🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱 @krishirashtrabyas Channel on Telegram

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

@krishirashtrabyas


फक्त शेतीविषयक माहिती देणारे टेलीग्राम चॅनेल

👳‍♂🌱👳‍♂🌱👳‍♂🌱👳‍♂🌱👳‍♂🌱

आपले कृषीराष्ट्र, माहिती देते बेस्ट

👳‍♂🌱👳‍♂🌱👳‍♂🌱👳‍♂🌱👳‍♂🌱

निष्ठा आणि समृद्धीला अधोरेखित करण्यासोबतच भरभराटीचा स्त्रोत म्हणजे हे कृषी क्षेत्र.

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱 (Marathi)

कृषीराष्ट्र अशा टेलीग्राम चॅनेलचा नामकरण केला गेला आहे ज्यात शेतीविषयक माहिती देणारे समूह आहे. ह्या चॅनेलमध्ये आपल्याला शेतीविषयक सर्व काही मिळवू शकतो. कृषीराष्ट्र हे समूह आपल्याला रोजच्या कृषीबाबतीत सुरक्षित आणि सटीक माहिती प्राप्त करू देतो. या स्त्रोतापासून आपल्याला निष्ठा आणि समृद्धीच्या अधोरेखणात आणि विकासात मदत मिळू शकते. भरभराटीचा स्त्रोत म्हणजे कृषी क्षेत्र ज्यातून हवे त्यातून सर्व संभव माहिती मिळवायला मिळेल.

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

08 Feb, 11:47


जमिनीचे आरोग्य कसे असावे, जमिनीचा पोत कसा सुधारावा याबद्दल सविस्तर माहिती वाचा.
👇👇👇👇

https://krushirashtra.in/जमिनीचे-आरोग्य/

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

31 Jan, 12:39


​सेंद्रिय खतांचे प्रकार

▪️ वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात.

▪️ सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हणजे, शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीची खते, गांडूळ खते, माश्यांचे खत, खाटिकखान्याचे खत, इत्यादी.

शेणखत:
▪️गाईम्हशींचे शेण, मूत्र, गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत म्हणतात.

▪️त्यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश असते.

▪️शेणाचा महत्त्वाचा उपयोग बायोगॅसमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी होतो आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणून वापरता येते.

कंपोस्ट खत :
▪️शेतातील गवत, पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, भुसा, उसाचे पाचट, कापसाची धसकटे इ. सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्मजीवजंतूंमुळे विघटन होऊन त्यातील कार्बन नत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो त्याला कंपोस्ट म्हणतात.

▪️यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश असते.

हिरवळीची खते :
▪️लवकर वाढणाऱ्या पिकांची निवड करून, त्यांची दाट पेरणी करून पीक फुलोऱ्यावर येण्याच्या आधी ते नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाडतात.

▪️त्यापासून जमिनीला नत्र मिळते, जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते. अशा खतांना हिरवळीचे खत म्हणतात.

▪️गाडलेल्या पिकांना कुजण्य़ासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालवधी लागतो.

▪️ताग, धैच्या, मूग, चवळी, गवार, शेवरी, बरसीम, ग्लीिरिसिडीया तागापासून नत्राचा पुरवठा ५ ते ६ आठवड्यात होतो.

▪️मुगाचा पालापाचोळा जमिनीत गाडल्यामुळे गव्हाच्या उत्पादनात चांगली वाढ होते.

गांडूळ खत -
▪️ह्या खतात गांडुळाची विष्ठा, नैसर्गिकरीत्या कुजलेले पदार्थ, गांडुळाची अंडीपुंज, बाल्यावस्था आणि अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असलेल्या खताला गांडूळ खत म्हणतात.

माशाचे खत -
▪️समुद्रकिनारी वाया गेलेल्या माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून जे खत तयार होते ते. ह्यात नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण भरपूर असते.

