Vitthal Kangane Sir @vitthalkanganeparbhani Channel on Telegram

Vitthal Kangane Sir

@vitthalkanganeparbhani


Vitthal Kangane Sir (English)

Welcome to the Vitthal Kangane Sir Telegram channel! This channel is dedicated to providing valuable insights and guidance from the renowned educator, Vitthal Kangane Sir. With years of experience and expertise in the field of education, Vitthal Kangane Sir is committed to helping students reach their full potential and achieve academic success. Whether you are a student looking for study tips, exam strategies, or career guidance, this channel is the perfect resource for you. Stay updated on the latest educational trends, motivational quotes, and informative videos shared by Vitthal Kangane Sir himself. Join the community of students and learners who are inspired and motivated by the wisdom and knowledge shared on this channel. Don't miss out on the opportunity to learn from one of the best educators in the industry. Subscribe to Vitthal Kangane Sir Telegram channel today and start your journey towards academic excellence!

Vitthal Kangane Sir

14 Nov, 03:24


चाहे लाख तुफान आयें...

   आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा पाय घट्ट रुतुन उभं रहायचं, कारण प्रश्न वादळाचा नसतो. ते जेवढ्या वेगाने येतं, तेवढ्याच वेगाने निघुन जातं. आपण किती सावरलो आहे, हे फक्त महत्वाचं असतं.

शुभ सकाळ ❤️

Vitthal Kangane Sir

13 Nov, 08:04


🔰 विभ्याजतेच्या कसोट्या :- 👇

१ ची कसोटी
१ या संख्येने कोणत्याही संख्येस निःशेष भाग जातो. आणि  भागाकार तीच संख्या असते

२ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ०,२,४,६,८ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस २ ने निःशेष भाग जातो.


३ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज केल्यास येणाऱ्या बेरजेस जर ३ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ३ ने निःशेष भाग जातो.

४ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या २ अंकी संख्येस जर ४ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी ० येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो.

५ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० किंवा ५ पैकी एक अंक असेल तर त्या संख्येस ५ ने निःशेष भाग जातो

६ ची कसोटी
ज्या संख्येस २ व ३ या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ६ ने निःशेष भाग जातो

७ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एखादा अंक जर क्रमवार ६ च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.

दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाला २ ने गुणून उरलेल्या संख्येतून वजा केल्यास येणारी वजाबाकी जर ० किंवा ७ च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.

८ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्येस जर ८ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ८ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक,दशक व शतक स्थानी ० येत असेल तर त्या संख्येस ८ ने निःशेष भाग जातो.

९ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून येणाऱ्या बेरजेस जर ९ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ९ ने निःशेष भाग जातो.

१० ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० असते  त्या सर्व संख्येस १० ने निःशेष भाग जातो.

११ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील समस्थानी आणि विषमस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज करून त्या बेरजेतील फरक जर ० किंवा ११च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ११ ने निःशेष भाग जातो.

१२ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ४ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १२ ने निःशेष भाग जातो.

१४ ची कसोटी
ज्या संख्येला ७ आणि २ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १४ ने निःशेष भाग जातो.

१५ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १५ ने निःशेष भाग जातो.

१८ ची कसोटी
ज्या संख्येला २ आणि ९ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १८ ने निःशेष भाग जातो.

२० ची कसोटी
ज्या संख्येला ४ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २० ने निःशेष भाग जातो.

२१ ची कसोटी
ज्या संख्येला ७ आणि ३ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २१ ने निःशेष भाग जातो.

२२ ची कसोटी
ज्या संख्येला २ आणि ११ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २२ ने निःशेष भाग जातो.


२४ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ८ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो.

३० ची कसोटी :-
ज्या संख्येला ३ आणि १० या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो.

उदाहरणे
खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने निःशेष भाग जाईल
a. 3256     b. 46732     c. 98673     d. 53216
उत्तर :-
a. 3256, 3+2+5+6=16
b. 46732, 4+6+7+3+2=22
c. 98673, 9+8+6+7+3=33
33 या संख्येला ३ ने निःशेष भाग जातो म्हणून पर्याय c याचे उत्तर असेल.
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Vitthal Kangane Sir

12 Nov, 10:07


ऑनलाइन बॅच सरळसेवा टाइम टेबल ,सर्वांनी ध्यानात ठेवा

Vitthal Kangane Sir

12 Nov, 07:10


💥जगातील पहिले लाकडी सॅटॅलाइट ज्यांचे नाव लिग्नोसॅट असे आहे.

Vitthal Kangane Sir

12 Nov, 00:42


मोठे निर्णय घेताना भीती वाटणे साहजिकच आहे पण केवळ भीतीमुळे निर्णय न घेणे मात्र चुकीचे आहे.



Good morning,...

