मनातील भावना..✍💌 @manatilbhavana Channel on Telegram

मनातील भावना..💌

@manatilbhavana


आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच वस्त्रे यत्न करू ।
शब्दचि अमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका ।।
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव, शब्देचि गौरव पूजा करू ।।

तुमच्या ही भावना आम्हाला पाठवत जा.👇
@Ganesh5463

मनातील भावना (Marathi)

आमच्या टेलिग्राम चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे! आमच्या चॅनलवर आपल्याला मनातील भावना साझा करण्याची अनंत शक्ती आहे. शब्दांच्या साथी आपल्याला धन देणारे, आपल्या भावनेंची छान वस्त्रे पहिल्यांदाच सांगणारे आम्ही तयार आहोत. आपल्या मनातील प्रेम, आदर, उत्साह आणि इतर भावनांची मालिका आमच्या साथीच्या स्पर्शाने आपल्या मनात उद्वेग असणार नाही. तुमच्या भावना आम्हाला जाण्यास विसरू नका! व्हाय्चा योग्य साथीचे भाग आजच जॉईन करा आणि साभार्य भावनांचा स्वागत करा.

मनातील भावना..💌

19 Feb, 05:13


शिवराय हे नाव ऐकायताचं आठवत तो अफझलखानवध शाहिस्तेखानाचे बोटे आणि आग्र्याहून सुटका किंवा आठवतो स्वराजभिषेक किंवा अजून दक्षिणदिग्विजय बस झालं इतकेच ते पण साहजिकच आहे म्हणा कारण आपल्याला फक्त शिवराय राजकीयदृष्ट्या सांगण्यात आले मात्र त्यांच सामाजिक जीवनावर खूप कमी लोकांनी अभ्यास केला शिवछत्रपतीनी सामाजिक क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली. त्यांचे सामाजिक कार्य अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण होते ते समजून घ्यायला आपलं पूर्ण आयुष्य कमी पडेल तरीही त्याचं रयतेच्या हिताचे महत्वपूर्ण कार्य थोडक्यात जाणून घेणाचा आपण छोटासा प्रयत्न करू छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कामे केली जसं  की  त्यांनी पहिल्यांदा जमिन मोजणीला सुरुवात करून योग्य करप्रणाली लागू केली तेव्हा त्यांनी अईनं झिंनस म्हणजे आताची कर्जमाफी योजना तेव्हा महाराजांनी सुरू केली शेतकऱ्यांना बी-बियाणे, बैल आणि इतर आवश्यक वस्तू उपलब्ध करून देने त्यांना सर्व सुखं सुविधा पुरवणे शिवछत्रपतीचा सर्व मावळ्यांना आदेश होता की शेतकऱ्यांच्या पिकांच्या देठाला हात लागता कामा नये व त्यांना कसलही दुःखं होऊ नाही म्हणून त्यांनी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना सर्वपरी मदत केली आपल्या जाणत्या राज्यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी नवनवीन उपाययोजना राबविल्या खेळशिवापुरचं धरण त्यातील एक उदाहरण ठरतं कोयना नदीवर पूल असे  छत्रपती, महाराजांनी अनेक लहान-मोठे पूल आणि बंधारे बांधले, जे त्यांच्या सामजिक कार्याची अजून पण साक्ष देत आहेत आणि त्यांची न्यायव्यवस्था: एवढी पारदर्शक होती की त्यांच्या स्वराज्यात सगळ्या रयतेला ताबडतोब न्याय मिळल होता छत्रपती शिवाजी महाराजांनी असे एक मजबूत आणि न्यायपूर्ण न्यायव्यवस्था तयार केली. त्यांनी लोकांना त्वरित आणि योग्य न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले. त्यांनी स्वतः अनेक खटले हाताळले आणि न्यायनिवाडा केला याचं अधिक एक उदाहरण म्हणजेच राझ्याच्या पाटलाचा केलेला चौरंग लक्षात येतो महाराजांनी महिलांचा नेहमी आदर केला त्यांचं तर घोषवाक्य होत प्रत्येक स्त्री ही मराठ्यांच्या देवऱ्यातील देवता आहे तिचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे हे फक्त घोषणा न्हवती तर त्याच आचरण पण तसेच होत इतिहासात तसा एक उल्लेख पण आढळतो कल्याणच्या सुबेदारांय्या सुनेला आई म्हणून दिलेला मान आपल्यासाठी आदर्श आहे छत्रपती शिवरायांनी वेळोवेळी घेतलेली महिलांच्या सुरक्षेची काळजी आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या ह्या आताच्या काळात शिकण्यासारख्याचं आहेत,महाराजांनी दूरदृष्टी इतकी जबरदस्त होती की त्यांना तेव्हाच कळतं होत की आपल्या स्वराज्याला भीती जमिनीवरून नाहीच तर ते समुद्रातुन आहे म्हणून राज्यांनी आपलं स्वतःचं सुंदर आरमार उभं केलं याचा फायदा झाला की आपल्या देशी मालाला जागतिक बाजारपेठेत उपलब्ध झाली तेव्हा ही गोष्ट अशक्य होती या एका युगपुरुषयांने शक्य करून दाखवली
म्हणून तर म्हणतात त्यांना भारतीय नौदलाचे जनक श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांच्या सामाजिक कार्याला उजाळा देण्याचा छोटेखानी प्रामाणिक प्रयत्न केला मी बाकी काहीच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे सामाजिक कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. त्यांनी एक आदर्श समाज निर्माण करण्याचा नेहमी प्रयत्न केला तरी पण काही कमी बुद्धीचे  लोक म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का मी म्हणतोय नाही देवापेक्षा पण आपल्यासाठी अधिक होते कारण त्यांच्यामुळेच दिसत आहे प्रत्येक मंदिरावरचा कळस आणि आपल्या अंगणात तुळस आणि त्याच्यामुळेचं अजूनपर्यंत सुरक्षित आहे आपल्या गोठ्यातली गाय व घरातील माय,,

छत्रपती शिवाजी महाराजांना या महान कार्यासाठी त्रिवार मानाचा मुजरा घालतो🚩👏🏻 आणि सर्वाना शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो🌺🚩🙏🏻
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
🌼🌼🌼

मी तुमच्या मधलाचं एक शिवविचारांचा पाईक
ओम संध्या मोहन शेळके

    @Omsmshelke

मनातील भावना..💌

19 Feb, 02:29


ज्ञान हे असं एक माध्यम आहे की त्यापासून आपण काही पण साध्य करू शकत फक्त आपल्याकडे थोडा संयम हवा आणि आपलं ध्येय प्राप्तकरण्यासाठी जरा अधिक जिद्द हवी मग आपली परिस्थिती कितीही बिकट असो मनस्थिती सकारात्मक असली की झालं मग ती अश्यक्य वाटणारी गोष्टपण शक्य होताना दिसू लागले फक्त स्वतःच्या ज्ञानावर विश्वास हवा!,,✍🏻