खाटीकखान्याचे खत :
▪️जनावरांचे रक्त व अवशेषापासून जे खत बनवितात त्याला खाटीकखान्याचे खत म्हणतात.
▪️यात नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणत असते.
धन्यवाद.
🙏🙏

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

28 Jan, 13:43


Farmer ID म्हणजे नेमके काय ? त्याचे फायदे काय ? हे आयडी कुठे काढावे इत्यादी बद्दल सविस्तर माहिती वाचा.
👇👇👇👇

https://krushirashtra.in/farmer-id/

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

15 Jan, 12:47


RTE ADMISSION 2025-26 *मोफत शिक्षण* साठी अर्ज
सुरू झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती वाचा.
👇👇

https://krushirashtra.in/rte-admission/

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

14 Jan, 10:44


कांदा खत व्यवस्थापन कसे असावे याबाबत सविस्तर माहिती वाचा.
🧅🧅🧅🧅🧅
👇👇👇👇👇

https://krushirashtra.in/kanda-khat-vyavsthapan-%/

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

08 Jan, 11:28


उन्हाळी बाजरी लागवड

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

07 Jan, 13:26


पालक लागवड कशी करावी ?


https://krushirashtra.in/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%95-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%a1-palak-lagwad/

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

04 Jan, 16:06


शेतीचा हिशोब कसा लिहावा ?
👇👇👇👇👇👇👇

https://krushirashtra.in/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%ac/

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

03 Jan, 12:45


मोसंबी आंबिया बहार बद्दल सविस्तर माहिती वाचा.

https://krushirashtra.in/मोसंबी-बहार-व्यवस्थापन

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

02 Jan, 14:35


शेळीपालन व्यवसाय बद्दल सविस्तर माहिती वाचा. 👇

https://krushirashtra.in/शेळीपालन-व्यवसाय/

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

01 Jan, 14:37


*मासेपालन व्यवसाय बद्दल जाणून घेवू. 👇*
🐟🐠🐟🐠🦈🎣

https://krushirashtra.in/मासेपालन-व्यवसाय

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

01 Jan, 10:00


Channel photo updated

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

25 Dec, 12:00


टरबूज लागवड बद्दल सविस्तर माहिती वाचा.
👇👇
https://krushirashtra.in/%e0%a4%9f%e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a5%82%e0%a4%9c-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%a1/

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

05 Dec, 05:52


*श्री. विकास भिकाजी धामापूरकर*
*शास्त्रज्ञ – मृद्शास्त्र*
*कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग*

मातीचे क्षारीकरण ही मातीची ऱ्हास करणारी प्रक्रिया पर्यावरणास धोक्यात आणणारी प्रमुख प्रक्रिया आहे आणि जागतिक स्तरावर कृषी उत्पादन, अन्नसुरक्षा आणि सर्वच प्रदेशातील शाश्वत उत्पादन टिकविण्यासाठी सर्वात महत्त्वाची समस्या म्हणून ओळखली जाते. जागतिक मृदा दिवस ०५ डिसेंबर २०२१ आणि त्याची मोहीम Halt Soil Salinization & Boost Soil productivity चा उद्देश माती व्यवस्थापनातील वाढत्या आव्हानांना तोंड देऊन, मृदा क्षारीकरणाशी लढा देणे, मातीची जागरूकता वाढवणे आणि समाजाला प्रोत्साहित करून निरोगी परिसंस्था आणि मानवी आरोग्य राखण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवणे आहे तसेच मातीचे आरोग्य सुधारणे हा आहे.
माती, अन्न, खाद्य, इंधन उत्पादनासाठी आणि इतर परिसंस्था आणि इतर मानवी कल्याणाच्या सेवेसाठी महत्वाचा आधार आहे. माती मधील असलेली जैवविविधता ही एकूण जगाच्या एक चतुर्थांश जैवविविधते एवढी आहे. त्यामुळे जमिनीच्या वरच्या जमिनीमधील जैवविविधतेकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. 2002 मध्ये इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉईल सायन्सेस (IUSS) ने 5 डिसेंबर हा 'जागतिक मृदा दिन' म्हणून साजरा करण्याचा प्रस्तावित करणारा ठराव मांडून मातीचे महत्त्व नैसर्गिक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक असून मानवी आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान निरंतर देत आहे. म्हणून हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरले. जागतिक मृदा दिन मोहिमेचा उद्देश लोकांना मातीशी जोडणे आणि आपल्या जीवनातील त्यांच्या महत्त्वपूर्ण महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करणे हा आहे. लोकांना मातीशी जोडण्याच्या अनेक मार्गांपैकी एक म्हणजे मातीचे आरोग्य पुनर्संचयित करणे आणि जतन करणे हा आहे. *मातीबद्दल काही महत्वाची माहिती*

