 13:14


जॉइन करा - https://t.me/mahashaktipeeth
Website - www.mahashaktipeeth.org

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

22 Oct, 12:42


https://www.mahashaktipeeth.org/post/नवरात्रि-navratri-2024

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

21 Oct, 14:26


लवकरच आजचे लाईव सुरू होत आहे.
लाईव ची लिंक खाली दिली आहे.

https://youtube.com/live/YVglXqKe4yU?feature=share

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

17 Oct, 06:50


Live stream finished (7 minutes)

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

17 Oct, 06:45


https://t.me/mahashaktipeeth?livestream=aa3dbe71b3555807d9

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

17 Oct, 06:42


Live stream started

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

15 Oct, 17:56


कोजागिरी पौर्णिमा महत्त्व व पूजन

को जागरती = कोण जागं आहे !….
अखंड लक्ष्मी प्राप्तीच्या व्रतांपैकीच एक अतीशय महत्त्वाचे आणि प्रभावी व्रत कोजागिरी पौर्णिमा. लक्ष्मी-कुबेर-इंद्र-चंद्र आदी देवतांची महत्वाची पूजा.

पौर्णिमेची रात्र. चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. अश्विन शु.पोर्णिमा म्हणजे ‘कोजागरी पोर्णिमा’ अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात.
त्यांच्यावर देव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. हा उत्सव अश्विन शु. पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक १२ ते १२.३९ या ३९ मिनिटात करायचा असतो. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येकाने आपल्या घरीच करावा. उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी असतात त्यांना अमृताचा (दुध) नवैद्य लागतो.

पूजाविधी मांडणी :-

मांडणी करतांना एका पाटावर किंवा चौरंगावर
१) लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानावर सुपारी ठेवावी
२) विड्याच्या जोड पानावर कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी.
३) तांदुळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांबा/गडवा, त्यात आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतिक म्हणून घ्यावा. अशी मांडणी रात्री १२ वाजेपर्यंत करून ठेवावी. रात्री ठीक १२ ते १२:३० या ३० मिनिटात दुधाचे भांडे चंद्राकिरणात ठेवावे. जेणे करून चंद्र देवता शलाका रुपात अमृताचा प्रसाद देतात.
४) चंद्राचे प्रतिक म्हणून चंदनाचा एक छोटा भरीव गोल बनवावा.
५) १२:३० ला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे. त्यात एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा व प्रार्थना म्हणावी

ऋण रोगादी दारिद्रयम अपमृत्यू भय I शोक मनस्ताप नाशयन्तु मम सर्वदा II


दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा. उपरोक्त सुपारी जपून ठेवून दरवर्षी पुजाव्यात. कोजागारीस त्यांची पूजा करावी. १२ ते १२:३० या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी
त्यात अखंड लक्ष्मी साधनेच्या पिडीएफ मध्ये दिलेल्या मंत्राचा जप करावा जमल्यास याग करावा.
हा अतिशय महत्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम आहे. लक्ष्मी म्हणजे श्री, शोभा!
लक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी हि परमदयाळू आहे. कृपाळू आहे, ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहिण मात्र संकटे आणते, त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे.

या मोठ्या बहिणीस अक्काबाई’ म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की ‘अक्काबाईचा फेरा आला’ हि अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते. कोण झोपले आहे कोण जागे आहे. ते ती पाहते अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागावते. पण जे जागरण करतात त्यांना सुख समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. कोण जागतोय? कोजागर्ती? यावरून या पौर्णिमेला कोजागरी हे नाव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे तो पाहत असतो. वारंवार तो कोजागरती असे विचारतो यावरून हे नाव रूढ झाले.

@mahashaktipeeth
—————————
महाराष्ट्रातील सर्व देवी स्वरूपांच्या भक्तांसाठी एकमेव शक्तिपीठ - श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम(महाशक्तीपिठ)
----------
☎️फोन  01169272882
📩व्हाटसप्प - 7028177950
🚩Website - www.mahashaktipeeth.org
----------
🚩टेलिग्राम -  https://t.me/mahashaktipeeth

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

15 Oct, 13:03


🍛कोजागिरी पौर्णिमा अन्नदान मध्ये योगदान केलेल्यांची नावे
१) गणेश भगण्णा कोळी परिवार
२) अश्विनी पडवळ परिवार
३) गौरी गरुड आणि परिवार
४) सोनल इंगावले परिवार
५) पांडुरंग तांदुळवाडे परिवार
६) अश्विनी काळे परिवार
७) किशोर गायकवाड परिवार
८) पल्लवी वेताळ परिवार
९) पूनम भोसले परिवार
१०) पूजा मोरे परिवार
११) अजित जाधव परिवार
१२) कल्याणी इनामदार परिवार
१३) अजय विचारे परिवार
१४) विजया केरेकर परिवार

