धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी.... @dhadpadnarya_tarunaisathi Channel on Telegram

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

@dhadpadnarya_tarunaisathi


अधिकाऱ्यांची यशोगाथा, प्रेरणादायी सुविचार, महापुरुषांचे विचार, Officers Words, Ground Reality, Motivation Thought's, Quote's, Video's असं बरंच काही...

Admin : @contact_Ni3_Bot

Join Now👇
@Dhadpadnarya_Tarunaisathi

धडपडणाऱ्या तरुणाईसाठी (Marathi)

धडपणाऱ्या तरुणांसाठी एक अद्वितीय टेलीग्राम चॅनल! येथे तुम्हाला अधिकाऱ्यांची यशोगाथा, प्रेरणादायी सुविचार, महापुरुषांचे विचार, Officers Words, Ground Reality, Motivation Thought's, Quote's, Video's असं बरंच काही मिळेल. एडमिन चा नाव @contact_Ni3_Bot आहे. तुम्ही जॉईन करू इच्छिता काय? तर आता जॉईन करा हा विशेष टेलीग्राम चॅनल आणि मिळावा सुवर्ण विचारांची खास पंक्तीत जीवनाच्या भंडारात नवीन ऊभांची ज्योत जगावतील. जहाँ पर आप जो भी चाहेंगे, उसकी मांग मिलेगी। तो भी बिना किसी ईजाजत या रुकावट के। तो भी बिना रुकावट के। इस अद्वितीय पोर्टल में आपका स्वागत है।

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

22 Jan, 16:07


@Shabdshailee

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

22 Jan, 15:51


*दररोज परमेश्वराला प्रार्थना करा. आजपर्यँत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशिर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व  समृध्दीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हास सतत होऊ देत. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये. याचीही काळजी तुच घे.*

*समाजातील लबाड, विश्वासघातकी लोकांपासुन सावध व दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी प्रथम खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.*🙏

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

22 Jan, 15:51


*प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणुन सुखा पेक्षा, समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल.*

*काही काही व्यक्ती आणि त्यांचं व्यक्तिमत्त्वही असे असतात की, प्रत्येक भेटीत त्यांचा एक नवा पैलू दिसतो. त्या क्षणी त्यांची एक नवी ओळख होते. यश, पैसा, प्रसिद्धी हे सगळं उत्तमच असतं, पण तुमचा आनंद, शांतता आणि स्थिर चित्तता यांच्यापुढे काहीच मोलाचं नाही.*

*अंतिम सत्य हेच की, माणसांना माणसाचीच गरज आहे. बाकी प्राॅपर्टी, बंगले, पैसा, हे सर्व खोटं, कारण हे गेल्यावर पुन्हा मिळवता येतात, पण हातातुन निसटलेली माणसं जशीच्या तशी पुन्हा मिळवता येत नाही.*

*प्रत्येक फुलाच्या नशिबात देवाची पायधूळ नसते आणि सर्वात जास्त सुगंध देणारी पारिजातकाची फुले सुद्धा पायदळीच तुडवली जातात. पण तरीही ती ओंजळीना आणि पायदळी तुडवणाऱ्या पायांनाही सारखाच सुगंध देतात. कदाचित ती आपल्याला शिकवून जातात की पुढच्याला वागायचं तसं वागू देत. पण तू मात्र तुझ्या चांगुलपणाच्या सुगंधावर ठाम रहा.*
          
*जगांत तीन मुख्य आश्चर्ये आहेत. आपण जन्मभर ज्या मी बरोबर राहतो, त्याचें स्वरूप आपल्याला कळत नाही. जीवनाचें सारे व्यवहार ज्या मनाच्याद्वारें करतो, ते मन आपल्या ताब्यात येत नाही. क्षणोक्षणीं प्रपंचात सुख नाही अशी सर्वजण तक्रार करतात, पण तो प्रपंच सोडायला कोणी तयार नाही, हे तिसरें आश्चर्य होय..!*

*शेवटच्या घावात दगड तुटतो, याचा अर्थ असा होत नाही, की आधीचे घाव महत्वाचे नव्हते, यश मिळविण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न महत्वाचाच असतो, जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास.*

*एखाद्याची प्रशंसा केल्याने तुमचा आणि त्यांचा आनंद वाढेलच. पण तसे नाही केले तर तुम्हालाच अधिक दुःख मिळेल. आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही. तर आनंद हाच सुखी होण्याचा मार्ग आहे. तुम्ही कोण आहात अथवा तुमच्याकडे काय आहे, यावर आनंद अवलंबून नाही. तर, तुम्ही नक्की काय विचार करता आणि त्यावर काय कृती करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे.*

*प्रतिभा परमेश्वराकडून  मिळते म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक रहा..! प्रतिष्ठा समाजाकडुन मिळते म्हणून समाजाचे आभारी रहा... परंतु मनोवृत्ती व अहंकार स्वतःकडुन मिळतो, त्यापासुन सावध रहा...*

*जेव्हा सर्व काही व्यवस्थित आहे हे तुम्ही जाणता तेव्हा तुम्ही शांततेने डोके मागे करून नक्कीच आकाशाकडे पाहता. हाच खरा आनंद. बरंच काही असण्यात आनंद नाही, तर असलेल्या गोष्टी वाटण्यात आनंद आहे. कोणत्याही गोष्टी वाटल्याने आनंद कमी होत नसतो तर तो वाढतो.*

*"मदत" एक अशी गोष्ट आहे की केली तर लोक लगेच विसरतात आणि मदत नाही केली तर कायम लक्षात ठेवतात. रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही; त्यासाठी संपूर्ण दिवसभर प्रामाणिक असावे लागते. पायाला झालेली जखम सावध जपून चालायला शिकवते; आणि मनाला झालेली जखम आयुष्य कसे जगायचे हे शिकवते...!!!*

*कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं. कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे. म्हणूनच खडक झिजतात. प्रवाह रुंदावत जातो.*

*प्रामाणिकपणा आणि चुकलेपणाची जाणीव असलेली असंख्य माणसं असतात. पण मोकळेपणी मान्य करायचं धाडस ही दुर्मिळ गोष्ट आहे ते धाडस आल्यावर शत्रुत्वातुन मैत्रीचाही जन्म होऊ शकतो.*

*माणूस नावाच्या एका अवाढव्य, अनाकलनीय यंत्राचा सेफ्टी वॉल्व्ह म्हणजे शब्द आणि संवाद आहे.*

*दुःखात फक्त एकच बोट आपले अश्रू पुसते आणि आनंदात दहाही बोटे एकत्र येऊन टाळ्या वाजवतात. जर आपले स्वतःचे अवयव असे वागत असतील तर जगाकडून आपण अपेक्षा तरी का ठेवायची.?*

*एका माणसाच्या समस्येवर दुसर्‍या माणसाजवळ उत्तरच नसतं, कारण सल्ला देणारा त्या समस्ये पर्यंत पोचू शकत नाही. तो स्वतःच्या वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्येकडे पाहतो समस्येतून जाणार्‍या माणसाच्या भूमिकेत तो जाऊ शकत नाही.*
            
*निर्माण होणाऱ्या भावना प्रकट करायच्या नाहीत हे अंगवळणी पाडून घेता घेता कातडीचं चिलखत कधी होतं हे स्वतःलाही समजत नाही.*

*बोलणी फिसकटली की मोडतो व्यवहार, प्रेम नव्हे.*

*काही काही शब्द, वाक्य विधानं फार भयंकर असतात ती मोघम असतात. पण गैरसमज पसरवण्याची त्या मोघम वाक्यांची ताकद साथीचा रोग पसरवण्याऱ्या जंतुपेक्षा अफाट असते.*

*मस्तक थोडं वाकवून बघा अहंकार मरून जाईल. डोळ्यांना थोडं ओलं करून बघा दगडी मन ही वितळेल. वाणीवर थोडं संयम ठेऊन बघा दुःखाचा काळ निघुन जाईल. इच्छा थोड्या कमी करून बघा आनंदाचं जग दिसू लागेल.*

*विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात शिरला कि जीवन संपवतो. आणि गैरसमजूतीचा एक शब्द कानात शिरला कि भली भली नाती संपवतो.*

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

22 Jan, 14:26


असं प्रत्येक जण म्हणतं की लोकं माझ्या सोबतच असं का वागतात पण फक्त एकदा असा विचार करून बघा की आपण दुसऱ्याशी कसं वागतो तर नक्कीच आपलं जगणं सोपं होऊन जातं राव शेवटी एक नियम सर्वांना लागू आहे की तो म्हणजे जसे आपण कर्म करतो तसंच काहीसं आपल्याला पण मिळतं💯बरोबर ना!,,,✍🏻

एकमन#लेखक

 

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

22 Jan, 11:50


जीवनात मोठा बदल हवा असेल, तर आरामदायी चौकटीतून बाहेर पडा.

सोपे निर्णय आणि सरळ वाटा तुम्हाला स्थिर ठेवतील, पण धैर्याची परीक्षा घेणारे क्षण, भीतीदायक आणि आव्हानात्मक निर्णय  तुम्हाला पुढच्या टप्प्यावर घेऊन जातील.

तुमची खरी क्षमता भीतीच्या पलीकडे आहे, फक्त पाऊल उचला.

#weareforyou

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

22 Jan, 07:54


मेरी कविताओं में बंद है
आम लोगों का इतिहास।

जिन्हें सत्ता से शिकायत का
वक़्त न था।
और न थी
समाज से लड़ पाने की क्षमता।

वो जयकारों में भी पीछे थे
और क्रांतियों में भी आखिरी।

उनकी लड़ाई खाने और
एक छत की थी,
आखिरी दिन तक यही लड़ाई थी-
उनकी क्रांतियाँ वहीं तक सीमित थीं।

ज्यादा से ज्यादा कुछ हुआ
तो कभी कभी
इन आम लोगों ने प्रेम भी किया-

और
उसमें भी ये हारे
और चुपचाप मान लिया।।

(फ़ोटो : अज्ञात)

- किताबगंज

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

22 Jan, 07:00


Fast track Batch शेवटच्या 15 दिवसात revision करण्यासाठी फक्त 199 rs मध्ये केली आहे. 🔥🔥

(फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी)

Join Batch on the App👉
https://share-app.link/7hTrrkt3KirBdKW7A

Join Batch👉
https://www.educulture.co.in/courses/Fast-track-Batch-Math-and-Reasoning-6731ba920890301d900a0ce3

सोबत fast track batch ची hand-written notes सुद्धा दिली आहे.

Telegram👉 t.me/abhishekcsat
Contact👉 9021747391

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

22 Jan, 06:54


https://whatsapp.com/channel/0029VaxJtdF84Om7cONp7e3V/167

शिवछत्रपतींवर व सैह्याद्रीवर नितांत प्रेम असणा-यांनी नक्की जॉईन करा 🙏🚩

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

22 Jan, 06:29


@Shabdshailee

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

22 Jan, 02:25


क्या करूँगा मैं-
सज सँवर के-
तुम्हारे खूबसूरती के समाजिक दायरों
पे खरा उतर के?

मैंने माना कि
बाल नहीं ठीक हैं,
ये जो उलझे मैले से कपड़े
बदन पे मेरे
सब नहीं ठीक है।

पर
ये आलस नहीं है-
बस ये सजने सवरने-
ये अच्छा दिखने की बातें-
तुम्हारे चाहतों में फिट हो जाने की बातें


मेरी चाहत नहीं है।
मेरी चाहत नहीं है।

और
तुम झाँको जरा तो
मेरे लिबासों के आगे-
मेरे कमरे में देखो
किताबें भरी हैं।

- किताबगंज

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

19 Jan, 08:50


जे काही करायचं ते मनभरून कराव
मन मारून नाही
कारण ज्या चार लोकांच ओझं आपण डोक्यावर घेऊन फिरतो ना, त्या चार लोकांची लेकरे मन भरून जगत असतात....
कोणत्याहि चार माणसांचा विचार न करता...

आयुष्याला वन्स मोअर नाही....
मग त्या चार लोकांसाठी आपण आपली आवड का दूर करावी.????

एक सत्य आहे,
कठीण असू शकत पण अशक्य अस काहीच नाही.....

तेजस्विनी प्र. राऊत
  
@TejuRaut

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

17 Jan, 14:41


आपण स्वतःला नेहमी सुखी समजायचं कारण तुम्हाला दुःखं दाखवायला आजूबाजुचं जग आहेस की शेवटी सर्व काही आपल्यालाचं विचारांवर अलंबून असते बाकी टेन्शन प्रत्येकाला असते ते कसं घ्यायचं हे आपल्या स्वभावावर ठरलेलं असते म्हणून तर प्रत्येक परिस्थितीत स्वतःला खूप खूश ठेवायचं असतें कारण शेवटी तुम्हाला दुःखी करायला वस्तुस्थिती असतेच की राव!,,,✍🏻

एकमन#लेखक
 

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

17 Jan, 14:07


काय म्हणालात,
प्रेम....

अरे खड्ड्यात गेल प्रेम
गप निवांत अभ्यास करा,
स्वतःच वाटोळं करून घ्यायला आयुष्य पडलंय
आता फक्त अभ्यासावर लक्ष द्या, मुलींवर नाही....
गुलीगत धोका मिळेल, मग बसाल तोंड पाडून....

अभ्यासाने नोकरी मिळेल की नाही माहित नाही
पण समज नक्की मिळेल जीवनात पुढे चालत राहण्याची.....

आयुष्याला उत्तर द्यायचं आहे,अत्तर नाही
त्यामुळे शानशौक चा नाद सोडा,
करिअरवर फोकस करा,
नाहीतर आयुष्याचा फोकस हलून जायचा...

समजतंय का...???

तेजस्विनी प्र. राऊत
  
@TejuRaut

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

17 Jan, 13:00


अखेर प्रतिक्षा संपली .एक दोन दिवसाची नाही .चौदा वर्षांची प्रतिक्षा.... तब्बल चौदा वर्षांनंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काल सिंहाच्या छाव्याचा जन्म झाला . आणि जन्मासाठी दिवस पण काय निवडला ... संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा स्थापना दिवस .
पण ह्याच्या जन्माचा प्रवास सोपा नव्हता. खूप खाच खळग्यांचा होता . आशा आणि निराशेच्या सीमेवरचा होता . आनंद आणि दु:खाचाही होता .
मानस आणि मानसी ही जोडी जुनागढ वरून 2022 मध्ये आणली होती .गेल्यावर्षी मानसी सिंहीण आजारी पडली .तब्बल 18 दिवस तिने काहीच खाल्ले नव्हते .बऱ्याच जणांनी तिची आशा सोडली होती .पण आम्ही काही जणांनी ठाम विश्वास ठेवून तिची अखंड शुश्रुषा केली .त्यातून ती बरी झाली . त्यानंतर मानस बरोबर तिचं मिलन केलं .त्या दोघांना एकत्र करणही सोपं नव्हतं . मानस सुरुवातीला डरकाळी फोडून तिच्या अंगावर धावायचा .तिला ओरबाडायचा .ही बिचारी घाबरून जायची .पण आम्ही धीर न सोडता त्यांना पुन्हा पुन्हा एकत्र करायचो .हळूहळू ते एकत्र रुळले आणि चक्क एकमेकांच्या प्रेमात पडले .मग तस सोपं झालं .गेल्यावर्षी गौरी ज्या दिवशी येतात त्या दिवशी त्यांचं मिलन सुरू झालं . प्राणी रक्षक Vaibhav Patil चा मला फोन आला .मी तशीच पिंजऱ्याकडे धावले .तर हे दोघे आखंठ प्रेमात बुडालेले .30 सप्टेंबरला यांचं शेवटचं मिलन झालं आणि मानसीचा मिलन काळ संपला .मग ती त्याच्यापासून दूर बसायला लागली .आता दोघांमध्ये ती वर्चस्व गाजवू लागली .मानस जर तिच्या जवळ आला तर ती पंज्याचा फटका द्यायची .मग हा बिचारा निमूटपणे दूर व्हायचा .आम्ही हे सगळे दिवस तिची काळजी घेत होतो .तिचा वाढीव आहार , बाळंतपणा मधील टॉनिक ची औषधं सगळं कसं वेळच्या वेळी . काल 108 दिवस पूर्ण झाले आणि तिला लेबर पेन चालू झाल्या .मी अखंड सीसीटीव्ही समोर बसून तिच्या एक एक क्षणाच निरीक्षण करत होते . तिच जमिनीवर लोळण ,पुन्हा पुन्हा मागे मान वळवून पिल्लू बाहेर आल की नाही ते पाहणं ,पुन्हा पुन्हा कळा देणं हे पाहत होते .संध्याकाळी माझा धीर सुटत चालला होता .मग मी उद्यानातील वाघाई देवीच्या देवळातही जावून आले .देवीला मनोमन सांगितलं ," बाई ग,तू उद्यानातील वाघांची देवी आहेस .माझी सिंहीण कितीवेळ झाला अडली आहे .तिला लवकर सोडव." आणि पुन्हा सीसीटीव्ही समोर बसून राहिले .जर आणीबाणीची वेळ आली तर काय करायचं याची संपूर्ण तयारी ठेवली होती .पण सुदैवाने ती वेळच आली नाही . काल रात्री तिने साडे नऊ वाजता पिल्लाला जन्म दिला .आमचे गार्ड Amit Rane रात्रभर पिंजऱ्याच्या बाहेर जागत होते . पहाटे तीन वाजता ती पिल्लाला दूध पाजायला लागली .मग आम्ही खऱ्या अर्थाने सुटकेचा निःश्वास टाकला .ही गोष्ट एका सिंहाच्या पिल्लाच्या जन्माची ...

