स्पर्धा परीक्षा अपडेट्स @spardhaparikshaupdate Channel on Telegram

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

@spardhaparikshaupdate


MPSC, UPSC, Banking ,केंद्रीय भरती, सरळसेवा परीक्षा Update देणारे टेलिग्राम चॅनेल

चालू घडामोडी वरती विशेष भर

स्पर्धा परीक्षा अपडेट्स (Marathi)

स्पर्धा परीक्षा अपडेट्स नावाचं हा टेलिग्राम चॅनेल या मराठी भाषेतील सर्व प्रतिसादांचं एक स्थळ आहे. या चॅनेलवर एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, केंद्रीय भरती, सरळसेवा परीक्षेच्या अद्यतनांची माहिती मिळेल. येथे चालू घडामोडी, वर्तनी, आणि विशेष भर पाहू शकतात. जे कोणती परीक्षा देणारे आहेत, त्यांना हे चॅनेल मदत करू शकतं. या चॅनेलवर नवीन ताज्या अपडेट्स वेळेवर वेळेवर लोड केल्या जातात आणि त्यांची मदत नक्कीच सोपी आहे. तुमच्याला स्पर्धांसाठी स्वतःचे आत्मविश्वास वाढवण्यास मदत करण्यात या चॅनेल मदत करू शकतं.

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

19 Nov, 03:57


मतदान दिवशी सुट्टी

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

15 Nov, 06:49


⭕️ बिरसा मुंडा यांच्यावर MPSC ने संयुक्त पूर्व परीक्षेत प्रश्न विचारला होता ..

@ स्पर्धा परीक्षा अपडेट्स

@SpardhaParikshaUpdates

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

15 Nov, 06:10


बिरसा मुंडा यांची आज 150 वी जयंती आहे. त्यांची जयंती 'आदिवासी गौरव दिन' म्हणून साजरी करण्यात येते.

@ स्पर्धा परीक्षा अपडेट्स

@SpardhaParikshaUpdate

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

10 Nov, 05:59


MPSC ने सुद्धा AI technology ची मदत घ्यावी.

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

09 Nov, 15:49


📌 उद्या होणाऱ्या MAHATET २०२४ परीक्षा साठी सर्वांना शुभेच्छा..

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

29 Oct, 01:34


https://marathi.indiatimes.com/maharashtra/jalna/jalna-news-doctor-ajit-kakade-will-contest-partur-vidhan-sabha-nivadnuk-for-manoj-jarange-patil/articleshow/114698554.cms

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

27 Oct, 12:13


Pune Municipal Corporation : महापालिकेच्या नोकरीला राम राम! वर्षभरात ७१ जणांची सोडचिठ्ठी The issue of youth job resignation at Pune Municipal Corporation highlights the challenges faced by the organization in retaining employees
https://www.esakal.com/pune/the-issue-of-youth-job-resignation-at-pune-municipal-corporation-highlights-the-challenges-faced-by-the-organization-in-retaining-employees-ap17

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

24 Oct, 05:45


महाबळेश्वर येथे कोयना नदीचा उगम झाला आहे. तेथून सुमारे ६५ किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या विशाल रांगांमधून सरासरी ५ हजार मिलिमीटर पडणारा पाऊस व भौगोलिक परस्थितीनुसार अरुंद रोड असलेल्या अचूक ठिकाणी कोयना धरणाची निर्मिती करण्यात आली, या धरणाचे बांधकाम रबल काँक्रीटमध्ये केल्याने मजबूत झाले आहे. या अलाशयास 'शिवसागर' असे संबोधिले जाते. ८१९.७८ चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र लाभलेल्या या धरुणाची साठवण क्षमता सुरुवातीला ९८.७८ टीएमसी होती. यामध्ये वाढ करून १०५.२५० टीएमसी करण्यात आली आहे.

यातील ५ टीएमसी पाणीसाठा मृतसाठा आहे. सुमारे ६० लाख लोकसंख्या असलेल्या शहराला किमान दहा वर्षे पाणी पुरेल एवढी क्षमता असलेला पाणीसाठा या शिवसागरात आहे. धरणाची एकूण लांबी ८०७.७८ मीटर असून उंची १०३.२ मीटर आहे. धरणाचा माथा सुमारे ३५ ते ४८ फूट असून यावर दुतर्फा वाहतूक होईल इतकी रुंद जागा आहे. धरणास सहा वक्र दरवाजे आहेत. याच दरवाजांतून व पायथा वीजगृहातून पावसाळ्यात धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग कोयना नदीमध्ये केला जातो.

धरणाच्या भिंतीत सुरक्षेसाठी विविध उपकरणे बसविण्यात आली असून, यातून धरणाची स्थिती दर्शविली जाते. कृष्णा पाणीवाटप लवादानुसार धरणातील १०५.२५ टीएमसी साठ्यातील ६७.५० टीएमसी पाणी हे पश्चिमेकडे वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येते. कोयना जलविद्युत प्रकल्पातून १९६० मेगावॉट वीजनिर्मितीद्वारे सुमारे बाराशे कोटींचे उत्पन्न शासनाला मिळत आहे. उर्वरित पाणी पूर्वेला सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात येत आहे.

