Weshall Talk @weshalltalk Channel on Telegram

Weshall Talk

@weshalltalk


गझल, शेर, कविता, मैफिल

Weshall Talk (Hindi)

वेशल टॉक एक टेलीग्राम चैनल है जो उन लोगों के लिए है जो गझलों, शेरों, कविताओं और मैफिलों का आनंद लेना चाहते हैं। यहाँ आपको हर रोज़ नए और मनोहारी कविताएं और गझलें मिलेंगी जो आपके दिल को छू जाएंगी। चैनल के माध्यम से आप भारतीय साहित्य की सुंदरता का आनंद उठा सकते हैं और अपनी भावनाओं को व्यक्त कर सकते हैं। वेशल टॉक चैनल में आपको न केवल गझलें और कविताएं मिलेंगी, बल्कि यहाँ आप एक साथी मिलेंगे जो इस प्रेम कला के साथ मेहनत कर रहे हैं। चैनल के सदस्य एक अद्वितीय साहित्य प्रेमी समुदाय का हिस्सा बनते हैं और एक-दूसरे से साझा करते हैं अपनी रचनाएं और भावनाएं। अगर आप भी गझलों और कविताओं के इस जादुई दुनिया में समाहित होना चाहते हैं, तो वेशल टॉक चैनल आपके लिए सही स्थान है। आइए, इस साहित्यिक सफर में शामिल होकर अपनी रचनाओं को साझा करें और दूसरों की रचनाओं से प्रेरित होकर अपनी कला को निखारें।

Weshall Talk

09 Feb, 02:15


आज पुण्यात या सुंदर कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला. मराठी गझल-कविता विश्वात ही नव्या पिढीची तरूणाई नवनव्या प्रयोगांसहीत पुढे येत आहे. विशेष म्हणजे यातील विशाल बुलढाण्याचा, आकाश नाशिक येथील तर यामिनी या मुंबई येथील आणि यांचा कार्यक्रम पुण्यात झाला आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सशुल्क कार्यक्रम होता तरीही हाऊसफुल्ल होता. प्रेम, विरह, वंचना, वेदना, अध्यात्म ते अगदी देशभक्ती पर्यंतच्या विविध विषयांवर या कार्यक्रमात रचना सादर करण्यात आल्यात. विशालच्या संध्याकाळ... दुरावा.. बाया नुसत्या दळत राहिल्या या रचना मनाला विशेष भावल्या. आकाश यांच्या रचनांमधला तुकोबा आणि विठ्ठलाचा संदर्भ खूप आवडला.. गझल म्हणजे... हे ही फार आवडलं.. यामिनी यांनी सादर केलेली पुरुष ही रचना मन जिंकून गेली... एकुणच एक सुंदर कार्यक्रम आहे हा.. ❣️

Weshall Talk

05 Feb, 16:48


शब्दाखातर...भेटुयात यारहो

शनिवार, 8 फेब्रुवारी, संध्या. 5.30 वाजता
सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे

https://www.ticketkhidakee.com/shabdakhatar

फोन बुकिंगसाठी संपर्क: निकिता +917218968420

Weshall Talk

02 Feb, 14:19


शब्दाखातर...

गझल, कविता आणि गप्पांची अनोखी मैफल.

मनाला भिडणारे शेर आणि गझला, हृदयाला साद घालणारी कविता आणि रसिकांशी संवाद घडवून आणणाऱ्या गप्पा यांचा एक सुंदर मिलाफ म्हणजेच ‘शब्दाखातर...’

सादरकर्ते:

विशाल मोहिते | यामिनी दळवी | आकाश कंकाळ

दिनांक: 8 फेब्रुवारी, शनिवार
वेळ: संध्याकाळी 5:30 वाजता
स्थळ: सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे

Tickets available on:
https://ticketkhidakee.com/shabdakhatar

तिकिटांसाठी संपर्क:
7769883887 | 7218968420 | 7499628073

शब्दाखातर... नक्की या.

