✨रंगले जग कवितांचे✨ Owner= प्रांजल @padhav Channel on Telegram

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

@padhav


💫प्रामाणिकपणा, सकारात्मक, योग्य विचार, माणुसकी
ये जगण्याच्या दिशा आहे 👍💮

तुम्ही पाठवू शकता मराठी, इंग्रजी ,हिंदी कविता, लेख ओव्या, स्वलिखित गाणी ,भाषणे.

@pgadhavvv

https://youtube.com/channel/UCAYpl2FT2OENJChRd3YT3-g

चैनल join Kara ##

#PRAN_JAL

पाठव (Marathi)

अद्वितीय आणि साहसी चरित्रांचा संगम, 'पाठव' चॅनेल एक आकर्षक स्थान आहे. या चॅनेलवर प्रांजल यांच्या तत्वज्ञ कवितांची एक मालिका आहे. या चॅनेलवर तुम्ही मराठी, इंग्रजी, हिंदी, विविध कवितांच्या चर्चा, लेख, ओव्या, गाणी आणि भाषणांचा आनंद घेऊ शकता. 'पाठव' चॅनेल एक सकारात्मक आणि योग्य वातावरण आहे ज्यात सर्वांना विचारांची आणि कल्पनांची अत्यंत मूळ्यवान अनुभवायला मिळते. तुम्हाला 'पाठव' चॅनेलवर सामील होण्याचा अवसर आहे. चॅनेलवर कॅनलला join करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमच्या साहित्यिक अभियांत्रिकीची वाहण करा. अशा प्रेरणादायक संवादांचा भाग होण्याचा आनंद घ्या, ज्यामागे तुमचं साहित्यिक सफर सुखद आणि सुखद असेल.

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

10 Jan, 16:53


@AmolmoreAm

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

10 Jan, 13:19


स्वतःसोबत प्रामाणिक असणारी व्यक्ती दुसऱ्याला त्रास देण्याचा विचार सुद्धा करू शकतं नाही कारण त्याला उत्तमरीत्या माहिती असते की आपण जसं इतरांनसोबत वागतो अगदी तसंच आपल्यासोबत घडत असते म्हणून द्यायचे झाले तर स्वतःकडून सर्वाना भरभरून आनंद देत राहा कारण दुःखं तर प्रत्येकाकडे आपलं आपलं ठेवलेलं असतें👆🏻बरोबर ना!,,,✍🏻👍🏻😊

एकमन#लेखक

 
@Ommshelke

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

08 Jan, 06:45


कवयत्री- कांचन उगले

थोडे मनातले ❤️

हिवाळ्यात पान जसं
हळूच गळून पडावं
झाडासारख्या हसत सारं
दुःख मनात घ्यावं ।।१।।

रात्रीच्या आकाशातील
मनात अंधार यावं
पाखराच्या त्या पिला सारखं
कुशीत दडून बसावं ।।२।।

भावनांच्या काळोखाचं
मनात वादळ यावं
जमिनीवरच्या गवतासारखं
खुदकन हसून घ्यावं ।।३।।

तसंच त्या मनामध्ये
दुःख सारे दाटून यावं
पावसाच्या सरीसारखं
कुणा रडून घ्यावं ।।४।।

राणा मधले फुलपाखरू ही
फुलाच्या कानात जाऊन सांगतय
दुसऱ्याला आनंद देण्यातच
खरं सामर्थ्य वाटतंय ।।५।।

झाडाच्या त्या पानासारखा
नव्या उमेदीने यावं
शेंड्यावर च्या फुलासारखं
सगळे गोड असावं
म्हणूनच वाटतं मनाला
पुन्हा उमलून यावं।।६।।

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

06 Jan, 11:56


पत्रकार... ✍️❤️
✍️" न्यायपालिका,संसद,कार्यकारी मंडळ,व निर्भीड निष्पक्ष प्रसार माध्यमं हे लोकशाहीचे 4मजबूत स्तंभ आहेत.बऱ्याचदा अनेक पत्रकारांनी आपला जीव धोक्यात घालत सत्त्याचा पाठलाग करतं,वेळोवेळी लोकशाहीचं रक्षण केलं.निष्पक्ष पत्रकरिता हा लोकशाहीचा मजबूत आधारस्तंभ आहे.लोकशाहीच्या रक्षणाची सर्वात मोठी जबाबदारी न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमाची आहे...सत्त्याचा पाठलाग करतं लोकशाहीच रक्षण करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवाना पत्रकार दिनांच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!"
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी, शिक्षक )
✍️संपर्क -:
@ABCs1432

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

05 Jan, 16:27


‘काव्य अंतरीचे’ काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर

साहित्याच्या क्षेत्रात नवे पर्व घडविणाऱ्या कवी गजानन दशरथ पोटे यांच्या पहिल्या काव्यसंग्रह ‘काव्य अंतरीचे’ चे प्रकाशन लवकरच होणार आहे. पी.आर. ग्रुप ऑफ पब्लिकेशन या वरुड येथील प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून हा संग्रह वाचकांसमोर येणार असून, मानवी जीवनातील विविध भावना आणि कल्पनांचे प्रतिबिंब या कवितांमधून दिसून येते.

कवी पोटे यांनी आपल्या पहिल्याच काव्यसंग्रहातून साहित्यातील नवरस (प्रेम, विरह, करुणा, शांतता, रौद्र, वीर, अद्भुत, भयानक आणि हास्य) उत्तम प्रकारे प्रकट केले आहेत. प्रेम, विरह, करुणा, शांतता, आणि अद्भुत भावनांनी भरलेल्या या कवितांमध्ये ग्रामीण संस्कृतीचे दर्शन होते, तसेच आधुनिक समाजातील समस्यांवरही मार्मिक भाष्य आहे. त्यांच्या सृजनशीलतेचा हा पहिला टप्पा साहित्यवेड्या वाचकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

साहित्यिक श्री. ह.भ.प. प्रा. रामकृष्णादादा महाराज पाटील यांनी या संग्रहाला प्रस्तावना लिहून आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी संग्रहाचे वर्णन “जीवनाच्या गूढतेचा आणि साधेपणाचा मिलाफ” असे केले आहे.

पी.आर. ग्रुप ऑफ पब्लिकेशनच्या वतीने या संग्रहाच्या प्रकाशनासाठी विशेष तयारी सुरू आहे. या संग्रहाच्या माध्यमातून कवी गजानन दशरथ पोटे वाचकांच्या अंतःकरणात भावनिक संवाद साधतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

‘काव्य अंतरीचे’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनासाठी शुभेच्छा देत साहित्यरसिकांनी या संग्रहाचा आस्वाद घ्यावा आणि कवीच्या विचारांना आपल्या मनात स्थान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

01 Jan, 15:20


https://youtube.com/shorts/PpA_i6aEt8g?si=5ACrhRFaWAoucAZ9

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

01 Jan, 02:51


2025😍
🎯"अनेक नवे वर्ष येतात आणि जातात पण त्या प्रत्येक नव्या वर्षात आपण नवं काय करतो?हे जास्त महत्वाच आहे.. प्रत्येक नव्या वर्षात यशाच्या नव्या वाटा शोधत यशस्वी जीवनाकडे वाटचाल करणं आवश्यक आहे.. प्रत्येक वर्षात अशी काही कामगिरी करा की, त्या कामगिरीमुळे तुमच्यासाठी ते वर्ष अविस्मरणीय ठरेल..!"
Happy New Year 2025
©️®️लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
लिखाण दि.1जानेवारी 2025

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

01 Jan, 02:26


Happy New Year 2025

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

01 Jan, 02:25


Good_Bye_2024
हे_आठवणीतील_वर्ष..❤️🌿

    तसे पाहता वर्ष वैगेरे काही नाही आपण प्रत्येक वर्षी चांगल्या वाईट क्षणानां सामोरे जातो.
काही क्षण आपल्यासाठी अविस्मरणीय असतात ते क्षण आपल्याला फार आठवणीत राहते आणि जे कधी विसरू शकत नाही तर काही क्षण आपल्याला खूप विसरावे वाटतात पण ते विसरताही येत नाहीत. 🌼

आयुष्य आहे चढ उतार येणारंच त्यामुळे प्रत्येक क्षणाचा मनभरून आनंद घेऊ या व वाईट क्षणांना स्वीकारून त्यातून शिकत तोही एक आनंद घेता यावा.. अन आपल्या आयुष्याला रंगीबेरंगी विचारांनी फुलवत रहावे..❤️🌱

वर्ष येते, वर्ष जाते पण आयुष्यात येणारे क्षण आणि व्यक्ती कायम आठवणीत मनात घर करून राहतात..😊

- शब्द मनातले..❣️
@Aaditya_pawar

happynewyear2025

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

30 Dec, 11:05


आयुष्यात दुःखी होण्याचे कुठलंच कारण नसते कारण आपल्या आजूजूला आनंद आनंदचं पसरलेला असतो फक्त तो आपल्याला घेता आला पाहिजे कारण संकट हे आपल्याला दुःखी करायलाच येतात मात्र त्या संकटात पण आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच आयुष्य हे योग्य पद्धतीने जगता येईल बाकी परिस्थितीचं आपल्याला खूप काही शिकवतं असते यातून तुम्ही काय घेता यावर आपलं बरेचस समाधान ठेवलेलं असते राव!,,,✍🏻

एकमन#लेखक

 @Ommshelke

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

28 Dec, 11:57


प्रेम♥️हा विषय प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला आहे  प्रेम म्हणजे सतत बोलणं नेहमी भेटावं वाटण एकमेकांच्या आठवणीत रमून जाणं आपल्या आवडत्या व्यक्तीण जरा वेळ कमी दिला तर तिच्यावर रुसुन बसणं म्हणजे असंच काहीसं नामात्र एकतर्फी प्रेम करण्याऱ्याचा कधी विचार केला काय ती व्यक्ती आपली कधीच होणार नाही हे माहिती असून सुद्धा तिच्यावरच निःस्वार्थपणे प्रेम करत राहणं तिच्या एका msg ची दिवसंदिवस वाट बघणं आणि तिचा हसरा चेहरा पाहण्यासाठी  सातत्याने प्रयत्नात असणं कोणाला माहिती न,होता शेवटच्या श्वासापर्यंत जपणं अस प्रेम करणं सगळयांच्या नशिबात नसतं ज्यांचं असतं त्यांचं खूप भाग्य असतं जसं की👇🏻!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

27 Dec, 12:01


सरलेलं वर्ष सुंदर होत आताच वर्ष पण चांगलंचं असणार आणि येणार प्रत्येक वर्षे ही आपलीच असणार यात काही शंका नाही हा विश्वास स्वतःला असला की कुठलीच वाट बिकट वाटत नाही फक्त आपलं ध्येय माहीत असायला हवं कारण आयुष्याच्या शर्यतीत धावतात सर्वच मात्र थांबावं कुठं हे अनेकांना माहिती नसतं म्हणून स्वतःवर भरोसा असणारी व्यक्ती कुठल्याही संकटात नेहमी शांत असते कारण त्याला आयुष्यात प्रत्येक परिस्थितीला सामोरे कसं जायचं याचं ज्ञान अनुभवणं  प्राप्त झालेल असतं!,,,✍🏻

एकमन#लेखक
  @Ommshelke

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

26 Dec, 11:53


'कौटुंबिक वादविवाद टेन्शन आणि दुःखाच कारण..'हा माझा लेख आज या वर्तमान पत्रातं प्रकाशित झाला नक्की वाचा..

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

25 Dec, 17:04


https://youtube.com/shorts/2nfDCXmVmtM?si=ey_6-2Le_s4vpeZG

अभ्यास करण्याऱ्या युवकांसाठी .....

