ANJANEY ACADEMY @anjaneyacademyvishal Channel on Telegram

ANJANEY ACADEMY

@anjaneyacademyvishal


Mpsc व इतर सर्व परीक्षेतील चालू घडमोडींवर One Stop Solution असणारे एकमेव चॅनल.
Cont:- 7773979955

You Tube: https://youtube.com/@vishalsir567?si=Yna3uMReKzZWSiai

Play store: https://play.google.com/store/apps/details?id=com.anjaney.academy

ANJANEY ACADEMY (Marathi)

ANJANEY ACADEMY एक प्रमुख चॅनल आहे ज्याने MPSC व इतर सर्व परीक्षेतील चालू घडमोडींसाठी One Stop Solution पुरवत आहे. या चॅनलवर सर्वात नवीन आणि महत्वाच्या सराव परीक्षांसाठी तयारी कसा करावी, हे सगळे माहिती उपलब्ध आहे. तुमच्या शंका व संदेहांसाठी संपर्क साधा: 7773979955. तुमच्या विषयी अधिक माहिती साठी या चॅनलवर भेट द्या.
YouTube लिंक: https://youtube.com/@vishalsir567?si=Yna3uMReKzZWSiai
Play Store लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=com.anjaney.academy

ANJANEY ACADEMY

03 Jan, 09:45


पराती आणि थाल्या वाजवण्याची तयारी करावी लागते वाटतेय............😂😂😂😂

ANJANEY ACADEMY

03 Jan, 07:05


💐राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024
◾️संपूर्ण यादी

ANJANEY ACADEMY

03 Jan, 06:55


💐ऑक्टोबर महिन्याची नोट्स अँप मध्ये अपलोड करण्यात आलेली आहे.... प्रिंट काढून घ्या.......
व्हिडिओ सोमवारी आणि मंगळवारी येतील...👍👍

🔥 संयुक्त गट ब आणि गट क साठी तुम्हाला जून 2023 ते ऑक्टोबर 2024 पर्यंतचे चालू घडामोडी करायचे आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांमध्ये वर्षभराचा डाटा वनलाइन मध्ये रिविजन करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे..... त्यामुळे या दोन नोट्स थोड्या मोठ्या झालेल्या आहेत.... परंतु येणाऱ्या संयुक्त परीक्षेत या दोन नोट्स मधूनच 10 पेक्षा जास्त प्रश्न असतील.....💐💐💐

ANJANEY ACADEMY

03 Jan, 06:07


चीनी सोशल मीडियावर दावा केला जात आहे की HMPV, इन्फ्लूएंझा ए, मायकोप्लाइमा न्यूमोनिया आणि COVID-19 सारखे अनेक व्हायरस एकाच वेळी रुग्णालयात पसरत आहेत. चीनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे आणि लोक चिंतेत आहे की, चीन सरकार या नवीन व्हायरसबद्दल योग्य माहिती देत नाही. एनडीटीव्ही आणि रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चीनमधील आरोग्य अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

झाले परत एकदा चीनची नाटके चालू.....😡😡

ANJANEY ACADEMY

03 Jan, 02:29


मेजर ध्यानचंद खेलरत्न
👉 मनू भाकर (नेमबाजी)
👉 दोम्माराजू गुकेश (बुद्धिबळ)
👉 हरमनप्रीत सिंग (हॉकी)
👉 प्रवीण कुमार (पॅरा-अॅथलेटिक्स)

अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव)

👉 सुच्चा सिंह (अॅथलेटिक्स)
👉 मुरलीकांत पेटकर (पैरा-जलतरण)

द्रोणाचार्य पुरस्कार

👉 सुभाष राणा (पॅरा-नेमबाजी)
👉 दीपाली देशपांडे (नेमबाजी)
👉 संदीप सांगवान (हॉकी)

द्रोणाचार्य (जीवनगौरव)

👉 एस. मुरलीधरन (बॅडमिंटन)
👉 अरमांडो अॅग्वेलो कोलाको(फुटबॉल)

अर्जुन पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या ३२ खेळाडूंमध्ये विक्रमी १७ पॅरा-खेळाडूंचा समावेश आहे.

💐 महाराष्ट्रातील सचिन खिलारी (पॅरा अॅथलेटिक्स) यांना अर्जून पुरस्कार

ANJANEY ACADEMY

03 Jan, 02:20


👉 नूतन वर्षाची भेट म्हणून 'गो ग्रीन' सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केली आहे.

ANJANEY ACADEMY

03 Jan, 02:18


✔️ देशातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ ऑक्सफर्ड विद्यापीठाने भारतातील विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांच्या नावाने गेल्या दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती सुरू केली आहे.

✔️ सोमरव्हिले या महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास ही शिष्यवृत्ती दिली जाते.

✔️ या शिष्यवृत्तीत शिक्षणाची सर्व फी, जेवण खर्चासह अनेक सुविधा मोफत दिल्या जात आहेत.

ANJANEY ACADEMY

03 Jan, 02:01


💐💐क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले 💐💐
(3 जानेवारी 1831-10 मार्च 1897)

👉 भारतातील पहिल्या महिला शिक्षिका

👉 भारताच्या स्त्रीवादी चळवळीच्या
प्रणेत्या

👉 भ्रूणहत्या विरोधी कार्यकर्त्या

👉 सावित्रीबाईंची जन्मतारीख, ३ जानेवारी
हा दिवस बालिका दिन म्हणून संपूर्ण
महाराष्ट्रात साजरा केला जातो.
🙏

ANJANEY ACADEMY

03 Jan, 01:21


घाऊक किंमत निर्देशांकाचे आधार वर्ष सध्याच्या २०११-१२ वरून २०२२-२३ असे करण्यासाठी केंद्र सरकारने १८ सदस्यीय कार्यकारी समिती स्थापन केली केली आहे.

या समितीच्या अध्यक्षपदी निती आयोगाचे सदस्य रमेश चंद हे आहेत.

ANJANEY ACADEMY

02 Jan, 16:23


💐 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 :-

बुद्धिबळ विश्वविजेता डी गुकेश,

एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी नेमबाज मनू भाकर,

भारतीय पुरुष हॉकी संघाचा हरमनप्रीत सिंग

पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित केले जाणार आहे.

क्रीडा मंत्रालयाने अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या एकूण 32 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 17 पॅरा अॅथलीट आहेत.

महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे आणि पॅराअॅथलीट सचिन खिल्लारीला अर्जुन पुरस्कार.

अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव) मुरलीकांत पेटकर पॅरा-स्विमर यांना

द्रोणाचार्य पुरस्कार दीपाली देशपांडे, नेमबाजी प्रशिक्षक यांना जाहीर झाला आहे.

