मराठी जोक्स Marathi jokes 😂 @only_marathi_jokes Channel on Telegram

मराठी जोक्स Marathi jokes 😂

@only_marathi_jokes


मराठी/हिंदी जोक्स and mems

𝐀𝐝𝐬/𝐐𝐮𝐞𝐫𝐲/𝐅𝐨𝐫 𝐏𝐫𝐨𝐌𝐨𝐭𝐢𝐨𝐧-
@Marathi_joke_bot

कोणी वेड म्हटलं तरी चालेल पण हसण्याचा आनंद घ्या.
😂😆😅😄😁🤣🤗😎😉😊

मराठी जोक्स Marathi jokes 😂 (Marathi)

आमचं 'मराठी जोक्स' चॅनेल लक्षात टेलीग्राम वापरकर्त्यांसाठी आनंदाचं एक स्थान आहे. या चॅनेलमध्ये तुम्हाला हसूच आणि मनोरंजन करण्याची संधी मिळेल. ह्यात तुम्ही मराठी आणि हिंदी जोक्स, मेमेस, आणि विविध प्रकारच्या हास्यप्रसंगांचं आनंद घेऊ शकता. हशील असं जमिनी तुमच्यासाठी वेगळ्या सोबतील्या आणि विनोदात्मक जोक्स आणि मेम्स किंवा भांड्यात आलेल्या जनसत्वांचं विचार किंवा बोध आणि खूप इतर खोटं आणि वेगळं काही. चॅनेलचं नाव 'only_marathi_jokes' आहे आणि त्यात आपलं स्वागत आहे ज्यांना हसूचं आवडतं त्यांना अशा सोबतील्या आणि मनोरंजनात्मक मज्जा घेता येईल.

मराठी जोक्स Marathi jokes 😂

15 Jan, 02:12


चायनीज खाऊन माणसे चायनीज बोलतात का ?

.

मग तिळगुळ खाऊन गोड कसे बोलतील ? 🤔

एक पुणेरी शंका

😝😜😂

मराठी जोक्स Marathi jokes 😂

30 Nov, 18:54


*बायकोला घरकामात माणुसकीतून मदत केली तरी काही ना काही चुका काढणारच...!*

एक दिवशी अंडी *बॉईल* केली तर बोलली, "बॉईल कशाला केली, *फ्राय* करायची होती....!"


दुसऱ्या दिवशी अंडी *फ्राय* केली तर बोलली, "फ्राय कशाला केली, *बॉईल* करायची होती....!"


मी तिसऱ्या दिवशी दोन अंडी *बॉईल* केली आणि दोन अंडी *फ्राय* केली....!

बायको *किचनमध्ये* आली, बराच वेळ ती त्या अंड्याकडे बघून शेवटी म्हणालीच, "अहो, तुम्हाला जरा तरी कळते का??, जी अंडी फ्राय करायची होती ती तुम्ही बॉईल केलीत आणि जी *बॉईल* करायची होती ती *फ्राय* केलीत....!"


🤔😒

मराठी जोक्स Marathi jokes 😂

27 Oct, 05:09


सिगरेटची सवय

पती संध्याकाळी खूप उदास चेहरा करून घरी येतो.

पत्नी :- काय झाले?

पती :- आज आमच्या ऑफिसची बिल्डिंग खाली कोसळली.

पत्नी :- मग तुम्ही कसे वाचले?

पती :- मी सिगारेट ओढण्यासाठी बाहेर गेलो होतो.

पत्नी :- नशिब चांगले तुमचे. थॅन्क्स गाॅड.

थोड्या वेळाने टीव्हीवर बातमी येते की, सरकारने मरण पावलेल्या व्यक्तींच्या परिवाराला १-१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

पत्नी रागात - काय मेली ही तुमची सिगारेट ओडण्याची सवय कधी सुटणार देव जाणे.
😀😁🤣

मराठी जोक्स Marathi jokes 😂

10 Oct, 17:00


गावातल्या शाळेत...

शिक्षिकेने एका मुलाला विचारले, मला सांग 15 ऑगस्टला आपल्याल काय मिळाले...?



विद्यार्थी: मॅडम, एक बिस्कीट चा पुडा!!


😜😝😁😂

मराठी जोक्स Marathi jokes 😂

03 Oct, 02:04


बायको - अहो ऐकता का ???.... पाटलांच्या मुलीला गणितात १०० पैकी ९९ मार्क्स मिळाले


नवरा - वाह... मग एक मार्क कुठे गेला???

बायको - आपला कार्टा घेऊन आलाय!

🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭

मराठी जोक्स Marathi jokes 😂

02 Oct, 02:11


एक गर्विष्ठ शास्त्रज्ञ - तुम्ही मला देव दाखवा

पुणेकर - तुम्ही मला ऑक्सिजन दाखवा

शास्त्रज्ञ - थोडा वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन काय आहे ते कळेल

पुणेकर - तुम्ही थोडा जास्त वेळ श्वास रोखून धरा म्हणजे तुम्हाला देव दिसेल.
😂😂😂😂😂😂😂😂

मराठी जोक्स Marathi jokes 😂

02 Oct, 02:11


मित्र - अरे! किती वेळ फोन करतोय
फोन का उचलत नाहीस?

