श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩 @shrimantyogi1 Channel on Telegram

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

@shrimantyogi1


शिवाजी महाराजांचे स्टेटस, माहिती, दिनविशेष, व्हिडिओ सर्व काही एकाच ठिकाणी.

सर्व शिवभक्तांना एकत्र आणणे हा एकमेव उद्देश

┎─────────────┒
☞ @Shrimantyogi1 ☜
┖─────────────┚

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩 (Marathi)

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज एक टेलीग्राम चॅनल आहे ज्यात आपण शिवाजी महाराजांचे स्टेटस, माहिती, दिनविशेष, व्हिडिओ सर्व काही एकाच ठिकाणी पाहू शकता. या चॅनलवर सर्व शिवभक्तांना एकत्र आणण्याचा उद्देश आहे. शिवाजी महाराजांच्या विविध विषयांवर माहिती मिळवण्याचा हा चॅनल शिवभक्तांसाठी खास आहे. तुमच्याला शिवाजी महाराजांच्या विषयांवर अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि एकत्रित होण्यासाठी हा चॅनल अत्यंत उपयुक्त आहे. तसेच, या चॅनलवर आपले आनंद वाढवण्यासाठी @Shrimantyogi1 चॅनलवर जाऊन जॉईन करा.

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

11 Jan, 04:01


-°.𓂋⃝🧡⃞⃟⃡🛕 શ્રી રામ મંદિર સ્થાપના दिવસ निમિत्त 🌸⃞⃟⃡🙌🏻<°" -~
- °. 🕉️⃞⃟⃡🙏🏻સर्वांना मंગलમय शुभेच्छा..!!🌿⃞⃟⃡🚩🔥 °. -

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

10 Jan, 05:06


कुणी तानाजी बनायचं,ढाल तुटली तरी
हातावर वार झेलून लढायचं...

कुणी शेलारमामा व्हायचं,थरथरत्या हातांनी दुष्मनावर विजेसारखं कडकडायचं...

कुणी प्रतापराव गुजर व्हायचं,सोबत मोजके साथी असले तरी गर्दीला मिळायचं...

कधी बांदल सेने सारखं संकटाला
पावनखिंडीत रोखून ठेचायचं.

कुणी बाजी, कुणी बहिर्जी, कुणी मुरारबाजी, कुणी जिवा महाला, कुणी कोंडाजी, कुणी येसाजी, कुणी कान्होजी, कुणी रामजी पांगेरा, कुणी फिरंगोजी नरसाळा तर कुणी शिवा काशीद व्हायचं..

कुणी संताजी-धनाजी व्हायचं
जरब अशी बसवायची की गनिमाच्या
घोड्याला स्वप्नात सुद्धा दिसायचं...

कुणी दत्ताजी शिंदे व्हायचं 'बचेंगे तो और भी लढेंगे' म्हणत संधी दिली ना तर अजून त्वेषाने लढू अस सांगायचं...

कुणीतरी हंबीरमामा सारखं काळ्या कातर बुरुजासारखं खंबीर आधार व्हायचं...

दुष्मनाच्या छाताडावर थयाथया नाचायला कुणीतरी महादजी शिंदे सुद्धा व्हायचं...

शिवराय,शंभूराजे यांच्याशी इमान आपुलं
त्यांचा मावळा म्हणून जगायचं...

हर हर महादेव 🔱🚩

जय जिजाऊ जय शिवराय
जय शंभूराजे 🙏

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

10 Jan, 05:04


रायगडावरील राजदरबारात कोणी कितीही हळू कुजबुज केली तरी तो आवाज महाराजांच्या सिंव्हासन पर्यंत जात होता ह्याचे उदाहरण…हिरोजी इंदुलकरानी स्थापत्य कलेचा अद्भुत करिश्मा 🙏🏻🚩

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

10 Jan, 04:46


माझा राजा तेव्हाही जगाचा पोशिंदा होता.. आजही आहे आणि उद्या ही राहणार..💯🙌🧡
दिवसभर अफाट कष्ट केल्यानंतर संध्याकाळी गडउतार होऊन श्रीमान रायगडाच्या पहिल्या पायरीस वंदन करताना माऊली..🙇🏻🌸

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

07 Jan, 03:19


महाराजांनी ३५ वर्ष जो अविरत संघर्ष केला तो फक्त राजा होण्याचा नव्हता तर रयतेला परकीय सत्तेच्या गुलामीतून मुक्त करणे, गोरगरीब लोकांना त्यांचा हक्क देणे, रयतेच्या जीवनात स्थैर्य व शांतता आणणे आणि एत्तदेशीय राज्य स्थापन करणे हाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्य लढ्याचा हाच खरा उद्देश होता. असा लोककल्याणकारी राजा या जगी पुन्हा होने नाही.
छत्रपती शिवाजी महाराज की जय 💯👑

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

07 Jan, 03:18


👑शिवजन्मोत्सव लवकरच 🧡🙏🏻🚩

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

07 Jan, 03:16


👑शिवजन्मोत्सव लवकरच 🧡🙏🏻🚩

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

06 Jan, 04:01


❤️🌍

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

01 Jan, 13:39


_इतिहास साक्षी आहे महाराजाच्या तलवारीच्या धारेला लागलेला रक्ताचा प्रत्येक थेंब हा रयतेच्या कल्याणासाठी होता, म्हणून माझा शिवबा राजा लाखात एक होता..🚩_
शिवराय असे शक्तीदाता..🙏

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

01 Jan, 02:51


🙏🏻
वर्ष कसे हे नवे म्हणावे
दिन उगवतो नशेमध्ये
मद्य प्राशुनी धुवा काढुनी
जाऊनी पडतो घाणी मध्ये

हिंदू बंधुनो कसे तुम्ही ओ
विसरुनी गेला पराक्रमा
पूर्वज आपले गाजवी समरे
निपटूनी लावी आंग्लजना

नववर्ष हे नव उमेदीचे
घेऊनी पालवी येते नवी
हिंदू वर्ष हे गुढी पाडवा
जाणीव ठेव तू नित्य मनी

त्याजुनी सारे आंग्ल विचारा
शिव शंभू नित मनी धरा
बुलंद करुनी हिंदू राष्ट्र हे
विराट हिंदू भूमी करा

देव देश धर्माची अस्मिता
सदैव तुमच्या मनी धरा
सुमधुर साखऱ्या खाऊन
गुढीपाडवा हेच हिंदू नववर्ष साजरे करा 🚩

