Saam TV @saamnews Channel on Telegram

Saam TV

@saamnews


महाराष्ट्रातील अग्रगण्य मराठी न्यूज चॅनल...देशातील आणि जगभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्याचे एकमेव ठिकाण.!

https://saamtv.esakal.com/

Saam TV (Marathi)

साम टीव्ही - महाराष्ट्रातील अग्रगण्य मराठी न्यूज चॅनल आहे. ह्या चॅनलवर देशातील आणि जगभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्याची एकमेव ठिकाण मिळते. या चॅनलवर तुम्ही मराठीत ताज्या घडामोडी वाचू शकता, विविध विषयांवर चर्चा करू शकता आणि राजकारणातील वादधटलं जाणून घेऊ शकता. साम टीव्हीच्या टेलीग्राम चॅनलवर आपल्याला जीवनातील महत्वाच्या घडामोडी मराठीत वाचून मिळतात. साम टीव्ही चॅनलवर जायची अद्याप तुमच्या फोनवरूनही, लॅपटॉपवरूनही मिळतात. तेव्हापासून आजच जॉईन करा साम न्यूजच्या टेलीग्राम चॅनलवर!

Saam TV

09 Aug, 14:51


पन्नास वर्षीय इसमाची एक्सप्रेसच्या शौचालयामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. नंदिग्राम एक्सप्रेसच्या शौचालयामध्ये गळ्यातील गमछाने गळफास घेतल्याचं सांगण्यात येत आहे. दादर लोहमार्ग पोलिसांकडून चौकशीला सुरुवात केलीय.

Saam TV

28 Jun, 07:54


विधानसभेत पुणे 'हिट अँड रन' प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले. विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं

Saam TV

28 Jun, 06:20


भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सेमीफायनलमध्ये विराटला मोठी खेळी करता आलेली नाही. दरम्यान या सामन्यानंतर रोहितने विराटबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Saam TV

27 Jun, 05:19


लोकलच्या गर्दीवर कोर्टाने रेल्वेला झापलं आहे. गुरांप्रमाणे प्रवास करायला लावणं हे लाजिरवाणं आहे, दर दिवशी सरासरी 6 मृत्यू होतात,तरीही रेल्वे प्रशासनाला गांभीर्य नाही, प्रवाशांच्या वाहतुकीबद्दल पाठ थोपटवून घेऊ नका, सबबी देऊ नका तोडगा समोर ठेवा रेल्वेला हायकोर्टाने अश्या पद्धतीने फटकारलं आहे.

Saam TV

24 Jun, 05:52


देशाच्या १८ व्या लोकसभेत शपथ घेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'सरकार चालवण्यासाठी बहुमताची गरज असते. तसंच देश चालवण्यासाठी सहमतीची गरज असते. त्यामुळे सर्वांच्या सहमतीने निर्णय घेतले जातील आणि देशाच्या हिताचे काम व्हावे यासाठी आमचे सरकार प्रयत्न करेल. तिसऱ्या कार्यकाळात आमचे सरकार तिप्पट मेहनत करेल आणि देशाचा तीनपट अधिक विकास करेल. भारताला लवकरच गरिबीतून मुक्त करेल.', असे आश्वासन पीएम मोदी यांनी देशातील जनतेला दिले आहे. यावेळी त्यांनी सर्व नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

Saam TV

24 Jun, 05:37


आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत सामना वेस्टइंडिज आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. अँटिग्वामध्ये पार पडलेल्या या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्टइंडिजने २० षटकअखेर ८ गडी बाद १३६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १३६ धावा करायच्या होत्या. मात्र पावसाने अडथळा निर्माण केल्याने दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १७ षटकात १२३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईस नियमानुसार ३ गडी राखून विजय मिळवला आहे.

Saam TV

22 Jun, 07:31


अयोध्येतील राम मंदिराची प्राण-प्रतिष्ठा करणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांचं शनिवारी सकाळी निधन झालं. लक्ष्मीकांत दीक्षित यांनी वयाच्या ९० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. आचार्य मागील काही दिवसांपासून आजारी होते.

Saam TV

22 Jun, 06:01


राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्यावं. तसेच सगेसोयरे अधिसूचना लागू करू नये, अशी मागणी करत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत. गेल्या १० दिवसांपासून जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे त्यांचं उपोषण सुरू आहे. हाके यांच्या या उपोषणाची धग आता खेड्यापाड्यात पसरली आहे. अनेक ओबीसी बांधवांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

Saam TV

22 Jun, 05:28


गुरुग्राममध्ये कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात २ कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Saam TV

21 Jun, 09:47


शेतकऱ्यांकडून नाफेडकडून शेतीमाल खरेदी केला जात असतो. त्यानुसार नाफेडकडून कांदा खरेदी केलेल्या केंद्रांवर गैरकारभार झाल्याचे समोर आले आहे. नाफेडच्या अध्यक्षांनी अचानक केंद्रावर जाऊन केलेल्या तपासणीत हा गैरकारभार उघडकीस आला आहे.