प्रेम की करिअर ( कविता )

नक्की बघा, आणी कमेंट करायला विसरू नका 😊

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

24 Dec, 12:02


व्हाट्सअप स्टेटस...💚
✒️"व्हाट्सअपच स्टेटस म्हणजेच जीवन असंच काही लोकांना वाटतं एखाद्या व्यक्तीच्या जीवनात काय सुरु आहे? याचा अंदाज लोकं त्या व्यक्तीच्या व्हाट्सअप स्टेटस वरून लावतात प्रत्यक्ष सवांद जवळपास बंदच झाला आहे.कधी कधी परिस्थिती अशी येते की,केवळ व्हाट्सअपच स्टेटस बघून लोकं त्या व्यक्तीला सोडून जाण्याचा पण विचार करतात.त्या व्यक्तीसोबत कोणतीही चर्चा न करता. खरं सांगायचं तर या जगातील बहुतांश लोकं व्हाट्सअपला स्टेटस ठेवतात ते फक्त आवड म्हणून..कोणत्याही व्यक्तीच जीवन हा व्हाट्सअप स्टेटसचा विषय नसतो..एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काय सुरु आहे? हे जर व्हाट्सअप स्टेटस वरून कळत तर काही लोकं स्टेटसच ठेवत नाही.. मग असे लोकं काय मेले कां...?😁ते पण जिवंतच आहे ना.. अमुक व्यक्तीनें एखाद स्टेटस ठेवलं तर ते आपल्याच उद्देशून ठेवल असा गैरसमज सुद्धा अनेक लोकं करुन घेतात.. अरे त्या व्यक्तीला विचारा कुणासाठी ठेवलं..? परस्पर स्वतः च काही ठरवू नका..व्हाट्सअप स्टेटस केवळ एक आवड आहे लोकांच जीवन नाही..!"
✍️लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC)
लिखाण दि24डिसेंबर 2024
✍️संपर्क -:
@ABCs1432

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

24 Dec, 07:44


Instagram I'd: @ravan_ashucp

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

24 Dec, 07:44


💔🥺..शब्दांनाही आज कंठ फुटला,
माणुसकीला ही काळींबा फासणारा माणुस
माणसातच कसा भेटला..🥀❤️‍🔥

- अमोल मोरे..
@AmolmoreAm

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

23 Dec, 06:55


कृषिप्रधान देशात अनेक शेतकरी आत्महत्या करतात त्याकडे कोणीच कसं पाहत नाही?मग बळीराजा,कृषिप्रधान देश म्हणतो ते फक्त नावापुरताच का?😐फक्त शेतकरी दिनाचे स्टेटस ठेवून,शेतकऱ्यांचे स्टेटस बदलत नाही,त्यासाठी रक्ताच पाणीच करावं लागतं😔.A.C च्या रूममधून शेतकऱ्यांवर फक्त भाषणे,योजना,चित्रपटे केल्याने परिस्तिथी बदलत नाही..बळीराजाची कथा ऐकणारे खूप आहेत पण त्याची व्यथा दूर करणारे कोणीच नाही हे दुर्दैवच😔.आपण कधी त्यांना शासन योजना,विम्या बदल माहिती देणार आहोत का?ज्या योजना येतात त्यात स्वतःचे हाथ साफ करून घेणारी व्यवस्था कधी बदलणार?बर लोकांचं जाऊद्या शेतकऱ्याकडून भाजीपाला विकत घेतो तेव्हा स्वतःच भाव कमी करून मागतो.आधुनिक शेतीची माहिती देऊन नवीन तंत्रज्ञनाद्वारे उत्पन्न कसे वाढेल ह्याची माहिती आणि त्याचे प्रात्यक्षिक दय्याला हव🤝.मातीपरिक्षणाचे,सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिले तरच येणाऱ्या काळात काहितरी पिकेल नाहीतर पूर्ण जमीन नापीक होईल आणि भूक लागली म्हणून पैसे खाता येत नसतात
....🦋🌺🙏....
लेखन-B.S.Kendre(stu)
Telegram-
@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

23 Dec, 04:54


💔🥺..शब्दांनाही आज कंठ फुटला,
माणुसकीला ही काळींबा फासणारा माणुस
माणसातच कसा भेटला..🥀❤️‍🔥

- अमोल मोरे..
@AmolmoreAm

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

23 Dec, 03:44


राष्ट्रीय कृषी दिन... 🌿
🌿 "शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्वपूर्ण कणा आहे.देशातील 70%जनता ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे..शेती हा असंघटीतं क्षेत्रातील सर्वात मोठा उद्योग आहे.. अनेक असंख्य संकट, वादळ यात सुद्धा कृषी क्षेत्राने आपलं अस्तित्व कायमच टिकवून ठेवलं आहे..आज 23डिसेंबर 2024राष्ट्रीय कृषी दिन आहे या दिवसाच्या सर्व देशवाशियांना अनंत शुभेच्छा... 🌿🌿💚
✒️ ABC'S Diaries
फोटो -राजमा पीक शिवशक्तीपीठ रुईखेड (मा.)ता. जि. बुलढाणा

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

23 Dec, 03:43


काही व्यक्ती खूप भावनिक असतात त्यामुळे सहसा ते कोणत्याही गोष्टी,व्यक्ती,विषयांना जास्त जवळ करत नाहीत🥺त्या विषयाचा फक्त परिक्षेपुरता अभ्यास करतात परंतु त्यांच्या जीवनात अश्या काही गोष्टी,विषय येतात जे जीवनाचा खरा अर्थ दाखवून जातात😇त्या विषयाची आवड कळत नकळत कशी लागते काही कळतच नाही,असे विषय फक्त परीक्षे पुरते मर्यादित न राहता जीवनाचा अविभाज्य भाग बनून जातात❣️त्यापैकी एक विषय म्हणजे गणित.ज्याला हा विषय समजतो,आवडू लागतो.त्याला जगातील अनेक गोष्टींचं गुपित कळू लागते.जग जिंकन्यचा आत्मविश्वास ह्या विषयाच्या सखोल अभ्यासामुळे येतो🔥ह्या विषयात प्राविण्य मिलवलेले रामानुजन,भास्कराचार्य,आर्यभट ह्यांनी आपल्या ज्ञानाने जगावर छाप सोडली. रामानुजन ह्यांच्या जन्मदिवस गणीतदिन म्हणून साजरा करतो😇.1729 हा हार्डी-रामनुजन संख्या तर सर्वत्र ज्ञात आहे.ह्या विषयाकडे फक्त विषय म्हणून न पाहता गुप्त गोष्टीची ज्ञान देणारी चावी अस म्हणून पाहिलं तर छानच कारण ह्या विषयाच अस्तिव सर्वत्र आहे😇
.....🦋🌺🙏.....
शब्दांकन-B.S.Kendre(stu)
Telegram-
@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

22 Dec, 06:03


जीने के लिए
तेरे सिवा और कुछ
नहीं चाहिए

बस तू चाहिए
बस तू ही तू
हरदम साथ चाहिए

✍️विनायक भिसे,बारामती
Mo.7798150143

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

21 Dec, 14:21


उडान..🍃🦅
21/12/2024

कटा दिये पंख मेरे
उन्हे लगा जीवन मेरा मेरे पंखोसे है,
उनके लिये बस अफसोस अब इस बात का है
आखीर यह अबतक जिंदा कैसे है..
💔😇🥀❤️‍🔥


https://www.instagram.com/ishq_kiyaan?igsh=dXdoMXRrMGdta2x4
#Ishq_Kiyaan 💔
@Writer_ami

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

25 Nov, 11:57


आयुष्याच्या शर्यतीत प्रत्येकाला जिंकाव वाटतं हे स्वाभाविकचं आहे मात्र परिस्थितीकडे बघून थांबावं लागतं कारण जे परिस्थिती शिकवते ते कुठलंच विद्यापीठ शिकवू शकतं नाही स्वप्न जरूर बघा ते पूर्ण करण्याचे प्रयत्न करत राहा पण आपली वस्तुस्थिती मान्य करा जे आहे ते मान्य केलं की जे आपल्याकडे नाही त्याचा त्रास कधीच आपल्याला होतं नाही,,,💯हा एक माझा अनुभव आहे!,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

24 Nov, 18:06


@Ommshelke

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

24 Nov, 17:01


संयम आणि चिकाटी🔥

दैनंदिन आयुष्यात असे काही प्रसंग घडत असतात जर आपण त्यांच्याकडे डोळसपणे पाहिलं आणि त्याचा योग्य अभ्यास केला तर ते नक्कीच आयुष्याला कलाटणी देणारे असतात🔥जीवनात तुम्ही कोणतेही कार्य किती प्रामाणिकपणे अनेक अडचणींचा,विरोधकांचा(जळणाऱ्यंचा)सामना करत ते कसे पूर्ण करता हे महत्त्वच आहे💪
तुम्ही जशी प्रगती करत पुढे जाणार तसे तुमच्यावर जळणाऱ्या लोकांची संख्याही वाढत जाते मग ते क्षेत्र कोणतेही असो शिक्षणही तुमच्या कामावर/अभ्यासावर शंका घेतली जाईल,तुम्हाला शिव्या दिल्या जातील,नातेवाईक/लोक टोमणे मारतील,समाजातून खाली खेचण्याचा प्रयत्न केला जाईल,मग अश्या गोष्टींना तुम्ही प्रतिउत्तर कसे देता आणि आपलं अस्तित्व परत कसं सिद्ध करता तेही स्वतःच्या जबाबरीवर💪अनेक आरोपांना तुम्ही एक शब्द न बोलता आपल्या कामातून ते कसं करून दाखवायचं हे कालच्या निकालातून शिकायला भेटते.🔥
"कर्तृत्व अस बनाव्यायच की जेव्हा तुम्ही bounce back करणार तेव्हा तुम्ही तर येणारच परंतु येते वेळेस अखी टीम घेवून येणार"🔥💪
.....🦋🌺🙏....
शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
प्रतिक्रिया कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

24 Nov, 13:23


अस्तित्व

बाप सावकाराच्या दावनीवर महिने घालायचा
माय दुसऱ्यांच्या बांधावर रोजंनदारी करायची
ताटव्याच्या रिकाम्या झोपडीला हादरे बसायचे
अनं बाहेरील दुनिया मग फिदीफिदी हसायची

बापाच्या पायातला बाभळीचा काटा सलायचा
माय विस्त्यावर बिबुवाचा गरम चरडका द्यायची
तरी बाप शिक्षणासाठी माझ्या पैसे उचलायचा
अनं गळ्याला त्याच्या कर्जाची फाशी बसायची

विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

24 Nov, 10:44


संयम आणि चिकाटी🔥

दैनंदिन आयुष्यात असे काही प्रसंग घडत असतात जर आपण त्यांच्याकडे डोळसपणे पाहिलं आणि त्याचा योग्य अभ्यास केला तर ते नक्कीच आयुष्याला कलाटणी देणारे असतात🔥जीवनात तुम्ही कोणतेही कार्य किती प्रामाणिकपणे अनेक अडचणींचा,विरोधकांचा(जळणाऱ्यंचा)सामना करत ते कसे पूर्ण करता हे महत्त्वच आहे💪
तुम्ही जशी प्रगती करत पुढे जाणार तसे तुमच्यावर जळणाऱ्या लोकांची संख्याही वाढत जाते मग ते क्षेत्र कोणतेही असो शिक्षणही तुमच्या कामावर/अभ्यासावर शंका घेतली जाईल,तुम्हाला शिव्या दिल्या जातील,नातेवाईक/लोक टोमणे मारतील,समाजातून खाली खेचण्याचा प्रयत्न केला जाईल,मग अश्या गोष्टींना तुम्ही प्रतिउत्तर कसे देता आणि आपलं अस्तित्व परत कसं सिद्ध करता तेही स्वतःच्या जबाबरीवर💪अनेक आरोपांना तुम्ही एक शब्द न बोलता आपल्या कामातून ते कसं करून दाखवायचं हे कालच्या निकालातून शिकायला भेटते.🔥
"कर्तृत्व अस बनाव्यायच की जेव्हा तुम्ही bounce back करणार तेव्हा तुम्ही तर येणारच परंतु येते वेळेस अखी टीम घेवून येणार"🔥💪
.....🦋🌺🙏....
शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
प्रतिक्रिया कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

24 Nov, 10:20


नाती

क्षणांत खोटी बोलतात आपली माणसं
सारीच फसवणारी निघतात आपली माणसं
कोणावर ठेवावा विश्वास इथे
घात आघात करतात आपली माणसं

