❤️शब्द मनाचे❤️ @shabdamanache Channel on Telegram

❤️शब्द मनाचे❤️

@shabdamanache


"शब्द"... माणसाला मिळालेली अद्भुत भेट!! आयुष्यात येणारे अनुभव, आनंद- दु:ख, भावना.. माणुस जगतो त्या शब्दातून! अन मनातून.. मनापासून उमललेले शब्द भावनेला पूर्णत्वाला नेतात!! असेच काही अनुभव, भावना...

Contact :- @kailasbobade

❤️शब्द मनाचे❤️ (Marathi)

शब्द मनाचे टेलीग्राम चॅनल हा एक अद्भुत स्थान आहे ज्यात माणसाला अद्भुत भेटीची अवस्था कायम करण्यात येते. आयुष्यात जे अनुभव, आनंद, दु:ख, भावना माणूस अनुभवतो, त्याचे सर्व महत्त्वपूर्ण समय त्या शब्दातून उभा होते. 'शब्द मनाचे' चॅनल तेव्हा असा असा चॅनल आहे कि त्यातील शब्द मनालो, त्यातील भावना मनात उमटली जाते. भेट द्यावी किंवा औरंगाबादसाठी अनुभव साझा करावा इच्छित असल्यास, @kailasbobade यांच्याशी संपर्क साधा.

❤️शब्द मनाचे❤️

23 Nov, 01:59


जुन्या वस्तू जेव्हा सापडतात तेव्हा त्या एकट्या सापडत नाहीत तर त्यांच्या सोबत अनेक आठवणी गवसतात.
#शब्द_मनाचे
Join👉
@shabdamanache

❤️शब्द मनाचे❤️

23 Nov, 01:57


🌅 " आजचे सुविचार "

1) मन समाधानी असलं की... छोट्या छोट्या गोष्टीतही भरपूर आनंद घेता येतो.

2) सकारात्मक राहिल्यास आलेली संकटे, समस्या या सगळ्यांचा सामना निर्भयपणे करता येतो.

3) घसरलेला पाय सावरता येईल, पण बोललेला शब्द सावरता येणार नाही.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    ❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

❤️शब्द मनाचे❤️

22 Nov, 11:13


स्वतःशी प्रामाणिक असलेली व्यक्ती दुसऱ्याला दुःखं देण्याचा विचार पण करू शकत नाही कारण त्याला चांगल्या पद्धतीने माहिती असतं की आपल्या माणसांकडून कडून मिळालेलं दुःखांची मनाला झालेली जखम एवढी कोरून जाते ती कधीच भरल्या जात नाही म्हणून प्रत्येकाशी आपुलकीणे वागा शेवटी आपण सोबत काही नेणार नाही आहो क्षुल्लक कारणावरून आयुष्यभरापासून जपलेली नाती सोडू नका माणसाचं जीवन पण एक पाण्याचा बुडबुडा आहे कधी पुठणार सांगता पण येणार नाही ना!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

❤️शब्द मनाचे❤️

22 Nov, 05:36


रोज मजुरीच्या वाटेवर केला
आज दुःख यातनांनी जश्नं
गरिबीमुळेच मिळाला मला
अनमोल हा महाराष्ट्र रत्नं

❤️शब्द मनाचे❤️

22 Nov, 03:36


मेहनत करणाऱ्या लोकांची देव परीक्षा खूप घेतो पण साथ कधीच सोडत नाही.

एक दिवस यश नक्कीच मिळते..
❤️

#शब्द_मनाचे
Join👉
@shabdamanache

❤️शब्द मनाचे❤️

22 Nov, 02:42


🌅 " आजचे सुविचार "

1) नेहमी तीच लोक आपल्याकडे बोटं दाखवतात, ज्यांची आपल्यापर्यंत पोहचायची ऐपत नसते.

2) गरिबी आणि श्रीमंती वृक्षाची सावली असते. सूर्य फिरला की सावली फिरत असते. तसेच प्रारब्ध बद्दलं की गरीबी आणि श्रीमंती बदलत असते.

3) जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्ण असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते...!

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    ♥️शब्द मनाचे♥️
  Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

❤️शब्द मनाचे❤️

21 Nov, 10:52


काही लोक म्हणतात खरं प्रेम वगैरे काहीच नसतं तर ते स्वार्थापोटी झालेलं एक आकर्षण असतं पण मला वाटतं प्रेम ही निःस्वार्थ भावना आहे ती तितक्याच शुद्धतेने जपल्या गेली पाहिजे कारण ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येणार की नाही हे परिस्थितीवर अलंबून असलं तरी मात्र एकतर्फी प्रेम आपल्यासाठी नेहमीच अमर असते ना राव❤️!,,✍🏻

कमन#लेखक
 
@Ommshelke

❤️शब्द मनाचे❤️

21 Nov, 04:03


बिंदास राहायचं कारण आपल्याला माहिती आहे... आपण किती धुमाकूळ घालू शकतो...
#शब्द_मनाचे
Join👉
@shabdamanache

❤️शब्द मनाचे❤️

21 Nov, 04:02


🌅 " आजचे सुविचार "

1) जिद्द पण त्यांनाच निवडते, ज्यांच्या मध्ये लढण्याची ताकद असते.

