जिब्रेलीन हे एक प्रकारचे वृद्धी संप्रेरक असून उच्च वनस्पतींमध्ये तसेच कवकांमध्ये तयार होते.
प्रयोगशाळेत याची निर्मिती पहिल्यांदा याबुटा आणि सुमिकी या दोन जपानी शास्त्रज्ञांनी 1938 मध्ये जिब्रेला फुजीकुरोई या कवकामुळे संक्रमित झालेल्या तांदळाच्या रोपापासून केली.
जिब्रेला फुजीकुरोई या कवकापासून आतापर्यंत 15 प्रकारच्या जिब्रेलिन्सची निर्मिती करण्यात आली आहे.
जिब्रेलिन्सच्या साह्याने सफरचंद आणि पिअर या फळांची फलनाशिवाय निर्मिती करण्यासाठी तसेच यांचा उपयोग बीजांची सुप्त आवस्था तोडण्यासाठी तसेच फुलांच्या निर्मितीसाठी होतो.
@JitendraRasal