आपल्या ग्रहाच्या एकूण जैवविविधतेच्या एक चतुर्थांश (२५%) पेक्षा जास्त जैवविविधता माती मध्ये आढळते.

९०% पर्यंत सजीव त्यांच्या जीवनचक्राचा महत्वाचा भाग मातीत राहतात किंवा घालवतात, तरीही आपल्याला या लपलेल्या विश्वातील फक्त १% माहिती आहे.

पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकवून ठेवण्यासाठी मातीतील जीव ३६५/२४/७ कार्य करतात.

मातीची जैवविविधता हा जमिनीच्या आरोग्याचा एक आवश्यक घटक आहे. निरोगी माती अधिक पौष्टिक आणि सुरक्षित अन्न तयार करते. आपल्याला ९५% अन्न मातीतून मिळते.

मातीतील जीव मातीत कार्बन साठवण्यास आणि ग्रीन हाऊस गॅसेस (GHG) उत्सर्जन कमी करण्यास मदत करतात.

मातीची जैवविविधता दूषित घटकांचे प्रमाण कमी करून मातीतील प्रदूषण कामी करण्यासाठी महत्वाचे योगदान देते.

माती फार मोठी महत्वाची फार्मसी आहे. तुम्हाला माहीत आहे का की, संक्रमणाशी लढा देण्यासाठी आम्ही जे अँटिबायोटिक्स घेतो ते बहुतेक सर्व मातीतील सूक्ष्म जीवांचा वापर करून बनवले जातात?

फक्त ३ इंच मातीमध्ये १३ कोटी पेक्षा सजीव असतात.

एक हेक्टर जमिनीत दोन गायींच्या वजनाएवढे जिवाणू असतात.

पृथ्वीवरील लोकांपेक्षा एक ग्रॅम निरोगी मातीत जास्त जीव आहेत.

गांडुळ दर २४ तासांनी मातीत स्वतःचे वजन पचवू शकतो. ग्रहाची ५०% माती दरवर्षी गांडुळांच्या आतड्यातून जाते.

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

29 Oct, 08:05


*TOP 5 गहू बियाणे*
🌾🌾🌾

https://www.instagram.com/reel/DBsyLmQRwWz/?igsh=MzRlODBiNWFlZA==

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

02 Oct, 12:06


*हवामान आधारित फळपीक विमा योजना*
आंबिया बहार 2024-25

*समाविष्ट पिके :-*
💠 आंबा
💠 मोसंबी
💠 केळी
💠 पपई
💠 द्राक्षे
💠 काजू
💠 संत्रा
💠 डाळिंब

*विमा भरण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात 👇*
📌 आधार कार्ड
📌 बँक पासबुक
📌 फळबाग नोंद असलेला ७/१२
📌 स्वयं घोषणापत्र

*विमा भरण्यासाठी शेवटची तारीख 🗓*

*🟥 मोसंबी, केळी & पपई* = ३१ ऑक्टोंबर २०२४

*🟥 संत्रा & काजू* = ३० नोव्हेंबर २०२४

*🟥 द्राक्षे* = १५ ऑक्टोंबर २०२४

*🟥 आंबा* = ३१ डिसेंबर २०२४

*🟥 डाळिंब* = १४ जानेवारी २०२५

अधिक माहितीसाठी & फॉर्म भरण्यासाठी आपल्या गावातील सीएससी सेंटर किंवा आपले सरकार केंद्र याठिकाणी संपर्क साधावा.
♦️♦️