Weshall Talk

31 Dec, 15:31


पोरं 7-8 दिवसातून एकदातरी ही प्रार्थना म्हणवून घेतात.

गझल(प्रार्थना: ए के शेख)

Weshall Talk

26 Dec, 14:58


पानगळ त्याहून आहे देखणी माझी
फक्त हिरवागर्द डेरेदार, मी नाही

- इंद्रजित उगले

Weshall Talk

24 Dec, 16:05


लिहिले अभंग ज्याने का तोच संत होतो
गझले तुझ्यात माझा अश्रू जिवंत होतो !..

कुठल्या ऋतूत झालो निवडुंग आठवेना
मीही कधी फुलांच्या लेखी वसंत होतो !..

सुधीर मुळीक

Weshall Talk

20 Dec, 11:08


बंद करतो तो उघडतो दार, मी नाही
शेवटी तो एक किमयागार, मी नाही

काढले जातील माझ्या अर्थ मौनाचे
मात्र कोणालाच उलगडणार मी नाही

माहिती आहे मला शेवट कहाणीचा
शेवटी सगळेचजण रडणार.. मी नाही

पाहिजे तितकाच माझा गंध दरवळतो
अत्तराइतका सुगंधी ठार, मी नाही

पानगळ त्याहून आहे देखणी माझी
फक्त हिरवागर्द डेरेदार, मी नाही

- इंद्रजित उगले

Weshall Talk

11 Dec, 16:01


प्रश्न स्पर्शाने पुसावे उत्तरे स्पर्शात द्यावी
फक्त स्पर्शानेच सारे बोलण्याची रात्र यावी

तू नदी होऊन यावे एकदा वाटेत माझ्या
अन् तुझ्या पाण्यात माझी राख मी सोडून द्यावी...

वैभव देशमुख

Weshall Talk

04 Dec, 14:48


"ग़म का ख़ज़ाना तेरा भी है मेरा भी
ये नज़राना तेरा भी है मेरा भी"
गीतकार : शाहिद कबीर, गायक : लता मंगेशकर - जगजित सिंग, संगीतकार : जगजित सिंग, गीत संग्रह/चित्रपट : सजदा (१९९१)

लेखन - संदीप विष्णू राऊत
ईमेल - [email protected]
साभार संदर्भ - विश्वकोश, आंतरजाल, यूट्यूब

Weshall Talk

04 Dec, 14:48


सदाबहार हृदयाला भिडणारी गाणी

"ग़म का ख़ज़ाना तेरा भी है मेरा भी
ये नज़राना तेरा भी है मेरा भी
अपने ग़म को गीत बना कर गा लेना
राग पुराना तेरा भी है मेरा भी"

गझल गायनाचा अनभिषिक्त सम्राट जगजीत सिंग आणि भारतरत्न गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या तलम सुरावटीतून हे गीत ऐकताना आपण भारावून गेलो नाही असं होणं शक्यच नाही. कधी कधी सुरावट थबकून ठेवते, कधी कधी त्यातला अर्थ बांधून ठेवतो.
दुःखाचा खजिना तुझाही आणि माझाही आहे, हा नजराणा तुझाही तसाच माझाही आहे. आपल्या दुःखांचे गीत बनवून गायलं पाहिजे, नुसता विलाप काय कामाचा? हा दुःखाचा राग प्राचीन आहे, त्यावरील तोडगाही तितकाच जुना...

७० आणि ८० च्या दशकात गायिका पत्‍नी चित्रा सिंह यांच्यासमवेत जगजीत यांनी केलेल्या गझलांच्या संगीत ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय ठरल्या. त्यांना गझलसम्राट या नावाने ओळखले जाऊ लागले. पंजाबी, हिंदी, उर्दू, बंगाली, गुजराती, सिंधी आणि नेपाळी या भाषांमधून जगजीतसिंह यांनी गायन केले. त्यांना केंद्र शासनाने पद्मभूषण पुरस्काराने गौरवले. पुढे तारुण्यात त्यांचा 18 वर्षांचा मुलगा विवेकचा अपघातात मृत्यू झाला. हा आघात जगजितसिंग आणि चित्रा यांच्या सहनशक्तीपलीकडचा होता. कारण विवेक अशा ठिकाणी गेला, जिथून तो परत कधीच येणार नव्हता. चित्रा यांनी तर गायनच सोडले होते. जगजीत सिंग यांनी अखेरपर्यंत आपल्या सुरांची मोहिनी संगीत जगतावर कायम ठेवली. आज आपल्यात ते नाहीत, पण सुरांच्या रुपात अजरामर आहेत.

