Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न" @phoenix_academywardha Channel on Telegram

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

@phoenix_academywardha


"PHOENIX ACADEMY WARDHA" 🌏

Best Platform For MPSC ,UPSC , Combine Group -B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी... 📙🌏📰🗞️🏫

https://www.youtube.com/channel/UC2hVHyEU3alXMf2oUwUonoA


📚Karale Sir 📮📝Telegram Channel...🌏

Phoenix Academy Wardha "वर्हाडी पॅटर्न" (Marathi)

फीनिक्स अकॅडेमी वर्धा एक नवीन आणि सुविधाजनक Telegram चॅनल आहे ज्यात एमपीएससी, यूपीएससी, संयुक्त ग्रुप- बी, तलाठी, पोलिस भर्ती, ग्राम सेवक आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उत्तम मार्गदर्शन उपलब्ध आहे. या चॅनलवर टॉपिकवार व्याख्यान, परीक्षेचे तयारी कसे करावे, उत्तम पुस्तिका सुचवली जातात. जेव्हा आपल्याला शिक्षकांच्या सर्वात श्रेष्ठ मार्गदर्शनाची आवश्यकता असेल, तेव्हा फीनिक्स अकॅडेमी वर्धा एक सर्वाधिक प्रेरणादायी स्थान आहे. कराळे सर यांचा तथ्यपरक उपयोग आणि सुसंगत मार्गदर्शन आपल्या परीक्षेची तयारी सोप्पी आणि प्रभावी बनवतात. या चॅनलवर जॉईन करणे आपल्याला अद्याप स्थिर नकालाच्या क्षेत्रात उत्तम प्रदर्शन करण्यास मदत करेल.

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

23 Dec, 08:06


जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- ६ जानेवारी २०२५

जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ - सुधारित दिनांक:- २ फेब्रुवारी २०२५

जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४- सुधारित दिनांक:- ४ मे २०२५

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

21 Dec, 18:17


कॅबिनेट मंत्री 🔥🔥

1.चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
2.राधाकृष्ण विखे पाटील - जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3.हसन मुश्रीफ -  वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन - जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6.गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा
7.गणेश नाईक -  वन
8.दादाजी भुसे - शालेय शिक्षण
9.संजय राठोड - माती व पाणी परीक्षण
10.धनंजय मुंडे  - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11.मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12.उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा
13.जयकुमार रावल - विपणन, प्रोटोकॉल
14.पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15.अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर
16.अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान 
19.दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे - महिला व बालविकास 
21.शिवेंद्रराजे भोसले -  सार्वजनिक बांधकाम
22.माणिकराव कोकाटे - कृषी 
23.जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे - कापड
26.संजय शिरसाट - सामाजिक न्याय 
27.प्रताप सरनाईक - वाहतूक 
28.भरत गोगावले - रोजगार हमी,फलोत्पादन
29.मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे 
31.आकाश फुंडकर - कामगार 
32.बाबासाहेब पाटील - सहकार 
33.प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण 

राज्यमंत्री  (State Ministers )
34. माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास , वैद्यकीय शिक्षण 
35. आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय 
36. मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा 
37. इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन 
38. योगेश कदम  - गृहराज्य शहर
39. पंकज भोयर - गृहनिर्माण, 

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

16 Dec, 06:39


नव्या वर्षात आर्थिक जनगणना

• तब्बल १२ वर्षांनंतर देशात आर्थिक जनगणना होणार आहे. ती २०२५ मध्ये राष्ट्रीय जनगणनेसोबत केली जाईल. केंद्र सरकारमधील सचिवांच्या समितीने हा निर्णय घेतला आहे.

• २०१९ मध्ये झालेल्या सातव्या आर्थिक जनगणनेच्या अहवालाला अर्ध्याहून अधिक राज्यांनी मान्यता न दिल्याने या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अशा प्रकारे आठवी आर्थिक जनगणना ही जीएसटी युगातील पहिली आर्थिक कसरत असेल. २०१३ मध्ये सहावी आर्थिक जनगणना झाली होती.

• मोदी सरकारची ही पहिलीच आर्थिक जनगणना असेल.

• पहिली आर्थिक जनगणना १९७७ मध्ये झाली. नंतर १९८०, १९९०, १९९८ व २००५ मध्ये झाली होती. २०१३ मध्ये सहावी आर्थिक जनगणना झाली, ज्याचा अहवाल जाहीर झाला आहे.

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

16 Dec, 06:37


सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचं निधन

• झाकीर हुसैन यांना सॅनफ्रेंन्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु होते, तसंच त्यांची प्रकृती गंभीर आहे असंही कळत होतं. मात्र उपचारांदरम्यान झाकीर हुसैन (Zakir Hussain ) यांची प्राणज्योत मालवली.

• झाकीर हुसैन यांनी अनेक भारतीय आणि परदेशी चित्रपटांना संगीत दिलं आहे. 'साझ' या सिनेमात त्यांनी अभिनयही केला आहे.

• १९८८ मध्ये झाकीर हुसैन (Zakir Hussain) यांना पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण, २०२३ मध्ये पद्मविभूषण या पुरस्करांनी गौरवण्यात आलं आहे. तसंच १९९० मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा संगीत पुरस्कारही मिळाला होता. २००९ मध्ये झाकीर हुसैन ५१ व्या ग्रॅमी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. उल्लेखनीय बाब ही आहे की झाकीर हुसैन (Zakir Hussain) यांना त्यांच्या कारकिर्दीत ७ वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं त्यापैकी चारवेळा त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

16 Dec, 02:54


💐💐💐💐

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

14 Dec, 11:39


◾️पोलीस भरती संदर्भात Update...🔥

राज्यात यापूर्वी दोनदा पोलीस भरती पार पडली असून आता डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती संकलित केली जाईल. त्यानंतर नवीन वर्षात जानेवारी- फेब्रुवारी भरती संदर्भातील निर्णय होईल. आता मागील भरतीतील नवप्रविष्ठ पोलीस उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल.

- राजकुमार व्हटकर , अप्पर पोलीस महासंचालक,
विशेष प्रशिक्षण व खास पथके.

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

14 Dec, 06:47


लवकरच...... सुरू होणार आहे..... लागा तयारीला

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

14 Dec, 00:20


🏆 राष्ट्रीय ग्रामपंचायत पुरस्कार जाहीर

◾️ठिकाण - विज्ञान भवन , नवी दिल्ली
◾️दिनांक - 11 डिसेंबर 2025
◾️विविध श्रेणीतील 45 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले
◾️एकूण 46 कोटी रुपयांची बक्षीस दिले गेले
◾️राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
◾️राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सहसा दरवर्षी 24 एप्रिल रोजी साजरा केला जातो
◾️या वर्षी स्पर्धेत 1.94 लाख ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला, ज्यामध्ये 42 पुरस्कार विजेत्या पंचायतींपैकी 42% महिलांचे नेतृत्व होते
◾️या कार्यक्रमात पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी ‘पुरस्कार प्राप्त पंचायतांचे कार्य: सर्वोत्तम प्रथा’ या पुस्तिकेचे अनावरण केले. 