❇️ मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराविषयी :-

✔️ सुरुवात : 1991-92

✔️ माजी PM राजीव गांधी यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार

✔️स्वरूप : प्रशस्तिपत्त्र, पुरस्कार आणि 25 लाख रुपये दिले जातात.
(2004-05 पर्यंत ते रु 5,00,000/- होते नंतर वाढून 7.5 लाख झाले.)

✔️ खेलरत्न पुरस्कार हा भारतीय खेळातील सर्वोच्च पुरस्कार आहे.

✔️ 06 ऑगस्ट 2021 रोजी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे.

✔️पहिला पुरस्कार :
• 1991-92 विश्वनाथन आनंद (बुद्धिबळ)

ANJANEY ACADEMY

02 Jan, 13:30


6 तारखेला जर फायनल रिझल्ट नाही आला......... तर हे खरं होईल......😂😂😂

ANJANEY ACADEMY

27 Dec, 12:38


CNG रिक्षामध्ये बसताना सावधान......

ANJANEY ACADEMY

27 Dec, 07:26


ऑक्टोबर २०२४ महिन्याच्या नोटस चे थोडे काम बाकी आहे.लवकरच उपलब्ध होतील.....👍👍

ANJANEY ACADEMY

27 Dec, 03:29


👉 दक्षिण कोरिया सर्वाधिक वृद्धांचा देश बनला आहे.

👉 २०३० पर्यंत ६ व्यक्तींमध्ये १ व्यक्ती वृद्ध असेल

👉 २०५० पर्यंत वृद्धांची लोकसंख्या दुप्पट होऊन २.१ अब्ज होईल.

👉 २०२० ते २०५०:- ८० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांची संख्या ३ पट वाढून ४२६ दशलक्ष होईल.

कोणते देश ठरतात सर्वात वयोवृद्ध ?

■ लोकसंख्येच्या ७ टक्क्यांहून अधिक लोक ६५ वर्षे किवा त्याहून अधिक वयोमानाचे आहेत, अशा देशांची यात गणना होते.

■ ज्या देशांतील १४ टक्क्यांहून अधिक लोक हे ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयोमानाचे असतात, अशा देशांमध्ये लोकसंख्येचा समतोल ढळण्याचा धोका अधिक असतो.

■ ज्या देशांमध्ये २० टक्क्यांहून अधिक वृद्ध नागरिक असतात, त्यांना सर्वाधिक वृद्धांचा देश म्हणून गणले जाते.

ANJANEY ACADEMY

27 Dec, 03:27


महाराष्ट्रातील दोन चिमुकलिंचा राष्ट्रिय बाल पुरस्काराने सन्मान

ANJANEY ACADEMY

27 Dec, 03:23


मल्याळम साहित्यिक एम. टी. वासुदेवन नायर यांचे निधन.

👉 ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त 1995

👉 पद्मभूषण 2005

ANJANEY ACADEMY

27 Dec, 02:44


💐 प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराचे वितरण - 26 डिसेंबर

✔️ वीर बाल दिनाच्या वेळी पुरस्काराचे वितरण केले जाते

❇️ महाराष्ट्राच्या दोन धाडसी आणि प्रेरणादायी मुलींना अमरावतीच्या करीना थापाला शौर्यासाठी, मुंबईच्या केया हटकरला साहित्य व सामाजिक कार्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले

👍 यंदा 14 राज्यांमधील 10 मुली व 7 मुले असे एकूण 17 मुलांना गौरविण्यात आले.

❇️ आगोदर हा पुरस्कार 26 जानेवारी ला दिला जात होता

💐 करीना थापा :-
अमरावतीच्या कठोरा परिसरातील जय आंबा अपार्टमेंटमध्ये 15 मे 2024 रोजी लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत करीना थापाने 70 कुटुंबांचे प्राण वाचवले

💐 केया हटकरने - मुंबई - अपंग पणावर मात करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव केले 'डान्सिंग ऑन माय व्हिल्स' आणि 'आय एम पॉसीबल' ही दोन्ही पुस्तके जागतिक स्तरावर नावाजले गेले, त्यांना स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) या आजाराने ग्रसित आहे

ANJANEY ACADEMY

27 Dec, 02:40


💐 वीर बाल दिवस :- 26 डिसेंबर 2024

2022 पासून सुरवात

26 डिसेंबर या दिवशी 'वीर बाल दिवस' म्हणून दोन्ही साहिबजादा बाबा जोरावरसिंग व बाबा फतेहसिंग यांना अभिवादन व शौर्याचे स्मरण करण्यात येते

शिख धर्मातील दहावे गुरु, गुरु गोबिंद सिंग यांचे सुपुत्र बाबा जोरावर सिंग (वय 9) आणि बाबा फतेहसिंग (वय 5) यांच्या अव्दितीय शौर्याला समर्पित या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

ANJANEY ACADEMY

26 Dec, 16:39


Rest in Peace Dr. Manmohan Singh 👏

History will be kinder to you. 🫡

👉 भारताचे 13 वे पंतप्रधान
👉 राज्यसभेतील 10वे विरोधी पक्षनेते
👉 22 वे केंद्रीय अर्थमंत्री

👉 भारतीय रिझर्व बँकेचे 15 वे गव्हर्नर

ऑक्सफर्डमधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवल्यानंतर सिंग यांनी 1966-1969 दरम्यान संयुक्त राष्ट्रांसाठी काम केले .

👉 त्यानंतर ललित नारायण मिश्रा यांनी त्यांना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्त केल्यावर त्यांनी नोकरशाही कारकिर्दीला सुरुवात केली .

👉 1970 आणि 1980 च्या दशकात, सिंग यांनी भारत सरकारमध्ये मुख्य आर्थिक सल्लागार (1972-1976)

👉 रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (1982-1985) आणि नियोजन आयोगाचे प्रमुख (1985-1987) यासारखी अनेक महत्त्वाची पदे भूषवली.

ANJANEY ACADEMY

23 Nov, 06:27


एकदम व्यवस्थित दिसत आहे टेस्ट सिरीज.... प्रिंट

ANJANEY ACADEMY

23 Nov, 05:44


सध्याची परिस्थिती....

