मराठी आणि हिंदी कविता✍️ @rahiilovemanjil Channel on Telegram

मराठी आणि हिंदी कविता✍️

@rahiilovemanjil


😊समूहामध्ये कोणीही कविता लिहीत असाल तर 9371751106 या टेलिग्राम नंबर वर आपल्या नावासहित पाठवा. त्यानंतर या समूहावरती ती कविता पोस्ट केली जाईल. 😊

मराठी आणि हिंदी कविता✍️ (Marathi)

या टेलिग्राम समूहात मराठी आणि हिंदी भाषेतील कविता लिहिणारे आणि वाचणारे लोकच एकत्रित झाले आहेत. 'मराठी आणि हिंदी कविता✍️' असे असलेल्या हा समूह यशस्वी कविता निर्माणातील उत्कृष्टतेचा संचार करतो. समूहातील सदस्यांनी स्वतःचे चिंतन आणि भावना सामायिक करण्याचा अभ्यास केलेला आहे. या समूहामध्ये सर्व कवितांची तपशील उपलब्ध आहेत आणि सर्वांनी या समूहात खास कविता शेअर करू शकतात. जर तुम्हाला कविता लिहायची आणि वाचायची आवड आहे तर तुम्हीही या समूहात सामील होऊ शकता. समूहात उपस्थित होऊन आपल्या अभिप्रायांच्या साथी कवितेचं कलेवर टप्प्यात भरण्याची संधी मिळेल. आपल्यातील कविता चांगल्या प्रतिष्ठेने स्वीकारली जाईल आणि या समूहात शेअर केल्या जातील. अशाच अभ्यासावर आधारित या समूहाचे सदस्य घेऊन समूहात नक्कीच सामील व्हा आणि आपल्या कवितेची माहिती स्पंदनी घ्या!

मराठी आणि हिंदी कविता✍️

17 Nov, 05:41


" किती सोपं अन सरळ आहे...
तुला फक्त विसरायचच तर आहे..."
खरंच,
" किती सोप्या असतात काही
गोष्टी काही लोकांसाठी..."
आणि म्हणणं तेव्हढ
करणं ही सोपं असत का?
आणि
जर असत तर रिकामे झाले असते
लोक एकमेकांना क्षणातच विसरून,
मोकळे झाले असते कायमचे
या विचारांच्या जाळ्यातून...

🍁

- K🖤

मराठी आणि हिंदी कविता✍️

13 Nov, 09:52


🍂

"Plans to protect birds and
trees are nothing but
plans to protect humans"

Please Save them,
And make this"world"
more beautiful🌿to live...

मराठी आणि हिंदी कविता✍️

07 Nov, 15:42


कधी तरी तुला ही टाळेल म्हणतो,
या भावनांना ही जाळेल म्हणतो,
शांत बसेन मग एकटाच कुठेतरी
हळू हळू सगळं सोडेल म्हणतो...

असेल एकटाच...
मग हसेल एकटाच...
त्या आनंदात माझ्या,
सहभागी एकटाच होईल म्हणतो...

थांबून मग कोठेतरी,
सोडेल साऱ्या दिश्या...
अन् एकच वाट,
आपलीशी करेल म्हणतो...
परत एकदा स्वतःला शोधेल म्हणतो...

-K🍂

🖤

मराठी आणि हिंदी कविता✍️

05 Nov, 04:33


आठवणींचे उकिरडे किती खोल गेले,
ह्या उकिरड्यांचे नाही काही मोल झाले...
सुंदर ते जग पाह ना आता काय झाले...
काय होते मी अन् बग आता काय झाले...

- K

🖤

मराठी आणि हिंदी कविता✍️

01 Nov, 16:08


"In search of you i lost me🍂"
Sometimes i feel this...
But the reality is
"In search of you i found myself"

- K

🖤

मराठी आणि हिंदी कविता✍️

27 Oct, 04:27


हसून टाळले मला कितीदा,
डोळ्याने छळले मला कितीदा,
वाट जी मी पाहत होते तूझी,
पापण्यांवर उभे आसू कितीदा...

कश्यात अडकून पडले होते,
जे मलाच माझा पत्ता नव्हता...
माहित नाही मी काय कमविले,
तु तर माझा कधीच नव्हता...

बघत होते सगळे काही तरीही,
जाणीवेचा काही हेतू नव्हता...
थांबले होतें तुझ्या साठीच मी,
येण्याचा तर तुझा काही इरादाच नव्हता...

