🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://youtube.com/shorts/bNm2k-iijJE?feature=share
📜 १६ मे इ.स.१६८२
(वैशाख वद्य पंचमी, शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार मंगळवार)
छत्रपती संभाजी महाराजांची आरमारी शक्ती!
महाराजांनी इ.स.१६५६ पासूनच मराठ्यांच्या आरमाराचा पाया रचला आणि आपले बळकट आरमार समुद्रावर उभे केले. जे महाराजांचे धोरण तेच धोरण पुढे छत्रपती शंभुराजेंनी सुरू ठेवले. मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना लिहीलेले एक पत्र इतिहासात उपलब्ध असून त्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या आरमारी शक्तीचा उल्लेख आढळतो.
तो असा
छत्रपती संभाजी महाराजांच्या जवळ ८५ गलबते, ५ माणसे, मायनाक भंडारीचा व सिद्दी संबळचा मुलगा हाताखाली आहेत. छोट्या होड्या वगळून ५८ मोठ्या युद्धनौका, ५०००हजार सैनिकांचे तळ, ३० ते १५० टनांची मोठी गलबते, ३ शिडांची गुराबे इतकी आरमारी ताकद उपलब्ध आहे. यावरून छत्रपती संभाजी महाराजांनीही राज्य कारभाराच्या सुरूवातीपासून आरमारी शक्ती सदृढ करण्याकडे भर दिला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १६ मे इ.स.१७३९
वसई मोहिम
पोर्तुगीच गव्हर्नर नो. द. कुन्या याने २० जानेवारी १५३३ ला गुजरातच्या बहादुरशहाचा सरदार मलिक तुग़लक याचा पराभव करुन वसई जिंकले. बहादुरशहाबरोबर वाटाघाटी करुन २३ डिसेंबर १५३४ ला वसई पोर्तुगिचानकड़े आली. तेथील स्थानिक जनतेने प्रथम त्यांचे स्वागत केले कारन मुघली सत्तेला ते वैतागले होते. पण पोर्तुगिचानी सक्तीचे धर्मांतर, मंदिरे उध्वस्त कर, हिन्दू पूजा व उत्सवाना बंदी सुरु केल्यानंतर तेथील जनतेने पेशव्यांपुढे आपली कैफियत मंडली. आणि त्यानंतर १७३७ साली पेशव्यानी मोहिम सुरू केली.
३० मे १७३७ वसईवर मराठयानी पहिला हल्ला केला पण फिरंग्यानी तो परतवून लावला. त्यानंतर ९ जून, २८ जून, ४ सप्टे. १९३७ हल्ला अयशस्वी राहिला.
चिमाजी आप्पानी १९३९ च्या फेब्रुवारी ला वसईत तल ठोकला व ख-या अर्थाने लढाई सूरू झाली. अप्पांच्या कुशल नेतृत्वखाली मराठयानी जोरदार हल्ले केल्यानंतर ३० एप्रिलपासून वसईच्या शेवटास सुरवात झाली. मराठे किल्ल्यात घुसले. आखेर ४ मे १७९३ मधे फिरंग्यानी तहाचे निशान फडकावले आणि १६ मे १७३९ रोजी किल्ला मराठयांन कड़े सुपूर्द केला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 १६ मे इ.स.१७५१
दाभाडे घराणे नजरकैदेत
सरसेनापती उमाबाईंनी युद्धांत अलौकिक शौर्य गाजवून दिले. एका महिला सरसेनापतीने केलेल्या या कामगिरीवर छत्रपती शाहू खूश झाले होते. त्यांनी उमाबाईंना साताऱ्यात बोलावून दरबारात त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पायात सोन्याचे तोडे घातले. सोन्याचे तोडे मिळविण्याचा मान उमाबाईनंतर त्यांचा मुलगा यशवंतरावांनी सुरतेच्या लढाईत मिळविला. पेशव्यांवरील उमाबाईंची नाराजी पुढे ही नानासाहेब पेशव्यांमुळे कायम राहिली. शाहू महाराजांच्या निधनानंतर दाभाड्यांचा मुख्य आधार कोसळला. उमाबाई ताराबाईंबरोबर गेल्या. उमाबाई, ताराबाई, आणि दमाजी गायकवाड यांनी पेशव्यांच्या विरूद्ध उठाव केला. तेव्हा १६ मे १७५१ रोजी पेशव्यांनी दाभाड्यांची सर्व मंडळी पुण्यात होळकरांच्या वाड्यात नजरकैदैत ठेवली; परंतु उमाबाईंनी पेशव्यांशी समझोता घडवून आणला व ते प्रकरण संपले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १६ मे इ.स.१८१८
इंग्रजांचा मालेगावच्या किल्ल्याला वेढा
नारोशंकर यांनी अठराव्या शतकात मालेगावचा भुईकोट बांधला. सातारा छत्रपती दुसरे शाहू यांचा धाकटा भाऊ चतुरसिंह याने पेशव्यां विरुध्द उठाव केला. त्याने मालेगावच्या किल्ल्याचा आसरा घेतला होता. पेशव्यांचा सेनापती त्र्यंबकजी डेंगळे याने त्याला १० फ़्रेब्रुवारी १८१० रोजी कपट करुन मालेगावच्या किल्ल्यात कैद केले होते. पेशवाईच्या पाडावानंतर या किल्ल्यावर अरबांची सत्ता होती. १६ मे १८१८ रोजी इंग्रजांनी मालेगावच्या किल्ल्याला वेढा घातला. जवळजवळ एक महिना ३००-३५० अरबांनी मालेगावच्या किल्ल्याच्या मदतीने इंग्रजांशी लढा दिला. १०जुम १८१८ ला इंग्रजांच्या तोफ़ांच्या मार्य़ात किल्ल्यातील दारुकोठाराचा स्फ़ोट झाल्याने १३ जून रोजी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