कोयना धरणाच्या पश्चिमेकडील पाण्याचा विसर्ग वीजनिर्मितीसाठी, तर पूर्वेकडील पाण्याचा विसर्ग हा सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी होत आहे. पूर्वेकडे पायथा वीजगृहात दोन जनित्रांच्या माध्यमातून वीजनिर्मिती करून पाणी नदीपात्रात सोडण्यात येते. कमाल २ हजार २०० क्युसेक पाणी हे सिंचनाच्या मागणीनुसार सोडण्यात येत असते; तसेच धरणाच्या पायथ्याला नदी विमोचक असून त्याची क्षमता तीन हजार क्युसेक आहे. अतिरिक्त पाण्याची गरज भासल्यास यातून कोयना नदीत पाणी सोडले जाते.

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

24 Oct, 05:45


कोयना प्रकल्प उभारणीच्या हालचाली स्वातंत्र्यपूर्व काळातच सुरु झाल्या होत्या. १९०१ साली एच.एफ. बिल या ब्रिटिश अभियंत्याने देशातील पाणीटंचाईवर उपाय म्हणून कोयना भागाचे सर्वेक्षण केले होते. दरम्यानच्या काळात पहिले व दूसरे महायुद्ध, तसेच जागतिक मंदीमुळे है काम धांडले. राज्यातून विजेची वाढती मागणी होत असल्याने १९४५ साली पुन्हा सर्वेक्षण व नियोजनाचे काम सुरू झाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोयना धरण विभागाची स्थापना करण्यात आली.
१९५३ साली लोकनेते बाळासाहेब देसाई व ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या अथक प्रयत्नांनी या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली. १९ जानेवारी १९५४ रोजी मोरारजी देसाई यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपुजन झाले. त्यानतर कामास सुरुवात झाली, कोयना प्रकल्पाच्या कार्माची पाहणी करण्यासाठी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६० साली भेट दिली होती. प्रकल्पाचे काम पाहून ते प्रभावित इाले होते. त्यांनी प्रकल्पासाठी रावणान्या श्रमिकांचे व अभियंत्यांच तोंडभरून कौतुक केले होते. १९६९ साली या धरणात पाणी साठविण्यास प्रारंभ झाला, तर १९६२ साली विद्युतनिर्मितीस सुरुवात झाली.

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

15 Oct, 14:26


Excise department

Driver & Constable नियुक्ती आदेश 🔥

@ स्पर्धा परीक्षा अपडेट्स

@SpardhaParikshaUpdate

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

15 Oct, 11:26


Excise department

Constable नियुक्ती आदेश 🔥

@ स्पर्धा परीक्षा अपडेट्स

@SpardhaParikshaUpdate

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

15 Oct, 10:22


⭕️ 20 नोव्हेंबर मतदान 🔥🔥🔥

23 नोव्हेंबर मतमोजणी 🔥🔥🔥

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

15 Oct, 03:39


⭕️ PSI वय वाढीचा मुद्दा आचारसंहिता पूर्वीच निकाली काढावा लागेल.
त्यानंतर ते शक्य होईल असे वाटत नाही .

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

15 Oct, 03:38


⭕️ या आठवड्यात नवीन जाहिराती येत आहेत
तेच बरेच pending नियुक्ती ऑर्डर सुद्धा आल्या आहेत.
कदाचित सोमवारी किंवा मंगळवारी राज्यात निवडणूक आचारसंहिता घोषणा होऊ शकते, अशी शक्यता आहे.

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

14 Oct, 16:08


केंद्र सरकारची दिवाळी भेट! राज्यातील ‘या’ २३ महसूल अधिकाऱ्यांना ‘आयएएस’ केडर
https://www.esakal.com/maharashtra/central-governments-diwali-gift-ias-cadre-to-these-23-revenue-officers-in-the-state

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

14 Oct, 08:29


👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :

मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ वाजेपासून अंमलबजावणी.

आगरी समाजासाठी महामंडळ

समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम

दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता

आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता

वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता

राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी

खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य

राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता

किल्लारीच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्यास कर्ज परतफेड समान हप्त्यात करण्यास मान्यता

अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ

मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे

खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना

मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा

अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट

‘उमेद’साठी अभ्यासगट

कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

14 Oct, 04:54


⭕️ PSI वय वाढीचा मुद्दा आचारसंहिता पूर्वीच निकाली काढावा लागेल.
त्यानंतर ते शक्य होईल असे वाटत नाही .

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

12 Oct, 08:03


Good news for home guards On the occasion of Dussehra state government doubled the salary
https://www.loksatta.com/maharashtra/good-news-for-home-guards-on-the-occasion-of-dussehra-state-government-doubled-the-salary-kvg-85-4647802/

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

12 Oct, 06:33


⭕️ या आठवड्यात नवीन जाहिराती येत आहेत
तेच बरेच pending नियुक्ती ऑर्डर सुद्धा आल्या आहेत.
कदाचित सोमवारी किंवा मंगळवारी राज्यात निवडणूक आचारसंहिता घोषणा होऊ शकते, अशी शक्यता आहे.

11,161

subscribers

6,715

photos

30

videos