एकमत#लेखक
 @Ommshelke

मनातील भावना..💌

19 Feb, 02:29


दिल्लीचेही तख्त राखतो
महाराष्ट्र माझा...🚩🚩🚩
✍️"जय जय महाराष्ट्र माझा..! ह्या सुंदर गीताच्या माध्यमातून कवी 'राजा बढे' यांनी महाराष्ट्राचा गौरव करताना म्हटले आहे की,दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.. महाराष्ट्राच्या इतिहासाची पान चाळत असताना एका महान राज्याच नाव इतिहासाच्या पानांवर सोनेरी अक्षराने लिहलेलं दिसतं, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले होय... या नावात खूप मोठी ताकद आहे..हे नाव घेतल्याबरोबर प्रत्येक मर्द मराठ्यांची छाती अभिमानाने फुगुन जाते.. कधी काळ अफगाणिस्तानातील अटक ह्या ठिकाणापासून ते ओडिसामधील कटक ह्या ठिकाणापर्यंत ज्यांनी आपल्या घोड्याच्या टापा वाजवत आणि हर हर महादेव की जय...!ही गर्जना देत एक एक प्रदेश स्वतः च्या अधिपत्त्याखाली आणला...त्या मराठा सम्राज्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अभिमानाने सांगितलं की "हे राज्य रयतेच आहे... 400वर्षांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये लोकशाहीचे बीजरोपण केले.. त्या छत्रपती शिवराय यांचा जन्म झाला 19फेब्रुवारी 1630मध्ये शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊ माँसाहेब व शहाजी मालोजी भोसले यांचे हे सुपुत्र.. शिवनेरी गडाजवळच्या 'शिवाई' देवीच्या नावावरून छत्रपतीच शिवाजी असं नामकरण करण्यात आलं.. वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली.. वय वर्ष 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला.. ही गोष्ट खूप मोठी आहे.. आजच्या काळात 16व्या वर्षाचा मुलगा नुकताच 11व्या वर्गात जातो त्या वयात महाराजांनी तोरणा जिंकला आणि स्वराज्याच तोरण बांधल..मराठी माणसाला संघटित करुन मराठ्यांच स्वतंत्र राज्य महाराष्ट्र स्थापन केला.. विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवाळकोंड्याची कुतूबशाही व औरंगजेब यांना सळो की पळो करुन सोडणारा एकमेव मर्द मराठा होते छत्रपती शिवाजी महाराज...छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कार्यकाळातील जवळपास 350+किल्ले जिंकले.. व भारतातील पहिले नौदल व जहाज बांधनी केंद्र शिवाजी महाराज यांनी उभे केले.. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचे जनक मानल्या जाते...सईबाई सोबत विवाह झाल्यावर शिवाजी महाराजांना संभाजी राजेसारखा कर्तबगार पुत्र लाभला आणि स्वराज्याची भरभराट झाली...अफजल खानसारखा लोखंडी पहार हाताने वाकवणारा ताकदवान पुरुषाचा कोथला शिवाजी महाराज यांनी टराटरा फाडला, हा केवळ अफजलखानचा कोथळा फाडला असं नाही तर,इथल्या मुघलशाहिला एक संदेश दिला की मराठे जर का पेटले तर, अक्खी मुघलशाही चराचर कापल्याशिवाय राहणार नाही...प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटेल अशी छत्रपती शिवाजी महाराज यांची कारकीर्द होती..6जून 1674रोजी रायगडावर राज्याभिषेक झालेले छत्रपती महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनातील रयतेचे राजे ठरले.. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात प्रत्येक जाती धर्मातील माणसाला सन्मानाची वागणूक मिळत होती.. छत्रपती शिवाजी महाराज कधीच मुस्लिम द्वेष करत नसतं.. ह्या ज्या काही होत्या त्या होत्या स्वराज्याच्या लढाया....अश्या महान राज्याने 3एप्रिल 1680मध्ये रायगड याठिकाणी आपला देह सोडला... अश्या महान सम्राटाची चरणांची धूळ मस्तकी लावून त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन...डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की "मला भारतीय संविधान लिहताना अडचण आली नाही कारण माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच स्वराज्य होतं.. आणि ह्या स्वराज्य विचारप्रणालीचा प्रभाव भारतीय संविधानावर पडलेला आहे...छत्रपती शिवाजी महाराज यांनी जसे रायतेचे राज्य स्थापन केले त्याप्रमाणे इथे सुद्धा लोकांचे राज्य स्थापन झाले याचा आम्हाला अभिमान आहे... छत्रपती शिवाजी महाराज यांच नाव घेतल की अभिमानाने म्हणावं वाटतं की,
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा...!
मराठी माणसाचा भगवा झेंडा मराठ्यांनी दिल्ली पर्यंत नेला याचा कायमच अभिमान असेल....छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन... व समस्त देशवाशियांना शिवजयंतीच्या भगव्या शिवमय शुभेच्छा.... 🚩🚩🚩
✍️लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
हा लेख कसा वाटला..? ह्याबद्दल प्रतिक्रिया नक्की कळवा..
✍️संपर्क -
8806379959
✍️संपर्क -:
@ABCs1432
🚩🚩

मनातील भावना..💌

16 Feb, 14:13


प्रवास

तळ शोधणाऱ्या धरणा सारखा कोरडाच मी
कुणी शृंगारल्यात आज ह्या वाटा माझ्यासाठी
रक्ताळलेल्या टाचेत बाभळीच्या काट्याची निशाणी
खाल्यात कित्येक खस्ता मी माझ्या लबाड पोटासाठी

सुगीच्या हंगामावर फेडत आलो ऊसणवारीचे कर्ज
फाटक्या परिस्थिती गरिबीला मानून माझा आदर्श
आला नाही कधीच मोहर माझ्या जीवन जगण्याला
कुणी घातला फुलांचा सडा आज माझ्या प्रवासाला

भुकेचा हुंदका गिळला अन् कविता जन्मास घातली
पेन ही मिळाला नाही घामाची शाही कागदावर ओतली
रस्त्यावर सांडले आयुष्य जीवन अन् मरनाचे हे गाणे
वर्तमानातच जगावे मला शिकवले तथागत गौतमाने

कालची माझीच वेदना आजची कादंबरी झाली
कुण्या खपाट्या पोराने ती झोपडीत वाचली
पेटून उठलाय म्हणे तो माझ्या पाठी येण्यासाठी
भेटण्या मला याच रस्त्यावर नव्या प्रवासासाठी

विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जी.बुलडाणा

मनातील भावना..💌

16 Feb, 14:12



*मेरे जिन्दगी के मालिक* *मेरे दिल पे हात रखना तेरे* *आने की खुशी मैं मेरा दम निकल ना जाये मुझे* *फूंकने से पहेले मेरा दिल निकल लेना किसी और की अमानत साथ जलना* ना जाये* ....!