Saam TV

21 Jun, 08:35


नीट परीक्षा घोटाळा, पेपर फुटी प्रकरण, वाढती महागाई, शेतकऱ्यांना हमीभाव यासह वेगवेगळ्या मुद्द्यावर महायुती सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेसच्या वतीने राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून चिखल फेक आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी महायुती आणि भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला आहे.

Saam TV

21 Jun, 06:55


राज्य सरकारने ५४ लाख कुणबी नोंदी रद्द करून त्याची लेखी द्यावी. तरच मी उपोषण मागे घेतो, अशी मागणी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी सरकारच्या शिष्टमंडळाकडे केली. जोपर्यंत मला लेखी मिळत नाही, तोपर्यंत माझे उपोषण सुरुच राहणार, असंही हाके यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या मागणीनंतर मराठा समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हाके यांच्या या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

Saam TV

20 Jun, 08:31


आयआयटी मुंबईच्या आठ विद्यार्थ्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. संस्थेच्या वार्षिक कला मोहत्सवात रामायणावर आधारित नाटकातील मुख्य पात्राला अपमानित पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यासंदर्भात काही विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती. हा प्रकार संस्थेच्या वार्षिक कला महोत्सवात घडला होता. या वर्षी मार्चमध्ये हा कार्यक्रम झाला होता. 'राहोवन' नावाचं नाटक या विद्यार्थ्यांनी सादर केलं होतं.

Saam TV

20 Jun, 07:34


दक्षिण आफ्रिका महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना बुधवारी पार पडला. या अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघावर ४ धावांनी विजय मिळवला आहे. यासह मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.
दरम्यान सामन्यात या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या स्म्रिती मंधानाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

Saam TV

20 Jun, 07:05


नव्याने शपथ घेतलेल्या केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही केंद्र सरकारची मार्गदर्शक घोषणा देवनागरी लिपीत चुकीच्या पद्धतीने लिहिल्याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. महिला व बालविकास राज्यमंत्र्यांनी सरकारचा नारा चुकीचा लिहिला याबद्दल सोशल मीडियावर सध्या टीका टिप्पणी होताना दिसतेय.

Saam TV

20 Jun, 06:34


युजीसी नीट च्या निकालातील गोंधळ अजूनही संपलेला नसताना MHT-CET चा निकालही वादात सापडलाय. विद्यार्थी आणि पालकांनी या निकालावर संशय व्यक्त केलाय. कारण MHT-CETच्या निकालाबाबत 'आन्सर की' म्हणजेच उत्तरपत्रिके आधारे मिळालेले मार्क आणि पर्सेन्टाईल यात तफावत असल्याची तक्रार विद्यार्थी आणि पालकांनी केलीय. हा विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी फेरण्याचा प्रकार असल्याची टीका सुषमा अंधारेंनी केलीय.

Saam TV

20 Jun, 06:12


लोकसभा निवडणुकानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारामती तालुक्यावर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून ते बारामतीमधील दुष्काळी भागाचा दौरा करत आहेत. आज त्यांच्या या दौऱ्याचा तिसरा दिवस असून या सर्व दुष्काळी भागाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

Saam TV

20 Jun, 05:43


आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील सामन्यांना प्रारंभ झाला आहे. वेस्टइंडिज विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने वेस्टइंडिजवर शानदार विजय मिळवला आहे. यासह वेस्टइंडिजचा विजयरथ रोखला आहे. या लढतीत इंग्लंडने ८ गडी राखून बाजी मारली आहे. इंग्लंडच्या विजयात फिल सॉल्टने मिठाचा खडा टाकला. त्याने अवघ्या ४७ चेंडूंचा सामना करत ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ८७ धावांची खेळी केली.

Saam TV

18 Jun, 10:07


एअर इंडियाच्या जेवणात ब्लेडचा तुकडा आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेंगळुरु ते सॅन फ्रान्सिस्को या विमानातील एका प्रवाशाच्या जेवणात हा ब्लेडचा तुकडा आढळला होता. मॅथुरेस पॉल असे त्या व्यक्तीचे नाव आहे. ते गेल्या आठवड्यात एअर इंडिया एआक १७५ फ्लाइटने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान ऑर्डर केलेल्या जेवणात धातूची काहीतरी वस्तू सापडली होती. प्रवाशाने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली होती. त्यानंतर आता एअर इंडियाने या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Saam TV

18 Jun, 08:52


तुकाराम मुंढे यांची दुग्धविकास आणि पशुसंवर्धन खात्याच्या सचिवपदावरुन बदली करण्यात आलीय. विकास आयुक्त, असंघटित कामगार या पदावर तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली. अप्पर मु्ख्य सचिव नितीन गद्रे यांनी मुंढे यांना बदलीचं पत्र दिल्याची माहिती मिळत आहे.

1,168

subscribers

5,656

photos

183

videos