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

31 Dec, 12:38


या वर्षाप्रमाणे पुढील वर्षी पणं इथली वारी व्हावी, या पायरीवर डोई ठेवुन छत्रपतींच्या पायची धुळं ह्या मस्तकी लागावी अनं ह्या उभ्या जल्माचं सार्थक व्हाव एवढंच 🙌🙇🏻‍♂️🥹
📍किल्ले श्रीमान रायगड..🚩

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

30 Dec, 04:56


शांतता संयम कार्यक्रम
शत्रूला हरवण्यासाठी नेहमी बुद्धीने काम करा हिंसा शेवटचा उपाय आहे🙏 👑🚩

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

30 Dec, 04:54


असेतुहिमाचल पती,आशिया खंडातील सर्वात बलाढ्य राजवाटीच्या बादशाहाचे, मोगलशाहीला सर्वोच्च वैभवाचे दर्शन घडवणार्या आलमगीर आलमपन्हा अवरंगजेबाच्या राजमुकूटाचे हरण करणारा एकच एक महाबलाढ्य योध्दा : राजश्री शंभूछत्रपती 💪🚩

श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा
१६ जानेवारी २०२५ | राजधानी रायगड
आयोजक : समस्त शिवशंभू पाईक

क्रांतीसुर्य_शंभूराजा 🔥
श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा
राजधानीरायगड

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

29 Dec, 05:46


👑🌍⚔️महाराज࿐🧡🙏🏻⃞⃟🚩

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

16 Dec, 06:59


मामा या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते..🧡
ज्याच्या नशिबी असा मामा असेल तो भाचा जीवनात कधीच अपयशी होऊ शकत नाही..💯

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

16 Dec, 06:58


श्री. छत्रपती निष्ठेचे महामेरू, स्वराज्याचे चौथे सरसेनापती, स्वराज्यासाठी आपले प्राण पणाला लावणारे, निष्ठावंत, समशेर बहाद्दर, ज्यांच्या शमशेरीच्या धारेपुढे भले भले शूरवीर मातीत मिसळून गेले अशा महापराक्रमी, परमप्रतापी सरलष्कर हंसाजी (उर्फ हंबीरराव) मोहिते यांच्या स्मृतीदिनानिमित त्यांच्या पराक्रमाला विनम्र अभिवादन..🙇🏻🌸🚩

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

15 Dec, 12:31


स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रुपांतर करणारे,
कुशल प्रशासक, शंभुपुत्र, हिंदवी स्वराज्याचे चौथे छत्रपती, थोरले शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..🙇🏻🌸🚩

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

15 Dec, 03:27


महाराजांनी ३५ वर्ष जो अविरत संघर्ष केला तो फक्त राजा होण्याचा नव्हता तर रयतेला परकीय सत्तेच्या गुलामीतून मुक्त करणे, गोरगरीब लोकांना त्यांचा हक्क देणे, रयतेच्या जीवनात स्थैर्य व शांतता आणणे आणि एत्तदेशीय राज्य स्थापन करणे हाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्य लढ्याचा खरा उद्देश होता. असा लोककल्याणकारी राजा या जगी पुन्हा होणे नाही." 💯
छ्त्रपती शिवाजी महाराज 🙇🏽‍♂️🙌🏻🌼👑

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

15 Dec, 03:26


धर्मो रक्षति रक्षितः 🔱🚩

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

10 Dec, 08:56


तुमचा पराक्रम आठवता कृष्णेवर आजही शहारे उठती रायगडी सदरेवर आजही राजे लाखो मुजरे झडती
युगनिर्माता छत्रपती ऐसा न होई कोणी दुजा
शतकांच्या छाताडावर खडा शिवाजी राजा..
शिवराय घराघरात शिवराय मनामनात🧡

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

10 Dec, 02:59


युगेयुगे अखंड निरंतर शेवटपर्यंत सेवा🙏🚩

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

09 Dec, 03:41


🙏
कोल्हापुर (करवीर ) छत्रपती संस्थान संस्थापिका
भद्रकाली महाराणी ताराराणीसाहेब स्मृतिदिवस
निमित्त विन्रम अभिवादन 🙏🏼🚩
९डिसेंबर_छत्रपती_महाराणी_ताराराणी_यांचा_स्मृतिदिन🙏🏼

छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या , छत्रपती ताराराणी भोसले ☝️

घोडेस्वारीमध्ये निपुण असलेल्या ताराबाई अत्यंत बुद्धिमान, तडफदार होत्या.
त्यांना युद्धकौशल्य आणि राजकारणातल्या उलाढालींचे तंत्र अवगत होते. इ.स. १७०० ते १७०७ या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सुनेच्या तडफदार धोरणामुळे आणि मुत्सद्देगिरीमुळे औरंगजेबाला मराठ्यांशी झुंज देत सात वर्षे दक्षिणेत मुक्काम करावा लागला आणि अखेरीस अपयश घेऊन येथेच देह ठेवावा लागला.

दिल्लीचा बादशहा औरंगजेब याला एक नाही, दोन नाही तर तब्बल सात वर्षे धोबीपछाड महाराणी ताराबाई यांनी दिली
खुब_लढे_वो_मरहट्टे
महाराणी_ताराराणी
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या, छत्रपती शिवरायांची सुन व छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी म्हणजे ताराराणी साहेब...
पराक्रमी महाराणी ताराराणींच्या काळात मराठ्यांच्या सर्वश्रेष्ट स्त्री योध्दा होत्या.
ज्यांनी या महाराष्ट्रात औरंगजेबाला जेरीस आणले, महाराष्ट्र जिंकू दिला नाही अश्या महाराणी ताराराणी यांना स्मृती दिना निमित्त विनम्र अभिवादन

"पुरुष काय पण स्त्रिया ही लढल्या परंपरा आमुची"
"पहा चाळुनी पाने आमुच्या इतिहासाची"

जय जिजाऊ आईसाहेब.
जय महाराणी ताराराणी साहेब.
.
.
.
अखंड हिंदुस्थान देशाचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज
जय शिवराय 🚩🙏 जय शंभुराजे 🙏🚩
जय जिजाऊ 🙏🚩 जय महाराष्ट्र 🚩
__________

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

09 Dec, 03:39


_नाम तुझे घेता देवा होई समाधान_ 
_तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान_ 
_नाम तुझे घेता देवा होई समाधान.._
.

छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा🚩

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

09 Dec, 03:39


मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे,कदा न सोडावे तयांचे चरण..,🌿🧡*

आयुष्य जगण्याचे गूढ उलगड नेतो तो सह्याद्री,🌿🧡
तोरणा किल्ला ऐतिहासिक घटनांशिवाय नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आणि नैसर्गिक सौंदर्य छातीवर घेऊन अभिमान बाळगणारा किल्ला आहे…🚩🌿🌸🧡

तोरणाकिल्ला🚩🌼

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

09 Dec, 03:38


"शस्त्र आणि लेखणी दोन्हीही तितक्याच ताकदीने चालवून एकीकडे पाच शाह्या विरुद्ध लढले तर दुसरीकडे सातशातक, नायिकाभेद, बुधभूषणम, नखशिखांत ही ग्रंथ लिहिली. आपल्या तलवार अन लेखणीच्या जोरावर/ तत्कालीन मुत्सद्याना मात देऊन ज्वलंत इतिहास निर्माण केला.

तेव्हापासून ते आतापर्यंतच्या पिढीला प्रेरणादायी ठरलेल्या मृत्यूजंयकार, धर्मवीर, स्वराज्य रक्षक, अजिंक्य योध्दे , छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा लवकरच ...
१६ जानेवारी 🚩
- शौर्यपीठ तुळापूर
- राजधानी रायगड
- विशाळगड

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

08 Dec, 03:47


🚩
ज्या दिवशी शिवछत्रपतींनी आपल्या वडिलांचे अपमान करणाऱ्या, आपल्या भावाला मारणाऱ्या, जगतजननी तुळजाभवानीच्या मूर्तीवर घणाचे घाव घालणाऱ्या, पंढरपूरच्या पांडुरंगाची विटंबना करणाऱ्या आणि भोसले कुळाला संपवून टाकण्याची शपथ घेतलेल्या क्रूर कपटी धूर्त अफजलखानाला श्रीप्रतापगडाच्या पायथ्याशी उभा फाडला तो दिवस म्हणजे..... 🚩

तिथी !!
मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी !! 🚩

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

01 Dec, 03:54


याच पाली दरवाज्याने शिवरायांची स्वारी कितीतरी वेळा अनुभवली असेल!😍🚩🙏
जय शिवराय

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

30 Nov, 07:35


🚩🙏

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

28 Nov, 06:34


तोफा उडाल्या, तशी बंदुकीची उडे फैर, तो तिरही पातलेl हल्ला कराया शिवाज्ञा जहाली,इमानी उड्या घालती मावळेll
तक्छौर्य-धैर्यास:कैसे स्तवावे? पुढे चालला भूप मोर्चावरी l
ओश्टावरी दात रोवून धांवे, जवे घालतो घाव घावावरी ll

जय_शिवराय 🚩_

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

26 Nov, 03:44


26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना व निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!🇮🇳🥹

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

24 Nov, 04:13


स्वकीयांच्या कटांशी परकीयांच्या संकटांशी
एकटाच लढला छावा औरंग्याच्या तटाशी 💪🚩
धगधगता लाव्हा स्वराज्याचा छावा 🔥
छत्रपती संभाजी महाराज

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

24 Nov, 04:13


सदैव स्मरण रहे 🙏🚩
शिवशंभू 🔥

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

23 Nov, 03:38


🌏🧡 राजे शिवछत्रपती महाराज 🔥🙏🏻🚩

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

10 Nov, 06:26


https://t.me/shrimantyogi1

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

09 Nov, 18:35


समजा जगाची उलथापालथ झाली, हिमालयाच्या जागी समुद्र झाला, सह्याद्रीच्या सर्व दऱ्या - पठार झाल्या, अन शिखरे भुईसपाट झाली, सारे काही जमीनदोस्त झाले, इथली मानवसंस्कृती संपुष्टात आली.....

मग...त्यानंतरही जेव्हा इतिहास म्हणून इथल्या संस्कृतीचा शोध घेतला जाईल तेव्हासुद्धा, छत्रपती_शिवाजी_महाराज हा श्वास इथल्या मातीच्या पोटात घुमताना ऐकू येईल🤌

या भारतभूमीत राजांचं अस्तित्व जेवढं अफाट बहरलय तेवढ्याच सखोलही ते रुजलंय 💯

अस्तित्व
संस्कृती
स्वराज्य
महाराष्ट्रधर्म

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

09 Nov, 18:34


जय महाराष्ट्र 🙏🚩

आपण जास्त कोणत्या राजकीय पक्ष , राजकीय नेते यांच्या नादी लागत बसत नाही आपल्याला नाद फक्त " छत्रपतींचा " ! आपण भक्त फक्त छत्रपती शिवरयांचेच ! ते सोडून आपण कोणालाच जास्त मानत नाही हा जे छत्रपतींना मानतात त्यांच्यासाठी कार्य करतात अशा नेत्यांचा आशा कर्तृत्ववान माणसांचा आदर नक्कीच करतो पण सेवक म्हणून रहायला आवडेल ते फक्त शिवरायांचाच ! याच्या व्यतिरिक्त मागेही कोणी व्यक्तिमत्त्व असणार नाही आणि पुढेही कोणी असणार नाही यात शंकाच नाही 💯 आमचं निव्वळ निव्वळ प्रेम म्हणजे शिवराय ❤‍🩹

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

09 Nov, 18:34


वो मसिहा आ गया है जो दिलो मे बस रहा
अफजलखानवध ⚔️🔥🚩

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

09 Nov, 18:33


मराठ्यांचा ज्वलंत इतिहासाची साक्ष देणारा दिवस म्हणजे शिवप्रतापदीन 🔥🚩

१० नोव्हेंबर १६५९ मराठ्यांना "भ्यायलाच लागतंय" हा संदेश समद्या दुनियेला देणारा दिवस म्हणजी शिवप्रताप दिन 💪

त्या दिवशी राजांनी नुसता अफजलच फाडलाच नाही तर मोगलांची, आदिलशाहीची दहशत पण फाडली. छत्रपती शिवाजी महाराजांची ताकत हिंदुस्थानाला गिळंकृत करू पाहणाऱ्या परकीय यवनांना समजली त्या ऐतिहासिक घटनेने त्या सर्वांचे धाबे दणाणले ⚔️🚩

शेर शिवराज है 💪

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

09 Nov, 18:31


शिवप्रताप घडला...........
आणि फाटलेल्या अंगरख्यातून रक्ताचं थारोळं बाहेर पडलं, खान धावत धावत पालखी जवळ करत होता त्या सांडलेल्या चिळकांड्या अवघ्या हिंदुस्थानच्या राजकारणावर पडल्या... दिल्लीची मोगलाई, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही, शे दीडशे वर्षाहुन अधिक सत्ता भोगणाऱ्या अवघ्या हिंदुस्तानातल्या बलाढ्य सल्तनती हादरल्या, दर्यावर अमर्याद सत्ता गाजवणारे वलन्देज, इंग्रज साऱ्या साऱ्या जलचारांना कापरं भरलं, आणि हिंदुस्तानातील भूतलावरल्या सर्व सत्ताधीशांना आणि समुद्रावरील सर्व ताम्रांना हा सिंहासारखा अभेद्य सह्याद्री आयाळे फिंजारून सांगत होता..
माझ्या नरसिंहाने हिरण्यकशिपू फाडिला •राजियाने खासा अफजल जाया केला.