मी : ( हलक्या आवाजात) लेक्चरमध्ये आहे

मित्र - कुठे आहे लेक्चर?
विषय काय आहे?

मी - लेक्चर घरीच आहे
मीच विषय आहे😳

😂😂😂😜😜🤪🤪😳😳

मराठी जोक्स Marathi jokes 😂

01 Oct, 02:06


सासू (सुनेला) : अगं उठ, तो बघ सूर्य पण उठला.

सून : तेवढंच दिसतं तुम्हाला ! तो माझ्या आधी झोपतो ते नाही दिसत..

🤣🤣🤭😄😄😄😄😄😄

मराठी जोक्स Marathi jokes 😂

01 Oct, 02:06


गणिताचे शिक्षक स्टाफरूममधे रिकाम्या डब्यात चपाती बुडवून खात होते...

मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात
तर काहीच नाही...

गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला 'एक्स' मानल आहे..!
😁😁😁😁😁😄😄😄😄

मराठी जोक्स Marathi jokes 😂

30 Sep, 02:06


😄😄😄😄😄😄😄😄

यजमान : आम्ही दार्जीलिंगचा चहा वापरतो

पुणेकर : वा , तरीच छान थंड होता. . .

किमान शब्दात कमाल अपमान

मराठी जोक्स Marathi jokes 😂

30 Sep, 02:06


एका मैत्रिणीची बायपास झाली तिला दुसऱ्या मैत्रिणीने मेसेज केला,...

Ata tula udya marayala harakat nahi.

बायपास झालेल्या मैत्रिणीला चक्कर येणं बाकी होतं.

कारण तिनं वाचलं..
आता तुला उद्या मरायला हरकत नाही.

परंतु मूळ मेसेज होता..
आता तुला उड्या मारायला हरकत नाही!!
😂😂😂😂😂😂😄😄😄
म्हणून मराठी नेहमी मराठीतूनच लिहावे
अन्यथा अर्थाचा अनर्थ होतो.

मराठी जोक्स Marathi jokes 😂

29 Sep, 02:07


पितळीच्या वाटीला कितीही घासा
ती सोन्याची होत नाही.


हे वाक्य कुणीतरी ब्युटी पार्लरच्या बोर्डाखाली लिहून

पळून गेलं राव!

😃😃😃😀😀😀

मराठी जोक्स Marathi jokes 😂

29 Sep, 02:04


कॉलेज मध्ये एक सुंदर मुलगी
एका तरुणाकडे आली
आणि म्हणाली

"Hi I'm Anushka ,
1st Year Arts, & you!!"

युवक (गर्वाने) "मी माझ्या मुलाची फीस भरायला आलोय"

Moral....

नेहमी फक्त आईच संतूर मॉम नसते बाप पण उरलेला साबण वापरतो।

😳🤪😜🙄😁😁😁😂😂

मराठी जोक्स Marathi jokes 😂

28 Sep, 02:11


रोज "अडानी"च्या
वाढत्या मालमत्तेच्या बातम्या बघून बघुन आई मला म्हणाली...

बघ जरा नालायका
अडाणी असून पैसे कमवतोय,

तुझा तर एवढे शिकुन पण
काही उपयोग नाही...मुडद्या...!

😅😂🤣😁😄😝😂😂😂

मराठी जोक्स Marathi jokes 😂

28 Sep, 02:02


🤣🤣🤣😀😃😃😛😜

माझी बायको हॉस्पिटलमध्ये आहे
असे सांगून एकजण गेले ३ महिने माझ्याकडून
पैसे घेतोय.

काय आजार आहे म्हणुन,काल हॉस्पिटलला गेलो
तर समजले,

त्याची बायको "नर्स" आहे

😂😂😂😂😂😂😂😂

मराठी जोक्स Marathi jokes 😂

27 Sep, 02:02


मी सध्या बायकोला ''अहो'' "Aho" अशी मला हाक मारु नको, असा नियमच घालून दिलाय्!!
कारण, मागे एकदा सकाळ पेपर मध्ये 'मुक्तपीठ' या सदरात एका मुली ने लिहिले होते.... माझ्या घरी आलेली एक जपानी मुलगी, माझ्या आई ने माझ्या वडिलांना ''अहो" म्हंटलं की हसायची. तिला तिच्या हसण्याचे कारण विचारल्यावर ती म्हणाली, जपानी भाषेत "अहो" म्हणजे "गाढव"🤣

काय हुश्शार आहेत मराठी बायका....!!
काय शब्द शोधलाय नवऱ्यासाठी...!!🤣

आणी गरीब बिच्चारे नवरे 😥 समजतात कि बायको प्रेमानेच 😍 हाक मारत आहे......

😷

मराठी जोक्स Marathi jokes 😂

26 Sep, 01:57


😂😂😂
एक आजोबा कोथरुड स्टँडला रिक्षात बसतात.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला रिक्षा थांबवतात...