डॉ. विनया जंगले
पशुवैद्यकीय अधिकारी
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

17 Jan, 10:52


राणीमाशी ♥️

‘राणीमाशी’ एक मधमाशी, जिच्याबरोबर नराचा संयोग झाला की तो मरतो. वापरणं व मारणं ही तर राणीमाशीची प्रवृत्ती, जी माणसातही असते.
राणीमाशी ही पती-पत्नी आणि प्रेयसीची आत्मकथा आहे. या तीन नात्यांतील चिवट जिवंतपणा आणि आत्मसंघर्ष हा या पुस्तकाचा केंद्रबिंदू आहे.

स्री-पुरुष संबंधांतील ताणतणाव, घालमेल आणि जीवघेणी घुसमट यात व्यक्त झाली आहे.

प्रेमाच्या त्रिकोणातला विरह आणि विद्रोह, भेटीगाठी आणि ताटातूट, रुप आणि कुरुपाचा उत्सव या लेखनातून अनुभवता येतो. स्री-पुरूष या सनातन संबंधांतील नित्य नूतनपणा अनिवार ओढीने इथं प्रकट झाला आहे.

हे मनाच्या पातळीवरचं जगणं आहे. मन आणि शरीरातल्या सनातन संघर्षाची ही आत्मकथा आहे. चिरंजीव नात्यांची स्वप्नं चिरडताना होणारा आक्रोश ‘राणीमाशी’तून व्यक्त झाला आहे.

#राणीमाशी_अभिप्राय

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

17 Jan, 10:52


काही लोक मुलींवर बलात्कार करतात
तर काही लोकशाहीवर.

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

17 Jan, 10:51


वाचून झालेल पुस्तक..त्यावर केलेल चिंतन..त्यातून मिळालेल ज्ञान जे असत ना ते..आयुष्याच्या प्रवासात येणारे बरेच खच खळगे भरुन काढणारे असते..

#BooksWorthReading

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

14 Jan, 17:35


कधी कधी परिस्थिती नसल्यानी पण स्वप्नात जगून बघावं कारण आपण वस्तूस्थिती बदलू शकतं नाही मात्र स्वप्नामध्ये का होईना आपण मनासारखं तर जगू शकतो ना राव आभासी का होईना एकांतात बेभान होऊन जगावं!,,,✍🏻

एकमन#लेखक

 

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

14 Jan, 09:35


चांगल्या व वाईट अनुभवाची शाळा म्हणजे आयुष्य, जिथं प्रत्येक अनुभव एक नवीन शिकवण देऊन जातो..!


~ हर्षवर्धन❤️

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

14 Jan, 05:13


तिळगुळ खाऊन जर कोणी गोड बोललं असतं तर,
कोणाच्याच आयुष्यात कडवट्पणा राहिला नसता
तरीही आपल्याला म्हणावं लागत,
तिळगुळ घ्या व गोड गोड बोला...

खर तर गोड बोलणारी नाही तर खर बोलणारी माणस पाहिजेत....

बरोबर ना ….?

तेजस्विनी प्र. राऊत
  
@TejuRaut

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

14 Jan, 03:16


तीळ इवलासा पण तो गुळात गेला की त्याचा तिळवा होतो,
तीळाप्रमाणे आपण असावं पण गुळाप्रमाणे आपली माणसे,
गोडवा जपावा, प्रसंगी एकत्र यावं, आणि आपले नाते आपणच गोड बनवून घ्यावेत....

मकरसंक्रांतिच्या सर्वांना शुभेच्छा....💐💐

- तेजस्विनी प्र. राऊत
    
@TejuRaut

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

13 Jan, 18:38


https://whatsapp.com/channel/0029VaxJtdF84Om7cONp7e3V/167

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

13 Jan, 11:37


*"सिर्फ हंगामा खडा करना बस हमारा मक्सद नही है हमारी सारी कोशिश यह हे सुरत बदलनी चाहिये"*

*🙏साईजित करिअर अकॅडमी*🙏

*#आमचे वैशिष्ट्ये#*
*👉.दहा एकर निसर्गरम्य वातावरणात...*
*👉.दहा वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले फिजिकल ट्रेनर...*
*👉.प्रत्येक विषयात तज्ञ प्राध्यापक...*
*👉.मुला मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सुविधा...*
*👉घरगुती व साध्या पद्धतीने जेवण*
*👉.डिजिटल क्लासरूम..*
*👉.प्रशस्त व इंटरनेट सुविधा उपलब्ध असलेली मुला- मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका.*
*👉संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत...**आपल्या प्रवेशासाठी आजच संपर्क साधा प्रवेश मर्यादित.*
संपर्क क्रमांक...*+9173875 69609...*+919881569609*
👉* *पत्ता* ...अस्तगाव फाटा शिर्डी रोड तालुका- राहता जिल्हा- अहिल्यानगर.

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

13 Jan, 08:38


खुप छान वाटायचा मला
स्वतःचा बालिशपणा,
ह्या वयाने सारा
समजदारपणा आणून दिला...

कोणी घेणार असेल तर फुकट देईल हा समजदारपणा
विकत जरी मिळाला तरी द्या मला आणून तो बालिशपणा.....

तेजस्विनी प्र. राऊत
  
@TejuRaut

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

13 Jan, 08:37


थांब थोडी. बस एका जागी. विचार कर.

तुझ्यासोबत वाईट वाहणार्‍या व्यक्ती या वाईट नसून ते तुझे भोग आहेत जे तुला भोगून संपवायचेत.

उलट उत्तर देऊन नवीन दुष्कर्म निर्माण करू नकोस.
शोषून घे ते सगळे अपशब्द आणि पुढे चालत रहा.

दुष्कर्मांचा घडा रिता होतोय.

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

13 Jan, 08:37


आजकाल लोकं enjoyment करण्यामागे मुख्यतः दोन कारणे असतात..

१) स्वतःच्या आनंदासाठी
२) जगाला दाखवण्यासाठी

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

13 Jan, 08:37


वळणा-वळणाचे आयुष्य असावे.. त्यात काटेही असावे, वेदनाही असावी पण "विश्वास" तोडणार कोणी नसावं...

#विश्वास..✍️

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

12 Jan, 06:01


स्वामी विवेकानंद यांनी आपल्या धर्मकार्यात अनेक आश्रमांची स्थापना केली ज्याद्वारे त्यांना रामकृष्ण मिशनचे कार्य पूर्ण करता येईल. त्यामध्ये रामकृष्ण मठ, बेलूर मठ, सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्कमधील वेदांत सोसायटी, कॅलिफोर्निया मधील शांती आश्रम आणि भारतातील अद्वैत आश्रम यांचा समावेश होतो.

       स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगावा वाटतो,
स्वामी विवेकानंद परीक्षेच्या आदल्या दिवशी मंदिरात बसुन विना वाजवत होते
त्यांचा मित्र शोधत शोधत त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो नरेंद्र उद्या पेपर असताना तू मंदिरत काय करतो
त्यावेळी विवेकानंद उत्तर देतात की परीक्षा ही माझ्या आजच्या दिवसाची नाही तर मागे केलेल्या 365 दिवसाची आहे यावरून असे लक्षात येते की कोणत्याही फलिताचा परिणाम हा मागच्या चार पाच दिवसांचा नसतो तर त्यासाठी आधी दिल्या गेलेल्या वेळेचा असतो.युवा पिढीने सुद्धा हे सूत्र आत्मसात केले की यश फार दूर राहत नाही.मेहनतीला एकच पर्याय आहे ते म्हणजे मेहनतच... अशा महान व्यक्तिमत्त्वास विनम्र अभिवादन...

- तेजस्विनी प्र. राऊत
   
@TejuRaut

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

10 Jan, 15:39


मेहफिल भरी थी,


किसीको हम मोटे दिखे,
तो किसीको हम पतले दिखे
किसीको सफेद तो किसीको काले दिखे
किसीको आखे नरम और दिमाख गरम दिखा,
किसीको चेहरा छोटा तो किसीको बडा दिखा,
देखणे वाले ने तो कमाल कर दी भाई,
जो मुझमे नही वो भी उनको दिखा,

बस दूर खडा एक दोस्त था यार,
जिसने मुझे हसते हुये भी रोते देखा....!

तेजस्विनी प्र. राऊत
@TejuRaut

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

10 Jan, 14:12


स्वतःसोबत प्रामाणिक असणारी व्यक्ती दुसऱ्याला त्रास देण्याचा विचार सुद्धा करू शकतं नाही कारण त्याला उत्तमरीत्या माहिती असते की आपण जसं इतरांनसोबत वागतो अगदी तसंच आपल्यासोबत घडत असते म्हणून द्यायचे झाले तर स्वतःकडून सर्वाना भरभरून आनंद देत राहा कारण दुःखं तर प्रत्येकाकडे आपलं आपलं ठेवलेलं असतें👆🏻बरोबर ना!,,,✍🏻👍🏻😊

एकमन#लेखक

 

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

10 Jan, 06:11


*काटे आणि समाज यामध्ये एकच साम्य आहे*
*सुंदरता दिसली की दोन्हीही टोचणी लावतात*
*एक शरीराला तर दुसरा मनाला😊*

*@P₹aS@d🩷*

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

09 Jan, 10:50


मेरे कमरे को सजाने की तमन्ना है तुम्हें
मेरे कमरे में किताबों के सिवा कुछ भी नहीं

-जौन एलिया🌷

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

09 Jan, 10:50


घोडा कितीही चांगला पळाला, तरी चाबूक नशीबी आहेच

झाडांनी स्वतःहून कितीही गोड फळे दिली, तरीही दगड नशीबी आहेच

तुम्ही कितीही चांगली व्यक्ती असाल, तरी लोकांच्या टीका टिप्पणी मधून तुमची सुटका कधी नसतेच...!!!

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

09 Jan, 08:14


🚨 Savings vs Miserable Life 🚨
करिअर सुरवातीला Saving च्या "नावाने" उगाच काटकसर करत बऱ्याच चुका केल्या, आता आठवतो तर वाटत की मग तसे आयुष्य जगून किती पैसे वाचवले, बांधला का बंगला की झाल्या हातात चार सोन्याच्या अंगठ्या ?? सामान्य माणसासाठी खरं तर बचत आणि काटकसरीने आयुष्य जगणे यात खूपच किंचित अशी Margin असते, एक पाऊल तिकडे की खर्च वाढला. आपल्या वडिलांनी पोटाला चिमटा काढून आयुष्य जगले आणि त्यातून वाढले हीच माझ्या सारख्या बऱ्याच मध्यम वर्गीय मजुराची कहाणी असते आणि आपण तोच मार्ग पकडतो. "Luxury म्हणजे पाप" हे आपले समीकरण आणि मग या समीकरणात काय बसवायचे काय सोडायचे हेच कळत नाही. हिशोबी राहणे चुकीचे नाही पण त्यामागे बचतसाठी एक वेळ उपाशी झोपायलाच हवे का ? हे गरजेचे नाहीये. माझी ती फेज गेली पण नवीन कर्मचाऱ्यांना नेहमी सल्ला असेल की गरज आणि वायफळ खर्च याचा समतोल साधत जीवन जगा. कंपनीने हॉटेल accomodation दिलेय तरी मित्राच्या खोली वर राहून पैसा घेणार या सारखे करू नका, ऑफिस मध्ये पार्टी होतेय, वरून थोडे पैसे जातय, देऊन द्या कारण त्या पब मधील पार्टी आपण एकट्याला परवडणाऱ्या सारखी नाही. Client Location गेलाय तर TA DA मिळतो, जास्त खर्च झाला तरी देतात, एक तुपाची पोळी जास्त जेवा कारण "भरपूर" वाला खर्च तर पुढे आहे.

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

09 Jan, 02:17


*बोलून व्यक्त केलेल्या रागा पेक्षा मनात अट्टाहासाने जोपासलेला रागच जास्त त्रासदायक ठरतो....*

*
@Prasad🩷*

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

08 Jan, 16:00


लोकलच्या गर्दीत चेंगरणारे, ऑटोचे पैसे वाचवायला बससाठी रांगेत उभे राहणारे, कांदा महाग आहे म्हणून कमी खाणारे, चप्पल तुटली तरी त्यावर महिने काढणारे, हॉटेलमधलं परवडत नाही म्हणून वडापाव खाणारे,   प्रत्येक सेकंदाला-मिनीटाला स्वतःच्या इच्छा मारत काटकसर करणाऱ्या  १ लाख २५ हजार मुंबईकरांचे  हजार कोटींपेक्षा जास्त पैसे या स्कीम मध्ये कायमचे गेलेयत. मुंबईतल्या ३१ वर्षीय प्रदीप वैश्य या भाजीवाल्याने १३ कोटी ४८ लाख या टोरेस स्कॅममध्ये गमावले आहेत.

-एकदम श्रीमंत सॉफिस्टिकेटेड नाव दिलं..
-जागोजागी, चकचकीत भुरळ पाडणारे ऑफिस उघडले
-असामान्य वाटावं असं कंपनीचं नाव ठेवलं
-चकचकीत, मोठा बिजनेस भासावा अशी वेबसाईट
-एकदम मोठ्या उद्योगाचा आपण भाग होतोय हे पटवून दिलं
- कंपनीत विश्वास बसावा म्हणून अनेक विदेशी चेहरे
-सोने, हिरे, चांदीत गुंतवणूक करत असल्याचं भासवलं
-गुंतवणूकीवर दर आठवड्याला परताव्याचं आमिष दिलं.
- ६ लाखांच्या गुंतवणूकीवर आठवड्याभरात ६ टक्के व्याज
- ६ लाखाहून अधिक गुंतवणूकीवर ११ टक्के व्याज
- म्हणजे वर्षाला ५२० टक्के. एका लाखाचे ६ लाख
-  एक लाख रुपये गुंतवणूक केली तर मोईसॅनाईट स्टोनच्या (लॅब निर्मीत हिरे) पेंडंटवर 10 हजार रुपयांची सूट दिल्याचं दाखवलं.
- तसेच ज्वेलरीच्या गुंतवणुकीवर देखील 6 टक्क्यांचा परताव्याचं आमिष दिलं
- सुरुवातीला काही जणांनी पैसे गुंतवले, आठवड्याला परतावा यायला लागला. पैसे येतायत हे दिसल्यावर सगळे आपल्या नातेवाईक, मित्रांनाही पैसे टाकायला सांगू लागले.यातूनच मुंबईत जागोजागी टोरेसची चैन उभी राह्यली.

कंपनी गुंतवणूकदारांना त्यांच्याकडे असलेले खडे, ज्वेलरी डिस्काउंटमध्ये द्यायची. गुंतवणूक केलेल्या या ज्वेलरीच्या रकमेवर आठवड्याला परतावा मिळायचा. ही ज्वेलरी, खडे परदेशी आहेत, असं कंपनी सांगायचीहळू हळू आठवड्याला ६ टक्क्यांऐवजी ११ टक्के परतावा कंपनी द्यायला लागलीमग लोभापायी सामान्य माणसं आणखी पैसे टाकायला लागली.  अवघ्या 4000 रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती.

ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवारदरम्यान त्याचा परतावा द्यायची. मग कंपनीने उच्चभ्रू इमारतीत घरे, गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा दिला . त्यामुळे गुंतवणुकदारांचा विश्वास बसला. म्हणून अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये टोरेस कंपनीत गुंतवले.

हेच बघून वर उल्लेख केलेल्या प्रदीप कुमार वैश्य या भाजीवाल्याने १३ कोटी ४८ लाख गुंतवले. आपल्या नातेवाईक मित्रमंडळीसह ३८ लोकांचे पैसेही त्याने यात गुंतवले.मिळालेला परतावा परत टोरेस कंपनीकडे सगळे गुंतवत होते कारण एकच ते म्हणजे आणखी लोभ, हव्यास, ग्रीड, मोह...

शेवटी याचा शेवट व्हायचा तोच झाला... एक सकाळ उजाडली आणि कंपनीने फसवणूक केल्याचं लक्षात आलं.. कंपनीने दिलेले दागिने पण नकली असल्याचं कळलं. कोट्यधीश होण्याची स्वप्न बघणारे एका रात्रीत देशोधडीला लागले. 

लोकलचे धक्के खात, कपडे पिळावे इतका घाम गाळून कमवलेला पैसा मुंबईकरांनी  सानपाडा, दादर,भाईंदर अश्या विविध भागातल्या ब्रांचमध्ये जात गुंतवला... कोणी घर गहाण ठेवलं, कोणी विकलं, कोणी कर्ज काढलं, कोणी पैसे उधार घेतले, कोणी दागिने विकले. श्रीमंत होण्याची स्वप्न बघत, कोणी हक्काच्या घराचं स्वप्न बघत, कोणी कर्जमुक्त होण्याचं स्वप्न बघत टोरेसमध्ये पैसे गुंतवले.. आणि आता ही स्वप्न पुर्ण होणं तर दुरच पण अनेकांची झोप सुद्धा एका चुकीच्या निर्णयाने हिरावून घेतलीये.  गरिबीच्या खाईत लोटलंय. होतं नव्हतं सगळं गेलंय.... 

कंपनीचा मालक युक्रेनला पळून गेलाय. यातून एक रुपया सुद्धा रिकव्हर होईल असं वाटत नाही.

बाबांनो आतातरी शहाणे व्हा. घरबसल्या झटपट पैसा मिळत नसतो. श्रीमंत होण्यासाठी पैसा कमवण्याईतकच तो सावधपणे जपणं देखील आवश्यक असतं.  नाहीतर प्रत्येकवेळी श्रीमंतीची स्वप्न दाखवत तुम्हाला नागडं करायला आणखी एक स्कॅम येईल.

- सौरभ कोरटकर

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

08 Jan, 16:00


नोकरी करणाऱ्यांना कमी लेखत बिझनेस करणाऱ्यांचा उदो उदो करण्याचे दिवस आहेत.

स्वतःचा बिझनेस करा!
कोणाच्या हाताखाली काम करू नका!
नोकरी मागणारे नाय, नोकरी देणारे बना!

मोटिवेश्नल स्पीकर बोलतात नेहेमी.

बट दे डोन्ट टेल यू द कॉस्ट यू नीड टू पे!

बिझनेस करणं खरंच भरपूर किक देणारं असतं. मजा येते.  पण त्याबदल्यात मोजावी लागणारी किंमत ही तशीच असते.

अँड व्हॉट्स वर्स?

ती किंमत हसत हसत, जगापासून दुःख लपवत मोजावी लागते!

डोक्यातला गोंधळ, मनातलं वादळ चेहऱ्यावर दिसून चालत नसतं. कारण जगासमोर रडका चेहरा दिसणं परवडणारं नसतं.

यू गॉट टू बी विनिंग - ऑल्वेज.

जगासमोर नेहेमी मिळणारं यश, कमावलेला विजय दाखवावा लागतो.

पण त्यापाठीमागे घडलेलं युद्ध दिसून चालणार नसतं.

व्हेंडर कटकट करतच असतात

कस्टमर्स तक्रार करतच असतात

एम्प्लॉयीज् मागण्या करतच असतात

नवनवीन अडचणी येतच असतात

आणि हे सगळं एकट्याने निभावत, एक एक पायरी चढत पुढे जायचं असतं - जगाला काहीही न दाखवता!

या प्रवासात आपली हक्काची माणसं हमखास दुरावतात

ज्यांच्यावर विसंबून रहाता येईल असं वाटतं ती बरोब्बर ऐनवेळी दगा देऊन जातात

तरी एकट्याने चालत रहायचं असतं, कोणासमोरही न रडता!

बाय द् वे - हे सगळं नकारात्मक अजिबात नाही!

आधी म्हणालो तसं - कमाल किक मिळते या प्रवासात! इट्स वर्थ इट! मला कधीच पश्चात्तम झालेला नाहीये हा मार्ग निवडल्याचा.

आणि - हे सगळं स्वतःचं कौतुक तर अजिबातच नाही.

आपल्यालाच लै हौस या उठाठेवी करण्याची - कौतुक कसलं त्यात!

हे सगळं फक्त नोकरीला कमी लेखणाऱ्या आणि / किंवा नोकरी सोडून स्वतःचा बिझनेस सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांसाठी.

जस्ट नो व्हॉट रनिंग अ बिझनेस कॉस्ट्स.

कारण यात पडल्यानंतर रडता येणार नाहीये!

बॉसची कटकट परवडते बहुतेकवेळा यापेक्षा!

थोडा कमी पगार ही ठीक वाटेल एकवेळ!

एवढे टेन्शन घेऊन जगण्यापेक्षा - "दुसऱ्यासाठी" ३-४ तास एक्सट्रा काम करणं ही योग्य ठरेल कदाचित! 

त्यामुळे नोकरी कमी लेखू नका अजिबात.

कुटुंबाची जबादारी उचलण्याचा अत्यंत आदर्श, बऱ्यापैकी सुरक्षित मार्ग आहे हा.

डोन्ट गेट फूल्ड बाय द रोजी पिक्चर ऑफ रनिंग अ बिझनेस.

एन्जॉय युअर जॉब!

इट्स नॉट बॅड!
नॉट बॅड अॅट ऑल!

चिअर्स!

- ओंकार दाभाडकर

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

25 Dec, 16:45


२०२५ साठी २१ महत्वाची सूत्र :-

१) पहाटे पाच ते सहा च्या दरम्यान उठणे.

२) उठल्यानंतर किमान पहिले एक तास झीरो स्क्रीन टाईम ठेवणे.

३) सकाळच्या सत्रात वजन उचलण्याचा व्यायाम, एक खेळ/कार्डियो, सूर्यनमस्कार/ स्ट्रेचिंग, माईंड फुलनेस मेडिटेशन करणे.

४) किमान 15 मिनिटे कोणतेही नॉन फिक्शन रीडिंग करणे.

६) कोणतेही एक नवीन कौशल्य शिकणेसाठी दररोज पंधरा मिनिटांचा वेळ देणे.

७) दर दिवशी साईड हसल व बचत/ गुंतवणुकीसाठी पंधरा मिनिटे वेळ देणे.

८) पूर्वनियोजित पद्धतीने पूर्वनिर्धारित वेळी कामास सुरुवात करणे.

९) कामासाठी 80-20 फॉर्मुला वापरणे, दर तासाला ब्रेक घेणे.

१०) पूर्वनिर्धारित वेळी काम बंद करणे.

११) झोपण्यापूर्वी किमान एक तास सर्व स्क्रीन बंद ठेवणे.

१२) दहा ते पंधरा मिनिटे जर्नलिंग करणे. दिवसभरात ठरलेल्या पैकी काय काय पार पडले व काय राहिले व त्यावेळी असलेल्या आपल्या मनस्थितीचा मानसिकतेचा खेद खंत न बाळगता आढावा घेणे.

१३) झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यापासून पूर्ण दिवसाचे नियोजन लिहून काढणे अर्थात टु डू लिस्ट तयार करणे.

१४) रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान झोपी जाणे.

१५) या व्यतिरिक्त हाय प्रोटीन लोकार्ब डायट फॉलो करणे.

१६) इंटरमीटंट फास्टिंग करणे.

१७) कॅलरी डिफिसिट निर्माण करणे.

१८) संपूर्णतः निर्व्यसनी राहणे.

१९) दर आठवड्याला विशिष्ट प्रमाणात स्क्रीन टाईम कमी करत जाणे.

२०) बोलण्यापेक्षा काळजीपूर्वक ऐकण्यावर अधिक भर देणे.

२१) यातील एखादी अथवा कोणतीही इतर चांगली बाब सवय बंद झाल्यास त्याचा खेद न करता फक्त पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करा.

कोणत्याही क्षेत्रात हमखास यशासाठी या सूत्रांचा वापर करा. अनुभवातून सिद्ध झालेली सुत्र आहेत.

डॉ प्रशांत भामरे.

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

25 Dec, 11:28


सालं निघाली असतील तर गाभा आहे. प्रामाणिकपणे
जगणाऱ्यांची सालं निघतात.
बाकीच्यांच्या अंगावर थर जमतात,
ऐहिक सुखाचे...🙌🏻

#आवडलेलं💓

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

25 Dec, 11:28


एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा...

थोडा तरी वेळ लागतोच आपला वेळ यायला फक्त आपण न थांबता, न हारता पुढे चालत राहिले पाहिजे..
🥳❣️

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

25 Dec, 11:28


पुस्तकांचे झाड 🎄

अगदी ठरवून नाही पण #मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील लहान मुलांची, कथा, कविता, फिक्शन-नॉनफिक्शन, चरित्र, ललित, संदर्भपर, अभ्यास अशी सर्व प्रकारची आणि विविध विषयांवरील #पुस्तके यात आहेत.

#नाताळ 🎅🎄❣️🥳

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

25 Dec, 08:32


लाज वाटते मराठी असण्याची...??

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

25 Dec, 08:21


*नाती अशी बनलेली असतात*
*ती तोडायची म्हणली तर थोड्याशा श्वासानेही तुटतील आणि*
*तोडायची नाही म्हटलं वज्रघातानेही तुटणार नाहीत*

*@प्रसाद🩷*

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

25 Dec, 08:21


फक्त वाचता येणं पुरेसं नसतं..
त्यातून शिकताही येणं गरजेचं असतं..!

पुस्तकप्रेमी

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

25 Dec, 08:17


"खरंतर आपण जितका जास्त मूर्खपणा करू ना तितका जास्त viral होतो." Social Media चा वापर सगळेच करत आहेत, जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे सुद्धा! बघूया त्यांचं काय मत आहे या virtual जगावर!

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

04 Dec, 03:57


**प्रवेश सुरू...!! प्रवेश सुरू..!!

🏛 *कालिका अभ्यासिका* 🏛

                     

🔰 अभ्यासिकेतील सुविधा 🔰
    
👉 फीस फक्त 550 रूपये
🔆 No deposit
🔆 No Admission fees
🔆  wi-fi सुविधा युक्त
🔆 वर्तमानपत्रे व मासिके
🔆 राखीव स्वतंत्र टेबल खूर्ची सुविधा
🔆 वेळोवेळी अधिकाऱ्यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
🔆 डे नाईट (247)अभ्यासिका
🔆 जेवणासाठी व डिस्कशन साठी   स्वतंत्र जागा
🔆मुलांसाठी व मुलीसाठी स्वतंत्र    
       Washroom सुविधा
🔆 चार्जिंग पॉइंट सुविधा
💢💯 शांत व सुसज्ज अभ्यासिका पाहिजे मग एकदा भेट द्या कालिका अभ्यासिकेला आणि मगचं ठरवा* 💯💢
   

🏛 पत्ता :  🛕कालिकामाता मंदिर जुनी तापकीर गल्ली ( फडके हौद व लाल महाला जवळ 5 मिनिट अंतरावर ) पुणे -५५२

📲 Contact:-8888696671

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

03 Dec, 12:29


आई म्हणे,...
जर एखादा व्यक्ती आपल्या वाईट वेळेत मदत करत नसेल तर पुन्हा त्याची मदत घ्यायची नाही...
#lifecoaching

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

03 Dec, 09:50


भारतीय स्वातंत्र्याचे आद्यप्रणेते महाराजा यशवंतराव होळकर 💐

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

03 Dec, 09:50


#HappyAdvocateDay

मला वकिलीचा व्यवसाय फार आवडतो; पण या धंद्याविषयी लोकांत आदर नाही. भारतात वकिलांवर कित्येक आरोप केले जातात. मध्यवर्ती सरकारातून मुक्तता झाल्यावर मी वकिलीलाच वाहून घेणार आहे. आज या देशात लाईक कसे वकील थोडेच आहेत आणि लायक वकिल नसतील तर त्या खात्याची अधोगती होईल.

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(२३ जुलै १९५०, सेशन्स कोर्ट, औरंगाबाद)
🇮🇳✒️📓🎓💙

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

03 Dec, 09:50


“मी फक्त सेल्फ हेल्प प्रकारातली पुस्तकं वाचतो”

किंवा

“मी सेल्फ हेल्प सोडून बाकीचं वाचतो!”

माझ्या मते, ही दोन्ही पण दोन टोकांची मतं आहेत!

वाचन हे एकांगी नसावं… “आपल्याला आवडणारं आणि विचारांची कक्षा रुंदावणारं” असं दोन्ही पण वाचत राहावं!📚❤️

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

03 Dec, 09:49


माँ नहीं थी वह,
आंगन थी,
द्वार थी,
किवाड़ थी,
चूल्हा थी,
आग थी,
नदी की धार थी।

~ विश्वनाथ प्रसाद तिवारी

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

03 Dec, 09:49


नवरा-बायकोच्या नात्यात, ज्या व्यक्ती सोबत आपण आयुष्य घालवलेलं असतं, तो अचानक तुम्हाला सांगतो,"मी तुमच्या आयुष्यातून निघून जात आहे."

आपण त्या क्षणाबद्दल कोणत्याही पूर्वतय्यारीत नसतो...अचानक तुमच्या कुटुंबाचा अढळ वाटणारा पाया तुटून पडतो.

आणि, जेव्हा या नात्यात आपली मुलं गुंतलेली असतात, तेव्हा तर वेदना अधिक खोलवर जातात.

हे आता फक्त तुमचंच हृदय तोडत नाही - तर ते त्या मुलांचं देखील हृदय तुटतं. नातेसंबंधातील या प्रकारचा धक्का हा केवळ जोडीदार गमावण्यापुरताच नसतो; तर आपण कल्पना केलेले आयुष्य गमावण्याबद्दल देखील आहे.

तुम्ही प्रत्येक गोष्टीवर प्रश्नचिन्ह लावता: आपल्या नात्यात काहीतरी खरं होतं का? मी पुरेशी/पुरेसा न्हवतो/न्हवते का? हे नातं मुलांसाठी एकत्र कसं टिकवता येईल?

सर्वात कठीण भाग म्हणजे एक संपूर्ण कुटुंब तुटणं.

आपल्या स्वतःच्या दु:खात बुडलेलं असताना, आपल्या मुलांना या वादळापासून वाचवण्याचा प्रयत्न करत, आपण फक्त विखुरलेले तुकडे उचलण्याकरिता उरतो...

हे एक भावनिक ओझं आहे, जे सहन करणे अशक्य वाटतं - परंतु तरीही तुम्ही ते सहन कराल, कारण तुम्हाला ते करावं लागेल.

या विध्वंसातून बरं होण्याची सुरुवात "वास्तविकता स्वीकारण्यापासून" होते, ते कितीही अन्यायकारक वाटत असलं तरीही.

दु:ख होणं, राग येणं, हरवल्यासारखे वाटणं ठीक आहे. पण तिथेच राहू नका. हळुहळू, तुम्ही पुन्हा तयार व्हाल-तुम्हाला सोडून गेलेल्यासाठी नाही, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी...

तुम्ही तुमचं सामर्थ्य पुन्हा शोधा, "कुटुंब म्हणजे काय" ते पुन्हा परिभाषित करा आणि स्वतःला सिद्ध करा की कोणाच्या जाण्याने तुमचं मूल्य किंवा तुमचे भविष्य निश्चित होत नाही.