💪 ऊर्जास्थान ⚔️
छत्रपती शिवाजी महाराज 🔥

शिवप्रतापदिन
प्रतापगड

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

09 Nov, 18:30


आदिलशाहीच्या जुलमी वरवंट्याखाली जेव्हा महाराष्ट्र भरडला, अन्याय निवारण्यासाठी तेव्हा कणाकणांतून बाहेर पडला सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह.....

शेर शिवराज है 💪
१० नोव्हेंबर शिवप्रताप दिन 🚩
हर हर महादेव 🔱

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

09 Nov, 18:30


जेव्हा तल्लख बुद्धीने केलेला जीवघेणा वार एखाद्या दाहक शस्त्राच्या वारापेक्षा घातक ठरतो तेव्हा प्रतापगडावर विजय साजरा होतो 💪

कृष्णनीती 🔱🚩

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

09 Nov, 15:02


शिवप्रताप दिन 10 नोव्हेंबर 1659👑⚔️💪🚩

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

07 Nov, 03:33


स्वतःच्या धर्माशी प्रामाणिक असाव माणसाने नाहीतर अधर्म वाढवणारे भरपूर असतात... 🚩🙏💯
शिवराय असे शक्तिदाता🚩🙏

अवनी_रायगडाची_लेक

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

06 Nov, 12:43


🚩रणांगणात उभ्या असलेल्या रणमर्दाची ताकद छाताडात असलेल्या स्वाभिमानावर असते आणि जोवर स्वाभिमान जागा आहे, तोवरच तो आपल्या लढण्याच्या धर्माला जागतो...!🙏🌏🧡

शंभूराजे 🚩

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

05 Nov, 06:07


वेरूळ लेणी , छत्रपती संभाजीनगर | महाराष्ट्र 🔱🚩

रावण अनुग्रह शिल्पांमध्ये रावण खाली एक गुडघा टेकून आपल्या वीस हातांनी कैलास पर्वत हलवीत आहे, तर कैलास पर्वतावर शांत चित्ताने बसलेले शिव आणि भयभीत झालेली देवी पार्वती शिवाला बिलगली आहे. रावण कैलासपर्वत हलवीत असल्यामुळे घाबरून पळणारे शिवगण, डोंगरावरचे प्राणी यांची शिल्पे हा प्रसंग जिवंत करण्यामध्ये कलाकार यशस्वी झाले आहेत. यातील नाट्यमयता वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे.

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

05 Nov, 06:06


_ऊर्जास्रोत🔥_
_मेल्या मढ्यात प्राण फुंकणारी संजीवनी म्हणजेच_
"छत्रपती शिवाजी महाराज"...!

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

01 Nov, 02:43


लक्ष्मीची होईल कृपा एवढी, सगळीकडे होईल नाव दिवसरात्र व्यापारात वाढेल तुमचं काम सर्व इच्छा होवो पूर्ण, लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा..!😍

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

31 Oct, 03:48


दिव्याचं देवपण तो जळत असेपर्यंत असतं. त्याला बाह्य शत्रुंपासून सुरक्षित ठेवण्याचं काम असतं त्या काचेचं'. एका संरक्षका प्रमाणे ती काच ह्या 'तेज' यज्ञात आपलं काम सलोखीने करत असते.

अगदी त्याचप्रमाणे स्वतःचं घरदार सोडून राष्ट्रासाठी रक्ताचा अभिषेक करणारे तेव्हाचे मावळे असोत किंवा आत्ताचे सैनिक आपलं काम चोख बजावत आहेत 🫡

कंदिलाच्या काचेप्रमाणे त्या दिव्याचं देवपण तेवत ठेवत आहेत. आजवर राष्ट्रहितासाठी रयतसाठी तेजाच्या अग्निकुंडात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या तमाम वीरांना दीपोत्सवाच्या तेजोमय शुभेच्छा 😇🔥🎉