आनंद कोळे नाशिक

मनातील भावना..💌

16 Feb, 03:33


*आपण सारे स्वतः च्या मनाला फसवणारे जोकरच समाजासमोर हसतो...😊*
*पण एकांतात मात्र रडतो...😔*

*
@Prasad 🩷*

मनातील भावना..💌

15 Feb, 04:49


बालपण दे रे देवा त्यात नसतो कधीच कोणाचा हेवा तो एक मस्तीचा थवा बालपणी विषय निघतो जेव्हा आपल्या पण लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो असतो तेव्हा कारण बालपण जीवनातील एक सुंदर आणि अनमोल काळ असतो. हा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतो. बालपणीचे दिवस म्हणजे फक्त आनंद, खेळणे आणि मस्ती करणे. कोणतीही चिंता किंवा जबाबदारी नसते.म्हणून तर बालपण सगळयांना हवं असतं मात्र ते परत कोणालास मिळत नसते!,,✍🏻

कमन#लेखक

 @Ommshelke

मनातील भावना..💌

15 Feb, 04:48


*आयुष्यात सर्व काही मिळतं*
*पण आपण जे शोधतो ते काय मिळत नाही*

*
@Prasad🩷*

मनातील भावना..💌

14 Feb, 03:06


प्रेम ही भावना सर्वांसाठी सारखीच असली तरी पण त्याची व्याख्या प्रत्येकजण वेगळी वेगळी मांडते कोणी याचा तिरस्कार करतो तर कोणी त्याला जीवापर जपतो मात्र सगळ्यांच्या जीवनात कधी ना कधी प्रेमाचा अनुभव आलेला असतो मग आपण का दुसऱ्याच्या प्रेमाला नावं ठेवत बसतो हेच समजतं नाही मी तर म्हणतो आज जे काही समाजामध्ये माणुसकी जिवंत आहे ते फक्त प्रेमाच्या शब्दांमुळे म्हणून म्हणतोय होतं नसेल तर प्रेम करू नका मात्र piz कोणाच्या प्रेमाला उगाच नावं ठेवू नका कारण ते खरंच खुपचं सुंदर नातं असतं ते तितक्याच सुंदरपणे जपायचं असते राव कारण प्रेम हे प्रेम असतें मात्र ते प्रत्येकासाठी सेम नसते ना!,,✍🏻

कमन#लेखक

 

मनातील भावना..💌

13 Feb, 04:24


*पायदळी तुडवले म्हणजे संपलं असे होत नाही*
*ती सुरूवात असते*
*पुन्हा नव्याने बहरण्याची*

*@प्र₹@sad🩷*

मनातील भावना..💌

23 Jan, 09:41


वाटतं तेवढं सोपं असतं का हो घर सोडून बाहेरगावी रहाणे?..

बाहेर शिकायला मुल पाठवले म्हणजे खूप लवकर यशस्वी होऊन येणार पण त्या मुलाचा बाहेरचा जीवनाचा प्रवास कसा असतो,तो कसा जगतो ते कुणीही पाहत नाहीत.सर्वात अवघड जगणं म्हणजे घराबाहेर भूक मारून राहणे😢आणि सोबत नोकरी,शिक्षणं पूर्ण करणे.फक्त एका नोकरीच्या,शिक्षणाच्या शोधात किती कष्ट करावे लागतात,कितीदा उपाशी राहून दिवस काढावे लागतात,रोज किती अडचणींचा सामना करावा लागतो हे वेगळच.त्यात घरची जबाबदारी असते ती वेगळीच😔घर सोडून रहाण्याचे दुःख तर वेगळेच..😢
बाहेर राहून तिथल्या वातावरणाशी मिळून राहणे,मेसच बेचव जेवण एवढं सोपं नसतं हो😢.फक्त जेवण हीच एक अडचण नसून रूम भाडे,शिकवणीची फीस,शिक्षकांचा दबाव,अभ्यासाचा ताण,नोकरीची चिंता,पैशाची अडचण,स्पर्धा अश्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते😔दहा रुपयाच्या चहा पिताना,किंवा दोन रुपयही खर्च करताना दहादा विचार करावा लागतो.घर सोडून राहणाऱ्या मुलांच्या नशिबात कुठे चांगल्या गोष्टी मच्छरदाणी,कुठे चांगले पाणी मिळत,ते दिवस कसेतरी काढावे लागतात😢 वाईट ह्याच वाटत नाही की आपण एवढं कष्ट घेतोय वाईट तेव्हा वाटत जेव्हा एवढं कष्ट करूनही इतर लोक,नातेवाईांकडून टोमणे एकून घ्यावे लागतात😢परंतु काहीही झाले तरीही हे मुल हार न मानता सगळ्या संकटाशी झुंज देतात ह्यातून जीवन जगण्याची कला त्यांना अवगत होते.
...........🦋🌺😇💞............
लेखन -B.S Kendre(Stu,Vicehead शौऱ्यरत्न&Script Writer)
Telegram -
@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा.✍🏻

मनातील भावना..💌

22 Jan, 16:08


@Shabdshailee

मनातील भावना..💌

22 Jan, 16:07


सुतकी रात्र

सगळेच निवांताची घटका घेत झोपत नसतात
जबाबदारीचे भूत काहींच्या उरावर नाचत
राहतात
काळजाचा ठाव घेत गात असते टिटवी गाणे
स्मशानाच्या दिशेने पळतात ऊद वाजतात हिरवी पाने

मध्यरात्री रात किड्यांचा जीवघेणा आक्रोश
सैरावैरा पळते वेशीत भटक्या कुत्र्यांची टोळी
लबाड पोटात तोडत असते आतडे भुकेने
धरकाप उडवतो सावकाराच्या कर्जाचा वाढीव धाक

घरांची खिडकी दारं लावून झोपलं सारं गावं
कोण रडतंय कोणीच विचारतं नसतं नाव
बोभाटा पहाटे गल्लोगल्लीत अनामिकतेचा
उलटली वटवाघळे सांगतात अर्थ सुतक्या रात्रीचा

विकास सुखधाने
युवा साहित्यिक लेखक
नांद्रा.ता.मेहकर जी.बुलडाणा

मनातील भावना..💌

22 Jan, 14:26


असं प्रत्येक जण म्हणतं की लोकं माझ्या सोबतच असं का वागतात पण फक्त एकदा असा विचार करून बघा की आपण दुसऱ्याशी कसं वागतो तर नक्कीच आपलं जगणं सोपं होऊन जातं राव शेवटी एक नियम सर्वांना लागू आहे की तो म्हणजे जसे आपण कर्म करतो तसंच काहीसं आपल्याला पण मिळतं💯बरोबर ना!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