हा प्रवास क्रूर आहे, परंतु तो बदलणाराही आहे. तुम्ही कदाचित स्वतःहून हा मार्ग निवडला नसेल, परंतु तुम्ही त्या खडतर मार्गावर कसं चालायचे, ते निवडू शकता.

एकावेळी एक पाऊल, लवचिकता आणि पुढे काय आहे याची आशा बाळगून.

लक्षात ठेवा: तुम्ही जे गमावलं, त्यापेक्षा तुमच्याकडे खूप जास्त आहे. जे उरलं, ते तुम्ही स्वतः आहात आणि आयुष्य पुन्हा सुरू करण्यासाठी ते पुरेसं आहे...!!!

- हेमंत महाकाळ

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

03 Dec, 04:39


📌 MPSC l UPSC : मार्गी अकॅडमी
G.S. Approach Batch.

👉 By : प्रवीण चव्हाण सर.

📝 MPSC Descriptive Pattern नवीन अभ्यासक्रमानुसार.

वैशिष्ट्ये :

✍️ प्रश्नोत्तर लेखनाचा सराव करून घेणे.

📚 Optional कोणता व कसा निवडावा.

📖 संदर्भ साहित्य कोणते वापरावे.

कालावधी : दर शनिवारी 2 तास. (अडीच महिने.)

🔺👉 पत्ता : S. M. Joshi Bhavan, पत्रकार भवन जवळ, नवी पेठ, गांजवे चौक, पुणे.

👉 Contact :
8793150523 / 9823059765

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

20 Nov, 05:52


"आमच्या प्रगतीच्या आड येणारी कोणतीही व्यक्ती असो किंवा संस्था असो, तिचा आपण तीव्र निषेध केलाच पाहिजे."

--विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर.

( नागपूर, ३० मे १९२०, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८, भाग १, पान नं. ७ )

#Social_revolution📍

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

20 Nov, 05:50


#मत हे आपल्याकडे असणारे एक समाज परिवर्तनाचे शस्त्र आहे. त्यामुळे समाजात पसरलेले, सामाजिक तसेच राजकीय दास्यत्व दूर करण्याकडे आपला प्रयत्न असावा. व आपला निर्धार प्रस्थापित व्यवस्थेला व पक्षाला आपण दाखवून द्यावा.

विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात,

"आम्ही सरकारला नेहमी अनुकूल असतो, म्हणूनच सरकार आमची नेहमी उपेक्षा करते. सरकार देईल ते घ्यावयाचे, सांगेल ते ऐकावयाचे, ठेवील तसे राहावयाचे अशी जी आमची #दास्यत्त्वाची वृत्ती होऊन गेली आहे, तीच सरकारकडून होत असलेल्या उपेक्षेचे मुख्य कारण आहे."

#vote📍
#MaharashtraElection2024

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

19 Nov, 18:23


*📑आपले विचार लिहून काढल्याने अनेक फायदे होतात !*

• आपल्या जगण्यात सूसूत्रता येते
- आपले Triggers आपल्या लक्षात येतात
- आपले Patterns आपल्याला समजतात
- लिहून भविष्यात आपलं लिखाण पुन्हा वाचल्याने आपण किती grow झालो आहेत याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो.
- confusion and conflicts resolve करण्यास मदत होते की आपण त्यावेळी काय कशाप्रकारे गोष्टी handle केल्या किंवा कशाप्रकारे चुकी झाली इत्यादी इत्यादी...
- स्वतःला Upgrade करता येतं.
- मनावरचा भार हलका होतो कारण आपण ते मन मोकळं करत असतो हवं ते लिहू शकतो

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

19 Nov, 15:20


उन्हातल्यांना उन्हातल्यांसाठी
सावली होता यायला हवं..
पुरूषाच्या जातीला येऊन
सुद्धा माऊली होता यायला हवं…!! ❤️🙌🏻

#आवडलेलं

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

19 Nov, 15:17


आपलं मत आपला खरा आवाज आहे.. बाकी समाजमाध्यमातून बोलणं किंवा रस्त्यावर उतरणं यापेक्षा जबरदस्त ताकद आपल्या बोटावर लागणाऱ्या शाईत आहे.. उद्या काहीही करून मतदान केंद्रावर पोहोचा.. आणि सद्सद्विवेक बुद्धीस स्मरून आपलं मत दान करा..❤️

#महाराष्ट्र

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

19 Nov, 12:01


विधानसभा निवडणूक महाराष्ट्र २०२४ 😊

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

19 Nov, 11:51


जागतिक महिला दिनी पुरुष मोठ्या उत्साहात साजरी करतात, मोठं मोठं लेख लिहून स्त्रियांचा गौरव करतात,
जेव्हा पुरुष दिन येतो त्याच महिला गायब असतात😴,
शेवटी पुरुषांना देखील मन असतं, भावना असतात माहिती असू द्या 🙂🙌🏻❤️

#पुरुषदिन
#MensDay2024

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

19 Nov, 11:50


पुरुषाने लपवलेल्या अश्रू मद्ये कित्येक त्याच्या इच्छा मेलेल्या असतात तरीही हसत राहण्याचं कसब नेहमीच त्याच्या अंगी असतं ...!

#पुरूषार्थ_दिन_वगैरे ❤️
#MensDay2024

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

19 Nov, 11:49


माणसान माणूस म्हणून जगाव..माणसासारख रहाव..जगण्यात माणुसकी नसली तरी चालेल..सध्याच्या काळात माणुस म्हणून जगण्यातही दडलेला असतो तुझा कुठेतरी पुरुषार्थ..

#HappyMensDay

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

19 Nov, 11:48


निवडणूक जनतेच्या मुद्द्यावर लढवली गेली पाहिजे एवढंच मला वाटत,
ते मुद्दे म्हणजे आया-बहिणींची सुरक्षा, तरुणांना नोकऱ्या, शेतमालाला भाव, चांगल्या वैद्यकीय सुविधा, माफक दरात शिक्षण, वीजेची सोय, रस्ते, वाहतूक, एवढंच.
बाकी मुद्दे गौण असावेत...🙏

#मतदान

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

17 Nov, 01:16


हातानेच् सगळं चांगले होते
हे माहिती असूनही,

लोक हातावरच भविष्य बघायला निघतात.....

तेजस्विनी प्र. राऊत. 
    
@TejuRaut

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

16 Nov, 14:50


पुस्तक वाचन हे पृथ्वीवरील सर्वात फायदेशीर
कामांपैकी एक आहे…❤️💯

आवडलेलं❤️

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

16 Nov, 12:12


प्रेम ही एक शक्तीच आहे, जी बहुदा अस्तित्वाच्या मूलभूत स्वरूपाचं अंगच आहे. प्रेम हा असा भाग आहे जो आपल्याला एका भव्य, वैश्विक रचनेशी जोडतो.
युगानुयुगांपासून समाजव्यवस्था आणि मानवी व्यवहार बदलत आले, पण प्रेमाचं हे महत्त्व आजही कायम आहे. ते शेवटपर्यंत राहील. म्हणूनच, मला प्रेम हे अस्तित्वाच्या मूलभूत स्वरूपाचं अंग वाटतं…🙌🏻

#राधा #प्रेम

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

16 Nov, 12:12


आयुष्य वाया घालवायचे 10 राजमार्ग -

१) इन्स्पिरेशन मिळेल याची वाट पाहत थांबणे.

२) लोक काय म्हणतील याची फिकर करत राहणे.

३) सतत तक्रार करणे.

४) सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न करणे.

५) स्वतःची इतरांशी तुलना करत राहणे.

६) त्याच त्याच चुकांची पुनरावृत्ती करणे.

७) परिपूर्णतेची वाट पाहत राहणे.

८) प्राधान्यक्रम निश्चित न करणे.

९) अपयशाची भीती बाळगणे.

१०) हवं असलेला आयुष्य न जगणे.

यातील काय काय तुम्ही करतात ? ते कधीपासून सोडणार ? कॉमेंट करून सांगा...

डॉ प्रशांत भामरे.

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

16 Nov, 12:11


प्रेम हे नऊ पाकळ्यांचं सुगंधी फूल आहे. विश्वास, संवाद, आदर, आनंद, संयम, तडजोड, विकास, आत्मीयता, आणि क्षमा. प्रेम दुर्मिळ असतं, असं तुम्ही म्हणता. त्यामागे हे कारण आहे. त्या फुलाचा सुगंध सगळ्यांनाच आवडतो आणि हवाहवासा वाटतो. पण या पाकळ्यांचं काय...??
त्यांना टवटवीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतातच. कारण पाकळ्या हेच फूल आहे. पाकळ्यांशिवाय फूल असू शकत नाही. प्रेमाचा इतका सूक्ष्मपणे विचार केला, तरच ते जपता येईल…❤️🙌🏻

#राधा #प्रेम

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

15 Nov, 17:35


आई ही आपल्या लेकरांसाठी आत्मसमर्पित होणारी इष्टदेवता असते, त्याच आईला आपण म्हातारणात तळहाताच्या फोडासारखं जपायचं असतं. ❤️

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

15 Nov, 14:24


प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न नेहमी येतोचं तो म्हणजे एवढ दुःखं माझ्याच वाट्याला का येत तो येणं स्वाभाविक आहे कारण जीवन म्हटलं सुखदुःखं हे आलंच हे वास्तविक सत्य कोणीच नाकारू शकतं नाही हा नियम सर्वांनाचं लागू होत असेल जी परिस्थिती आपल्या पुढे निर्माण झाली आहे तिचा स्वीकार करून आनंदाने जगायला काय हरकत आहे उलट त्या गोष्टींचा त्रास आपल्यालाच कमी होतो हे मी स्वतःलाचं अनुभवत आहे !,,,✍🏻

एकमन#लेखक

 

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

15 Nov, 10:53


काहींशी आपला अबोला होतो, भांडण होतं, वाद होतात. परिणामी संवाद खुंटतो. बोलणं दुरापास्त होतं. मोबाइलवर कधी कुणाचा नाव नंबर शोधताना अचानक काही क्षणासाठी अशा व्यक्तीचे नाव दिसले की काही वेळासाठी का होईना पण त्या व्यक्तीबद्दलच्या आठवणी उचल खातात. मन निमिषार्धासाठी भूतकाळात जातं. मात्र अवघ्या काही क्षणात आपण पुन्हा आपल्या कामात गढून जातो.

मन पुन्हा कधी तरी उचल खातं, आपण मनाचा हिय्या करतो. झालं गेलं विसरून जातो, बोललं पाहिजे मन मोकळं केलं पाहिजे या जाणिवेने फोन करतो!
सेकंदात फोन डायल होतो, डायल टोन ऐकू येतो पण रिंग वाजत नाही.
फोन स्विच ऑफ असल्याचं यंत्रवत उत्तर येतं.
काही क्षण आपण पुन्हा आठवणीत गढून जातो.
मनात अनेक विचार येऊन जातात.

आपण पुन्हा आपल्या दिनचर्येत व्यस्त होतो. दिवसामागून दिवस जातात, अधून मधून त्या व्यक्तीच्या आठवणींची वीज चमकून जाते मात्र आभाळ बरसत नाही.
काळ आपल्या गतीने पुढे जात राहतो.
एखाद्या दिवशी काही जुनी जाणती माणसं भेटतात. माणसांच्या गप्पा रंगतात. मध्येच वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला जातो.
त्यातच कुणीतरी त्या व्यक्तीचा उल्लेख करतो, त्यासरशी आपली नजर चमकते मात्र तितक्यात एकजण सांगतो, "अरे ते तर बऱ्याच दिवसांपूर्वी गेले! बरेच दिवस अंथरुणाला खिळून होते. आपल्या सर्वांची ते खूप आठवण काढत होते. मी वेळ काढून जाऊन भेटून आलो. त्यांच्या घरच्या लोकांना खूप आधार वाटला. तुम्ही गेला होतात की नाही?"

त्या नंतरच्या चर्चेत गप्पांत आपण केवळ देहरूपाने असतो.
आपण खाली मान घालून बसलेले असतो, आपले डोळे डबडबलेले असतात, मनात अपराधाची भावना दाटून आलेली असते.
आता त्यांची भेट पुन्हा कधी होऊ शकणार नाही याचा सल आयुष्यभर सोबत राहणार या जाणिवेने अस्वस्थ होतो!

किमान जीवश्च व्यक्तींसोबतचा अबोला, विसंवाद वेळीच मिटवता आले पाहिजेत! गतकाळात आपण बोलायला हवं होतं, न जाणो पुन्हा त्यांच्याशी भेट होईल की नाही ही बाब आपल्या गावीच नसते.

जगण्याची गती बऱ्याचदा आपल्याला आत्मकेंद्रित करते, अहंकारी करते. नमतं घेण्यात कमीपणा वाटू लागतो नि मग उरतो क्लेशदायक सल, टोकदार आठवणींचा!

क्षमा करण्यासाठीही मनोधैर्य, औदार्य लागतं. ते सहजी अवगत होत नाही!
मला हे लवकर जमले नाही. पश्चात्तापाचे ओझे आता सोबतीला असते!

- समीर गायकवाड

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

15 Nov, 08:07


*धान्याबरोबर विचारांची ही उफणणी करावी लागते ...*
*मग विचार ही स्वच्छ आणि पेरण्याजोगे होतात..😊*

*
@prasad🩷*

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

12 Nov, 09:00


स्वतः शिकत राहणारे आणि इतरांपर्यंत ते पोहोचविण्याची इच्छा असणारे लोक खूप महत्वाचे असतात... आपण पण त्यातले ऐक होऊ या!📚❤️

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

12 Nov, 08:59


उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत.

ऑनलाईन परीक्षा ज्यात एकापेक्षा जास्त शिफ्ट आणि त्यामुळे होणारा नॉर्मलायझेशनचा खेळ याविरोधात विद्यार्थी लढत आहेत.

खाजगी केंद्र हा देखील वादाचा मुद्दा झालाय.

#MPSC

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

12 Nov, 08:59


माझं एक स्वप्न आहे, मला वॉरेन बफेट सारखं वाचायचं!📚

- रोज वाचनासाठी ठराविक वेळ बाजूला ठेवायचा
- रोज ५०० पानं वाचायची

पहिली पायरी चांगली जमतीये. आता लक्ष दुसऱ्यावर!🎯

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

12 Nov, 04:17


@Shabdshailee

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

12 Nov, 04:16


निलेश अभंग यांची फेसबुक पोस्ट ―
        सिनेमा पटकथालेखक जावेद अख्तर एका ठिकाणी त्यांच्या मुलाखतीत म्हणतात की उत्तम, चवदार अन्नपदार्थ बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो मुबलक असावा लागतो, मसाल्यांची उपलब्धता असावी लागते जे काही ठिकाणी (बिहार, ओडिसा ह्या राज्यांची नावे घेतल्याचे आठवते, चुकभूल द्यावी घ्यावी) तेथील लोकांच्या असलेल्या गरिबीमुळे उपलब्ध नसते. त्यामुळे अन्नाला चव येण्यासाठी ते लोक मिरचीचा भरपूर उपयोग करतात. मराठवाडा, नगर जिल्ह्यातील लोक तिखट कालवणं का खातात, याचे गमक इथे आहे.

कारण चव येण्यासाठी जे मसाले लागतात, पदार्थ लागतात, ते त्यांच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे वापरू शकत नाही. म्हणून भरपूर मिरची घालून ते आपली चवीची भूक भागवून घेतात.

आमचा एक चुलता होता, आता हयात नाही, नाक्यावर बांधकाम मजुरी करायचा, शेजारीच राहायचा, आमच्या लहानपणी तो भाकरीभाजीसोबत कच्ची हिरवी मिरची दाताने करंडून खात असे.

आम्हाला तो भाकरीसोबत मिरची करंडून का खायचा याचे नवल वाटे, मात्र जावेद अख्तर यांची मुलाखत पाहिल्यानंतर त्याचे कारण कळले.

माणसाच्या रोजच्या अन्नातले मिरचीचे प्रमाण कमी होत जाणे हे त्याची आर्थिक परिस्थिती सुधारत चालल्याचे लक्षण आहे.