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

02 Sep, 05:53


🔊🔊 अतिशय महत्त्वाचे

♦️ गेल्या 24 तासात जवळपास संपुर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे.
♦️ या पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे तरी शेतकरी बांधवांनी पीक विमा मिळण्यासाठी नुकसान झाल्याची तक्रार त्वरित करावी.
♦️ टोल फ्री क्रमांक 14447
♦️ CROP INSURANCE APP
@krushirashtra
♦️ मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाल्यास त्वरित प्रशासनास कळवावे.
♦️ स्वतःची, आपल्या कुटुंबाची आणि पशुधनाची योग्य काळजी घ्यावी.

KRUSHI RASHTRA
🌱🌱👳🏻‍♂👳🏻‍♂🌱🌱
🌊🌊🌊

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

27 Aug, 05:28


*मराठवाडा & नगर जिल्ह्यातील काही तालुक्यातील कृषी क्षेत्रासाठी आनंदाची बातमी*

27 जुलै रोजी नाथसागरात फक्त 4 टक्के पाणी साठा होता तो आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी तब्बल 55 टक्क्यांहून अधिक झाला आहे म्हणजे ह्या महीन्यात नाथसागर 50 टक्यांहून अधिक भरला...

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

27 Aug, 05:28


*ज्या शेतकरी बांधवांनी मागील 8 ते 10 दिवसापूर्वी नवीन केळी लागवड केली असेल त्यांनी केळी रोपांना खालील आळवणी करावी.*
@krushi_rashtra
🌱🌱👳🏻‍♂️🌱🌱

♦️Rootmax 50 ग्रॅम प्रति पंप
♦️ SoluSEAMIX 40 ग्रॅम प्रति पंप
♦️19-19-19 विद्राव्य खत 100 ग्रॅम प्रति पंप
वरील प्रमाण हे 20 लिटर पाण्यासाठी आहे.

श्री. सुदर्शन बाबासाहेब काकडे,
मुंगी पैठण

♦️

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

27 Aug, 05:28


शेतकरी साठी आनंदाची बातमी
100 टक्के अनुदानित बॅटरी पंप योजना पुन्हा सूरू झाली आहे
गेल्या अनेक दिवसापासून सर्वर लोड असल्यामुळे अनेक शेतकरी अर्ज बाकी होते महाराष्ट्र राज्य कृषी विभागाकडे अनेक पाठ पुरावा केल्यामुळे योजना पुन्हा सुरु झाली आहे
आता शेतकरी बांधवानी या योजेनेचा लाभ घ्यावा

*🛑बॅटरी संचलित फवारणी पंप करीता 31 ऑगस्ट २०२४ पर्यंत (मुदतवाढ).......... तसेच नवीन समाविष्ट केलेल्या **कापुस साठवणूक बॅग* * *करीता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत महाडीबीटी वर अर्ज करता येणार आहे तरी सर्व शेतकरी बंधूनी Mahadbt वर ऑनलाईन अर्ज सादर करावे*

योजनेची माहिती
अर्ज करण्यासाठी
संपर्क:- साई ग्राहक सेवा 8080444494

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

30 Jul, 05:48


*अद्रक Special*
🫚🫚🫚🫚

♦️ अद्रक पिकाचा अधिक आणि निरोगी फुटवा निघण्यासाठी
NUTRIPHOS एकरी 2 लिटर याप्रमाणे ठिबक मधून द्यावे.
@Krushi_Rashtra
🌱🌱👳🏻‍♂️👳🏻‍♂️🌱🌱
♦️♦️

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

30 Jul, 05:48


ताबडतोब करा कापूस पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापन.....!

बऱ्याच ठिकाणी झालेल्या पाऊसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात.
कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते. अशावेळी सिंचन दिल्यास अथवा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. सिंचन दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर ३६-४८ तासांत आकस्मिक मर ची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते.

