Maharashtra Bharti Updates @mahabhartiupdates Channel on Telegram

Maharashtra Bharti Updates

@mahabhartiupdates


महाराष्ट्र भरती परीक्षेची तयारी करताय का? तर मग आपल्या Youtube चॅनेल ला लगेच subscribe करून घ्या. https://www.youtube.com/@generalknowledgeinmarathi Website: https://mhbharti.com/

Maharashtra Bharti Updates (Marathi)

महाराष्ट्र भरती परीक्षेची तयारी करताय का? तर मग आपल्या Youtube चॅनेल ला लगेच subscribe करून घ्या. 'Maharashtra Bharti Updates' हा टेलीग्राम चॅनेल आपल्याला सर्व भरती संदर्भांची अपडेट्स मिळवणार आहे. या चॅनेलवर आपण विविध परीक्षा जाहिराती, पाठ्यक्रम, प्रश्नपत्रिका प्रश्न, उत्तरकुंजी, प्रिव्हियस इयर्स पेपर्स, लेखी परीक्षा मार्गदर्शन, व्याख्यान आणि काही अद्वितीय माहिती घोषित केली जाते. महाराष्ट्र सरकारी भरती संदर्भांचे सर्व नवीन अपडेट्स, महत्त्वाचे दिवस, पेपर पॅटर्न, परीक्षेत काय दिसेल याबाबतची माहिती या चॅनेलवर उपलब्ध असतील. ह्या चॅनेलवर सदस्यता घेण्याची प्रक्रिया अतिशय सोप्पी आणि वापरकर्ता मैत्रीण माहिती अर्ज करण्याचा सौख्य आपल्याला मिळेल. महाराष्ट्र भरती परीक्षा साठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ह्या चॅनेलवर जॉईन करण्याची सलग्नता आहे. आपल्याला मिळणारी माहितीनुसार तयारी करून लक्षात घेता की, 'Maharashtra Bharti Updates' आपल्याला सर्वप्रथम जाहीर व्हा असे प्रमाणपत्र प्रदान करणार आहे. जो आपल्या परीक्षा परिणामांच्या व्यक्तीत्व मापदंडांत उच्च असतील. 'Maharashtra Bharti Updates' आपल्याला दिलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्याला परीक्षेत यश मिळवू शकतो. त्यासाठी नक्की 'mahabhartiupdates' चॅनेलवर सदस्यता घेऊन तयार राहा.

Maharashtra Bharti Updates

24 Oct, 12:29


https://www.youtube.com/watch?v=P1BHkKhBgT8

Maharashtra Bharti Updates

23 Oct, 03:29


https://youtu.be/qHh0zKw2UF8

Maharashtra Bharti Updates

19 Oct, 05:48


https://youtu.be/gfbX5RQGqKc

Maharashtra Bharti Updates

18 Oct, 05:45


https://www.youtube.com/watch?v=f70UaTruhlc

Maharashtra Bharti Updates

07 Oct, 10:58


https://youtu.be/QqVKO2ocKxk

Maharashtra Bharti Updates

04 Oct, 04:45


🚩🤩
माझा मराठाचि बोलु कौतुके।
परि अमृतातें ही पैजा जिंके ॥

समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!!

अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! 🚩🚩

Maharashtra Bharti Updates

02 Oct, 12:02


https://youtu.be/Xb-KDSLkmJQ

Maharashtra Bharti Updates

15 Sep, 04:06


https://youtu.be/Fabr0xVJ0tE

Maharashtra Bharti Updates

14 Aug, 10:48


Channel name was changed to «Maharashtra Bharti Updates»

Maharashtra Bharti Updates

03 Jul, 08:04


https://www.youtube.com/watch?v=ay4iXLUn7Co

Maharashtra Bharti Updates

21 Jun, 12:15


https://youtu.be/-WresGl85M8

Maharashtra Bharti Updates

22 Mar, 10:11


👆 पोलीस भरती फॉर्म भरत असताना कोणाचा ईमेल आयडी चुकला असेल तर ते आता बदलू शकतात.