तर हे मिरची पुराण सांगण्याचे कारण असे की हल्ली stand up comedians कॉमेडी करताना सतत लिंगवाचक शिवीगाळ करत असतात. त्यांच्या सादरीकरणात कॉमेडी कमी, शिव्याच अधिक असतात. इतक्या शिव्या असतात की पाहायला कंटाळा येतो.

तर जावेद अख्तर अशा कमेडियन्ससंदर्भात म्हणतात की जसे गरीब आर्थिक परिस्थिती असलेले लोक अन्नपदार्थाला चव यावी म्हणून (मजबुरीने) मिरचीचा भरपूर उपयोग करतात तसे ह्या कमेडियन्सकडे Content ची कमी आहे, यांच्या Content मध्ये Problem आहे, त्यामुळे हे सादरीकरणात जीव आणण्यासाठी सतत शिव्या वापरत असतात.

- निलेश अभंग, कल्याण

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

11 Nov, 17:05


धैर्यवान होण्यात शहाणपण आहे...!!!

फक्त आणि फक्त संयमच माणसाला सर्वात जास्त आणि योग्य आधार देतो.

जगात तुम्हाला असा एकही माणूस सापडणार नाही, ज्याने आपल्या जीवनात अडचणींचा सामना केला नसेल आणि या अडचणी आल्यावर अधीर न होणारे लोक तर फार कमी आहेत.

आपलं अधीर होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्याला भविष्यात येणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण आजच्या आजच करायचं आहे, जे अशक्य आहे.

आणि, जेव्हा आपल्याला कोणत्याही अशक्य गोष्टीची इच्छा असते, तेव्हा चिडचिड नक्कीच होते आणि ही चिडचिडच आपला संयम हिरावून घेते आणि आपल्याला अधीर बनवते.

केवळ आपल्यातील संयमच हळूहळू अशक्य वाटणाऱ्या गंतव्याला आपल्या यशात बदलू शकतं.

वर्तमान हे जीवनाचं सत्य आहे. आयुष्यात तुम्हाला एकाच वेळी सर्व काही मिळत नाही. जसं एका बीजाला झाड होण्यासाठी वर्षे लागतात. पण फळं येण्याची वाट पाहण्यात झाड कधीच अधीर होत नाही आणि योग्य वेळेची धीरानं वाट पाहत असतं.

त्याचप्रमाणे, आपल्या आयुष्यातही चांगला किंवा वाईट काळ येतो, तेव्हा "संयम बाळगणं" ही सुद्धा सर्वात मोठी कला आहे. आपण आपल्या स्वतःवर इतका विश्वास ठेवला पाहिजे की काहीही झालं तरी आपल्यात इतकं सामर्थ्य असलं पाहिजे की आपण भविष्यात येणा-या प्रत्येक समस्येला तोंड देऊ शकू.

त्यामुळे धीर धरणं हे शहाणपणाचं आहे...!!!

- हेमंत महाकाळ

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

11 Nov, 13:43


जबरदस्तीने नाते ओढता येते
पण....

समजदारी म्हणते, सोडलेलं बर...

तेजस्विनी प्र. राऊत
  
@TejuRaut

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

10 Nov, 15:45


अगोदर याच झेंड्यासाठी शाळेत भांडायचो, आणि मिळाला की कंपास मध्ये लावायचो 😄

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

10 Nov, 15:45


स्वप्नं विकायला काढलेला एक तरूण भेटला
त्याला विचारलं, "इंद्रधनुष्य आहे का तुझ्याकडे?"
रूक्ष चेहऱ्याने तो उत्तरला, "आहे! पण ते दिसण्यासाठी पाऊस हवा!"
तपकिरी उन्हांचे दिवस होते, पाऊस कोठून आणणार?
बहुधा त्याचं कुठलंच स्वप्न कुणी विकत घेतलं नव्हतं,
आता मला हवी असणारी चीजही त्याच्यापाशी नव्हती
त्याचा चेहरा हिरमुसून गेला
नि डोळे आसावले
मग जाऊन त्याच्या डोळ्यात दिसलं इंद्रधनुष्य!

खेरीज दिसला त्रिकोणी थवा पक्षांचा आणि
निरभ्र आकाशाखाली पियानो वाजवत बसलेला एक म्लान तरूण.
माझ्या चेहऱ्यावर समाधान विलसले, तो ही प्रफुल्लित झाला.
त्याला मदत द्यावी म्हणून हात खिशाकडे जाताच
काकुळतीला येत त्याने हात जोडून नकार देत म्हणाला,
"या इंद्रधनुष्याचे फार ओझे होते, बरे झाले तुम्ही खरेदी केलंत!
तसेही इथं माझं काही उरलं नाही
या बेरंग जिंदगीच्या पलीकडे माझे जग आहे!"

ते ऐकून कसनुसे वाटले
बऱ्याच वेळाने घरी परतल्यावर लक्षात आले,
त्याने हात जोडले होते खरे पण त्याच्या हाताला बोटे नव्हती.
बोटांच्या जागी पियानोच्या काळ्या पांढऱ्या कळा होत्या,
त्यांच्या देहांतर्गत एक वाहती नदी होती जिचा ध्वनी त्याच्या आवाजात सामावला होता.
तो बोलताना रिक्विमचा ध्वनीभास झालेला!

मला क्षणभरातच मोझार्ट आठवला!
मोझार्टचे मरणाआधीचे उद्गार होते,
"मी अशा काही गोष्टींची अनुभूती घेतोय ज्या या पृथ्वीतलावर अस्तित्वात नाहीत!"

- समीर गायकवाड.

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

10 Nov, 14:12


अटी-शर्ती लावुन “व्यवहार” होतात “नाती” नाही!!

कोणतही नातं टिकवण्यासाठी एकमेकांशी कुठल्याही परिस्थितीत जुळवुन घेणे वा समायोजन करणे पुरेसं असतं आनंदी आयुष्य जगायला!

आता आपले आई-वडील ह्यांच उदाहरण घ्या!! कोणत्याही कठीण परिस्थितीतही आयुष्य काढत आहेत आनंदाने!🙏

#आयुष्य

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

10 Nov, 11:56


*स्वराज्यधर्माच्या आड येणाऱ्या यवन राक्षसाला बुद्धीच्या शस्त्राने संपवून केलेल्या प्रजा अन धर्म रक्षणाची शौर्यगाथा म्हणजे शिवप्रताप दिन..*

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

10 Nov, 08:28


१० नोव्हेंबर १६५७ ल अफजलखान ल प्रतापगड पायथ्याला संपवले"#शिवप्रतापदिन.
स्वतः औरंगझेब अफजल खाना हातातून बीदर किल्ल्या वेढ्यत मरता मरता वाचला होता.अफजल खान मेल्या ची बातमी मुळे छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारतात प्रसिद्ध झालेले. आसाम बंगाल अफगाणिस्तान इराण मध्ये प्रसिद्ध पावले
अफजलखान वध ल इतिहासात अनन्य साधारण महत्व कारण अफजलखान हा तत्कलिन सेनानी मध्ये धुरंधर आणि कपटी होता. मात्र ह्या गोष्टीवर पाहिजे तितके संशोधन झाले नाही हेच दुर्दैव
मोहम्मद आदिलशाह नंतर आदिलशाही मध्ये जे काही मोजके सेनानी मुळे आदिलशाही टिकून होती. त्यात शहाजी महाराज ,अफजल खान ,खान मोहम्मद ह्यांचा समावेश होता.
अफजलखान ही खरी तर एक पदवी आहे ह्याचे खरे नाव अब्दुल्लाखान असे होते.विजापूरच्या दरबारातील मुदपाकखान्यात असणाऱ्या भटारणीचा हा पुत्र असावा असे लिहला गेले.शहाजी महाराजांचे जवळचे मित्र रणदुल्ला खान ह्याचा अफजल खान हा शिष्य पण रणदुलाखानाचा काही गुण घेतले पण काही चांगले गुण घेतले नाहीत. एकेकाळी अफजलखान आणि शहाजी महाराज रणदुलाखाना साठी लढले. पण नंतर रणदुलाखानाचा मृत्यू झाला आणि शहाजी महाराज आणि अफजलखान हेच दोन खंदे वीर राहिले.त्या दोघात खूप मत्सर द्वेष होता. शिवाजी महाराजांचा मोठा भाऊ संभाजी महाराज सुद्धा याच अफजलखानाने कपटाने मारले.
औरंगझेबाने शहाजहानला ५७ साली लिहिलेल्या एका पत्रात अफजलखान हा रणदुलाखानाचा सेनापती असून त्याला बादशहा आदिलखानाने पुत्र म्हणवून मोठी दौलत दिली आहे असा एक उल्लेख आला आहे.
सन १६३८ ते १६४४ या काळात त्याने दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर शौर्य गाजवून आपल्या नावाचा दबदबा निर्माण केल्याचे दिसून येईल. या काळात त्याने बेदनूर, श्रीरंगपट्टण, कर्णपूरम चिकनायकनहळ्ळी येथील संस्थानिक राजांचा पराभव करून त्यांना अक्षरशः देशोधडीला लावले. मदुरा, कांची यांच्यासारखी समृद्ध शहरे लुटली. सन १६४३ मध्ये अफझलखानाच्या नुसत्या दहशतीनेच सिद्दी अंबरने रणदुल्लाखानासमोर शरणागती पत्करली तर त्याने शिरेपट्टणच्या कस्तुरीरंगाला दग्याने ठार केले. दक्षिण भारतातल्या केंगनायका सारख्या दिग्गजाला हरवून त्याने बसवपट्टणचा महत्वाचा किल्लाही ताब्यात घेतला.

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

10 Nov, 08:26


१० नोव्हेंबर १६५९.

स्वराज्यावर चालून आलेला 'अफजल्या' नावाचा ३२ दाताचा बोकड शिवरायांनी टराटरा फाडला होता.

"राजीयाने अफजल मारिला ,
कर्म केले, यश आले."

। शिवप्रताप दिन । 🚩

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

10 Nov, 08:23


संयम हे फक्त वाट पाहणंच नाही, तर "आपलीही वेळ येईल" यावर सक्रियपणे विश्वास ठेवणं आहे.

या विश्वासाला मूर्त रूप देताना, तुम्ही आशेचे आदर्श बनता, इतरांना अखंड विश्वासाची शांत शक्ती दाखवता.

जेंव्हा तुम्ही प्रार्थना करता आणि मोठं मोठ्या संकटातही तग धरून राहता, तुम्ही फक्त तुमच्यासाठीच नाही, तर तुमच्याकडे पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक मार्ग उजळता.

तुमच्या कृतींना, तुमच्या आशेबद्दल सांगू द्या आणि तुमची प्रार्थना, तुमच्या सहनशीलतेमध्ये परावर्तित होऊ द्या.

सद्गुणांचे हे मिश्रण तुम्हाला मार्गदर्शक प्रकाश बनवते, इतरांसाठी त्यांच्या स्वत: च्या संघर्षात संचालन करणाऱ्यांसाठी एक प्रेरणादायी दिवा बनवते.

विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा आणि लक्षात ठेवा: जेव्हा तुम्ही तुमच्या उदाहरणाने नेतृत्व करता, तेव्हा तुमच्या चारित्र्याची ताकद अधिक चमकते...

इतरांच्या वाटेत खोडे टाकण्यापेक्षा, त्यांचे वाटाडे बना...!!!

- हेमंत महाकाळ

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

10 Nov, 05:52


योग्य नियोजन अन, परफेक्ट कार्यक्रम🤺
म्हणजेच
🙏🚩 *शिव प्रताप दिन* 🚩🙏

१०नोव्हेंबर १६५९म्हणजेच ३६५"वर्षापूर्वी परफेक्ट मॅनेजमेंट म्हणजे काय"? याच उत्तम उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांनी
👉प्रतापगडाच्या भोरप्या डोंगरावर साडेसहा फूट उंचीचा धिप्पाड अफजलखान मारायला ४ फुटाच्या तलवारीचा नाही तर ४ इंचाच्या वाघनखाचा उपयोग करून जगाला संदेश दिला की
🚩आतंकवाद असाच संपवला पाहीजे🙏
🛑
जेव्हा तल्लख बुद्धीने केलेला जीवघेणा वार एखाद्या दाहक शस्त्राच्या वारापेक्षा घातक ठरतो तेव्हा प्रतापगडावर साजरा होतो.....
*शिवप्रतापदिन*...🔥🚩

🤺🧡💪 *हर हर महादेव*💪🧡🤺

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

10 Nov, 05:52


१० नोव्हेंबर, मार्गशीर्ष शुध्द सप्तमी, १६५९, रोजी श्रीमन्छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी वध केला व अफजलचे शीर कापुन घेऊन जाताना जिऊ महाला.

बडोदा संग्रहालय मध्ये पुरुषोत्तम बंदिष्टी यांनी १८२१ साली लिहिलेल अफझल वधाचे शिव काव्यातील एक दुर्मिळ हस्तलिखित चित्रण.🙏🏼🙏🏼🚩🚩

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

02 Nov, 16:01


प्रत्येक चमकणारी गोष्ट सोन नसते,

तसेच प्रत्येक् हसणाऱा व्यक्ती खुश असतोच अस नाही,

कधी कधी जबाबदाऱ्या, आपली माणसं यासाठी हसावं लागत......

तेव्हा आरशात स्वतः चा चेहरा बघताना आरसा म्हणतो कसा,

" काय सराइतपणे हसण्याची कला अवगत केली....."
आता त्याला कोण सांगाव, त्याच्यात जीव असता तर त्यानेही तेच केल असतंस.....!

बरोबर ना...???

- तेजस्विनी प्र. राऊत
  
@TejuRaut

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

02 Nov, 06:08


ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...💫

#दिवाळी🪔

सौजन्य : राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

02 Nov, 05:26


...ॲसिड ॲटॅक झालेल्या महिलांवर उपचार करणं, त्यांच्या विद्रुप झालेल्या चेहर्‍यावर स्वखर्चानं प्लॅस्टिक सर्जरीसारखी महागडी ऑपरेशन्स करणं, त्यांच्यावर मानसिक उपचार करुन त्यांच्या मनाला उभारी देणं आणि त्यांना स्वत:च्या पायांवर उभं रहाण्यासाठी सगळी आर्थिक मदत करणं...
ही सगळी कामं तो गेली कित्येक वर्ष करतोय !

...आपल्या आईवडिलांच्या आठवणीसाठी नानावटी हाॅस्पीटलमध्ये त्यानं लहान मुलांच्या कॅन्सरवरच्या उपचारांसाठी एक वाॅर्ड उभा केलाय, ज्यासाठी तो सतत मोठ्ठी आर्थिक मदत करत असतो !

...२०१२ साली त्यानं देशभरातली बारा खेडेगांवं दत्तक घेतली. तिथं स्वखर्चानं वीज-पाणी-शाळा आणि औषधं अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम त्यानं केलं. अजूनही तिथं नवनविन सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचं काम तो आजतागायत करतोय !

...२००८ साली बिहार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यानं जगभर लाईव्ह काॅन्सर्टस् करून तीस दशलक्ष रूपये जमा करुन दिले ! २०१५ मध्ये चेन्नई पूरग्रस्तांसाठी एक कोटी रूपये.. २०१३ मध्ये उत्तराखंड पूरग्रस्तांसाठी तेहेतीस लाख रूपये.. तर डाॅ. मनमोहन सिंग यांच्या 'त्सुनामी रिलिफ फंड'साठी पंचवीस लाख रूपये त्यानं स्वत:च्या खिशातून दिले !

...एक पत्रकार त्याची मुलाखत घेऊन परत जात असताना, त्या पत्रकाराचा ॲक्सीडेंट झाला.. तो गंभीर जखमी झाला. मृत्यूशी झुंज सुरू झाली.. अशावेळी त्या पत्रकाराचा बरा होईपर्यन्तचा सगळा हाॅस्पीटल खर्च त्यानं उचलला, जो दर दिवशी दोन लाख रूपये होता !

...भारतभरातल्या झोपडपट्ट्यांमधल्या लहान मुलांच्या छोट्या-मोठ्या इच्छा-स्वप्न पूर्ण करणार्‍या 'मेक अ विश फाऊंडेशन' या समाजसेवी संस्थेबरोबर तो काम करतो !