दुष्मनाच्या ही डोळ्यांत येते पाणी
दुःखात हसणारी असतात आपली माणसं
कुणा म्हणावे आपलेसे या क्षणाला
सारीच परकी निघतात आपली माणसं

सावुली स्वःताची येते माघारी परत
पाठीत खंजिर खुपसतात आपली माणसं
प्रेम शोधावे कुना मध्ये या दिवसाला आता
धोकेबाज आहेत सारीच आपली माणसं

विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

22 Nov, 11:12


स्वतःशी प्रामाणिक असलेली व्यक्ती दुसऱ्याला दुःखं देण्याचा विचार पण करू शकत नाही कारण त्याला चांगल्या पद्धतीने माहिती असतं की आपल्या माणसांकडून कडून मिळालेलं दुःखांची मनाला झालेली जखम एवढी कोरून जाते ती कधीच भरल्या जात नाही म्हणून प्रत्येकाशी आपुलकीणे वागा शेवटी आपण सोबत काही नेणार नाही आहो क्षुल्लक कारणावरून आयुष्यभरापासून जपलेली नाती सोडू नका माणसाचं जीवन पण एक पाण्याचा बुडबुडा आहे कधी पुठणार सांगता पण येणार नाही ना!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

22 Nov, 03:01


रोज मजुरीच्या वाटेवर केला
आज दुःख यातनांनी जश्नं
गरिबीमुळेच मिळाला मला
अनमोल हा महाराष्ट्र रत्नं

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

21 Nov, 17:40


नक्कीच👍मनापासून धन्यवाद ताई🙏❤️ 

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

21 Nov, 15:28


जीवन कसे जगावे याचं शुद्ध उदाहरण म्हणजे ओम शेळके दादा,
जीवनात मी अनेक व्यक्ती अनुभवले, बघितले, त्यात मी सुध्दा येते कि आपण आपल्या आयुष्यातील दुःख ना कंटाळून देवाला दोशी ठरवत असतो स्वतःला कमी लेखत असतो आणि प्रत्येकावर चीड चीड करत असतो, पण ओम दादांच्या आयुष्यातून आपण बरच काही शिकले पाहिजे,

परिस्थिती कशी पण असो माणसाची स्वतः मध्ये आनंद आणि आपल्या चांगल्या लोकांमधे आनंद शोधता आले पाहिजे.

ओम दादा येवढ्या दुःखातून तूम्ही सुख कस अनुभवायचं हे जगासमोर शिकवून जाताय.

असेच शुद्ध आणि सुखी विचार आमच्या पर्यंत पोहचवत रहावे 🙏👍

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

21 Nov, 15:22


प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न नेहमी येतोचं तो म्हणजे एवढ दुःखं माझ्याच वाट्याला का येत तो येणं स्वाभाविक आहे कारण जीवन म्हटलं सुखदुःखं हे आलंच हे वास्तविक सत्य कोणीच नाकारू शकतं नाही हा नियम सर्वांनाचं लागू होत असेल जी परिस्थिती आपल्या पुढे निर्माण झाली आहे तिचा स्वीकार करून आनंदाने जगायला काय हरकत आहे उलट त्या गोष्टींचा त्रास आपल्यालाच कमी होतो हे मी स्वतःलाचं अनुभवत आहे !,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

21 Nov, 12:14


संध्याकाळ

तग धरून राहते बिन चेहऱ्यांची उदाशी
कसी तक्रार करवी मी ह्या नशिबाशी
यातनांचा वेदनांचा असतो दारांत जश्न
रोज जंन्म घेतो नव्याने पोटापाण्याचा प्रश्न

विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

21 Nov, 10:53


काही लोक म्हणतात खरं प्रेम वगैरे काहीच नसतं तर ते स्वार्थापोटी झालेलं एक आकर्षण असतं पण मला वाटतं प्रेम ही निःस्वार्थ भावना आहे ती तितक्याच शुद्धतेने जपल्या गेली पाहिजे कारण ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येणार की नाही हे परिस्थितीवर अलंबून असलं तरी मात्र एकतर्फी प्रेम आपल्यासाठी नेहमीच अमर असते ना राव❤️!,,✍🏻

कमन#लेखक
 
@Ommshelke

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

20 Nov, 23:45


आयुष्यात आलेले वाईट प्रसंग वाईट वेळ फक्त अनुभव म्हणून जरी मान्य करता आली तर तुम्ही जीवनाच्या प्रगतीकडे एक पाऊल पुढे टाकले आहे समजा❤‍🔥कारण आहे ती परस्थिती स्विकारायलाही खूप मोठं धाडस लागत..💯🔥💪🏻
........🦋🌺🙏........
शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

20 Nov, 23:45


काहींना काल कोणता विशेष दिवस आहे का विचारल्यास जाणवले की हे सुध्दा माहित नव्हते की पुरुषदीन पण असतो आणि तो 19 nov रोजी साजरा केला जातो आणि काहींना तर माहिती होऊनही आपल्या घरातील,संपर्कातील पुरुषांना साधे wish करायलाही वेळ भेटला नसावा🙁किंवा कमीपणाचं वाटलं असावं😔 ज्याप्रमणे महिला दिनाचे हजारो स्टेटस,wishes दिसतात तसे काल का मग हजारो जाऊदे निदान त्याचा अर्धेतर wishes, status दिसले का नाहीत?🥺त्यांच्यावर असणार लिखाणही,status का शेअर केले जात नाहीत?मग पुरुषप्रधान संस्कृती नावापुरतीच का?🙁असो कारण ईथे पुरुषाला कर्तुव्व आणि जबाबदारी ह्या सीमेपलीकडील पुरुष समजून घेणं एवढं सोपं नाही🙁.एका दोघांमुळेl प्रत्येक पुरुषाकडे संशयाने पाहण्याची पद्धत अयोग्य आहे,तो तर नेहमी सर्वांसाठी असतो पण त्याच्यासाठी कोणी नसतं हे खरं आहे😔समाज पुरुषांकडून नेहमी ताकदवान,यशस्वी व निर्णयक्षमची अपेक्षा करतो मग त्याच्या वेदनांनाभावनांना का कोणी पाहत नाही?
........🦋🌺🙏........
शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

20 Nov, 04:11


मनाला लागली कविता👌💯

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

19 Nov, 18:28


लोक सच बोला करते हैं
दुनिया में कोई झूठी कसमा
खा मर नहीं जाता प्यारे

और तू हस हस कर जहर खा के
मरने की बातें किया करते हो

प्यारे कभी बिना बातें किये
जहर खा कर हमे मर के
दिखाओ रे प्यारे

✍️विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

19 Nov, 11:34


"त्याचं अस्तित्व कुणाला कसं कळलंच नाही?"
( एकदा पूर्ण वाचून पहा,तुमच्याही मनाला कुठेतरी खरं वाटेल🙏)

आपण सर्वांनी "श्यामची आई" ह्या पुस्तकाचे नाव तर एकलेच असेल मग त्या पुस्तकासारखं एखादं बाबा,भाऊ,मुलगा ह्यांच्यावर लिहलेले पुस्तक कधी तुम्ही पाहिलंय का?कसं भेटेल कारण पुरुषांवर कधी कोणी काही बोलल,लिहिलेच जात नाही😳इतरांच काय तुम्ही तुमच्या घरातील पुरुषांवर बाबा,मुलगा,काका,भाऊ,मित्र ह्यंच्यबदल लिहून पहा जास्त दोन चार ओळी पलीकडे लीहताच येणार नाही कारण त्यांच्या भावनांना,दुःखांना समजुन घ्यायला आपण कधी त्यांचं जबाबदारीच पांघरून उघडुन पाहतो का😔?छ.शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजाऊमातेंचे नाव आपल्या मुखावर येते तसे स्वराज्यसंकल्पक शहाजीराजांचे नाव लवकर लक्षात का येत नाही?श्रीकृष्णांना जन्म दिलेल्या देवकी मातेचे वर्णन केले जाते परंतु भर पावसात डोकंभर यमुना नदीच्या पाण्यातून सुखरूप आपल्या मुलाला पोहचविणारे वसुदेव आपल्या लक्षात येत नाही😔
एक पुरुष,मुलगा म्हणून त्यांचाकड फक्त वंशाचा दिवा म्हणून पाहिलं जात आणि तो जीवनभर जबाबदारीच्या ओझ्याखाली चालत असतो आपण कधी त्याच्या भावना,दुःख समजून घेतो का?सहज आपण त्यांची कधी विचारपूस करतो का😞ज्याप्रमाणे महिला दिवस 8 मार्चला असतो तसा पुरुष दिन कधी असतो बघा बर 90 टक्के लोकांना माहीतच नाही?स्त्रिंयासाठी रक्षाबंधन,भाहुबिज अशा सणांना भावाकडून भेटवस्तू घेतो पण पुरुषांचा वाढदिवस वगळता त्याला कधी आपण भेटवस्तू देतो का?😔भेटवस्तूच बाजूला सोडा त्याची कधी साधी मित्र,भाऊ म्हणून विचारपूस करतो का,त्याला समजून घेतो का😒?आपण मनमोकळेपणे पुरुष दिनाच्या शुभेच्छा तरी त्यांना देतो का😔?मग आपण पुरुषप्रधान संस्कृती म्हणतो ती फक्त नावापुरतीच का?शंभरात दोन तीन पुरुष महिलांशी चुकीचे वागले,वाईट कृत्य केले म्हणून सगळे पुरुष तसे नसतात🙅‍♂कारण स्त्रियांचा आदर करणारे शिवाजी महाराज हेही पुरुष होते आणि तसे आजही अनेक पुरुष आहेत मग अश्या पुरुषांचे दुःख,वेदना आपण कधी समजून घेणार आहोत?😢तोही एक जीव आहे त्यालाही रडणं येते,त्यालाही दुःख असतं परंतु तो जबाबदारीमुळे सर्वंसमोर रडत नाही, एकाट्यात रडतो😞मान्य आहे स्त्रीचं जिवन अवघड आहे परंतु एका पुरुषाचं जीवन हे एका पुरुषालाच समजू शकत कारण खूप सार दुःख सहन करून एका स्मितहास्यामाघे तो सगळं लपवनारा पुरुष असतो😢कधी वेळ आली तर एका पुरुषाला मित्र,भाऊ,मुलगा समजून त्यांचं दुःख,वेदना अस्तित्व मान्य करून त्याला  आधार द्या,तो प्रत्येकासाठी आहेच की मग कधीतरी त्याच्यासाठी जगून पहा,नक्की त्याला बर वाटेल..☺️नकळत कुणाच्या भावना दुःखवल्या असतील तर माफी असावी🙏
........🦋🌺🙏........
शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

19 Nov, 08:15


*आयुष्यात आलेले वाईट प्रसंग व वाईट वेळ फक्त अनुभव म्हणून जरी मान्य करता आली तर तुम्ही जीवनाच्या प्रगतीकडे एक पाऊल पुढे टाकले आहे समजा❤‍🔥कारण आहे ती परस्थिती स्विकारायलाही खूप मोठं धाडस लागत* 💯🔥💪🏻
........🦋🌺🙏........
शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

18 Nov, 06:55


वीरक्ती
हरवले जरी काही
खेद त्याचा नसावा
सापडले नवे दुसरे
खेद त्याने पुसावा 1
हरवली वस्तू
जरी महागडी
होईल का? मग जगबुडी
गेली मग जाऊ द्या की
का? जळता व्यर्थ कुडी 2
हरवणे अन गवसणे
नित्य चाले निरंतर
नित्य जाती अन येती
जशी रजनी अन वासर 3
गेली वस्तू आपल्या हातून
वीरक्तीचा भाव यावा
आउट हात देहामध्ये
आसक्तीचा ठाव नसावा.4
शब्दांकन शेवाळे दीप्ती गोपाळ

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

17 Nov, 23:57


जोपर्यंत हातावरील भविष्य सांगणाऱ्या रेघांना, कष्टामुळे होणाऱ्या भेगांची झळ लागत नाही आणि पोटातल्या आतड्यांना भुकेमुळे होणारी कळ लागत नाही🥺व इतरांचे दुःख बघूनही स्वतःला हळहळ होत नाही🙁 तोपर्यंत आयुष्याच्या खऱ्या संघर्षाचा अर्थ समजतच नाही..🔥🙏🏻
...........🦋🌺🙏...........
लेखन✍️-B.S Kendre(Stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

17 Nov, 23:57


इतरांसारखा तूपण नकोस बनू युवानेता🙅‍♂
मिळेल काय तुला जरी आली कुणाचीही सत्ता?
एका मतासाठी दिल्या जातात येथे हजारोच्या नोटा🤷
सत्तेसाठी हा चालत राहतो नेहमी खेळ खोटा.