Maharashtra Bharti Updates

12 Mar, 05:03


📰 12 मार्च 2024 सकाळच्या टॉप घडामोडी 👍

📌 Computer General Knowledge in Marathi: https://youtu.be/UYwW9qaKsOk



📰 राज्यातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी २ योजना सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला


🏫 राज्यातील ६१ आदिवासी अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


🌟 धनगर समाजास नवी मुंबई येथे भूखंड उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला


🎓 GST वस्तू व सेवा कर विभागात नवीन ५२२ पदांच्या भरतीला मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला


🚩 उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे महाराष्ट्र भवनासाठी भूखंड उपलब्ध करून घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली


📰 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईतील चिरागनगर, घाटकोपर येथे सार्वजनिक निकडीचा प्रकल्प म्हणून उभारण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.


📰 राज्यात गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरणाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला


📰 राज्यातील वनहक्क धारकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.


📰 भारत आणि चार-युरोपियन समूह EFTA यांनी रविवारी परस्पर व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत-EFTA अंतर्गत, पुढील 15 वर्षांमध्ये भारतात 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असून या अंतर्गत भारतात 10 लाख रोजगार निर्माण होणार, असेही म्हटले आहे.


🚩 डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी काल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला तसेच यावेळी पाटील यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला.


🔴 कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाने रंगीत कॉटन कँडी आणि कृत्रिम रंगाचा वापर करुन गोबी मंचुरियन तयार करणे आणि अशा पदार्थांच्या विक्रीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.


🔉 देशभरात CAA लागू; केंद्राने काढली अधिसूचना


📰 सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांविरोधात बारामतीतून लोकसभा मी लढणार; विजय शिवतारेंची मोठी घोषणा


🚇 CM शिंदेंचं पुणेकरांना गिफ्ट ! वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गाला मंजुरी


🚺 शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव बंधनकारक; मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय


🔵 भाजपचा संविधान बदलण्याचा हेतू; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका


🛣 कोस्टल रोड पूर्णपणे टोलमुक्त ठेवा; मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली मागणी


🚺 राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा पहिला मान ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ यांना मिळाला; उपमुख्यमंत्र्यांच्या दालना बाहेरील नावाची पाटी बदलली


👮‍♂️ मी आणि देवेंद्र फडणवीस टार्गेट होतो, कारवाई झाली पाहिजे; एसआयटीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, SIT चौकशी चा शासन निर्णय (GR) प्रसिद्ध


📲 एअरटेलच्या दोन प्रीपेड प्लॅनच्या किमतीत वाढ झाली असून यामुळे ग्राहकांना फटका बसणार


🎓 ‘सीईटी’चे अर्ज भरण्यास मुदतवाढ; विलंब शुल्कासह 15 मार्चपर्यंत करता येणार अर्ज


🚩 मराठा उमेदवारांचा फायदा भाजपला, निर्णय घेण्यापूर्वी विचार करा; रोहित पवारांचं मराठा समाजाला थेट आवाहन


🗳 सुप्रियाला मंत्री करण्याचा अधिकार असतानाही कधी तिचा विचार केला नाही, शरद पवारांचं मोठं वक्तव्य


🛣 द्वारका एक्सप्रेस महामार्गाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन


🎬 स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा मराठी ट्रेलर लाँच; मराठी सावकरांचा आवाज सुबोध भावे याने दिला


🏏 केकेआरने जेसन रॉयच्या रिप्लेसमेंटची केली घोषणा; इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज फिलीप सॉल्ट याला कोलकात्याने करारबद्ध केले


🎬 करो तैयारी, आ रहे हैं अटल बिहारी! पंकज त्रिपाठींचा 'मैं अटल हूँ' 14 मार्चला 'झी 5' या ओटीटीवर होणार रिलीज


🪙 Today's Gold Rate - आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - 22K = 60,960/- || 24K = 65,850/-




🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

📌 Computer General Knowledge in Marathi: https://youtu.be/UYwW9qaKsOk

Maharashtra Bharti Updates

09 Mar, 06:58


https://youtu.be/mhmeNYjYIws

Maharashtra Bharti Updates

07 Mar, 04:29


📰 07 मार्च 2024 सकाळच्या टॉप घडामोडी 👍

📌 Computer General Knowledge in Marathi: https://youtu.be/UYwW9qaKsOk



👨 तुरीला मिळाला प्रतिक्विंटल १० हजार ३२५ रुपये इतका विक्रमी भाव

🇺🇸 गाझातील परिस्थिती भयावह, लोक उपासमारीने मरतायत, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची युद्ध विरामाची मागणी

📰 राज्यातील महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात; येत्या 9 मार्चला जाहीर होण्याची शक्यता

📰 अमित शाहांनी डाव टाकला, भाजपचा माईंड गेम सुरू, शिंदे गट, अजितदादा गटाला एक अंकी जागा मिळण्याची शक्यता, वीकेंडपर्यंत महायुतीचे जागावाटप जाहीर होण्याची शक्यता

💣 बंगळूरुच्या कॅफेत बॉम्ब ठेवल्याची माहिती देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस; एनआयएची घोषणा

👨 शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सर्व सीमा सील; आंतरराज्य बस स्थानकांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

👮 ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप धुनियाची प्रेयसी पोलिसांच्या ताब्यात; हवाला व्यवहाराचा ‘ईडी’ कडून तपास

📰 लोकसभेनंतर विरोधक होणार बेरोजगार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

📰 खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

🚖 मुंबईच्या वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं पहिलं पाऊल; BKC मध्ये धावणार पॉड टॅक्सी

🐔 नागपुरात बर्ड फ्लूचा उद्रेकामुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू; पशू संवर्धन विभाग अलर्ट मोडवर

🙏 महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी चोवीस तास खुले राहणार

📰 बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांची संगमनेर विधानसभा युवक अध्यक्षपदी नियुक्ती

🚩 विनापरवाना रॅली काढने मनोज जरांगेंच्या अंगलट, 12 जणांवर गुन्हा दाखल

👮 कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शेख शाहजहाँचा ताबा सीबीआयकडे देण्यास पश्चिम बंगाल पोलिसांचा नकार

😱 यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील सदोबा सावळी येथे डोळ्यात मिरची पुड टाकून सराफ व्यापाऱ्यांना लुटले; रोख रक्कमेसह 27 लाखांचा मुद्देमाल केला लंपास

💹 मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पहिल्यांदाच ७४ हजार अंकांच्या पातळीवर

🏏 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात विदर्भाचा मध्य प्रदेशावर ६२ धावांनी विजय

🏏 वुमन्स प्रीमियर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारी दक्षिण आफ्रिकेची माजी वेगवान गोलंदाज शबनिम इस्माईलने इतिहास रचला. महिला क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम इस्माईलने केला. तिने 138.3 किलोमीटर प्रतितास वेगाचा मार्क ओलांडला आहे.

🪙 Gold Rate: सोन्याची ऐतिहासिक उसळी, ४८ तासात २ हजारांची वाढ, दर प्रति तोळा ६४ हजार ६५० रुपये - 22K = 59,950/- || 24K = 64,750/-



🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

📌 Computer General Knowledge in Marathi: https://youtu.be/UYwW9qaKsOk

Maharashtra Bharti Updates

06 Mar, 04:51


📰 06 मार्च 2024 सकाळच्या टॉप घडामोडी 👍

📌 अर्थशास्त्र महत्वाचे प्रश्न: https://youtu.be/BWGrMoxx-Kw



🤑 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाकडून सातारा एकात्मिक पर्यटन विकासाचा ३८१ कोटींचा शासन निर्णय जारी

👨अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २४ कोटीवर निधी वितरणास मान्यता – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

🌐 केंद्र सरकारने आता ऑनलाईन गुन्ह्यांविरोधात नवी मोहीम सुरू केली आहे. सेक्टॉर्शन, नोकरीचे आमिष, ब्लॅकमेल अशा प्रकारच्या ऑनलाईन गुन्ह्यांची तक्रार नोंदवण्यासाठी टेलिकॉम मंत्रालयाने दोन नवीन प्लॅटफॉर्म लाँच केले आहेत. Chakshu पोर्टल आणि डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म अशी यांची नावे आहेत.

