CMO MAHARASHTRA @cmo_maharashtra Channel on Telegram

CMO MAHARASHTRA

@cmo_maharashtra


मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र राज्य यांचे अधिकृत चॅनल...

CMO MAHARASHTRA (Marathi)

आमच्या प्रदेशातील मुख्यमंत्री सचिवालय यांचे अधिकृत चॅनल, CMO MAHARASHTRA यात आपले हार्दिक स्वागत आहे! या चॅनलवर मिळणारे ताज्या आणि महत्वाचे समाचार, सरकारच्या योजना आणि त्याचे अपडेट्स, विविध क्षेत्रांमध्ये प्रगतीचे विचार आणि अभ्यास, व्यक्तिगत व्यवसाय आणि स्थानिक समुदायाला संबंधित माहिती, साक्षात्कार आणि नेटवर्किंग समारंभ आढळणार आहेत. जोडल्याबद्दल आपले हार्दिक आभार!

CMO MAHARASHTRA

15 Oct, 13:05


Channel photo updated

CMO MAHARASHTRA

29 Aug, 10:46


🎥📡📡🎥📡📡
Watch Live Now

#LIVE | 'न्यूज 18 इंडिया' च्या 'डायमंड स्टेट्स समिट महाराष्ट्र' कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

Facebook:-
https://www.facebook.com/CMOMaharashtra/videos/1225477681977685/

Twitter:-
https://twitter.com/i/broadcasts/1ypJdpywllYJW

Youtube:-
https://youtube.com/live/Qhf-_Umenyk?feature=share

CMO MAHARASHTRA

28 Aug, 19:23


छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती
----------------
नवीन भव्य पुतळ्यासाठी तज्ञांचा समावेश असलेली समिती

--------------
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


मुंबई दिनांक २८: मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते , तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ही समिती जबाबदारी निश्चित करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तुत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.

या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा येथे संबंधितांची बैठक बोलाविली होती. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव गृह इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास असीम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हाईस ऍडमिरल अजय कोचर, रियर ऍडमिरल मनीष चढ्ढा, शिल्पकार राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके उपस्थित होते.

छत्रपतींच्या पुतळ्याला नव्याने भव्य स्वरुपात तयार करणे आणि उभारणे यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महारात्ष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. नौदलाने हा पुतळा राजकोट येथे नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने एका चांगल्या भावनेने उभारला होता भविष्यात आपल्याला अशी दुर्घटना परत कधीच घडू नये यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा. यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही.

CMO MAHARASHTRA

28 Aug, 17:44


महाराष्ट्रात केंद्राप्रमाणेच एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू

मुंबई दि. २८: केंद्र सरकारने २४ ऑगस्ट रोजी 'एकीकृत निवृत्तिवेतन योजना' (Unified Pension Scheme) घोषित केली. त्याच धर्तीवर प्रस्तावित 'सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना' ऐवजी महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना (Unified Pension Scheme) जशीच्या तशी लागू करण्यात येत आहे. तसेच या अनुषंगाने येणाऱ्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात येत आहे असे वित्त विभागाने कळविले आहे

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या एकीकृत निवृत्तिवेतन योजनेची मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारचे अनुषंगाने महाराष्ट्रात लागू करण्याकरिता "वित्त विभागास” प्राधिकृत करण्यात येत आहे.

CMO MAHARASHTRA

27 Aug, 14:59


शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे

'लाडकी बहीण' प्रमाणेच 'सुरक्षित बहीण' ही जबाबदारीही शासनाचीच

कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. २७ :-

गोविंदा पथकांच्या पाठीशी हे शासन नेहमीच खंबीरपणे उभे आहे आणि यापुढेही राहील. शासनाकडून गोविंदांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करण्यात येईल. 'लाडक्या बहिणी' प्रमाणेच 'सुरक्षित बहीण' ही जबाबदारी देखील शासनाचीच आहे, शासनाने ही जबाबदारी निश्चितपणे स्वीकारली आहे. हे शासन कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात ते बोलत होते.

यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, पूर्वेश सरनाईक, संस्कृती युवा प्रतिष्ठानचे इतर सर्व पदाधिकारी, विविध गोविंदा पथके व गोविंदाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हा खेळ पाहून आम्हालाही आमचे बालपण आठवते. आम्हीही आमच्या लहानपणी या खेळात उत्साहाने सहभागी होवून दहीहंड्या फोडत असू. आता हा उत्सव सातासमुद्रापलीकडे पोहोचलाय. 'प्रो-कबड्डी' प्रमाणे हा 'प्रो-गोविंदा' खेळ झाला. शासनाने या खेळाला साहसी खेळ म्हणून मान्यताही दिली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी या खेळामध्ये खूप लक्ष घालून या खेळाला लोकप्रिय बनविण्यात मोठा हातभार लावला आहे. त्यांनी या खेळाची व्यापकता वाढविली आहे. त्यातला साहसीपणा व धोका लक्षात घेऊन सर्व गोविंदांचा विमा काढण्याबाबत शासनाकडे मागणी करण्यात आली होती. शासनाने ही मागणी तात्काळ मान्य केली. सर्व गोविंदांचा विमा काढण्यात आला. ते पुढे म्हणाले, असे असले तरी हा उत्सव सुरक्षितपणे साजरा करणे, ही आपली जबाबदारी आहे. आपले कुटुंबीय आपली वाट पाहत असतात. 2011 या वर्षी नऊ थरांचा विक्रम या दहीहंडी उत्सवात झाला होता. 'जय जवान' या मित्रमंडळाने हा विक्रम केला होता आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली होती. आपल्याकडे एकापेक्षा एक मित्रमंडळे, दहीहंडी पथके आहेत, जे या खेळामधील विक्रम दरवर्षी मोडताना दिसत आहेत. परंतु ही सोपी गोष्ट नव्हे. यासाठी वर्षभर मेहनत घ्यावी लागते, कसून सराव करावा लागतो. एकाग्रपणे सांघिक भावनेने या खेळाचे प्राविण्य मिळवावे लागते. या गोविंदाची मेहनत बघून हे शासन आपल्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहील. जे जे शक्य आहे ते सर्व काही गोविंदांसाठी करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी शेवटी महिला गोविंदा पथकांचेही विशेष अभिनंदन केले.
000000000

CMO MAHARASHTRA

27 Aug, 14:58


🎥📡📡🎥📡📡
Watch Live Now

#LIVE | ठाणे | प्रताप सरनाईक फाऊंडेशन आयोजित ‘दहीहंडी उत्सव- २०२४’ मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Facebook :-
https://www.facebook.com/CMOMaharashtra/videos/1025708669561453/

Twitter :-
https://twitter.com/i/broadcasts/1OdKrXnpwrQJX

YouTube :-
https://youtube.com/live/ws2-hsSoctg?feature=share

CMO MAHARASHTRA

26 Aug, 20:06


#VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई - गोवा महामार्ग पाहणी दौरा

4,764

subscribers

3,450

photos

133

videos