"कौन है अपना कौन पराया क्या सोचें
छोड़ ज़माना तेरा भी है मेरा भी
शहर में गलियों गलियों जिस का चर्चा है
वो अफ़्साना तेरा भी है मेरा भी"

या ओळी कुणाला आपल्या स्वतःच्या वाटणार नाही? म्हटलं तर वैयक्तिक पातळीवर हे गीत आपल्याला भावनिक दृष्ट्या जोडतं, म्हटलं तर ते वैश्विक पातळीवर सुद्धा जोडतं. आपले काय परके काय, कृष्णाला जसा कुरुक्षेत्रावर हा प्रश्न पडला, तसाच तो आपल्याला ही कुठे पडत नाही? ज्या किस्स्याची/ कहाणीची चर्चा साऱ्या शहरात गल्लोगल्ली होतेय, जी नेहमीच जग करत राहतं, तो तुझाही आणि माझाही नाही का किस्सा?

हे गीत दुःखाच्या सार्वत्रिक अनुभवाबद्दल बोलतं. ते सांगतं की दुःख हे फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नसतं, तर ते सर्वत्र आढळतं. आपण आपल्या दुःखाला गीत बनवून व्यक्त करू शकतो आणि त्यातून सांत्वन मिळवू शकतो. हे गीत आपल्याला एकमेकांशी जोडतं आणि आपल्याला समजावून देतं की आपण एकटे नाही.

यातील सगळीच कडवी, सगळेच शेर अर्थाच्या अंगाने दमदार आहेतच, पण यातला मला आवडलेला कमालीचा शेर म्हणजे

"मय-ख़ाने की बात न कर वाइज़ मुझ से
आना जाना तेरा भी है मेरा भी"

"वाइज़" म्हणजे धर्मोपदेशक किंवा उपदेश करणारा. माझ्या उणेपणा बद्दल, माझ्या अवगुणांबद्दल, तथाकथित नीतीनियम याबद्दल बोलण्याचा व्यक्ती म्हणून कुणालाच अधिकार नाही, कारण इथे जाणारा तू ही आहे आणि मी ही. यातला सरळ वाच्यार्थ काढला तर मयखाना (दारूचे जिथे विकत मिळते) सरळ अर्थ जरी होत असला, तरी हा अधिक गहिरा जाणारा अर्थ इथे आहे. हे आयुष्य जर मयखाना मानला तर इथे जन्म मृत्यूचा फेरा कुणाचा टळला आहे. आज मला तर उद्या तुलाही जायचं आहेच की नाही?

या कडव्याने तत्त्वज्ञानाच्या उंच पातळीवर या गीताला नेऊन ठेवलं आहे.
शाहिद कबीर यांचे हे शब्द: हृदयाला थेट जावून भिडतात. ते कविता, लघुकथा आणि लेख लिहिणारे सक्रिय लेखक होते. ते प्रामुख्याने त्यांच्या गझलांसाठी प्रसिद्ध होते पण त्यांनी इतरही लेखन प्रकार आजमावले आहेत. महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीने त्यांना मान्यता दिलेली आहे. याहीपेक्षा खरं तर रसिकांनी त्यांना हृदयाच्या कोंदणात बसवले आहे.