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

30 Oct, 09:17


किल्ले जंजिरा हा जलदुर्ग सर्वाना माहीत आहे पण त्याचा समोर जाऊन त्याहून आत समुद्रात छत्रपतींनी एक जलदुर्ग बांधला तो म्हणजे पद्मदुर्ग तो अनेकांना आजही माहीत नाही तेव्हा खंत वाटते. जंजिरा हा अभेद्य अफाट आहेच तो समुद्राने इतका सुरक्षित आहे की, त्याला जिंकताना नाकी नऊ येतात हे मावळ्यांना उमगले होते. शिवाय जंजिरा जिकण्यासाठी अनेक युक्त्या लढवूनही जंजिरा काही हाती येत नव्हता तेव्हा महाराजांनी फार पुढची युक्ती लावून असा विचार केला की हा जो सिद्धी आहे तो जंजिरा वर राजा आहे परंतू त्याला जगण्यासाठी बाहेरच्या लोकांची मालाची आवश्यकता आहेच तो किती काळ स्वावलंबी राहील फार फार तर गडावर अन्नसाठा आहे तोपर्यंत तर मग आपण त्याचा हा सगळा व्यापारच बंद करूयात यासाठी महाराजांनी समुद्रकिनारी सामराजगड नावाच्या गडाची उभारणी केली आसपासचा किनारपट्टी वरील मुलुख आपल्या ताब्यात घेतला. सिद्धीला कळून चुकले की महाराज आपली कोंडी करत आहेत त्याने काही सैनिक पाठवून हा सामराजगड वर हल्ला केला पण स्वराज्याचे राजे छत्रपतींचे शूर मावळे सिद्धीला जमिनीवर कसले आवरतील त्यांनी गनिमाना वेळोवेळी चोख हल्ल्याने उत्तर दिले आता मात्र सिद्धी ने उलट डोकं चालवत आपण आता जमिनीवर व्यापार करू शकत नसलो तरी समुद्री मार्गाने तर करू शकतो हे ध्यानात घेऊन तो समुद्री मार्गे आपल्या गरजा आवश्यक वस्तू महाराजांचे इतर शत्रू असतील त्यांचा सैन्याशी हातमिळवणी करून तो समुद्री मार्गे आधार घेऊ लागला ही बाब शिवाजी महाराजांच्या लक्षात येताच एक दिवस महाराजांनी सागराची अधिक माहिती काढत जंजिरा च्या पुढे समुद्रात एक कासवाच्या आकाराचे बेट / खडक आहे हे ध्यानात घेतले आणि तिथे निर्माण केला पद्मदुर्ग ! मी स्वतः पद्मदुर्ग पाहिला तेव्हा मला तो दुर्गविज्ञानाचा आविष्कारच वाटला. असा हा पद्मदुर्ग बांधून सिद्धीची समुद्रातूनही व्यापार बंद करून कोंडी करण्याचा डाव छत्रपतींनी बनवला पण दुर्दैवाने पुढे महाराजांचे निधन झाले शिवाय एका सिद्धीपेक्षा ढीग खान आणि यवन स्वराज्यावर सतत स्वाऱ्या करत होते त्यामुळे छत्रपतींना जंजिराकडे फार लक्ष देता आले नाही आणि अखंड स्वराज्याचा विस्तार पाहता त्याकडे प्राधान्य देणे साहजिकच होते त्यामुळे जंजिरा हा स्वराज्यात येता येता राहिला. लेखाचा थोडक्यात उद्देश छत्रपतींनी पद्मदुर्ग बांधला त्यामागे राजांचे काय धोरण होते आणि एखादा गड जिंकण्यासाठी राजे जंजिऱ्याच्या नाकावर टिच्चून त्याही पुढे जाऊन त्या भयाण सागरात पद्मदुर्ग बांधतात हीच गोष्ट त्या सिद्धी साठी घाम फोडणारी होती.

-- आदेश म्हस्के ✒️

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

30 Oct, 09:17


सागरी दुर्गबांधणीत जंजिरेकर सिद्दीच्या उरावर छत्रपती शिवरायांनी “पद्मदुर्ग उर्फ कांसा किल्ला” बांधला....🚩

शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट आवाहन दिले होते त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणुन प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले...,
‘राजे म्हणतात.., या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल..ताकीद असे...’

सागरी दुर्गबांधणीतही काही किल्ल्यांचे तटबंदीच्या बाहेर ओबड-धोबड़ दगडांच्या राशी आढळतात भरतीच्या लाटा सोडाच पण साध होडक सुद्धा तटबंदीशी लगट करू शकत नाही शिवाय त्या धारधार दगडांवर कोणी पाय ठेवायची हिम्मत सुद्धा करणार नाही.. दुर्गबांधणी मध्ये त्यांनी निरनिराळे प्रयोग यशस्वी केले व त्यासाठी बारीक सारीक गोष्टींवर तपशीलवार विचार ही केले होते एक दुर्गविज्ञान त्यांनी आपल्या समोर मांडून ठेवले आहे...

किल्ल्यांच्या संरक्षण व्यवस्थेतले महत्त्वाचे घटक म्हणजे तटबंदी आणि बुरूज आणि त्या पद्मदुर्गावरील पाकळी बुरुजाची दुर्गरचना वैशिष्ट्य :

बुरुजाच्या पाकळ्यांच्या बाहेर आलेल्या भागाचा उपयोग शत्रूवर जास्तीत जास्त कोनांमधून मारा करण्यासाठी केलेला आहे कल्पकतेने बनवलेला हा बुरूज पाहाताना बनवणाऱ्यांची सौंदर्य दृष्टी दिसून येते..किल्ल्यावर लांबलचक पसरलेली तटबंदी आणि भव्य बुरूज आहे किल्ल्यासाठी लागणाऱ्या दगडाची गरज भागून किल्ल्यावर पाण्याचे साठे तयार होत हा दगड काढण्यासाठी त्याला आकार देण्यासाठी छिन्नी हातोड्याचा वापर केला जातो त्याच बरोबर दगड सरळ निघावा यासाठी एक पुरातन पद्धत वापरली जाते यात जो दगड फोडायचा आहे त्यावर एका सरळ रेषेत त्रिकोणी खाचा केल्या जातात त्या खाचांमध्ये लाकडाची पाचर घट्ट बसेल अशा प्रकारे मारली जाते या लाकडावर रोज पाणी ओतले जाते यामुळे लाकूड फुगून त्याच्या जोरामुळे कातळातून दगड वेगळा होतो अनेक लेण्यांच्या ठिकाणी किल्ल्यांवर अशा प्रकारचे खाचा असलेले दगड पाहायला मिळतात...

――――――――――――
📷 @gadwat_official 👌🏼♥️🔥
.
.
मराठा_आरमार जलदुर्ग_पद्मदुर्ग
गडकिल्ले_महाराष्ट्राचे
छत्रपती_शिवाजी_महाराज
छत्रपती_संभाजी_महाराज
मराठा_साम्राज्य आरमार इतिहासकर्ते_मराठे
#dronephotography #droneoftheday
#maharashtratourism
#kokandiaries #bhatkanti
#photography #gadwat_official

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

30 Oct, 09:14


इतिहास फक्त शुरांचा असतो,
भ्याड कधीच इतिहास घडवत नाही...!