🚩 मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सगेसोरऱ्याची अंमलबजावणी करण्याची मागणी लावून धरली आहे. मनोज जरांगेंनी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी १० मार्चपर्यंत करा, अशी मागणी केली आहे. तसेच मला जेलमध्ये तर टाकून बघा, मग तुमचा राजकीय सुफडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी त्यांनी सरकारला दिला.

👭 कोलकाता हायकोर्टाने शुक्रवारी एका प्रकरणामध्ये टिपण्णी करत अनोळखी महिलेला डार्लिंग म्हणणे लैंगिक अत्याचार असल्याचे म्हटले आहे. तसेच आयपीसीच्या कलम 354A(i) नुसार हा गुन्हा ठरतो, असेही कोर्टाने नमूद केले आहे.

🛍 जेफ बेझोस इलॉन मस्कला मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. इलॉन मस्कची एकूण संपत्ती 197.7 अब्ज डॉलर आहे, तर जेफ बेझोसची संपत्ती 200.3 अब्ज डॉलर आहे. 2021 नंतर बेझोस प्रथमच श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

😅 कलकत्ता हायकोर्टाचे न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय यांनी काल 5 मार्चला सकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर दुपारी आपण आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत असेही जाहीर केले.

🌬 मोदी सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने टेक कंपन्यांसाठी एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यानुसार 'एआय' प्रॉडक्ट लाँच करण्यापूर्वी आता कंपन्यान्या परवानगी घ्यावी लागणार आहे. ही सूचना तात्काळ लागू करावी, आणि 15 दिवसांच्या आत अॅक्शन-कम-स्टेटस रिपोर्ट द्यावा असेही सर्व कंपन्यांना सांगण्यात आले आहे

😅 बारामतीत दहशतीचे वातावरण असेल तर माझ्याशी संपर्क करा, युगेंद्र पवारांनी अजितदादांविरोधात दंड थोपटले

📰 माझी राज्यसभेची दोन वर्षे शिल्लक, शिंदेंच्या खासदाराला तिकडे पाठवा; मला शिर्डीतून लोकसभेची उमेदवारी द्या: रामदास आठवले

🎬 जवळपास चार वर्षांपासून रखडलेल्या 'मैदान' चित्रपटाला मुहूर्त सापडला; चित्रपटाचा ट्रेलर 7 मार्च रोजी प्रदर्शित होणार

🐆 कात्रज प्राणी संग्रहालयातील पळालेला बिबट्या अखेर जेरबंद!

📰 महायुती लोकसभेत राज्यात 50 ते 55 जागा मिळवतील; अंबादास दानवे यांची मिश्किल टिपण्णी

📰 मोदींचे 10 वर्ष जाऊ द्या तुमच्या 50 पैकी 5 वर्षाचा हिशोब द्या; पवारांवर अमित शाह यांचा पलटवार

😅 जगभरात मेटाची सेवा एक तास ठप्प, मोबाईल, लॅपटॉपमधील फेसबुक, इंस्टा, आकाऊंट आपोआप लॉगआऊट

📰 राहुल गांधींची पदयात्रा गुजरातमध्ये पोहोचण्यापूर्वी काँग्रेसचे तीन माजी आमदार अर्जुन मोधवाडिया, अंबरीश डेर आणि मुलू भाई कंडोरिया यांनी भाजपात प्रवेश केला

🌊 सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून सहा टीएमसी पाणी सोडणार