🏆राज्यांच्या नुसार क्रमांक
1️⃣पहिला क्रमांक - ओडीसा आणि त्रिपुरा (7 पुरस्कार)
2️⃣दुसरा क्रमांक - महाराष्ट्र (6 पुरस्कार)
3️⃣तिसरा क्रमांक - आंध्रप्रदेश ( 4 पुरस्कार)
3️⃣चौथा क्रमांक - बिहार आणि हिमाचल (3 पुरस्कार)

‼️ पुरस्काराच्या श्रेणी कोणत्या आहेत
1】दीनदयाळ उपाध्याय पंचायत सातत विकास पुरस्कार (DDUPSVP)
2】नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सातत विकास पुरस्कार
3】ग्राम उर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार
4】कार्बन न्यूट्रल विषेश पंचायत पुरस्कार
5】पंचायत क्षेत्र निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार

‼️ 6 पुरस्कारांसह राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात महाराष्ट्र द्वितीय स्थानी

1️⃣मान्याचीवाडी ग्रामपंचायत- नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार प्रथम क्रमांक (1.5 कोटी)
2️⃣मान्याचीवाडी ग्रामपंचायत - ग्राम उर्जा स्वराज्य विशेष पुरस्कार श्रेणीत प्रथम क्रमांक (1 कोटी)
3️⃣बेला ग्रामपंचायत- कार्बन न्यूट्रल श्रेणीत प्रथम (1 कोटी)
4️⃣मोडाळे ग्रामपंचायत(नाशिक) - स्वच्छ व हरित पंचायत (तृतीय क्रमांक)
5️⃣यशदा अकादमी (पुणे) - पंचायत क्षमतानिर्माण  सर्वोत्तम संस्थान या श्रेणीत तृतीय क्रमांक (50 लाख)
6️⃣तितोरा पंचायत (जिल्हा गोंदिया) - सर्वोत्कृष्ट ब्लॉक पंचायत

व्यवस्थित वाचा महत्वाचा पुरस्कार आहे , एकदम सोपं करून दिल आहे

💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

13 Dec, 13:36


मुख्यमंत्री महिला सन्मान योजना :

▪️दिल्ली सरकारने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू केली.
▪️या अंतर्गत, दिल्लीतील महिलांना मासिक ₹ 1,000 ची मदत दिली जाईल.
▪️निवडणुकीनंतर ही रक्कम ₹2,100 पर्यंत वाढवली जाईल.

▪️योजनचे निकष :
▪️महिला अर्जदाराचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
▪️दिल्लीचा कायमचा रहिवासी आणि दिल्लीचा अधिकृत मतदार असणे आवश्यक आहे.
▪️कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹ 3 लाखांपेक्षा जास्त नसावे.
▪️सरकारी कर्मचारी किंवा करदाता किंवा पेन्शन प्राप्तकर्ता असू नये.
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

13 Dec, 10:56


🤩 महिला सन्मान योजना - 1000 रुपये महिना

⭐️विधानसभेत पुन्हा जिंकल्यास  दिल्लीच्या महिलांना 2100 रुपये महिन्याला - अरविंद केजरीवाल यांची घोषणा

🧠 या योजनांचा जास्त महत्व द्या
◾️मुख्यमंत्री लाडली बहणा योजना : मध्यप्रदेश (महिना 1250 रूपये)
◾️मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : महाराष्ट्र ( महिना 1500 रुपये)
◾️इंदिरा गांधी प्यारी बहना सुख-सन्मान निधी योजना : हिमाचल प्रदेश (पात्र महिलांना 1500/- महिना सहाय्य)
◾️मुख्यमंत्री महिला सम्मान योजना : नवी दिल्ली ( पात्र महिलांना 1000 /- महिना अर्थसहाय्य)
◾️'हर घर हर गृहणी योजना : हरियाणा ( BPL धारकांना 500 रुपये गॅस)
◾️महतारी वंदन योजना : छत्तीसगड (पात्र महिलांना 1000/- महिना)

💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

12 Dec, 16:38


‼️रेल्वे/ मुंबई पोलीस/पुणे जेल पोलीस/RRB /NTPC/RPF/
अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी....
अत्यंत महत्त्वाचे ई-बुक्स बनवले आहेत
‼️त्यामध्ये

1) इतिहास PYQ
2) भूगोल PYQ
3)RRB साठी प्राचीन इतिहास नोट्स
4) चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या
5) मुंबई आणि पुणे कलाघटक विशेष

हवे असल्या नंतर 8483815942 या नंबर वरती संपर्क साधावा....
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

12 Dec, 05:22


‼️संजय मल्होत्रा यांच्या बाबत माहिती 👆

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

11 Dec, 17:01


'घरचोळा'ला GI टॅग.

▪️गुजरातचा सांस्कृतिक हस्तकला वारसा घरचोलाला GI टॅग मिळाला आहे.

▪️हस्तकला क्षेत्रात गुजरातला दिलेला हा 23वा GI टॅग आहे.

▪️घरचोळा म्हणजे घरात परिधान केलेले कपडे.

▪️येथे घर प्रत्यक्षात वधूचे नवीन घर मानले जाते.

▪️घरचोळा बनवण्याची सुरुवात गुजरातच्या खंभात जिल्ह्यातून झाली.
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

11 Dec, 16:41


#GR
♦️शासन निर्णय प्रसिद्ध..

👉 राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट -क (वाहन चालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेन महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतच्या कार्यवाही प्रमाणित कार्यपध्दती (SOP) प्रसिद्ध करणेबाबत…

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

11 Dec, 04:05


राज्यातील विविध संवर्गातील रिक्त पदे

गट अ - 15,615
गट ब - 29,898
गट क - 1,35,057
गट ड - 58,733

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

11 Dec, 04:02


दिग्दर्शिका पायल कपाडिया हिने इतिहास घडवला आहे.
▪️गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2025 मध्ये तिच्या ‘ऑल वी इमॅजिन ऍज लाईट’ या सिनेमाला दोन श्रेणीत नामांकनं मिळाली आहेत.
▪️गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये नामांकन मिळवणारी ती पहिलीच भारतीय महिला बनली आहे.
▪️या नामांकनातील पहिली श्रेणी म्हणजे सर्वोत्तम दिग्दर्शिकेची आणि दुसरी म्हणजे गैर-इंग्लिश भाषेतील सर्वोत्तम मोशन पिक्चर आहे. पायलची ही कामगिरी भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

25 Nov, 10:36


▪️ऋषभ पंत  - 27 करोड
▪️टीम - लखनौ
▪️श्रेयस अय्यरचा विक्रम मोडला.
▪️IPL आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू..

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

25 Nov, 01:54


ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी शतके (भारतीय)

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

25 Nov, 01:53


महाराष्ट्र विधानसभा अंतिम निकाल


मतांची टक्केवारी ( IBPS exam ला प्रश्न येऊ शकते)

भाजप - 26.77%
शिवसेना - 12.38%
राष्ट्रवादी - 9.01%
काँग्रेस 12.42%
शिवसेना (उबाठा) - 9.96%
राष्ट्रवादी (शरद पवार) - 11.28%
मनसे - 1.55%
नोटा - 0.72%

सर्वात जास्त मताने निवडणूक आलेले
काशिराम पावरा - 1,59,044
शिवेंद्रराजे भोसले - 1,42,124

सर्वात कमी मतांनी निवडून आलेले
मुफ्ती मोहम्मद - 162
नाना पटोले - 207

💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

24 Nov, 14:35


💥कोणत्या पक्षाचा किती स्ट्राईक रेट.......