आजोबा : किती झाले ?
रिक्षावाला : ३२ रुपये
आजोबा ४० रु देतात .
रिक्षावाला : सुट्टे नाहीयेत
आजोबा : ठीक आहे,
जोपर्यंत मीटरमध्ये ४० होत नाहीत तोपर्यंत पुतळ्याभोवती गोल फिरव....

रिक्षावाला मुकाट्याने सुट्टे पैसे देतो .

काही लोक परफेक्ट होण्यासाठी आयुष्यभर झटतात...

तर काही लोक थेट पुण्यातच जन्म घेतात....!

😜😝😀😄😜😝😀😄😝😜😄😀😜😝😀

मराठी जोक्स Marathi jokes 😂

23 Sep, 16:04


😃😃😃

*एक माणूस मानसोपचार तज्ञ डॉक्टरांकडे जातो*

*डॉक्टर :- बोला काय त्रास आहे तुम्हांला ?*

*पेशंट :- डॉक्टर, मी रात्री बेड वर झोपल्यानंतर मला सतत जाणवतं की बेड खाली कोणी तरी आहे. मी रात्र भर उठून बघतो, पण तीथे कोणी नसतं*

*डॉक्टर :- ठीक आहे, मी तुम्हांला गोळ्या देतो, त्या घ्या, आणी पुढचे सहा महीने आठवड्यातून दोन रात्र दवाखान्यात झोपाला या, म्हणजे मला योग्य निदान करता येईल*

*पेशंट :- ठीक आहे, तुमची एकंदर फी किती होईल ?*

*डॉक्टर :- गोळ्यांचे ५ हजार व सहा महीने दवाखान्यात झोपण्याचे एका वेळचे १५०० रूपये प्रमाणे होतात ७२,००० हजार, एकंदर ७७,००० हजार*

*पेशंट :- ठीक आहे डॉक्टर, मी उद्या पासून येतो.*

*पुढे एक वर्षांनी तो पेशंट डॉक्टरांना रस्त्यात भेटतो*

*डॉक्टर :- अरे, तुम्ही आलाच नाहीत उपचार घेण्यासाठी*

*पेशंट :- डॉक्टर, मला माझ्या शिक्षक मित्रांनी त्याच दिवशी सल्ला दिला, व मी पूर्ण बरा झालो.*

*डॉक्टर : काय सल्ला दिला.*

*पेशंट:- मित्र म्हणाला, डॉक्टर ला ऐवढे पैसे देण्यापेक्षा, बेड आजच विकून टाक, मी तसेच केले, व गादी जमीनीवर टाकून झोपायला सुरवात केली, त्यामुळे बेड खाली कुणी तरी आहे, ही भिती गेली व ७७,००० तुमची फी वाचली व बेड चे सहा हजार आले.*

*सारांश*

*डॉक्टर किंवा वकील यांच्या कडे गरजे नुसार जरूर जा पण एक तरी शिक्षक असलेला मित्र नक्की असुद्या.*

*because the teacher is the Great..*🙂

मराठी जोक्स Marathi jokes 😂

22 Sep, 16:05


आजची ठळक बातमी...


apple कंम्पनीला 85,000/- चे नुकसान

.
.
घरच्यानि iphone घेण्यास दिला नकार.


🤣😂😭😂

मराठी जोक्स Marathi jokes 😂

22 Sep, 04:21


गावाकडचे लोक मुंबईत एका लग्नात गेले...
आत गेल्यावर इतके सारे सलाड चे प्रकार बघून लगेच बाहेर आले.,
बाहेर येऊन त्यातला एक म्हणाला, " टाइम हाय... अजून भाजीच चिरीत्यात..! 🤣🤣🤣

मराठी जोक्स Marathi jokes 😂

21 Sep, 00:19


लंडन येथे एकेकाळी कामगारांचे काम संपल्यावर रोज संध्याकाळी एक ग्लास दारू दिली जात असे...त्याला लोकं Precious Evening Glass असे म्हणत.

त्याचाच पुढे शॉर्ट फॉर्म "Peg" झाला...!!
🥃🍷🍻🍺🍹
...
...

जिवलगां साठी कुठून कुठून माहिती मिळवावी लागते भो.💃🏻

😁😁 😅😅 🤗🤗

मराठी जोक्स Marathi jokes 😂

20 Sep, 00:18


अभ्यास करून भले तुम्ही डिग्री मिळवली असेल...😎




पण तुम्हाला खरे ज्ञान मात्र,🧐





फक्त आपल्याच ग्रुपवर मिळेल...🤗



😜🙈😎😉😅😂🥳

मराठी जोक्स Marathi jokes 😂

19 Sep, 00:12


बायकोच्या हाताचा धक्का लागून फुलदाणी पडून फुटली....



2 तास भांडण झाल्यावर....


शेवटी .....


नवऱ्याने चुकीच्या ठिकाणी फुलदाणी ठेवली होती हे सिद्ध झाल्यावर भांडण थांबले....
😬🤐🤐😄😜😜😁

4,004

subscribers

262

photos

13

videos