स्फूर्तिस्थान
छत्रपती शिवाजी महाराज🔥

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

30 Oct, 04:13


शिवछत्रपतींनी स्वराज्याचा विस्तार करताना भौगोलिक रचनेचे भान ठेवून स्वराज्याकरिता प्राणाची बाजी लावणाऱ्या मराठा सेनानींची मालिकाच विकसित केली. त्यामुळेच स्वातंत्र्य लढ्यात बलाढ्य शत्रूसमोर स्वराज्य टिकून राहिले. याचे कारण म्हणजे “सेनापती धनाजी जाधव”...🙏🚩

मराठेशाहीतील उत्कृष्ट संघटक व व्यवस्थापक होता. त्याच्या संघटन व व्यवस्थापन कौशल्याची वैशिष्ट्ये यात आहे की कधी पराजय पदरी येत असताना जनतेचा त्याचेवरील विश्वास कधीच कमी झाला नाही. कधी त्यांच्याविरुद्ध त्याच्या सैनिकांनी बंडखोरी केली नाही. उलट सैन्यात तो प्रिय असल्याचेच मोगल इतिहासकारांचे मत आहे. जनता व सैनिक मोठ्या विश्वासाने त्याच्या सोबत व पाठीशी खंबीरपणे राहिली. मोगलांविरुद्ध आपणास निश्चित यश मिळेल ही त्यांनाही खात्री असावी. कारण अपयश आल्यास सर्वांचाच विनाश होता. त्याविरुद्ध खंबीरपणे लढण्याचा निर्धार धनाजी जाधव, त्याचे सैनिक, जनता व छत्रपतीनी केला होता. त्यात अखेर मराठे विजयी ठरले...

पण वरील सदगुणांबरोबरच त्याच्या व्यक्तिमत्त्वात काही दोष होते. मुख्यतः धनाजीस युद्ध कार्याशिवाय इतर कामात रस वाटत नसे. तसे पाहिले तर सेनापती धनाजी जाधव हे त्यांच्यात एक व्यंगच होते...!
――――――――――――――
: @rambdeshmukh

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

29 Oct, 14:55


सणासुदीला गडावर असण्यासाठी पण भाग्य लागतंय..
त्यामुळेच नेहमीप्रमाणे दिवाळीचा पहिला दिवा राजमाता जिजाऊंच्या चरणी...
दिवाळीचा पहिला दिवा अखिल हिंदुस्थानचे भाग्यविधाते असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या चरणी..
दिवाळीचा पहिला दिवा जगदीश्वराच्या चरणी...❤️

कर्तव्य
रायगड

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

27 Oct, 06:02


वासुबारस, ज्याला "गोवत्स द्वादशी" असेही म्हणतात, हा सण भारतीय संस्कृतीत महत्त्वपूर्ण आहे आणि विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. वसुबारस दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात करणारा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी गाई आणि वासराचे पूजन केले जाते आणि त्यांचे पावित्र्य मानले जाते.

वासुबारसचे महत्व


1. गोमातेचे पूजन: वासुबारस दिवशी गाईचे पूजन केले जाते कारण गायीला माता मानले जाते. गायीच्या उपकारांमुळे ती हिंदू संस्कृतीत पवित्र मानली गेली आहे.

2. गोकुळातील स्मरण: वासुबारस हा सण भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या काळाची आठवण करून देतो. गोकुळातील गाई आणि वासरांचे संरक्षण आणि पालन श्रीकृष्णाने केल्याची कहाणी या दिवसाशी जोडलेली आहे.

3. पर्यावरणीय संतुलन: गायीला भारतात पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते, कारण ती शेती आणि दुध उत्पादनामध्ये खूप उपयुक्त आहे. त्यामुळे गाईचे पूजन करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.

4. कुटुंबातील समृद्धी: वासुबारसच्या पूजेनंतर समृद्धीचे प्रतीक म्हणून कुटुंबातील आनंद आणि धनसंपदा वाढवण्याची कामना केली जाते.

5. परंपरा आणि संस्कृतीचे जतन: हा सण साजरा करणे हे आपल्या पारंपरिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे संरक्षण करण्याचे एक साधन आहे, जेणेकरून पुढील पिढ्यांना त्याचे महत्त्व समजावे.

वासुबारस साजरी करण्याची पद्धत

- गाईला सजवणे: गाई आणि वासराला विशेषरित्या सजवले जाते, फुलांच्या माळा आणि रंगांनी त्यांना सजवले जाते.
- *पूजन विधी*: गाईला स्नान घालून तिच्या शिंगांना रंग लावले जातात आणि तिला विशेष खाऊ दिला जातो.
- आरती आणि प्रार्थना: गाईची आरती केली जाते आणि तिच्या कल्याणाची प्रार्थना केली जाते.
- गोड पदार्थ बनवणे: या दिवशी विशेष गोड पदार्थ तयार करून प्रसाद म्हणून वितरण केला जातो.

वासुबारसचा सण आपल्या संस्कृतीतील एक आदर्श उदाहरण आहे ज्यामध्ये गाईच्या प्रति आदर व्यक्त करून पर्यावरण आणि पशु संरक्षणाचा संदेश दिला जातो.

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

27 Oct, 06:01


lस्वीकार हाच जीवनाचा पहिला मंत्र आहे...!

वास्तव समोर आहे ते स्वीकार करण्याची मानसिकता ठेऊन त्याला सामोरे जा त्यावर उपाय शोधा परंतू अनेकजण वास्तविकता स्वीकारत नाहीत आणि केवळ छे छे हे कसं होईल ! हे कसं झालं ! हे होऊच शकत नाही अशा शब्दात स्वतःच समजूत काढून सत्य मात्र नाकारत राहतात आणि एकदिवस अतिशय बिकट परिस्थितीत अडकतात आणि तेव्हा त्यांना ते वास्तव जगू देत नाही त्यामुळे जे झालं आहे ते स्वीकार करा तेव्हा त्यापुढे काय करायचं याचे धागे दोरे हाती लागतात💯

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

27 Oct, 06:00


_गुलामी मधून मुक्त होऊन जिवाचा भंडारा करुन रयतेच्या स्वाभिमान व अस्मितेचे रक्षण करणारा एकमेव राजा,ज्या काळात देव-देवळे देखील सुरक्षीत नव्हती तेव्हा देवाला देखील संरक्षण देणाऱ्या मर्द मावळ्यांची फौज उभारणारा महाप्रतापी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !!_

राजा स्वराज्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाचा , राजा शत्रूशी दोन हात करणाऱ्या मरहट्टा फौजेचा ,राजा हिंदूंचा, राजा रयतेचा, राजा बहुजनांचा 🚩
जाणताराजा 🚩