ANJANEY ACADEMY

23 Nov, 02:36


वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या संसदीय संयुक्त समितीचा(JPC) अहवाल तयार

ANJANEY ACADEMY

23 Nov, 02:36


◾️2016 मध्ये सौदी अरेबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान राजा अब्दुल अझीझ सश यांच्या हस्ते

◾️ 2016 - अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान अमीर अमानुल्ला खान पुरस्कार

◾️2018 - ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार

■ 2019 - संयुक्त अरब अमिरातीचा ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कार

◾️2019 - रशियाचा द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द प्रेषित पुरस्कार

◾️2019 - मालदीवचा निशान इज्जुद्दीन पुरस्कार

■2019 - बहरीनचा द किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्स अवॉर्ड आणि

■2020 - अमेरिकेचा युनायटेड स्टेट्स आर्ड फोर्स अॅवार्ड लीजन ऑफ मेरिट अॅवार्ड

◾️2021 - भूतानचा ऑर्डर ऑफ द डुक ग्याल्पो

◾️2023 पलाऊचा अबकाल पुरस्कार

■2023- फिजीचा कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी अवार्ड

2023 - पापुआ न्यू गिनीचा ग्रँड कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू

2023 - इजिप्शियन ऑर्डर ऑफ द नाईल

2023 - फ्रान्सचा ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर

2023 - ग्रीसचा ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर

2024 - डॉमिनिकाचा डॉमिनिका अॅवार्ड ऑफ ऑनर

■ 2024 - नायजेरियाचा द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर

■ 2024 - ऑनररी ऑर्डर ऑफ ऑनर बार्बाडोसचा स्वातंत्र्य पुरस्कार

2024 - गयानाचा ऑर्डर ऑफ एक्सलन्स

ANJANEY ACADEMY

22 Nov, 14:25


आपल्याला कोणता सेट येईल कसा ओळखावा 😄
तुमचे शेवटचे दोन अंक कोणते आहे यावर अवलंबून असेल, त्याला 4 ने भाग देऊन जी बाकी उरेल 1 म्हणजे A सेट
2- म्हणजे B सेट
3- म्हणजे C सेट
आणि पूर्ण भाग गेल्यास D सेट

उदाहरण :शेवटी 72 असेल तर पूर्ण भाग जातो म्हणून D सेट
11 असेल तर 3 बाकी उरेल म्हणजे C सेट

99.99% असेच होईल तरी वेळेवर खात्री करून घ्यावी 🙏


उद्या चुकीने दुसरा सेट आल्यास आम्ही जबाबदार नाही 👍

@Siddheshmundhe94 Dm काही अडचण असेल तर 🤗

उद्या राज्यसेवा साठी शेवटच्या 8 दिवसात काय करावे यावर ग्रुप वर टाकण्यात येईल 👍अनुभव -सलग 4 राज्यसेवा मेन्स साठी पात्र 🤗

ANJANEY ACADEMY

22 Nov, 13:59


💐संयुक्त गट ब व क साठी टेस्ट सिरीज सुरु करण्यात येत आहे.... ऑक्टोबर 2023 ते ऑक्टोबर 2024 पर्यंत टेस्त सिरीज असेल....
त्यातील टेस्ट- 1 ऑक्टोबर 2023...... तुमच्यासोबत शेअर करत आहोत......

प्रश्नांची QUALITY पाहून घेणे.....Answer key with explanation लवकरच अपलोड करण्यात येईल........👍👍👍


Note:- ही टेस्ट सिरीज लॉन्च करण्यात आलेली नाही आहे..... एक डिसेंबरला लॉन्च होईल

ANJANEY ACADEMY

22 Nov, 13:53


सेंटर बदलून आलेले आहेत सर्वांचे......😂😂....... तरीपण पेपर जुनेच असणार.....👍👍

ANJANEY ACADEMY

22 Nov, 12:51


तसे दुपारी यायला पाहिजे होते 😄

ANJANEY ACADEMY

22 Nov, 12:50


आले 🤗

ANJANEY ACADEMY

22 Nov, 12:48


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

ANJANEY ACADEMY

17 Nov, 12:00


💐डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने शनिवारी (16 नोव्हेबर) रात्री ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

ANJANEY ACADEMY

17 Nov, 11:27


राज्यसेवा पूर्व - 14 दिवस बाकी


हल्लीच्या काळात कुणाशीही वाद घालू नका. अगदी चहा वाल्याशी सुद्धा नका.

समोरचा जर म्हणाला की,
हत्ती उडतो.तर त्याला सांगा...
आज सकाळीच माझ्या बाल्कनीत बसला होता😂

ANJANEY ACADEMY

17 Nov, 07:21


💐 महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर :-

❇️ डॉ. आ. ह. साळुंखे यांना 'जीवनगौरव'

❇️ शरद जावडेकरांना समाजकार्य विशेष पुरस्कार

❇️ अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने

❇️ ज्येष्ठ संशोधक-विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

❇️शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे कार्याध्यक्ष शरद जावडेकर यांना समाजकार्य विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे.

❇️ देवेंद्र सुतार यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.

💐 रा. शं. दातार नाट्य पुरस्कार असे ग्रंथ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत ➡️

1) धरणसूक्त' कादंबरीचे लेखक :- विलास शेळके

2) 'माणूस 'असं का वागतो' ?' या पुस्तकाच्या पुण्यातील लेखिका अंजली चिपलकट्टी

3) रंगवाचा' त्रैमासिकाचे संपादक वामन पंडित
.

ANJANEY ACADEMY

17 Nov, 07:16


💐 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये भारतातील वेतनाची स्थिती आली समोर.

आइसलँडने आपले पहिले स्थान कायम राखले आहे.

१४६ देशांच्या यादीत सुदान शेवटच्या स्थानी आहे.

भारताचा क्रमांक १२९ वा आहे.

दक्षिण आशियात बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि भूताननंतर भारत पाचव्या स्थानी, तर पाकिस्तान शेवटच्या स्थानी आहे.

➡️लैंगिक समानतेत टॉप १० देश

1)आईसलँड
2)फिनलँड
3)नॉर्वे
4)न्यूझीलंड
5)स्वीडन

◾️समानतेसाठी लागणार १३४ वर्षे
-वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने म्हटले आहे की, जगातील लैंगिक असमानता ६८.५ टक्के कमी झाली आहे.

ANJANEY ACADEMY

17 Nov, 06:34


💐 ट्रस्ट इंडेक्स 2024

◾️जगभरात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संदर्भ
वेगाने बदलत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणता देशातील वातावरण परस्परांसाठी अधिक विश्वासार्ह आहे, हे दर्शवणारा एडेलमॅन ट्रस्ट बॅरोमीटर २०२४ हा अहवाल जारी करण्यात आला आहे.

◾️विकसनशिल देशांचा विश्वास निर्देशांक ६३ इतका आहे. विकसित देशांपेक्षा (४९) तो अधिक आहे.

➡️ सर्वाधिक :-

◾️देश ◾️ निर्देशांक
1) चीन - 79
2) भारत - 76
3) यूएई - 74
4) इंडोनेशिया - 73
5)सौदी अरेबिया - 72

➡️ सर्वात कमी :-

◾️ देश निर्देशांक
1) द आफ्रिका 49
2) स्वीडन 49
3) कोलंबिया 47
4) फ्रान्स 47
5)आयर्लंड 47

ANJANEY ACADEMY

17 Nov, 03:59


काल आपल्या नोट्स बद्दल टाकलेल्या मेसेज मुळे आपल्या विद्यार्थी मित्रांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कॉल करून आणि मेसेज पाठवून सांगितले आहे की.......... आपल्या नोटची आणि क्लासची फक्त पुण्यातच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक अभ्यासिकेमध्ये हवा आहे.........🔥🔥🔥.......... हे ऐकून काय आता अजून मला दोन दिवस झोप येत नाही............ आता काय मेसेज करू नका..... नाहीतर माझ्या डोक्यात हवा जाईल...... आणि मग मी काय जमिनीवर चालणार नाही .....माझे अवघड होईल.....😊😊😊

....असंच प्रेम राहू द्या...... तुमच्या विश्वासात पात्र ठरण्यासाठी अहोरात्र कार्यरत राहील....🙏🙏🙏

ANJANEY ACADEMY

17 Nov, 03:57


💐 केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी 'मा-मदर' या पुस्तकाचे प्रकाशन केले.

केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 'मा-मदर' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

केरळच्या राज्यपालांचे अतिरिक्त सचिव डॉ. दवेंद्र कुमार धोडावत यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

ANJANEY ACADEMY

17 Nov, 03:55


❇️ ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024..

ANJANEY ACADEMY

17 Nov, 03:46


💐 भारताचा पहिला अंतराळ संरक्षण सराव (Space Exercise)

कालावधी - 11 ते 13 नोव्हेंबर 2024

ठिकाण : नवी दिल्ली

आयोजन - डिफेन्स स्पेस एजन्सी

उद्दिष्ट - स्पेस-आधारित मालमत्ता आणि सेवांसाठी धोक्यांचे अनुकरण करणे आणि तयार करणे

2019 मध्ये मिशन शक्ती ची यशस्वी अँटी-सॅटेलाइट (शत्रूचे उपग्रह नष्ट करणे) चाचणी घेण्यात आली होती

ANJANEY ACADEMY

17 Nov, 03:45


🔴 स्वातंत्र्यसैनिक मदन मोहन सोमटिया यांचे वयाच्या 102 व्या वर्षी निधन झाले

🔹मेवाड प्रजा मंडळातील प्रमुख व्यक्ती आणि स्वातंत्र्यसैनिक मदन मोहन सोमटिया यांचे राजस्थानमधील राजसमंद येथे १०२ व्या वर्षी निधन झाले.

🔸वयाच्या १५ व्या वर्षी ते स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले आणि भारत छोडो आंदोलनात योगदान देत ब्रिटिशांनी त्यांना अनेक वेळा अटक केली.

ANJANEY ACADEMY

17 Nov, 03:00


💐डॉ. आ. ह. साळुंखे यांना 'जीवनगौरव'

👉 महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर.

ANJANEY ACADEMY

17 Nov, 02:10


🔸मतदान केंद्रावर मोबाईल बंदीचा नियम सर्वांसाठी

ANJANEY ACADEMY

17 Nov, 02:09


इफ्फी च्या आंतरराष्ट्रीय ज्यूरीच्या अध्यक्षपदी गोवारीकर

ANJANEY ACADEMY

15 Nov, 11:47


💐💐 आपल्या ॲपचे 5000 डाउनलोड पूर्ण.... तसेच 2500 + ऍडमिशन पूर्ण......🥳🥳🥳🥳....

आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.........🙏🙏🙏

ANJANEY ACADEMY

15 Nov, 11:38


💐 नवीन नियुक्त्या 2024 :-

भारतीय तटरक्षक दलाचे नवीन प्रमुख :- परमेश शिवमणी

महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष :- रुपाली चाकणकर

भारताचे ५१ वे सरन्यायाधीश :- न्यायमूर्ती संजीव खन्ना

राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष :- विजया किशोर रहाटकर

लष्कराच्या मिलिटरी ऑपरेशन्स महासंचालक :- राजीव घई

जागतिक स्टील असोसिएशन अध्यक्ष :- थाचत विश्वनाथ नरेंद्रन

भारतीय विमानतळ प्राधिकरण अध्यक्ष :- विपिन कुमार

महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक :- संजय वर्मा

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ अध्यक्ष :- तय्यब इकराम

FICCI चे अध्यक्ष :- हर्षवर्धन अग्रवाल

ANJANEY ACADEMY

15 Nov, 03:51


💐15 November 2024 - 150th birth anniversary of Bhagwan Birsa Munda

दरवर्षी 15 नोव्हेंबर रोजी, या समुदायांच्या, विशेषत: भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी जनजाती गौरव दिवस साजरा केला जातो.

हा दिवस भगवान बिरसा मुंडा, एक आदिवासी नेता आणि स्वातंत्र्यसैनिक, ज्यांचा वारसा सतत प्रेरणा देत आहे, यांची जयंती आहे.

2021 पासून, जनजाती गौरव दिवस साजरा केला जात आहे.

2024 मध्ये, जनजाती गौरव दिवस भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती आहे.

ANJANEY ACADEMY

15 Nov, 03:48


💐 गृह मंत्रालयाने CISF साठी पहिल्या महिला बटालियनला मान्यता दिली आहे.

सध्या CISF मध्ये 7% महिला कर्मचारी आहेत, ज्यांची एकूण संख्या सुमारे 1.77 लाख आहे.

एका बटालियनमध्ये अंदाजे 1,000 जवान असतात
.

ANJANEY ACADEMY

15 Nov, 03:47


💐महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 :-

▪️महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 राजगीर, बिहार येथे सुरू झाली.

▪️ही स्पर्धा 11 ते 20 नोव्हेंबर दरम्यान चालेल, ज्यामध्ये 6 देशांचे संघ सहभागी होतील.

▪️यामध्ये भारत, चीन, जपान, मलेशिया, कोरिया आणि थायलंड यांचा समावेश होतो.

▪️भारतीय संघाचे नेतृत्व सलीमा आणि उपकर्णधार नवनीत कौर करतील.

▪️महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात 2010 साली झाली.

ANJANEY ACADEMY

15 Nov, 03:45


💐 'फॉर्च्युन' कडून टॉप 100 बिझनेसमनची यादी
जाहीर; मस्क अव्वल.

ANJANEY ACADEMY

15 Nov, 01:30


💐महत्वाच्या वनलायनर : 13 नोव्हें 2024

🔸भारत आणि रशिया यांनी 'पँटसीर एअर डिफेन्स मिसाईल-गन सिस्टिम'च्या संयुक्त निर्मितीसाठी करार केला.

🔹ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते फिलिप नॉयस यांना 'सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार' देऊन गौरविण्यात येणार आहे.

🔸हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये 'शानन प्रकल्प'वर 'पूर्ण हक्क'साठी वाद सुरू.

🔹डॉ नवीन रामगुलाम मॉरिशसचे पंतप्रधान झाले.

🔸12 नोव्हेंबर 2024 रोजी राष्ट्रीय सार्वजनिक सेवा प्रसारण दिन साजरा करण्यात आला.

🔹उत्तराखंडमध्ये आयोजित 'इगास दिवाळी उत्सव'.

🔸डिफेन्स स्पेस एजन्सीने नवी दिल्ली येथे प्रथमच 'स्पेस एक्सरसाइज-2024' चे उद्घाटन केले.