या गीताला जितका वेळा ऐकलं तितके वेळा अर्थाचे नवे नवे पदर उलगडत जातात. साहित्यिक लिहिताना ज्या अर्थाने अपेक्षेने लिहितो, त्यापेक्षाही ऐकणारा, वाचणारा ज्या दृष्टीने त्याकडे बघतो, तसे अर्थ उलगडत जातात. या अर्थाने या गीताचा अनुवाद करता येत नाही, तो आपला आपला अर्थच अधिक महत्त्वाचा नाही का? आपल्याला कोणत्या अर्थाने ते उलगडले?

"तू मुझ को और मैं तुझ को समझाऊँ क्या
दिल दीवाना तेरा भी है मेरा भी
जैसा भी है 'शाहिद' को अब क्या कहिए
यार पुराना तेरा भी है मेरा भी"

प्रेमाच्या या गोड विळख्यात तू आणि मी दोघेही आकंठ बुडालेले असताना, खरंच आता कोण कुणाला समजावून सांगणार आहे? जसा आहे मी तसाच स्वीकार मला, जुन्या मित्राचा गुण काय अवगुण काय सगळं क्षम्य असतं ना? हे वाक्य साथीदाराला सुद्धा तेवढंच लागू होत नाही का? आपले नाव शेरात अचूक गुंफत शाहिद कबीर यांनी ते अजरामर केले आहे. या गाण्याचा आपला किस्सा, अर्थ मला नक्की ईमेल वर शेअर करा. आपल्याला आवडलेली, मनाला भिडलेली हिंदी व मराठी गाणी सुद्धा शेअर करा.

Weshall Talk

24 Nov, 16:52


कुछ तो तिरे मौसम ही मुझे रास कम आए
और कुछ मिरी मिट्टी में बग़ावत भी बहुत थी

परवीन शाकीर

Weshall Talk

15 Nov, 14:58


#आवडते तिन शेर

पिकलेल्या आंब्याशेजारी घरटे दिसले
नाहीतर केव्हाचा दगड उचलला होता..!

-सदानंद बेंद्रे

अद्याप कळाली नव्हती मजलाही माझी उंची..
मी भीत जरासा उठलो अन् भिडलो आकाशाला

--- प्रकाश मोरे

किती वाचवू मी मला सारखा ?
उन्हाच्या घरी मी फुलासारखा.

-@रूपेश देशमुख

Weshall Talk

08 Nov, 16:59


#जाळे

Weshall Talk

07 Nov, 18:07


मिल ही जाएगा कभी दिल को यक़ीं रहता है
वो इसी शहर की गलियों में कहीं रहता है

इक ज़माना था कि सब एक जगह रहते थे
और अब कोई कहीं कोई कहीं रहता है

अहमद मुश्ताक

Weshall Talk

03 Nov, 07:44


आम्ही असा मिटवला, तंटा जुन्या घराचा...
सगळे मिळून केला, सौदा जुन्या घराचा...

पाडायच्या अगोदर, आजी रडत म्हणाली,
"फोटो तरी मुलांनो, काढा जुन्या घराचा..."

आलो नव्या घरी अन् मी कर्जदार झालो
आधी असायचो मी, राजा जुन्या घराचा...

बांधेल फ्लॅट येथे, कोणी उद्या नव्याने
येईल का बदलता? रस्ता जुन्या घराचा...

डोळ्यात आसवांसह अवघ्या स्मृती तरळल्या
सोडून आज आलो, ताबा जुन्या घराचा...

अद्याप आत माझ्या, वसतो जुना जमाना
अद्याप घालतो मी, चष्मा जुन्या घराचा...

शहरात आज आहे मोठे मकान माझे
आहेच यात मोठा, वाटा जुन्या घराचा...

कुठल्याच हादऱ्यांनी खचले कधीच नाही
रचलाय पूर्वजांनी, पाया जुन्या घराचा...

शहरीकरण खुबीने भाडेकरी बनवते
पुरतो कधी कुणाला, पैसा जुन्या घराचा...

आजा नव्या घराच्या, खिडकीस प्रश्न करतो
मिळणार का? इथेही, वारा जुन्या घराचा...