कुठपर्यंत युवनेता म्हणून उचलणार तू संतरज्या?
तू मोठा झालास तेव्हाच असेल खरी मज्जा❤‍🔥
तूच आहेस एकमेव तुझ्या घरासाठी राजा🥰
का करायाचा इतरांच्या सत्तेसाठी गाजावाजा?

कलम १९ नुसार गहाण नको ठेवू मतदान स्वातंत्र्यचा अधिकार🙋
मतदानाचा हक्क गाजवून निवडायला हवं योग्य सरका
🙏🏻
स्वतःवर ठेव विश्वास,मानू नकोस आता तू हार
शिक्षणाची संधी सोडून आयुष्याचा नको करू अंधार

........🦋🌺🙏........
शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

16 Nov, 13:36


Follow my Insta Id: https://www.instagram.com/ravan_ashucp/profilecard/?igsh=cTY0am1zbndyNnNp

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

16 Nov, 13:36


Follow my Insta Id: https://www.instagram.com/ravan_ashucp/profilecard/?igsh=cTY0am1zbndyNnNp

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

16 Nov, 12:27


फुलपाखरू
"फुलपाखराला कोषातुन बाहेर पडण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो.. जेव्हा ते फुल पाखरू कोष फाडून बाहेर येते ना. तेव्हा त्या फुल पाखराचे बळकट झालेले असतात. माणसाने सुद्धा या फुल पाखरा सारखं दुःखाचा कोष फाडून आनंदी जीवन जगायला हवं."!
शब्दांकन शेवाळे दीप्ती गोपाळ
चित्र रेखाटन शेवाळे दीप्ती गोपाळ

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

15 Nov, 11:39


प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न नेहमी येतोचं तो म्हणजे एवढ दुःखं माझ्याच वाट्याला का येत तो येणं स्वाभाविक आहे कारण जीवन म्हटलं सुखदुःखं हे आलंच हे वास्तविक सत्य कोणीच नाकारू शकतं नाही हा नियम सर्वांनाचं लागू होत असेल जी परिस्थिती आपल्या पुढे निर्माण झाली आहे तिचा स्वीकार करून आनंदाने जगायला काय हरकत आहे उलट त्या गोष्टींचा त्रास आपल्यालाच कमी होतो हे मी स्वतःलाचं अनुभवत आहे !,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

15 Nov, 06:32


🍁नभिच्या चांदण राती
     सखे तुझी आठवण येते गं..
     माझ्या कवितेच्या ओठांनी 🍃
      तुला शब्दात गातो गं...

शब्दांत तुला गातांना
     मन व्याकूळ होत आहे
💓 या नभिच्या चांदण राती
      तुला शब्दात गातो गं...

❤️ तुझ्या प्रेमळ आठवणींनी
      ओंजळ अपूरी माझी
💞 तरी सखे तुला मी
      माझ्या शब्दात वाहतो गं
.🥰


✍️ ❚█══अभिषेक जाधव ══█❚

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

14 Nov, 17:35


चित्र रेखाटन शेवाळे दीप्ती गोपाळ

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

14 Nov, 17:32


झेलले ते लाखो घनाचे ते घाव
नाही केले दाखविले कधी
तया वरील घाव
केले वेळेचं जतन
त्या पिढ्यान् पिढ्यांचे
नाही केली तक्रार कधी
सोसले ते लाखो घनाचे घाव
#शाळेची घंटा
@Writer_sonya

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

14 Nov, 13:35


भारतीयांचा परदेशी शिक्षण,व्यसायाकडे कल वाढतोय का??(स्वदेशासाठी🇮🇳फक्त पूर्ण वाचू नका त्यावर विचार करा,तेव्हा खरा सार्थ समजेल,सर्व बाजू विचारात घेवून स्वमत मांडले आहे)

एकेकाळी आपल्या देशास सोने की चिडिया असणारा देश संबोधतले जायचे कारण ह्या पवित्र देशात सर्व गोष्टींची भरभराट होती मग ती शिक्षणाची असो की व्यवसायाची.आपलं प्राचीन ज्ञान मानवी जीवनासाठी किती उपयोगाचे आहे हे फक्त चार वेदांचा अभ्यास केला तरीही समजते.आर्यभट्ट,चाणक्य,स्वामी विवेकानंद ह्यांच्यासारखे थोर अभ्यासक येथे होऊन गेले आणि त्यांनीच भारतीय ज्ञानाचा पाया ह्या मातीत पेरला व त्या विचारातूनच देशात आमूलाग्र बदल,चळवळी घडल्या.नालंदा,तक्षशिला ही प्रसिद्ध विद्यापीठे होती,जिथे जगभरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत अशी ही अभिमानास्पद शिक्षणपद्धती पुढे चालत राहिली.
   परंतु आताची परिस्थिती आणि लोकमत सांगण्यास दुःख होते की,बहुतांश भारतीय लोक/विद्यार्थी ह्यांना विदेशी शिक्षण/व्यवसाय सोयीस्कर वाटतोय कारण विदेशात अनेक संधी,कमी पैशात शिक्षण,रोजगार मिळेल असा त्यांचा समज असतो.आपण विदेशात जाऊन शिक्षण घेतो इथपर्यंत ठीक आहे परंतु स्वभुमित येऊन त्याच शिक्षणाच्या उपयोग येथील समाजासाठी करतो का?ह्यांचे उत्तर बहुतांश नाही असे असेल अपवादही असतील काही परंतु जेव्हा शिक्षणासाठी,व्यवसायासाठी विदेशात जातो तेव्हा विदेशी लोक,कंपन्या आपल्याला अश्या ऑफर्स दाखवतात की  तिथलेच कायमस्वरुपी रहिवाशी होते आणि एक स्वदेशी माणूस आपले कष्ट,बुध्दिमत्ता विदेशाच्या प्रगतीसाठी फक्त काही पैशाच्या मोबदल्यासाठी गहाण ठेवतो.पैसे भेटतात परंतु प्रगती विदेशची होते.ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की आपण सुंदर अश्या भारतराष्ट्रास,इथील परिवरास विसरतो.
  हेच सगळे व्यवसायिक स्वदेशात जे विदेशात काम करणार आहोत तेच केलं तर देशाची किती प्रगती होईल आणि ज्या काही अडचणी असतील त्या एकमेकांमध्ये सोडवल्या जातील,परंतु त्यासाठी स्वदेशात एकत्र काम करण्याची मानसिकता तयार केली पाहिजे त्याशिवाय राष्ट्रउन्नत्ती होणे कठीण आहे.ज्या राष्ट्राने,स्वराज्याच्या कुशीत वाढलो इथिल अन्न खाऊन मोठे झालो,मग ह्या देशात काम करायला कसली लाज?व्यवसायाच्या संधी कदाचित नसतील तर आपण त्याचे क्षेत्र आणि ठिकाण बदलू शकतो. कदाचित थोडे पैसे कमी मिळतील परंतु समाधान तर नक्की मिळू शकते ना.इतर देशातलं वातावरण , संस्कृती,भोजन आणि हवमान आपल्याला पचल का आणि मूळ प्रश्न येतो सुरक्षेचा आणि युक्रेनरशिया युध्याच्या काळात कितीतरी लोक स्वदेशात परतले हे तर जगाने पाहिलच आहे.शिक्षण विदेशात झाल परंतु त्याचा उपयोग स्वदेशत होवा.विदेशी शिक्षण,नोकरी विरोध नाही परंतु प्रत्येक गोष्टीस नाण्याप्रमाने असणाऱ्या दोन्हीही बाजू पडताळणे गरजेचे आहे,शेवटी निर्णय हा व्यक्तिकच असतो......🦋🌺🙏.....शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

14 Nov, 11:35


'मताची किंमत'.. हा माझा महत्वपूर्ण लेख या वर्तमान पत्रामध्ये प्रकाशित झाला नक्की वाचा..
✒️❤️

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

14 Nov, 10:19


https://youtube.com/shorts/_l7ftIbfNwg?si=6sKcggAqu4R5J5gm

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

14 Nov, 08:39


काही माणसांसोबत तुम्ही किती ही चांगल वागण्याचा प्रयत्न करा. तरीही ते माणसं तुम्हाला दुःख दिल्या शिवाय राहणार नाही. भाव वाणी विचार अन कृती या चार गोष्टी वरून एखाद्या माणसाचं स्वभाव वैशिष्ट्य कसं आहे हे ओळखता येत. कुणी कुणाचं नसतं एखादी व्यक्ती त्याच्या स्वार्था साठी त्या संबंधित व्यक्ती सोबत त्याच असणार कोणतीही नातं विसरून जातो.
चित्र रेखाटन शेवाळे दीप्ती गोपाळ
शब्दांकन शेवाळे दीप्ती गोपाळ

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

13 Nov, 12:22


आयुभरासाठी माझी प्रिय,राणी, एक मैत्रीण म्हणून साथ मला देशील ना।।जीवनरुपी प्रवासाच्या प्रत्येक वळणावर येऊन मला भेटशील ना।।माझ्या संकटाच्या रात्री मनाला आधार देणारा संवाद तू माझ्याशी साधणशील ना।।मला माहिती आहे ग,या जन्मात आपण एक नाही होऊ शकतं पण मात्र पुढील जन्मात माझी जीवनसाथी बनून येशील का?!,,,✍🏻

. . .I like you.. Dk. . .♥️🦋
चित्र रेखाटन शेवाळे दीप्ती. गोपाळ

एकमन#लेखक

 
@Ommshelke

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

13 Nov, 09:31


काय चुकते कळते सर्व..💔
( वळत कसे नाही.. )
12/11/2024


माणूस हवेत जातो कसा,
का राहत नाही नात्यात भरवसा..
हळव्या मनाला लागते
जेव्हा चाहुल प्रेमाची,
तरीही नाती का
बदलत असतील हक्काची..
टोचते, बोचते मनी
घाव विरहाचे,
सोबत असतानाही का दिसत नाही
प्रेम पाऊल आपुलकीचे..
एवढंही का बदलावं
माणसाने आपल्याच नात्यात,
का तोडावा विश्वास आणि
घालावा कसा काळजावर घाव..
मिळवुन मिळणार तरी काय असते
माणसाला असे करुन,
मरते ते अमोल नाते
स्वप्ने जातात जळुन..
उरुन काय उरते हातात
मग राख होती ती भावनांची,
अनुभव कोरला जातो काळजावर
उरते कहाणी ती जीवनाची..
शेवटी अनुभव कोरला जातो काळजावर
अन् उरते कहाणी ती जीवनाची..
❤️‍🔥

लेखक - अमोल मोरे..✍🏻
@AmolmoreAm

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

13 Nov, 03:41


ह.भ.प.संत नारायण बाबा पुण्यतिथी सोहळा १३ नोव्हेंबर

आपण ज्या देवाकडे प्रार्थणा करतो आणि सुख समृद्धी यश मागतो त्या देवाला कधी विसरू नये देवाची कृपादृष्टी सर्वत्र असते

💐💐👏👏

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

12 Nov, 12:09


जीवनाची खरी परिक्षा..
11/11/2024

नात्यामध्ये महत्त्वाचा असतो तो विश्वास
जसा जगण्यासाठी महत्वाचा असतो तो श्वास..
नसते काही मोठे मागणे कोणाचे,
असते हवी ती आयुष्यभर साथ..
तरीही का बदलतात लोकं नात्यामध्ये,
का मिळत नाही प्रत्येकाला प्रेमात काठ..
का झुरणं हे शेवटपर्यंत राहतं,
जर माहीत आहे कधी ना कधी मरणं..
प्रत्येकजन जर जर बदलणारच आहे वेळोवेळी,
तरीही का त्याच्यासाठीच जगणं..
जिंदगी ही अमोल आहे,
कधी कळेल त्याचे मोल..
मृत्युलोकी हे जग सारे,
रहस्य जन्म मृत्यू सखोल..