...२००९ मध्ये ओरीसामधल्या सात खेडेगांवांमध्ये त्यानं स्वखर्चानं सोलर इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट सुरू केले.. ज्यामुळे स्वातंत्र्यानंतर तब्बल ६१ वर्षांनंतर त्या गांवांमध्ये 'लाईटस्' आले !

...आयपीएल सिझन सात मध्ये त्याची टीम विजेता ठरली. बक्षिस म्हणून पंधरा कोटी रूपये मिळाले. ती सगळीच्या सगळी रक्कम त्यानं मुंबई आणि कलकत्त्यामधील गरीब कॅन्सर पेशंटस् वरील उपचारांसाठी दान करून टाकली !

...महाराष्ट्रातल्या आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटूंबीयांसाठी त्यानं जगभर काॅन्सर्ट करुन कोट्यावधी रूपये उभे केले तर इंडीयन आर्मीमधील जवानांसाठी सात कोटी रूपये दिले !

...कोरोनाकाळात त्यानं स्वत:चं चार मजली ऑफीस बीएमसी ला दिलं. लाॅकडाऊनमध्ये मुंबईत १००० गरीब कुटूंबांना तेल, पीठ, तांदूळ, डाळ इत्यादी सामान पुरवलं. अगदी हातावर पोट असलेल्या २००० लोकांना रोज ताजं अन्न दिलं. बंगालमधल्या अतिशय दुर्गम खेड्यापाड्यांमध्ये जाऊन राशन आणि सॅनिटायझर पुरवले.

शाहरूखच्या समाजकार्याबद्दल काय काय सांगू? मी लिहीत जाईन पण तुम्ही वाचून वाचून थकून जाल. त्याच्याविषयी कुणी कितीही अफवा पसरूद्यात. कुणी म्हणेल पाकिस्तानला त्यानं ह्यॅव दिलं आणि त्यॅव दिलं. सगळ्या थापा आहेत हो. अहो, अन्नदान करतानासुद्धा धर्म बघून करणार्‍या त्या दळभद्र्या जमाती... त्यांना 'द ग्रेट शाहरूख खान' कसा झेपणार? त्यांनी कितीही ट्रोल केलं तरी सगळ्या जगात शाहरूखनं भारतीय कलाकारांचा सन्मान वाढवलाय हे सत्य लपणार नाही !

...त्यानं केलेल्या समाजोपयोगी कार्यासाठी त्याला जर्मनीमध्ये झालेल्या २० व्या युनेस्को अवाॅर्डस् मध्ये स्पेशल अवाॅर्ड देऊन सन्मानित करण्यात आलंय.

...साऊथ कोरीयानं त्याला 'गुडविल ॲम्बॅसीडर' म्हणून सन्मानित केलंय.

...इंग्लंडमधल्या सर्वात मोठ्या 'लाॅ युनिव्हर्सिटी'तर्फे त्याला ह्यूमन राईटस् आणि ॲक्सेस टू जस्टिस ॲन्ड क्राईम मधील कार्यासाठी स्पेशल डाॅक्टरेट देण्यात आलीय.

तो फक्त अभिनयातला बादशाह नाही, तर 'माणूस' म्हणून सुद्धा किंग आहे ! सलाम शाहरूख खान... कडकडीत सलाम !! कुठल्याही सच्च्या भारतीयाला तुझा अभिमानच वाटेल.. आज तू साठाव्या वर्षात पाऊल ठेवतोयस. तुला वाढदिवसाच्या मनाच्या तळापास्नं शुभेच्छा ❤️

- किरण माने.

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

02 Nov, 02:39


राजा हा नेहमी गोरगरीब जनतेच्या हृदयात जन्माला  यावा लागतो तेव्हा कुठे सिंहासन उभी राहतात. 🚩

रयतेचं राजं छत्रपती शिवाजी महाराज 🧡

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

01 Nov, 15:00


मुहूर्ताची दिवाळी
आणि
मनांची दिवाळी एक व्हावी,
बाहेर उजळलंल जग पाहता
स्वतःच जग आतून तेवढंच उजळलेले असावं,
दिव्यांची लखलखाट आणि रोषणाई पाहता
नात्यांमध्ये तितकीच रोषणाई यावी,
मिठाई चा गोडवा माणसांच्या संभाषणांमध्ये असावा,
अत्तरांचा सुगंध सहवास,प्रेम,आदर यातून दरवळावा.
-Anjalib

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

01 Nov, 10:02


भालचंद्र नेमाडे सरांच्या नव्या कवितासंग्रहातून

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

01 Nov, 10:02


सगळा ताण, तणाव थकवा, दु:ख  बाजूला सारून गरीबानां आनंद साजरा करण्याचं आणि जगण्याचं नवीन बळ पुरवते दिवाळी..!❤️
#दिवाळी

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

01 Nov, 10:01


“माणसाच्या जीवनामध्ये अविवेक हाच त्याच्या दु:खाला कारणीभूत असतो..

या अविवेकाची माणसाच्या मन:पटलावर काजळी जमा झालेली आहे, ती काजळी ‘फेडून’ मी तेथे विवेकाचा नंदादीप पेटवितो..

त्यामुळे अखंड दिवाळीचा आनंद मिळतो” असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात..!❤️❤️

#दिवाळी #विवेक

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

31 Oct, 11:59


मेरे कमरे को सजाने की तमन्ना है तुम्हे,
मेरे कमरे में किताबो के सिवा कुछ भी नही!

©हजरत जौन एलिया

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

31 Oct, 07:29


आज तीने घरच्या सगळ्यासाठी काहींना काही वस्तू आणल्या होत्या,ती स्वतः मात्र मागे पडली होती.
तीने मागील दोनतीन दिवसात खमंग फराळ बनवला होता, मात्र ती खरकटी उचलत् बाजूला होती.
घराची साफसफाई करून ती पार थकून गेली होती, पण मनावरची धूळ मात्र अधिकच वाढली होती....
दारात, अंगणात रांगोळी मात्र सुरेख रेखाटली होती पण ती कुठेतरी बेरंग होत चालली होती.
फटाक्याचा आवाज सगळीकडे घुमत होता,पण त्याच आवाजात तिचा आवाज दबला होता......
एक नव्हे अनेकदा तीने दिवे जाळून प्रकाश निर्माण केला होता, पण ती मात्र नेहमी अंधारातच होती......

मित्रा, दे शुभेच्छा तिला, मग बघ कशी उजाळते तुझी लक्ष्मी....

आता ऐक सखे, एक पणती तुझ्यासाठी लाव
होऊ दे उजेड, तुझ्या गुणांचा, तुझ्या संयमाचा, तुझ्या शांततेचा आणी तुझ्या अस्तित्वाचा......

दिवाळी फक्त तुमचीच का, दिवाळी आपल्या सगळ्यांची.......

शुभ दिपावली.....💐💐💐

तेजस्विनी प्र. राऊत
 
@TejuRaut

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

30 Oct, 07:48


कोणत्याही सणाला भरपूर पैसे असावे अस काही असत का???
दागिने, सोन नाण, पैसा अडका यांनी आनंद साजरा होतो का???
भरजरी साडी, अन बुट्टेदार कुर्ता घातला म्हणजे चैतन्य येत का??

हे सगळं लागत.....पण गरजेचेच असते असे नाही....

मग काय हवं असतं?????

" आपली प्रिय माणसं "

सणं झोपडीतही साजरा होतो आणी महालात ही...
पण समाधानी तेच असतात,जिथे हक्काची माणस असतात.....

ही दिवाळी मिळून साजरी करूया...
गरज आहे आता प्रेम वाटण्याची...

तेजस्विनी प्र. राऊत
  
@TejuRaut

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

30 Oct, 06:26


🔄महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) : 2025
🔄महाराष्ट्र गट सेवा परीक्षा : 2025
परीक्षांसाठी उपयुक्त....
---------------------------------------------------
🟢संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब आणि क)

📝15 प्रॅक्टिस पेपर्स
विस्तृत स्पष्टीकरणासह
--------------------------------------------------
🧬 पुस्तकाची वैशिष्ट्ये🧬

➡️➡️आयोगाच्या नवीन पॅटर्ननुसार प्रश्नांची रचना.

➡️➡️बहुपर्यायी/विधानात्मक वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश.

➡️➡️प्रत्येक प्रश्नांचे विस्तृत स्पष्टीकरणासह विश्लेषण.

➡️➡️अधिप्रमाणित संदर्भ पुस्तकातून प्रश्नांची निर्मिती.
-------------------------------------------------
📣🔴महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🔴

महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

📣आजच खरेदी करा

खरेदी करण्याची Amazon लिंक-
https://amzn.to/3ZwTAdr
https://amzn.to/3ZwTAdr
https://amzn.to/3ZwTAdr
---------------------------------------------
📞📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

30 Oct, 04:51


@Shabdshailee

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

30 Oct, 02:24


निर्णय आप आपला...

विज्ञानानं आपल्याला प्रत्येक चूक सुधारण्यासाठी काही ना काही मार्ग दिलेला आहे...

उदाहरणार्थ,
मोबाईलमध्ये चुकून मेसेज पाठवला गेला, तर तो 'डिलीट फॉर ऑल' करता येतो.

कॉम्प्युटरमध्ये काही चुकीचं टाईप झाल्यास बॅकस्पेस बटनाने उडवता येतं.

पेन्सिलने काही चुकीचे लिहिल्यास, खोडरबर ने सर्व पुसून टाकत येतं.

पेनाने लिहिताना, काही चुकीचं लिहिलं गेल्यास इंक फ्लूईडने किंवा व्हाइट मार्केर ने मिटवता येतं.

अहो येवढंच काय, निसर्गानं आपलं शरीर देखील असं बनवलं आहे की शरीरातील घाण बाहेर टाकण्याची देखील सोय केली आहे.

मग सांगा बरं, जिथं आपलं शरीर आपल्या आत कोणतीही घाण राहू देत नाही, तर मग आपण जुन्या वस्तू, जुन्या गोष्टी, ज्याच्यामुळे कधी काळी आपल्याला दुःख झालं होतं, त्या घाणीच्या रूपाने आपल्या आत-आपल्या मनात का साठवून ठेवतात...???

आपल्यातील सर्व विकार दूर करून आपण स्वतःला मुक्त का करत नाही?

आपला स्वभाव, आपल्याला प्रत्येक चूक सुधारण्याची संधी देतो. मग आपल्या मनावर मणभर ओझं वाहवत असतो...?

आपण आपलं मन जितकं हलकं ठेवू, तितकं आनंदी जीवन जगू शकू. या ओझ्यापासून आपण स्वतःला मुक्त करावं, कारण ते आपल्यावर इतर कोणी लादलेले नाही, तर ते आपलंच संकलन आहे.

दु:ख कधीच कमी होणार नाही,
आपली कितीही इच्छा असली तरी  सुख-दु:ख येणं कधी बंद होणार नाहीय...

सर्व काही असंच चालू राहील, एक दिवस आपणच या जगात राहणार नाही.

तुम्ही तुमचं चार दिवसांचं आयुष्य, जितकं शांततेनं जगाल, तितकाच तुम्हाला आनंद मिळेल.

आपल्याला मिळलेल्या वेळेचं काय करायचं हे आपणच ठरवलं पाहिजे

आपण आपलं जीवन कसं जगायचंय, "ओझ्यासह की ओझ्याशिवाय", हा निर्णय तुमचा स्वतःचा आहे...!!!😊😊😊

- हेमंत महाकाळ

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

30 Oct, 02:24


रामदास आठवले हे पृथ्वी तळावरील सर्वात सुखी राजकीय नेता.निवडणूक कोणतीही असो,आठवलेंना ना जागावाटपाचा मोह,ना अपेक्षा.असे मनाचे वैराग्य दुर्मिळच.
निवडून कोणीही आघाडी येऊ दे,हा मनुष्य त्यात मंत्री असतो.याला राज्यसभेवर निवडून आणण्याची जबाबदारीही इतर राजकीय पक्षांवर.

मज्जानू लाईफ.😄

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

30 Oct, 02:20


प्रेम हे एखाद्या मुक्त अभयारण्याप्रमाणे असलं पाहिजे, युद्धभूमीसारखं नाही.

ज्या क्षणी, दोघांतील एक जोडीदार, त्या अभयारण्याचा अनादर करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा लढाईचा जन्म होतो आणि त्या नात्यात युद्धभूमी तय्यार होते.

विश्वासघात केल्यामुळे, ज्या पायावर संपूर्ण नातेसंबंध बांधला जातो, तो पायाच भंगतो.

फसवणूक ही एक अशी निवड आहे, जी व्रण सोडते, जे व्रण बरे होण्यासाठी आयुष्यभर लागू शकतं.

ज्यामुळे केवळ नातेसंबंधच नव्हे, तर आत्म-सन्मान, सुरक्षिततेची भावना आणि एखाद्याच्या जोडीदारावरचा आत्मविश्वास, दुरुस्त न होण्या इतपत खराब होतो.

अनेक लोकांचा असा विश्वास आहे की जर एखाद्याच्या गरजा पूर्ण होत नसतील, तर "फसवणूक करणे" वैध आहे.

पण हे खरंच वैध आहे का?

जोडीदाराला प्रचंड वेदना आणि विश्वासघात करण्या इतकं, हे पुरेसं चांगलं कारण आहे का?

खरं प्रेम, तुमच्या सर्व गरजा पूर्ण करणारी व्यक्ती शोधणं नाही; तर हे अश्या एखाद्या व्यक्तीला शोधण्याबद्दल आहे, जो तुमच्याबरोबर वाढण्यास आणि बदलण्यास इच्छुक आहे.

परंतु, एकमेकांपासून रहस्ये लपवून ठेवणं आणि सीमा ओलांडणं, हे कधीही योग्य उत्तर नाहीय. आणि कधीही होणार नाही.

फसवणूक हे फक्त कृतीपर्यंतच थांबत नाही; तर हे नंतरच्या परिणामावर देखील अवलंबून आहे.

ज्याची कधी अश्याप्रकारे फसवणूक झाली आहे, त्यांना ह्याची वेदना माहित आहेत. त्यांना माहित आहे की व्यभिचाराचे डाग किती खोलवर जातात आणि भविष्यात, इतर कोणी जरी त्यांच्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर त्याचा देखील परिणाम होतो.

आणि म्हणूनच लोकं म्हणतात, 'संवाद ही गुरुकिल्ली आहे'.

तुम्हाला कदाचित दिवसाच्या प्रत्येक सेकंदाला तुमच्या जोडीदाराशी कनेक्टेड वाटत देखील नसेल, आणि निश्चितच असेही दिवस येतील, जेव्हा बंध तुटण्याची शक्यता येईल, पण हेच दिवस एकमेकांप्रती प्रामाणिकपणा, आदर आणि निस्सीम प्रेम ओळखण्याचे-वाढवण्याचे निश्चित क्षण आहेत.

- हेमंत महाकाळ

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

27 Oct, 10:45


आज लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीमध्ये दर वर्षी प्रमाणे ....पुस्तकांच्या यादीच पेज वेळ काढून नक्की वाचा....😊
#खजिना📚😍

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

27 Oct, 06:59


वसुबारस - पहिला दिवा पहिला दिवस!
धनोत्रयोदशी- दुसरा दिवस! धन्वंतरी पूजन!
नरकचतुर्दशी- अभ्यंगस्नान - यमतर्पण तिसरा दिवस!
लक्ष्मीपूजन - दिपावली मुख्य दिवस! अमावास्या!
बलीप्रतीपदा - दिवाळी पाडवा! पाचवा दिवस!
भाऊबीज - यमद्वितीया! शेवटचा दिवस!
🪔🪔🪔

#दिवाळी
#माहितीसाठी

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

27 Oct, 03:58


आयुष्यात सर्व काही करा..
पण इतरांना मोटीव्हेट करण्या-यांना कधी डीमोटीव्हेट करु नका..!

शैलजा ❤️ शब्दशैली


@Shabdshailee

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

27 Oct, 03:36


@Shabdshailee

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

27 Oct, 03:30


रविवार - कवितेचा वार ❤️

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

26 Oct, 15:51


किती वास्तव आहे, शांततेत ऐका

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

26 Oct, 15:50


आयुष्याच्या चित्रपटात चांगले वाईट रंग बदलणारे, कलाकार आपलेच असतात..!🍁

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

26 Oct, 13:30


@Shabdshailee

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

26 Oct, 07:26


निर्णय आप आपला...