📰 अवघा महाराष्ट्र गेल्या ५० वर्षापासून शरद पवारांचं ओझं वाहतोय; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा जळगावातून शरद पवारांना टोला

📰 संत ज्ञानेश्वर उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणार; १५० कोटीचा निधी देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

📰 'काहींनी फक्त गरिबी हटावचे नारे दिले, मोदीजींनी गरिबांचे कल्याण केले'; देवेंद्र फडणवीसांचा जळगाव मधून काँग्रेसवर हल्लाबोल

😅 मनमोहन सिंग नेतृत्वातलं सरकार मुकं, बहिरं, आंधळं होतं; नितीन गडकरींची नागपूरमध्ये टीका

👨 गर्भपात करणे हा महिलांचा मूलभूत अधिकार, फ्रान्समध्ये महिलांसाठी ऐतिहासिक निर्णय ; ठरला जगातील पहिला देश

👨 प्राध्यापक जी. एन. साईबाबांसह इतर पाच जणांची निर्दोष मुक्तता; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निकाल!

🏓 भारताच्या महिला व पुरुष संघाने टेबल टेनिसमध्ये रचला इतिहास ; पॅरिस ऑलिम्पिकसाठी पहिल्यांदाच ठरले पात्र

🎬 अभिनेत्री अदा शर्माचा नक्षलवाद्यां विरोधात एल्गार; मन सुन्न करणारा 'बस्तर'चा ट्रेलर प्रदर्शित

🪙 Today's Gold Rate आजचे सोन्याचे भाव जाणुन घ्या - 22K = 59,950/- ||| 24K = 64,750/-



🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

📌 अर्थशास्त्र महत्वाचे प्रश्न: https://youtu.be/BWGrMoxx-Kw

Maharashtra Bharti Updates

05 Mar, 04:42


📰 5 मार्च 2024 सकाळच्या टॉप घडामोडी 👍

📌पोलीस भरती परीक्षा 5000 प्रश्नांची PDF फक्त 99 रुपयात - "UPI ID - rsm1810901@ybl" पैसे पाठवल्यानंतर या नंबर वर "7820827674" Screenshot पाठवा.



🚺 ‘लेक लाडकी’ योजनेसाठी १९ कोटी ७० लाखांचा निधी वितरित – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे


💉 राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत ९५ लाख ६४ हजार ६१३ बालकांना पोलिओचा डोस


🏏 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात मुंबईचा तमिळनाडूवर एक डाव आणि ७० धावांनी विजय


😁 शेहबाझ शरीफ यांनी घेतली पाकिस्तानचे २४ वे प्रधानमंत्री म्हणून शपथ


📰 महाविकास आघाडीचं राज्यातल्या ४० जागांचं वाटप निश्चित- बाळासाहेब थोरात यांची माहिती


🚆 जालना ते मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस शुक्रवारपासून हिंगोलीतून सुटणार


👮 राज्यात १७ हजार पोलिस शिपायांची भरती होणार पोलीस भरती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे


👨 सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिला आहे. विधानसभेत भाषण करण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी लाच घेणाऱ्या आमदार, खासदारांना कायदेशीर खटल्यापासून बचाव करणारा कायदा आता रद्द केला आहे. त्यामुळे सभागृहात लाच घेऊन मतदान करणे किंवा भाषण करणे आता खासदार-आमदारांना महागात पडणार आहे.


🚺 काल सोमवारी दिल्लीत अरविंद केजरीवाल सरकारने सादर केलेल्या बजेटमध्ये महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. दिल्लीच्या अर्थमंत्री आतिषी यांनी आपले पहिले बजेट सादर करताना 'मुख्यमंत्री महिला सम्मान योजना' जाहीर केली. या योजनेअंतर्गत दिल्लीतील प्रत्येक महिलेला प्रति महिना १००० रुपये दिले जाणार आहेत. यासाठी दिल्ली सरकारने दोन हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे
.