....... निलेश कवडे अकोला

Weshall Talk

27 Oct, 14:51


आजपर्यंत जे काही लिहिलं आहे त्यातलं चांगल्यात चांगलं वेचून क्रिएटिव्ह स्टुडिओ चे संचालक विद्यानंद दादांनी प्रस्तुत केलं आहे. गझल, कवितेचे रसिक असाल तर त्यांच्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

Weshall Talk

27 Oct, 14:47


https://youtu.be/SocilIUR26w?si=G8gXNGT2FLuA018s

Weshall Talk

20 Oct, 15:44


ज़रा मोहतात होना चाहिए था
बग़ैर अश्कों के रोना चाहिए था

हमारा हाल तुम भी पूछते हो
तुम्हें मालूम होना चाहिए था


अलविदा...Fehmi Badayuni साहब


💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Weshall Talk

09 Oct, 13:40


असतात कुणी जपलेल्या जखमाही भळभळणाऱ्या
प्रत्येक डायरीमध्ये घमघमता चाफा नसतो...

- विशाल

Weshall Talk

06 Oct, 09:32


Waah!! Jio❤️❤️

Weshall Talk

22 Sep, 15:38


जरा सा क़तरा कहीं आज अगर उभरता है,
समंदरो ही के लहजे में बात करता है।

शराफ़तों की यहाँ कोई अहमियत ही नहीं,
किसी का कुछ न बिगाड़ो तो कौन डरता है।

वसीम बरेलवी

Weshall Talk

13 Sep, 13:14


जनता भनंग इथली सत्ता धनिक भाऊ,
विकसित देश माझा मी नागरिक भाऊ!

अमुची सुगी ऋतूंच्या गेली घश्यात सारी,
तुमच्या बरे निघाले खुर्चीत पिक भाऊ!

तो भूतकाळ तोडू हा वर्तमान जोडू,
थोडे करु आता हे आयुष्य ठिक भाऊ!

बांधावरी बसा अन एक-एक थेंब मोजा,
पाऊस म्हणे पिकाला देतोय भिक भाऊ!

नुसत्याच अक्कलीवर श्रीमंत कोण होतो,
पैश्या शिवाय असतो मेंदू पडीक भाऊ!

सतिश दराडे

Weshall Talk

09 Sep, 16:12


सतीश दराडे यांचे निवडक ६० अप्रतिम शेर

१)तिच्या पोटातली गुपिते कशी सांगू समुद्राला
नदीचे बाळ आहे मी मला डोहातले कळते...

२) मनाच्या मांडावाखाली निराशेचा सडा पडला
कुणाची याद आशेने निघाली वेचण्यासाठी

३)ती राउळामागे मला केव्हातरी भेटायची
मी ईश्वरापासून मग चालीरिती लपवायचो...

४)कुठलेही नाते नव्हते अखंड रिमझिमले
मी तुरळक भेटींवर जन्म फुलवला सारा...

५)माझ्या समूळ नोंदी डोळ्यांमध्ये तुझ्या
मी नामशेष होईन इतके रडू नको

६)लाळगाळ्या ढगांची अपेक्षा बघा
दोनदा दोनदा पेरणी पाहिजे...

७)मला भिंतीमधे ऐसा रुजू देऊ नको देवा
तुझा तडकेल गाभारा ऋतूंनी कान भरलेतर

८)जातीय दंगलीने छाटून हात नेले
देऊ कशी तिरंग्या आता तुला सलामी...

९)तो उसासारखा गोड झाला म्हणे,
त्यास जोतो आता कोयता दावतो...'

१०)काढून बांगड्या तू हळुवार फेक माती
होईल प्रेत जागे चाहूल लागल्यावर

११)ढग क्षितीजाला कधीचा लोंबकळतो
घेतली की काय फाशी पावसाने ...

१२)नदी हिंदोळली होती तरी तेजाळलो थोडा
दिवा पाण्यात सोडावा तसे तू सोडले होते

१३)काय मिळले तिला काय उरले मला
फक्त झुरली गझल जन्मभर जन्मभर...

१४)वेलीवरील ज्याने खुडले न फूल साधे
का लागलीय दुनिया त्याला किलर म्हणाया...