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

24 Nov, 02:24


विधानसभा निवडणुक 2024 निकाल

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

23 Nov, 17:21


पंतप्रधान मोदींना अमेरिकेत 'जागतिक शांतता पुरस्कार' प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 22 नोव्हेंबर रोजी त्यांच्या अनुपस्थितीत अमेरिकेत जागतिक शांतता पुरस्कार मिळाला. 
वॉशिंग्टन ॲडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी आणि असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज (एआयएएम) या संघटनेने संयुक्तपणे त्यांना 'डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर जागतिक शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

23 Nov, 12:42


भारतातील महत्त्वाची बंदरे

◾️एन्नोर बंदर : तमिळनाडू

◾️कोलकाता बंदर : पश्चिम बंगाल

◾️पारादीप बंदर : ओरिसा

◾️विशाखापट्टणम बंदर : आंध्र प्रदेश

◾️कामराजर बंदर : तामिळनाडू

◾️चेन्नई बंदर : तामिळनाडू

◾️तुतीकोरीन बंदर : तामिळनाडू

◾️कोचीन बंदर : केरळ

◾️मंगलोर बंदर : कर्नाटक

◾️मुरगाव बंदर : गोवा

◾️मुंबई बंदर : महाराष्ट्र

◾️जवाहरलाल नेहरू बंदर(न्हावा शेवा)  : महाराष्ट्र

◾️कांडला बंदर : गुजरात

◾️गोपालपुर पोर्ट : ओडीसा

◾️मुंद्रा पौर्ट - गुजरात

◾️हरफा पोर्ट- इजराईल

◾️हाजीरा पोर्ट - गुजरात

◾️धामरा पोर्ट - ओडीसा

◾️चाबहार पोर्ट - इराण ( भारत विकसित)

◾️ग्वादर पोर्ट - पाकिस्तान ( चीन विकसित)

◾️दुक्कम पोर्ट - ओमान

◾️कांडला पोर्ट - गुजरात ( दिन दयाळ पोर्ट)

◾️विझिंगम पोर्ट - केरळ

◾️पोर्ट ब्लेअर बंदर : अंदमान आणि निकोबार बेटे

बंदरांचा बद्दल महत्त्वाची माहिती

◾️सर्वात जुने बंदर : श्यामा प्रसाद मुखर्जी बंदर ट्रस्ट, कोलकाता

◾️सर्वात नवीन बंदर : वाधवन, महाराष्ट्र

◾️सर्वात मोठे नैसर्गिक बंदर : मुंबई बंदर महाराष्ट्र

◾️सर्वात मोठे कृत्रिम बंदर : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT)

◾️सर्वात खोल बंदर : विशाखापट्टणम बंदर ,आंध्र प्रदेश

◾️कोळसा वाहतुकीसाठी महत्वाचे बंदर : एंनोर बंदर (तमिळनाडू)

◾️लोहखनिज निर्यात बंदर : मंगलोर बंदर : कर्नाटक

◾️भारतातील एकमेव नदी बंदर : कलकत्ता बंदर (हुगळी नदीवर)

◾️सर्वात व्यस्त बंदर: जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT), महाराष्ट्र

◾️खाजगी प्रमुख बंदर : मुंद्रा बंदर (अदानी पोर्ट लिमिटेडद्वारे संचालित)

◾️सर्वात मोठे कंटेनर बंदर: जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT)

महत्वाची बंदरे त्यांची वैशिष्टे

◾️सर्वात मोठे बंदर - मुंबई - महाराष्ट्र

◾️सर्वात खोल बंदर - विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश

◾️मन्नारच्या आखातातील बंदर - तुतिकोरीन - तामिळनाडू

◾️निर्याताभिमुख बंदर - नवे मंगळूर - कर्नाटक   

◾️लाटांवर आधारित बंदर - कांडला - गुजरात 
( भारतातील पहिले मुक्त व्यापार क्षेत्र )

◾️कृत्रिम बंदर - JNPT महाराष्ट्र ,चेन्नई - तामिळनाडू

◾️नैसर्गिक बंदर - कोची - केरळ , मार्मागोवा - गोवा ,  मुंबई - महाराष्ट्र 

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

23 Nov, 06:28


Leader of Opposition मिळणार का नाही याचे सुद्धा वांदे झाले महाराष्ट्र मध्ये😂😂😂😂

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

23 Nov, 06:27


मी पुन्हा येईन ......😁

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

23 Nov, 06:26


💥 सुरुवातीचे कौल

भाजप - 125
शिवसेना ( एकनाथ शिंदे ) - 56
राष्ट्रवादी ( अजित पवार ) - 36
काँग्रेस - 20
शिवसेना ( ठाकरे ) - 19
राष्ट्रवादी ( शरद पवार ) - 14

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

22 Nov, 17:09


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी ६६.०५% मतदानाची नोंद, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून अंतिम आकडेवारी जाहीर.

➡️ सर्वाधिक मतदान: करवीर - ८४.९६%
➡️ सर्वात कमी मतदान: कुलाबा - ४४.४४%

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

21 Nov, 14:20


परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे :-

1] राज्यातील पाहिले मतदान केंद्र मणिबेल (ता.अक्कलकुवा, जि. नंदुरबार) हे आहे.
2] राज्यातील शेवटचे मतदान केंद्र कोंतेव बोबलाद (ता.जत, जि. सांगली) हे आहे.
3] राज्यातील पहिल्या मतदार(महिला) रविता तडवी ठरल्या आहेत.
4] राज्यातील शेवटचा मतदार कुमार संजय लोणार हा ठरला आहे.
5] राज्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ  नंदुरबार आहे.
6] राज्यातील शेवटचा(288) विधानसभा मतदारसंघ "जत" आहे.
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

20 Nov, 13:43


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अपडेट

दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात ४५.५३% मतदान!

➡️ गडचिरोली: ६२.९९% (सर्वाधिक)
➡️ ठाणे: ३८.९४% (सर्वात कमी)

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

20 Nov, 02:32


विधानसभा निवडणूक 2024 साठी पक्षनिहाय उमेदवारांची संख्या
👉 158 पक्ष आणि 2086 अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
👉 288 जागेसाठी एकूण 4136 उमेदवार

सर्वांनी आवर्जून मतदान करा. आजचा निर्णय येणाऱ्या 5 वर्षासाठी महाराष्ट्राचे भविष्य ठरणार आहे.

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

19 Nov, 03:43


उत्सव लोकशाहीचा...
बजावू हक्क मतदानाचा


मतदान : बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४
वेळ : सकाळी ७ ते सायं. ६

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

19 Nov, 00:25


Good morning.,.......

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

18 Nov, 16:59


माना किस्मत कभी कभी साथ नही देती, लेकिन याद रखना, किताबों में धूल लगने से कहानियां खत्म नही होती............
Good night
@kiran sir

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

18 Nov, 16:50


मिस युनिव्हर्स 2024 चा खिताब मिस डेन्मार्क म्हणजेच व्हिक्टोरिया कजेर

• ७३ मि. यूनिवर्स पुस

भारतीय मिस युनिवर्स खेळाडू :

• यावेळी मिस युनिव्हर्स 2024 चा खिताब मिस डेन्मार्क म्हणजेच व्हिक्टोरिया कजेर हिने मिळवला आहे.

• सुष्मिता सेन (1994)

• लारा दत्ता (2000)

• हरनाज़ संधू (२०२१)

• पहिली रनरअप नायजेरियाची चिडिन्मा अदेत्शिना,

• दुसरी रनरअप मेक्सिकोची मारिया फर्नांडा बेल्ट्रान, तर

तिसरी रनपअप थायलंडची ओपल सुचता चुआंगश्री ठरली आहे.

मिस युनिव्हर्स

• स्थापना : 28 जून 1952

• मुख्यालय : न्यूयॉर्क (यूएसए)

• ठिकाण : एल. साल्वाडोर (जोस अडोल्फो पिने हेना)

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

18 Nov, 14:25


स्पर्धा परीक्षा करणारे गावाबाहेर असणारे सर्व उमेदवार लक्ष्यात ठेवा मतदान करायचं आहे....कितीही व्यस्त असाल तरी अभ्यास एक दिवस कमी होईल पण 5 वर्ष रडण्याची वेळ येणार नाही....हीच ती वेळ ....बोटाची ताकत दाखवायची......🔥🔥🔥

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

18 Nov, 13:19


🔰DRDO ने 75km मार्गदर्शित पिनाका रॉकेट प्रणाली चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या.

🔹DRDO ने मार्गदर्शित पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट सिस्टीमच्या चाचण्या पूर्ण केल्या, त्याची रेंज 75km पेक्षा जास्त वाढवली.

🔸अखेरीस, योजना 120 किमी आणि नंतर 300 किमीपर्यंत नेण्याची आहे.

🔹विविध DRDO प्रयोगशाळा आणि उद्योगांद्वारे स्वदेशी पद्धतीने विकसित केलेली, पिनाका प्रणाली लांब पल्ल्याच्या रॉकेट तोफखाना क्षमता वाढविण्याच्या योजनेचा एक भाग आहे, 300km पर्यंत पुढील श्रेणी विस्तारांची योजना आहे.

💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

17 Nov, 04:55


सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

◾️50 वे सरन्यायाधीश
◾️भारताचे सरन्यायाधीश :- 9 नोव्हेंबर 2022 ते 8 नोव्हेंबर 2024
◾️2000 ते 2013 पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केले आ
◾️2013 ते 2016 अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले
◾️ते राष्ट्रीय विधी सेवांचे पदसिद्ध संरक्षक-इन-चीफ आहेत
◾️शिक्षण दिल्ली विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठात झाले आहे
◾️त्यांनी सुलिव्हन आणि क्रॉमवेल आणि मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून सराव केला

💘 ते भाग असलेल्या काही खडपीठाचे निर्णय
⭐️निवडणूक बाँड योजनेचा निकाल,
⭐️रामजन्मभूमी निकाल 
⭐️गोपनीयतेचा निकाल 
⭐️समलैंगिकतेचे गुन्हेगारीकरण 
⭐️सबरीमाला प्रकरण 
⭐️समलिंगी विवाह प्रकरण
⭐️जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणे 

◾️वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे भारताचे सर्वाधिक काळ सेवा करणारे मुख्य न्यायाधीश आहेत
◾️आणि त्यांची आई प्रभा या शास्त्रीय संगीतकार
◾️भारताच्या राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ दिली होती

💬 भारताचे सरन्यायाधीश : महत्त्वाची माहिती
● पाहिले सरन्यायाधीश : हरीलाला कानिया( 1950)
⭐️ 48 वे सरन्यायाधीश - एन व्ही रमन्ना
⭐️ 49 वे सरन्यायाधीश - न्या.ललित
⭐️ 50 वे सरन्यायाधीश -डी वाय चंद्रचूड
⭐️ 51 वे सरन्यायाधीश - न्यायमूर्ती खन्ना
-----------------------------------------
💬 महाराष्ट्रातील सरन्यायाधीश
1】न्या. प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर (1954)
2】न्या. मोहम्मद हिदायतुला (1968)
3】न्या.वाय व्ही चंद्रचूड (1978)
4】न्या.शरद बोबडे (2019)
5】न्या.उदय ललित (2022)
6】न्या.डी वाय चंद्रचूड (2022- आतापर्यंत)
-----------------------------------------
✔️सुप्रीम कोर्ट ची पहिली महिला न्यायाधीश - फातिमा बिवी (1959)
फातिमा बिवी या न्यायाधीश होत्या - सरन्यायाधीश नाही
आतापर्यंत एकही महिला सरन्यायाधीश बनल्या नाहीत
सर्वात जास्त काळ सरन्यायाधीश रहाणारे - वाय. व्ही. चंद्रचूड ( 7 वर्षे 139 दिवस)
सर्वात कमी काळ सरन्यायाधीश - कमल नारायण सिंग (17 दिवस)

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

17 Nov, 03:32


ज्या विद्यार्थांचे TRTI पोलीस/मिलिटरी मधी सीलेक्शन झाले.. परंतु अजून पर्यंत विद्यार्थ्यांनी संस्था निवडली नाही आहे.. त्यांनी लवकरात लवकर संस्था निवडून घ्यावी...

17 नोव्हेंबर 2024 ....
आजची शेवटची तारीख आहे संस्था निवडीची

https://cpetp.trti-maha.in/candidateLogin

आपलाच
नितेश बाळकृष्णजी कराळे
संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

17 Nov, 03:12


जोपर्यंत हातावरील भविष्य सांगणाऱ्या रेघांना, कष्टामुळे होणाऱ्या भेगांची झळ लागत नाही आणि पोटातल्या  आतड्यांना भुकेमुळे होणारी कळ लागत नाही🥺व इतरांचे दुःख बघूनही स्वतःला हळहळ होत नाही🙁 तोपर्यंत आयुष्याच्या खऱ्या संघर्षाचा अर्थ समजतच नाही..🔥🙏🏻

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

16 Nov, 07:18


भारताचा ऐतिहासिक सामना...

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

16 Nov, 02:52


विधानसभा निवडणूक 2024 साठीच्या पक्षनिहाय उमेदवारांची संख्या

◾️बहुजन समाज पार्टी - 237 जागा
◾️वंचित बहुजन आघाडी - 200 जागा
◾️भाजपा - 149 जागा
◾️मनसे - 125 जागा
◾️काँग्रेस - 101 जागा
◾️राष्ट्रवादी शरद पवार - 86 जागा
◾️राष्ट्रवादी अजितदादा - 59 जागा
◾️शिवसेना (शिंदे) - 81 जागा
◾️शिवसेना (उद्धव ठाकरे)- 95 जागा
◾️अपक्ष - 2086 उमेदवार

⭐️एकूण उमेदवार - 4136 उमेदवार
⭐️एकूण जागा - 288 जागा
⭐️एकूण पक्ष - 158 पक्ष आहेत
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

15 Nov, 17:33


ज्या विद्यार्थांचे TRTI पोलीस मधी सीलेक्शन झाले.. परतू अजून पर्यंत विद्यार्थ्यांनी संस्था निवडली नाही आहे.. त्यांनी लवकरात लवकर संस्था निवडून घ्यावी... शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 ....
https://cpetp.trti-maha.in/candidateLogin

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

15 Nov, 16:13


ज्या विद्यार्थांचे TRTI पोलीस मधी सीलेक्शन झाले.. परतू अजून पर्यंत विद्यार्थ्यांनी संस्था निवडली नाही आहे.. त्यांनी लवकरात लवकर संस्था निवडून घ्यावी... शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 ....
https://cpetp.trti-maha.in/candidateLogin

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

15 Nov, 12:42


जे विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत त्यांनी खालील डॉक्युमेंट्स तयार ठेवा. लवकरच तुम्हाला Documents verification साठी कॉल येईल.
1. अनुसूचित जमातीचे मूळ प्रमाणपत्र (Caste certificate)
2. अनुसूचित जमातीचे मूळ वैधता प्रमाणपत्र (Caste validity certificate)
3. दहावी गुणपत्रिका किंवा मूळ प्रमाणपत्र
4. वयाचा पुरावा दर्शविणारे कागदपत्रे यापैकी एक - पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड इत्यादी
5. आधारकार्ड मूळ प्रत
6. डोमिसाइल मूळ प्रमाणपत्र
7. आधारकार्ड लिंक असलेले उमेदवाराचे बँक पासबुक
8. तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेला मागील तीन वर्षाचा मूळ उत्पन्नाचा दाखला
9. अनाथ असल्यास संबंधित उपयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय यांनी निर्गमित केलेला अनाथाचा दाखला
10. Passport दोन कॉपी

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

14 Nov, 17:35


तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता.. 🔥🔥🔥

@kiran sir

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

14 Nov, 17:34


गृह मंत्रालयाने CISF साठी पहिल्या महिला बटालियनला मान्यता दिली

▪️सध्या CISF मध्ये 7% महिला कर्मचारी आहेत, ज्यांची एकूण संख्या सुमारे 1.77 लाख आहे. 
▪️एका बटालियनमध्ये अंदाजे 1,000 जवान असतात.

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

14 Nov, 14:20


20 नोव्हेंबर 2024 - मतदान करा.....

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

14 Nov, 03:24


चाहे लाख तुफान आयें...

   आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा पाय घट्ट रुतुन उभं रहायचं, कारण प्रश्न वादळाचा नसतो. ते जेवढ्या वेगाने येतं, तेवढ्याच वेगाने निघुन जातं. आपण किती सावरलो आहे, हे फक्त महत्वाचं असतं.

शुभ सकाळ ❤️

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

12 Nov, 00:42


मोठे निर्णय घेताना भीती वाटणे साहजिकच आहे पण केवळ भीतीमुळे निर्णय न घेणे मात्र चुकीचे आहे.