👨 शेतकऱ्यांनी त्यांच्या 'दिल्ली चलो' मोर्चाचे काल नवीन वेळापत्रक जाहीर केले. देशभरातील शेतकऱ्यांना 6 मार्चला दिल्ली गाठण्याचे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले असून 10 मार्च रोजी देशभरात 'रेल्वे रोको' आंदोलनाची घोषणाही केली आहे.


🇯🇵 काल ४ मार्चला जपानच्या टोकियोमध्ये आठवा क्रंचीरोल अॅनिमे पुरस्कार सोहळा पार पडला. यावर्षीचा बेस्ट अॅनिमे पुरस्कार हा 'जुजुत्सु काईसेन' (सीझन 2) या अॅनिमेला मिळाला. यासोबतच तब्बल 11 कॅटेगरींमध्ये या सीरीजने पुरस्कार पटकावला आहे.


🏏 22 मार्चपासून IPLच्या 17 व्या हंगामाचा थरार रंगणार आहे, या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगच्या सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने काल 4 मार्च रोजी आगामी हंगामासाठी आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली. नवा कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सची निवड करण्यात आली आहे


🚩 फडणवीस साहेब आचारसंहितापूर्वी आरक्षण द्या, अन्यथा मराठा तुमचा सुपडासाफ करतील ; मनोज जरांगेंचा सोलापुरात फडणवीसांना इशारा


📰 राहुल गांधी यांची न्याय यात्रा १२ मार्चला महाराष्ट्रात; नंदुरबारमध्ये होणार महाराष्ट्रातील पहिली सभा


😱 राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण लागू; आता पाचवी आणि आठवीची वार्षिक परीक्षा होणार


📰 नांदेड विमानतळावर पंतप्रधान मोदी यांचे अशोक चव्हाण यांनी केले स्वागत; विविध विषयांवर झाली चर्चा


🚀 इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांना कॅन्सरचे निदान; आदित्य-एल १ मिशनच्या लॉन्चिंग दरम्यान मिळाली माहिती


👨 आम आदमी पक्षाला सुप्रीम कोर्टाचा दणका; दिल्लीतील कार्यालय १५ जूनपर्यंत रिकामे करण्याचे आदेश


😱 ओडिशामधल्या पुरी येथील जगन्नाथ मंदिरात घुसले गैर-हिंदू बांगलादेशी; ओडिशा पोलिसांकडून नऊ जणांना अटक


🏆 शार्दुल ठाकूरचा रणजी ट्रॉफीमध्ये मोठा पराक्रम ; वनडे स्टाइलने झळकावले प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक


🇮🇳 'ऐ वतन मेरे वतन' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च, सारा अली खान झळकणार मुख्य भूमिकेत, २१ मार्चला ओटीटीवर रिलीज होणार सिनेमा


🪙 Today's Gold Rate आजचे सोन्याचे भाव जाणुन घ्या - 22K = 58,970/- ||| 24K = 63,700/-



🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

📌पोलीस भरती परीक्षा 5000 प्रश्नांची PDF फक्त 99 रुपयात - "UPI ID - rsm1810901@ybl" पैसे पाठवल्यानंतर या नंबर वर "7820827674" Screenshot पाठवा.

Maharashtra Bharti Updates

02 Mar, 04:20


📰 2 मार्च 2024 सकाळच्या टॉप घडामोडी 👍

📌 Police Bharti Question Paper: https://youtu.be/gdqkCIKvk4E



💉 आपल्या बाळाला उद्या ३ मार्चला पोलिओची लस अवश्य द्या – आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन


👨 बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी सहा कोटीवर निधी वितरणास मान्यता


🤑 राज्य सरकारी सेवेतल्या नव्या निवृत्ती वेतन योजनेतल्या कर्मचाऱ्यांनाही शेवटच्या वेतनाच्या निम्मं निवृत्तिवेतन देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा


👮 अजित पवारांसह अनेकांना पुन्हा 'क्लीन चिट', मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेचा सी-समरी रिपोर्ट


