𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂 @mithunpawar Channel on Telegram

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

@mithunpawar


🌸 MPSC I UPSC🌸

👉 प्रयत्न नव्हे, निष्कर्ष महत्त्वाचे.
👉 To the Point... मोजकच.
👉 Material पलीकडील काही अनुभव.
👉 तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर

www.youtube.com/@PROJECTCHHAYA


WhatsApp: 9970841952

दर्जा पहा, खाञी करा आणि मगच ज्वाईन व्हा:

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂 (Marathi)

आजच्या सुयोगात, आपल्याला परिपूर्ण नोकरी सोडण्याची उत्कृष्ट संधी मिळावी शकते. '𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂' ही टेलीग्राम चॅनल एक अद्वितीय स्रोत आहे ज्याच्या माध्यमातून आपण MPSC आणि UPSC परीक्षांसाठी तयारी करू शकता. इतके नक्की करण्याच्या निर्देशांकडे तुम्हाला PROJECTCHHAYA च्या YouTube वरील व्हिडिओज देखायला मिळतील. यात तुम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाच्या अशा टिप्स आणि अद्वितीय मार्गदर्शनांमध्ये मदत मिळेल. तसेच, इतर मात्रिमुळेतील अनुभवांचे विचार आणि नुसार तुमच्या सर्व समस्यांचे उत्तर दिले जातील.

आता तुम्ही सोडवणं सुरू करू शकता, तुमच्या नोकरीसाठी तयारी कसी करावी, कसे परीक्षा दिल्यानंतर आपलं करिअर कसा विकसावावं याच्याविषयी सर्व गरजेच्या माहितीच्या स्रोतांचे लाभ घ्यावे. तसेच, तुमच्याकडून तुमच्याकडे आलेल्या काही वास्तविक माहितीची गरज असू देतील किंवा प्रश्नांचं उत्तर दिलेल्या जातील.

तुमच्याच तयारीची दिशा साधून तुमचा प्रत्यकाष्टवीचं लक्ष्य साधल्यावर, सर्व योग्यतेवर, तुमच्याच व्यक्तिगत विकासावर आणि तुमच्या भविष्यावर खास बल देणारे स्रोत आहे '𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂'. आता घेऊन या अद्वितीय सामर्थ्यशी संरचनावत जाऊन आणि तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शका. तुमच्याकडोबाहेर सर्व काही मिळविण्याची योग्यता आहे!

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

22 Jan, 08:18


❇️ UPSC Advt. 2025

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

21 Jan, 14:08


🔴 अन्न आणि औषध प्रशासन सेवा

Merit List ✔️


@mithunpawar

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

17 Jan, 04:28


🔶 SSM 2024 आणि इतर....

@mithunpawar

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

17 Jan, 04:21


👆👆👆👆

आयोगाने काल शिरस्ता पाळला नाही. पायंडा मोडला. त्यांच्यावर असे कोणते बंधन नाही. मेरिट लिस्ट तयार आहे हे सर्वश्रुत आहे. मात्र ती योग्य खातरजमा करूनच वेबसाईट वर अपलोड केली जाईल. कसली खातरजमा ? तर एखादी कोर्ट केस. त्याच्या हंगामी ऑर्डर असे तपासून मग अपलोड होईल.

या माहितीला कोणताही आधार नसतो. सर्व ऐकीव.

MPSC पेंशन्स शिकवते, नमवते असा अनुभव आहे. मुद्दाम नाही पण असे काही तांत्रिक अडचणीमुळे पण होत असेल. परंपरेला साजेसेच म्हणावे लागेल. FSO Exam प्रक्रियेला सुरुवाती पासूनच ग्रहण लागले होते काल ते आणखी गडद झाले. पुन्हा प्रत्यय आला.

या आठवड्यातील हा आज शेवटचा दिवस. प्रतिक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीच.