🔹GM अरविंद चिथंबरम यांनी चेन्नई ग्रँड मास्टर्स 2024 चे विजेतेपद जिंकले.

🔸सोनू सूदची थायलंड टुरिझमचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती.

🔹एव्हीयन बोटुलिझममुळे राजस्थानच्या सांभर तलावात 2 आठवड्यात 600 स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू झाला.

🔸S&P ग्लोबल सस्टेनेबिलिटी रँकिंगमध्ये हिंदाल्को सलग पाचव्या वर्षी अव्वल संस्था राहिली
.

ANJANEY ACADEMY

14 Nov, 16:21


💐पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिलेलेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार:-

2016- ऑर्डर ऑफ अब्दुलाझिज (सोदी अरेबिया)-2016

2016 - स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर (अफगाणिस्तान)

2018 - ग्रैंड कॉलर (पॅलेस्टाईन)

2019 - ऑर्डर ऑफ झायद (UAE)

2019 - ऑर्डर ऑफ सेंट अँडू (रशिया)

2019 - निशान इज्ज्युदिन (मालदिव)

2019 - ऑर्डर ऑफ द रेनेसॉन्स (बहरिन)

2020 - लेगीन ऑफ मेरिट (अमेरिका)

2021- ऑर्डर ऑफ द डक (भूतान)

2023 - रिपब्लिक अवार्ड (पलाऊ)

2023 - चॅम्पियन ऑफ द ऑर्डर (फिजी)

2023 - कम्पॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू (न्यू गिनिया)

जून 2023 - ऑर्डर ऑफ दि नाईल (इजिप्त)

जुलै 2023 - ग्रैंड क्रॉस ऑफ दि लिजन ऑफ ऑनर (फ्रान्स)

ANJANEY ACADEMY

14 Nov, 14:39


💐 ऑगस्ट done :- नोट्स+ व्हिडिओ

सप्टेंबर........ Loading.....

ANJANEY ACADEMY

10 Nov, 12:19


https://youtu.be/PVH877jLu7U?si=r1uJLYJMCIQvazBC

ANJANEY ACADEMY

10 Nov, 12:19


https://youtu.be/SF8oMJE_gHk?si=kFQHlqEiv5mLOUqT

ANJANEY ACADEMY

10 Nov, 07:58


एमपीएससी चे वेळापत्रक जाहीर करून 45 दिवसात निकाल जाहीर करू.

🔥🔥महाविकास आघाडीचा जाहीरनामा. 🔥🔥

आमचा कोणताही राजकीय पक्ष नाही..... तरीपण जर असे जर होणार असेल....... तर सर्व MPSC मित्र- मैत्रिणी तर्फे आमचा यांना जाहीर पाठिंबा...🙏🙏


😊 जो आमच्या बाजूने.... आम्ही त्यांच्या बाजूने (एमपीएससी करणारे मित्र मंडळ)

ANJANEY ACADEMY

10 Nov, 06:36


💐 सलमान रश्दी यांच्या 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या पुस्तकाच्या आयातीवर दिल्ली उच्च न्यायालयाने बंदी उठवली आहे.

◾️ दिल्ली उच्च न्यायालयाने 7 नोव्हेंबर रोजी सलमान रश्दी यांच्या 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या वादग्रस्त कादंबरीवरील 36 वर्षांची आयात बंदी उठवली. 

◾️ 1998 मध्ये या कादंबरीवर भारतात बंदी घालण्यात आली होती. या कादंबरीवर बंदी घालणारा भारत हा पहिला देश ठरला होता.

◾️ या पुस्तकाच्या नावावरच मुस्लिम धर्माच्या लोकांनी आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे राजीव गांधी सरकारने 1988 मध्ये सलमान रश्दींच्या या पुस्तकाच्या आयातीवर बंदी घातली होती.

ANJANEY ACADEMY

10 Nov, 03:13


💐 हर्षवर्धन अग्रवाल FICCI चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त :-

❇️ इमामी लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि एमडी हर्षवर्धन अग्रवाल 97 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन FICCI अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील.

❇️ अग्रवाल हे सध्या फिक्कीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिश शाह यांच्या जागी येणार आहेत.

ANJANEY ACADEMY

10 Nov, 03:04


💐 भारतीय लष्करी वारसा महोत्सवाचे उद्घाटन :

उद्घाटन : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, जनरल अनिल चौहान यांनी

✔️
दिनांक : 8 नोव्हेंबर 2024
✔️ ठिकाण : नवी दिल्ली येथे
✔️ आवृत्ती :- 2 री

इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिव्हल म्हणजेच IMHF 2024 हा महोत्सव 2 दिवस चालणार आहे.

पहिला भारतीय लष्करी वारसा महोत्सव 21- 22 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.

ANJANEY ACADEMY

10 Nov, 01:30


ANJANEY ACADEMY:
💐महत्वाच्या वनलायनर : 6 नोव्हें 2024

🔸भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय लष्करी सराव 'VINBAX' च्या 5व्या आवृत्तीला अंबाला येथे सुरुवात.

🔹जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक क्षयरोग अहवाल 2024 नुसार
सर्वाधिक टीबी रुग्णांच्या बाबतीत भारत अव्वल देश आहे

🔸जपानने जगातील पहिला लाकडी उपग्रह 'लिग्नोसॅट' अवकाशात यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला.

🔹केयर्न ही UNEP च्या तेल आणि वायू मिथेन भागीदारीत सामील होणारी भारतातील पहिली तेल आणि वायू कंपनी ठरली.

🔸मद्रास उच्च न्यायालयाने गोपनीयतेच्या अधिकारांतर्गत 'वैवाहिक गोपनीयतेचा' समावेश केला आहे.

🔹कन्नड लघुपट 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो' लघुपट श्रेणीत ऑस्करसाठी नामांकन.

🔸बिहारसह देशभरात छठ पूजा उत्सवाला सुरुवात झाली.

🔹'केंद्रीय हिंदी समिती'ची 32 वी बैठक नवी दिल्लीत झाली.

🔸कोडो बाजरी खाल्ल्याने मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात 10 हत्तींचा मृत्यू झाला.

🔹जगातील सर्वात मोठी मगर 'कॅशियस'चा ऑस्ट्रेलियात मृत्यू झाला.

🔸पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेता अल्जेरियन बॉक्सर इमान लीक झालेल्या वैद्यकीय अहवालानुसार खलीफ हा पुरुष आहे.