🇧🇩 बांगलादेश अग्नितांडवामुळं हादरलं, ढाका शहरातील सात मजली इमारतीला भीषण आग, ४३ लोकांचा मृत्यू, २२ जण गंभीर


💬 जागावाटप होण्यापूर्वीच सुप्रिया सुळेंची अनपेक्षित चाल, व्हॉटसअॅप स्टेटसवरुन बारामतीच्या उमेदवारीवर दावा


📰 मोदी साहेबांनी पुढे नेला महाराष्ट्र म्हणून मोदींच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र : सीएम एकनाथ शिंदे


📃 बारावीनंतर आता दहावीच्या पेपरलाही कॉपीचा सुळसुळाट; लातूर जिल्ह्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद शाळेच्या बाहेर कॉपीचे प्रकार समोर


👨 राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात 7 मार्चला सुनावणी होणार


🌐 मोठी कारवाई! महादेव ऑनलाईन बुक प्रकरणी ईडीने 580 कोटी रुपये गोठवले


पुणे शहरातील शिवाजी नगर, औंध, बाणेर, सांगवी परिसरात तुरळक स्वरुपात पावसाने लावली हजेरी; या अवेळीच्या पावसामुळे चिंता व्यक्त


📰 नांदेड जिल्ह्यात ड्रोन कॅमेरा उडविण्यास प्रतिबंध, आंदोलनही करता येणार नाही; जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांची माहिती


🔵 वंचित आघाडी स्वबळावर लढल्यास लोकसभेच्या किमान 6 जागा जिंकेल; प्रकाश आंबेडकरांचा दावा


🎬 भारतरत्न पी.व्ही नरसिंह राव यांच्यावर आधारित वेबसिरिज लवकरच येणार भेटीला, प्रकाश झा करणार दिग्दर्शन


🏦 Paytm पेमेंट्स बँकेला आणखी एक दणका! मनी लाँड्रिंगप्रकरणी 5.49 कोटी रुपयांचा दंड ठोठावला; अर्थ मंत्रालयाची कारवाई


🚩 मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित, आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान


📰 “बेडकाने छाती फुगवली की त्याला वाटतं आपणं बैल आहोत”, रुपाली चाकणकरांचा अमोल कोल्हेंना टोला


👨 हेलिकॉप्टरने पोहचल्या बारावीच्या प्रश्नपत्रिका, नक्षलवादी जिल्ह्यातील 36 विद्यार्थ्यांसाठी घेतली मदत


🏃 प्रो कबड्डी लीग स्पर्धाच्या 10 व्या हंगामात पुणेरी पलटन संघ विजयी ठरला; पुणेरी पलटणने हरियाणा स्टीलर्सचा 28-25 असा पराभव करत प्रो कबड्डी लीगचा 10वा हंगाम जिंकला


🚌 मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे, बेस्ट बसच्या दैनंदिन पासच्या दरात १० रुपयांनी, तर मासिक पासच्या दरात तब्बल १५० रुपयांनी वाढ करण्यात आली असून ही दरवाढ १ मार्चपासून लागू झाली आहे.


📰 सरकारच्या राष्ट्रीय स्तरावर झालेल्या सर्वेक्षणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे 485 पैकी फक्त 46 शहरे लोकांना पिण्यायोग्य पाणी पुरवतात.


📰 नवीन तिकीट दर सध्याच्या भाड्याच्या तुलनेत 33 टक्क्यांनी कमी असणार आहे. दरम्यान नवीन तिकीट दर 1 मार्चपासून लागू झाले आहे. तसेच येत्या काळात महा मेट्रो प्रवाशांकरिता ‘कॅश बॅक’ ची संकल्पना लागू करणार आहे.


🪙 Today's Gold Rates आजचे सोन्याचे भाव जाणुन घ्या - 22K = 58,280/- ||| 24K = 62,950/-



🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

📌 Police Bharti Question Paper: https://youtu.be/gdqkCIKvk4E