Vitthal Kangane Sir

11 Nov, 13:13


आज पासून gk class regular live youtube LA असेल

Vitthal Kangane Sir

11 Nov, 06:56


भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांना शपथ देण्यात आली

➡️काही महत्त्वाची माहिती सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय
◾️ सर्वोच्च न्यायालय प्रमाणे प्रत्येक उच्च न्यायालय सुद्धा अभिलेख न्यायालय आहे
◾️सर्वोच्च न्यायालय - कलम 124 ते 147
◾️उच्च न्यायालय - कलम 214 ते कलम 231
◾️सर्वोच्च न्यायालय संख्या - 34 (1+33)
◾️उच्च न्यायालय संख्या - राष्ट्रपती ठरवतील तेवढे
◾️7 घटनादुरुस्ती 1956 नुसार दोन किंवा अधिक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी संयुक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार संसदेला दिला गेला
◾️भारतात 1 सुप्रीमकोर्ट आहे

◾️भारतात एकूण 25 उच्च न्यायालये आहेत
◾️मुंबई उच्च न्यायालय स्थपणा - 1862
◾️25 वे उच्च न्यायालय - अमरावती (आंध्रप्रदेश)-2019

🌫मुंबई उच्च न्यायालय खडपीठे
नागपूर खडपीठ
पणजी खडपीठ
औरंगाबाद खडपीठ
💥💥💥💥💥💥💥💥💥

Vitthal Kangane Sir

10 Nov, 14:06


TET पेपर चालू आहे जॉईन व्हा

Vitthal Kangane Sir

10 Nov, 10:18


उद्यापासून सर्व क्लास सुरळीत चालू होतील ऑनलाईन ऑफलाइन आणि आता लगेच टीईटी चा पेपर ऑनलाईन सोडून घेत आहे आपल्या यूट्यूब चैनल वर

Vitthal Kangane Sir

10 Nov, 08:08


Document from Sachin Kangane

Vitthal Kangane Sir

10 Nov, 08:07


TET पेपर 1

Vitthal Kangane Sir

10 Nov, 01:43


💥बेंगळुरूचे पहिले डिजिटल लोकसंख्या घड्याळ💥

उद्घाटन: सामाजिक आणि आर्थिक बदल संस्थेत 8 नोव्हेंबर

रिअल-टाइम अपडेट्स: कर्नाटकची लोकसंख्या दर 1 मिनिट 10 सेकंदात, भारताची प्रत्येक 2 सेकंदात.

उद्देशः लोकसंख्या वाढीबद्दल जागरूकता वाढवणे आणि संशोधनासाठी डेटा प्रदान करणे.

तंत्रज्ञान: अचूक टाइमकीपिंगसाठी उपग्रह-कनेक्ट केलेले.

संशोधन समर्थन: सखोल लोकसंख्याशास्त्रीय अभ्यासासाठी जनगणना डेटा संशोधन कार्य केंद्र स्थापन केले.


💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Vitthal Kangane Sir

09 Nov, 13:32


https://www.youtube.com/live/3Wih0FuaTyc?si=y6VywxsUcrdWhvea

Vitthal Kangane Sir

09 Nov, 11:56


Youtube

Vitthal Kangane Sir

09 Nov, 11:56


Gk class chalu ahe

Vitthal Kangane Sir

09 Nov, 11:47


विधानसभानिवडणूक2024

बुधवार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत.

या छायाचित्र ओळखपत्रांपैकी एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे.

#MaharahstraElection2024

Vitthal Kangane Sir

09 Nov, 06:31


https://www.youtube.com/live/-Z-Ex6gZ9-I?si=IbHvkA5l_uzoeDbY

Vitthal Kangane Sir

08 Nov, 14:02


रात्री ९ वाजता पाण्याची टाकी नळ प्रकरण घेत आहे सर्वांनी जॉईन व्हा

Vitthal Kangane Sir

08 Nov, 08:17


NTPC/ RRB/SSC-GD/TET
BMC/RPF/मुंबई पोलीस/अंगणवाडी पर्यवेक्षिका... यासाठी E-BOOK किंवा NOTES हवी असेल....
तर 8483815942 या नंबर वरती कॉल करा..... वरील कोणत्याच एक्झाम चेGS /GK चे प्रश्न जाणार नाहीत याची पूर्ण दक्षता घेऊन नोट्स आणि ई -बुक बनवला आहे...