*आकस्मिक मर व्यवस्थापन*

१. अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करवा.
२. वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.
३. *लवकरात लवकर २०० ग्रॅम युरिया+ १०० ग्रॅम पांढरा पोटॅश (००:००:५० खत ) + २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली याप्रमाणे आळवणी करावी.*
किंवा
*१ किलो १३:००:४५ + २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड + २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली आळवणी करावी.*

४. वरील प्रमाणे द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी.

वरील सर्व *उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे २४ ते ४८ तासाच्या आत कराव्यात जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल.*

*डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईत श्री.एम.बी.मांडगे*
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणी
*वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी*

अधिक माहितीसाठी संपर्क करा
*कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र*
*वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ*
*परभणी*
*०२४५२-२२९०००*

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

24 Jul, 10:03


*सावधान*
*सर्व शेतकरी बंधुंना आग्रहाची विनंती शेतातील बांधावर मोटारसायकल उभे केल्यानंतर आपले शेतातील काम आटोपुन किंवा काही वेळानंतर परत येताना गाडीला सिटवर जोराने दोन तीन थाप मारा. कारण गाडीच्या सिटखाली अथवा कुठे साप वगैरे असल्यास तो बाहेर निघेल.तसेच मोटारसायकल व्यवस्थित चेक करुनच हाताळा.अन्यथा अशा प्रकारची वेळ येऊ शकते*

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

22 Jul, 06:08


*कापुस पिकावरील रसशोषक किडीसाठी रामबाण उपाय*
🌱🌱💦🌱🌱

https://www.instagram.com/reel/C9tiKvCSrIK/?igsh=MzRlODBiNWFlZA==

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

22 Jul, 06:08


🫚🫚🫚🫚🫚🫚🫚

🌱 सध्याची परिस्थिती पाहता सर्व अद्रक उत्पादक शेतकरी बांधवांनी ठिबक मधून उच्च दर्जाचे ट्रायकोडर्मा सोडावे.
🌱👳🏻‍♂ कृषीराष्ट्र 👳🏻‍♂🌱
♦️♦️

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

12 Jul, 10:05


सोयाबीन पिकासाठी पहिली फवारणी

🌱 अनोलिक 15 मिली प्रति पंप
🌱 कॉन्टिस 40 मिली प्रति पंप
🌱 M - 45 40 ग्रॅम प्रति पंप
🌱 स्टिकर 10 मिली प्रति पंप

*°° श्री. सुदर्शन बाबासाहेब काकडे, मुंगी पैठण °°*
🌱🌱👨‍🌾👳🏻‍♂️🌱🌱

https://www.instagram.com/reel/C9UEXgkyVgZ/?igsh=MzRlODBiNWFlZA==

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

05 Jul, 07:02


नमस्कार मित्रांनो,
मी सुदर्शन बाबासाहेब काकडे
मुंगी-पैठण

आज आपण शेतीत कळत नकळत येणाऱ्या समस्येबद्दल बोलुयात.

सध्या सर्वच शेतकरी बांधवांची मूग, उडीद, कपाशी, सोयाबीन इत्यादी पिकावर पहिली फवारणी( कीड नियंत्रण) करायची लगबग चालू आहे.

अश्याच गडबडीत आपण अनेकदा तणनाशक फवारणी केलेला पंप कीटकनाशक फवारणी साठी वापरतो. आणि पिकाचे कळत नकळत नुकसान होते.

♦️ विशेष करून ज्या भागात ऊस शेती होते तिथे ऊसातील तणनाशक फवारणी केलेला पंप कपाशी किंवा इतर पिकात कीटकनाशक फवारणीसाठी वापरला जातो आणि यामुळे खूप नुकसान सहन करावे लागते.
♦️ प्रत्येक पिकातील तणनाशक वेगवेगळे असते त्यामूळे एका पिकात फवारणी केल्यावर पंप चांगला धुवूनच दुसऱ्या पिकात तणनाशक फवारणी साठी वापरावा.
♦️ ग्लायसेल किंवा राऊंडअप या तणनाशकाचा वापर उभ्या पिकात करू नये.
♦️ शक्य असल्यास तणनाशक आणि कीटकनाशक फवारणी साठी वेगवेगळे पंप वापरावे.
♦️ पिकात शिफारस केलेल्या तणनाशकाचाच वापर करावा.

