विशाल सुतार -मराठी @vishalsutar Channel on Telegram

विशाल सुतार -मराठी

@vishalsutar


स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण,शब्दसंग्रह,निबंध,सारांश लेखन,आकलन यांची परिक्षाभिमुख समज वाढवण्यासाठी आपला चॅनल नक्कीच मदत करेल..आपल्या मित्रांनाही समाविष्ठ करा.
@vishalsutar

ऑफिस संपर्क -7875757252

विशाल सुतार -मराठी (Marathi)

विशाल सुतार चॅनल एक मराठी भाषेतील स्पर्धा परीक्षा मध्ये मदत करणारा आहे. या चॅनलवर मराठी व्याकरण, शब्दसंग्रह, निबंध, सारांश लेखन, आकलन यांच्या परीक्षासाठी मार्गदर्शन प्राप्त करण्यास मदत केली जाते. तुमच्या मित्रांना ही माहिती सांगा आणि संपर्क साधा खिल्लीत 7875757252 या नंबरवर.

विशाल सुतार -मराठी

13 Nov, 10:23


मराठीमध्ये तीन लिंग विचार आहेत


1) पुल्लिंग

2) स्त्रीलिंग

3) नपुसंकलिंग

उदा :

पंखा - पुल्लिंग

विहीर - स्त्रीलिंग

झाड - नपुसंकलिंग


परंतु काही नामे दोन लिंगामध्ये येतात..

उदा :
बाग - पुल्लिंग व स्त्रीलिंग
नेत्र - पुल्लिंग व नपुसंकलिंग

अशा नामांना ' उभयलिंगी नाम ' असे म्हणतात.

काही नामे तिन्ही लिंगामध्ये येतात...

बाळ - पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी.

अशा नामांना ' बहुलिंगी नामे' असे म्हणतात..

विशाल सुतार -मराठी

13 Nov, 04:21


प्रयोगाचे एकूण ४ प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे ;
(१) कर्तरी प्रयोग
(२) कर्मणी प्रयोग
(३) भावे प्रयोग
(४) मिश्र किंवा संकर प्रयोग


जेव्हा कर्त्याची लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते, तेव्हा त्या वाक्यारचनेस ‘कर्तरी प्रयोग’ असे म्हणतात.

उदाहरणार्थ : राम आंबा खातो.

विशाल सुतार -मराठी

11 Nov, 07:37


"महाराष्ट्रातील समाजसुधारक व व्यक्तिविशेष" पुस्तक आजपासून पुन्हा उपलब्ध झाले आहे.

इतिहास विषयाचा अभ्यास करताना समाजसुधारक व व्यक्तीविशेष हा स्वतंत्र मुद्दा आहे.
गेल्या काही परीक्षांमध्ये आयोगाने समाजसुधारक टॉपिकवर खूप खोल वर जाऊन प्रश्न विचारलेले आहेत.

आज पर्यंत आपल्याला आयोगाने विचारलेले बरेचशे प्रश्न आपल्या पुस्तकातून Reflect झालेले दिसतात.

आजपर्यंत हे पुस्तक आयोगाच्या आणि तुमच्या अभ्यासाला खरे उतरले आहे आणि इथूनपुढे देखील आपल्याला ह्या पुस्तकाचा फायदा होईल याची खात्री आहे.

महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध झाले आहे.

धन्यवाद😊

विशाल सुतार -मराठी

11 Nov, 05:55


समास....

मनुष्य बोलत असताना बोलण्याच्या ओघात कधी-कधी तो काही मराठी शब्द गाळून सुटसुटीत असे जोडशब्द बनवितो, ह्याला समास असे म्हणतात. उदा. 'पोळीसाठी पाट' या दोन शब्दांऐवजी पोळपाट असा जोडशब्द वापरला जातो. मराठी भाषेत दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांचे एकत्रीकरण करून त्यांचा एक शब्द करण्याची परंपरा पुष्कळ जुनी आहे. या व्यवस्थेने शब्दांचा संक्षेप होऊन थोड्या शब्दांत पुष्कळ अर्थ व्यक्त होतात.