विज्ञानानं आपल्याला प्रत्येक चूक सुधारण्यासाठी काही ना काही मार्ग दिलेला आहे...

उदाहरणार्थ,
मोबाईलमध्ये चुकून मेसेज पाठवला गेला, तर तो 'डिलीट फॉर ऑल' करता येतो.

कॉम्प्युटरमध्ये काही चुकीचं टाईप झाल्यास बॅकस्पेस बटनाने उडवता येतं.

पेन्सिलने काही चुकीचे लिहिल्यास, खोडरबर ने सर्व पुसून टाकत येतं.

पेनाने लिहिताना, काही चुकीचं लिहिलं गेल्यास इंक फ्लूईडने किंवा व्हाइट मार्केर ने मिटवता येतं.

अहो येवढंच काय, निसर्गानं आपलं शरीर देखील असं बनवलं आहे की शरीरातील घाण बाहेर टाकण्याची देखील सोय केली आहे.

मग सांगा बरं, जिथं आपलं शरीर आपल्या आत कोणतीही घाण राहू देत नाही, तर मग आपण जुन्या वस्तू, जुन्या गोष्टी, ज्याच्यामुळे कधी काळी आपल्याला दुःख झालं होतं, त्या घाणीच्या रूपाने आपल्या आत-आपल्या मनात का साठवून ठेवतात...???

आपल्यातील सर्व विकार दूर करून आपण स्वतःला मुक्त का करत नाही?

आपला स्वभाव, आपल्याला प्रत्येक चूक सुधारण्याची संधी देतो. मग आपल्या मनावर मणभर ओझं वाहवत असतो...?

आपण आपलं मन जितकं हलकं ठेवू, तितकं आनंदी जीवन जगू शकू. या ओझ्यापासून आपण स्वतःला मुक्त करावं, कारण ते आपल्यावर इतर कोणी लादलेले नाही, तर ते आपलंच संकलन आहे.

दु:ख कधीच कमी होणार नाही,
आपली कितीही इच्छा असली तरी  सुख-दु:ख येणं कधी बंद होणार नाहीय...

सर्व काही असंच चालू राहील, एक दिवस आपणच या जगात राहणार नाही.

तुम्ही तुमचं चार दिवसांचं आयुष्य, जितकं शांततेनं जगाल, तितकाच तुम्हाला आनंद मिळेल.

आपल्याला मिळलेल्या वेळेचं काय करायचं हे आपणच ठरवलं पाहिजे

आपण आपलं जीवन कसं जगायचंय, "ओझ्यासह की ओझ्याशिवाय", हा निर्णय तुमचा स्वतःचा आहे...!!!😊😊😊

- हेमंत महाकाळ

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

26 Oct, 01:15


*🙇‍♂️!..हर हर महादेव..!🙇‍♂️*
*🔰आपल्या अडचणींमधुन आपल्यालाच मार्ग काढावा लागतो. जगाकडून फार अपेक्षा ठेवून अडचणी कमी होत नाहीत तर वाढतातच..🖼️*
*🙌“आपला निर्णय आपली जबाबदारी”या तत्वावर काम करणारी माणसं जगाच्या भरोश्यावर जगत नाही आणि खरं शहाणपण हे समजून घेण्यातच असतं.जगाच्या सहानूभुतीची अपेक्षा भ्रमनिरास करणारी असते एवढं मात्र नक्की💯👍*
*🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩*

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

26 Oct, 01:15


*जगाच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या सारखा दुर्गवेडा राजा सापडणे फारच महामुश्किल आहे... छत्रपती शिवराय दुर्गावर जन्मले, दुर्गावर विसंबले आणि दुर्गावारच विसावले... शिवराय दुर्गपती होते म्हणूनच छत्रपती होऊ शकले....*

*#शककर्ते_शिवराय*
*#छत्रपती*

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

26 Oct, 01:11


_*⚔️📜आपल्या इतिहासाचे संस्कार जर लहानपणासूनच दिले तर इतिहास घडवणारी पिढी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.🙌💯*_

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

25 Oct, 10:10


ज्याची त्याची दिवाळी, ज्याच्या त्याच्या ठेवणीतला आनंद घेऊन येणारी आगळी वेगळी असते..कुणाच्या आईसाठी ही दिवाळी घरादाराची साफसफाई, सडारांगोळी आणि ताटभऱुन ओसंडुन वाहणा-या फराळातल्या चवीत असते. चकली - लाडु हातात नाचवत बागडणा-या लेकरांच्या रुपात असते. तर कधी नवीन साड्यांमधली आणि दागिऩ्यांनी सजलेल्या नाविन्याची असते. तर कधी माहेरची ओढ लावुन, भाऊबीजेच्या ओवाळणीत सुखावणारी असते.

कुणाच्या बापासाठी हीच दिवाळी पगाराच्या आकडेमोडीत हिशेबाचा ताळमेळ घालणारी असते. बापाचा खिसा फाटका असला तरी लेकरांचे कपडे फराळ, व फटाक्यांचा हट्ट पुरवणारी घट्ट शिवण घालणारी असते. घरातल्या सगळ्यांसाठी सगळं घेणार-करणार पण स्वत: मात्र जुनं पुराणं बनियन, चप्पल घालणार अशा बापाचे डोळे एकवेळ दिवाळीतल्या कंदिलाच्या ऊजेडाने कमी बायका-पोरांच्या डोळ्यांतला आनंद बघुन जास्त दिपुन जाणारे असतात.

नोकरीवाल्या पोरा-पोरींची दिवाळी गावाकडच्या साज-या केलेल्या दिवाळीच्या आठवणीत रमणारी असते. कंपनीतल्या बॉसनं रजा मंजुर करावी म्हणुन तळमळणारी असते..मिळालेल्या बोनसमध्ये आज्जीला आईला, बहीणीला, भावाला, वडिलांना काय काय घ्यायचं व त्यांना सरप्राईज कसं द्यायचं याच प्लानिंग करणारी असते.

देशाच्या सीमेवर लढणा-या लाखों सैनिकांसाठी ही दिवाळी फटाक्यांच्या व आतिषबाजी च्या रुपात न्हवे तर रणगाडे व बंदुकीच्या रुपात शत्रुला तोंड देत साजरी होत असते असेही एक दिवाळीचे रुप..!
ज्यांचं वय ऊलटुनही अजुन कपाळाला बाशिंग नाही अशांसाठी ही दिवाळी ती लवकरात लवकर संपुन तुळशीच्या लग्नाच्या व सोबतच त्यांच्या स्वतःच्या लग्नाच्या अक्षतांची कळकळीने वाट पहायला लावणारी असते. आणि बेरोजगारांसाठी मात्र हीच दिवाळी यंदा राहिलेली स्वप्नं पुढच्या दिवाळीत नक्की पुर्ण करायची या अपु-या इच्छेत विरलेली असते.

सिझनल बिझिनेस करुन स्वत:च्या घराला हातभार लावणा-या लोकांसाठी ही दिवाळी खुप काही देणारी असते. या दिवाळसणाची हा कष्टकरी वर्ग वर्षभर वाट पाहत असतो. त्यांचे वीतभर पोट चालण्यासाठी खंडीभर कष्ट करायला लावणारी ही दिवाळी असली तरी त्यांचा अर्थार्जनाचा पुर्ण पाया या सणावर अवलंबुन असतो हे सत्य आपण लोकांना मान्य करायला लावणारी ही दिवाळी असते..!

दिवाळीच्या मार्केटमध्ये प्रकाशाचा झगमगाट, छान खरेदी, सगळ्यांना भारी वाटते पण कुठंतरी कोप-यात एखादी म्हातारी थरथरत्या हाताने मातीच्या पणत्या विकताना दिसेल, एखाद्या बारक्या, रातदिन जागुुन बनवलेले रंगीबेरंगी कंदिल विकताना दिसेल, कुणाचातरी मुलगा, कुणाचा तरी भाऊ कुणाचा तरी बाप मळका सदरा घातलेला, शर्टाच्या बाहीनेच घाम पुसत, नरडीच्या शिरा ताणुन वीसला एक, तीसला दोन ओरडुन  रांगोळ्यांची पाकिटे, लाईटीच्या माळा विकताना दिसेल..

एखादी दिदी तिच्या आईसोबत शाळा-कॉलेजातुन घरी न जाता थेट मेहंदी, नेलपेंट, टिकल्या पिना विकायला बसली असेल, आणि एखादं कष्टकरी जोडपं खरेदी करुन दमलेल्यांना स्वस्तातली मस्त प्लेटभर भजी व कटिंग चहा देताना दिसेल..तर अशा माणसांची दिवाळी ही ख-या अर्थाने अंधारातून प्रकाशाकडे नेणारी असते़..!

©® शैलजा खाडे ❤️ शब्दशैली

@Shabdshailee

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

25 Oct, 08:52


हॉटेलच्या चमच्यांचा गुण आहे. पण माणूस असलेल्या चमच्याला लवकर अक्कल येणं अपेक्षित असतं
पूवीं पक्षाला कार्यकर्याचं महत्त्व होतं. पण आता जात धर्म आणि पैसा या गोष्टी निवडणुकीत महत्त्वाच्या झाल्या आहेत. सोशल मीडियावर काही मिनिटांतच एखाद्या अफवेचा आधार घेऊन रानपेटवता येतं, दंगली घडवता येतात आपला विकास झालाय असं चित्र निर्माण करता येतं. परदेशातल्या ठिकाणांचे फोटो आपल्याकडचे आहेत असं दाखवून 'विकास झाला' असं चक्क वर्तमानपत्रातल्या जाहिरातीत बिनधास्त दाखवलं जातं. हे एक-दोनदा नाही खूप वेळा झालंय. असे फोटो सोशल मीडियावरचे चमचे अभिमानाने फिरवत असतात... मिरवत असतात. या चमच्यांना आता "ट्रोल" असा शब्द आहे,
(४०। सेल्फी )

हे ट्रोलर्स हा या देशापुढचा सगळ्यांत मोठा धोका आहे. कारंण हे ट्रोल देशाचं खरं चित्र आपल्यापुढे येऊ देत नाहीत. विरोधी ट्रोल कायम "आपलं वाईंट चालत आहे हे सांगत असतात, तर सत्ताधारी ट्रोल 'आपण कसे जगात चांगले आहोत हे सांगत असतात. पण यापैकी काही खरं नसतं. कुठलाच देश कधीच परिपूर्ण नसतो आणि नेताही. प्रत्येकाच्या मर्यादा असतात. पण या मर्यादा आपल्यापुढे येऊ दिल्या जात नाहीत. आपण गाफील राहायला हवं असा कायम प्रयत्न चालू असतो
पण देशाबाबत
राज्याबाबत किंवा आपल्या गावाबाबत गाफील राहणं हे नशेत
राहिल्यासारखं आहे. नशेत असल्यावर संकट ओळखू येत नाही. आलं तरी त्यावर उपाययोजना करण्याची ताकद उरत नाही. त्यामुळे या सोशल मीडियावरच्या अफवांच्चा नशेत राहण्यात काही अर्थ नाही, सगळ्यांत मोठी नशा "आपण जगात भारी आहोत' ही आहे. जुनी माणसं कितीही पैसा असला तरी साघेपणा जपत. पैशाचा बडेजाव किंवा दिखावा करत नसत. आता प्रत्येक बाबतीत दिखावा जास्त महत्त्वाचा वाटतो कर्ज काढू नये अस नाही; पण ते दिखाव्यासाठी नसावं. आज आपण आपल्या राज्यावर किती कर्ज आहे याचा विचार करतो का? आपल्याकडे तलाठी किवा शिपाई होण्यासाठी लाखो अर्जी येतात, हे कशाचं लक्षण आहे? लोक धर्मावर एवढा आक्रस्ताळेपणा करतात; पण किती लोकांनी भगवद्गीता वाचलेली असते? किती लोकांनी कुरआन वाचलेलं असतं? किती लोकांना बुद्धाने खरोखर काय सांगून ठेवलंय हे माहिती असतं? पौराणिक कथा माहीत असतात; पण 'चरकसंहिता' कितीलोकाना
(४०|सेल्फी)

माहीत असते? वेदात नेमकं काय लिहिलंय किती लोकांना ठाऊक असतं ? जर भावच कळला नसेल तर तो भक्त कसा? कामच होणार नसेल तर तो कार्यकर्ता कसा? तो चमचाच उरणार. आणि चमचा स्वतःचेही भले करू शकत नसेल तर जनतेचं काय होणार? व्यवस्थेला प्रश्न कोण विचारणार? जेवतांना माणसं तोंडाचा आवाज करतात. पण त्याने अन्न चावलं जात असतं. चमच्यांचा आवाज उगाच असतो. तो लोकांच्या डोक्यात जात असतो. तो शिष्टाचार नसल्याचा असतो. ज्यांचे चमचे जास्त आवाज करतात अशी माणसं बैठकीत बसण्याच्या लायकीची नसतात., त्यांना देशातच लोक हसतात. जगात तर बोलायलाच नको. महत्त्वाचं काय? तर, ज्यांचे हात स्वच्छ असतात त्यांना सहसा चमच्याची गरज पडत नाही.
*निवडून द्यायच्या आधी लोक उमेदवाराला काहीच विचारणार नसतील तर निवडून दिल्यावर उमेदवार लोकांना कधीच विचारत नसतात.,*

समाप्त.
(४१|सेल्फी)

....अरविंद जगताप

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

25 Oct, 08:51


पण इंग्रजांनी राज्य केलं आणि आपल्याला हाताने जेवायची लाज वाटू लागली, आपल्या तोंडी चमचा येण्यात इंग्रजांचा हात आहे, ते असो! तो ताटात ठीक आहे, वाटीत ठीक आहे; पण समाजात नको. एक काळ होता, जेव्हा कार्यकर्त्याला किंमत होती, प्रतिष्ठा होती. चळवळीतले कार्यकर्ते. संघटनेतले कार्यकर्ते.. पूर्ण वेळ कार्यकर्ते. आणि कार्यकर्ता म्हणजे प्रामाणिक, तत्त्वनिष्ठ, कष्टाळू ही प्रतिमा होती. कारण पक्ष, संघटना आणि चळवळी यांना एक विचासरणी होती. हळूहळू पक्षांनी स्वतःची विचारसरणी सोडून दिली. माफ करा! हळूहळू नाही झटक्यात! कॉग्रेसने ते सगळ्यांत आधी केलं खूप पैसा आणि ताकद असली की ते होतंच. मग बाकी पक्षांनी अनुकरण केलं, निवडणुकीत गुन्हेगारी कशी शिरली ? आधी उमेदवार प्रचाराला, धमक्या देऊन मत द्यायला लावण्यासाठी गुंडांचा वापर करू लागले. गुंडाच्या जिवावर निवडणूक जिंकू लागले, कार्यकर्त्यांच्या गराड्यात वावरणारे नेते गुंडांच्या टोळ्या घेऊन फिरू लागले मग गुंडांच्या लक्षात आलं, की आपण नेत्यांना का निवडून द्यायचं? त्यापेक्षा आपण स्वतःच निवडणूक लढवू आणि मग गुंडानी पांढरे कपडे घालायला सुरुवात केली निवडणूक लढवली... जिंकली. जनतेनेही गुंडांना मोकळ्या मनाने निवडून दिलं हे नैतिक अधःपतन कुठल्या थराला गेलं? गुंड थेट तुरुंगातून निवडून येऊ लागले एक-दोन नाही, असंख्य गुंड तुरुंगातून निवडून आले.. येतात. आता कुठल्याही पक्षाला गुंडांशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती आलीय. परंतु गुंड खूप लवकर पांढरपेशी होतात. आपल्यावरच्या केसेस मिटवतात. उजळ माथ्याने जगू लागतातः सुधारत नाही तो चमचा! जो धड गुंड नसतो, धड सज्जन नसतो, तो केवळ आपल्या नेत्याचे, गुणगान गात राहतो. त्यासाठी सोशल मीडियावर अतिशय घाणेरड्या भाषेत बोलत राहतो. वेळप्रसंगी बलात्काराचं आणि बेरोजगारीचं समर्थन करू लागतो. आपल्या नेत्याच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालू लागतो एखादा प्रेमळ बाप सुद्धा आपल्या मुलाचे एवढे अपराध पोटात घालत नाही, जेवढे चमचे आपल्या नेत्याचे अपराध पोटात घालतात. मुलगा दारुडा असेल तर (३८। सेल्फी)