मनातील भावना..💌

22 Jan, 06:29


@Shabdshailee

मनातील भावना..💌

20 Jan, 16:23


*☘️परिस्थितीचे दुकान☘️*

*✍️आज वर्गातल्या मुलाने कुतुहलाने प्रश्न विचारला - सर तुमचे चप्पलचे दुकान आहे काय?*
*मी म्हटलं - नाही रे...का ?*
*नाही तुम्ही वेगवेगळी चप्पल, बूट घालता म्हणून विचारले...*
*हे म्हणताच मन क्षणभर थांबले...मनाशीच स्मितहास्य करत... सैर करत निघाले... ते बारावीच्या वर्गात, भूतकाळात शिरले,आठवला तो मोरे कॉलेज कला शाखेचा वर्ग....आठवला... तो मानसशास्त्र चा तास...तसं कॉलेज म्हटलं की जरा लाजणे, शायनिंग असायची...अंगात जवानीची रग असायची...मुलीच्या पुढ्यात कोणी काय म्हणून चालत नसायचं...*
*तसे मोरे कॉलेज शिस्तीचं. त्यामुळे जास्त काय चालायचं नाही.*
*पण कॉलेज म्हटलं की असायचच काहीतरी....*
*दिवस पावसाळयाचे होते...नुसतंच बारावीच्या वर्गात प्रवेश केला होता.*
*पावसाळा असल्याने सुतार काम बंद होते. पैशाची चलती बंद होती पण शेळ्या, म्हैस यावर कसंतरी घर चालत होतं...*
*त्यामुळे वडिलांच्या खिसा रिकामा असायचा. कॉलेजला असल्यामुळे बऱ्यापैकी चांगले कपडे घालून जायची सवय होती. पण ऐन पावसाळ्यात पायातील चपलाने साथ सोडली...पण काय करणार नवीन लगेच घेऊ शकत नव्हतो. म्हणून तेच पन्नास वेळा शिवून सायकल मारत कसातरी कॉलेज करत होतो...*
*आणि माझी चप्पल शिवून शिवून सरवडेच्या नाक्यावरील चांभार सुद्धा कंटाळून गेला होता...म्हणायचा लेका घे की रं नवं चप्पल...*
*मी हसायचो आणि म्हणायचो पुढच्या वेळेला  नक्की काका. वर्गात तेच चप्पल घालून कसेतरी मुलींपासून आत सरकून बसायचो.... मारून बसवल्यासारखे. बाजूला मुली असायच्या कसंतरी वाटायचं...*
*एकदा रागाने घरी आलो आणि वडीलांना म्हणालो - मला नवीन बैराठी चप्पल पाहिजे... त्यावेळी बाजारात बैराठी नवीन brand आला होता.*
*पण मी त्यांच्या चेहऱ्यावरूनच ओळखले की...चपलासाठी पैसे कुठून आणायचे हा भाव चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तो काय माझ्या नजरेतून सुटला नाही.परिस्थितीची जाणीव होती त्यामुळेच की काय मी ही फार मागे लागलो नाही..*
*पण पोरग्याच्या पायात चप्पल नाही ही गोष्ट वडीलांनीही मनावर घेतली आणि  गावातील एका प्रतिष्ठित माणसाचे वापरलेले अभ्यंकर चप्पल...ते ही पूर्णपणे झिजलेले मला आणून दिले आणि म्हणाले - "हा पावसाळा काढ कसातरी, यावर काम आले की घेऊया तुला नवीन चप्पल..."*
*मी ही पहिल्यापेक्षा बरं म्हणून ते सोल झिजलेले चप्पल घालून दिवस काढत होतो.*
*पण हे चप्पल घालायची गोची ही होती. ज्या प्रतिष्ठित माणसाची ही चप्पल होती...त्यांची मुलगी आमच्याच वर्गात शिकत होती.*
*त्यामुळे लाजेखातर मला हे चप्पल तिच्यापासून लपवून वापरावे लागत होते.*
*पण एकदा गमंत झाली... बारावीला मानसशास्त्र विषय असल्यामुळे आम्हाला आठवड्यातून एकदा वेगळं बसावं लागत होतं.*
*मांगोलीची सगळी मुली - मुले एकत्र असायचे. मानसशास्त्राचे सर ही एवढे कडक शिस्तीचे नव्हते त्यामुळे आमची चेष्टा मस्करी चालायची आणि तो विषयही तसाच....*
*या तासाला विनायक आणि मी शेवटच्या बेंचवर बसलो होतो. कॉलेजची फरशी निसटती होती. आमच्याच बाजूला मुली बसल्या होत्या आणि आमचे पायाने बेंच उचलणे चालू होते.*
*बेंच उचलता उचलता एकदम सोल नसलेल्या चपलामुळे पाय निसटला आणि बेंच निसटून आम्ही दोघेही खाली पडलो...बाजूलाच मुली होत्या...हसायला लागल्या. त्या मध्येच ती प्रतिष्ठित व्यक्तीची मुलगी सुद्धा बसली होती. तिने ते पाहिले आणि चप्पल ओळखले. आता तिची कुजबुज सुरू झाली...पण चपलाने आमची गमंत केली.*
*पण हीच गमंत माझ्या आयुष्याला वेगळी रंगत देऊन गेली...त्याच वेळी मनाशी निश्चय केला...की आज जरी माझ्यावर ही वेळ आली असली तरी भविष्यात माझ्यावर ही वेळ कधीच येऊ देणार नाही...म्हणूनच की काय मला पुस्तक,कपडे आणि चप्पल यावर प्रेम जडले...*
*परवा त्याच मित्राला घेऊन चांगल्या किंमतीची दोन जोड चप्पल घेऊन आलो.आज माझ्याकडे चपलाची कमी नाही पण या साध्या घटनेवरून मला भविष्याचा वेध घेण्याची दिशा मिळाली.*
*आपली जडणघडण होते ती अशाच एखाद्या घटनेवरून.*
*आयुष्याला कलाटणी देणारा एखादाच क्षण असतो तोच पकडावा लागतो.*
*त्यावेळीच मी ना उमेद झालो असतो तर...*
*आणि शेवटी माणूस शिकतो तो परिस्थितीतूनच....*
*ही सगळी घटना मनापुढे उभी राहून आठवणी ताज्या करून गेली , परत मुलाने आवाज दिला सर सांगा की तुमचं चपलाचे दुकान आहे का? तसा भानावर आलो आणि म्हणालो बाळ चपलाचे नाही पण परिस्थितीचे दुकान नक्कीच होते ते आता मी बंद केलंय.*
*मुलगा बावरला... त्याला काय कळले नाही तो तसाच निघून गेला...मी मात्र त्याच्या प्रश्नाने स्मितहास्य करत तिथेच खुर्चीवर बसून होतो.*

आपल्यापैकी बरेच असतील त्यांनी असेच आपल्या हिमतीने आपल्या परिस्थितीचे दुकान बंद केले असेल त्या सर्वांना वरील लेख समर्पित🙏🙏🙏

      *@प्रसाद सुतार*
       *
9970820227*

मनातील भावना..💌

20 Jan, 12:26


असं म्हटलं जातं की आपल्या आयुष्यातील काही निर्णय आपली परिस्थिती घेत असते होय मान्य आहे पण मात्र काही वेळाला स्वतःची परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला पण काही निर्णय घ्यावे लागतात कारण सर्वाचं नशीब देव लिहितो असं म्हटलं जातं मग का? शेवटी हिशोब माणसाचा कर्माचा होतोहे अजून कोणालाच समजलं नाही राव!,,,✍🏻

एकमन#लेखक
 @Ommshelke

मनातील भावना..💌

20 Jan, 01:56


*सुंदर दिसण्यासाठी मेकअपच करावा लागतो असे नाही*
*कधी कधी कष्ट पण तुम्हाला सुंदर बनवतात*

