1. शेतकऱ्यांना सक्षम करणे:
- शेतकऱ्यांना आधुनिक आणि टिकाऊ शेती पद्धती शिकवणे.
- बियाणे बँका आणि स्थानिक बाजारपेठा स्थापन करणे.
- पावसाळ्यात पाणी साठवून ठेवण्याच्या पद्धती प्रोत्साहित करणे.
- शेतकरी सहकारी संस्था स्थापन करण्यास मदत करणे.
2. सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण:
- शिक्षकांची संख्या वाढवून त्यांना कायमस्वरूपी नोकरी देणे.
- शाळांमध्ये प्रशासकीय कामांपेक्षा शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे.
- सरकारी शाळांना खाजगी शाळांच्या पातळीवर आणण्यासाठी पायाभूत सुविधा पुरवणे.
3. सर्वसुलभ आणि स्वस्त आरोग्य सेवा:
- सरकारी रुग्णालयांमध्ये कर्मचारी वाढवून, सुविधा उंचावणे आणि स्वच्छता राखणे.
- सर्व नागरिकांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवणे.
- 2019 मध्ये महाराष्ट्रात 13,918 लोकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू झाला.
4. स्वच्छ पर्यावरण आणि कचरा व्यवस्थापन:
- कंपोस्टिंग आणि रिसायक्लिंग सारख्या पद्धतींद्वारे कचरा व्यवस्थापन करणे.
- स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे.
- रवांडा देशाचा यशस्वी मॉडेल अंगीकारणे.
5. लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे:
- स्थानिक व्यवसाय, कुटीर उद्योग आणि हस्तकलाकारांना मदत करणे.
- लहान व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देऊन अधिक रोजगार निर्मिती करणे.
- मोठ्या कंपन्यांवर अवलंबून न राहता विकेंद्रीकृत आर्थिक विकास करणे.
6. कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेची खातरजमा:
- आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पोलीस दलाची संख्या वाढवणे.
- गुन्हेगारीवर प्रभावी मात करण्यासाठी तज्ञ चौकशी पथके स्थापन करणे.
- सर्व नागरिकांच्या सुरक्षेची हमी देणे.
From : MPSC Guidance