*🚩श्री स्वामी समर्थ 🚩*
*⚜लक्ष्मीपूजन-लक्ष्मी-कुबेर पूजन ⚜*
(आश्विन कृ.१४ दि. २४ऑक्टोबर २०२२ सोमवार)
*📍कार्यकारण भाव : बलीच्या बंदिवासातून माता लक्ष्मीची सुटका, लक्ष्मीकारक व्रतांपैकी एक.*
*🌺पूजा साहित्य🌺*
*गंध, अक्षता, हळदी-कुंकू, फुले (शक्यतो पांढरी रुई, पांढरी जास्वंदी, पांढरी शेवंती, पांढरी कन्हेर, झेंडू इ.) तुळशी पत्र, निरांजन, धूप, नागवेलीची पाने, खारीक, बदाम, नाणे, पाण्याचा तांब्या, फळे, नैवेद्यास, पुरण पोळी, साळीच्या लाह्या, बत्ताशे, फराळाचे पदार्थ इ. (ग्रंथ-नित्यसेवा, श्री दुर्गा सप्तशती, श्री स्वामी समर्थ सेवा मासिक अंक)*
*🌹पूजा मांडणी व पूर्वतयारी🌹*
*📍पूजेची वेळ सायंकाळी ५.३० नंतर प्रदोष काळापूर्वीच मांडणी करावी. (सायं. ५.३० वा.)*
*👉 देव्हार्यासमोर एक मोठा पाट ठेवावा व त्यावर पूजेसाठी आणलेले नवीन वस्त्र अंथरावे.*
*👉 चित्रात दिल्यानूसार पाटावर स्वस्तिक काढावे (त्यावर बाहेरून पूजा करून आणलेली नवीन केरसुणी ठेवण्यात येईल.) पाटावर डाव्या बाजुला लक्ष्मी नारायण यांची प्रतिमा ठेवावी, त्याच्या समोर दोन स्वतंत्र जोडपानांवर कोजागरी पौर्णिमेस वापरलेल्या देवी लक्ष्मी आणि कुबेर यांच्या सुपार्या ठेवाव्यात. त्यानंतर दोन सुक्या खोबर्याच्या वाट्यांमध्ये अनुक्रमे खडीसाखर व बत्ताशे-साळीच्या लाह्या भराव्यात. त्यानंतर या दोन्ही वाट्या जोड पानावरील सुपारी स्वरुपातील देवतांच्या समोर ठेवाव्यात.*
*👉 लक्ष्मी नारायण यांच्या प्रतिमे शेजारी कुलदेवतेचा टाक ठेवावा.*
*👉 त्याच्या समोरील बाजुस चार हत्तींनी युक्त असलेली माता लक्ष्मीची प्रतिमा अथवा नाणे ठेवावे, त्यासमोर एक नारळ ठेवावे. पैसे, सोने, चांदी, फळे, फराळाचे पदार्थ इ. चित्रात दर्शविल्या प्रमाणे त्या त्या ठिकाणी ठेवावे. पूजेच्या उजव्या बाजूस शंख तसेच डाव्या बाजूस घंटा ठेवावी, अशा पद्धतीने पूजेची मांडणी केल्यानंतर पूजेसमोर तसेच प्रवेशद्वार आणि तुळशी वृंदावना जवळ रांगोळी काढावी. तुळशीपासून पूजेच्या ठिकाणा पर्यंत रांगोळीने लक्ष्मी तसेच गायीची पावले काढावीत.*
*⚜श्री लक्ष्मी पूजन मांडणी ⚜*
*👉 तद्नंतर देवघर, प्रवेशद्वार, तसेच तुळशीजवळ पणत्या प्रज्वलित कराव्यात.*
*👉 पूजेला सुरुवात करताना घरात तुपाचा दिवा व धूप लावावा, सर्वत्र गोमुत्र शिंपडावे. घरातील वातावरण शांत ठेवावे. टी.व्ही. टेप बंद ठेवावेत.*
*⚜पूजन विधी ⚜*
*👉 सायंकाळी ५.३० वा. पूजेस सुरुवात करावी. पूजेची सुरुवात तुलसी पूजनाने करावी.*