ज्यांना सेवेत सहभाग घेण्याची इच्छा आहे त्यांनी 7028177950 या नंबर वर कॉल किंवा WhatsApp करून रश्मी ताईंशी संपर्क साधावा.
सेवा ही अनमोल असते तिला मूल्य नसते आपल्या इच्छेनुसार करावी. जमल्यास प्रत्यक्ष येऊन सेवा द्यावी.
____
@mahashaktipeeth

महाराष्ट्रातील सर्व देवी स्वरूपांच्या भक्तांसाठी एकमेव शक्तिपीठ - श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम(महाशक्तीपिठ)
----------
☎️फोन  01169272882
📩व्हाटसप्प - 7028177950
🚩Website - www.mahashaktipeeth.org
----------
🚩टेलिग्राम -  https://t.me/mahashaktipeeth
----------

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

15 Oct, 12:34


श्री अजय विचारे परिवार, श्रीमती विजया केरेकर परिवार यांच्या तर्फे महाप्रसादासाठी खाद्यतेलाचे योगदान.

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

15 Oct, 11:05


ज्यांना १७ ऑक्टोबर (कोजागिरी पौर्णिमा) च्या अन्नदान/महाप्रसाद मध्ये काही योगदान देण्याची इच्छा आहे त्यांनी या QR कोड ला स्कॅन करून योगदान देऊ शकता.
जय जगदंब!🚩

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

14 Oct, 15:40


https://youtu.be/IPF2yPDDG1w

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

11 Oct, 17:42


अमृतसिद्ध कलश स्थापन विधी

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

11 Oct, 06:18


🚩महाशक्तीपीठ दर्शन🚩
रंग - जांभळा

महाराष्ट्रातील सर्व देवी स्वरूपांच्या भक्तांसाठी एकमेव शक्तिपीठ - श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम(महाशक्तीपिठ)
----------
☎️फोन  01169272882
📩व्हाटसप्प - 7028177950
🚩Website - www.mahashaktipeeth.org
----------
🚩टेलिग्राम -  https://t.me/mahashaktipeeth
----------

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

10 Oct, 05:42


🚩महाशक्तीपीठ दर्शन🚩
सातवा दिन - आई महागौरी
रंग - गुलाबी

महाराष्ट्रातील सर्व देवी स्वरूपांच्या भक्तांसाठी एकमेव शक्तिपीठ - श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम(महाशक्तीपिठ)
----------
☎️फोन  01169272882
📩व्हाटसप्प - 7028177950
🚩Website - www.mahashaktipeeth.org
----------
🚩टेलिग्राम -  https://t.me/mahashaktipeeth
----------

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

09 Oct, 15:27


Updated🌳

🌏महाशक्तीपीठ नवरात्री सेवा
काही भक्तांनी आपआपल्या इच्छेनुसार या उत्सवात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपाने सहयोग दिला आहे. ज्यांना प्रत्यक्ष येऊन सेवा करण्याची इच्छा आहे त्यांनी सुद्धा आईसाहेबांची सेवा करू शकता. 

ज्यांना सेवेत सहभाग घेण्याची इच्छा आहे त्यांनी 7028177950 या नंबर वर कॉल किंवा WhatsApp करून रश्मी ताईंशी संपर्क साधावा.

🏵९ दिवस उत्सवाची पूर्ण तयारी
🍁९ दिवस साज सजावट श्रमदान-
१) यथार्थ अजित जाधव, मुंबई
२) गणेश कोळी, मुंबई
३) प्रीती जाधव, मुंबई.
४) रश्मी ताई, ठाणे.
🍁तेलाचा अखंड दिवा - राजेंद्र दरंदले, अहमदनगर.
🍁तुपाचा अखंड दिवा - पूनम भोसले, मुंबई
🍁९ दिवस प्रसाद - आनंद तेरकर, नांदेड
🍁९ दिवस फुले - 
🍁९ दिवस हार - 
🍁९ दिवस आरती -
🍁९ दिवस कापूर - भगण्णा कोळी, मुंबई
🍁९ दिवस तांबूल सेवा - मकरंद रानडे, संगमनेर.
🍁९ दिवस सवाष्न आणि कन्या पूजन -
🍁९ दिवस देवी अभिषेक -
🍁९ दिवस देवीचा साज श्रृंगार - रागसंस ज्वेलर्स, डेप्युटी कलेक्टर साहेब, कोल्हापूर.
🍁९ दिवस देवीचा गजरा - भावना ठाकूर परिवार, जळगाव

