नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल @natemanache Channel on Telegram

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

@natemanache


💞Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...💞

YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache

Admin Contact: @Nmcontactbot

Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल (Marathi)

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल एक टेलीग्राम चॅनेल आहे ज्यात मराठी मोटिवेशनल व्हिडिओ, कोट्स, कथा आणि इतर अधिक काही मिळतं. ह्या चॅनेलवर तुमच्या मनाला मिळणारे उत्साहवंत कथांचं आणि विचारांचं आनंद घ्या. नाते मनाचे या चॅनेलवर तुम्हाला देखील YouTube वरील त्यांचे चॅनेल पाहण्याची संधी मिळेल : https://youtube.com/c/NateManache. जर तुम्हाला काही प्रश्न किंवा प्रतिक्रिया असतील तर त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधता @Nmcontactbot ला संपर्क करू शकता. त्यांचं Instagram चा आणि त्यांच्या अद्यतनांसाठी त्यांच्या Instagram खात्यावर पध्दला जा : https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1u0026u. नाते मनाचे चॅनेल एक सुविधानिष्ठ ठिकाण आहे ज्यातून तुम्हाला मराठी मोटिवेशनल कंटेंट मिळेल आणि तुमच्या जीवनात आणि कामात उत्साह आणि प्रेरणा भरून टाका.

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

22 Nov, 15:04


स्वतःशी प्रामाणिक असलेली व्यक्ती दुसऱ्याला दुःखं देण्याचा विचार पण करू शकत नाही कारण त्याला चांगल्या पद्धतीने माहिती असतं की आपल्या माणसांकडून कडून मिळालेलं दुःखांची मनाला झालेली जखम एवढी कोरून जाते ती कधीच भरल्या जात नाही म्हणून प्रत्येकाशी आपुलकीणे वागा शेवटी आपण सोबत काही नेणार नाही आहो क्षुल्लक कारणावरून आयुष्यभरापासून जपलेली नाती सोडू नका माणसाचं जीवन पण एक पाण्याचा बुडबुडा आहे कधी पुठणार सांगता पण येणार नाही ना!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

22 Nov, 15:04


काही लोक म्हणतात खरं प्रेम वगैरे काहीच नसतं तर ते स्वार्थापोटी झालेलं एक आकर्षण असतं पण मला वाटतं प्रेम ही निःस्वार्थ भावना आहे ती तितक्याच शुद्धतेने जपल्या गेली पाहिजे कारण ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येणार की नाही हे परिस्थितीवर अलंबून असलं तरी मात्र एकतर्फी प्रेम आपल्यासाठी नेहमीच अमर असते ना राव❤️!,,✍🏻

कमन#लेखक
 
@Ommshelke

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

20 Nov, 14:39


काहींना काल कोणता विशेष दिवस आहे का विचारल्यास जाणवले की हे सुध्दा माहित नव्हते की पुरुषदीन पण असतो आणि तो 19 nov रोजी साजरा केला जातो आणि काहींना तर माहिती होऊनही आपल्या घरातील,संपर्कातील पुरुषांना साधे wish करायलाही वेळ भेटला नसावा🙁किंवा कमीपणाचं वाटलं असावं😔 ज्याप्रमणे महिला दिनाचे हजारो स्टेटस,wishes दिसतात तसे काल का मग हजारो जाऊदे निदान त्याचा अर्धेतर wishes, status दिसले का नाहीत?🥺त्यांच्यावर असणार लिखाणही,status का शेअर केले जात नाहीत?मग पुरुषप्रधान संस्कृती नावापुरतीच का?🙁असो कारण ईथे पुरुषाला कर्तुव्व आणि जबाबदारी ह्या सीमेपलीकडील पुरुष समजून घेणं एवढं सोपं नाही🙁.एका दोघांमुळेl प्रत्येक पुरुषाकडे संशयाने पाहण्याची पद्धत अयोग्य आहे,तो तर नेहमी सर्वांसाठी असतो पण त्याच्यासाठी कोणी नसतं हे खरं आहे😔समाज पुरुषांकडून नेहमी ताकदवान,यशस्वी व निर्णयक्षमची अपेक्षा करतो मग त्याच्या वेदनांनाभावनांना का कोणी पाहत नाही?
........🦋🌺🙏........
शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