१५)नाही पुन्हा बिलगली आत्यास मोहमाया
मी एकदाच रडलो कालिज नितळ कराया

१६)जनता भनंग इथली सत्ता धनिक भाऊ,
विकसित देश माझा मी नागरिक भाऊ!

१७)विठोबा संपली वारी निघू का रे घरी आता
तुला ठाऊक आहे मी मुलाबाळातुनी आलो...!

१८)लग्न लावले तुझे नि दूर जाहलो
तू जिती असूनही विधूर जाहलो...

१९)उगवल्या दुर्वा घरावर कोवळ्या
ऐवढी भिंतीत माती दडपली

२०)याद आली भाकरी आई तुझी
जाहले मन घट्ट पिठल्यासारखे...

२१)अक्षर अक्षर मायेने कुरवाळत बसतो
मी तान्ह्या कवितेचे जावळ हुंगत बसतो

२२)खोलतानाच मोडली छत्री
पावसाच्या मनातले झाले

२३)"फुले साऱ्याच अश्रूंची करू आपण
बघू डोळ्यात केव्हा पात्रता येते"

२४)"मला मातीमधे गाडा वरी लोटून पाचोळा
तरी माझ्या वसंताचा ऋतू घेतील धांडोळा"

२५)"मी रोखठोक माझ्या आत्म्यास प्रश्न केला
देहात राहिल्याचा देतो कधी किराया"

२६)हयातीला हवे जे ते कटाक्षाने दिले होते
तिच्या प्रत्येक इच्छेचे तरी नख लागले होते...

२७)उडाले शेकडो पक्षी पुढे सारे कुठे गेले
फिरे एकेकटा जो तो थवे सारे कुठे गेले...

२८)माझ्या तिच्या मिठीचा इतिहास काय सांगू
संकोच आड आला एकांत लाभल्यावर

२९)ओठ इतके दिवस शुष्क ठेऊ नको
चेहरा आतली आर्द्रता दावतो....

३०)उगा जन्मते का घरंदाज कविता
पिढीजात दु:खे मिळाली असावी

३१)ओठ येता पुढे पाकळी ठेवली
कोवळी वासना कोवळी ठेवली...

३२)कैक झाली देउनी शब्दात वचने
आज स्पर्शातून शपथा घेउया चल...

३३)सुखाचे लोट आठवले मधाचे घोट आठवले
मनाच्या लुब्ध भुंग्याला कुणाचे ओठ आठवले...

३४)केशराची तुझ्या साय ओठावरी
आणि गालावरी स्निग्ध लसलस पुन्हा...

३५)आग देहातली विझू बघते
ओठ ओठावरी पुन्हा घासा...

३६)हवेतिल चुंबनाचा कोवळा अनुराग आठवतो
उमटला जो धुक्यावर तो गुलाबी डाग आठवतो...

३७)खुल्या सडकेवरी मी ही मिठ्या मारायला शिकलो
तसा ओढा,तशी झाडी,तशी पांदण कुठे शोधू...

३८)धावते घेउन मिठीचा गंध अपुल्या
या हवेचे पाय दोन्ही बांधुया चल...

३९) गूढ छाया गझल मोहमाया गझल
पाहिजे भाग्य मोठे कळाया गझल...

४०)आपण जगू बरोबर आपण मरू बरोबर
कुठल्या हवेत विरल्या माझ्या तुझ्या बढाया...

४१) आपापल्या परीने निवडून झाड घ्यावे
नसतात या ढगांच्या विश्वासपात्र छाया....

४२)हातात बांध गजरा कानात कोंब फाया
ये एकदा मनाच्या कोठीवरी बसाया...

४३)झाले तिचे पतीच्या प्रेतासमोर सांत्वन
कुंकू पुसावयाला आल्या सवाष्ण बाया...

४४)तू थांब पापण्यांच्या वृंदावना किनारी
शोधू नकोस माझ्या डोळ्यात कृष्णविवरे...