- K🍃

🖤

मराठी आणि हिंदी कविता✍️

24 Oct, 13:18


"मग त्याने एकदा सोडलं सगळंच"

सगळ्यांचं "आईकन ही सोडलं"
आणि 'तक्रार' करणं सुद्धा...
त्याने 'नाराज' होन ही सोडलं
आणि 'नाराजकरणं' सुद्धा...
सगळ्यांशी 'बोलणं' सुद्धा
आणि सगळ्यांना 'हसवणं' सुद्धा...
"सोडलं त्याने सगळंच"

"सोडलं" त्याने 'बाहेर' येणं 
आणि 'नजरेला नजर' देणं सुद्धा...
सगळ्यांमध्ये 'मिसळन' सुद्धा
आणि सगळ्यांसोबत 'हसणं' सुद्धा...
"सोडलं त्याने सगळं एकदाचं"

- Karn🍃

🖤

मराठी आणि हिंदी कविता✍️

21 Oct, 08:16


बरसायला पावसाने सुद्धा किती उशीर केला,
अन् डोळ्यातले पाणी ही डोळ्यातच राहीले...

सगळ काही सोडून मी वाट त्याची पाहिली,
कदाचीत त्याच्या आठवणीत मीच नाही राहिले...

किती दिवस अखेर माझे आता राहिले,
जगण्याचे आजुन हे किती क्षण राहीले...

या देहातून श्वास आता माझा चालला अन् 
तारका पल्याड जायचे ही स्वप्नंच राहीले...

- K

🖤

मराठी आणि हिंदी कविता✍️

14 Oct, 10:28


Don't chase butterflies🦋
Build a beautiful garden🍀

😊🖤

मराठी आणि हिंदी कविता✍️

03 Oct, 16:24


रंगा विना सार जग,
बघ ना रे तू बघ...
थोडं बेरंग होऊन,
तू ही जगून रे बघ...

थोडा आशेचा कल्लोळ,
थोडा जीवाला आधार,
थोड हसू कोणाला,
कधी तू वाटून रे बघ...

थोडं असं सुद्धा जग...
थोडं तस सुद्धा जग...
जगण्याचा रे गोडवा,
तू ही चाकून बघ...

- K🍃

🖤

मराठी आणि हिंदी कविता✍️

28 Sep, 04:43


त्या वाटेवरी,
आज ही त्या आठवणी,
मला पुन्हा तश्याच भेटतात...
अन् एका क्षणातच
मनाचा भंग करतात...

- K 🍃

🖤

मराठी आणि हिंदी कविता✍️

20 Sep, 05:22


कळले ना मला मी काय हरले ?
मनी दुःखा विना कुठे काय उरले...
आसवांचे उसासे, मी फोडलेत टाहो,
रडल्या विना कधी ना माझे दिस सरले...

- K🍃 

🖤

मराठी आणि हिंदी कविता✍️

17 Sep, 04:21


नको ऋतु ते पुन्हा,पुन्हा....
नको रे ते पुन्हा,पुन्हा भिजणे....
नको मला ती आठवण तुझी
अन् नको तुझे ते असणे,नसणे...

- K🍃


🖤

मराठी आणि हिंदी कविता✍️

07 Sep, 04:42


नको भावनांत वाहू रे इतका,
संपवतील तुला त्या ही कधी...

- K🍃

🖤

मराठी आणि हिंदी कविता✍️

03 Sep, 17:26


सितारे जगमगाते जा रहे हैं...
खुदा, मेरे आखरी दिन लिख रहा हैं...

- K 🍃

🖤

मराठी आणि हिंदी कविता✍️

25 Aug, 05:20


ख़ाली ख़ाली जो घर था एकदम भर गया,
उदास बैठा वो शक्स कल रात मर गया...
                              
 - john elia💐

🖤

मराठी आणि हिंदी कविता✍️

21 Aug, 04:43


तुम्हीं म्हंणतान घरदार इथं सर्वच राहत सार,
माणूस मेल्यावर याचं गावाबाहेर घर...

तुम्हीं म्हंणतान पैसा अडका इथं सर्वच राहत बरकां,
माणूस मेल्यावर संगे एक मातीचा मडका...

घेरे घे हरिनाम घे...
घेरे घे हरिनाम घे...

😇

🖤

मराठी आणि हिंदी कविता✍️

18 Aug, 06:44


नजर धुसर धुसर,
स्वप्न हे काळे काळे....
का बुनत मी होते,
हे अंधाराचे जाळे...

गुंतवून सारा गुंता,
मी ही गुंतले त्यात...
जे होते सगळे सोपे,
मी का अडकले त्यात...

डोळे झाकून ठेवले...
नको ही कीचं किचं...
माझे शत्रु कोण होते ?
माझे विचार अन् मीचं...

- Karn 🍃 


🖤

मराठी आणि हिंदी कविता✍️

16 Aug, 06:38


या चालू क्षणाची कोठे,
कोणाला किंमत आहे?


- K🍃

🖤

मराठी आणि हिंदी कविता✍️

13 Aug, 17:05


'जौन' तुम्हें ये दौर मुबारक
दूर ग़म-ए-अय्याम से हो,
इक पागल लड़की को भुलाकर
अब तो बड़े आराम से हो...

इक अधूरी अंगराई के
मुस्तकबिल का खून किया,
तुम ने उस का दिल दुखाया
उसे के दिल का खून किया...


- John elia💐


🍃💖

🖤

1,277

subscribers

119

photos

1

videos