ANJANEY ACADEMY

09 Nov, 10:12


💐 महत्त्वाचे पुरस्कार :-

🔥 महाराष्ट्र भूषण पुरस्कार :-

- २०२२: डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी, एक प्रसिद्ध समाजसेवक ज्यांनी वृक्षारोपण, रक्तदान आणि वैद्यकीय शिबिरांमध्ये योगदान दिले. 🩸

- २०२३: आशोक सराफ, एक अनुभवी मराठी अभिनेता, यांना २०२३ साठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. 🎭

🔥 साहित्य अकादमी पुरस्कार २०२३ :-

- मराठी भाषा: कृष्णत खोत यांना "रिंगण" या कादंबरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- उर्दू भाषा: सदीका नवाब सहर यांना "राजदेव की अमराई" या कादंबरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 📚

🔥साहित्य अकादमी बाल पुरस्कार २०२३

- मराठी भाषा: एकनाथ आव्हाड यांना "छंद देईल आनंद" या काव्यसंग्रहासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 📖👶

🔥साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२३

- विशाखा विश्वनाथ यांना स्वतःला स्वतः विरुद्ध उभा करताना या काव्यसंग्रहासाठी.

🔥 पद्म पुरस्कार २०२३ :-

❇️ पद्मविभूषण:

- झाकीर हुसेन (कला)

❇️ पद्मभूषण:

- कुमार मंगलम बिर्ला (व्यापार आणि उद्योग)
- दीपक धार (विज्ञान आणि अभियांत्रिकी)
- सुमन कल्याणपूर (कला)

❇️ पद्मश्री:

- भिकु रामजी इदाते (सामाजिक कार्य)
- राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर) (व्यापार आणि उद्योग)
- परशुराम कोमाजी खुणे (कला)
- प्रभाकर भानुदास मांडे (साहित्य आणि शिक्षण)
- गजानन जगन्नाथ माने (सामाजिक कार्य)
- रमेश पाटणगे (साहित्य आणि शिक्षण)
- रवीना टंडन (कला)
- कूमी नरिमन वाडिया (कला)

🔥 ३३ वा व्यास सन्मान पुरस्कार २०२३

- प्राप्तकर्ता: पुष्पा भारती यांना "यादें, यादें और यादें" या संस्मरणासाठी सन्मानित करण्यात आले आहे. 🏆📚

🔥 नोबेल पुरस्कार २०२३ :-

- शांती: नर्गेस मोहम्मदी यांना इराणमध्ये महिलांच्या दडपशाहीविरुद्ध लढ्याबद्दल. 🕊️
- साहित्य: जॉन फॉसे यांना त्यांच्या नवीन नाटके आणि गद्यांसाठी जे न बोलता येण्याजोग्या गोष्टींना आवाज देतात. 📖

🔥रॅमन मॅगसेसे पुरस्कार २०२३

- प्राप्तकर्ते:
- कोर्वी रक्षंद (बांगलादेश) 🇧🇩
- युजेनियो लेमोस (टिमोर-लेस्टे) 🇹🇱
- डॉ. रवी कन्नन (भारत) 🇮🇳
- बर्नाडेट जे. माद्रिद (फिलिपीन्स) 🇵🇭

🔥 बुकर पुरस्कार :-

- बुकर पुरस्कार २०२३: पॉल लिंच यांना "प्रॉफेट सॉंग" या कादंबरीसाठी. 📚🏅
- आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२३: जॉर्जी गोस्पोडिनोव यांना "टाइम शेल्टर" (अनुवादक: एंजेला रोडेल) या पुस्तकासाठी. 🌍📖

ANJANEY ACADEMY

09 Nov, 03:39


#prelims

Prelims च्या काय tricks आहेत ? अभ्यासाव्यतिरिक्त अनोळखी प्रश्न कसा सोडवावा? अशा काही प्रश्नांच्या अनुषंगाने काही मते.

🔹Tukkegiri
मध्यंतरी एक गोष्ट चालू होती की 1/3 मध्ये 3 answer select करा.  किंवा अमुक तमूक विषयात शेवटचा पर्याय म्हणजे answer असतं. अशा स्वरूपाची गोष्ट कधी फार केली नाही.
त्याची सत्यता किती आहे हे कधी पडताळून नाही पाहिले. त्यामुळे मन prejudice होतं आणि अभ्यास सोडून नको त्या मार्गाने विचार करायला लागतं असं मला वाटत.

माहित नसणाऱ्या प्रश्नाबद्दल,असणाऱ्या माहितीच्या आधारे उत्तर काढण्याकडे माझा जास्त कल होता.

त्यामुळे अभ्यास आणि PYQ मध्ये जास्तीत जास्त areas cover करायचे ही strategy होती.

🔹काही commonsense किंवा निरीक्षणे
तरीही काही निरीक्षण माझे सुद्धा आहेत. जसे की दोन similar option मध्ये उत्तर असण्याची खूप जास्त शक्यता असते.(उदा.Universal Encyclopedia व Britannica Encyclopedia, साने गुरुजी व हिरवे गुरुजी, दादोबा तर्खडकर व आत्माराम तर्खडकर)

त्याचबरोबर शाहू, फुले, आंबेडकर, कर्वे, पंडिता रमाबाई अशा मुख्य समाजसुधारकांवर पूर्व मध्ये प्रश्न येतोच. त्यामुळे खूप जास्त confusion असेल तर यापैकी एखादा पर्याय बरोबर असण्याची शक्यता जास्त आहे.

यावर मी अजून जास्त सविस्तर व काळजीपूर्वक लिहून share करतो. तुम्ही जास्तीत जास्त PYQ बघितले तर ते आपसूकच तुमच्याही ध्यानात येईल.

पण अशा गोष्टी अभ्यासाला replace कधीच करू शकत नाहीत.

" CONTENT IS THE GOD "

👆 हे तत्त्व मी पाळायचो.

(Polity सारख्या विषयात तरी tricks जास्त work करतच नाहित असं मला वाटतं. तिथे अभ्यास आणि पाठांतर केलेच पाहिजे.)

🔹Educated Guess
पण Educated Guess करण्याचा प्रयत्न निश्चित केला पाहिजे म्हणजे
उदा. मध्यंतरी environment मध्ये Green Dot Programme हा pollution control program कूठे होता असं विचारलं होत? Option मध्ये Germany होता जी एक Industrial Country होती. मग तिथे pollution जास्त म्हणून तिथे असण्याची शक्यता जास्त आहे.

महिलांना football पाहण्यास बंदी कूठे आहे? याला इराण सारखा conservative मुस्लिम बहुल देश असण्याची शक्यता जास्त आहे. अशा पद्धतीने guess work करायला हरकत नाही

@dcvineetshirke

ANJANEY ACADEMY

09 Nov, 02:05


👍 आज झालेल्या समाज कल्याण अधिकारी गट ब या परीक्षेत आपले 9 पैकी 9 प्रश्न जशास तसे.....🔥🔥🔥

ANJANEY ACADEMY

05 Nov, 02:37


🔲 चालु घडामोडी: 5 नोव्हेंबर 2024

🔷राष्ट्रीय कँडी डे' दरवर्षी 04 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो

🔶पर्यावरण राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी 'राष्ट्रीय जैवविविधता कृती धोरण आणि योजना' लाँच केली आहे.