20 Nov, 14:39


ज़िंदगी भर
जिनके बारे में
हम हर वक्त सोचते रहे

उन्होंने हमारे बारे में
सोचते के लिए
एक पल भी वक्त
जाया नहीं किया

हम कबखत्त ना जाने क्यू
ज़िंदगी भर
उनके ही बारे में
हम हर वक्त सोचते रहे

✍️विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

20 Nov, 14:39


ये मेरे मेहबूब
खुद से थोड़ा सा
वक्त निकाल कर
हमसे यूंही बेवजह बातें
किया करो

नहीं तो आपको पास
हमसे बात करने के लिए
हजारों बहाने होंगे
बेवजह वक्त ही वक्त होगा

पर आपसोस यह की
आपकी बातें सुनके के लिए
हमारे पास एक पल भी
वक्त नहीं होगा

✍️विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

20 Nov, 14:39


लोक सच बोला करते हैं
दुनिया में कोई झूठी कसमा
खा मर नहीं जाता प्यारे

और तू हस हस कर जहर खा के
मरने की बातें किया करते हो

प्यारे कभी बिना बातें किये
जहर खा कर हमे मर के
दिखाओ ना प्यारे

✍️विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

19 Nov, 16:50


पुरुष म्हणजे समुद्राचा
भरभक्कम काठ,
संसारात उभा राहतो
पाय रोवून ताठ.

कितीही येवो प्रपंचात
दुःखाच्या लाटा,
तो मात्र शोधीत राहतो
सुखाच्या वाटा.

सर्वांच्या कल्याणा करता
पोटतिडकीने बोलत राहतो,
न पेलणारं ओझं सुद्धा
डोक्यावर घेऊन चालत राहतो.

कधी कधी बायकोलाही
दुःख त्याचं कळत नसतं
आतल्या आत मन त्याचं
मशाली सारखं जळत असतं.

तो आपल्या दुःखाचं
कधीच प्रदर्शन मांडत नाही,
खुप काही बोलावसं वाटतं
पण कुणाला काही सांगत नाही.

सारं काही कळत असूनही
अपमान त्याला गिळावे लागतात,
वेदनांना काळजात दाबून
पुन्हा कष्ट उपसावे लागतात.

सगळ्यांच्या आवडी जपता जपता
मन मारीत जगत असतो,
बायको, पोरं खूष होताच
तो सुखी होत असतो.

मित्रांजवळ आपलं मन
त्यालाही मोकळं करावं वाटतं
हातात हात घेऊन कधी
जोर जोरात रडावं वाटतं.

समजू नका पुरुष म्हणजे
नर्मदेचा गोटा आहे
पुरुषाला काळीज नसतं
हा सिद्धांत खोटा आहे.

घरात तुमचं लक्षच नाही
हा एक उगीच आरोप असतो
बाहेर डरकाळ्या फोडणारा
घरी मनातल्या मनात कुढत बसतो.

नवरा म्हणा ,वडील म्हणा
कधी कुणाला कळतात का
त्यांच्या साठी कधी तरी
आसवं कुणाची गळतात का ?

पेला भर पाणी सुद्धा
चटकन कुणी देत नाही,
कितीही पाय दुखले तरी
मनावर कुणी घेत नाही.

#जागतिक_पुरषदिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

19 Nov, 12:36


🪴🏵️🦚🌻🌸💠🌹☘️🍁♻️🌺🪴

*🎭 बोधकथा : खरी शांती 🎭*

*🖊️संकलन : प्रविण सरवदे, कराड,*
*⊱━━━━━✥⊰༺☬༒☬༻⊱✥━━━━━⊱*
एक राजा होता ज्याला चित्रकलेची खूप आवड होती. शांततेचे दर्शन घडवणारे चित्र काढणाऱ्या कोणत्याही चित्रकाराला अपेक्षित बक्षीस देऊ असे त्यांनी एकदा जाहीर केले. निर्णयाच्या दिवशी, बक्षीस जिंकण्यासाठी उत्सुक असलेले अनेक चित्रकार आपली चित्रे घेऊन राजाच्या महालात पोहोचले. राजाने एक एक करून सर्व चित्रे पाहिली आणि त्यातील दोन चित्रे बाजूला ठेवली. आता या दोघांपैकी एकाची पुरस्कारासाठी निवड करायची होती.