♦️♦️

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

23 Jun, 04:27


रानडुक्कराचे पर्यावरणस्नेही व्यवस्थापन

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

21 Jun, 04:35


ज्या शेतकरी बांधवांना, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, युवा कृषी उद्योजकांना या अभियानात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा.
🐝🍯🐝🍯

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

02 Jun, 02:53


 एक एकर जमिनीवर नांगरणी करून दोन पिके घेण्यासाठी १२ ते १५ लिटर डिझेल जाळावे

लागते ते न करता पिकांची मुळे (लिग्नीन) जागेवरच कुजवल्यामुळे मातीतील सेंद्रिय कर्बाची टक्केवारी वाढून माती जास्त मऊ व सुपीक बनते. यामुळे मातीत सकारात्मक प्रभावाची साखळी सुरू होते.
शून्य मशागतीमुळे शेतीमधील मजुरांचे कष्ट (विशेषत: महिला) ५० टक्केने कमी होतात, उत्पादनावरील सुमारे ४० टक्के खर्च कमी होतो आणि ५० टक्के ते १०० टक्के उत्पादनात वाढ होते. यामुळे शेतकरीवर्गात आत्मविश्वास आणि आनंद त्वरित परत येईल.
शून्य मशागतीमुळे दोन पिकांमधील मशागतीसाठी लागणारा मौल्यवान वेळ कमी होतो. यामुळे दीर्घ कालवधीसाठी जास्त जमिनी हिरव्या पिकांनी झाकून ठेवण्यास प्रोत्साहन मिळेल.
सगुणा बाग येथील चमूने शून्य मशागतीसाठी एक साधी-सोपी पद्धत विकसित केलेली आहे. या पद्धतीस सगुणा राईस टेक्निक म्हणतात. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने त्यांच्या पीपीपी-आय.ए.डी. कार्यक्रमात या तंत्राचा समावेश केलेला आहे. हे तंत्र स्वीकारण्यास व वापरण्यास शेतकरी सकारात्मक आहेत.
जास्तीत जास्त जमीन हिरव्या पिकांखाली आणि झाडांखाली (फळझाडे) झाकण्यास कितीही कठीण किंवा सोपे वाटले तरी आपल्यातील प्रत्येकाने आता आपले एक पाऊल त्या दिशेने ‘आत्ताच’ टाकायला हवे! जागृती बद्दलचे फलक, त्याबद्दलच्या मोठ मोठय़ा योजना किंवा त्याबद्दलच्या घोषणा किंवा वृक्ष लागवड मोहिमा यामधून आत्तापर्यंत आपण काय साधले ते आपल्या समोर आहेच.
या सर्व गोष्टी कृतीत आणणारी व्यक्ती म्हणजे शेतकरी; जो या कमी सर्वात महत्त्वाचे काम करतो. मोठय़ा प्रमाणात सक्षम तरुण मंडळी याकडे आकृष्ट होण्यासाठी या कामाला प्रतिष्ठा मिळणे आवश्यक आहे. शक्ती, बुद्धी व चिवटपणा असलेल्या तरुणांना या कामी आत्मविश्वास वाढायला हवा असेल तर समाजाने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायला हवे. आपल्या कुटुंबासाठी कायमस्वरूपी अन्नाचा स्रेत निर्माण करणे (पुढील काळात पैसे फेकून अन्न मिळेल याची खात्री नाही) व पृथ्वीवरील कर्बाचे स्थिरीकरण करण्यासाठी लवकरात लवकर एक शेतकरी मित्र शोधावा.
🙏🙏