प्रमुख मार्गदर्शन:-विठ्ठल कांगणे सर
संकलन:-किरण अंबूरे सर
8483815942

Vitthal Kangane Sir

08 Nov, 07:02


BMC/GS तसेच स्थानिक स्वराज्य संस्था अत्यंत महत्त्वाची.... संपूर्ण कायदे यामध्ये दिली गेली आहे

Vitthal Kangane Sir

08 Nov, 07:02


MPSC GS Paper - नागरी स्थानिक स्वराज्य संस्था.pdf

Vitthal Kangane Sir

07 Nov, 14:30


https://www.youtube.com/live/feWN-Ur2HyQ?si=YTX-tXssBVw2NWQh

Vitthal Kangane Sir

07 Nov, 14:27


Youtube ल
जास्त वेळ आज tet व इतर परीक्षा विषय live class आहे सर्वांनी sharp 9 ल जॉईन व्हा

Vitthal Kangane Sir

07 Nov, 07:51


धनंजय कीर लिखित डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र मध्ये विद्यार्थी म्हणून असलेली बाबासाहेबांची दिनचर्या जरी पहिली तरी कळेल आज विदयार्थी दिवस का साजरा करतो

" भीमासाठी अभ्यासाकरिता स्वतंत्र खोली नव्हती. मुलांकरिता घरी शिक्षक ठेवणे सुभेदारांना शक्य नव्हते. डबक चाळीतील त्यांची खोली धुरकट असून घरगुती वस्तूंनी नि भांड्याकुंड्यांनी भरलेली असे. तिच्या एका कोपऱ्यात माळ्यावर जळाऊ लाकडांचा साठा होता. दुसऱ्या कोपऱ्यात चूल होती. विश्रांती, झोपणे, जेवण, अभ्यास यांसाठी ती एकच खोली. अशा गर्दीतही मुलांच्या अभ्यासाची सोय रामजींनी एक युक्ती काढून साधली. रात्री मुलगा लवकर गोधडीवर झोपी जाई. त्याच्या उशाजवळ भिंतीला टेकून घिरट कोंबलेला असे. पायाशी बकरी धापा टाकीत असायची. दोन वाजेपर्यंत स्वतः जागून रामजी मुलाला अभ्यासासाठी दोन वाजता उठवीत असत. मुलगा अभ्यासास बसला म्हणजे ते झोपी जात. तेलाच्या मिणमिणीत दिव्याशेजारी ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळता वळता भीम अभ्यास करून

पहाटे पाच वाजता पुन्हा झोपत असे. सकाळी उठे. स्नान

मी शाळेत जाईन.

Vitthal Kangane Sir

07 Nov, 05:00


♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी 4110 उमेदवार रिंगणात..

Vitthal Kangane Sir

06 Nov, 17:05


संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून डेमोक्रॅटिक पक्षाच्या  कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत झाली.

या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला असून ते 47वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.

Vitthal Kangane Sir

05 Nov, 16:20


वाटा सापडत जातील,आपण शोधत जायचं,
माणसं बदलत जातील, आपण स्विकारत जायचं,
परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायच,
येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं,
विश्वास तोडून अनेकजण जातील, आपण सावरत जायचं,
प्रसंग परिक्षा घेत जाईल, आपण क्षमता दाखवत जायचं..

💥 Good night  💥

Vitthal Kangane Sir

05 Nov, 08:58


♦️महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक संजय वर्मा..

Vitthal Kangane Sir

05 Nov, 08:57


नवी दिल्ली येथे पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद :

💥पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद (ABS) 5-6 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.
सांस्कृतिक मंत्रालय आणि इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन यांनी आयोजित केलेल्या या समिटमध्ये 'आशिया मजबूत करण्यामध्ये बुद्ध धम्माची भूमिका' या थीमवर लक्ष केंद्रित केले आहे.

भारताचे माननीय राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
💥शिखर परिषदेचा उद्देश :

💫संघाचे नेते, विद्वान, तज्ञ आणि विविध बौद्ध परंपरेतील अभ्यासकांना एकत्र आणण्याचे या शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे.
💫ते संवादाला प्रोत्साहन देण्याचा आणि समजूतदारपणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करते.
💫हा कार्यक्रम संपूर्ण आशियातील बौद्ध समुदायासमोरील समकालीन आव्हानांना सामोरे जाईल.
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Vitthal Kangane Sir

05 Nov, 08:03


T.A भरती तामिळनाडू 6 नोव्हेंबर

Vitthal Kangane Sir

05 Nov, 08:03


T.A भरती कोल्हापूर
11 व 12 नोव्हेंबर

Vitthal Kangane Sir

05 Nov, 06:14


♦️ राज्यात कोणत्या साली किती टक्के मतदान?