Good morning,...

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

11 Nov, 06:56


भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांना शपथ देण्यात आली

➡️काही महत्त्वाची माहिती सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय
◾️ सर्वोच्च न्यायालय प्रमाणे प्रत्येक उच्च न्यायालय सुद्धा अभिलेख न्यायालय आहे
◾️सर्वोच्च न्यायालय - कलम 124 ते 147
◾️उच्च न्यायालय - कलम 214 ते कलम 231
◾️सर्वोच्च न्यायालय संख्या - 34 (1+33)
◾️उच्च न्यायालय संख्या - राष्ट्रपती ठरवतील तेवढे
◾️7 घटनादुरुस्ती 1956 नुसार दोन किंवा अधिक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी संयुक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार संसदेला दिला गेला
◾️भारतात 1 सुप्रीमकोर्ट आहे

◾️भारतात एकूण 25 उच्च न्यायालये आहेत
◾️मुंबई उच्च न्यायालय स्थपणा - 1862
◾️25 वे उच्च न्यायालय - अमरावती (आंध्रप्रदेश)-2019

🌫मुंबई उच्च न्यायालय खडपीठे
नागपूर खडपीठ
पणजी खडपीठ
औरंगाबाद खडपीठ

-----------------------------------------

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

10 Nov, 11:56


वर्धा मुलाखतीला पात्र उमेदवार यादी

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

10 Nov, 01:43


💥बेंगळुरूचे पहिले डिजिटल लोकसंख्या घड्याळ💥

उद्घाटन: सामाजिक आणि आर्थिक बदल संस्थेत 8 नोव्हेंबर

रिअल-टाइम अपडेट्स: कर्नाटकची लोकसंख्या दर 1 मिनिट 10 सेकंदात, भारताची प्रत्येक 2 सेकंदात.

उद्देशः लोकसंख्या वाढीबद्दल जागरूकता वाढवणे आणि संशोधनासाठी डेटा प्रदान करणे.

तंत्रज्ञान: अचूक टाइमकीपिंगसाठी उपग्रह-कनेक्ट केलेले.

संशोधन समर्थन: सखोल लोकसंख्याशास्त्रीय अभ्यासासाठी जनगणना डेटा संशोधन कार्य केंद्र स्थापन केले.


💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

09 Nov, 11:47


विधानसभानिवडणूक2024

बुधवार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत.

या छायाचित्र ओळखपत्रांपैकी एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे.

#MaharahstraElection2024

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

08 Nov, 09:38


आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (TRTI) साठी फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना....
ज्या विद्यार्थ्यांनी TRTI चा फ्रॉम भरला होता अश्या विद्यार्थ्यांची निवड ही 10 वीच्या टक्यानुसार झाली आहे.
ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन/निवड झाली आहे. त्यांना रजिस्टर email 🆔 वर खालीलप्रमाणे मेल आला आहे. त्यात login here वर क्लिक करून संस्था निवड करावी.
https://cpetp.trti-maha.in/candidateLogin

काही अडचण आल्यास 9579909342 , 8010285625 यावर संपर्क करावा.

आपलाच
नितेश कराळे
संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

08 Nov, 08:18


NTPC/ RRB/SSC-GD/TET
BMC/RPF/मुंबई पोलीस/अंगणवाडी पर्यवेक्षिका... यासाठी E-BOOK किंवा NOTES हवी असेल....
तर 8483815942 या नंबर वरती कॉल करा..... वरील कोणत्याच एक्झाम चेGS /GK चे प्रश्न जाणार नाहीत याची पूर्ण दक्षता घेऊन नोट्स आणि ई -बुक बनवला आहे...


प्रमुख मार्गदर्शन:-नितेश कराळे सर
संकलन:-किरण अंबूरे सर
8483815942

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

08 Nov, 07:02


BMC/GS तसेच स्थानिक स्वराज्य संस्था अत्यंत महत्त्वाची.... संपूर्ण कायदे यामध्ये दिली गेली आहे

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

08 Nov, 07:02


MPSC GS Paper - नागरी स्थानिक स्वराज्य संस्था.pdf

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

07 Nov, 07:51


धनंजय कीर लिखित डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र मध्ये विद्यार्थी म्हणून असलेली बाबासाहेबांची दिनचर्या जरी पहिली तरी कळेल आज विदयार्थी दिवस का साजरा करतो

" भीमासाठी अभ्यासाकरिता स्वतंत्र खोली नव्हती. मुलांकरिता घरी शिक्षक ठेवणे सुभेदारांना शक्य नव्हते. डबक चाळीतील त्यांची खोली धुरकट असून घरगुती वस्तूंनी नि भांड्याकुंड्यांनी भरलेली असे. तिच्या एका कोपऱ्यात माळ्यावर जळाऊ लाकडांचा साठा होता. दुसऱ्या कोपऱ्यात चूल होती. विश्रांती, झोपणे, जेवण, अभ्यास यांसाठी ती एकच खोली. अशा गर्दीतही मुलांच्या अभ्यासाची सोय रामजींनी एक युक्ती काढून साधली. रात्री मुलगा लवकर गोधडीवर झोपी जाई. त्याच्या उशाजवळ भिंतीला टेकून घिरट कोंबलेला असे. पायाशी बकरी धापा टाकीत असायची. दोन वाजेपर्यंत स्वतः जागून रामजी मुलाला अभ्यासासाठी दोन वाजता उठवीत असत. मुलगा अभ्यासास बसला म्हणजे ते झोपी जात. तेलाच्या मिणमिणीत दिव्याशेजारी ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळता वळता भीम अभ्यास करून

पहाटे पाच वाजता पुन्हा झोपत असे. सकाळी उठे. स्नान

मी शाळेत जाईन.

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

07 Nov, 05:00


♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी 4110 उमेदवार रिंगणात..

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

06 Nov, 17:04


संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून डेमोक्रॅटिक पक्षाच्या  कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत झाली.

या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला असून ते 47वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

05 Nov, 16:20


वाटा सापडत जातील,आपण शोधत जायचं,
माणसं बदलत जातील, आपण स्विकारत जायचं,
परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायच,
येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं,
विश्वास तोडून अनेकजण जातील, आपण सावरत जायचं,
प्रसंग परिक्षा घेत जाईल, आपण क्षमता दाखवत जायचं..

💥 Good night  💥

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

05 Nov, 08:58


♦️महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक संजय वर्मा..

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

05 Nov, 08:57


नवी दिल्ली येथे पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद :

💥पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद (ABS) 5-6 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.
सांस्कृतिक मंत्रालय आणि इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन यांनी आयोजित केलेल्या या समिटमध्ये 'आशिया मजबूत करण्यामध्ये बुद्ध धम्माची भूमिका' या थीमवर लक्ष केंद्रित केले आहे.

भारताचे माननीय राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
💥शिखर परिषदेचा उद्देश :

💫संघाचे नेते, विद्वान, तज्ञ आणि विविध बौद्ध परंपरेतील अभ्यासकांना एकत्र आणण्याचे या शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे.
💫ते संवादाला प्रोत्साहन देण्याचा आणि समजूतदारपणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करते.
💫हा कार्यक्रम संपूर्ण आशियातील बौद्ध समुदायासमोरील समकालीन आव्हानांना सामोरे जाईल.
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

05 Nov, 06:14


♦️ राज्यात कोणत्या साली किती टक्के मतदान?