पहिले चित्र अतिशय सुंदर शांत तलावाचे होते. त्या सरोवराचे पाणी इतके स्वच्छ होते की त्याचा आतील पृष्ठभागही दिसत होता. आणि आजूबाजूला असलेल्या हिमनगांची प्रतिमा आरसा लावल्यासारखी त्यावर उमटत होती. ओव्हरहेड एक निळे आकाश होते ज्यात पांढरे ढग कापसाच्या गोळ्यासारखे तरंगत होते. ज्याने हे चित्र पाहिले असेल त्याला असे वाटेल की शांततेचे चित्रण करण्यासाठी यापेक्षा चांगले चित्र असू शकत नाही. खरे तर हेच शांततेचे प्रतीक आहे.

दुसऱ्या चित्रातही पर्वत होते, पण ते पूर्णपणे कोरडे, निर्जीव, निर्मनुष्य होते आणि या पर्वतांच्या वर दाट गडगडणारे ढग होते ज्यात विजा चमकत होत्या, मुसळधार पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत होती, जोरदार वाऱ्यामुळे झाडे थरथरत होती. आणि टेकड्या एका बाजूला असलेल्या धबधब्याने उग्र रूप धारण केले होते. ज्याने हे चित्र पाहिलं त्याला प्रश्न पडेल की त्याचा शांतीशी काय संबंध. त्यात फक्त अशांतता आहे.

ज्या चित्रकाराने पहिले चित्र काढले त्यालाच बक्षीस मिळेल याची सर्वांना खात्री होती. त्यानंतर राजा सिंहासनावरून उठला आणि त्याने दुसरे चित्र काढणाऱ्या चित्रकाराला अपेक्षित बक्षीस देण्याची घोषणा केली. सगळे आश्चर्यचकित झाले.

प्रथम चित्रकाराला रहावल नाही, तो म्हणाला, पण महाराज, त्या चित्रात असे काय आहे की तुम्ही त्याला पुरस्कार द्यायचे ठरवले आहे. तर सगळे म्हणत आहेत की माझे चित्र शांततेचे चित्रण करण्यासाठी सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ आहे?

“माझ्या बरोबर चल” राजाने पहिल्या चित्रकाराला त्याच्या सोबत यायला सांगितले, दुसऱ्या चित्रासमोर जाऊन राजा म्हणाला, धबधब्याच्या डाव्या बाजूला वाऱ्याने एका बाजूला वाकलेले हे झाड बघ. त्याच्या फांदीवर बांधलेलं ते घरटं बघा. बघा कसा एक पक्षी आपल्या मुलांना इतक्या हळूवारपणे, शांतपणे आणि प्रेमाने चारा देत आहे.

तेव्हा राजाने तिथे उपस्थित सर्व लोकांना समजावून सांगितले, “शांत राहण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही अशा परिस्थितीत आहात जिथे आवाज नाही, कोणतीही समस्या नाही, जिथे कठोर परिश्रम नाही, जिथे तुमची परीक्षा नाही, शांत राहण्याचा खरा अर्थ म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या अव्यवस्थता, अराजकता, अशांतता, अराजकते सारख्या वातावरणात असून देखिल तुम्ही शांत राहाणे आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे होय. तेव्हाच तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत राहाल.
राजाने दुसरे चित्र का निवडले हे आता सर्वांना समजले.

*📍तात्पर्य :*
मित्रांनो, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात शांती हवी असते. पण बर्‍याचदा आपण शांतीला बाहेरची गोष्ट समजतो आणि ती दूरच्या ठिकाणी शोधतो, तर शांतता ही संपूर्णपणे आपल्या मनाची आंतरिक जाणीव असते आणि सत्य हे आहे की सर्व दुःख, त्रासात आणि अडचणींमध्ये शांत राहणे हीच खरे तर शांतता असते. नेहमी आनंदी राहा, जे काही साध्य होईल ते पुरेसे आहे. ज्याचे मन आनंदी आहे त्याच्याकडे सर्व काही आहे.
*▣▬▬▬▬✥⊰༺☬༒☬༻⊱✥▬▬▬▬▣*

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

19 Nov, 06:00


आयुष्यात आलेले वाईट प्रसंग वाईट वेळ फक्त अनुभव म्हणून जरी मान्य करता आली तर तुम्ही जीवनाच्या प्रगतीकडे एक पाऊल पुढे टाकले आहे समजा❤‍🔥कारण आहे ती परस्थिती स्विकारायलाही खूप मोठं धाडस लागत..💯🔥💪🏻
........🦋🌺🙏........
शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

17 Nov, 17:12


इतरांसारखा तूपण नकोस बनू युवानेता🙅‍♂
मिळेल काय तुला जरी आली कुणाचीही सत्ता?
एका मतासाठी दिल्या जातात येथे हजारोच्या नोटा🤷
सत्तेसाठी हा चालत राहतो नेहमी खेळ खोटा.

