..लग्न...
एक सामान्य कुटुंब मुलीच्या घरी मुलगी पाहायला जातात.
मुलीकडचे- मुलगा काय करतो?
मुलाकडचे- मुलगा प्रायव्हेट कंपनीत कामाला आहे!
मुलीकडचे- पण आम्हाला सरकारी नोकरदार मुलगा पाहिजे
मुलाकडचे- अहो पण आमचा मुलगा बिगर व्यसनी आहे.
मुलीकडचे- व्यसन न करणारा माझा मुलीच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल का?
मुलाकडचे- पगार सरकारी नोकरदारा इतका नसला तरी मुलीला सुखी ठेवेल इतके तर नक्कीच कमावतो.
मुलीकडचे- खाजगी कंपनीचा काय भरोसा कधी बंद पडेल, किंवा कधी कामावरून काढेल,सांगता येत नाही ना! पुढे जाऊन प्रॉब्लेम नकोत
मुलाकडचे- मुलगा मेहनती आहे, काही ना काही नक्कीच करेल उपाशी थोडीच मरेल.
तेवढ्यात मुलीने तिच्या बाबांना बोलावणे धाडून त्यांना सांगितले मुलगा पसंद आहे बाबा मला छान दिसतोय,
यावर बाबांनी तिला समजावण्याचा स्वरात सांगितले की बाळ दिसणं चांगलं असलं म्हणजे सगळं नसतं , कर्तृत्व पण तसं लागतं जे त्याच्याकडे नाहीये. आणि पुढे आर्थिक संकट आल्यावर काय करशील ,माहेरात हात पसरशील का? हे बग तो मुलगा तुला पाहायला येताना सुद्धा स्वतःच्या दोनचाकी गाडीवर आलाय, अन त्यातल्या त्यात त्यांचं स्वतःच घर शुद्ध नाहीये शहरामध्ये ,गावाकडे घर शेती असून काय उपयोग, शहरात काहीतरी नको का?
अहो पण बाबा लग्न करण्या अगोदर तुमच्या कडे तरी कुठे काय होतं ,जे काही आहे ते तुम्ही दोघांनी लग्ना नंतरच उभे केले ना, मग आजकालच्या नवीन कमला लागलेल्या मुलांकडून तुम्ही का अशी अपेक्षा करतात.
हे बग बाळ तो जमाना वेगळा होता आता वेगळा आहे ,आताच्या अडचणी मोठ्या आहेत, त्या पेलण्यासाठी काहीतरी असणं खुप गरजेचं असतं. तू लहान आहेस आम्ही तुझा भल्यासाठीच करत आहोत.. फक्त तू शांत राहा अन आम्ही जे सांगू तेच तू ऐकायचं. मुलीचे बाबा बाहेर येऊन ..
मुलीकडचे- पण तरीही आम्हाला हे स्थळ मान्य नाही,करण आमची एकुलती एक मुलगी आहे , तिला एवढी मोठी केली लाडाने सांभाळली, तिचे सर्व हट्ट पुरवलेत आज पर्यंत, तिच्या मना प्रमाणे आम्ही तिला जगू दिलंय, तर आता तिच्या भविष्याची चिंता तर आम्हाला असणारच ना, उद्या तिला काही प्रॉब्लेम जाणवला तर तिने आम्हाला दोष देता कामा नये...म्हणून ताक सुद्धा फुकुन पिलेले बरे!
मुलाकडचे - चला आम्ही येतो , तुमच्या अपेक्षा पूर्ण होवोत.अन तुमच्या मना प्रमाणेच तिला मुलगा भेटो! धन्यवाद
2. दुसरे स्थळ
मुलीकडचे- मुलगा काय करतो
मुलाकडचे- सरकारी नोकरदार आहे ,महिना 35 हजार मिळतात , मोठ्या अधिकाऱ्याच्या हाताखाली कामाला आहे.
मुलीकडचे - अरे वा! आम्हाला मुलगा पसंद आहे
तेवढ्यात मुलीने आतल्या खोलीत बाबांना बोलावणे धाडले व मुलगा दिसण्यास नाही आवडला असे सांगितले. त्यावर बाबा म्हणाले "या जगात दिसणे महत्वाचे नसते तर असणे महत्त्वाचे असते, मुलगा सरकारी नोकरदार आहे, आयुष्याचं कल्याण होईल. राणी सारखी राहशील. त्यात मुलाचे स्वतः चे घर आहे , मोठी गाडी घेऊन आलाय तो तुला पाहायला.अस काय करतेस.
"बाबा पण मुलगा मला थोडा उद्धट वाटतोय, त्याच्या वागण्यातून बोलण्यातून. ओव्हर कॉन्फिडेंट वाटतोय" मुलगी बाबांच्या डोळ्यात पाहत पडक्या चेहेऱ्याने अन उतरल्या आवाजात बोलली
यावर बाबा वरचढ आवाजात पण हळू तिच्याकडे बोट करून " तुला खुप कळायला लागलंय का? उद्धट असला म्हणून काय झालं थोडंफार सहन करावंच लागेल ना. सगळ्या गोष्टी थोडीच मनासारख्या भेटणार आहे, तुलाच सांभाळून घ्यावं लागेल..अति बोलू नकोस अन शांत राहा...
मुलीचे बाबा बाहेर येऊन मूलकडच्याना सांगतात "आम्हाला मुलगा पसंद आहे .पुढे काही देण्या घेण्याचं असेल तर बोलून घेऊयात". यावर मुलाची आई म्हणते की "आम्हाला ही मुलगी पसंद आहे आता लग्नच बोलायचं तर आमचं घराणं जरा प्रतिष्टीत आहे तरी लग्न कस एकदम थाटात होयला हवं,त्यामध्ये कसलीही कमी पडता कामा नये, मुलीच्या अंगावर 20 तोळे सोनं घाला, बाकी रुक्वतात तुम्हाला जे हवं ते देऊ शकता म्हणजे कार्यालयात कसं जरा भरून दिसलं पाहिजे, त्यात तुमचा ही मान वढेलच की.. बाकी आम्हाला काही नको"
हे ऐकून मुलीला जरा धसका बसला आपल्या बाबांची एवढं काही द्यायची परिस्थिती नाहीये,एवढा खर्च त्यांना कसा पेलवेल ,एवढे पैसे आणणार कुठून ह्या विचाराने तिचे मन भरून आले पण वाडीलांसमोर काही बोलू शकत नव्हती.
वडिलांनी जुळवा जुळव, करून कर्ज काढून ,उसने घेऊन लग्नाची तयारी सुरू केली .तारीख ठरली लग्नाचा दिवस उजाडला.
वडिलांनी होईल तेवढा जोर लावून जेवढं मोठं लग्न करता येईल तेवढं मोठं करण्याचा प्रयत्न केला पण तरीही मूलाकडच्याना लग्नात प्रत्येक ठिकाणी काही ना काही कमी जाणवत होती , व ते मुलीच्या वडिलांना टोमणे मारत होते. लग्न पार पडले मुलगी सासरी गेली. पाहिले 7 8 दिवस ठीक ठाक गेले पाहुण्यांची वर्दळ कमी झाली . आता मुलीला टोचून घालून पडून बोलायला सुरुवात होऊ लागली ,नवरा कामावरून आल्यावर नुसती चिडचिड करतोय ,सासू प्रत्येक कामात हइ नीट जमलं नाही ते नीट जमलं नाही म्हणून तिच्या घरच्यांचा उद्दार करत राहते, मुलीला घरात