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

05 Nov, 03:39


𝑻𝒉𝒆 𝑮𝑶𝑨𝑻. 𝑻𝒉𝒆 𝑳𝒆𝒈𝒆𝒏𝒅. 𝑻𝒉𝒆 𝑲𝒊𝒏𝒈. 🙇👑

His skills, 𝘂𝗻𝗿𝗶𝘃𝗮𝗹𝗲𝗱. 🙌
His dedication, 𝘂𝗻𝗺𝗮𝘁𝗰𝗵𝗲𝗱. 💪
His greatness, 𝘂𝗻𝗱𝗲𝗻𝗶𝗮𝗯𝗹𝗲. 🏆
His legacy, 𝗶𝗻𝗳𝗶𝗻𝗶𝘁𝗲. ♾️

𝗛𝗮𝗽𝗽𝘆1️⃣8️⃣𝘅2️⃣ = 3️⃣6️⃣𝘁𝗵 𝗕𝗶𝗿𝘁𝗵𝗱𝗮𝘆 𝗩𝗶𝗿𝗮𝘁! ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

04 Nov, 12:29


💥💥पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आल्यानंतर पोलीस महासंचालक पदाचा तात्पुरता कारभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

04 Nov, 05:04


दिवाळी संपलीये पोरांनो... आत्ता परतीच्या प्रवासाला लागा..घरच्यांसोबत दोन-चार दिवस काढले की घरातून पाय निघत नाही आपला.. घर सोडताना भयंकर रडायला येतं प्रत्येकाला पण पुढच्या वर्षी दिवाळीला समाधानाने यायचं असेल तर आज घर सोडावं लागेल ना??.. इथं त्याग केल्याशिवाय काहीचं मिळत नाही हे मी वारंवार सांगत असतो..असो आत्ता कसलाही विचार करू नका.. परीक्षा तोंडावर आहे..ताकदीने परीक्षा द्यायची आहे एवढंच सध्या डोळ्यासमोर असावं तुमच्या... लगे रहो 🌿

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

03 Nov, 14:44


NTPC/ RRB/SSC-GD/TET
BMC/मुंबई पोलीस/अंगणवाडी पर्यवेक्षिका... यासाठी E-BOOK किंवा NOTES हवी असेल....
तर 8483815942 या नंबर वरती कॉल करा..... वरील कोणत्याच एक्झाम चे प्रश्न जाणार नाहीत याची पूर्ण दक्षता घेऊन नोट्स आणि ई -बुक बनवला आहे...
Kiran sir

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

03 Nov, 10:04


मोबाईल युगात हल्ली पुस्तक वाचन हा एक आश्चर्यकारक उपक्रम होत चालला आहे.! 📚📷

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

03 Nov, 06:13


MPSC आयोगाच्या प्रोफाइल वर जर तुमचा सध्याचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर..

लिंक : 👇👇👇

http://65.2.95.159/mpsconline/public/candMobChng

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

03 Nov, 02:40


🔰आपला आनंद जर दुसऱ्यावर अवलंबून असेल तर तो आपल्याला कधीच सापडणार नाही; पण आपला आनंद आपण स्वत:च निर्माण केला तर तो कधीच हरवणार नाही...

  ❤️❤️  शुभ सकाळ   ❤️❤️

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

02 Nov, 16:09


❇️ ऑक्टोंबर 2024 चालू घडामोडी ❇️

1.नुकतेच कोण गरुड एरोस्पेसमध्ये ब्रँड अँबेसिडर म्हणून पुन्हा सामील झाले ?
उत्तर – एम एस धोनी

2.नुकतेच इस्लामाबाद पाकिस्तान येथे एस सी ओ कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्मेंट मीटिंग चे कितवे संस्करण पार पडले ?
उत्तर – 23 वे

3.अलीकडेच भारताने कोणत्या देशाला वैद्यकीय पुरवठा स्वरूपात मानवतावादी मदत पाठवली ?
उत्तर – लेबनॉन

4.कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच संस्कृत हा अनिवार्य विषय म्हणून घोषित करण्याची योजना आखली ?
उत्तर – उत्तराखंड

5.जी-7 च्या संरक्षण मंत्र्यांची पहिली बैठक कुठे झाली ?
उत्तर – इटली

6.कोणत्या तारखेदरम्यान 21 वी पशुगणना होणार आहे ?
उत्तर - 25 ऑक्टोबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025

7.सोळाव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले ?
उत्तर - रशिया.

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

02 Nov, 08:06


➡️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात नऊ कोटी 70 लाख 25 हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली असून, विविध वयोगटातील मतदार वरील प्रमाणे आहेत.

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

01 Nov, 17:05


भारतीय संघाकडून कसोटीत सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज
▪️जडेजा हा कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.
▪️जडेजाने आतापर्यंत 312 गडी बाद केले आहेत.
▪️या यादीत माजी गोलंदाज अनिल कुंबळे अव्वल स्थानी आहेत.त्यांच्या नावे कसोटीत 619 गडी बाद करण्याची नोंद आहे.

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

01 Nov, 13:53


💥 पहा पोरांनो... आपण गव्हर्नमेंट फोर्स ची तयारी करत आहोत तरी फटाके दिवे लाइटिंग अशा आपल्या शरीराला इजा होईल अशा गोष्टीपासून थोडा दूर राहा कारण आपण गव्हर्नमेंट फोर्स तयारी करत आहोत आपल्यासाठी मेडिकल फार महत्त्वाचा असतं...(नाहीतर एखादा शहाणा म्हणेल तोंडात लक्ष्मी बॉम्ब नाहीतर सुतळी बॉम्ब वाजवतो.... तसा शहाणपणा करू नका) असं आपल्या शरीराला इजा होईल अशी कोणतीच गोष्ट करू नये... कारण काही क्षणिक सुखासाठी आपला जे स्वप्न आहे ते पूर्ण नाही होणार.... अशी कोणतीच गोष्ट करू नका.…




तसंच सर्वांनाच दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा...😊🙏🙏

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

31 Oct, 13:24


💥रेल्वे परीक्षा सुधारित वेळापत्रक जाहिर झाले आहे.

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

31 Oct, 10:53


🔰राष्ट्रीय एकता दिवस : 31ऑक्टोबर.

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो.
सुरुवात 2014

भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री

या दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. गुजरातच्या केवडियामध्येही या दिनानिमित्त परेड आयोजित करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे याठिकाणी ‘रायगडा’ची प्रतिकृती साकारण्यात आल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

29 Oct, 10:01


भारतातील पहिले लेखकांचे गाव डेहराडून येथे उघडले.

🔹रमेश पोखरियाल निशंक यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या दूरदृष्टीने प्रेरित असलेल्या साहित्यिक आणि कलात्मक प्रतिभेला वाव देण्यासाठी 'लेखकांच्या गावा'चे उद्घाटन केले.

🔸लॉन्च इव्हेंटमध्ये 65 हून अधिक देशांतील प्रतिनिधींसह तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय साहित्य, कला आणि संस्कृती महोत्सवाचा समावेश आहे.

🔹गावाच्या वैशिष्ट्यांमध्ये लायब्ररी, योग केंद्र आणि हिमालयीन संग्रहालय, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक वारसा यांचा समावेश होतो.
💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

29 Oct, 02:22


जनगणना पुढील वर्षी 2025👍
💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

28 Oct, 17:15


*ध्येय उंच असलं की झेप देखील उंच घ्यावी लागते.... ही झेप खूप उंच असेल.... त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी कोणताही दिवाळी किंवा कोणताही दसरा हा सण नसून आपल्यासाठी फक्त आपल्या अंगावर पडलेला गुलाल ज्या दिवशी असेल तोच आपला खरा मोठा उत्सव असेल.... म्हणून सांगत आहे अभ्यास करत रहा*....,..#kiran sir

Gn.....

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

27 Oct, 20:22


📖देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड

📖देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

📖देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य -महाराष्ट्र

📖देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

📖देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

📖देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य -तामिळनाडू

📖देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर

📖देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प -कांडला (गुजरात)

📖देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

📖देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

📖देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ - राज्यस्थान

📖देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

📖देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

📖देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

📖देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

📖•देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

📖देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

📖देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील  पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

📖देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली

📖देशातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

27 Oct, 17:25


🔰यश मिळेल पण त्यासाठी नियतीशी टक्कर घ्यायची हिम्मत पाहिजे.

