व पु काळे @vpukale Channel on Telegram

व पु काळे

@vpukale


https://t.me/joinchat/AAAAAFdOjTjZaQF3XpwUrQ

व पु काळे (Marathi)

व पु काळे टेलीग्राम चॅनल हा विचारात्मक लेखन आणि साहित्यिक कृतींसाठी एक सार्वजनिक स्थान आहे. या चॅनलवर विविध विचारांचे वाचन करण्याची संधी आहे आणि साहित्याच्या समृद्धीसाठी समर्पित आहे. ज्यात कविता, कथा, निबंध आणि इतर साहित्यिक कृतींची सामग्री आहे. व पु काळे चॅनल एचटीटीपीच्या लिंकद्वारे जॉईन करण्यात येऊ शकतो.

व पु काळे

29 May, 13:56


स्वाभाविक गोष्टींवर चिडण्यात अर्थच नसतो. भुंगे जमावेत म्हणून कमळ  फुलत नाही,आणि एखादं  कमळ पकडायचं असं ठरवून भुंगे भ्रमण करीत नाहीत. फुलणं  हा कमळाचा धर्म, भुलणं हा भुंग्याचा धर्म. जाणकारांनी, रसिकांनी कमळाकडे पाहावं, भुंग्याकडे पाहावं आणि फुलावं कसं आणि भुलावं कसं  हे शिकावं. 
 

व पु काळे

20 Oct, 15:28


📌 माणसाने समोर बघायचं की मागे यावरच बरेचसे अवलंबून असते

वपु

व पु काळे

05 Mar, 07:07


📌प्रेमाची व्याप्ती प्रचंड आहे.
आपलं या जगातील अस्तित्व
विनाकारण नाही,हे दुसऱ्याच्या डोळ्यांत पाहिल्यावरच कळतं......

वपु

व पु काळे

18 Feb, 16:14


📌काचेच भांड फुटतच ..पण हातातून ग्लास निसटण आणि मुद्दाम आपटण ह्यात खूप फरक आहे ..काचेला ह्यातला फरक कळत नाही ..जाणीवा असलेल्याला हे कळते ..जमिनीवर पडलेले तुकडे फेकून देता येतात ..तरी त्यातले सगळेच तुकडे केराच्या टोपलीत जात नाहीत ..नजेरेच्या टप्प्यातून सुटलेला एखादा काचेचा तुकडा अचानक पायाला लागतो ..तो तुकडा देखील काढता येतो..पण त्या प्रसंगाची आठवण झाली कि तो तुकडा मनाच्या तळाशी कुठे तरी वास्तव्य करून राहिलेला आहे हे कोणत्या तरी क्षणी केव्हाही आठवत ..

मन दुभंगल जात ते असेच..टोचला म्हणून आपोआप सापडला हे समाधान सुद्धा मिळत नाही ....
✍🏼 वपु

व पु काळे

16 Feb, 15:14


📌एकदा तुम्ही यशस्वी ठरला की भूतकाळातील चुकांचेही पोवाडे होतात
वपु

व पु काळे

14 Feb, 13:21


📌प्रतिसाद देणार मन साद देणाऱ्या मनाइतकं विशाल असतं
वपु

व पु काळे

14 Feb, 05:46


📌प्रेम आपोआप घडतं, घडवून आणता येत नाही

व पु काळे

14 Feb, 05:45


📌प्रेम करायला सवड लागते जिगर नाही
वपु

व पु काळे

11 Feb, 04:32


📌ज्याला प्रेम समजतं, वेळ समजते तो शब्द पाळतो आणि ज्याला स्वार्थ समजतो तो वेळ साधतो
व पु

व पु काळे

10 Feb, 07:03


📌भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमी पडतात हेच खरं
वपु

व पु काळे

07 Feb, 10:27


स्त्री सर्वात सुंदर कधी दिसते..?"
'वपूच्या मते तरी एखादी स्त्री सर्वाधिक सुंदर दिसते "स्वयंपाक" करतांना'..आपल्या कोणाला..'अन्न मिळावं' त्याचं वेळेवर 'पोट भरावं' म्हणून जी "तळमळ" तीच्या "चेहर्‍यावर" दाटलेली असते त्याला तोडच नाही... तीचा स्वयंपाकघरातील प्रत्येक वावर हा "जादुई" असतो... फक्त तो आपल्या "मनाला" दिसायला हवा"...!*(अजून काय हवं खरच पोळ्या करणे सोपे नसते लाटायला जाता गोल पण होतो भुगोल... म्हणजे भारताचा वा जगाचा नकाशाच जणू....)

वपु

व पु काळे

02 Feb, 02:26


जगातील सर्वात सोपी गोष्ट
कोणती ?
तर इतरांनी काय करावे ,
हे आपण ठरवणं
व.पु

व पु काळे

10 Dec, 11:44


दुर्लक्ष करण्याचं कौशल्य वाढवणं म्हणजे सुख -वपु

व पु काळे

10 Dec, 01:59


प्रेमाच्या प्रांतात स्वतःकडे कमीपणा घ्यायची वृत्ती लागते. स्वतःला लहान समजण्यातलं मोठेपण मिळवायचं असतं
व पु

व पु काळे

09 Dec, 12:53


कोणतंही समर्थन मूळ दुःखाची हकालपट्टी करु शकत नाही. वर पट्टी बांधायची ती जखम झाकण्यासाठी. आत जखम आहे ती ज्याची त्याला ठसठसत असतेच. – व. पु. काळे

व पु काळे

15 May, 14:36


आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई...
_ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही._

*आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे?*
नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत...

_कदाचित, पुन्हा भेटतील ,न भेटतील?🚩_
*✍️व.पु.काळे*
🌸

1,442

subscribers

714

photos

1

videos