कुठपर्यंत युवनेता म्हणून उचलणार तू संतरज्या?
तू मोठा झालास तेव्हाच असेल खरी मज्जा❤‍🔥
तूच आहेस एकमेव तुझ्या घरासाठी राजा🥰
का करायाचा इतरांच्या सत्तेसाठी गाजावाजा?

कलम १९ नुसार गहाण नको ठेवू मतदान स्वातंत्र्यचा अधिकार🙋
मतदानाचा हक्क गाजवून निवडायला हवं योग्य सरका
🙏🏻
स्वतःवर ठेव विश्वास,मानू नकोस आता तू हार
शिक्षणाची संधी सोडून आयुष्याचा नको करू अंधार

........🦋🌺🙏........
शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

17 Nov, 17:11


@Writer_ami

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

17 Nov, 17:11


बेशक तुझको
ये खुदा चाहे हद से
ज्यादा मुझे दर्द दे

पर एक पल भी उसकी
याद ना आ जाए
ऐसा मुझे हर लम्हा दे

✍️विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

17 Nov, 14:03


स्वतःमध्ये खुश राहा कारण ते दुसऱ्या कडून शोधलं तर आपलं जगणं विसरून जाहाण हा त्यांच्या दोष नसतो तर प्रत्येकाला जीवन जगण्याचं स्वतंत्र असतं फक्त आपण आपला जगण्याचा कोणाला होऊ द्यायचा नाही कारण आयुष्यात अश्या काही व्यक्ती भेटतात त्यांना गमावणं आपल्याला पडवणार नसतं म्हणून त्यांच्या पासून दूर जाऊन त्यांना आनंदी बघायचं असतं यालाच ❤️ म्हणतात ना जीवापार जपणे!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

16 Nov, 17:02


हम वह बदनसीब
इंसान है जो आपसे
बेइंतहा मोहब्बत करके भी

आपकी एक कॉल के
इंतजार में आपको
हर पल बेपनाह याद करके
आपके खयालों में
गुमशुदा रहते है

✍️विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

16 Nov, 16:29


हो” आणि “नाही” हे दोन*
छोटे शब्द आहेत,
पण त्याविषयी खूप
विचार करावा लागतो…
आपण जीवनात
बऱ्याच गोष्टी गमावतो,
“नाही” लवकर बोलल्यामुळे,
आणि,
“हो” उशिरा बोलल्यामुळे…!!!!

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

16 Nov, 16:28


भावनेशी खेळ झाला की व्यक्ती एकांत पसंत करतो....

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

16 Nov, 16:23


I'm on Instagram as @krishnasays412k. Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/krishnasays412k?igsh=MXJrbXdodnVvOXZ0aA==&utm_source=ig_contact_invite

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

16 Nov, 10:44


जोपर्यंत हातावरील भविष्य सांगणाऱ्या रेघांना, कष्टामुळे होणाऱ्या भेगांची झळ लागत नाही आणि पोटातल्या आतड्यांना भुकेमुळे होणारी कळ लागत नाही🥺व इतरांचे दुःख बघूनही स्वतःला हळहळ होत नाही🙁 तोपर्यंत आयुष्याच्या खऱ्या संघर्षाचा अर्थ समजतच नाही..🔥🙏🏻
...........🦋🌺🙏...........
लेखन✍️-B.S Kendre(Stu)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

15 Nov, 11:49


प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न नेहमी येतोचं तो म्हणजे एवढ दुःखं माझ्याच वाट्याला का येत तो येणं स्वाभाविक आहे कारण जीवन म्हटलं सुखदुःखं हे आलंच हे वास्तविक सत्य कोणीच नाकारू शकतं नाही हा नियम सर्वांनाचं लागू होत असेल जी परिस्थिती आपल्या पुढे निर्माण झाली आहे तिचा स्वीकार करून आनंदाने जगायला काय हरकत आहे उलट त्या गोष्टींचा त्रास आपल्यालाच कमी होतो हे मी स्वतःलाचं अनुभवत आहे !,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