उदा. वडापाव – वडा घालून तयार केलेला पाव.
पोळपाट – पोळी करण्यासाठी लागणारे पाट

विशाल सुतार -मराठी

01 Nov, 14:53


आणि लेकरांची दिवाळीच्या गोड़ झाली..

मातीशी नाळ घट्ट असणाऱ्या लेकरांची शाळा, सासवड

दिवाळी म्हंटल की एक उत्सवांचा सोहळा या क्षणी नवीन कपडे, फटाके, आणि फराळ या साऱ्या गोष्टींची उत्सुकता लेकरांना असते पण वीट भट्टी बंद असताना घरातील चूल पेटणं अवघड असते, अश्यावेळी आपण त्यांच्या आनंदाचा कारण होऊ शकतो का या भावनेतून रयतचे कार्यकर्ते प्रमोद कारकर यांच्या माध्यमातून आपल्या शाळेतील लेकरांची दिवाळी उत्सहात व्हावी म्हणुन त्यानां लागणारी प्रत्येक गोष्ट रयतच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली गेली..
या प्रसंगी जेष्ठ समाजसेवक रावसाहेब आण्णा पवार, शिवस्वराज्य सोशल फाउंडेशन, ऋणानुबंध सामाजिक संस्था यांच्या उपस्थिती मध्ये हा क्षण साजरा केला गेला..
शेवटी इतकंच.....
आपल्याला पूल होता आलं पाहिजे जो आनंदचा, माणुसकीचा, जिव्हाळ्याचा, सामाजिक बांधिलकीचा मार्ग सोपा करणारा असला पाहिजे.

दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 🌿

🙏🙏

विशाल सुतार -मराठी

25 Oct, 04:51


भावकर्तुक क्रियापदे –

जेव्हा वाक्यातील क्रियापदाचा मूळ अर्थ किंवा भाव हाच त्यांचा कर्ता मानावा लागतो. अशा क्रियापदांना ‘भावकर्तृक क्रियापद’ असे म्हणतात.

उदा.

मी घरी पोहचण्यापूर्वीच सांजावले.

पित्त झाल्यामुळे तिला आज मळमळते.

पुण्यात जातांना कात्रज जवळ उजाडले.

आज दिवसभर सारखे गडगडते.

अशा क्रियापदांना कर्त्याची आणि कर्माची गरज नसते.
म्हणून अशा क्रियापदाला अकर्तुक क्रियापद म्हणतात.

विशाल सुतार -मराठी

23 Oct, 06:25


संकर प्रयोग....

कर्तू कर्म व कर्तुभाव या दोन्हीही प्रयोगातील कर्ता हा द्वितीय पुरुषी असतो.

कर्मभाव या संकर प्रयोगातील कर्ता हा तृतीय पुरुषी असतो.

विशाल सुतार -मराठी

22 Oct, 05:45


यमक:-

कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो.

उदा:
जाणावा तो ज्ञानी
पूर्ण समाधानी
निःसंदेह मनी
सर्वकाळ


पुष्ययमक-

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो


दामयमक-

आला वसंत कविकोकिल हाही आला
आला पितो सुचवितो अरुणोदयाला.

विशाल सुतार -मराठी

19 Oct, 15:27


आज पुण्यात अभ्यासिकेत झालेल्या दुर्दैवी घटनेत विद्यार्थ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले..

या विद्यार्थी मित्रांसोबत रयत प्रबोधिनी उभी असेल याची ग्वाही देतो..

रयत ची Test Series, रयत च्या क्लास नोट्स, पुस्तके आणि रयतच्या Revision Program च्या सर्व Xerox, रयतच्या Batches या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील..

रयत विद्यार्थी फंडाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देखील केली जाईल 🙏

रयतच्या ऑफिसशी संपर्क साधा :
भरत -9762131361

16,914

subscribers

1,262

photos

26

videos