*@P₹@S@D🩷*

मनातील भावना..💌

19 Jan, 12:33


लहान मुले ही देवाघरची फुल 💞असतात ते शेवटी त्यांच्या आईवडिलांना पाहूनच मोठे होतात,त्यांना पाहूनच शिकतात त्यांच्या कृतींचे अनुकरण करतात...❣️आईवडीलंनी लहान वयात दिलेल्या संस्कार आणि योग्य शिकवणी मुळेच भविष्यात इतरांचा आदर करणारी खासकरून स्त्रींयाचा आदर करणारी पिढी निर्माण होते👌जी नेहमी फुलांसारखी इतरांच्या आयुष्यात सुगंध पसरवण्याचे काम करते🥰😇ज्या मुलांना योग्य वेळी योग्य संस्कार व मार्गदर्शन भेटलेले असतात ते कधीच जीवनात दुःखी होत नाहीत किंवा वाम मार्गाला जात नाहीत..👌भविष्यात ते आपल्या फक्त घराचेच नव्हे तर पूर्ण देशाचेही नाव उज्ज्वल करू शकतात कारण तेवढी ताकद लहानपणीच्या मिळालेल्या योग्य शिकवणीत असते..💯👍🏻
....🦋🌺💞😇🙏....
लेखन-B.S.Kendre(stu)
Telegram-
@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा

मनातील भावना..💌

17 Jan, 14:41


आपण स्वतःला नेहमी सुखी समजायचं कारण तुम्हाला दुःखं दाखवायला आजूबाजुचं जग आहेस की शेवटी सर्व काही आपल्यालाचं विचारांवर अलंबून असते बाकी टेन्शन प्रत्येकाला असते ते कसं घ्यायचं हे आपल्या स्वभावावर ठरलेलं असते म्हणून तर प्रत्येक परिस्थितीत स्वतःला खूप खूश ठेवायचं असतें कारण शेवटी तुम्हाला दुःखी करायला वस्तुस्थिती असतेच की राव!,,,✍🏻

एकमन#लेखक
 @Ommshelke

मनातील भावना..💌

17 Jan, 03:39


*परिस्थिती हा एकच शब्द*
*पण तो माणसाला घडवितो नाहीतर बिघडवतो 😊*

*
@Prasad🩷*

मनातील भावना..💌

16 Jan, 17:37


कोणी कितीही जवळचे असो कुणाच्याही डोक्यावर "ओझ" म्हणून राहण्यापेक्षा🤗स्वतःच्या पायावर "सज्ज" झालेलं कधीही चांगलच💪🏻...भलेही स्वतःला होईल थोडा "त्रास" परंतु आपल्यामुळे नको होयला कुणाचा "नास"(Distrub) ...💯👌
....🦋🌺🙏....
लेखन-B.S.Kendre(stu)
Telegram-
@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा

मनातील भावना..💌

16 Jan, 14:09


स्पर्धा परीक्षा आणि अभ्यास... हा माझा महत्वपूर्ण लेख आज प्रकाशित झाला नक्की वाचा...

मनातील भावना..💌

16 Jan, 06:14


@Ommshelke

मनातील भावना..💌

16 Jan, 02:05


*चित्रे च एवढी बोलकी असतात की*
*काही नाही लिहिले*
*तरी समाजात विचार पेरण्याचे काम नक्कीच करतात*

*
@Prasad 🩷*

मनातील भावना..💌

14 Jan, 17:35


कधी कधी परिस्थिती नसल्यानी पण स्वप्नात जगून बघावं कारण आपण वस्तूस्थिती बदलू शकतं नाही मात्र स्वप्नामध्ये का होईना आपण मनासारखं तर जगू शकतो ना राव आभासी का होईना एकांतात बेभान होऊन जगावं!,,,✍🏻

एकमन#लेखक

 @Ommshelke
चित्र रेखाटन ✍️दीप्ती गोपाळ शेवाळे

मनातील भावना..💌

14 Jan, 09:35


चांगल्या व वाईट अनुभवाची शाळा म्हणजे आयुष्य, जिथं प्रत्येक अनुभव एक नवीन शिकवण देऊन जातो..!


~ हर्षवर्धन❤️

मनातील भावना..💌

14 Jan, 02:52


# मनातील भावना ❤️

मनातील भावना..💌

14 Jan, 02:51


डॉ. बाबासाहेब...आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर...
✍️ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः च एक विद्यापीठ होते, कारण एका विद्यापीठाचे सर्व अभ्यासक्रम होतील इतकं शिक्षण एकट्या बाबासाहेब आंबेडकर यांनीच घेतलं होतं..म्हणून अश्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच नाव एखाद्या विद्यापीठाला दिल्या गेलं असेल तर ते आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा...!
सप्रेम जयभीम🙏🙏 💙
✍️ ABCs Diaries 📚
14जानेवारी नामविस्तार दिवस
💙💙💙💙💙

मनातील भावना..💌

28 Dec, 12:29


प्रेम♥️हा विषय प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला आहे  प्रेम म्हणजे सतत बोलणं नेहमी भेटावं वाटण एकमेकांच्या आठवणीत रमून जाणं आपल्या आवडत्या व्यक्तीण जरा वेळ कमी दिला तर तिच्यावर रुसुन बसणं म्हणजे असंच काहीसं नामात्र एकतर्फी प्रेम करण्याऱ्याचा कधी विचार केला काय ती व्यक्ती आपली कधीच होणार नाही हे माहिती असून सुद्धा तिच्यावरच निःस्वार्थपणे प्रेम करत राहणं तिच्या एका msg ची दिवसंदिवस वाट बघणं आणि तिचा हसरा चेहरा पाहण्यासाठी  सातत्याने प्रयत्नात असणं कोणाला माहिती न,होता शेवटच्या श्वासापर्यंत जपणं अस प्रेम करणं सगळयांच्या नशिबात नसतं ज्यांचं असतं त्यांचं खूप भाग्य असतं जसं की👇🏻!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

मनातील भावना..💌

28 Dec, 03:44


*वयाबरोबर वाढलेल्या समजूतदारपणा आपल्याला मौनाकडे घेऊन जातो😊*

*
@Prasad🩷*

मनातील भावना..💌

27 Dec, 17:21


सरलेलं वर्ष सुंदर होत आताच वर्ष पण चांगलंचं असणार आणि येणार प्रत्येक वर्षे ही आपलीच असणार यात काही शंका नाही हा विश्वास स्वतःला असला की कुठलीच वाट बिकट वाटत नाही फक्त आपलं ध्येय माहीत असायला हवं कारण आयुष्याच्या शर्यतीत धावतात सर्वच मात्र थांबावं कुठं हे अनेकांना माहिती नसतं म्हणून स्वतःवर भरोसा असणारी व्यक्ती कुठल्याही संकटात नेहमी शांत असते कारण त्याला आयुष्यात प्रत्येक परिस्थितीला सामोरे कसं जायचं याचं ज्ञान अनुभवणं  प्राप्त झालेल असतं!,,,✍🏻

एकमन#लेखक
 

मनातील भावना..💌

26 Dec, 17:40


डॉ.मनमोहन सिंग... 🙏🌹*
✒️ *"काळाच्या ओघात जगातली चांगली माणसं काळाने हिरावून घेतली आता राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी.. आपल्या देशाचा सर्वात जास्त आर्थिक विकास दर ज्यांच्या कार्यकाळामध्ये होता ज्यांनी देशातील 32+कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढलं ते एकमेव उच्चशिक्षित प्रधानमंत्री RBI चे माजी गव्हर्नर अर्थतत्व डॉ. मनमोहनसिंग यांच आज निधन झालं... त्यांना भावपुर्ण आदरांजली....
🙏🙏🙏🙏