2) जी गोष्ट मनात आहे, ती बोलण्याची हिंमत ठेवा. आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे, ती समजून घेण्याची क्षमता ठेवा.

3) माणसांच्या नात्यातील ओलावा हा वाईट प्रसंगाच्या वेळी खरा गारवा देतो.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    ♥️शब्द मनाचे♥️
 Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

❤️शब्द मनाचे❤️

20 Nov, 06:27


लोकशाहीचे अभेद्य कवच, जागरूक मतदार..

जरूर सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही सुदृढ करा..

#शब्द_मनाचे
Join-
@shabdamanache

❤️शब्द मनाचे❤️

20 Nov, 04:25


❣️❣️ मतदान करा.. ❣️❣️

लोकशाहीच्या ऊत्सवात सहभागी व्हा मतदान करा, आपली जबाबदारी पार पाडा फरक पडतो..!

#शब्द_मनाचे
Join👉
@shabdamanache

❤️शब्द मनाचे❤️

20 Nov, 04:12


एकटं असणं आणि एकाकी असणं यात बराच फरक आहे. एकाकी व्यक्ती गर्दीतही पोरकी असते, एकट्या व्यक्तीस मात्र आत्मभानाची अखंड सोबत असते.
#शब्द_मनाचे
Join👉
@shabdamanache

❤️शब्द मनाचे❤️

20 Nov, 04:08


🌅 " आजचे सुविचार "

1) वेळप्रसंगी प्रत्येकाची बोलण्याची भाषा आणि वागण्याची पद्धत बदलत असते...!!

2) जी लोकं आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगल म्हणतात तीच लोक आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात.

3) कामात आनंद निर्माण केला की, त्याचं ओझं वाटत नाही. आळस वाटत नाही आणि कंटाळवाने वाटत नाही.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
    ♥️शब्द मनाचे♥️
  Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

❤️शब्द मनाचे❤️

19 Nov, 18:28


लोक सच बोला करते हैं
दुनिया में कोई झूठी कसमा
खा मर नहीं जाता प्यारे

और तू हस हस कर जहर खा के
मरने की बातें किया करते हो

प्यारे कभी बिना बातें किये
जहर खा कर हमे मर के
दिखाओ रे प्यारे

✍️विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143

❤️शब्द मनाचे❤️

19 Nov, 17:09


*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*

निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझं गाव विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहीलं

गावाला घडवण्याचे अमीष दाखवुन
गावं *मटन आणि दारुत* बुडवताना पाहीलं
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी
*माझं गाव विकताना पाहील*

इतक्या दिवस साड्या ओढणारं
अचानक साड्या वाटताना दिसलं
मटनाच्या तुकड्यात दारुच्या बाटलीसाठी
गरीबाला मी लाचार होताना पाहिलं,
रात्री मी *माझं गाव विकताना पाहिलं*

पैश्या पुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला
पुन्हा गरीब बिचारा गरीबचं राहिला...
त्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ
मी माझ्या डोळ्यांनी पाहीला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

गरिबांना पायदळी तुडवणारा
आता त्यांच्या पाया पडताना दिसला
गरिबांच्या झोपडीकडे जाताना
त्याचे जोडे केवढे घासले पण
वरवरच्या प्रेमाचा डाव
मी त्याच्या तोंडावर पाहीला,
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

लोकशाही ढाब्यावरच बसवून
त्याने तोडलेत गरीबांचे लचके
आज दडपशाही मतदानाला आणली
गावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी
त्या फुकट वाटलेल्या *दारुनेच* धुतली

त्या वाहणा-या विषारी *दारुत*
आज माझं गावही वाहिलं, 
*मटनाच्या* रस्स्यापाई पुन्हा पाच वर्ष गरीबच राहीलं,,,

निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझ गावं विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
*बरबाद* होताना पाहिलं.....!