लेखक - अमोल मोरे..✍🏻
@AmolmoreAm

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

10 Nov, 04:26


तो आला नव्हता त्याला आणला होता, तो मेला नव्हता त्याला मारला होता..!!
शिवरायांनी अन्यायी प्रवृत्तीचा अंत केला होता.. .!!
युक्तीच्या जोरावर शक्तीच्या बळावर आत्मविश्वासाचा प्रमाणावर 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजलखान नांवाचा राक्षसाचं उभा फाडला होता.. .!!
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

सर्वाना शिवप्रताप दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा🚩🙏🏻


@Ommshelke

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

09 Nov, 18:08


संयम..💯🔜🔝✌️🏻
09/11/2024

पर्याय हाच
शेवटचा पर्याय बनण्याची ताकद
ठेवत असतो..,
फक्त संयम आणि
स्वतःचा चांगुलपणा हा कधीच
विसरायचा नसतो..
वेळ ही प्रत्येकाची येते,
फक्त फरक एवढाच की ती
वेळेवरच येते..
म्हणुस स्वतःवर विश्वास ठेवा
वेळ नक्की बदलते..😍🙏🏻


लेखक - अमोल मोरे..✍🏻
@AmolmoreAm

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

09 Nov, 18:02


आयुष्यात बाप नावाची ढाल जर पाठीशी असेल तर पाठीमागून येणार्याच नाही तर समोरून येणाऱ्या संकटांची सुध्दा भिती वाटत नाही

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

09 Nov, 06:50


#मी तुजी बहीण तू माझा भाऊ❤️.. सर्वात best नातं आपलं..नको कसला राग.....नको कसला स्वार्थ.....नको जराही राग.... असू दे नेहमीच प्रेमाचीच बात😍..असो थोडासा राग..असो तुजा धाक मला....प्रेमाच्या बंधनातं ह्या कधी सोडू नकोस माझी साथ🫂..दुःख सारे तुझे माझ्या वाटयाला येऊ दे ... तुज आयुष्य सारे आनंदात जाऊ दे😊... तुजी माझ्यावर माया, तुज प्रेम, तुजी काळजी, तुज हसवन,तुज रडवणं,तुज मला थोडवंस चिडवन असच दृढ राहू दे ना रे माझ्या भावा❤️🫶... तू माझा भाऊ आणि मी तुजी बहीण हे कायम नातं जीवनभर असू दे... दोघ मिळून आपण आपल्या या प्रेमाचं नातं अतूट ठेऊ🥰... कायम माझा आशीर्वाद तुज्या सोबत असेन तुजा ही मला असू देत..... ❤️❤️ 𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐤✍️🌺❤️

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

09 Nov, 06:07


🦋 आयुष्य एक परिक्षा..💯👍🏻
08/11/2024

आयुष्य हे खुप छोटं असतं,
मोठं असतं ते प्रत्येकाचं ह्रदय..
कारण ते सहज कोणाला ही माफ करुन टाकण्याची ताकद ठेवत असतं
मग समोरच्याचा गुन्हा हा कितीही मोठा असो
आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे
समोरच्याला माफ करायचे का नाही..
पण एक नक्की सांगतो..,

अनुभव हाच सर्वात मोठा गुरू आहे
आणि मग तो अनुभव वाईट असो वा चांगला
म्हणून आपण फक्त अनुभव घेतला पाहिजे
आणि हे आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण हे आयुष्य पुन्हा नाही..
म्हणून प्रत्येकाला माफ करत चला अगदी स्वतः लाही शेवटी कोणत्याही गोष्टीचं ओझं हे शेवटी ओझच असतं आणि ते ओझं मुक्त केलं ना तरच मनाला खुप चांगली शांतता लाभते..
एकदा नक्की Try करून पहा..
Life Is A Experiment, That's It..😊💐👍🏻

लेखक - अमोल मोरे..✍🏻

@AmolmoreAm

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

08 Nov, 16:28


🦋 आयुष्य एक परिक्षा..💯👍🏻
08/11/2024

आयुष्य हे खुप छोटं असतं,
मोठं असतं ते प्रत्येकाचं ह्रदय..
कारण ते सहज कोणाला ही माफ करुन टाकण्याची ताकद ठेवत असतं
मग समोरच्याचा गुन्हा हा कितीही मोठा असो
आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे
समोरच्याला माफ करायचे का नाही..
पण एक नक्की सांगतो..,

अनुभव हाच सर्वात मोठा गुरू आहे
आणि मग तो अनुभव वाईट असो वा चांगला
म्हणून आपण फक्त अनुभव घेतला पाहिजे
आणि हे आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण हे आयुष्य पुन्हा नाही..
म्हणून प्रत्येकाला माफ करत चला अगदी स्वतः लाही शेवटी कोणत्याही गोष्टीचं ओझं हे शेवटी ओझच असतं आणि ते ओझं मुक्त केलं ना तरच मनाला खुप चांगली शांतता लाभते..
एकदा नक्की Try करून पहा..
Life Is A Experiment, That's It..😊💐👍🏻

लेखक - अमोल मोरे..✍🏻

@AmolmoreAm

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

08 Nov, 05:30


आयुष्य
उद्या मी गेली की तुम्ही नक्की म्हणाल, आयुष्यानं भरभरून दिलंय मला... खरंय
आंदन म्हणून मिळालेल्या वेदना त्यांची गाणी केली मी, असे कितीतरी क्षण... आसूंचे हसू झाले., म्हणजे केले मुद्दाम... खूप दूरच्या वाटा दिल्या आयुष्याने चालतांना कधी दाट फुल, कधी दाट हिरवळ, बऱ्याचदा... निर्गध पानगळ... कधी मखमल... कधी चिक्कार दलदल... तरीही जीवनाचं गाणं बनवल...???!!!  म्हणजे योग्य सूर मैफिल जमवली... वाट नं
चुकता चालणं सहज करीत गेले. कारण मी
"स्त्री "न  प्रत्येक स्त्री मला आयुष्यानं भरभरून दिलंय असं म्हणत राहते. प्रत्येक्षात तीच्या वाट्याला अनेक जीवघेणी आंदोलन असतात हेच खर
शब्दांकन शेवाळे दीप्ती गोपाळ
शुभ सकाळ

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

07 Nov, 11:14


"आजकालची नाती का टिकतं नाही?" हा माझा महत्वपूर्ण लेख आज या वर्तमान पत्रामध्ये प्रकाशित झाला..
नक्की वाचा..

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

07 Nov, 06:43


https://youtu.be/mAyHlvzQE3g

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

07 Nov, 04:00


https://youtube.com/shorts/S56jXmZqyiY?si=ATQ58ArLnQG3xOui

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

07 Nov, 01:08


प्रयत्नं हेचं परिस आहे ..!

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

07 Nov, 01:01


☀️ "तूझ्या आठवणी" ☀️ ✍️
━━━━━━━━━━━━━━━━

वाटतं कधीतरी त्या एकट्या मनाला साथ हवी कुणाचीतरी...
त्यां रडणाऱ्या डोळ्यांना ही सोबत हवी कुणाचीतरी...

पहाटेच्या स्वप्नाना पण बळ मिळू दे ...
हरवलेल्या आठवणींना पण पंख मिळू दे...

गुंतलेल्या आयुष्यात सोबत मिळू दे...
स्वनातील घरांना एकदातरी मायेचा ओलावा मिळू दे...

घराच्या अबोल भिंतीतील आठवणींना कधीतरी साद घालू दे...
तिच्या आठवणीत कधीतरी एकटेपणात बसून दाद मागू दे...


 🔹🔹🔹🦋⃟≛⃝"स्पर्श"🦋⃟≛⃝ﮩ٨ـﮩﮩ٨ـ❥🔸🔸🔸
  ...................🦋🌺😇💞🦋................
...

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

06 Nov, 12:01


आपल्या डोळ्यातील अश्रू प्रत्येकाला दिसतात हे मात्र खरं तर ते मनातील साठलेलं दुःखं शांतपणे बाहेर काढण्याचा एक मार्ग असतो ते ओळखणं सर्वांना जमतं नसतं म्हणून तर मनातीळ वेदना कमी करण्यासाठी कधी कधी एकांत हवा असतो कारण त्यांना समजून घ्यायला कोणीच तयार नसतं!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

06 Nov, 05:17


(वेळ काढून पूर्ण वाचा,विराट प्रेरणादायक संघर्षगाथा मांडली आहे)
आज यशाच्या उंच शिखरावर पोहचलेले अनेक व्यक्ती दिसतात.आजच success जगाला दिसतो,परंतु कालचा संघर्ष कुणाला दिसत नाही😔.हे जगाचा नियमच आहे जग तुमच फक्त output पाहत असतं,त्यासाठी तुम्ही सोसलेल्या वेदना,यातना नाहीत😒.यशस्वी होण्याचा प्रवास हा काट्यानिंच भरलेला असतो मग तो प्रवास अंबानींचा असो की विराटचा  जोपर्यंत संघर्षाच्या त्या वेदना आपल्याला जाणवत नाहीत तोपर्यंत स्वतःवर असणारा विश्वास आणि आपण स्वतः काय करू शकतो ह्याचा अंदाजही येत नाही👍म्हणून कोणतेही परस्थिती असो,आपल्याला चुकीचं समजणारी,टीका करणारी,टोमणे मारणाऱ्या व्यक्ती ह्याकडे जास्त लक्ष दिले नाही तरच कुठे काहितरी मिळेल.
  विराट कोहलीचाही संघर्ष हाही अतिशय कसोटीचा.वाईट दिवस पहिल्याशिवाय चांग्याल्या दिवसांची किंमत समजत नसते.अनुभव हाच मोठा गुरू आहे,आणि त्यातूनच शिकत विराट न डगमगता पुढे गेला म्हणूनच आजही विराटचे वेगवेगळे रेकॉर्डस् बनतात.2006 साली फक्त 18 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना त्याने खेळ सोडला नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याने शतकी धावा केल्या.त्याच्या हे देश,संघाप्रती असलेल्या समर्पणाने त्याचे किती मजबूत व्यक्तिमत्व आहे,हे दाखवले.स्वतचं फिटनेस जपण्यासाठी तो आजही आवडीचे पदार्थ खाणे टाळतो ह्यावरून त्याचा त्याग दिसतो. क्रिकेटच्या क्षेत्रात त्याने स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केली आहे.प्रत्येक वेदनादायक प्रवासाचा सुखदायक शेवट होतोच आणि त्याचे उदाहरण म्हणजे 👑 किंग कोहली..
.........🦋🌺🙏.........
शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