४५)ती तिच्या कानात बोटे घालते
आणि मी मेंदूत वाजू लागतो...

४६)टीव्हीमधून अमुच्या देतील धान्य हाती
ते आमुच्या भुकेच्या करतील जाहिराती....

४७)मी तुझी ओळख पुसाया जन्म दुसरा घेतला
आणि तू आलीस हा प्राचीन परिचय घेउनी...

४८)झोपताना बल्ब झीरोचा सुरू ठेऊ नको
गूढ अंधारी तुझी तो देहबोली वाचतो...!!!

४९)डोळ्यातला तुझ्या मी ठेवू कुठे पसारा
माझ्याच आसवांना नाही जगात थारा....

५०)का सांडतेय पाणी डोळ्यांतुनी पिकांच्या
त्याचेच दुःख त्याच्या जाईल का मुळाशी ?

५१)पोट फुटल्या सारखे आभाळ गळते
मारला कोणी विळा माहीत नाही !

५२) का सांडतेय पाणी डोळ्यांतुनी पिकांच्या
त्याचेच दुःख त्याच्या जाईल का मुळाशी ?

५२) जिचे चोचले कष्ट पुरवीत नाही
अशी जीभ गरिबास द्यावी कशाला ?

५३) जीवनाने डाग सारे लावले
फक्त अग्नीडाग शिल्लक ठेवला..

५४)तुझ्या डोळ्यांमधे पडते मनाची सावली माझ्या
बघू देना कशी दिसते उदासी आतली माझ्या...

५५)हिच्या डोळ्यांवरी काळी दिसे का नेहमी चिंधी
कुणी या न्यायदेवीचा असावा फोडला डोळा...

Weshall Talk

09 Sep, 16:12


५६)बैसतो येऊन खाली त्यास माया लावते
झाड कोठे गार छायेचा किराया लावते ...

५७)रंग शिंगाचा जरी विटला तरी
नाचतो जन्मा तुझ्या पोळ्यात मी...

५८)जीव आंब्याची डहाळी होत जातो
काय गाते कोकिळा माहीत नाही...

५९)ती मैफलीत माझ्या बसते अशा प्रकारे
तारेवरी विजेच्या पक्षी जसा बसावा

६०)खिन्न दोघीतिघी चितेपाशी
धुमसतो धूर कोणतीसाठी...

सतीश सबा दराडे

Weshall Talk

08 Sep, 11:21


दराडे मास्तर काल तुमची भयंकर आठवण येत होती म्हणून श्र्वासांच्या समिधा वाचायला घेतलं..आणि आताच तुम्ही गेल्याची वार्ता खरी वाटत नाहीये..

तुमचे शेर अमर आहेत. एका मराठी गझल युगाचा अस्त...

आत्म्यास पंख फुटले गेला भ्रमण कराया
कविते उभी रहा तू मागे स्मरण कराया..

-सतीश दराडे

भावपूर्ण श्रद्धांजली मास्तर...🥺
💐💐💐💐💐💐💐💐

Weshall Talk

07 Sep, 16:42


Satish Darade

Weshall Talk

01 Sep, 12:32


https://abhijitraut10.wordpress.com/2024/09/01/razors-for-productivity/

Weshall Talk

26 Aug, 10:24


जर वेळ तशी आली तर हातात सुदर्शन घेतो
कृष्णाच्या हाती केवळ वेळूचा पावा नसतो

विशाल

Weshall Talk

24 Aug, 15:17


जखम भरणार होती पण पुन्हा टाके निघत गेले
तुला म्हटलो सुगी अन मग तुझे येणे टळत गेले

तुझ्यामाझ्यासवे झाल्या मुक्या भिंती घराच्याही
तुला ते आवडत गेले मलाही आवडत गेले

तिने स्वप्नातही अंतर निरंतर ठेवले होते
मिठी मारायला माझे तरीही मन पळत गेले

तुझ्याआधी तुझ्यानंतर तुझा कोणीच नसतो रे
मला आयुष्य माझे कैकदा हे दाखवत गेले

जयदीप विघ्ने