आणि रात्री *मी गांव माझं विकताना पाहिलं*

🙏 एक मतदार 🙏

❤️शब्द मनाचे❤️

19 Nov, 11:34


"त्याचं अस्तित्व कुणाला कसं कळलंच नाही?"
( एकदा पूर्ण वाचून पहा,तुमच्याही मनाला कुठेतरी खरं वाटेल🙏)

आपण सर्वांनी "श्यामची आई" ह्या पुस्तकाचे नाव तर एकलेच असेल मग त्या पुस्तकासारखं एखादं बाबा,भाऊ,मुलगा ह्यांच्यावर लिहलेले पुस्तक कधी तुम्ही पाहिलंय का?कसं भेटेल कारण पुरुषांवर कधी कोणी काही बोलल,लिहिलेच जात नाही😳इतरांच काय तुम्ही तुमच्या घरातील पुरुषांवर बाबा,मुलगा,काका,भाऊ,मित्र ह्यंच्यबदल लिहून पहा जास्त दोन चार ओळी पलीकडे लीहताच येणार नाही कारण त्यांच्या भावनांना,दुःखांना समजुन घ्यायला आपण कधी त्यांचं जबाबदारीच पांघरून उघडुन पाहतो का😔?छ.शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजाऊमातेंचे नाव आपल्या मुखावर येते तसे स्वराज्यसंकल्पक शहाजीराजांचे नाव लवकर लक्षात का येत नाही?श्रीकृष्णांना जन्म दिलेल्या देवकी मातेचे वर्णन केले जाते परंतु भर पावसात डोकंभर यमुना नदीच्या पाण्यातून सुखरूप आपल्या मुलाला पोहचविणारे वसुदेव आपल्या लक्षात येत नाही😔
एक पुरुष,मुलगा म्हणून त्यांचाकड फक्त वंशाचा दिवा म्हणून पाहिलं जात आणि तो जीवनभर जबाबदारीच्या ओझ्याखाली चालत असतो आपण कधी त्याच्या भावना,दुःख समजून घेतो का?सहज आपण त्यांची कधी विचारपूस करतो का😞ज्याप्रमाणे महिला दिवस 8 मार्चला असतो तसा पुरुष दिन कधी असतो बघा बर 90 टक्के लोकांना माहीतच नाही?स्त्रिंयासाठी रक्षाबंधन,भाहुबिज अशा सणांना भावाकडून भेटवस्तू घेतो पण पुरुषांचा वाढदिवस वगळता त्याला कधी आपण भेटवस्तू देतो का?😔भेटवस्तूच बाजूला सोडा त्याची कधी साधी मित्र,भाऊ म्हणून विचारपूस करतो का,त्याला समजून घेतो का😒?आपण मनमोकळेपणे पुरुष दिनाच्या शुभेच्छा तरी त्यांना देतो का😔?मग आपण पुरुषप्रधान संस्कृती म्हणतो ती फक्त नावापुरतीच का?शंभरात दोन तीन पुरुष महिलांशी चुकीचे वागले,वाईट कृत्य केले म्हणून सगळे पुरुष तसे नसतात🙅‍♂कारण स्त्रियांचा आदर करणारे शिवाजी महाराज हेही पुरुष होते आणि तसे आजही अनेक पुरुष आहेत मग अश्या पुरुषांचे दुःख,वेदना आपण कधी समजून घेणार आहोत?😢तोही एक जीव आहे त्यालाही रडणं येते,त्यालाही दुःख असतं परंतु तो जबाबदारीमुळे सर्वंसमोर रडत नाही, एकाट्यात रडतो😞मान्य आहे स्त्रीचं जिवन अवघड आहे परंतु एका पुरुषाचं जीवन हे एका पुरुषालाच समजू शकत कारण खूप सार दुःख सहन करून एका स्मितहास्यामाघे तो सगळं लपवनारा पुरुष असतो😢कधी वेळ आली तर एका पुरुषाला मित्र,भाऊ,मुलगा समजून त्यांचं दुःख,वेदना अस्तित्व मान्य करून त्याला  आधार द्या,तो प्रत्येकासाठी आहेच की मग कधीतरी त्याच्यासाठी जगून पहा,नक्की त्याला बर वाटेल..☺️नकळत कुणाच्या भावना दुःखवल्या असतील तर माफी असावी🙏
........🦋🌺🙏........
शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

❤️शब्द मनाचे❤️

19 Nov, 08:15


*आयुष्यात आलेले वाईट प्रसंग व वाईट वेळ फक्त अनुभव म्हणून जरी मान्य करता आली तर तुम्ही जीवनाच्या प्रगतीकडे एक पाऊल पुढे टाकले आहे समजा❤‍🔥कारण आहे ती परस्थिती स्विकारायलाही खूप मोठं धाडस लागत* 💯🔥💪🏻
........🦋🌺🙏........
शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

❤️शब्द मनाचे❤️

19 Nov, 02:06


कधी कधी सगळं जिंकूनही हरल्यासारखे वाटते, कारण मनाला जिंकण्याची सवय नसते. कधी कधी आनंदाचे क्षणही रडवून जातात कारण त्या आनंदात काही तरी कमी असते. कधी कधी सारे काही आपले असते पण पाहिजे तेच जवळ नसते. खूप काही मिळूनही ओंजळ रिकामीच असते. पण सगळेच आपल्या मनासारखे झाले तर ते आयुष्य कसले ? कधी कधी इतरांच्या मनाचा विचार करतच आयुष्य जगायचे असते...
#शब्द_मनाचे
Join👉
@shabdamanache

6,339

subscribers

4,855

photos

84

videos