मनातील भावना..💌

25 Dec, 08:22


*नाती अशी बनलेली असतात*
*ती तोडायची म्हणली तर थोड्याशा श्वासानेही तुटतील आणि*
*तोडायची नाही म्हटलं वज्रघातानेही तुटणार नाहीत*

*@प्रसाद🩷*

मनातील भावना..💌

24 Dec, 16:41


व्हाट्सअप स्टेटस...💚
✒️"व्हाट्सअपच स्टेटस म्हणजेच जीवन असंच काही लोकांना वाटतं एखाद्या व्यक्तीच्या जीवनात काय सुरु आहे? याचा अंदाज लोकं त्या व्यक्तीच्या व्हाट्सअप स्टेटस वरून लावतात प्रत्यक्ष सवांद जवळपास बंदच झाला आहे.कधी कधी परिस्थिती अशी येते की,केवळ व्हाट्सअपच स्टेटस बघून लोकं त्या व्यक्तीला सोडून जाण्याचा पण विचार करतात.त्या व्यक्तीसोबत कोणतीही चर्चा न करता. खरं सांगायचं तर या जगातील बहुतांश लोकं व्हाट्सअपला स्टेटस ठेवतात ते फक्त आवड म्हणून..कोणत्याही व्यक्तीच जीवन हा व्हाट्सअप स्टेटसचा विषय नसतो..एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काय सुरु आहे? हे जर व्हाट्सअप स्टेटस वरून कळत तर काही लोकं स्टेटसच ठेवत नाही.. मग असे लोकं काय मेले कां...?😁ते पण जिवंतच आहे ना.. अमुक व्यक्तीनें एखाद स्टेटस ठेवलं तर ते आपल्याच उद्देशून ठेवल असा गैरसमज सुद्धा अनेक लोकं करुन घेतात.. अरे त्या व्यक्तीला विचारा कुणासाठी ठेवलं..? परस्पर स्वतः च काही ठरवू नका..व्हाट्सअप स्टेटस केवळ एक आवड आहे लोकांच जीवन नाही..!"
✍️लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC)
लिखाण दि24डिसेंबर 2024
✍️संपर्क -:
@ABCs1432

मनातील भावना..💌

24 Dec, 07:08


*साधेपणाचा सुगंध बाटलीत ठेवून त्याच्या अर्क वाटण्यात जीवनाचा खरा आनंद आहे*

*
@Prasad🩷*

मनातील भावना..💌

09 Dec, 13:37


आपण स्वतःमध्ये इतकं खुष राहायचं की दुसऱ्यांनी पण आपल्याकडे बघून त्यांचे दुःखं विसरले पाहिजे दुःखंचा प्रश्नतर प्रत्येकाला आहे हो याचे उत्तर कसं शोधायचं हे आपल्यावर आहे जेव्हा कधी वाटेल की एवढ दुःखं आपल्याचं नशिबात का? तर एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवायची ते म्हणजे देव पण त्यांनाच दुःख देतो त्यांच्यात त्याला तोंड देण्याची क्षमता असते!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

मनातील भावना..💌

07 Dec, 16:31


गावाकडची गोष्टचं खूप भारी इथल्या पारावर जमते सर्व मंडळी गल्लीपासून दिल्लीपर्यंत वार्ता कळते सारी गावमधली गोष्टचं लय न्यारी तिथं एक पण योजना पोचत नाही सरकारी तरीही प्रत्येकजण करते आपआपल्या नेत्यांसाठी हाणामारी नका ना घेऊ त्यांच्या साधेपणाचा फायदा जेव्हा समजायला लागेल सर्वांना कायदा तेंव्हा भरावा लागेल समद्या राजकीय लोकांना एक एक रुपयांचा वायदा इथेच जिवंत आहे अजूनपर्यंत माणुसकीची नाती म्हणून तर सुखावते ना प्रत्येकाला आपल्या गावाकडची माती!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

मनातील भावना..💌

07 Dec, 03:34


*एखाद्यावर बोट करणे जेवढं सोपं*
*त्यापेक्षा अवघड बोट धरणं 😊*

*@प्रसाद🩷*

मनातील भावना..💌

06 Dec, 14:00


महामानवास विनम्र अभिवादन 🙏🏻💐

मनातील भावना..💌

06 Dec, 04:32


बाबासाहेब 🙏💙
✍️"6डिसेंबर 1956ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर या जगातून निघून गेले पण त्यांचे विचार आजही जिवंत आहे आणि जिवंत राहतील या आकाशात जोपर्यंत चंद्र, सूर्य आणि तारे आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार असतील... इतिहासाच्या पानापानावर आणि भारताच्या संविधानावर एक नाव सोनेरी अक्षराने लिहल्या गेलं ते.. म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवास कोटी..
कोटी प्रणाम विनम्र अभिवादन...
🙏🙏🙏🙏🙏💙
बाबासाहेब आंबेडकर याचे विचार हेच आमचे आचार होवो हिच सदिच्छा...!
🙏🙏🙏🙏🙏

मनातील भावना..💌

21 Nov, 12:20


संध्याकाळ

तग धरून राहते बिन चेहऱ्यांची उदाशी
कसी तक्रार करवी मी ह्या नशिबाशी
यातनांचा वेदनांचा असतो दारांत जश्न
रोज जंन्म घेतो नव्याने पोटापाण्याचा प्रश्न

विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा

मनातील भावना..💌

21 Nov, 12:08


काही लोक म्हणतात खरं प्रेम वगैरे काहीच नसतं तर ते स्वार्थापोटी झालेलं एक आकर्षण असतं पण मला वाटतं प्रेम ही निःस्वार्थ भावना आहे ती तितक्याच शुद्धतेने जपल्या गेली पाहिजे कारण ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येणार की नाही हे परिस्थितीवर अलंबून असलं तरी मात्र एकतर्फी प्रेम आपल्यासाठी नेहमीच अमर असते ना राव❤️!,,✍🏻

कमन#लेखक
 
@Ommshelke

मनातील भावना..💌

20 Nov, 07:49


मतदान.. 🇮🇳
✒️"मतदान या शब्दामध्येच दान हा शब्द येतो.. मतदान हे सुद्धा लोकशाहीच्या मजबुतीसाठी मतदारानी करायच दानच आहे.. आणि हे दान मुक्तपणे कोणाचा रुपया न घेता केल तरच तो लोकशाहीचा खरा विजय आहे.. मी मतदान केल तुम्ही सुद्धा करा...!"
✒️ लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा )
# मतदान 🇮🇳

मनातील भावना..💌

18 Nov, 06:34


#Ishq_Kiyaan 💔
@Writer_ami

मनातील भावना..💌

17 Nov, 13:05


स्वतःमध्ये खुश राहा कारण ते दुसऱ्या कडून शोधलं तर आपलं जगणं विसरून जाहाण हा त्यांच्या दोष नसतो तर प्रत्येकाला जीवन जगण्याचं स्वतंत्र असतं फक्त आपण आपला जगण्याचा कोणाला होऊ द्यायचा नाही कारण आयुष्यात अश्या काही व्यक्ती भेटतात त्यांना गमावणं आपल्याला पडवणार नसतं म्हणून त्यांच्या पासून दूर जाऊन त्यांना आनंदी बघायचं असतं यालाच ❤️ म्हणतात ना जीवापार जपणे!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