*🥦तुलसी पूजन 🥦*
*📌प्रथम तुळशीजवळ जाऊन दिवा अगरबत्ती लावून, हळद-कुंकू, अक्षता व फुले वाहून तिची पंचोपचार पूजा करावी.*
*🎯तुळशी पंचोपचार पूजा🎯*
*👉 गंध, अक्षता, हळदी-कुंकू, फुले, धुप, दीप व खडीसाखरेचा नैवेद्य) यानंतर एक वेळा तुलसी स्तोत्र किंवा तुलसी मंत्र अकरा वेळा म्हणावा.*
*🎤तुलसी स्तोत्र🎤*
*तुलसी सर्व व्रतानां महापातक नाशिनी। अपवर्ग प्रदे देवी वैष्णवानां प्रिय सदा।*
*सत्ये सत्यवतीचैव त्रेताया मानवी तथा।*
*द्वापारे चावतीर्णासी वृन्दात्वं तुलसी कली:॥*
*📍तुलसी मंत्र📍*
*“ॐ र्हीं क्लीं ऐं वृन्दावन्यै स्वाहा॥”*
*👉 तसेच पूजेसाठी आणलेल्या नवीन केरसुणीची पंचोपचार पूजा करावी.*
*👉 तद्पश्चात प्रवेश द्वाराजवळ यावे, प्रवेशद्वाराची हळद-कुंकू वाहून पूजा करावी.*
*👉 त्यानंतर पूजेच्या ठिकाणी यावे, बाहेरून पूजा करून आणलेली केरसुणी चित्रात दाखविलेल्या जागी ठेवावी. त्यानंतर निम्नलिखित क्रमानूसार पूजा करावी.*
*📍 सर्व प्रथम देवघरातील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची पूजा करून श्री स्वामी स्तवन म्हणावे तसेच १ माळ श्री स्वामी समर्थ जप करावा.*
*📍 त्यानंतर महिलांनी स्वत:च्या कपाळाला हळद-कुंकू तर पुरुषांनी अष्टगंध लावावा.*
*⚜आचमन ⚜*
*📌 भगवान विष्णूंच्या २४ नावांपैकी प्रथम तीन नावांनी पाणी प्राशन करावे व पुढील दोन नावांना पाणी सरळ हाताने ताम्हणात सोडावे नंतर हात जोडून पुढील नावे म्हणावीत.*
*१) ॐ केशवाय नम:*
*२) ॐ नारायणाय नम:*
*३) ॐ माधवाय नम:*
*४) ॐ गोविंदाय नम:*
*५) ॐ विष्णवे नम:*
*६) ॐ मधुसुदनाय नम:*
*७) ॐ त्रिविक्रमाय नम:*
*८) ॐ वामनाय नम:*
*९) ॐ श्री धराय नम:*
*१०) ॐ ऋषिकेशाय नम:*
*११) ॐ पद्मनाभाय नम:*
*१२) ॐ दामोदराय नम:*
*१३) ॐ संकर्षणाय नम:*
*१४) ॐ वामनाय नम:*
*१५) ॐ प्रद्युम्नाय नम:*
*१६) ॐ अनिरुद्धाय नम:*
*१७) ॐ पुरुषोत्तमाय नम:*
*१८) ॐ अधोक्षजाय नम:*
*१९) ॐ नारसिंहाय नम:*
*२०) ॐ अच्युताय नम:*
*२१) ॐ जनार्दनाय नम:*
*२२) ॐ उपेंद्राय नम:*
*२३) ॐ हरये नम:*
*२४) ॐ श्रीकृष्ण परमात्मने नम:*
*⚜प्राणायाम ⚜*
*प्राणायाम करण्यापूर्वी पुढील विनियोग म्हणावा.*
*‘प्रणवस्य परब्रह्म ऋषि। परमात्मा देवता। देवी गायत्री छंद:। प्राणायामे विनियोग:॥’*
*👉 नंतर खाली दिलेली कृती करावी*
*👉 प्रथम मधल्या दोन बोटांनी डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्यावा व नंतर अं