Vitthal Kangane Sir

05 Nov, 03:39


𝑻𝒉𝒆 𝑮𝑶𝑨𝑻. 𝑻𝒉𝒆 𝑳𝒆𝒈𝒆𝒏𝒅. 𝑻𝒉𝒆 𝑲𝒊𝒏𝒈. 🙇👑

His skills, 𝘂𝗻𝗿𝗶𝘃𝗮𝗹𝗲𝗱. 🙌
His dedication, 𝘂𝗻𝗺𝗮𝘁𝗰𝗵𝗲𝗱. 💪
His greatness, 𝘂𝗻𝗱𝗲𝗻𝗶𝗮𝗯𝗹𝗲. 🏆
His legacy, 𝗶𝗻𝗳𝗶𝗻𝗶𝘁𝗲. ♾️

𝗛𝗮𝗽𝗽𝘆1️⃣8️⃣𝘅2️⃣ = 3️⃣6️⃣𝘁𝗵 𝗕𝗶𝗿𝘁𝗵𝗱𝗮𝘆 𝗩𝗶𝗿𝗮𝘁! ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

Vitthal Kangane Sir

04 Nov, 12:30


💥💥पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आल्यानंतर पोलीस महासंचालक पदाचा तात्पुरता कारभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Vitthal Kangane Sir

25 Oct, 18:12


राज्यात पशुगनणेला सुरुवात

▪️राज्यात 21 व्या पशुगनणेला सुरुवात झाली आहे.
▪️ही पशुगणना प्रथमच ऑनलाइन अर्थात ॲपद्वारे करण्यात येणार आहे.
▪️ यामध्ये 16 पशुधन जाती व कुक्कुटादी पक्ष्यांची प्रजातीनिहाय नोंदी घेण्यात येणार आहेत.
▪️भारताची पहिली पशुगणना डिसेंबर 1919-एप्रिल 1920 मध्ये झाली होती.
▪️दर पाच वर्षांनी एकदा आयोजित केली जाते.
▪️कृषी मंत्रालय,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभाग,भारत सरकार यांच्याद्वारे पशुधन गणना केली जाते.
▪️आतापर्यंत 20 पशुगणना करण्यात आल्या आहेत.
▪️2019 मध्ये झालेल्या 20 व्या गणनेनुसार,भारतातील एकूण पशुधन संख्या 535.78 दशलक्ष आहे.
▪️एकूण गोवंश लोकसंख्या 302.79 दशलक्ष होती.
▪️पशुधना मध्ये गायी, म्हशी,शेळ्या, मेंढ्या,डुकरे,गाढवे,घोडे,शिंगरे,खेचरे व उंट यांची गणना केली जाणार आहे.
▪️तर कुक्कुट व कुक्कुटादी पक्ष्यांमध्ये कोंबड्या,बदके,टर्की,क्चेल,शहामृग,गिनी,इमू,हंस तसेच तसेच पाळीव कुत्रे,हत्ती व ससे आणि भटक्या गायी व कुत्रे यांचीदेखील गणना करण्यात येणार आहे.
▪️पशुधनाच्या विकासासाठी 2014-15 मध्ये   राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) सुरू


Vitthal Kangane Sir

25 Oct, 18:11


🔰ध्येयापेक्षा सुंदर काय असेल तर त्या ध्येयापर्यंत प्रवास करताना जगलेले क्षण...

  ❤️❤️  शुभ रात्री   ❤️❤️

Vitthal Kangane Sir

25 Oct, 15:43


https://www.youtube.com/live/uo3IFRlE3wQ?si=WnVcSRTK8v19uakh

Vitthal Kangane Sir

24 Oct, 17:56


♦️ ब्रिक शिखर परिषद 2024 कझान ( रशिया ) येथे आयोजित केली आहे.

👉 हि शिखर परिषद 16 वी वार्षिक ब्रिक्स शिखर परिषद आहे,

👉 ब्रिक्स शिखर परिषद दिनांक 22 ते 24 ऑक्टोबर 2024 या कालावधीत रशियातील कझान येथे होत आहे. 

👉इजिप्त , इथिओपिया , इराण आणि संयुक्त अरब अमिराती यांचा सदस्य म्हणून समावेश करणारी ही पहिली BRICS परिषद आहे.

Vitthal Kangane Sir

24 Oct, 17:55


🛑 RRB REVISED CALENDAR

📅 RRB JE CBT-I EXAM DATE
👇👇
13 TO 17 DECEMBER 2024

Vitthal Kangane Sir

24 Oct, 16:45


https://www.youtube.com/live/RBpnnkznmVg?si=nuhdRVcZ7FC9uBja

Vitthal Kangane Sir

24 Oct, 14:55


https://www.youtube.com/live/Wb7ALpx7RSo?si=ouObbFwArpImMOHM

Vitthal Kangane Sir

24 Oct, 06:39


❇️ आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स प्रश्न & उत्तरे

प्रश्न.1) जगातील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोण ठरली आहे ?