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

25 Oct, 04:00


अगदी काही दिवसांवर रोशनाईचा सण दिवाळी आलेली आहे.रस्तावर ठिकठिकाणी दिवे विकणारे लोक बसलेले आहेत.हे स्वाभिमानी लोकं कष्ट करून जगतात.अतिशय मेहनतीने मातीला आकार देऊन एक एक दिवा बनवतात आणि आपली दिवाळी रोशन करतात. अगोदरच त्यांच्या वस्तूची किंमत मेहनतीच्या मानाने कमीच असते त्यात आपणही अगदी त्यांचा जीव जाई पर्यंत मोल भाव करून त्यांच्या कष्टाची बोली लावतो.वर्षात एक वेळेस एखादं दोन डझन दिवे घेण्यात काहीच नुकसान नाही.आपण जेंव्हा मोठं मोठ्या दुकानात अथवा मॉल मध्ये जातो तेंव्हा सर्व काही चढ्या भावाने MRP वर घेतो आणि कसलीही तक्रार न करता बिल देऊन निघुन जातो.कष्टकऱ्यांच्या वस्तूला जर 5-10 रुपये जास्त दिले तर आपल्याला भले काही फरक पडणार नाही परंतु त्या गरिबाच्या लेकरांना भरपूर फरक पडेल.ह्या दिवाळीला मदत म्हणून का होईना त्यांनी मागेल त्या किमतीत वस्तू घ्या आणि त्यांच्या लेकरांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा आपसूक आपली दिवाळी त्यांच्या दिव्यांनी उजळून तर जाईलच सोबत भरभरून आनंद पण देईल.आपल्या हस्ते थोडं सत्कार्य झाल्याची पावती देखील नक्कीच मिळेल.
एक उदाहरण म्हणून ह्या फोटोतील व्यक्ती अपंगत्वाचा फायदा घेऊन भीक मागण्यापेक्षा कष्ट करून जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय.असे अनेक व्यक्ती रोज आपल्याला कुठे न कुठे आढळतात.पेन,कंगवे, काटा पिन अश्या छोट्या छोट्या वस्तू विकून ते आपली उपजीविका भागवत असतात.ते श्रीमंत होण्यासाठी नाहीतर स्वाभिमानाने जगण्यासाठी अपंगत्व विसरून मेहनत करत असतात.कधीतरी गरज नसताना त्यांच्या कडून वस्तू विकत घ्यावी हे पण पुण्य प्राप्त करून देते.

🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

24 Oct, 05:05


रणांगणात उभ्या असलेल्या रणमर्दाची ताकद छाताडात असलेल्या स्वाभिमानावर असते
आणि जोवर स्वाभिमान जागा आहे,
तोवरच तो आपल्या लढण्याच्या
धर्माला जागतो...!

शंभूराजे 🚩

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

24 Oct, 05:04


🚩
"सह्यादीचा राजा आज समिनदरावर स्वार झाला”.
“जमिन पण गेली आता समुद्र पण जाणार "
-पोर्तुगीज.
🚩
मराठा_आरमार_दिन
२४ ऑक्टोबर १६५७
मध्ययुगीन कालखंडात कोकण किनारपट्टीवर आरमार दलाची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे अगदी २७ व्या वर्षी आरमार स्थापून एक नवे सागरी राज्यच उभे केले होते .
🚩
अमात्यांच्या म्हणण्यानुसार ,
" छत्रपती शिवाजी महाराजांच्या मते नौदल हे मराठा राज्याचे एक स्वतंत्र अंग आहे ". एक इंग्रज काय म्हणतो पाहू , " तो स्वतः खलाशी नव्हता म्हणून बरे ,
नाही तर त्याने जमिनीचा पृष्ठभाग साफ करून टाकला, त्याप्रमाणे समुद्रही साफ करून टाकला असता ". 🚩
मराठा_आरमार_दिन.
.
.
.
.
.
Maratha_Navy_Day
Father_of_Indian_Navy
Chatrapati_Shivaji_Maharaj
जलं_यस्य_बलं_तस्य.
२४ऑक्टोबर
मराठा_आरमार_दिन.


श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

24 Oct, 05:03


🚩
शिवरायांच्या आरमारासंबंधी एक कवी म्हणतो -
देशी भार्गव क्षेत्र सागर तिरी नाना स्थळे योजिनी, बंदी दुर्ग अनेक डोंगर शिरी बेटे बाले पाहुनी
||जहाजेआरमार भरजलधि दुष्टांसी शिक्षा करी, बारा मावळ देश पर्वत दरी बांधोनि किल्ले गिरी II

🚩
मराठा_आरमार_दिन
२४ ऑक्टोबर १६५७
मध्ययुगीन कालखंडात कोकण किनारपट्टीवर आरमार दलाची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे अगदी २७ व्या वर्षी आरमार स्थापून एक नवे सागरी राज्यच उभे केले होते .
🚩
भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते.
शिवरायांच्या पूर्वीही हजारो वर्षांपासून आपल्याकडे आरमार होते मात्र त्यानंतर काही कारणांमुळे भारतात आरमाराचा वापर पूर्णपणे बंद झाला.
एवढेच काय तर समुद्र उल्लंघायला देखील बंदी करण्यात आली. याचा फायदा पोर्तुगीज-इंग्रज-डच-फ्रेंच-सिद्दी यांनी उठविला आणि आपल्याला अनेक वर्षे गुलामगिरीत काढावी लागली.
त्यावेळचे बलाढ्य सम्राट मोगल-आदिलशाह-निजामशहा-कुतुबशाह इ. यांनीदेखील प्रबळ असे लढाऊ आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही.
मात्र शिवाजी महाराजांनी कोकणाचा मुलुख ताब्यात आल्यानंतर तेथील समुद्र पाहून, सिद्दी व युरोपियनांच्या उचापती पाहून लढाऊ आरमार उभे केले.
एवढेच नाही तर अत्यंत कमी कालावधीत उत्तमोत्तम सागरी किल्ले बांधले. धार्मिक चालीरीती झुगारून देऊन आपल्या मावळ्यांना बलाढ्य युरोपियनांविरुद्ध लढण्याची नवी प्रेरणा दिली.
आणि... आणि मग पुढच्या पिढीने आपल्या समुद्रावरील युरोपियनांची सत्ता खिळखिळी करून टाकली.
पोर्तुगीज तर स्वतःला हिंद महासागराचे मालकच समजत.
समुद्रामध्ये बाहेर पडणाऱ्या कोणत्याही जहाजांना मग ते बलाढ्य मोगलांचे असले तरी त्यांना पोर्तुगीजांकडून कार्ताझ (परवाने) विकत घ्यावे लागत.
मोगलांची हि स्थिती तर आपली काय ?
त्यावेळच्या सागरी किनारपट्टीवरील बलाढ्य शाह्यांपुढे मराठयांची नव्याने उदयास आलेली सत्ता अगदीच छोटी होती.
मात्र शिवरायांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी आरमाराची गरज ओळखली.