03 Nov, 12:04


https://youtube.com/shorts/pp9QPKw4gQU?si=e5PRpGgU9-5u7Grz

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

02 Nov, 23:46


"सुटका"
   लग्न पंधरा दिवसावर आले. दोन्ही घरच्यांची खरेदी जोरात चालू होती.
   सुधा तर खूप खुश होती. कारण ऐका पिढीजात श्रीमंत घराण्यात तिचे लग्न ठरले होते.
     घरी वडिलांची परिस्थिती बेताची. मध्यम वर्गीय. खूप गरिबी नाही आणि श्रीमंत नाही. खाऊन पिऊन सुखी.
    आपल्या लेकीसाठी काय करू नी काय नको असे तिच्या आईबाबांना वाटत होते.
     त्यांची बरोबरी तर करू शकत नाही. पण निदान त्यांच्या खालोखाल तरी.
      आज तर सुधा खूपच खुश होती. सासूबाईंनी सांगितले होते PNG ज्वेलर कडे जाऊन दागिने खरेदी करायचे आहे.  तुला आवडेल तसे. पन्नास तोळे पर्यंत काहीही घे.
  तिचा तिच्या कानावर विश्र्वासच बसत नव्हता. पन्नास तोळे...! म्हणजे अर्धा किलो सोने....!
बापरे बाप...!
स्वतःशीच म्हणाली, नाही नाही इतके सोने ना मला सांभाळता येणार. ना घालायला झेपणार !
नकोच !
त्यांना सांगु फक्त दोन बांगड्या, मंगळसूत्र आणि कानातले द्या. माझ्या आईने छोटे मंगळसूत्र केले रोज घालायला.
    विचार करतच सोनाराकडे पोहचली. सासरचे आधीच येऊन बसले होते. दोन्ही जावा, सासूबाई आणि तिचा होणारा नवरा सुशांत.
   सासूबाई आणि जाऊबाईंनी तर बरेच डिझाइन सिलेक्ट पण करून ठेवले होते.
     तिला गेल्यागेल्या सगळे दाखवले. जवळ जवळ साठ तोळे सोने होते.
    दागिने इतके देखणे होते की रीजेक्ट करूच शकत नव्हते.
    मनाचा हिय्या करून ती म्हणाली, आई इतके दागिने नको मला. त्यातले थोडे बाजूला काढून ती म्हणाली इतके बस...
   सासूबाई म्हणाल्या, अग वेडी आहेस का?
   या दोघींना त्यांच्या लग्नात इतकेच घेतले. हा.. थोडा डिझाइन चा फरक आहे. आणि आता सुध्दा त्यांनी त्यांच्या साठी एक एक नवीन दागिना घेतला.
     पण आई ....
आता पण नाही आणि बिन नाही.
  फक्त आवडले नसेल तर सांग.
नाही आई सगळेच छान आहे.
झाले तर मग.
     दागिने खरेदी करून लगेच साड्या घ्यायला गेले.
   सासूबाई आणि होणारा नवरा पुढे होते. दोन्ही जावा आणि ही मागे होत्या.
   मोठ्या जाऊबाई म्हणाल्या, सुधा एक गोष्ट विचारू. विचारा ना ताई!
सुशांत कसा वाटला ग तुला.
का?
असे का विचारता?
नाही ग!
तुला अख्खं आयुष्य त्याच्या बरोबर काढायचे आहे म्हणून विचारते.
   खूप चांगले आहेत.
मुख्य म्हणजे स्त्री चा आदर करणारे आहेत.
नक्की ना!
हो ताई!
मग तू नशीबवान बाई !
ताई काय झाले  ?
काही नाही!
नाही ताई काहीतर आहे जे तुम्हाला मला सांगायचे आहे.
पण सांगवत नाही.
नाही ग!
आमचा सुशांत आधी पासूनच स्त्रीचा आदर करतो.
  म्हणूनच तो हे घर सोडून लांब गेला नोकरी करायला.
  इतके पिढीजात श्रीमंत आहेत. इथेच काम केले तरी चालले असते.
   पण आपल्या घरात स्त्रीचा सन्मान होत नाही. कित्तेक वेळा यासाठी सर्वांसमोर बंड करून उठला. खूप भांडला .
पण, आपल्या घरच्या लोकांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही.  शेवटी गेला नोकरी शोधून. जातांना सांगून गेला, मी या घरात माझ्या बायकोला फक्त दोन दिवसाची पाहुनी म्हणून आणणार.
   तुमचे आचार आणि विचार याचा परिणाम माझ्या संसारावर नको.
   सुहास दादा, सुजय दादा तुम्ही तरी सुधारा. शिकलेले आहात.
पण बाबा आणि आमच्या दोघींचे नवरे यांच्यात काडीचा फरक पडला नाही.
   नेमके काय करतात ही लोक ताई !
काही नाही!
तु चल !
तो बघ सुशांत वळून वळून बघतो.
त्याला वाटत असेल माझ्या बायको सोबत मला जरा सुध्दा वेळ देऊ देत नाही या दोघी महामाया.
आमचा राग राग करत असेल.
     असे काही म्हणणार नाही तो. अग तू त्याला अरे तुरे म्हणते!
हो!
बाई तुझ काही खर नाही.
म्हणजे?
बाबा आणि हे दोघे भाऊ फाडून खातील तुला.
   मला खातील तेव्हा खातील. आधी तुम्ही सांगा.
तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे . स्त्री च्या आदरा बद्दल आणि या घरा बद्दल.
    तुला ते आल्यावर कळेलच.
अर्थात सुशांत घेऊन आला तर!
का नाही घेऊन येणार तो?
मी घेऊन येईल त्याला.
सुधा एक सांगायचे आहे, या घरात आमच्यावर अन्याय होतो आहे. फक्त तसाच अन्याय तुझ्यावर झाला तर गप्प बसू नकोस. कमवती आहेस. स्वतःच स्वतःचा भार उचलू शकते.
    मधल्या जाऊबाई बोलल्या. हो वेळीच बंड करून उठ. नाहीतर....!
ताई तुम्हाला नेमके काय सांगायचे आहे. मला काहीच कळत नाही.
   चला पटापट! सुशांत चा आवाज आला. पाठोपाठ सासूबाई पण बोलल्या. या ग लवकर. काय रमत गमत चालल्या.
  सुधा च्या डोक्यात सतत हेच विचार घोळत होते.
   आता कुणीच काही सांगणार नाही आणि सुशांत ला पण आताच याबद्दल विचारणे योग्य नाही. तूर्तास हा विषय इथेच संपवू.
   लग्न झाल्यावर बघू. जाऊबाई नक्की बोलतील.
नाहतर आपण बोलत करू.
     साड्यांची खरेदी झाली.
ती घरी गेली. डोक्यातून विचार जातच नव्हते.

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

02 Nov, 23:46


  ठीक आहे बाबा!
या घरची सून म्हणून मलाही कधीच वाटणार नाही माझ्या घरची इज्जत चव्हाट्यावर यावी.
झोपा तुम्ही!
येते मी!
    फोन हातात घेतला, हॅलो सुशांत मी बोलते. सुधा इतक्या रात्री फोन केला.
  सॉरी सुशांत , मी तुला न सांगता आपल्या घरी आले.
तीन महिने झाले. मी घरी व्हिडिओ कॉल करते. सारखे कोणाच्या कोणाच्या तरी अंगावर मारल्याच्या जखमा असतात.
    इथे आल्यावर प्रत्यक्ष डोळ्याने पाहिले. सगळे खूप भयानक आहे रे!
सूना, नातवंडं असून बाबा सुध्दा आईला मारायला कमी करत नाही. लाजिरवाणी गोष्ट आहे.
  म्हणूनच तू हे गाव सोडून बाहेरगावी नोकरी करायला गेलास ना!
हो!
मला हे सगळ नाही बघवत होत !
खूप प्रयत्न केला मी या लोकांचे मन परिवर्तन करायचा.
हे लोक म्हणजे गाढवा पुढे गीता वाचल्या सारखं
जाऊ दे!
तु कधी येते?
ते कधीच सुधारणार नाही.
दोन दिवसाने येते.
आता परिवर्तन झाले त्यांच्यात. यापुढे असे होणार नाही!
काय?
सगळ्यांची यातून सुटका केली.
    कशी ?
पोलीस आणि पत्रकारांचा धाक दाखवून.
     यापुढे आपले घर नेहमी हसत, खेळत आणि आनंदात दिसेल.
    ओह!
धन्यवाद मॅडम!
बंदा कायम आपल्या ऋणात राहील.
जे काम मी तीस वर्षात करू शकलो नाही ते तू तीन महिन्यात करून दाखवले.
दोन्ही वहिनी आणि आईंनी आज पहिल्यांदा सुटकेचा निःश्वास सोडला असेल.
    खूप खूप धन्यवाद बायको..
उद्या मी येतो.
तुझे आभार मानायला आणि
   न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगून सुटका झालेल्या कैद्यांचे स्वागत करायला.
खरच!
हो ! खरच येतोय!
त्यांच्या सोबत मलाही सुटकेचा निःश्वास टाकायचा आहे.
©️®️

  सौ. प्रभा कृष्णा निपाणे
               कल्याण.

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

02 Nov, 23:46


काय असेल या तीन पुरुषांचे विचार?
काय त्रास असेल या घरातील स्त्रियांना?
विचारात झोपी गेली.
थोड्याच दिवसात
    थाटात लग्न पार पडले. पूजा आटोपली, रिसेप्शन झाले. सुशांत म्हणाले, आम्ही हनिमून ला चाललो. तिकडूनच एक दिवस हिच्या माहेरी जाऊन नोकरीच्या गावी जावू.
     फोन करत राहू. आता अधेमधे येणे होणार नाही. डायरेक्ट दिवाळीला येऊ.
   निघतो आम्ही...
सुधा च्या डोक्यात पुन्हा चक्र सुरू होते.
   सर्वांच्या पाया पडली. मोठ्या जाऊबाई म्हणाल्या चल सुधा देवघरात देवाच्या पाया पडून घे.
    सुधा आणि दोघी जावा देवघरात आल्या. मोठ्या जाऊबाईन्नी कुंकू लावले. मग म्हणाल्या कधीतरी एकटी एखादी चक्कर मारशील का?
  सुशांत येणार नाही. पण तू ये. आधार वाटायला लागला तुझा.
    हो ताई, नक्की येते.
सुशांत आणि सुधा जायला निघाले.
   सुधा च्या डोक्यात एकच चक्र . काय प्रोब्लेम असेल या घरातील स्त्रियांचा. एकदा एकटे येऊन बघूच.
    रोज व्हिडिओ कॉल, फोन चालूच होते. एक दिवस तिच्या लक्षात आले. मोठ्या जाऊबाईंचा डोळा सुजला आहे.
तिने फोनवर विचारले सुध्दा. पण त्यांनी असेच थातुर मातुर कारण सांगून वेळ मारून नेली.
सुधा चे समाधान झाले नाही.
एक दिवस तर सासूबाईंच्या हातावर वळ होते.
ती खूप अस्वस्थ झाली. कुणीच काही बोलत नव्हते.
सुशांत सगळे माहिती असूनही गप्प होते.
आता लग्नाला तीन महिने होत आले होते.
  एक दिवस ती सुशांत ला म्हणाली आई बाबांची खूप आठवण येते.आठ दिवस जाऊन येऊ का?
    मी पण येतो, सोबत जाऊ दोन दिवसात परत येऊ.
नाही रे !
दोन दिवसाच्या भेटीने माझे पोट भरणार नाही. मी पुढे जाते. हवे तर तू मागून ये.
   Ok सरकार म्हणून त्याने तिला अनुमती दिली.
नेमके ती जायच्या दिवशी त्याची अर्जंट मीटिंग होती. त्यामुळे बस स्टॉप वर सोडायला आला नाही.
     तिने डायरेक्ट सासरची बस पकडली. सासरी येऊन पोहचली. एकटीच आली म्हणून दोन्ही जावा खूप खुश होत्या.
    दोन दिवस हसत खेळत गेले.
     एक दिवस रात्रीचे बारा वाजले असतील. सुजय दादाच्या खोलीतून मारल्याचा आणि रडल्याचा आवाज येत होता.
   नेमकी सुधा त्या वेळी पाणी घ्यायला म्हणून स्वयंपाक घरात जात होती.
   आवाज ऐकून ती दाराशी उभी राहिली. आतला कानोसा घेतला.
  दादा वहिनीला मारत होते. आणि वहिनी अहो नका मारू ना!
इतका कोणता मोठा गुन्हा केला ते तरी कळू द्या.
    आता सुधाला गप्प राहणे अशक्य झाले. तिने जोरजोरात दार वाजवले. वहिनी दार उघडा, दादा दार उघडा.
     मुलांनी कसे बसे दार उघडले. आणि दोघे एकमेकांना बिलकुल सुधा च्या मागे लपले.
     दादा काय झाले?
का मारताय असे ढोरा सारखे?
ये!
तू आमच्या मध्ये पडू नको!गपचूप तुझ्या रूम मध्ये जा!
मुलं म्हणाली, काकु आईला वाचावं. आईने काहीच केले नाही.
     रात्री झोपायला आले, आईला म्हणाले भाजी कोणी केली. आई म्हणाली मीच केली.
    तर खूप घाणेरड्या शिव्या दिल्या आणि मारायला सुरुवात केली.
   का तर म्हणे मीठ जास्त होत.
   तोवर सगळे सुजयच्या रूम बाहेर गोळा झाले होते.
  मोठ्या जाऊबाई मनोमन खुश झाल्या. निदान कोणीतरी जाब विचारला या नराधमांना.
     सुधा ने हातात मोबाईल घेतला. थांबा आता पोलिसांनाच फोन करते.
   गावातील प्रतिष्ठित लोक तुम्ही. लोकांना तर माहितीच नाही या प्रतिष्ठित घरात काय चालत ते?
शिवाय पत्रकार बोलवते. उद्या पेपरात ही बातमी यायलाच हवी.
    भाजीत मीठ जास्त पडले म्हणून, गावातील उच्चभु घरातील स्त्रीला मारहाण.
     आता मात्र सुजय ची टरकली. त्याला घाम फुटला.
    सुधा प्लीज असे काही करू नको. या गावात खूप मान आहे आम्हाला.
    दादा गावात मान असून काय उपयोग हो!
   घरातल्या स्त्रीचा सन्मान करता येत नाही. कोण म्हणत तुम्ही श्रीमंत आहात?
तुमच्या सारखे गरीब तुम्हीच.
   तुम्ही ,सुहास दादा इतकेच काय बाबा सुध्दा आपल्या बायकोवर हात उगारला कमी करत नाही. कारण अगदी शुल्लक.
    पंधरा दिवसांपूर्वी मी व्हिडिओ कॉल केला होता. आईच्या हातावर वळ होते.
   सूना घरात आल्या, नातवंडं झाली. तरीही तुम्ही असे वागता.
   लाज कशी वाटत नाही तुम्हाला. आता कळले सुशांत मला इथे का येऊ देत नाही ते. त्याला असे वागणे कधीही खपणार नाही.
     सुधा ने १०० नंबर डायल करायला घेतला.
   आता सासरे पुढे आले. सुधा चुकलो आम्ही. आम्हाला माफ कर. यापुढे या घरात कोणीही बायकोवर हात उगरणार नाही. मी खात्री देतो.
   आज पासून तुझ्या मनासारखे होईल.
म्हणजे कसे बाबा?
हे घर स्त्रीचा सन्मान करेल.
कोणीही हात उचलणार नाही. इतकंच काय, साधी शिवी सुध्दा देणार नाही.
   पोलीस, पत्रकार यांना बोलवू नकोस.आम्ही तुझ्यापुढे हात जोडतो.