उत्तर - श्रीजा अकुला

प्रश्न.2) 2026 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे ?

उत्तर - हॉकी

प्रश्न.3) नुकतेच चर्चेत असलेले दाना(उदारता) हे चक्री वादळ कोणत्या दोन राज्यांना धडकणार आहे ?

उत्तर - पश्चिम बंगाल आणि ओडीसा

प्रश्न.4) कोणत्या देशाने हवेतून जमिनीवर मारा करणारे इझडेलीये 305 हे क्षेपणास्त्र विकसित केले ?

उत्तर - रशिया

प्रश्न.5) औषध नियामक प्राधिकरणांच्या (ICDRA) 19व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले ?

उत्तर - नवी दिल्ली

प्रश्न.6) भारतीय तटरक्षक दलाचे 26 वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला ?

उत्तर - परमेश शिवमणी

प्रश्न.7) नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ?

उत्तर - 21 ऑक्टोबर 2024

प्रश्न.8) नुकतेच भारत आणि कोणत्या देशा दरम्यानचा सीमावाद संपून "गस्त करार" ला मंजुरी देण्यात आली आहे ?

उत्तर - चीन

Vitthal Kangane Sir

24 Oct, 06:36


♦️ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा - 2026

👉आवृत्ती - 23 वी

👉 ठिकाण - ग्लासगो ( स्कॉटलंड ) येथे होणार

👉 बर्मिंघम ( इंग्लंड ) येथे 2022 ची राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित केली होती.

👉 हि स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते.

👉 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात - 1930 (हॅमिल्टन,कॅनडा)

👉भारातचा सहभाग - 1934 (लंडन,इंग्लड)

👉भारतात नवी दिल्ली येथे 2010 रोजी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती.

👉भारतासाठी पहिले पदक जिंकणारा खेळाडू - राशिद अनवर ( 74 किलो वजनी गट फ्रि स्टाईल कुस्तीमध्ये )

👉भारतासाठी पहिल्या पदक जिंकणाऱ्या महिला खेळाडू - अमी घिया आणि कंवल सिंह (बॅडमिंटन 1978 - 🥉कास्यंपदक)

👉 2026 ग्लासगो संयोजक समितीने हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट आणि नेमबाजी या महत्त्वाच्या खेळांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

Vitthal Kangane Sir

23 Oct, 18:45


Gk प्रश्न

Vitthal Kangane Sir

23 Oct, 18:44


NTPC पेपर स्पष्टीकरण दिले आहे सर्वांनी पहा

Vitthal Kangane Sir

23 Oct, 18:44


Document from Vitthal Kangane

Vitthal Kangane Sir

23 Oct, 18:06


🔴प्रयत्न करणे सोडू नका
तुम्ही आधीच खूप काही सोसलय
आता वेळ आली आहे ती म्हणजे
बक्षीस मिळवण्याची

      💥💥 शुभ रात्री   💥💥

Vitthal Kangane Sir

23 Oct, 17:58


परिक्षाभिमुख महत्वाचे निर्देशांक :

◾️हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 : 7 वा क्रमांक
◾️ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2024 : 29 वा क्रमांक
◾️मानव विकास निर्देशांक (2023-2024) : 134 वा क्रमांक
◾️ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 : 111 वा क्रमांक
◾️ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2023 : 126 वा क्रमांक
◾️लैंगिक असमानता निर्देशांक 2022 (GII) : 108 (193 पैकी)
◾️ग्लोबल पीस इंडेक्स 2024 : 116 वा क्रमांक
◾️जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023 : 13 वा क्रमांक
◾️हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2024 :  82 वा क्रमांक
◾️जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक : 40 वा क्रमांक
◾️आंतरराष्ट्रीय आयपी निर्देशांक : 42 वा क्रमांक
◾️लोकशाही निर्देशांक 2023 : 41 वा क्रमांक
◾️मिलिटरी स्ट्रेंथ रँकिंग 2024 : 4 था क्रमांक
◾️WEF चा ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स : 129 वा क्रमांक
◾️जागतिक सायबर क्राइम इंडेक्स :10 वा क्रमांक
◾️जागतिक वायु गुणवत्ता अहवाल 2024 : 3 (सर्वात प्रदूषित तिसरा देश)
◾️Corruption Perceptions Index 2023 : 93 वा क्रमांक
◾️ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2023 : 63 वा क्रमांक
◾️Artificial Intelligence Preparedness Index 2024 : 72 वा क्रमांक
◾️Sustainable Development Report 2024 : 109 वा क्रमांक
◾️भारतात थेट परकीय गुंतवणुक 2023 : 15 वा क्रमांक
◾️हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 : 3 रा क्रमांक (67 युनिकॉर्न स्टार्टअप्स)
◾️World Happiness Index 2024 : 126 वा क्रमांक
◾️लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 : 38 वा क्रमांक
◾️ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 :  40 वा क्रमांक
◾️जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2024 : 159 वा क्रमांक

Vitthal Kangane Sir

23 Oct, 03:52


2026 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत हॉकी खेळाचा समावेश नसणार...