@mithunpawar

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

16 Jan, 07:27


👆👆👆👆

🔶 महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त ( अन्न ) आणि अन्न सुरक्षा अधिकारी ( FSO ) पदांसाठी पार पडलेल्या परीक्षेतील मुलाखतींचा आज शेवटचा दिवस आहे. आज केवळ 31 विद्यार्थांचा इंटरव्ह्यू होता. त्यांनतर आयोगाच्या शिरस्त्या नुसार या परीक्षेची General Merit List आजच येण्याची दाट शक्यता आहे.

यास्तव आयोगाकडे डोळे लावून बसलेल्या परीक्षार्थींना खूप खूप शुभेच्छा.

@mithunpawar

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

09 Jan, 12:08


विदिन टाईम !

@mithunpawar

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

08 Jan, 04:17


🔷 HMPV

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

01 Jan, 05:03


🎯 TARGET SSM 2024

1) यासाठी अगोदर Combine पूर्व नंतर प्रवेश देईन असे साधारण बोललो होतो मात्र तारीख पुढे गेल्याने तसा प्रवेश देता येणार नाही. सुरुवातीचे दिवस गेल्या नंतर Techniques बाबत इतरांच्या बरोबर येता येत नाही. 2 Feb पर्यंत गोष्टी खूपच पुढे गेलेल्या असतील.

2) 1 ते 3 जानेवारी या दोन तीन दिवसांत केवळ दोन ते तीन जणांना ( क्षमता पाहूनच ) यात प्रवेश मिळू शकतो. पण काही नियम वेगळे असतील. ते बोलून ठरविले जाईल. या ग्रुप मद्ये विशिष्ट संख्येपेक्षा जास्त लोक घेता येत नाहीत कारण नंतर Descriptive पेपर्स आणि कोणी मागे पुढे राहिले तर त्याला वेळ देण्यातून वेळ उपलब्ध होत नसतो म्हणून असे आहे. याला अन्य ही कारण आहे.

3) या तीन दिवसांनंतर या ग्रुप मध्ये पुढे कोणालाच प्रवेश नसेल.

📍 @mithunpawar

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

01 Jan, 04:56


🔶 या ग्रुप मध्ये नवीन लोकांना केवळ आजच प्रवेश करता येईल.

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

01 Jan, 04:44


🎯 2 फेब्रुवारी

🔶 लक्ष 1 ते 14 जानेवारी नियोजन

📍
@mithunpawar

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

30 Dec, 15:39


❇️ अर्थसंकल्प प्रकार...In short but sufficient

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

30 Dec, 04:34


❇️ FRBM...In short but sufficient

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

26 Dec, 05:42


जे आज Project CHHAYA च्या सानिध्यात आहेत त्यांचे साठी...🌿

📍@mithinpawar

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

26 Dec, 02:55


🟧 COMBINE B: तुम्हाला हे करावेच लागेल...

1) तुम्ही खूप वर्षांपासून स्टडी करत आहात आणि फोकस Combine B आहे.

2) UPSC किंवा राज्यसेवा करत होता. पण आता Combine करत आहात.

3) कोठेतरी Revision बॅचेस केलेल्या आहेत. सर्व मटेरियल रेडी आहे.

4) Current चांगले केलेले आहे, इतरांपेक्षा तुमची पकड आहे असे तुम्हाला वाटते.

5) मागील काही दिवस भरपूर चांगला अभ्यास केलेला आहे. नक्कीच चांगला परफॉर्मन्स करणार अशी आतून भावना आहे.

.
.
.
.
असे काहीही असो.

जोवर तुम्ही..

1) गाठोडे ही कॉन्सेप्ट आणि वारंवार भेट देणे अंमलात आणत नाही.

आणि

2) अगदी आयोगाप्रमाणे वेळ लावून पूर्वी आयोगाच्या आणि आता बाजारातील टेस्ट सोडवत नाही. Correct Evaluation करत नाही, चुका शोधून त्यावर काम करत नाही.

तोवर तुम्हाला अपेक्षित रिझल्ट येणार नाही...

नाहीच!

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

24 Dec, 15:23


♦️MPSC Interview: निरीक्षणे आणि सल्ला

1) प्रत्येक गोष्ट माहितीच हवी असा अट्टहास अजिबात नको. विद्यार्थ्यांचे वय आणि अनुभव पॅनल सदस्यांच्या तुलनेत अगदीच नगण्य किंवा जवळपास शून्य असतो. याची तिथे आयडिया असते. तेव्हा उत्तरे नाही आलीत तरी अतिरिक्त ताण नको किंवा अनुभव नसताना तो आहे असा दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न ही नको.