🍛कोजागिरी पौर्णिमा अन्नदान (भंडारा) -
१) गणेश भगण्णा कोळी परिवार - २५ किलो तांदूळ.
२) अश्विनी पडवळ परिवार - देणगी ₹५००१/-
३) संबळ वाद्यावर आरती - गौरी गरुड आणि परिवार, पुणे.
४) १० किलो हरभरा - सोनल इंगावले, शिरूर.
५) पांडुरंग तांदुळवाडे परिवार, कोल्हापूर - ₹१२०१/-
६) अश्विनी काळे परिवार, पुणे - ₹५०१/-
७) किशोर गायकवाड, पुणे - ₹५००१/-
८) पल्लवी वेताळ परिवार, पुणे - ₹११०००/-
९) पूनम भोसले परिवार, मुंबई - ₹२१०००/-
१०) पूजा मोरे परिवार, मुंबई - ११०१/-


🌈९ दिवस आई जगदंबेची साडी
पिवळा - दिपाली देशपांडे, चेतना जोशी, मुंबई
हिरवा - गणेश भगण्णा कोळी, मुंबई
करडा - प्रीती जाधव, मुंबई
केशरी - सीमा शेटे,मुंबई
पांढरा - 
लाल - पूनम भोसले, मुंबई. बबिता फोगाट, हरियाणा.
निळा - गौरी गरुड, पुणे.
गुलाबी - अश्विनी पडवळ, पुणे
जांभळा - निरा बिंद, काशी.


ज्यांना सेवेत सहभाग घेण्याची इच्छा आहे त्यांनी 7028177950 या नंबर वर कॉल किंवा WhatsApp करून रश्मी ताईंशी संपर्क साधावा.
सेवा ही अनमोल असते तिला मूल्य नसते आपल्या इच्छेनुसार करावी. जमल्यास प्रत्यक्ष येऊन सेवा द्यावी.
____
@mahashaktipeeth

महाराष्ट्रातील सर्व देवी स्वरूपांच्या भक्तांसाठी एकमेव शक्तिपीठ - श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम(महाशक्तीपिठ)
----------
☎️फोन  01169272882
📩व्हाटसप्प - 7028177950
🚩Website - www.mahashaktipeeth.org
----------
🚩टेलिग्राम -  https://t.me/mahashaktipeeth
----------

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

09 Oct, 05:55


🚩 अंबा बैसली सिंहासनी

महाराष्ट्रातील सर्व देवी स्वरूपांच्या भक्तांसाठी एकमेव शक्तिपीठ - श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम(महाशक्तीपिठ)
----------
☎️फोन  01169272882
📩व्हाटसप्प - 7028177950
🚩Website - www.mahashaktipeeth.org
----------
🚩टेलिग्राम -  https://t.me/mahashaktipeeth
----------

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

09 Oct, 05:16


🚩महाशक्तीपीठ दर्शन🚩
सहावा दिन - आई काल रात्री
रंग - निळा

महाराष्ट्रातील सर्व देवी स्वरूपांच्या भक्तांसाठी एकमेव शक्तिपीठ - श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम(महाशक्तीपिठ)
----------
☎️फोन  01169272882
📩व्हाटसप्प - 7028177950
🚩Website - www.mahashaktipeeth.org
----------
🚩टेलिग्राम -  https://t.me/mahashaktipeeth
----------

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

08 Oct, 13:03


महाशक्तीपिठात चमत्कार!

महाराष्ट्रातील सर्व देवी स्वरूपांच्या भक्तांसाठी एकमेव शक्तिपीठ - श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम(महाशक्तीपिठ)
----------
☎️फोन  01169272882
📩व्हाटसप्प - 7028177950
🚩Website - www.mahashaktipeeth.org
----------
🚩टेलिग्राम -  https://t.me/mahashaktipeeth

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

08 Oct, 06:20


🚩महाशक्तीपीठ दर्शन🚩
पाचवा दिन - आई कात्यायनी
रंग - लाल
सजवलेले रूप - महालक्ष्मी
महाराष्ट्रातील सर्व देवी स्वरूपांच्या भक्तांसाठी एकमेव शक्तिपीठ - श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम(महाशक्तीपिठ)
----------
☎️फोन  01169272882
📩व्हाटसप्प - 7028177950
🚩Website - www.mahashaktipeeth.org
----------
🚩टेलिग्राम -  https://t.me/mahashaktipeeth
----------

महाशक्तीपीठ | गुरु रेवती (माई)

07 Oct, 04:55


🚩महाशक्तीपीठ दर्शन🚩
पाचवा दिन - आई स्कंद माता
रंग - पांढरा
सजवलेले रूप - ब्रह्मचारिणी
महाराष्ट्रातील सर्व देवी स्वरूपांच्या भक्तांसाठी एकमेव शक्तिपीठ - श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम(महाशक्तीपिठ)
----------
☎️फोन  01169272882
📩व्हाटसप्प - 7028177950
🚩Website - www.mahashaktipeeth.org
----------
🚩टेलिग्राम -  https://t.me/mahashaktipeeth
----------