🔷न्यूझीलंडने भारताविरुद्धची कसोटी मालिका 3-0 अशी जिंकली आहे.

🔶इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) ची 352 वी गव्हर्निंग बॉडी मीटिंग 'जिनेव्हा' येथे आयोजित करण्यात आली आहे. भारताकडून कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव 'सुमिता डावरा' या बैठकीत सहभागी झाल्या आहेत.

🔷Collins Dictionary ने 'Brat' ला वर्ड ऑफ द इयर 2024 घोषित केले आहे.

🔶कोलोरॅडो, यूएसए येथे झालेल्या अंडर-19 जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने चमकदार कामगिरी करत 4 सुवर्णांसह 17 पदके जिंकली आहेत.

🔷जम्मू-काश्मीरमधील भाजप विधिमंडळ पक्षाने एकमताने 'सुनील शर्मा' यांची नेता म्हणून निवड केली आहे. भाजप विधानसभेतील सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे.

ANJANEY ACADEMY

04 Nov, 10:09


💐 भारतातील पहिल्या घडामोडी :-

भारताचे पहिले संविधान संग्रहालय :- हरियाणा

छत्तीसगडचा पहिला 15 मेगावॅटचा तरंगणारा सोलर प्लांट :- भिलाई स्टील प्लांट

युनिफाइड पेन्शन योजना स्वीकारणारे पहिले राज्य :- महाराष्ट्र

भारतातील पहिला CO2-टू-मिथेनॉल पायलट प्लांट :- महाराष्ट्र

दिल्लीच्या IGI विमानतळाला 2027 पर्यंत भारतातील पहिली एअर ट्रेन सुरु होणार

भारतातील पहिली सुपरकॅपॅसिटर उत्पादन सुविधेचे उद्घाटन :- केरळ

देशातील पहिल्या बापू टॉवरचे उद्घाटन :- बिहार

INITI आयोगाचा महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म चॅप्टर मिळवणारे पहिले राज्य :- तेलंगाना

भारतातील पहिले 'लेखकांचे गाव' :- ठाणो गाव, उत्तराखंड

भारतातील पहिली मोफत एअर ॲम्बुलन्स सेवा :- एम्स ऋषिकेश

ANJANEY ACADEMY

04 Nov, 10:06


👉 विवेक फणसाळकर यांच्याकडे DGP पदाचा अतिरिक्त पदभार

👉 EC ने केली रश्मी शुक्ला यांची बदली

ANJANEY ACADEMY

04 Nov, 03:53


💐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 :- 4 जुन 2023

◾️चालू घडामोडी प्रश्नांचे विश्लेषण:-

जागतिक घडामोडी :- 7 प्रश्न
भारतातील घडामोडी :- 5 प्रश्न
महाराष्ट्रातील घडामोडी:- 3 प्रश्न.

✔️ नियुक्त्या :- 2 प्रश्न
✔️ पुरस्कार :- 2 प्रश्न
✔️ परिषदा /बैठका :- 4 प्रश्न
✔️ क्रीडा घडामोडी :- 2 प्रश्न

◾️ 6 महिन्यातील पंधरा प्रश्न आले आहेत. कारण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 ही ऑगस्ट 2022 मध्ये झाली होती.
◾️ ऑक्टोबर 2022 ते मार्च 2023 पर्यंतचे सर्व पंधरा प्रश्न आलेले आहेत.

ANJANEY ACADEMY

04 Nov, 03:53


🚨 समाज कल्याण अधिकारी गट ब चालू घडामोडी प्रश्नपत्रिका विश्लेषण :-

सर्व 9 प्रश्न हे 2023 मधील आहेत.

✔️ मे 2023 :- 2 प्रश्न.
✔️ जुन 2023:- 1 प्रश्न.
✔️ जुलै 2023:- 2 प्रश्न.
✔️ सप्टेंबर :- 1 प्रश्न.
✔️ ऑक्टोबर :- 2 प्रश्न.
✔️ डिसेंबर :- 1 प्रश्न

🌐 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी नियोजन :-

यावरून आपल्याला एक समजते की ही परीक्षा राज्यसेवा सोबतच होणार होती..... आणि यामध्ये सर्व 2023 चे प्रश्न आलेले आहेत....... आता होणाऱ्या राज्यसेवा साठी तुम्ही एप्रिल 2023 ते मार्च 2024 पर्यंत चालू घडामोडी व्यवस्थित पाहून घेणे.

15 पैकी 15 प्रश्न हे या 12 महिन्यातीलच असतील....👍👍


ANJANEY ACADEMY 😊

ANJANEY ACADEMY

31 Oct, 06:12


👍 आज झालेल्या समाज कल्याण अधिकारी गट ब या परीक्षेत आपले 9 पैकी 9 प्रश्न जशास तसे.....🔥🔥🔥

ANJANEY ACADEMY

31 Oct, 06:12


💥 विशाल काजळे सर संचलित अंजनेय अकॅडमी, पुणे.

🔥 चालू घडामोडी बॅच 2023-24 🔥

💥 30 % Discount Offer 💥

‼️ बॅचची वैशिष्ट्ये :-‼️

✔️ प्रत्येक महिन्याचे 2 तासांचे 2 video.
✔️ प्रत्येक महिन्याच्या फोटोसहीत नोट्स.
✔️ प्रत्येक महिन्याच्या Short Notes.
✔️ प्रत्येक महिन्याचे 150 + MCQ.
✔️ प्रत्येक महिन्याचे 200+ वन लाइनर प्रश्न
✔️ प्रत्येक महिन्याचा 2 तासांचा Fastrack Revision video.
✔️ Special topic wise video.
✔️ 1 video कितीही वेळा पाहता येईल.
✔️ बॅच व्हॅलेडीटी :- 6 महिने.(Unlimited view)

👍 संयुक्तं गट ब मुख्य-2023 परीक्षेत 7 महिन्यांच्या व्हिडिओ मधून 11 पैकी 9 प्रश्न जसाच तसे आले आहेत.

💐 आज झालेला समाज कल्याण अधिकारी गट ब परीक्षेमध्ये आपल्या बॅचचे 9 पैकी 9 प्रश्न जशास तसे आलेले आलेले आहेत....
🔥🔥🔥

🔖 मार्गदर्शक : विशाल काजळे सर,
शितल खिल्लारे मॅडम (PSI 2017,Tax ASST).