Vitthal Kangane Sir

22 Oct, 04:04


गोव्याच्या मलायका वाझ ला मिळाला 'ग्रीन ऑस्कर' पुरस्कार

◾️ब्रिस्टलमध्ये हा पुरस्कार सोहळा झाला
◾️पुरस्काराचे नाव : वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार
◾️याला आंतरराष्ट्रीय वन्यजीव माहितीपट आणि टीव्ही उद्योगाचा ‘ग्रीन ऑस्कर’ म्हणून संबोधले जाते.
◾️मलायकाला तिच्या 'द सॅक्रिफाइस झोन' नावाच्या माहितीपटासाठी मिळाला.
◾️निसर्ग संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना मिळणारा हा एक आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
◾️ऑन-स्क्रीन टॅलेंट श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले.
◾️मलाइका वाझ ही ‘नॅशनल जिओग्राफिक’ पुरस्कृत संशोधिका आहे.
◾️तिला गोवा राज्य युवा पुरस्कार
◾️राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे.

Vitthal Kangane Sir

21 Oct, 16:11


रेल्वे भरती NTPC
रेल्वे प्रश्न PYQ

Vitthal Kangane Sir

21 Oct, 16:10


SenseBoard (7).pdf

Vitthal Kangane Sir

21 Oct, 15:29


https://www.youtube.com/live/ClTMf1VP9-0?si=zo_bP3nrTfdXg4DR

Vitthal Kangane Sir

21 Oct, 11:59


Aaj cha class pdf

Vitthal Kangane Sir

21 Oct, 11:59


SenseBoard.pdf

Vitthal Kangane Sir

21 Oct, 09:39


🔰जम्मू आणि काश्मीर मंत्रिमंडळाने राज्याचा दर्जा पुनर्स्थापनेचा ठराव मंजूर केला.

🔹मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत, CM ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारने जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याची केंद्र सरकारला विनंती करणारा ठराव मंजूर केला.

🔸नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 42 जागा जिंकल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सने तयार केलेला ठराव अब्दुल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना सादर करणार आहेत.

🔹मुख्यमंत्री: ओमर अब्दुल्ला
🔸उपमुख्यमंत्री : सुरिंदर चौधरी

💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Vitthal Kangane Sir

21 Oct, 06:29


🙏🙏🙏

Vitthal Kangane Sir

20 Oct, 14:46


विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये 9000 धावांचा टप्पा गाठणारा चौथा भारतीय फलंदाज
💫विराट कोहलीने कसोटीत 9 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. 💫विराट कोहलीने 197
कसोटी डावात 9 हजार धावा पूर्ण केल्या
आहेत.
💫सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांच्यानंतर असा कारनामा करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे.
💥💥💥💥💥💥💥💥💥

Vitthal Kangane Sir

20 Oct, 14:17


https://youtu.be/Z44QH3eQgYc

Vitthal Kangane Sir

20 Oct, 13:03


https://www.youtube.com/live/LBOoJF67YG0?si=XR6aD8J_LS0T8YKl

Vitthal Kangane Sir

20 Oct, 09:56


➡️ महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सुरूवात: 14 ऑक्टोबर 2024
शेवट :     04 नोव्हेंबर 2024

➡️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सुरूवात: 14 ऑक्टोबर 2024
शेवट :      04 नोव्हेंबर 2024

➡️एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)2024 जाहिरात
सुरूवात:   14 ऑक्टोबर 2024
शेवट :        03 नोव्हेंबर 2024
अर्ज लिंक : CLICK HERE

➡️आदिवासी विभाग भरती 2024
सुरूवात: 12 ऑक्टोबर 2024
शेवट :     02 नोव्हेंबर 2024
अर्ज लिंक: CLICK HERE

➡️समाजकल्याण विभाग भरती 2024
सुरूवात : 10 ऑक्टोबर 2024
शेवट :       11 नोव्हेंबर 2024
अर्ज लिंक : CLICK HERE

➡️ अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क जाहिरात 2024 जाहिरात 
सुरूवात: 23 सप्टेंबर 2024
शेवट:      22 ऑक्टोबर 2024
अर्ज लिंक: CLICK HERE

➡️महिला व बाल विकास आयुक्तालय
महाराष्ट्र राज्य पुणे जाहिरात 2024
सुरूवात:   14 ऑक्टोबर 2024
शेवट :        03 नोव्हेंबर 2024
अर्ज लिंक: CLICK HERE

Vitthal Kangane Sir

20 Oct, 09:53


♦️राष्ट्रिय महिला आयोग अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची निवड..