14 Nov, 04:44


भारतीयांचा परदेशी शिक्षण,व्यसायाकडे कल वाढतोय का??(स्वदेशासाठी🇮🇳फक्त पूर्ण वाचू नका त्यावर विचार करा,तेव्हा खरा सार्थ समजेल,सर्व बाजू विचारात घेवून स्वमत मांडले आहे)

एकेकाळी आपल्या देशास सोने की चिडिया असणारा देश संबोधतले जायचे कारण ह्या पवित्र देशात सर्व गोष्टींची भरभराट होती मग ती शिक्षणाची असो की व्यवसायाची.आपलं प्राचीन ज्ञान मानवी जीवनासाठी किती उपयोगाचे आहे हे फक्त चार वेदांचा अभ्यास केला तरीही समजते.आर्यभट्ट,चाणक्य,स्वामी विवेकानंद ह्यांच्यासारखे थोर अभ्यासक येथे होऊन गेले आणि त्यांनीच भारतीय ज्ञानाचा पाया ह्या मातीत पेरला व त्या विचारातूनच देशात आमूलाग्र बदल,चळवळी घडल्या.नालंदा,तक्षशिला ही प्रसिद्ध विद्यापीठे होती,जिथे जगभरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत अशी ही अभिमानास्पद शिक्षणपद्धती पुढे चालत राहिली.
   परंतु आताची परिस्थिती आणि लोकमत सांगण्यास दुःख होते की,बहुतांश भारतीय लोक/विद्यार्थी ह्यांना विदेशी शिक्षण/व्यवसाय सोयीस्कर वाटतोय कारण विदेशात अनेक संधी,कमी पैशात शिक्षण,रोजगार मिळेल असा त्यांचा समज असतो.आपण विदेशात जाऊन शिक्षण घेतो इथपर्यंत ठीक आहे परंतु स्वभुमित येऊन त्याच शिक्षणाच्या उपयोग येथील समाजासाठी करतो का?ह्यांचे उत्तर बहुतांश नाही असे असेल अपवादही असतील काही परंतु जेव्हा शिक्षणासाठी,व्यवसायासाठी विदेशात जातो तेव्हा विदेशी लोक,कंपन्या आपल्याला अश्या ऑफर्स दाखवतात की  तिथलेच कायमस्वरुपी रहिवाशी होते आणि एक स्वदेशी माणूस आपले कष्ट,बुध्दिमत्ता विदेशाच्या प्रगतीसाठी फक्त काही पैशाच्या मोबदल्यासाठी गहाण ठेवतो.पैसे भेटतात परंतु प्रगती विदेशची होते.ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की आपण सुंदर अश्या भारतराष्ट्रास,इथील परिवरास विसरतो.
  हेच सगळे व्यवसायिक स्वदेशात जे विदेशात काम करणार आहोत तेच केलं तर देशाची किती प्रगती होईल आणि ज्या काही अडचणी असतील त्या एकमेकांमध्ये सोडवल्या जातील,परंतु त्यासाठी स्वदेशात एकत्र काम करण्याची मानसिकता तयार केली पाहिजे त्याशिवाय राष्ट्रउन्नत्ती होणे कठीण आहे.ज्या राष्ट्राने,स्वराज्याच्या कुशीत वाढलो इथिल अन्न खाऊन मोठे झालो,मग ह्या देशात काम करायला कसली लाज?व्यवसायाच्या संधी कदाचित नसतील तर आपण त्याचे क्षेत्र आणि ठिकाण बदलू शकतो. कदाचित थोडे पैसे कमी मिळतील परंतु समाधान तर नक्की मिळू शकते ना.इतर देशातलं वातावरण , संस्कृती,भोजन आणि हवमान आपल्याला पचल का आणि मूळ प्रश्न येतो सुरक्षेचा आणि युक्रेनरशिया युध्याच्या काळात कितीतरी लोक स्वदेशात परतले हे तर जगाने पाहिलच आहे.शिक्षण विदेशात झाल परंतु त्याचा उपयोग स्वदेशत होवा.विदेशी शिक्षण,नोकरी विरोध नाही परंतु प्रत्येक गोष्टीस नाण्याप्रमाने असणाऱ्या दोन्हीही बाजू पडताळणे गरजेचे आहे,शेवटी निर्णय हा व्यक्तिकच असतो......🦋🌺🙏.....शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

5,825

subscribers

5,538

photos

397

videos