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

02 Nov, 16:55


दिवाळी

कोण आले ईथे मुक्कामाला
जायचे तर प्रत्येकालाच आहे
बस कोणी करतो दिवाळी साजरी
तर कोणी आठवणीत जळतो आहे

दिवे जळतात राहतात रात्रभर
तसे मन ही जळत असते
दंग असते दुनिया आनंदोत्सवात
तर कुणाला,कुणाचे भास छळत राहते

दिवाळी येईल दिवाळी निघून जाईल
सगळेच वाट नव्या वर्षाची पाहतील
धुळ खात कोणी त्याचं रस्त्यावर थांबेल
निघून गेलेला मुसाफिर खरंच परतेल

विकास सुखधाने
युवा साहित्यिक लेखक
नांद्रा.ता.मेहकर जी.बुलडाणा

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

02 Nov, 11:58


https://youtube.com/shorts/pp9QPKw4gQU?si=AzAiHWfQsbiQmDOG

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

01 Nov, 12:05


https://youtube.com/shorts/L_I6xj9bI40?si=FhYAujLC13LnY1FJ

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

31 Oct, 07:59


कुठपर्यंत आपण मॉलमध्ये, ऑनलाईन खरेदी करणार..?कधीतरी ह्या गरिबांकडून खरेदी करून पहा नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर एक सुखद हास्य☺️ दिसेल,आणि त्या हास्यापेक्षा अमूल्य काहीच नसेल💯.गरज नसली तरीही अशा गरीब लोकांकडून खरेदी करा कारण ते पैसे मिळवण्यासाठी नाहीतर पोटासाठी संघर्ष करत असतात🙏🏻आपण आपल्या परिवाराचा, स्वतःचा विचार नेहमीच करतो चला तर ह्या दिवाळीनिम्मित एक संकल्प घेवूया.आपण इतरांचापण फक्त विचार करायला सुरुवात करूया कदाचित ज्यामुळे कुणाच्यातरी चेहऱ्यावर हास्य येईल..🙏🏻😇
.........🦋🌺🙏.........
शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

31 Oct, 07:37


#जगातील सुंदर मुली पार्क, सिनेमाघर, मॉल, रस्त्यावर फिरत दिसतं नसून, चुपचाप अभ्यासिके मध्ये पुस्तकं वाचताना दिसतं असतात.... आजचा आनंद सोडून त्या मुली पुढच्या चागल्या जीवनासाठी संघर्ष करत आहेत.. त्याना माहीत आहे आज जर study केली तर तीच जीवन सुखी होईल या मतलबी दुनियेत स्वतःच श्रीकृष्ण आणि स्वतः च अर्जुन बनावं लागतं.... स्वतःचा सारथी बनून जीवनाची लढाई जिकंवी लागते... सण अभयासू विध्यार्थीना आभास करू लावते कि विजयी होणाएवढं मोठा सण कोणताच नाही....सत्य, प्रामाणिकतेचा विजय नक्की होते वेळ लागेल पण जरूर होते...𝐤𝐞𝐞𝐩 𝐬𝐦𝐢𝐥𝐞 𝐧𝐝 𝐟𝐨𝐜𝐮𝐬 𝐲𝐨𝐮𝐫 𝐬𝐭𝐮𝐝𝐲 𝐚𝐥𝐥 𝐠𝐢𝐫𝐥𝐬🥰🙏 #𝐕𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐤✍️

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

31 Oct, 06:49


दिवाळी

लागतील महलात तेला ,तुपाचे दिवे
गोडधोड कुठे अनं आनंदाचे क्षण नवे
मग झोपडीतल्या अंधाराचे काय होईल
रस्त्यात पालावर उपवाशी कोण राहिलं

गेली खरडून, पावसांत जमिन सारी
मग शेतकऱ्यांच्या आसवांचे काय होईल
सुर पडतील काणी कुठे दिवाळी पहाटेचे
मग बळिराजाच्या आकांताचे काय होईल

किंमत येईल फटाक्यांच्या आवाजाला
मग शेतकऱ्यांच्या मालाचे काय होइल
भरेल बाजार दिवाळीच्या महागाईने
मग हातावरच्या मजुरांचे काय होईल

रोषणाई असेल गल्लो गल्लीत साऱ्या
मग सिमेवरच्या सैनिकाचे काय होइल
भाऊबीजेला ओवाळील बहिण भावाला
मग रस्त्यावरच्या अनाथ मुलिचे काय होईल

विकास सुखधाने
युवा साहित्यिक लेखक
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

30 Oct, 14:23


☀️ "धनत्रयोदशी" ☀️ ✍️
━━━━━━━━━━━━━━━━

सण आला दिवाळीचा घरोघरी,
लगबग झाली सुरु दारोदारी...

धनत्रयोदशीने सुरुवात झाली दिवाळीच्या सणाला...
कष्ट करण्या आयुष्य लावले सारे पणाला...

या सुंदर क्षणी कृपा व्हावी लक्ष्मीची,
धन - धान्यांची घरी व्हावी रास...

दिवस आहे आज खूप खास..
सदैव राहो लक्ष्मीचा तुमच्या घरी वास...

"धनत्रयोदशीच्या"!! सर्वांना खूप खूप शुभेच्छा... 🍁🍁

🔹🔹🔹🦋⃟≛⃝"स्पर्श"🦋⃟≛⃝ﮩ٨ـﮩﮩ٨ـ❥🔸🔸🔸
 .....................🦋🌺😇💞🦋................
.

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

30 Oct, 06:30


शांत रहाणं जीवनात किती महत्वाचे आहे☝️ एकदा एक हरण जगंलात फिरत होत तेव्हा त्याला अचानक सिह दिसला त्याला वाटू लागलं कि सिह आपला आता शिकार करेल मनून जंगलाचा आत जाणाचा प्रत्न करत होता..... तेव्हा जंगलाला पण आग लावली होती... तो दुसऱ्या रस्त्याला जाऊ लागला तर एक शिकारी झाडाच्या मागे लपला होता बंधूक घेऊन शिकार कारणासाठी आला होता... ते त्या हरणाला समजलं त्याला काहीच सुचत नव्हतं मागे बघितलं तर एक विहीर होती....तो कुठे ही गेला तरी त्याला मरणाची भीतीच होती... समोर गेला तर सिह होता...जंगलात गेला तर आग लागली होती... मागे गेला तर विहीर दिसतं होती... दुसऱ्या रस्त्याला शिकारी बसला होता... जिकडे तिकडे संकटच दिसतं होत.... तो त्या वेळेला कुठेच नाही गेला शांत मन करून ज्या जागी होता हरण तितेच थांबला थोडा वेळ स्तब्ध.राहिला त्याला समजलं कि काही वेळ शांत राहिलेलं चागलं..... काही वेळानंतर जंगलाची आग पण विसली... शिकारी ला कोणतंच प्राणी दिसतं नव्हता तो कंटाळूण घरी गेला.. सिह त्याच्या गुहेत गेला निगुन गेला... त्या हरणासाठी सगळे रस्ते मोकळे झाले होते का???? माहीत आहे तो त्या वेळेला शांत थांबला होता एक पाऊल पण पुढे टाकत नव्हता.... प्रत्येचकाचा जीवनात अशी वेळ कधीनकधी अशी वेळ येते इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्या वेळेला जास्त विचार करायचा सोडून थोडस शांत रहाणं चागलं..... शांत मन प्रत्येक परिस्तिथी तुन बाहेर निगायचं कस ये प्रत्न करत असते.... जीवनात शांतता असणं खुप गरजेचं असतं... कधी वाटलं ना सकटाच काळ चालू आहे आपला त्या वेळेला जेवढं शांत राहून निर्णय घेता येईल याचा विचार करायचा....सगळे दरवाजे जेव्हा बंद होतात तेव्हा एक दरवाजा उगडतो तो म्हणजे ईश्वरांचा तो आपली परीक्षा घेत असतो तो सक्षम आहे का???? जीवनाचा संघर्ष करायला मनून संकट आपल्यला देत असतो आणि जो संकट देतो तो मार्ग, रस्ता पण दाखवत असतो आपल्यला तर चालायचं असतं समोर समोर... परिस्तिथी कशी असो आपल्यला त्या संकटाशी कस जगता येत अगदी शांत मनानी तो माणूस जीवनाच्या लढाइत कधी हरू शकत नाही आणि कधी कुणी त्याला हरू शकत नाही☝️☝️☝️😊🙏 🌺❤️ #𝐯𝐚𝐢𝐬𝐡𝐮. 𝐤 ✍️

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

30 Oct, 04:50


चकवा

पिकल्या नाहीत शिमग्याला बोरी बाभळी
घरं धुऊन गेल्यात अनामीक वावटळी
झोपडीच्या दारांवर हिरव्या पानांचं तोरणं
स्मशानात एकटंच जळतं राहतं सरणं
पाठमोऱ्या आकृत्यांचा भास छळत राहतो
रस्ता चुकला की मग चकवा लागतं असतो
भुताच्या सावल्या उरावर नाचायला लागतात
घरावरून तेव्हांच मग टिटव्या फिरतं राहतात
प्रत्येकाचीच नसते पाडवा दिवाळी पाहट
डोळे करोडेच दिसतात मात्र ओले असतात काठ

विकास सुखधाने
युवा साहित्यक लेखक
नांद्रा.ता.मेहकर जी.बुलढाणा

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

30 Oct, 03:27


दिवाळी

सगळ्यांचीच सारखी नसते दिवाळी
काहींचे घरे असतात खुल्या आभाळी
दुःख आसवांचाच रोज असतो वनवा
काहींच्या झोपडीत लागतं नसतो दिवा

काहींना पोट भरण्याची असते घाई
गरिबांच्या वस्तीत होतं नसते रोषणाई
यातनांचा आक्रोश आभाळ भेदत जाई
तोंड वासून बसलेली असते महागाई

विकास सुखधाने
युवा साहित्यिक लेखक
नांद्रा.ता.मेहकर जी.बुलडाणा

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

29 Oct, 04:23


शोध स्वतःचा.. 😊
[
#In_Process412 ]

आयुष्य जगत असताना
खर्च होतो जीवनाचा प्रवास...
कितीही जगले स्वतः साठी पण
प्रत्येकाला पाहिजे असतो
कोणाचा तरी सहवास..
काय बरोबर काय चुक हा तर
बाजार भावनांचा..
सर्वांसाठी जगणे हाच एक खरा मंत्र
या मनुष्य जीवनाचा..