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

02 Jun, 02:53


🙏🙏
*वाचा आणि विचार करा*
भर दुपारी १२ वाजता मोकळ्या परिसरात या आणि पडीक जमीन किंवा रस्ते किंवा घराच्या भिंतीचा सूर्यप्रकाश पडलेला पृष्ठभाग की ज्याच्यावर वनस्पती/ गवत वाढलेले नाही अशा पृष्ठभागावर आपला हाताचा पंजा/ तळवा ठेवा. गरमागरम लागले का? आणि नंतर जवळच असेलल्या एखाद्या झाड/ गवत यांची हिरवी पाने मुठीमध्ये घट्ट धरा. आता सांगा आपल्याला या दोन्ही स्पर्शामध्ये काय फरक जाणवतो? एकच सूर्य दोन्ही पृष्ठभागावर एकाच वेळी तळपतो आहे, परंतु दोन्ही स्पर्शात मोठ्ठा फरक आहे ना?
उजाड पृष्ठभाग हे उष्णता शोषून घेतात, परावर्तित करतात आणि उत्सर्जित करतात. या उलट हिरवी पाने/ गवत हे उष्णता आत घेत असताना ‘उष्माग्राही प्रतिक्रिया’ (प्रकाश संश्लेषण) अमलात आणतात. याचा परिणाम म्हणून तेवढी जागा थंड होते, परंतु फक्त एवढीच क्रिया घडत नाही, तर तेथे अन्नाची निर्मिती होऊन ऑक्सिजन बाहेर उत्सर्जित केला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे झाडं/ गवत वातावरणात निसटलेला सुटा/ वायुरूप कार्बन डाय ऑक्साईड (Co2) खाऊन टाकतात आणि तो पाने, खोड, बिया, मुळे इ. च्या स्वरूपात दीर्घ काळापर्यंत स्थिर करतात. यालाच ‘कर्बाचे स्थिरीकरण’ असे म्हणतात.

