*👉आर्टिफिशिअल इंटेलिजन्स... तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर...*
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता काय करू शकते, ह्याची चुणुक जगाला दिसू लागली आहे ..!!
ह्या तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ म्हणवले जाणारे डॉ. जेफ्री हिंटन ह्यांनी त्याविषयीची भीती व्यक्त केली आहे. ‘एआय’ काय आहे, ते विनाशक का होऊ शकते याविषयी...
👇
"कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी (एआय) मी जे काम केले, त्याबद्दल मला थोडा खेदच वाटतो" हे उद्गार आहेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ असे बिरूद लाभलेले डॉ. जेफ्री हिंटन ह्यांचे ..!!
गुगल मधून राजीनामा देताना, 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’, आणि त्या तंत्राच्या भयावह शक्यता ह्या विषयी बोलताना नोकरीमध्ये असताना मर्यादा येतील, म्हणून राजीनामा देत आहे ..!!
मी ह्याला ‘तिसरा स्फोट’ म्हणतो ..!!
सन १८९६च्या आसपास ‘डायनामाइट’चा शोध लावणाऱ्या आल्फ्रेड नोबेलचा स्फोट पहिला ..!!
सन १९४५ मध्ये ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’मधील अणुबॉम्बचा शोध लावणारा ओपेनहाइमरचा स्फोट दुसरा ..!!
आल्फ्रेड नोबेलच्या भावाचे निधन झाल्यानंतर, आल्फ्रेडचेच निधन झाले आहे असे समजून एका वृत्तपत्राने, ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याचे निधन’ अशी बातमी छापली ..!!
आपण मेल्यावर जग आपल्याला कसे ओळखेल, आठवेल ह्या विषयीची ‘याची देही, याची डोळा’ जाणीव झाल्यानंतर उपरती झालेल्या आल्फ्रेडने, पाप-क्षालनासाठी ‘नोबेल पारितोषिका’ची घोषणा केली ..!!
गंमत म्हणजे ह्याच नोबेल पारितोषिकासाठी १९४६, १९५१, १९६७ असे तीन वेळा नामांकन मिळालेल्या; परंतु पुरस्कार मिळू न शकलेल्या रॉबर्ट ओपेनहाइमरने अणुबॉम्ब बनवला. त्याचा स्फोट ‘डायनामाइट’पेक्षा कित्येक पट विध्वंसक होता. त्यानंतर त्या संशोधनाच्या विनाशक शक्तीमुळे, ओपेनहाइमरने खेद व्यक्त केला होता ..!!
आताचा डॉ. जेफ्री हिंटन ह्यांचा राजीनामा आणि त्यानंतरची 'खेदयुक्त काळजी' हा ‘एआय’ तंत्राच्या अजूनही अव्यक्त; पण नजीकच्या भविष्यातील महास्फोटाची जणू नांदीच ..!!
इतकी वर्षे ‘गूगल’मध्ये कार्यरत असूनही, त्याने आत्ताच राजीनामा देण्याची मला तीन कारणे वाटतात. पहिले म्हणजे...
‘एआय’मुळे नजिकच्या काळात जवळजवळ ६० ते ८० टक्के नोकऱ्या कमी होण्याचे भाकित वर्तविले जात आहे ..!! त्यामुळे प्रचंड सामाजिक अस्थैर्य निर्माण होईल ..!!
दुसरे म्हणजे, अलीकडेच ‘चॅट जीपीटी’ आणि ‘लार्ज लँग्वेज मॉडेल’ने (एलएलएम) घातलेला धुमाकूळ ..!!
आणि...
तिसरे म्हणजे, ह्या अत्यंत प्रगत ‘एआय’मुळे तयार होत असलेल्या विध्वंसक शस्त्रांची भीती ..!!
‘स्वार्म तंत्रज्ञान’, म्हणजे अनेक छोटे ड्रोन एकत्रित काम करतात ..!! एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र दिल्यास, हे सारे छोटे ड्रोन एकत्र काम करून त्या व्यक्तीला ठार करू शकतात ..!! ह्या हल्ल्यातून बचाव होणे शक्य नाही ..!!
ही तिन्ही कारणे ज्या तंत्रज्ञानामुळे शक्य झाली त्यात, डॉ. हिंटन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे ..!!
‘चॅट जीपीटी’ आणि ‘डीप फेक’ तंत्रज्ञानासारख्या गोष्टींमुळे, सोशल मीडियावर बनावट छायाचित्रे, व्हिडिओ, मजकूर यांचा अनिर्बंध सुळसुळाट होण्याची नुसती शक्यताच नव्हे, तर अनेक शास्त्रज्ञांना खात्री वाटते ..!! हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वाईट हेतू असणाऱ्या, आसुरी महत्त्वाकांक्षेने प्रेरीत लोकांच्या हाती पडल्यास, जगाचा विनाश अटळ आहे, याबाबतही त्यांच्यात एकवाक्यता आहे ..!!
याच्याही पुढे जात...
'जगाचा विनाश होईल का ..??
ह्यापेक्षा...
‘कधी होईल' ..??’
एव्हढेच विचारणे आपल्या हातात आहे, अशी भीतीही अनेक विचारवंत व्यक्त करीत आहेत ..!!
ह्याच प्रकारची विधाने, काळजीयुक्त भाषणे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि प्रसिद्ध तंत्रज्ञ-उद्योजक इलॉन मस्क, बिल गेट्स करीत आहेत ..!! आपण ती ऐकत आणि वाचत आहोत ..!!
व्हाइट हाउसने नुकतेच ‘गूगल’चे सुंदर पिचाई आणि ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नाडेला ह्यांना ‘एआय’चा जबाबदारीपूर्वक वापर करणे आणि त्यासाठीचा आराखडा करणे, ह्यासंबंधी बोलावले होते. त्या बैठकीत ‘ओपन एआय’च्या (‘चॅट जीपीटी’ची जनक कंपनी) सॅम आल्टमनबरोबरच अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिसही उपस्थित होत्या. ‘विश्वासार्ह एआय’साठी व्हाइट हाउसने १४ कोटी डॉलर जाहीर केले आहेत ..!!
‘एआय’ची उपशाखा असणारी ‘न्यूरल नेटवर्क’ खूप जुनी आहे. ‘न्यूरल नेटवर्क’ अती-प्रगत करण्यात, तिचे २०१२मध्ये ‘डीप लर्निंग’मध्ये रूपांतर करण्यात, डॉ. हिंटन ह्यांचे मोलाचे योगदान आहे. ह्या ‘डीप लर्निंग’ प्रकारामुळे आज ही परिस्थिती ओढावली आहे ..!!
डॉ. हिंटन म्हणतात की, हे तंत्रज्ञान मानवापेक्षाही पुढे जाईल, अशी शक्यता आहे आणि ती खूप भयावह आहे ..!!
काही दिवसांपूर्वी ‘सॅमसंग’ कंपनीने ‘चॅट जीपीटी’च्या वापरावर बंदी घातली ..!!
वॉरन बफे या गुंतवणूक क्षेत्रातील अग्रेसर सीईओने तर ‘एआय’ला ‘दुसरा अणुबॉम्ब’ म्हटले आहे ..!!