📱 ॲप लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=com.anjaney.academy

📱 Youtube :- https://www.youtube.com/@anjaneyacademybyvishal

📱 Teligram link :-
https://t.me/anjaneyacademyvishal

ANJANEY ACADEMY

31 Oct, 04:28


2000 ऍडमिशन पूर्ण...💐💐💐 ...... अंजनेय अकॅडमी वर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे...... विश्वासात पात्र ठरण्यासाठी अविरत कार्यरत राहू...🙏🙏🙏

ANJANEY ACADEMY

31 Oct, 02:12


आपल्या बॅचवर दिवाळीनिमित्त 3 तारखेपर्यंत 30% डिस्काउंट ऑफर सुरू राहील........ कुपन कोड ची आवश्यकता नाही तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन करू शकता..... 3 तारखेनंतर बॅच 499 मध्ये उपलब्ध असेल
👍👍👍👍

ANJANEY ACADEMY

26 Oct, 04:17


जुलै 2024 महिन्याची PDF नोट्स ॲप मध्ये अपलोड केलेली आहे,प्रिंट काढून घ्या....... जुलै पार्ट -2 व्हिडीओ आज 5 वाजता ॲप मध्ये उपलब्ध होईल..👍

ANJANEY ACADEMY

26 Oct, 03:55


💐 INS अरिधमान :-

भारताने विशाखापट्टणम येथील शिप बिल्डिंग सेंटर (SBC) येथून चौथी अणुऊर्जेवर चालणारी ( Nuclear Submarine) बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी (SSBN) लाँच केली आहे.

या पाणबुडीला S4 असे सांकेतिक नाव देण्यात आले आहे. अरिहंत वर्गातील ही शेवटची पाणबुडी आहे.

🚨भारताकडील आण्विक पाणबुड्या :-

1) INS चक्र- S1
2) INS अरिहंत- S2,
3) INS अरिघाट -S3,
4) INS Aridman -S4

ANJANEY ACADEMY

25 Oct, 13:48


💐 ओडिशा सरकारने सध्याच्या रजेच्या हक्काव्यतिरिक्त महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा एक दिवसाची सशुल्क मासिक रजा सुरू केली आहे.

महिला कर्मचाऱ्यांना आता वार्षिक 12 अतिरिक्त प्रासंगिक रजा मिळतील, त्यांची एकूण संख्या 27 दिवसांपर्यंत वाढेल (15 वर्तमान CL + 12 नवीन).

या उपक्रमाची घोषणा उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी स्वातंत्र्यदिनी केली होती.

ANJANEY ACADEMY

25 Oct, 13:44


💐इस्रायल आशियाई विकास बँकेचा(ADB) नवीन सदस्य.

इस्रायल आशियाई विकास बँकेचा नवा सदस्य झाला आहे.

आता आशियाई विकास बँकेच्या सदस्यांची संख्या 69 झाली आहे.

आशियाई विकास बँक ही आशिया-पॅसिफिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी एक बहुपक्षीय विकास वित्त संस्था आहे.

हे सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सदस्य देशांना कर्ज प्रदान करते.

❇️ आशियाई विकास बँक :
✔️स्थापना : वर्ष 1966
✔️मुख्यालय : मनिला (फिलीपिन्स)

ANJANEY ACADEMY

25 Oct, 09:47


💐 इजिप्त 'मलेरियामुक्त' घोषित :-

▪️इजिप्तला 20 ऑक्टोबर 2024 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अधिकृतपणे 'मलेरियामुक्त' घोषित केले.

▪️WHO कडून मलेरिया मुक्त प्रमाणपत्र प्राप्त करणारा हा 5 वा आफ्रिकन देश आहे.

▪️या वर्षी अधिकृतपणे मलेरियामुक्त घोषित होणारा काबो वर्दे यांच्यानंतर हा देश जगातील दुसरा देश बनला आहे.

▪️प्लाझमोडियम व्हायव्हॉक्स" या परजीवी प्रोटोझुआ मूळे लागण होते.

▪️ अनाफेलिस डासाची मादी चावल्याने संक्रमण होते.

इतर :
▪️दरवर्षी 25 एप्रिल हा जागतिक मलेरिया दिवस म्हणून साजरा केला जातो.

▪️2008 मध्ये पहिला जागतिक मलेरिया दिवस आयोजित करण्यात आला होता.

ANJANEY ACADEMY

25 Oct, 07:28


💐महत्वाचे निर्देशांक आणि भारताचा क्रमांक:-

◾️हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 : 7 वा क्रमांक

◾️ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2024 : 29 वा क्रमांक

◾️मानव विकास निर्देशांक (2023-2024) : 134 वा क्रमांक

◾️ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 : 111 वा क्रमांक

◾️ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2023 : 126 वा क्रमांक

◾️लैंगिक असमानता निर्देशांक 2022 (GII) : 108 (193 पैकी)

◾️ग्लोबल पीस इंडेक्स 2024 : 116 वा क्रमांक

◾️जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023 : 13 वा क्रमांक

◾️हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2024 :  82 वा क्रमांक

◾️जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक : 40 वा क्रमांक

◾️आंतरराष्ट्रीय आयपी निर्देशांक : 42 वा क्रमांक

◾️लोकशाही निर्देशांक 2023 : 41 वा क्रमांक

◾️मिलिटरी स्ट्रेंथ रँकिंग 2024 : 4 था क्रमांक

◾️WEF चा ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स : 129 वा क्रमांक

◾️जागतिक सायबर क्राइम इंडेक्स :10 वा क्रमांक

◾️जागतिक वायु गुणवत्ता अहवाल 2024 : 3 (सर्वात प्रदूषित तिसरा देश)

◾️Corruption Perceptions Index 2023 : 93 वा क्रमांक

◾️ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2023 : 63 वा क्रमांक

◾️Artificial Intelligence  Preparedness Index 2024 : 72 वा क्रमांक

◾️Sustainable Development Report 2024 : 109 वा क्रमांक

◾️भारतात थेट परकीय गुंतवणुक 2023 : 15 वा क्रमांक

◾️हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 : 3 रा क्रमांक (67 युनिकॉर्न स्टार्टअप्स)

◾️World Happiness Index 2024 : 126 वा क्रमांक

◾️लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 : 38 वा क्रमांक

◾️ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 :  40 वा क्रमांक

◾️जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2024 : 159 वा क्रमांक

ANJANEY ACADEMY

25 Oct, 05:25


💐 23 ऑक्टोंबर :आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिन

23 ऑक्टोबर 2013 रोजी, बिश्केक, किर्गिझस्तान येथे हिम बिबट्याच्या संवर्धनासाठी एक घोषणा स्वीकारण्यात आली. सर्व 12 हिम बिबट्या श्रेणीतील देशांनी हा ठराव स्वीकारला.

✔️ या ठरावात हिम बिबट्याच्या संख्येचे आणि त्यांच्या अधिवासाचे संरक्षण आणि पुनर्प्राप्ती करण्यासाठी तातडीच्या सामूहिक कारवाईच्या गरजेवर जोर देण्यात आला.

✔️ हा दिवस पहिल्यांदा 2014 मध्ये साजरा करण्यात आला.

❇️ प्रोजेक्ट स्नो लेपर्ड : प्रोजेक्ट स्नो लेपर्ड 2009 मध्ये जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये सुरू झाला.

6,497

subscribers

3,901

photos

246

videos