मनातील भावना..💌

16 Nov, 16:07


आवड... ❤️
✒️"वाचनाची आवड असणारी बहुदा ही शेवटची पिढी, थोडा जरी रिकामा वेळ मिळाला की अशी माणसं खाली पडलेल्या रद्दी कागदावर सुद्धा काय लिहलं आहे ? हे वाचत असतात.. अश्या माणसाककडे मोबाईल नाही त्यामुळे त्यांना हे जमतं.. नाहीतर आजकालची तरुण पिढी थोडा रिकामा वेळ मिळाला की मोबाईल बघत बसतात.. पण अशी माणसं रिकाम्या वेळेत सुद्धा काहीतरी ज्ञान मिळवण्यासाठी धडपड करतात.. अश्या व्यक्तीचा आदर्श नव्या पिढीने नक्कीच घ्यावा.."
✒️ लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC)
(मराठी विषय शिक्षक संत शुकदास कॉन्व्हेंट रुईखेड मायंबा जि. बुलढाणा )
( फोटो -तेजराव बाबा खराटे रुईखेड मायंबा जि. बुलढाणा )
🖋️संपर्क -:
@ABCs1432

मनातील भावना..💌

15 Nov, 13:30


प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न नेहमी येतोचं तो म्हणजे एवढ दुःखं माझ्याच वाट्याला का येत तो येणं स्वाभाविक आहे कारण जीवन म्हटलं सुखदुःखं हे आलंच हे वास्तविक सत्य कोणीच नाकारू शकतं नाही हा नियम सर्वांनाचं लागू होत असेल जी परिस्थिती आपल्या पुढे निर्माण झाली आहे तिचा स्वीकार करून आनंदाने जगायला काय हरकत आहे उलट त्या गोष्टींचा त्रास आपल्यालाच कमी होतो हे मी स्वतःलाचं अनुभवत आहे !,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

मनातील भावना..💌

15 Nov, 08:07


*धान्याबरोबर विचारांची ही उफणणी करावी लागते ...*
*मग विचार ही स्वच्छ आणि पेरण्याजोगे होतात..😊*

*
@prasad🩷*

मनातील भावना..💌

13 Nov, 17:19


ख्वाईशे...❤️‍🔥
13/11/2024

Na Dikhe Manjil To Khafa Na Hona,
Yahaan Murad Na Puri Hone Par Log
Bhagwan Badal Deten Haii..
Aur Tum Dil Ki Baat Karte Ho Sahab,
Yahaan Waqt, Waqt Ke Hisab Se
Pyaar Main Log..
Log Hi Badal Deten Haii..

ना दिखे मंजिल तो खफा ना होना,
यहाँ मुराद ना पुरी होने पर लोग
भगवान बदल देते है..
और तुम दिल कि बाद करतें हो सहाब
यहा वक्त, वक्त के हिसाब से
प्यार मे लोग..
लोग ही बदल देते है..

#Ishq_Kiyaan 💔
@Writer_ami

मनातील भावना..💌

13 Nov, 13:46


आयुभरासाठी माझी प्रिय,राणी, एक मैत्रीण म्हणून साथ मला देशील ना।।जीवनरुपी प्रवासाच्या प्रत्येक वळणावर येऊन मला भेटशील ना।।माझ्या संकटाच्या रात्री मनाला आधार देणारा संवाद तू माझ्याशी साधणशील ना।।मला माहिती आहे ग,या जन्मात आपण एक नाही होऊ शकतं पण मात्र पुढील जन्मात माझी जीवनसाथी बनून येशील का?!,,,✍🏻

  . . .I like you.. Dk. . .♥️🦋
चित्र रेखाटन शेवाळे दीप्ती. गोपाळ

एकमन#लेखक

 
@Ommshelke

मनातील भावना..💌

13 Nov, 06:10


*सुंदर गोष्टी घडवायला,घडताना नेहमी वेळ हा लागतोच*
*पण* 
*विध्वंस हा क्षणार्धात होतो😊*

*@प्रसाद🩷*

मनातील भावना..💌

12 Nov, 17:14


काय चुकते कळते सर्व..💔
( वळत कसे नाही.. )
12/11/2024


माणूस हवेत जातो कसा,
का राहत नाही नात्यात भरवसा..
हळव्या मनाला लागते
जेव्हा चाहुल प्रेमाची,
तरीही नाती का
बदलत असतील हक्काची..
टोचते, बोचते मनी
घाव विरहाचे,
सोबत असतानाही का दिसत नाही
प्रेम पाऊल आपुलकीचे..
एवढंही का बदलावं
माणसाने आपल्याच नात्यात,
का तोडावा विश्वास आणि
घालावा कसा काळजावर घाव..
मिळवुन मिळणार तरी काय असते
माणसाला असे करुन,
मरते ते अमोल नाते
स्वप्ने जातात जळुन..
उरुन काय उरते हातात
मग राख होती ती भावनांची,
अनुभव कोरला जातो काळजावर
उरते कहाणी ती जीवनाची..
शेवटी अनुभव कोरला जातो काळजावर
अन् उरते कहाणी ती जीवनाची..
❤️‍🔥

लेखक - अमोल मोरे..✍🏻
@AmolmoreAm

मनातील भावना..💌

12 Nov, 12:19


मताचा मिळालेला अधिकार हे तुमच्या मुक्तीचे साधन आहे..

मनातील भावना..💌

12 Nov, 04:17


@Shabdshailee

मनातील भावना..💌

10 Nov, 05:39


तो आला नव्हता त्याला आणला होता, तो मेला नव्हता त्याला मारला होता..!!
शिवरायांनी अन्यायी प्रवृत्तीचा अंत केला होता.. .!!
युक्तीच्या जोरावर शक्तीच्या बळावर आत्मविश्वासाचा प्रमाणावर 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजलखान नांवाचा राक्षसाचं उभा फाडला होता.. .!!
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

सर्वाना शिवप्रताप दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा🚩🙏🏻


@Ommshelke

मनातील भावना..💌

10 Nov, 05:39


Move on होयच पण होऊ शकत नाही,
त्याच्यासोबत आयुष्भराच स्वप्न पहिल
त्याला एक क्षणात विसरु शकत नाही,
ज्याला माझ संपूर्ण आयुष मानल
त्याला मनातून काढता येत नाही,
मन तळमळतय त्याच्यासाठी पण
दुराव्यामुळे त्याला बोलता येत नाही,
कधी सरेल हा वनवास कारण
आत्ता सोसवत नाही,
खर प्रेम केलंय त्याच्यावर एवढ्या
लवकर त्याला विसरता येत नाही,
Move on व्हायचय मला पण काय
करू होता येत नाही...!!!

