1) पणजी, गोवा येथे 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (IFFI) सुरुवात झाली. [1952 मध्ये स्थापित, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) हा आशियातील सर्वात महत्त्वाचा चित्रपट महोत्सव आहे आणि तो दरवर्षी गोव्यात आयोजित केला जातो.)
2) फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फिल्म प्रोड्युसर्स फेडरेशन (FIAPF) द्वारे स्पर्धात्मक फीचर फिल्म फेस्टिव्हल म्हणून ओळखला जाणारा दक्षिण आशियातील IFFI हा एकमेव चित्रपट महोत्सव आहे.
3) युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड (UNICEF) ने स्टेट ऑफ द वर्ल्डस चिल्ड्रन 2024 (SOWC-2024) अहवाल प्रकाशित केला आहे.
4) दुसरी भारत-CARICOM शिखर परिषद गयाना इथे आयोजित करण्यात आली होती.
5) क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स (CCPI) 2025 जर्मनवॉच, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट अॅक्शन नेटवर्क इंटरनॅशनल द्वारे जारी करण्यात आला.
6) क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स (CCPI 2025) मध्ये भारताचा 10 वा आहे. (पहिल्या तीन जागा रिक्त राहिल्या असून, डेन्मार्कला चौथे स्थान मिळाले.)
7) अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) ला लक्ष्य करणाऱ्या भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित प्रतिजैविकाचे नाव नॅफिब्रोमायसिन असे आहे.
8) विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने नावीन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) डेटा बँक सुरू केली.
10) भारतीय महिला हॉकी संघाने चीनचा 1-0 असा पराभव करत तिसऱ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. घरच्या भूमीवर भारताचे हे सलग दुसरे आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद आहे.]
11) गॅबॉन देशाने अलीकडेच सार्वमताद्वारे नवीन संविधान मंजूर केले आहे.
12 ) मुलांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी जागतिक बालदिन साजरा केला जातो. (युनायटेड नेशन्सने 1954 मध्ये सार्वत्रिक बालदिन म्हणून याची स्थापना केली.]
13 ) जागतिक बालदिन 2024 ची थीम "भविष्य ऐका" ही आहे.
14) जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्र (INCASR) संशोधन संस्थेने एचआयव्ही जीनोमपासून उद्भवणारे G- Quadruplex (GQ) शोधण्याचे तंत्र विकसित केले आहे.
15) समर्पित GCC (ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स) धोरण सुरू करणारे कर्नाटक हे भारतातील पहिले राज्य आहे.