💥GN💥

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

27 Oct, 13:53


गरज नसेल तरी विकत घ्या अशा लोकांकडून, कारण ते श्रीमंत होण्यासाठी नाही, तर जगण्यासाठी धडपडत असतात🙏🏻

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

26 Oct, 17:57


कधी तुम्हाला खूप प्रश्न पडत असतील  
         की उद्या कस होईल, हे मला जमेल का, 
         आज काय चूका झाल्या, हे विचार
         तुम्हाला झोपू देणार नाही, पण काय
         असतं ना काही गोष्टी आपणच
         संपवायच्या असतात की जे होईच 
         होत ते झाल, आणि जे होणार आहे  
         त्याला अजून वेळ आहे,
            होईल सगळं ठीक....
💥  Good_Night  💥

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

26 Oct, 12:02


🔴निवडणूक आयोगाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार MS Dhoni ची आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

26 Oct, 06:08


♦️अमेरिकेतील मानाचा छायाचित्रण पुरस्कार कोल्हापूरच्या मंगेश देसाई यांना जाहीर

👉 स्पर्धेतील 'ग्रँड प्राईज' या मुख्य पुरस्काराने सन्मान

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

25 Oct, 18:11


राज्यात पशुगनणेला सुरुवात

▪️राज्यात 21 व्या पशुगनणेला सुरुवात झाली आहे.
▪️ही पशुगणना प्रथमच ऑनलाइन अर्थात ॲपद्वारे करण्यात येणार आहे.
▪️ यामध्ये 16 पशुधन जाती व कुक्कुटादी पक्ष्यांची प्रजातीनिहाय नोंदी घेण्यात येणार आहेत.
▪️भारताची पहिली पशुगणना डिसेंबर 1919-एप्रिल 1920 मध्ये झाली होती.
▪️दर पाच वर्षांनी एकदा आयोजित केली जाते.
▪️कृषी मंत्रालय,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभाग,भारत सरकार यांच्याद्वारे पशुधन गणना केली जाते.
▪️आतापर्यंत 20 पशुगणना करण्यात आल्या आहेत.
▪️2019 मध्ये झालेल्या 20 व्या गणनेनुसार,भारतातील एकूण पशुधन संख्या 535.78 दशलक्ष आहे.
▪️एकूण गोवंश लोकसंख्या 302.79 दशलक्ष होती.
▪️पशुधना मध्ये गायी, म्हशी,शेळ्या, मेंढ्या,डुकरे,गाढवे,घोडे,शिंगरे,खेचरे व उंट यांची गणना केली जाणार आहे.
▪️तर कुक्कुट व कुक्कुटादी पक्ष्यांमध्ये कोंबड्या,बदके,टर्की,क्चेल,शहामृग,गिनी,इमू,हंस तसेच तसेच पाळीव कुत्रे,हत्ती व ससे आणि भटक्या गायी व कुत्रे यांचीदेखील गणना करण्यात येणार आहे.
▪️पशुधनाच्या विकासासाठी 2014-15 मध्ये   राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) सुरू


Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

24 Oct, 17:56


♦️ ब्रिक शिखर परिषद 2024 कझान ( रशिया ) येथे आयोजित केली आहे.

👉 हि शिखर परिषद 16 वी वार्षिक ब्रिक्स शिखर परिषद आहे,

👉 ब्रिक्स शिखर परिषद दिनांक 22 ते 24 ऑक्टोबर 2024 या कालावधीत रशियातील कझान येथे होत आहे. 

👉इजिप्त , इथिओपिया , इराण आणि संयुक्त अरब अमिराती यांचा सदस्य म्हणून समावेश करणारी ही पहिली BRICS परिषद आहे.

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

24 Oct, 17:56


🛑 RRB REVISED CALENDAR

📅 RRB JE CBT-I EXAM DATE
👇👇
13 TO 17 DECEMBER 2024

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

24 Oct, 06:39


❇️ आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स प्रश्न & उत्तरे

प्रश्न.1) जगातील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोण ठरली आहे ?

उत्तर - श्रीजा अकुला

प्रश्न.2) 2026 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे ?

उत्तर - हॉकी

प्रश्न.3) नुकतेच चर्चेत असलेले दाना(उदारता) हे चक्री वादळ कोणत्या दोन राज्यांना धडकणार आहे ?

उत्तर - पश्चिम बंगाल आणि ओडीसा

प्रश्न.4) कोणत्या देशाने हवेतून जमिनीवर मारा करणारे इझडेलीये 305 हे क्षेपणास्त्र विकसित केले ?

उत्तर - रशिया

प्रश्न.5) औषध नियामक प्राधिकरणांच्या (ICDRA) 19व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले ?

उत्तर - नवी दिल्ली

प्रश्न.6) भारतीय तटरक्षक दलाचे 26 वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला ?

उत्तर - परमेश शिवमणी

प्रश्न.7) नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ?

उत्तर - 21 ऑक्टोबर 2024

प्रश्न.8) नुकतेच भारत आणि कोणत्या देशा दरम्यानचा सीमावाद संपून "गस्त करार" ला मंजुरी देण्यात आली आहे ?

उत्तर - चीन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

24 Oct, 06:36


♦️ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा - 2026

👉आवृत्ती - 23 वी

👉 ठिकाण - ग्लासगो ( स्कॉटलंड ) येथे होणार

👉 बर्मिंघम ( इंग्लंड ) येथे 2022 ची राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित केली होती.

👉 हि स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते.

👉 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात - 1930 (हॅमिल्टन,कॅनडा)

👉भारातचा सहभाग - 1934 (लंडन,इंग्लड)

👉भारतात नवी दिल्ली येथे 2010 रोजी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती.

👉भारतासाठी पहिले पदक जिंकणारा खेळाडू - राशिद अनवर ( 74 किलो वजनी गट फ्रि स्टाईल कुस्तीमध्ये )

👉भारतासाठी पहिल्या पदक जिंकणाऱ्या महिला खेळाडू - अमी घिया आणि कंवल सिंह (बॅडमिंटन 1978 - 🥉कास्यंपदक)

👉 2026 ग्लासगो संयोजक समितीने हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट आणि नेमबाजी या महत्त्वाच्या खेळांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

23 Oct, 18:06


🔴प्रयत्न करणे सोडू नका
तुम्ही आधीच खूप काही सोसलय
आता वेळ आली आहे ती म्हणजे
बक्षीस मिळवण्याची

      💥💥 शुभ रात्री   💥💥

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

23 Oct, 17:59


परीक्षाभिमुख महत्वाचे :

▪️निधन झालेल्या व्यक्ती :

◾️रामोजी राव : रामोजी फिल्म सिटी संस्थापक
◾️फ्रान्सिस दिब्रिटो : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिध्द साहित्यिक
◾️डॉ.विद्युत भागवत : ज्येष्ठ स्त्रीवादी  लेखिका, स्त्री चळवळीच्या अग्रणी कार्यकर्त्या 
◾️विल्यम अँडर्स : माजी अंतराळवीर ( अपोलो 8)
◾️यशवंत केशव पेंढरकर : विको कंपनी चे अध्यक्ष
◾️अमोल काळे : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष
◾️क्षितीज झारापकर : अभिनेते आणि दिग्दर्शक
◾️डेव्हिड जॉन्सन : भारताचा माजी क्रिकेटपटू
◾️फ्रँक डकवर्थ : क्रिकेटमधील डकवर्थ-लुईस नियम बनवणारे नियम बनवणारे
◾️सुशील कुमार मोदी : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री
◾️फिरोज खान : प्रसिद्ध अभिनेते
◾️मोहनसिंग राजपाल : पुण्याचे माजी महापौर (पुण्याचे पहिले शीख महापौर)
◾️जॉन लँडाऊ : प्रसिद्ध चित्रपट निर्माते (टायटॅनिक' आणि 'अवतार' ( ब्लॉकबस्टर सिनेमांचे निर्माते )
◾️सतीश जोशी : ज्येष्ठ अभिनेते
◾️मीना चंदावरकर : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका
◾️ होल्झेनबाइन:  माजी फुटबॉलपटू
◾️ मुनव्वर राणा : प्रसिद्ध शायर
◾️ स्मृती बिस्वास : ज्येष्ठ अभिनेत्री
◾️ बिशन सिंग बेदी : भारताचे महान फिरकीपटू
◾️माणिक भिडे : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका
◾️चार्ली मुंगेर : अमेरिकेतील प्रसिद्ध गुंतवणूकदार
◾️पिलू रिपोर्टर : आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध अम्पायर
◾️सुब्रतो रॉय : सहारा इंडिया समूहाचे प्रमुख

💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

23 Oct, 17:57


परिक्षाभिमुख महत्वाचे निर्देशांक :

◾️हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 : 7 वा क्रमांक
◾️ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2024 : 29 वा क्रमांक
◾️मानव विकास निर्देशांक (2023-2024) : 134 वा क्रमांक
◾️ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 : 111 वा क्रमांक
◾️ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2023 : 126 वा क्रमांक
◾️लैंगिक असमानता निर्देशांक 2022 (GII) : 108 (193 पैकी)
◾️ग्लोबल पीस इंडेक्स 2024 : 116 वा क्रमांक
◾️जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023 : 13 वा क्रमांक
◾️हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2024 :  82 वा क्रमांक
◾️जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक : 40 वा क्रमांक
◾️आंतरराष्ट्रीय आयपी निर्देशांक : 42 वा क्रमांक
◾️लोकशाही निर्देशांक 2023 : 41 वा क्रमांक
◾️मिलिटरी स्ट्रेंथ रँकिंग 2024 : 4 था क्रमांक
◾️WEF चा ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स : 129 वा क्रमांक
◾️जागतिक सायबर क्राइम इंडेक्स :10 वा क्रमांक
◾️जागतिक वायु गुणवत्ता अहवाल 2024 : 3 (सर्वात प्रदूषित तिसरा देश)
◾️Corruption Perceptions Index 2023 : 93 वा क्रमांक
◾️ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2023 : 63 वा क्रमांक
◾️Artificial Intelligence Preparedness Index 2024 : 72 वा क्रमांक
◾️Sustainable Development Report 2024 : 109 वा क्रमांक
◾️भारतात थेट परकीय गुंतवणुक 2023 : 15 वा क्रमांक
◾️हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 : 3 रा क्रमांक (67 युनिकॉर्न स्टार्टअप्स)
◾️World Happiness Index 2024 : 126 वा क्रमांक
◾️लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 : 38 वा क्रमांक
◾️ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 :  40 वा क्रमांक
◾️जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2024 : 159 वा क्रमांक

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

22 Oct, 07:18


तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल की भारतीय नोट प्रिंट साठी साधारण किती खर्च येत असेल ?

10 ₹ ची नोट - 0.95 ₹
20 ₹ ची नोट - 0.95 ₹
50 ₹ ची नोट - 1.13 ₹
100 ₹ ची नोट - 1.77 ₹
200 ₹ ची नोट - 2.37 ₹
500 ₹ ची नोट - 2.29 ₹

Note : Do not try at home 😅

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

22 Oct, 04:04


गोव्याच्या मलायका वाझ ला मिळाला 'ग्रीन ऑस्कर' पुरस्कार

◾️ब्रिस्टलमध्ये हा पुरस्कार सोहळा झाला
◾️पुरस्काराचे नाव : वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार
◾️याला आंतरराष्ट्रीय वन्यजीव माहितीपट आणि टीव्ही उद्योगाचा ‘ग्रीन ऑस्कर’ म्हणून संबोधले जाते.
◾️मलायकाला तिच्या 'द सॅक्रिफाइस झोन' नावाच्या माहितीपटासाठी मिळाला.
◾️निसर्ग संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना मिळणारा हा एक आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
◾️ऑन-स्क्रीन टॅलेंट श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले.
◾️मलाइका वाझ ही ‘नॅशनल जिओग्राफिक’ पुरस्कृत संशोधिका आहे.
◾️तिला गोवा राज्य युवा पुरस्कार
◾️राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे.

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

21 Oct, 09:39


🔰जम्मू आणि काश्मीर मंत्रिमंडळाने राज्याचा दर्जा पुनर्स्थापनेचा ठराव मंजूर केला.

🔹मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत, CM ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारने जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याची केंद्र सरकारला विनंती करणारा ठराव मंजूर केला.

🔸नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 42 जागा जिंकल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सने तयार केलेला ठराव अब्दुल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना सादर करणार आहेत.

🔹मुख्यमंत्री: ओमर अब्दुल्ला
🔸उपमुख्यमंत्री : सुरिंदर चौधरी

💥💥💥💥💥💥💥💥💥💥

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

21 Oct, 06:29


🙏🙏🙏

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

20 Oct, 14:46


विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये 9000 धावांचा टप्पा गाठणारा चौथा भारतीय फलंदाज
💫विराट कोहलीने कसोटीत 9 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. 💫विराट कोहलीने 197
कसोटी डावात 9 हजार धावा पूर्ण केल्या
आहेत.
💫सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांच्यानंतर असा कारनामा करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे.
💥💥💥💥💥💥💥💥💥

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

20 Oct, 09:55


➡️ महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सुरूवात: 14 ऑक्टोबर 2024
शेवट :     04 नोव्हेंबर 2024

➡️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सुरूवात: 14 ऑक्टोबर 2024
शेवट :      04 नोव्हेंबर 2024

➡️एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)2024 जाहिरात
सुरूवात:   14 ऑक्टोबर 2024
शेवट :        03 नोव्हेंबर 2024
अर्ज लिंक : CLICK HERE

➡️आदिवासी विभाग भरती 2024
सुरूवात: 12 ऑक्टोबर 2024
शेवट :     02 नोव्हेंबर 2024
अर्ज लिंक: CLICK HERE

➡️समाजकल्याण विभाग भरती 2024
सुरूवात : 10 ऑक्टोबर 2024
शेवट :       11 नोव्हेंबर 2024
अर्ज लिंक : CLICK HERE

➡️ अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क जाहिरात 2024 जाहिरात 
सुरूवात: 23 सप्टेंबर 2024
शेवट:      22 ऑक्टोबर 2024
अर्ज लिंक: CLICK HERE

➡️महिला व बाल विकास आयुक्तालय
महाराष्ट्र राज्य पुणे जाहिरात 2024
सुरूवात:   14 ऑक्टोबर 2024
शेवट :        03 नोव्हेंबर 2024
अर्ज लिंक: CLICK HERE

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

20 Oct, 09:53


♦️राष्ट्रिय महिला आयोग अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची निवड..

👉 त्यांचा कार्यकाळ आणि त्यांच्या विषयी महत्वपूर्ण माहिती.

Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"

19 Oct, 19:53


सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश 👇👇👇

१)48 वे सरन्यायाधीश :- एन व्ही रमणा   
२)49 वे सरन्यायाधीश :- उदय लळित 
३)50 वे सरन्यायाधीश :- डी वाय चंद्रचूड    
४)51 वे सरन्यायाधीश :- संजीव खन्ना (शिफारस)

ले सरन्यायाधीश - हिरालाल कानिया

💥सर्वोच्च न्यायालय ( कलम - 124 )

🔹स्थापना - 26 जानेवारी 1950
🔸घोषवाक्य :- येतो धर्मस्ततो जय: ॥
🔹कामकाजाची भाषा :- इंग्रजी   
🔸सदस्य संख्या :- (33+1) 34
🔹 नेमणूक - राष्ट्रपती
🔸 शपथ - राष्ट्रपती
🔹 कार्यकाळ - 65 व्या वर्षापर्यंत

14,102

subscribers

1,246

photos

32

videos