सर्वांसाठी जगणे हाच एक खरा मंत्र
या मनुष्य जीवनाचा..


लेखक - अमोल मोरे..✍🏻
@AmolmoreAm

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

25 Oct, 05:05


#जिंदगी में लगा कभी जरुरत के time पे लोग बदल गये है😊.... तब याद रखना☝️लोगों कि आदत है बदलणा!! अच्छे ने अच्छा कहा तो बुरे ने बुरा कहा!!जिसको जितनी जरुरत थी हमारी उतना ही हमको समझा उतना ही हमको जाना!!लोगों कि फितरत है मुश्किल वक्त पर छोड जाना.... कितनी बाते खुद पर लगाही जाये ये अपने उपर depend करता है!!खुद को बदलो लोगों को नाही उनकी आदत है ये सब कारण😌👍💫

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

25 Oct, 02:30


https://youtube.com/shorts/M1dXxDq6t-g?si=gvmFdCezExho4rsq

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

24 Oct, 15:42


अर्थ आयुष्याचा

जंन्म आणि मुत्यु या दोन्हीं च्या मधील "अंतर,, डोईवर घेऊन मी निघालोय बालपण, तारुण्याचे घोट पीत अर्थ आयुष्याचा शोधायला .बस वार्धक्याची गळा भेट झाल्यावर पावलाने थकू नये.फक्त आयुष्याच्या प्रवासात स्मशानाच्या रस्त्यावर मुत्युच्या महासर्पांनी गुंडाळू नये पावलांना .विळखा घालू नये भोवती आणि मागू नये "दाखला माझ्या कमाईचा,
जबाबदारी घर प्रपंच संसार संपत्ती श्रीमंती पैसा अडका पद पत्रिष्ठा तारूण्य सौंदर्य शरीरयसष्ठी .फक्त पुरावा मागू नये जीवनभर काय कमावले मी सोबत नेण्यासाठी . स्मशानाच्या क्षितिजाकडे जातांना धुसर होऊ नये माझ्या डोळ्यांच्या नजरे तेव्हां."सरणाच्या, सिंहासनावर विराजमान होऊन मला बघायचं लोकं म्हणतात ते खरं आहे का ? नर्क आणि स्वर्ग असतो म्हणून.बस इतकंच स्वप्नं आहे आयुष्याचा अर्थ समजण्याआधी गतप्राण होऊ नये माझा देह..!

विकास सुखधाने
युवा साहित्यिक लेखक
नांद्रा.ता.मेहकर जी.बुलडाणा

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

24 Oct, 15:34


अर्थ आयुष्याचा

जंन्म आणि मुत्यु या दोन्हीं च्या मधील "अंतर,, डोईवर घेऊन मी निघालोय बालपण, तारुण्याचे घोट पीत अर्थ आयुष्याचा शोधायला .बस वार्धक्याची गळा भेट झाल्यावर पावलाने थकू नये.फक्त आयुष्याच्या प्रवासात स्मशानाच्या रस्त्यावर मुत्युच्या महासर्पांनी गुंडाळू नये पावलांना .विळखा घालू नये भोवती आणि मागू नये "दाखला माझ्या कमाईचा,
जबाबदारी घर प्रपंच संसार संपत्ती श्रीमंती पैसा अडका पद पत्रिष्ठा तारूण्य सौंदर्य शरीरयसष्ठी .फक्त पुरावा मागू नये जीवनभर काय कमावले मी सोबत नेण्यासाठी . स्मशानाच्या क्षितिजाकडे जातांना धुसर होऊ नये माझ्या डोळ्यांच्या नजरे तेव्हां."सरणाच्या, सिंहासनावर विराजमान होऊन मला बघायचं लोकं म्हणतात ते खरं आहे का ? नर्क आणि स्वर्ग असतो म्हणून.बस इतकंच स्वप्नं आहे आयुष्याचा अर्थ समजण्याआधी गतप्राण होऊ नये माझा देह..!

विकास सुखधाने
युवा साहित्यिक लेखक
नांद्रा.ता.मेहकर जी.बुलडाणा

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

24 Oct, 12:17


'चिडचिड का होते '? हा माझा महत्वपूर्ण लेख आज या वर्तमान पत्रामध्ये प्रकाशित झाला नक्की वाचा...!

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

24 Oct, 11:52


जुन्या काळात माणसाकडे बोलायला वेळ खूप होता पण साधन न्हवती मात्र हल्ली साधनं तर भरपूर आहेत पण कोणाला विचारा सुद्धा वेळ नाही मान्य आहे की गतिशील जगासोबत जपाट्याने चालावं लागणार मात्र कमी झालेल्या संवादामूळे आपली माणसं एकटी पडू लागली आहेत त्यांच्या साठी थोडा वेळ काढा तुमचे दोन शब्द त्यांना मानसिक समाधान देऊ शकतात!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

24 Oct, 08:25


शब्दांकन शेवाळे दीप्ती गोपाळ

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

23 Oct, 11:36


जर सर्व जग सुंदर बनवायचे असेल तर याची सुरुवात स्वतःपासून करावी लागणार आपल्याला असे मार्मिक शब्द संत तुकडोजी महाराज लिहिले आहेत

विश्व ओळखावे आपणावरून।आपणचिविषवघटक जाण । व्यक्ती पासुनि कुटुंब निर्माण । कुटुंबापुढे समाज आपुला ।।४५।।श्लोक

समाजापुढे ग्राम आहे ग्रामापुढे देश राहे । देश मिळोनि ब्राह्मांड होय । गतगतीने जवळ ते।।४६।।श्लोक

 अध्याय पहिला
🙏।।ग्रामगीता।।
🙏

 
@Ommshelke

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

23 Oct, 03:40


जगण्याचे राहून गेले

भाकरीच्या पुढे जगण्याचे राहून गेले
वय कोवळे उन्हातं राबताना भाजून गेले

कशाला देतोस मला तू दाखले हे जीवनाचे
जबाबदारी ,मजबुरीने आहे मला दत्तक घेतले

मला ही आला होता मोहर तारूण्याचा
गरिबीवर माझ्या नव्हते कुणीच भाळले

माझी कविता जाते रोज घरी त्यांच्या
माझाच गळा दाबून मी होते गीतं गायले

नाही म्हणत मी मला कधीचं शायर युगाचा
भावनांचे शब्दं आहेत हे काळजात साठलेले

विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

22 Oct, 12:21


जगानं तुम्हाला वेड्यात काढले तरी चालेल मात्र तुम्ही तुमचे प्रयत्न चालूच ठेवा ..हजार अपयश पचवल्या नंतरच यशाचा एक दिव्य सोहळा साजरा होतो ..!

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

22 Oct, 03:38


https://youtube.com/shorts/z_-WhaZduZs?si=-UxJQSK4dZ4xPJRV

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

21 Oct, 15:22


अपेक्षा सोबतीची.....

हात माझा मोकळा
हातात कोणी घेईल का..?

या स्वार्थी दुनियेत
निस्वार्थी कोणी  होईल का... ?
या निराधार आयुष्याला
आधार कोणी देईल का...?
हात माझा मोकळा
हातात कोणी घेईल का...?

माझ्या बेरंग आयुष्यात
रंग कोणी भरेल का...?
माझ्या या भटकंतीला
रस्ता कोणी दाखवेल का....?
हात माझा मोकळा
हातात कोणी धरेल का...?

माझ्या एकटेपणाला
सोबत कोणी देईल का...?
आजच्या स्वार्थी दुनियेत
कोणी जीवाला जीव देईल का...?
हात माझा मोकळा
हातात कोणी धरेल का...?

❚█══अभिषेक जाधव ══█❚

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

21 Oct, 13:26


आयुष्य म्हणाले

बंधनात वायाच्या आता खरा बसलो आहे
आयुष्य म्हणाले हा आता आखरी प्रवास आहे

मागे बालपण तारुण्य शोधत बसूं नकोसं
पाऊलखुणावर आठवणीची धुळ पडली आहे

जड का वाटले तुला तुझे दोन्ही खांदे आज
सांग बापाने कशी झेलली जबाबदारी आहे

विरहात प्रेमाच्या रडतं किती दिवस बसणारं
आई ईतके खरे प्रेम आजवर कोणी केले आहे

हा खेळ ऊन सावल्यांचा अनं सुख दुःखचा
कुणाला कळला खरा जीवनाचा अर्थ आहे

एकटा आलास एकट्यालाच जावे लागणार आहे
स्मशानात आयुष्याचा मग चित्रपट संपणार आहे

विकास सुखधाने
युवा साहित्यिक लेखक
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

21 Oct, 11:52


नात्यात खूप स्वार्थी होतो मी हाचं माझा गुन्हा आहे। सर्वांणवर आपुलकीने हक्क दाखवतो मी इथंच चुकतो राव मी। का झालो मी एवढा मतलबी। या असल्या स्वभावचा होत आहे माझ्याच लोकांना त्रास। राहतं होतो ना मी प्रत्येकाशी बिंदास। आता मला समजत एक राज या मायावी जगात कोणीच कोणाच नसतं हे समजण्यासाठी माणसाला थोडा एकांत हवा असतो!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

21 Oct, 09:43


..... ज्याच्या आधारावर आपण एकमेकांशी जोडलेलो आहोत ना तो म्हणजे विश्वास!
तो जर एकदा तुटला परत जोडणं खूप कठीण आहे.... कारणं विश्वास 💰 💸 पैशांची लाज घेत नाही... 💯


✍️ अभिषेक जाधव

रंगले जग कवितांचे Owner= प्रांजल

21 Oct, 07:22


☀️ आयुष्य हे कुणासाठी ☀️✍️
━━━━━━━━━━━━━━━━━━


आयुष्य हे कुणासाठी...
मरमर करतो कशासाठी...

सोबत असून जवळ कधी बसत नाही...
एकाच घरात असून संवाद कधीही होत नाही...

हरवला आहे तो नात्यातील जिव्हाळा...
आता कुणाचाही येत नाही कळवळा...

नेहमीच एकमेका दोष देत..
कुरघोड्या करतो आपसातचं...

धाव धाव धावतो आहे...
कुणासाठी मात्र कळत नाही...

धावून धावून थकलो आहे...
दिशा मात्र अजूनही कळत नाही...

अरे, कधीतरी जपून बघ जिव्हाळा माणसातला आपल्या...
होईल नव्याने ओळख तुला स्वतःची...

खूप पळून झालं, पण मोकळा श्वास घ्यायला वेळ नाही...
इथे कशाचाच कशाला मेळ नाही...

ऐक क्षण असाही येइल, बंद पडेल श्वास...
अर्ध्यातच थांबेल जीवनाचा प्रवास...

अजूनही वेळ आहे, नात्यात थोडा गोडवा भरून पाहा...
आपल्यातल्या नात्याला नवीन जन्म देऊन पाहा...


🔹🔹🔹🦋⃟≛⃝"स्पर्श"🦋⃟≛⃝ﮩ٨ـﮩﮩ٨ـ❥🔸🔸🔸
  .................🦋🌺😇💞🦋................
....

1,613

subscribers

3,953

photos

435

videos