जमिनी पडीक बनण्याचे प्रमाण झपाटय़ाने वाढते आहे. मोठय़ा प्रमाणात शेतकरी शेती व्यवसाय सोडून देत आहेत. वणव्याने काळ्या झालेल्या टेकडय़ा व जंगली इलाके, सगळीकडे तयार होत असलेले रंगीत गृहनिर्माण संकुल; प्रगतीसाठीचे महामार्ग आणि असे बरेच काही विनातक्रार याबाबतच्या अडचणी वाढवत आहेत. हे सर्व समजून घेऊन त्यावर काही योग्य कारवाई होण्यासाठी आपण जेवढा विलंब करू त्याच्या कितीतरी पटीत जास्त वेळ हवामान बदलाच्या दुष्परिणामांना दुरुस्त करायला जाणार आहे. हवेत निसटलेला हा कर्ब मातीत लवकरात लवकर स्थिर करण्याच्या या कामी आता आपण प्रत्येकानेच काहीतरी हातभार लावला पाहिजे.
अशाप्रकारे जेव्हा माती/ जमीन उष्णता शोषून घेते आणि परावर्तित करते तेव्हा ती उष्णता आपल्याबरोबर मातीतील ओलावासुद्धा घेऊन जाते, त्यामुळे आसपासच्या वातावरणात अधिक गुंतागुंत उद्भवते. अलीकडील येणारा अनियमित पाऊस आणि उद्भवणारी वादळे ही त्याची एक प्रमुख कारणे असू शकतात की जी मनुष्य जातीच्या दृश्य व अदृश्य नुकसानीस कारणीभूत ठरतात.
अन्न उत्पादन प्रक्रियेमध्ये (शेती) जमिनीतील सेंद्रिय कर्बाची टक्केवारी सर्वात महत्त्वाची आहे. या प्रक्रियेत हिरव्या वनस्पती आणि मातीतील सूक्ष्मजीव अत्यावश्यक आहेत. यामुळे प्रकाश संश्लेषण होऊन हवेतील कर्ब- पेशीजालात साठणे व त्याद्वारे सेंद्रिय माती तयार होणे अशी एक नैसर्गिक जटिल प्रक्रिया घडून हवेचे मातीमध्ये रूपांतर होणे चालू करता येते. खरं तर जमिनीची सुपीकता आणि कर्बाचे स्थिरीकरण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कोणत्याही प्रकारची शेती सक्षमपणे करण्यासाठी, मातीतील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण किमान १.० टक्के असावे. २.५ टक्के आणि अधिक असेल तर पिके चांगलीच फोफावतात. हीच टक्केवारी थंड प्रदेशातील अबाधित जंगले आणि गवताळ प्रदेशात ४ टक्केपर्यंत असू शकते. भारतीय कृषीक्षेत्रात मात्र हे प्रमाण ०.५ टक्के एवढे कमी झाले आहे.
शून्य मशागत तंत्र, पीक फेरपालट पद्धत आणि रसायनांचा कमीत कमी वापर या सर्वाचा एकत्रित वापर हे शेती करू इच्छिणा-या सर्वाना उपयुक्त आणि स्वीकारार्ह मॉडेल असू शकेल. विकसनशील आणि प्रगतशील अशी ही पद्धत या सर्व प्रश्नांवर शाश्वत उपाय ठरू शकते. आपण प्रत्येक जण ज्यांना अन्न आणि स्थिर हवामान आवश्यक वाटते त्या सर्वानी हवेत मोकळा असणारा कार्बन डाय-ऑक्साईड पकडून जमिनीत स्थिर कसा करता येईल याबाबत सतत विचार करणे आणि त्यावर कृती करणे आवश्यक आहे.
अशा या शून्य मशागत लागवड तंत्राच्या अनेक सकारात्मक बाजू आहेत त्यापैकी काही :
जमिनीची खोल नांगरणी केली नाही, तर गांडूळांच्या जीवनचक्राला अडथळा येत नाही. शिवाय जमिनीत राहिलेल्या पिकांच्या अवशेषांपासून त्यांना खाद्य मिळते व ते आनंदी होतात. हे जेव्हा भारतासारख्या नैसर्गिकरित्या उबदार देशांमध्ये घडते आणि पावसाळ्यानंतर जेव्हा हवेतील तापमान वाढायला लागते तेव्हा गांडुळे निद्रितावस्थेत जाण्यासाठी जमिनीत खोलवर जातात. हे ४ ते १० फूट खोल असू शकते. अशा खोल नांगरटीसाठी डिझेलची आवश्यकता पडत नाही आणि पावसाचे पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाण्याऐवजी ते पाणी जमिनीत खोलवर मुरते. याउलट नांगरणीमुळे जमिनीच्या १० ते १२ इंच वरच्या थरातली माती मोकळी होते, परंतु त्याखालील जमीन टणक/ कठीण बनते यामुळे पाणी खोलवर न मुरता टणक पृष्ठभागावरून वाहून जाते आणि नकारात्मक परिणामांची साखळी सुरू होते. अगदी असेच फायदे जेव्हा जमिनीच्या वरच्या थरात पिके व वनस्पतींची मुळे मरतात, वाळतात आणि कुजतात व पोकळ्या तयार होतात तेव्हा दिसून येतात. अशी परिस्थिती लाखो एकर जमिनीतील भूजलपातळीत पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यास अधिक उपयुक्त ठरेल.

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

24 May, 14:30


Dr. PDKV,AKOLA soybean varieties.pdf

🌱👳‍♂ कृषीराष्ट्र 👳‍♂🌱

23 May, 03:25


*#खरिप_हंगाम_२०२४ साठी #बियाणे_अनुदान_योजना*

(पिक प्रात्यक्षिक आणि प्रमाणित बियाणे वितरण घटकांसाठी)

खरीप हंगामासाठी लागणारे बी बियाणांसाठी तात्काळ *#महाडिबीटी* पोर्टल वर अर्ज करा.

*अर्ज दाखल करण्याची अंतिम #तारीख २४ मे २०२४*

△ *समाविष्ट बियाणे* △

*ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन, भुईमूग, भात, उडीद, तूर, मूग, मका*

*अर्ज करण्यासाठी लिंक: www.mahadbt.maharashtra.gov.in*

#खरीप #बियाणे #Agriculture #agrigoi #Farmers #krishi#शेतकरी #कृषीविभाग #महाराष्ट्रशासन

1,608

subscribers

1,036

photos

128

videos