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

24 Oct, 05:01


मध्ययुगीन कोणत्याही राजाने एत्तदेशीय आरमार बांधले नव्हते एवढेच काय मोगल सुद्धा समुद्रावर हतबल होते अवा प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आरमार बांधण्याचा यशस्वी प्रयत्न केला म्हणूनच आजही छत्रपती श्री शिवाजी महाराजांना The Father Of Indian Navy म्हणून जगभर ओळखले जाते...

मराठा_आरमार_दिन

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

24 Oct, 05:01


समुद्री मार्गाने स्वराज्याला डिवचू पाहणाऱ्या परकीय अक्रमकांना धडा शिकवण्यासाठी छत्रपतींनी एक नव्हे तर त्या महाकाय सागरात जलदुर्गांची एक साखळीच निर्माण करून शत्रूला बाप बाप होता है हे दाखवून दिले ✌️🚩

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

22 Oct, 04:13


🚩
शिवरायांनी हिंदू धर्मियांची अस्मिता राखली आणि त्यांच्या पराक्रमाची ख्याती उत्तरेपर्यंत पोहोचली होती, याची साक्ष कवी भूषण देतात. (कवणाच्या खाली मराठी अर्थ आहे.)

राखी हिंदुवानी हिंदुवान को तिलक राख्यो, अस्मृति पुरान राखे वेद विधि सुनी मैं। राखी रजपूती राजधानी राखी राजन की, धरामें धरम राख्यो गुन गुनीमें ।। भूषन सुकवि जीति हद्द मरदहन की देस देस की रति बखानी तब सुनी मैं। साहि के सपूत सिवराज, समसेर तेरी दिल्ली दल दावि कै दिवाल राखी दुनी मैं - कविभूषण

अर्थ- हे शहाजीचे सुपुत्र शिवराज ! तुम्ही हिंदुंचे धर्मचिन्ह 'तिलक' तसे स्मृति, पुराणे, यांचे संरक्षण करून वेदमर्यादा कायम ठेवली. रजपूत राजांच्या राजधानीचे संरक्षण केले; पृथ्वीवर धर्म राखला, आणि गुणिजनांचा गुण (त्यांच्या गुणास उत्तेजन देऊन) कायम ठेवला. भूषण म्हणतो, -

"शिवरायांनी आपल्या तरवारीच्या जोरावर दिल्लीच्या सैन्यास जरबेत ठेऊन, पराभव करून दुनियेत मर्यादा (शांतता) राखली; तसेच मराठ्यांची देशामागे देश जिंकल्याने चहूंकडे ख्याती झाली तेव्हा (ती) मी ऐकली."🚩🙏🏻

जय_जिजाऊ... जय_शिवराय.. जय_शंभुराजे..

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

22 Oct, 04:12


प्रबळ इच्छा शक्ती असेल तर वय फक्त एक आकडा आहे.

शिव जन्माने पावन झालेल्या किल्ले शिवनेरी वर नतमस्तक होण्यास आलेले आजी आजोबा.🚩

युवा पिढी आई वडिलांच्या जीवावर शोख पाणी पुर्ण कोणी , Drink , smoker , Mava , Drug's च्या नादी लागतंय यांच्यातून सिद्ध काय होतंय पैसे ही जाता इज्जत ही जातात बाहेर ची लोक ही इज्जत घेता मित्र ही इज्जत घेतात आई वडील ही घेतात आशा लोकांना कोणी चांगलं म्हणत नाही असो ज्याचा त्याचा विषय एक सांगण्याचा प्रयत्नशील करतोय आम्ही करताय आपण स्वता कमवा आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट जपा त्यांचा इतिहास जपा जेव्हा सर्व हरवलेलं वाटेल तेव्हा रायगड जा.!

शिवराय असे शक्तिदाता🚩

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

12 Oct, 03:56


राम आठवणीत राहतात आणि रावण सुद्धा, कलियुगात विसर पडतो फक्त सीता मातेचा...🚩🚩🚩
_दसरा
रावण धहन

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

11 Oct, 02:00


*🚩 #ऊर्जामंत्र*

_*तुमच्या यशाचा पाया जितका खोल असेल तितकीच तुमची यशाची इमारत उंच बनेल...!*_

*#हर_हर_महादेव 🙏🏻🚩*

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

09 Oct, 13:02


*🚩 #ऊर्जामंत्र*

_*सल्ला घ्यायचाच तर यशस्वी आणि अयशस्वी या दोघांचाही घ्या, कारण यशस्वी काय करायचं ते सांगतो आणि अयशस्वी काय करू नये ते सांगतो…!*_

*#हर_हर_महादेव 🚩*

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

08 Oct, 13:02


🚩 *#उर्जामंत्र*

_*भविष्याची जराही कल्पना नसतांना आपण मोठ्या गोष्टींचे नियोजन करतो तोच मनाचा खरा आत्मविश्वास.*_

*#हर_हर_महादेव 🙏🏻🚩*

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

07 Oct, 12:59


_*आपल्या इतिहासाचे संस्कार जर लहानपणासूनच दिले तर इतिहास घडवणारी पिढी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.*_

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

07 Oct, 06:18


मी तुझा भुत्या खरा
पंचभूतांचा हा देह माझा!!

अनुहत चौडक वाजत धक धक
उदो उदो घोष बरा!!

अविद्येचे तेलात जळत त्रिगुण पोत
ज्ञानाग्नीने भर भरा!!

चिद्रूप तेजाचे भूषण कवड्यांचे
माणिक अंग साजिरा,!!

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

06 Oct, 12:58


_*जात-धर्म-भाषा आणि प्रदेशाच्या पलिकडे मानवता जपण्याचे नाव म्हणजे… छत्रपती शिवाजी महाराज.*_

*#शिवराय_असे_शक्तीदाता..🙏🚩*

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

05 Oct, 12:56


🚩 *#उर्जामंत्र*

_*आयुष्यात कुणासोबत किंवा जे काही कार्य कराल त्याच्याशी एकनिष्ठ असले पाहिजे, मग भले परिस्थिती कशीही असो...!*_

*#जय_शिवराय🙏🏻🚩*

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

05 Oct, 04:00


🙏🚩

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩

04 Oct, 12:52


*🚩 #ऊर्जामंत्र*

_*“नम्रपणा” हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किंमती व मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे आहे त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले, तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो...!*_

*#हर_हर_महादेव 🚩*

6,279

subscribers

2,015

photos

181

videos