प्रत्येकाला माहिती असले पाहिजेत असे काही अलिखित सामाजिक नियम कोणते आहेत?
1.मित्राच्या बहिणीशी लग्न करणार नसाल तर प्रेम करू नये.
2. दवाखाना, विमान प्रवास, आणि मुलाखत या तीन ठिकाणी शक्यतो परफ्युम वापरू नये.
3. लग्न समारंभ ,शोक समारंभ, व कामाचे ठिकाण येथे शक्यतो सर्वात मिसळून जातील असेच कपडे घालावेत.
4.कोणी पैसे दिले तर त्याने मागायचा आधी परत द्यावेत.
5.जर तुम्ही सिगारेट ओढत नसाल तर मित्र सिगारेट ओढताना लांब थांबावे व सिगारेट ओढणाऱ्या लोकांनी उगीच ओढत नसलेल्या लोकांच्या तोंडावर धूर सोडू नये.आणि त्याला एकदा ट्राय कर म्हणू नये.
6.कोणी तुमचा कॉल उचलत नसेल तर उगीच 3,4 नंबर वरून त्या व्यक्तीला कॉल करू नये. कदाचित ती व्यक्ती काही कामात असु शकते.नाहीतर त्याला तुमच्याशी बोलायचे नसेल.
7.वर्गात लेक्चर असताना सर्वाना त्रास होईल असे वागू नये. वर्गात 50 मुले असतील आणि तुम्ही 2 मिनिट जरी चुकीचे वागले तरी 50 मुलांचे 2 मिनिट असे 100 मिनिट वाया जातात. तुम्हाला शिकायचे नसेल पण कदाचित बाकीच्यांना शिकायचे असते.
8. दुसऱ्याच्या आवडी निवडी वर हसू नका, ह्याची gf अशी , हा देव चांगला नाही, हे का खातोय , त्या सिंगर चा आवाज चांगला नाही तुला का आवडतो, टिकटोक फालतू आहे ( हे खरेच फालतू आहे ) तुम्हाला त्याचे निवडीचे काय करायचेय त्याला त्याचे पाळू द्या
9.जेवताना आवाज करू नयेच पण तोंडात काही असताना बिलकुल बोलू नये.
10.इतकेच तोंडात भरावे जितके असताना तुम्ही तुमचे नाव सांगू शकता. आणि तोंड बंद ठेवूनच चावावे
11.सर्वाना वाढून झाल्यावरच जेवायला सुरुवात करावी
12.एखादा पदार्थ कसे खायचे हे माहिती नसल्यावर बाकीच्या कोणीतरी खाताना पाहावे मग सुरुवात करावी उगीच अज्ञानी बनून फिंगर बाउल पियू नये.
13. एखाद्या अनोळखी व्यक्तीविषयी लगेचच चर्चा करू नये, तुम्ही जीच्याबद्दल चर्चा करता ती तुम्ही ज्याच्याशी चर्चा करता त्याची कोणतरी असू शकते.
14.कोणाच्या घरी गेले तर तिथल्या मुलांना कितीवीला आहे विचारून झाल्यावर त्याचे मार्क, आणि गणितातले, इंग्रजी मधले प्रश्न विचारू नयेत.
15.बिना आमंत्रणाचे कोणत्याही कार्यक्रमात जाऊ नये.
16.एखादा पत्ता माहिती नसला तर का जायचंय, तिथे काय आहे असले प्रश्न विचारून किंवा खोटा पत्ता सांगून समोरच्याच्या टाईमपास करू नये. सरळ नाही माहिती सांगावे.
17.समोरचा व्यक्ती तुम्हला माहिती असलेला जोक सांगत असेल तर उगीच तो जोक पूर्ण करून रसभंग करू नये.
18.रांग लावली असली तर रांगेचा रिस्पेक्ट करावा.मधेच घुसू नका आणि कोणाला घुसून पण देऊ नका.
19.समोरची व्यक्ती मुलगी आहे म्हणून सगळे खरे मानू नका, पाहिले दोन्ही बाजू एकूण घ्या मगच ठरवा. दरवेळेस मुलाची चूक नसते.
20. तसेच दरवेळेस ऍकॅसिडेंट झाला तर कार वाल्याची चूक नसते दोन्ही बाजू समजून घ्या आधी मदत करा नंतर दोषारोप करत बसा.
21.काही चुकीचे होत असेल तर मदत करा.तिथले फोटो , व्हिडीओ काढून स्टेटस ठेवण्यापेक्षा ती परिस्थिती कशी नीट करता येईल ते पहा.
22.प्रवासात शेजारच्या व्यक्तीला स्वतः विषयी सगळेच सांगू नका, पैसे एकाच ठिकाणी ठेवू नका, स्वतःला लागणाऱ्या सर्व गोष्टी घेऊनच निघा.
23.स्वतः बद्दल गोष्टी, तुम्ही किती शिकलात, तुम्ही काय करता, किती पैसे कमावता, तुमच्याकडे काय काय आहे हे विचारल्याशिवाय सांगू नये. फुशारक्या मारू नयेत.
24.कोणाकडे भेटायला पहिल्यांदा घरी जाणार असाल तर शक्यतो मोकळे जाऊ नये. काहीतरी छोटेसे पुस्तक, खायचा पदार्थ, एखादी वस्तू घेऊन जावे.
25.वैयक्तिक स्वछता पाळा, चांगले दिसा उगीच शरीराच्या दुर्गंधीने हवा प्रदूषण, आणि गाबाळे दिसून दृष्टी प्रदूषण करू नका.
26.अपव्होट फ्री असतात उत्तर कोणाचेही आवडले तरी देत जा. कोणी कोणी भरपूर वेळ देऊन उत्तरे लिहिते. दररोज 2 , 2 तास लिहिणारे लोक आहेत इथे. लेखकांनी सुद्धा दर 2 मिनिटांनी सारखे सारखे किती अपव्होट झाले ते मोजत बसू नये. आयुष्यात इतरही गोष्टी आहेत करण्यासारख्या.
आजून खूप सारे गोष्टी आहेत फक्त आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही काही नुकसान होणार नाही असे वागले. एखादी गोष्ट जितकी चांगल्या प्रकारे करता येईल तितकी केली म्हणजेच समाजातले तुम्ही भरपूर नियम पाळले.
भरपूर लाईक्स बद्दल धन्यवाद. काही आजून टीप देऊ इच्छितो प्रत्येक दिवशी एक एक ऍड करेल.
लग्न झाल्यावर जोवर एकमेकांना योग्य रित्या समजून घेत नाहीत तोवर बाळाचा विचार करू नका. ( खूप वेळा चुकीच्या व्यक्ती बरोबर फक्त बाळासाठी राहावे लागते आणि उरलेल्या आयुष्याचे वाटोळे होते म्हणून पाहिले समजून घ्या काहीही प्रॉब्लेम्स असू शकतात )
आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाहुण्याकडे ठेवू नये.