◾️ केंद्र सरकारने डॉ. व्ही. नारायणन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे नवीन अध्यक्ष आणि अवकाश विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती केली.
◾️ अवकाश विभागाचे सध्याचे सचिव आणि 'इस्रो' चे प्रमुख एस. सोमनाथ यांची जागा नारायणन घेतील. अवकाश विभागाच्या सचिवांकडेच 'इस्रो'चे प्रमुखपदही असते.
⚫️ कोण आहेत व्ही. नारायणन?
डॉ. व्ही. नारायणन हे एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आहेत, ज्यांना रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शनमध्ये जवळपास चार दशकांचा अनुभव आहे. त्यांनी 1984 मध्ये इस्रोमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि विविध पदे हाताळली.
2018 मध्ये त्यांची लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर (एलपीएससी) चे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, जे इस्रोच्या प्रमुख केंद्रांपैकी एक आहे.
✍ संकलन: अमित लव्हटे सर
(संचालक, विद्या प्रबोधिनी कोल्हापूर)
Join - t.me/VidyaPrabodhiniMPSC
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