2) फारच त्रोटक किंवा खूप पाल्हाळीक बोलणे टाळा. प्रश्न विचारल्या नंतर मुद्देसूद बोला. कमी बोलण्याचा अर्थ येत नाही किंवा अधिक बोलण्यातून शो ऑफ करण्याचा इरादा असा अर्थ निघू शकतो. येत नसेल तर MCQ प्रमाणे अंदाज, elimination असा सवयीचा प्रकार टाळा. येत असेल तरच बोला, नसेल तर नाही असा नम्र सूर हवा.

3) मागील transcript मधून इतरांनी दिलेली उत्तरे कॉपी करू नका. प्रश्न तोच आला तरी उत्तर तुमच्या अनुभवातून असू द्या. तुमचे हवे. एक दोन दिवसांत दृष्टीकोन बदलता येत नाही. Positive असा / सकारात्मक असा.

4) तुम्ही स्वतः कोण आहात? स्पेशालिटी काय? प्रोफाइल, पदवी, छंद, इच्छुक पोस्ट आणि आजची महत्वाची बातमी या अनुषंगाने येणारे प्रश्न नक्की तयार करा. अशा area वरील प्रश्नांचा advantage घेता यायला हवा.

5) तुम्ही अनेक परीक्षार्थी आहेत त्यांच्यातून सिलेक्ट होवून इथवर आला आहेत हे बिलकुल विसरू नका. प्रत्येक माणूस अपूर्ण असतो. प्रत्येकाची कशी खासियत असतेच असते. त्यामुळे कसलाच न्यूनगंड नको. स्वतः वर विश्वास ठेवा. प्राप्त परिस्थितीत आपण चांगले बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत , बाकी आपल्या हाती काही नाही हेच वास्तव माना. हसतमुख असा. ताण टाळा. जे आहे ते आहे. ते ठामपणे मांडा.


मिथुन पवार
Project CHHAYA MPSC UPSC
Telegram:
t.me/mithunpawar
WhatsApp: 9970841952

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

24 Dec, 15:19


♦️ Interview/ मुलाखत कोणतीही...

1) Be Natural...Be Original. जसे आतून आहात तेच बाहेर reflect होवू द्या. बाकी टप्पे पार करून आला आहात म्हणजे तुम्ही शून्य नसता. काहीतरी असते म्हणून मुलाखतीस आला आहात. म्हणून जसे आहात तसेच राहा.

2) Be honest. प्रामाणिक असा. तसुभरही छक्के पंजे नकोत. जे आहे ते आहे, नाही ते नाही. खोटेपणा बुजुर्ग लोकांच्या सहज लक्षात येतो. तुमचा स्वतःस तिथे प्रेझेन्ट करण्याचा प्रयत्न प्रामाणिक आहे हे त्यांच्या चटकन लक्षात येते. ते डायरेक्ट भिडते. नक्कीच गुण वाढतात.

3) पूर्वग्रह टाळा. कोणत्याच बाबतीत पूर्वग्रह नको. जसे की, अमुक panel असे, अमुक तसे. तसेच ओळख करून द्या, छंद सांगा, पदवीचा प्रशासनात उपयोग सांगा असे प्रश्न मला विचारतीलच असाही पूर्वग्रह नको. कसलाच पूर्वग्रह नको किंवा अपेक्षा नको. तसे तिथे प्रत्यक्षात झाले नाही तर हिरमोड होवून मग आपण बचावात्मक होतो. जे गुणांसाठी मारक असते.

4) चांगल्या सूचना / सल्ले स्वीकारण्याची तयारी असू द्या. स्वभावा बाबत तुमचे जवळचे, घरातील, मित्र मैत्रिणी यांनी दिलेल्या suggestions खूप सकारात्मक घ्या. आत्तापासून त्यानुसार बदल करायचा प्रयत्न करा. बदला अन्यथा बदल तुमच्यावर थोपवला जातो. स्वभावाला औषध नसते हे जरी खरे असले तरी आवश्यक असेल तिथे आपण नक्की थोडेसे बदलू शकतो.