बाप कानाखाली मारेल, शिव्या देईल. किमान माघारी तरी त्याची चूक कबूल करेल. पण एखाद्या नेत्याचा किंवा राजकीय पक्षाचा चमचा माघारी देखील आपल्या नेत्याची चूक कबूल करत नाहीं. म्हशीच्या शेपटासारखी अवस्था असते या चमचे लोकांची. शेणामुताने माखले तरी लाज झाकायची कामगिरी करत राहायचं. पुन्हा माश्या हाकलायला शेपटानेच हलत राहायचं. दिवसरात्र. थांबायचं नाव नाही. पण शेपटाने क्षणभर माश्या हाकलता येतील. स्वच्छता कशी होणार ? कार्यकर्ते जाऊन चमचे आले आणिराजकारण पूर्ण बदलून गेलं. पूर्वी नेते कार्यकर्त्यावर अवलंबून होते, त्यांना सांभाळून होते, त्यांच्या शब्दाला मान देत होते. कार्यकर्ते नेत्यांना काम सांगू शकत होते. प्रश्न विचारू शकत होते. कार्यकर्ते काय म्हणतील, हा विचार करत होते. कारण, कार्यकर्ते नेत्यासाठी नाही, विचारांसाठी लढणारे होते. पण तो विचार संपला, युती आणि आघाडीच्या राजकारणात नाही, पक्षांतरात संपला. लोकशाहीत वेगळे पक्ष एकत्र येतात आणि सरकार स्थापन करतात. पण थेट पक्ष बदलायची प्रथा सुरू झाली आणि घोळ झाला. पक्ष सोडण्याला आणि फोडण्याला प्रतिष्ठा आली. पक्ष फोडण्यात वाकबगार लोकाना चाणक्य' म्हणू लागले आजकाल
गल्लीतल्या नेत्यालासुद्धा चाणक्य म्हणायची प्रथा सुरू झाली. खऱ्या चाणक्याला कधी नव्हे एवढा पश्चात्ताप होत असणार!
आजकालच्या राजकारणातल्या लोकांना केवळ चाणक्य न म्हणता "चमचांचे चाणक्य' म्हणायला पाहिजे. चमचा होण्यात आनंद मानणाऱ्यांना मी नेहमी सांगत असतो, 'चमचा हरला तरी कुणाला दु:ख होत नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे घरातले ग्लास, कप तरी लोक मोजतात. पण चमचे कुणी मोजत नाहीत.लग्नात वाटी किंवा तांब्या भेट दिला तरी त्यावर नांव टाकायचे लोक! पण चमच्यावर कधी कुणी नांव टाकत नाही. चमच्यावर आपलं नांव असावं असं कुणाला वाटत नाही हॉटेलमध्ये किंवा पंगतीत जेवतांना सगळ्यांत जास्त आवाज करतात ते चमचे, डोकं उठवतात लोकांचं! पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हॉटेलमध्ये एका ताटाची किंमत असते. एक श्रीखंड किंवा रस्साभर वाटीचेही दर ठरलेले असतात.पण" चमच्याचा दर नसतो.. किंमत नसते... रेट नसतो. चमच्यांचे प्रकार वेगवेगळे असले तरी त्याला मिळणारी वागणूक सारखीच असते. काटेरी चमचा असला म्हणून त्याला विशेष वागणूक असते असं नाहीं. राजकीय पक्षाचेही असेच! काटेरी चमचे असतात कांहीं पदार्थांत ते वापरावे लागतात. फारच घाई असेल तर प्लास्टिकचे चमचेसुद्धा
(सेल्फी । ३९)

वापरले जातात सोशल मीडियावर फुटकळ पैशात राजकारण्यांची आरती ओवाळणारे असे प्लास्टिकचेच चमचे असतात खरंतर चमच्याला वाटत असतं आपण खातोय पण खाणारी तोंडं वेगळी असतात चमचे फक्त खरकटे होत असतात पण ही गोष्ट चमच्याला शेवटपर्यत कळत नाही. तो दर वेळी वाटीत असाकाही शिरतो, की जणू त्याच्यासाठीच आमरस बनलेला आहे.

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

25 Oct, 08:51


*चमचा*

(सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या सेल्फी या पुस्तकातून साभार)

नेता शब्दाचं वजन गेलं आणि 'कार्यकर्ता’ शब्दाचीही किंमत कमी होत गेली. नाणंच खणखणीत नसेल तर त्याला किंमत काय असणार? नेते आज या वरून त्या फांदीवर उडू लागले
मग कार्यकर्ते तरी काय करणार? ज्याच्या नावाचं
उद्या त्या फांदीवर करून
कुंक् लावलं त्याला दुसऱ्याच्या अंथरुणात पाहिल्यावर काय वाटणार? इथे राजकारणी तर दर पाच वर्षाला झेंडे बदलतात. आयाराम गयाराम सगळीकडे आहेत. पैशासाठी पदासाठी, तर कुणी धमकीला घाबरून पक्ष बदलतात. कुत्र्याला घाबरून मांजरीने शेपूट घालून रस्ता बदलावा तसा पक्ष बदलणारे कांहीं नेते, तर पोलिसाला बघून चोराने दुसऱ्या गल्लीत धूम ठोकावी तसे काही नेते!
कधी-कधी गल्लीत नवीन कुत्रा दिसला की बाकीचे कुत्रे भुंकून-भुकून त्याला हैराण करून टाकतात. मग काहीं दिवसांत तो नवीन कुत्रा त्यांच्या कळपात सामील होतो. मित्र होतो. राजकारणातही असंच आहे .एखाद्याला भ्रष्टाचाराचे आरोप करून हैराण करतात शेवटी तो आरोप करणाऱ्यांच्या पक्षात सामील होतो. सगळं काहीशांत होतं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपलं सरकार आलं. लोकांना वाटलं, आता सगळं सुखात होईल पण पहिली निवडणूक आली आणि लोकशाहीचे भलतेच रंग दिसायला सुरुवात झाली, राजकीय नेत्यांनी गुंडांना हाताशी धरायला सुस्वात केली.नेते गुंडांच्या इशाऱ्यावर 'काम करू लागले. काहीठिकाणी हे चित्र दिसत होतं. पुढे गुंड वाढतगेले असा काळ आला, की राजकारणीच गुंडांच्या इशाऱ्यावर काम करू लागले. राजकारण्यांना आणि जनतेला त्यांची एवढी सवय झाली, की हळूहळू गुंडच निवडणुकीत उभे राहू लागले. या सगळ्या गोष्टीसाठी महत्त्वाचं कारंण होतं निवडणुकीसाठी लागणारा पैसा आजही कुणीच गंभीरपणे या गोष्टीचा विचार करत नाही. निवडणुकीत होणारा खर्च कमी झाला तर देशातला खूप मोठा भ्रष्टाचार कमी होईल, खूप मोठ्या प्रमाणात गुंडगिरी कमी होईल. आणि ही गोष्ट फक्त आणि फक्त जनतेच्या हातात आहे त्यासाठी विनाकारण रिकामटेकडं असल्यासारखं नेत्यांच्या सभेला जाणं बंद केलं पाहिजे
(३६। सेल्फी)

अमेरिकेत होते तशी उमेदवारांची टीव्हीवर जाहीर चर्चा झाली पहिजे. तेवढी पुरेशी आहे. लाखो लोक गोळा करून फालतू आश्वासनं द्यायची, टाळ्या मिळवण्यासाठी भंपक भावनिक आवाहन करायचं, लोक गोळा करण्यासाठी लाखो स्पये खर्च करायचे हे सगळं बंद होईल. काही लोकांना वाटतं की, निवडणुकीच्या निमित्ताने छोट्यामोठ्या व्यावसायिकांना कामं मिळतात. हा एक मोठा गैरसमज आहे. पाच वर्षात दोन-तीनदा काम मिळण्याच्या मोबदल्यात कायमस्वरूपी नुकसान किती होतं याचा विचार कुणी करायचा? निवडणुकीत एकेका उमेदवारांचा पाच-सहा कोटी रुपये खर्च सहज होतो, हा खर्च आमदार-खासदार जनतेची सेवा करायची म्हणून करतात, असं आपल्याला वाटत असेल तर आपल्यासारखे मूर्ख आपणच! हा खर्च हे लोक वसूल करतातच, करणारच. आपल्याकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे, यांना खर्चातच पाडायचं नाही., बाप दारूडा, जुगारी किवा बेजबाबदार असला तर मुलं समजूतदारपणे वागू लागतात. फार खर्चात पाडत नाहीत. आपल्यालाही शहाण्या मुलासारखं वागावं लागेल. कारण आपण पैसे न खाणारे किती नेते पाहिलेत ? गुंडांशी जवळीक नसलेले किती नेते पाहिलेत? बरं, हे नेते अधिकाऱ्यांच्या बदल्या करणार. एक अधिकारी बदली मिळण्यासाठी पाच-पन्नास लाख देत असला तर त्याची वसुली वेगळी. कारण पुन्हा तेच. अधिकारी काय जनतेची सेवा करायची म्हणून बदली मागत असतो का? सेवाच करायची तर ती कुठल्याहीं पदावर आणि कुठल्याही शहरात करता येते. मला अमुक एकाच शहराची किंवा जिल्ह्याची सेवा करायची आहे, असं कसं म्हणू शकता? पण कित्येक अधिकारी असं म्हणत असतात. ही चमचेगिरीची सुरुवात असते. अधिकाऱ्याने नेत्याला शरण जाण्याची सुरुवात आज कित्येक अधिकारी कुठल्या नेत्यासाठी काम करतात हे सामान्य माणसालाही माहीत असतं. अमक्या महापालिकेत अमका अधिकारी आणून ठेवायचा हे नेता ठरवून टाकतो. कुठला पोलीस आयुक्त पाहिजे हेसुद्धा ठरवल जातं महामार्गाच्या कामासाठी अमुक एकच अधिकारी पाहिजे असा आग्रह होतो. याचा अर्थ काय? इडीसारख्या विभागात एकच प्रमुख निवृत्तीनंतरहीं कायम ठेवावा वाटणे याचा अर्थ काय? जेव्हा राज्यकर्ते आपल्या मर्जीने अधिकारी नेमू लागतात तेव्हा आपल्याला कर्तव्यदक्ष लोक कमी दिसतात आणि चमचे जास्त दिसूलागतात
(सेल्फी । ३७)

कधीकाळी एखादी कामगिरी पार पाडण्यासाठी कर्तबगार आणि विश्वासू माणसं नेमली जायची. ते उजवे किंवा डावे हात म्हणून ओळखले जायचे. पण हळूहळू कामगिरीत कुणाला रस उरला नाही. वसुलीच महत्त्वाची झाली, वसुलीच करायची तर कर्तबगार माणूस कशाला पाहिजे? वसुली करून देईल एवढा विश्वास पाहिजे मग तो उजवा हात किंवा डावा हात असला पाहिजे असा आग्रह उरला नाही. जेवहा हाताची गरज नसते तेव्हा चमच्यांचा काळ येतो. आता चमच्यांचा काळ आलाय. आपल्या देशात आपण सहसा हाताने जेवणारी माणसं... काला करून, कुस्करा करून.

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

25 Oct, 05:54


_*"स्त्री" मुळातच सामर्थ्यवान आहे. आणि म्हणूनच परमेश्वराने महत्त्वाची सगळीच खाती तिच्याकडेच दिली आहेत. शिक्षण खाते आहे सरस्वती कडे, अर्थ खाते दिलेय लक्ष्मीकडे, तर संरक्षण खाते दुर्गामातेकडे, आणि अन्न खाते अन्नपुर्णा देवीजवळ.*_

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

25 Oct, 03:03


भावना चेहऱ्यावर उतरण्यासाठी कोणत्याही अभिनयाची गरज नसते
ती प्रसंगानुसार उद्भवणारी गोष्ट आहे 😊

@प्रसाद🩷

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

22 Oct, 10:29


@Shabdshailee

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

22 Oct, 10:23


हसत रहा, खुश रहा...…

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

22 Oct, 06:50


काही लोक तुम्ही पाहिलेल्या स्वप्नांवर-ध्येयांवर आणि तुमच्या धाडसीपणावर हसतील, तर काही तुमच्या चुका दाखविण्याची एकही संधी सोडणार नाहीत.

तुमच्या प्रगतीच्या प्रवासात, लोकांची 'मतं' आणि 'सल्ले' असतील. तुमच्यावर संशय, थट्टा किंवा तुम्हाला कमी लेखलं जाऊ शकतं.

कधीकधी या गोष्टी अशा लोकांकडून येतात, ज्यांना आपली खरोखर काळजी असते, परंतु जास्तीत जास्त तुम्हाला रस्त्याच्या कोण्याकोपऱ्यात तुम्हाला त्रास देणारी नालायक लोकं आढळतील.

तुमच्या स्वतःवरील विश्वासाला बाधा आणण्याचा प्रयत्न करणारे आवाज, तुम्हाला तुमच्या निर्णयांचा दुसरा अंदाज लावायला लावतात.

पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात करता, तेव्हाच हे आवाज वास्तविक होतात.

जेव्हा तुम्हाला तुमच्या मार्गावर अडथळे येतात तेव्हाच हे घडतं. जेव्हा तुमची "आत्म-शंका" प्रबळ होते, तेव्हा तुम्हाला सगळं सोडून द्यावंसं वाटतं.

ही प्रगतीची लढाई, तुमच्या आत एक ज्योत प्रज्वलित करत आहे, विझण्यास नकार देणारी आग.

म्हणून या आवाजांशी लढा. जोपर्यंत अविरतपणे तुमच्या प्रगतीचा लढा चालू ठेवा.

तोपर्यंत पुढे जा, जोपर्यंत तुमची केलेली थट्टा, तुमच्यावर घेतलेली शंका, तुमच्या "लवचिकता आणि दृढनिश्चयाचा" पुरावा बनत नाही...

स्वतःला आणि जगाला सिद्ध करण्याची ही एक संधी आहे की, तुम्ही विचार केला होता, त्यापेक्षा जास्त तुम्ही सक्षम आहात.

म्हणून, आव्हानं स्वीकारा, परत लढा द्या, तुमच्या चुकांमधून शिका आणि कोणालाही तुमच्यातील तेज-ज्योत विझवू देऊ नका...

मग ते स्वकीय असो व परकीय...!!!

- हेमंत महाकाळ

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

22 Oct, 01:40


प्रुव्ह करण्याच्या भानगडीत पडू नका,

स्वतः मध्ये कितीही चांगुलपणा असला तरी कायम स्वतःला इम्प्रुव्ह करत राहा.....
कारण जुना मॉडेल कितीही फिचर्सचा असला तरी नवा तोच आपल्याला हवा असतो.....
ही गोष्ट मनात कोरून ठेवा....!

तेजस्विनी प्र. राऊत
 
@TejuRaut

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

21 Oct, 18:59


जगाला आपल्या अस्तित्वाची जाणीव व्हायच्या आधी आपल्यावर जिने प्रेम केलंय ती म्हणजे आपली 'आई' ♥️
आपण कल्पनाही करू शकत नाही त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आपण तिचे देणं लागतो!

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

21 Oct, 18:59


चॅर्ली चॅप्लीन ची आई त्याला नेहमी म्हणायची... या जगात देव आहे... प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिल तर एका वेळेनंतर आपल्याला जे हव ते देव देत असतो... जो पर्यत मिळत नाही तो पर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करण मात्र खूप महत्वाच...

#हसरे_दु:ख

धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....

21 Oct, 15:20


⚠️⚠️⚠️ ALERT ⚠️⚠️🏐
🔤🔤🔤🔤..


जवळच्या मित्राकडून निळ्या येणाऱ्या वेब लिंक वर क्लिक करू नका automatic message जात आहेत contact मधील मेंबर ला.. त्यामुळे चुकून मित्राकडून BLUE LINK आली तरी ती ओपन करू नका तुमच्या सर्व मित्रांना automatic message जात आहेत..

35,938

subscribers

35,286

photos

1,915

videos