👉 त्यांचा कार्यकाळ आणि त्यांच्या विषयी महत्वपूर्ण माहिती.

Vitthal Kangane Sir

20 Oct, 09:50


चालू आहे जॉईन

Vitthal Kangane Sir

20 Oct, 09:50


https://www.youtube.com/live/8gkfFDswiUA?si=fhTi22JiGSyvJkZW

Vitthal Kangane Sir

20 Oct, 08:27


कार्यशाळा पुन्हा 2.30 चालू होणार आहे

Vitthal Kangane Sir

19 Oct, 19:53


सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश 👇👇👇

१)48 वे सरन्यायाधीश :- एन व्ही रमणा   
२)49 वे सरन्यायाधीश :- उदय लळित 
३)50 वे सरन्यायाधीश :- डी वाय चंद्रचूड    
४)51 वे सरन्यायाधीश :- संजीव खन्ना (शिफारस)

ले सरन्यायाधीश - हिरालाल कानिया

💥सर्वोच्च न्यायालय ( कलम - 124 )

🔹स्थापना - 26 जानेवारी 1950
🔸घोषवाक्य :- येतो धर्मस्ततो जय: ॥
🔹कामकाजाची भाषा :- इंग्रजी   
🔸सदस्य संख्या :- (33+1) 34
🔹 नेमणूक - राष्ट्रपती
🔸 शपथ - राष्ट्रपती
🔹 कार्यकाळ - 65 व्या वर्षापर्यंत

Vitthal Kangane Sir

19 Oct, 13:29


9 वर्षांनंतर भारतीय "परराष्ट्रमंत्री" पाकिस्तान मध्ये

▪️2015 मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानच्या दौऱयावर गेल्या होत्या.

परराष्ट्रमंत्री कशासाठी गेले आहेत

◾️ शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) कौन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंटच्या शिखर परिषदेचे आयोजन - पाकिस्तान मध्ये त्यासाठी परराष्ट्रमंत्री गेले आहेत
◾️इस्लामाबाद - पाकिस्तान येथे
◾️15-16 ऑक्टोबर 2024
◾️भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर उपस्थित
◾️भारतीय परराष्ट्र मंत्री पाकिस्तानला भेट देण्याची ही जवळपास नऊ वर्षांतील पहिलीच वेळ
◾️उद्देश : सर्व देशांच्या मध्ये आथिर्क , सांस्कृतिक आणि सामाजिक सहयोग वाढवणे

SCO म्हणजे काय?

▪️स्थापना : 15 जून 2001 रोजी
▪️चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’ची स्थापना केली.
▪️1996 मध्ये स्थापन झालेल्या "शांघाय फाइव्ह" पासून SCO चा उगम झाला.

Vitthal Kangane Sir

19 Oct, 12:01


🔰राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

🔸महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती (2016 ते 2021) झाल्या होत्या.

🔹राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत

🔸राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी डॉ अर्चना मजुमदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष (पूनर्नियुक्ती) :- रूपाली चाकणकर 
💥💥💥💥💥💥💥💥

Vitthal Kangane Sir

18 Oct, 07:22


🔰वैनगंगा नदीवर महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.

🔹 भंडा-यातील वैनगंगा नदीवर महाराष्ट्रातील पहिल्या जल पर्यटनाला सुरूवात झाली आहे.

🔸नदीवर उभारण्यात आलेला महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प आहे.

🔹या प्रकल्पामुळे एक हजार लोकांना रोजगार मिळणार  आहे.

राज्यातील पहिला ‘ॲक्वाफेस्ट’ जल पर्यटनमहोत्सव :- जळगाव
💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Vitthal Kangane Sir

18 Oct, 06:14


➡️विविध विभाग आणि परीक्षा कोण घेणार माहिती..➡️

BMC कार्यकारी सहायक - TCS
BMC निरीक्षक - TCS
आदिवासी विकास निरीक्षक - IBPS
समाजकल्याण विभाग - TCS
महिला व बालविकास विभाग - TCS
महिला व बालविकास ICDS मुख्यासेविका - TCS
💯

Vitthal Kangane Sir

18 Oct, 02:25


▶️ इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) च्या राष्ट्रीय ब्रँड ॲम्बेसेडर  रश्मिका मंदान्ना

⭕️ देशातील सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचा पुढाकार असलेल्या इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) च्या राष्ट्रीय ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांची नियुक्ती करण्यात आली.