5) Be Positive. सकारात्मक असा. आपण असेच. आपण तसेच. आपल्यातील न्यूनत्वाची विनाकारण सतत उजळणी नको. जे आपण चिंतीतो तेच घडते हे नेहमीच लक्षात असू द्यात. मला टफ जाणार , मला टफ जाणार असे घोकाल तर तेच घडेल. म्हणून सकारात्मक असा. Panel तुमच्या बाबत सकारात्मकच असते. तुम्ही ही त्यांचे बाबत तसेच राहा.

6) दडपण / भीती नको. तुम्ही त्यांच्याहुन खूप लहान आहात, अननुभवी आहात याची त्यांना कल्पना असते. त्यामुळे काही आले नाही, चुकले तर सर्व संपत नाही. घाबरु नका. तसेच तुम्हाला आत्ताच अधिकारी असल्यासारखे जमायला हवे असेही नसते. त्यामुळे विनाकारण प्रौढत्व आणू नका. त्यातील फोलपणा लगेच कळून येतो.

7) या संपूर्ण प्रक्रियेत गरज पडेल तिथे दोष स्वतःकडे घ्या. कोणावरही ब्लेम करू नका. आरोप नको. आई वडील , मित्र, शिक्षक किंवा कोणीही यांना दोष देवू नका. तसा नकारात्मक टोन नको. तात्कालिक परिस्थितीत तसा निर्णय घेणे भाग पडले. त्याचा कसला पश्चाताप नाही अशी भूमिका असू द्या.

8) काहीही विचारतात या भ्रमातून बाहेर पडा. Telegram वरती फिरणाऱ्या ट्रान्सस्क्रिप्ट पाहिल्या तर तसा प्रश्न त्या उमेदवाराला च का बरे विचारला असेल याची कारणमीमांसा नक्की करता येते. त्यात सातत्य असते. रोजच्या जगण्याशी निगडित ती गोष्ट असते. विनाकारण तो प्रश्न. नसतो. हे अगोदर समजून घ्या मग ताण हलका होईल.

9) Be Specific. गोलमाल नको. शक्यतो प्रश्न नीट ऐकून तीन ते चार वाक्यात बोलण्याची सवय करा. जे विचारले आहे त्या मुद्याला धरून बोला. पसरट नको. To the point असा. पाल्हाळीक बोलणे टाळा. फिरवून फिरवून बोलू नका. समोरच्या व्यक्तीस ते लगेच कळून येते.

10) सरते शेवटी ही परीक्षा नसून हा एक मनमोकळा संवाद आहे हे मनाला बजावा. 'मला तपासणार पेक्षा आम्ही काही बाबींवर बोलणार' अशी मानसिकता ठेवा. गोष्टी सोप्या होतील. आपणाला ते जाणून घेणार आहेत हा दृष्टीकोन मनात बाळगा.

मिथुन पवार
Project CHHAYA MPSC UPSC
Telegram:
t.me/mithunpawar
WhatsApp: 9970841952

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

24 Dec, 11:10


🟧 अन्न आणि औषध प्रशासन मुलाखती 2 ते 16 जानेवारी

📍
@mithunpawar

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

24 Dec, 11:08


🟧 अन्न आणि औषध प्रशासन मुलाखती 2 ते 16 जानेवारी

📍
@mithunpawar

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

24 Dec, 09:15


𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂 pinned «♦️Interview Guidance Online Lectures by Mithun Pawar ❇️ उद्देश: थेट Mock /अभिरूप मुलाखती देणे म्हणजेच तयारी असा गैरसमज केला जातो. हे बाजारू प्रारूप सर्वांच्या अंगवळणी पडले आहे त्यामुळे सर्वमान्य झाले आहे. बहुतेक जण याच वाटेने जातात. वास्तविक मुलाखत ही आयोग…»

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

24 Dec, 06:31


👆 FSO मुलाखती 2 जानेवारी पासून

"Mock पूर्वी मुलाखती विषयी नक्की जाणून घ्या..."