Arabhi...❤️🌍

मनातील भावना..💌

08 Nov, 04:46


*मनातील भिती दूर करून निर्भय करण्याचं सामर्थ्य फक्त प्रकाशात असते ...😊*

*@प्रसाद🩷*

मनातील भावना..💌

08 Nov, 01:56


(वेळ काढून पूर्ण वाचा,विराट प्रेरणादायक संघर्षगाथा मांडली आहे)
आज यशाच्या उंच शिखरावर पोहचलेले अनेक व्यक्ती दिसतात.आजच success जगाला दिसतो,परंतु कालचा संघर्ष कुणाला दिसत नाही😔.हे जगाचा नियमच आहे जग तुमच फक्त output पाहत असतं,त्यासाठी तुम्ही सोसलेल्या वेदना,यातना नाहीत😒.यशस्वी होण्याचा प्रवास हा काट्यानिंच भरलेला असतो मग तो प्रवास अंबानींचा असो की विराटचा  जोपर्यंत संघर्षाच्या त्या वेदना आपल्याला जाणवत नाहीत तोपर्यंत स्वतःवर असणारा विश्वास आणि आपण स्वतः काय करू शकतो ह्याचा अंदाजही येत नाही👍म्हणून कोणतेही परस्थिती असो,आपल्याला चुकीचं समजणारी,टीका करणारी,टोमणे मारणाऱ्या व्यक्ती ह्याकडे जास्त लक्ष दिले नाही तरच कुठे काहितरी मिळेल.
  विराट कोहलीचाही संघर्ष हाही अतिशय कसोटीचा.वाईट दिवस पहिल्याशिवाय चांग्याल्या दिवसांची किंमत समजत नसते.अनुभव हाच मोठा गुरू आहे,आणि त्यातूनच शिकत विराट न डगमगता पुढे गेला म्हणूनच आजही विराटचे वेगवेगळे रेकॉर्डस् बनतात.2006 साली फक्त 18 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना त्याने खेळ सोडला नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याने शतकी धावा केल्या.त्याच्या हे देश,संघाप्रती असलेल्या समर्पणाने त्याचे किती मजबूत व्यक्तिमत्व आहे,हे दाखवले.स्वतचं फिटनेस जपण्यासाठी तो आजही आवडीचे पदार्थ खाणे टाळतो ह्यावरून त्याचा त्याग दिसतो. क्रिकेटच्या क्षेत्रात त्याने स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केली आहे.प्रत्येक वेदनादायक प्रवासाचा सुखदायक शेवट होतोच आणि त्याचे उदाहरण म्हणजे 👑 किंग कोहली..
.........🦋🌺🙏.........
शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

मनातील भावना..💌

07 Nov, 13:58


*फुले रोजच आयुष्यात पडत असतात*
*वेगवेगळ्या रुपात*
*फक्त कोणती अंगावर झेलायची यावर*
*आपला आनंद अवलंबून असतो😊*

*@प्रसाद🩷*

मनातील भावना..💌

06 Nov, 13:53


चुकलेच का माझे

मुत्युला सुख म्हणालो
चुकलेच का माझे
जखमांना जगणे म्हणालो
चुकलेच का माझे

आप्तेष्टांना घात आघात म्हणालो
चुकलेच का माझे
मारेकऱ्यांना यार म्हणालो
चुकलेच का माझे

मंदिरातल्या ईश्वराला दगड म्हणालो
चुकलेच का माझे
डाॅक्टर रूपी माणसांना देव म्हणालो
चुकलेच का माझे

प्रियशिला दगाबाज धोकेबाज म्हणालो
चुकलेच का माझे
माय बापाला श्वास म्हणालो
चुकलेच का माझे

जीवनाला बंदिशाळा म्हणालो
चुकलेच का माझे
अंत्य याञेला कौतुक म्हणालो
चुकलेच का माझे

काळजाला वेदनेचे बाजार म्हणालो
चुकलेच का माझे
मनाला शब्दांचे आगार म्हणालो
चुकलेच का माझे

विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा

मनातील भावना..💌

06 Nov, 13:48


आपल्या डोळ्यातील अश्रू प्रत्येकाला दिसतात हे मात्र खरं तर ते मनातील साठलेलं दुःखं शांतपणे बाहेर काढण्याचा एक मार्ग असतो ते ओळखणं सर्वांना जमतं नसतं म्हणून तर मनातीळ वेदना कमी करण्यासाठी कधी कधी एकांत हवा असतो कारण त्यांना समजून घ्यायला कोणीच तयार नसतं!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

मनातील भावना..💌

06 Nov, 02:07


@Shabdshailee

मनातील भावना..💌

02 Nov, 05:37


@Shabdshailee

मनातील भावना..💌

01 Nov, 18:58


आठवण त्या वेडयाची....

  तो पहिला कॉल जो तु मला केलेला
   ती पहिली भेट जेव्हा तु पहिल्यांदा माझा हात
     तुज्या हातात घेतलेला...!!!
  ते एकमेकाना बोलण्यवीना न राहण
    तासनतास कॉल वरती बोलत बसण
      तुझ ते माझ्या कड़े पाहुन हासण ...!!!
  मी रूसल्यावर मला प्रेमाने मनवन
    sad असल्यावर मला हसवन
      मला झोप येत नस्ल्यास माझ्यासाठी जागी रहाण ...!!!
  मला तुज्या हाताने प्रेमाने भरवण
    माझा हात तुझ्या  हातात घेऊन सोबत चालण
      मी आजारी असल्यावर माझी काळजी करण ...!!!
  मी तुझ्या  पासून दूर जाईल म्हणून तुझ ते घाबरण
   सांग ना कस विसरु तुझ माझ्यावरती प्रेम करण
     तुझ्यासाठी सोप असेल मला सोडून जाण
पण माझ्यासाठी खुप अवघढ आहे तुला विसरुन जाण...!!!

Arabhi...❤️🌍

मनातील भावना..💌

01 Nov, 02:37


💥 🎉 शुभ दीपावली ☄️☄️

मनातील भावना..💌

30 Oct, 04:51


@Shabdshailee

मनातील भावना..💌

30 Oct, 02:39


दिवाळी

सगळ्यांचीच सारखी नसते दिवाळी
काहींचे घरे असतात खुल्या आभाळी
दुःख आसवांचाच रोज असतो वनवा
काहींच्या झोपडीत लागतं नसतो दिवा

काहींना पोट भरण्याची असते घाई
गरिबांच्या वस्तीत होतं नसते रोषणाई
यातनांचा आक्रोश आभाळ भेदत जाई
तोंड वासून बसलेली असते महागाई

विकास सुखधाने
युवा साहित्यिक लेखक
नांद्रा.ता.मेहकर जी.बुलडाणा

मनातील भावना..💌

30 Oct, 02:29


शुभसकाळ 💐

मनातील भावना..💌

28 Oct, 17:07


आठवणी तुझ्या
कधी विसरता येत नाही..
गॅलेरीतले फोटो तुझे
कधी डिलीट करता येत नाही..
आठवणीने आठवण तुझी
दररोज येत राहते..
मोबाईलच्या स्किनवर वाट
तुझ्या मॅसेजची पाहते..
पण कितीही तुला आठवल्याने
जुने दिवस परत कसे येत नाही..
विचारांत तु असतो
मग जवळ कशा दिसत नाही..
आठवणींच्या विरहात
पुर्ण रात जागते..
अन् नकळत अश्रू माझे डोळ्यातून वाहते..


Arabhi...❤️🌍

11,808

subscribers

14,054

photos

1,183

videos