Vitthal Kangane Sir

17 Oct, 11:57


♦️ महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपालीताई चाकणकर..

Vitthal Kangane Sir

17 Oct, 11:55


संजीव खन्ना होणार भारताचे नवे सरन्यायाधीश

👉भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना उत्तराधिकारी म्हणून औपचारिकपणे प्रस्तावित केले आहे.

👉 केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्रात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले आहे की, मी 11 नोव्हेंबर रोजी पद सोडत असल्याने न्यायमूर्ती खन्ना त्यांचे उत्तराधिकारी असतील. 

👉सरकारने मान्यता दिल्यास न्यायमूर्ती खन्ना हे भारताचे 51 वे सरन्यायाधीश होतील.

👉त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असेल.

Vitthal Kangane Sir

17 Oct, 09:46


संजीव खन्ना असतील नवीन CJI

▪️सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी पुढील सरन्यायाधीश पदासाठी नावाची शिफारस केली आहे.
▪️सध्याचे सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांचा कालावधी नोव्हेंबर महिन्यात संपत आहे.
▪️न्यायमूर्ती संजीव खन्ना सध्या दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत.
▪️सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानंतर भूषण रामकृष्ण गवई यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
▪️ते जर सरन्यायाधीश झाले तर ते देशातील दुसरे अनुसूचित जातीतील सरन्यायाधीश असतील.
▪️यापूर्वी न्यायमूर्ती केजी बालकृष्ण हे देशातील पहिले एससी सरन्यायाधीश होते.

💥💥💥💥💥💥💥

Vitthal Kangane Sir

17 Oct, 07:17


नुकत्याच जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुका 2024 नंतर झालेले मुख्यमंत्री

✔️जम्मू काश्मीर - ओमर अब्दुल्ला (केंद्रशासित जम्मू-काश्मीर चे पहिले मुख्यमंत्री

✔️ हरियाणा - नायब सैनी (12वे मुख्यमंत्री)

✔️ महाराष्ट्र - (21 वे मुख्यमंत्री)

✔️ झारखंड - (14 वे मुख्यमंत्री)

Vitthal Kangane Sir

17 Oct, 07:15


🔴जागतिक भूक निर्देशांक २०२४

🔰२०२४ च्या जागतिक भूक निर्देशांकामध्ये १२७ देशांत भारत १०५  स्थानावर आहे..

🔹भारताचा भूक निर्देशांक - २७.३


💥💥💥💥💥💥💥

Vitthal Kangane Sir

17 Oct, 03:09


📚 VK’s चालू घडामोडी अंक 3
👉 (01 जुलै ते 30 सप्टेंबर 2024)

🔑 लेखक – विठ्ठल कांगणे
📖 प्रकाशन – अर्षता पब्लिकेशन, परभणी

💥 या पुस्तकात काय आहे?
👉 500+ संभाव्य प्रश्नसंच – आगामी परीक्षा अंदाज प्रश्नसंच
👉 210+ पोलिस भरती 2024 प्रश्न – खास पोलीस भरतीसाठी
👉 महत्त्वाचे वन लाइनर
👉 चित्रांसह मुद्देसूद विश्लेषण
👉 01 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंतच्या चालू घडामोडींचं परिपूर्ण कव्हरेज

🗝 एकूण पाने – 135
💰 MRP – ₹260 (Discounted ₹129/-)

📦 ऑर्डर डिटेल्स:
📱 WhatsApp वर ऑर्डर करा:
KG Book Center – 8390533593
ऑर्डर करण्यासाठी : https://wa.me/p/27053449440936793/918390533593

*पुस्तक आधी चाळा, आवडलं आणि उपयुक्त वाटलं तर खरेदी करा!*

Vitthal Kangane Sir

16 Oct, 18:08


सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या सूचनेवरून न्यायदेवतेत बदल करण्यात आले आहेत.

▪️खरं तर, न्यायदेवतेच्या वर्षानुवर्षे डोळ्यावर बांधलेली पट्टी काढून टाकण्यात आली आहे.

▪️यासोबतच न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी संविधान देण्यात आले आहे.

▪️सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, CJI चंद्रचूड यांच्या मते  कायदा कधीच आंधळा नसतो.

▪️तो सर्वांना समानतेने पाहतो. त्यामुळे न्यायदेवतेचे रूप बदलले पाहिजे, असे सरन्यायाधीशांचे मत होते.

▪️तसेच, न्यायदेवतेच्या एका हातात तलवार नसावी, तर संविधान असावे जेणेकरून ती राज्यघटनेनुसार न्याय देते असा संदेश समाजात जाईल.

95,752

subscribers

761

photos

41

videos