उद्या दिनांक 25 डिसेंबर रोजी दोन महत्वपूर्ण लेक्चर्स..

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🔷 अधिक माहितीसाठी:

https://t.me/mithunpawar/3441

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

24 Dec, 02:48


♦️Interview Guidance Online Lectures by Mithun Pawar

❇️ उद्देश:

थेट Mock /अभिरूप मुलाखती देणे म्हणजेच तयारी असा गैरसमज केला जातो. हे बाजारू प्रारूप सर्वांच्या अंगवळणी पडले आहे त्यामुळे सर्वमान्य झाले आहे. बहुतेक जण याच वाटेने जातात. वास्तविक मुलाखत ही आयोग म्हणतो त्याप्रमाणे  व्यक्तिमत्वाची चाचणी असते. व्यक्तिमत्व हे अचानक घडत नसते. ती दीर्घ प्रक्रिया आहे. त्यामुळे तो प्रकार नेमका काय असतो हे समजले तर आपण रोजच्या जीवनात चौकस बनतो. गोष्टी त्याच असतात मात्र आपण त्याकडे वेगळ्या नजरेतून पाहतो. हा बदल किंवा विकास म्हणजेच माझ्या मते मुलाखतीची तयारी. म्हणून केवळ मेन्स दिली आहे त्यांनाच याची गरज नसून स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या प्रत्येकाने या टप्प्या विषयी माहिती करून घेतली पाहिजे. त्यासाठी मुलाखत तयारी बाबत समग्र आकलन या ऑनलाईन लेक्चर्स मधून देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी कोणीही Apply करू शकतो. अर्थात आगामी FSO मुलाखती ही पार्श्वभूमी आहेच.

❇️ समाविष्ट घटक:

1) Bio data/प्रोफाइल म्हणजे काय? त्यावरून कोणते प्रश्न विचारले जातात? उदा. पदवी, गाव, तालुका, जिल्हा, छंद इ.

2) आपली पदवी आणि प्रशासन संबंध कसा जोडावा. त्याचे महत्व काय? पदवी विषय अभ्यासणे कितपत योग्य.

3) मुख्य परीक्षेचे अभ्यास आता या टप्प्यावर किती महत्त्वाचे? किती वेळ त्यासाठी द्यावा?

4) चालू घडामोडी अनुषंगाने तयारी कशी करावी? लोकसत्ता चा प्रभावी वापर या काळात का महत्वाचा. तो कसा करावा. सोदाहरण उलगडणार.

5) प्राथमिक माहिती: पेहराव, हावभाव, संवाद याचे महत्व किती. यात बदलला वाव किती असतो.

6) Mock Interview महत्व आणि धोके. त्याचा फायदा कसा करून घ्यावा.

7) महिला उमेदवारांना हमखास विचारू शकतात असे प्रश्न.

8) FSO Post अनुषंगाने कोणते प्रश्न असतील? त्याला सन्मानजनक सामोरे जाण्याकरता काय केले पाहिजे?

याच बरोबर,

विशिष्ट पॅनल कमी गुण तर विशिष्ट जास्त गुण देतात असे आहे का? विशिष्ट पॅनल ठराविक साचेबद्ध प्रश्न विचारते का? जे telegram वर फिरते यासारखे समज गैरसमज यावरही चर्चा होईल.

❇️ दिनांक आणि वेळ:

दिनांक 25 डिसेंबर
सकाळी 9 ते 11 आणि
संध्याकाळी 6 ते 8

Google meet द्वारे live स्वरूपात होतील. रेकॉर्डेड काही नसेल.

❇️ Fees: Rs 250

प्रवेश:

इच्छुक लोकांनी 9970841952 यावर Telegram किंवा Whatsapp msg द्यावा. कोणीही फोन करू नये.

♦️अधिक माहितीसाठी:

Join: t.me/mithunpawar

𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂

23 Dec, 15:55


📍 @mithunpawar

4,015

subscribers

1,892

photos

4

videos