*🌀आधार जीवांचा श्रीगुरुमाऊली 🌀*
*💠‼️उद्या गुरुपुष्यामृत योग आहे ‼️💠*
*💠पंचागात दिल्याप्रमाणे हा आजचा गुरूपुष्यामृत योग विशेष फलदायी आहे कारण आज कालाष्टमी आहे. कराष्टमी आहे. आज अमृत सिध्दी योग आहे. सर्व कार्य सिध्दी योग आहे. साध्य योग आहे. देव नक्षत्र पुष्य नक्षत्र तर असतेच या दिवशी. असा अती शुभ सर्वार्थसिध्दी योग आज आला आहे. दिलेली सेवा उपाय सेवा करून गुरुकृपा प्राप्त करून घ्यावी.*
*💠उद्या गुरुवार आहे. सकाळी 6 वा.52 मि.पासून ते दुपारी 3 वा.34 मि. पर्यंत या आरोग्यदायी शुभदायी लक्ष्मीकारक,धनदायी गुरुपुष्यामृत योगाचा शुभदायी पुण्यकाल आहे. या काळात आवर्जून श्री स्वामी चरीत्र सारामृत या पोथीचा एक पाठ अवश्य करावा. तसेच 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करावा.. या सेवेने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होऊन लक्ष्मी प्रसन्न राहते.*
*🛑ईतर सेवा व या दिवसाचे महत्व🛑*
*श्री प्रभु रामचंद्रांचे लग्न या गुरुपुष्यामृत योगावर*
*लागले होते. परंतु साक्षात परमेश्वर असून सुध्दा त्यांना सुखाचा संसार करता आला नाही .वैवाहिक आयुष्य अत्यंत खडतर (वनवास) होते. तेंव्हा पासून अशी एक धारणा आहे किंवा प्रथा रूढ झाली की या योगावर विवाह करत नाहीत.बाकी सर्व कार्यास शुभपुण्यदायी असा हा योग असतो‼️*
*💠गुरुवारी आलेले हे #पुष्य नक्षत्र मात्र लहान बालकांना औषध प्राशन करण्याकरता व सुवर्णजल प्राशन करण्यासाठी फार उपयुक्त असतो. हे नक्षत्र श्री लक्ष्मीकरक आहे. #चांदीचे निरंजन या नक्षत्रावर आणून सलग 12 दिवस चढत्या क्रमाने वात प्रज्वलीत करून लावावी व नंतरचे 12 दिवस उतरत्या क्रमाने एक एक वात कमी करावी. शुद्ध गायीचे तूप वापरावे. हा अत्यंतच प्रभावी लक्ष्मीप्राप्ती व आर्थिक प्रगतीसाठी करायचा उपाय आहे. अर्थातच त्या व्यक्तीने नित्यसेवा केलेली असणे व करणे आवश्यकच आहे. गुण लवकर येतो.*
*💠तसेच या पुण्यकाळात नित्यसेवा ग्रंथातील धन्वंतरीमंत्राचा व सर्व रोगनाशक मंत्रचा एक माळ जप करून ते तीर्थ घरात सर्वांनी घ्यावे. नित्यसेवा या काळात करता आली तर अती उत्तमच आहे. तसेच हा योग लहान बालकांना औषधीयुक्त सुवर्णजल प्राशन म्हणजेच पिण्यासाठी करण्यासाठी अत्यंत शुभ असते. यास सुवर्ण प्राशन संस्कार म्हणतात. पुष्य नक्षत्र हे औषधी व रोग निवारण करणारे शुभ नक्षत्र आहे.डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे घेण्याची सुरुवात जमले तर या गुरुपुष्यामृत योगावर करावी.*
*💠टीप:-- या अखील भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक सेवा मार्ग (दिंडोरीप्रणित) मार्गातील स्वामींची नित्यसेवा जर मनोभावे करत असाल तर हे या स्वरूपाचे विशिष्ट हेतूने शुभ दिवशी केलेले केलेले तोडगे उपाय यांचा लाभ होतोच होतो.पोस्ट मधील सर्व माहिती ज्ञान दिंडोरीप्रणित ग्रंथात दिलेले आहे.*
*💠🙏श्री स्वामी समर्थ गुरूमाऊली चरणार्पणमस्तू💠🙏*
https://whatsapp.com/channel/0029VaiJ3VL4IBhIcw97oj2q
https://t.me/swamishakti