आपुलकीच्या माणसासाठी @aapulkichya_mansasathi Channel on Telegram

आपुलकीच्या माणसासाठी

@aapulkichya_mansasathi


आपुलकीच्या माणसासाठी (Marathi)

आपुलकीच्या माणसासाठी चॅनल मराठी भाषेच्या प्रेरणादायी मैसेज, कथांच्या संग्रह, आणि मोटिवेशनल कथांच्या वाचनांना साझारणारे एक मराठी चॅनल आहे. या चॅनलमध्ये आपल्याला आपल्या जीवनातील परिस्थितींच्या सामान्य आणि विशेष क्षणांना सामोरे करण्यास साहाय्य करण्यासाठी रुजू करण्यात येईल. या चॅनलचे उद्दिष्ट आपल्याला प्रेरित करणं, सकाळची शुभेच्छा देणं, आणि आपल्या जीवनातील सर्व अवस्थांना सामोरे करणं आहे. तसेच, आपुलकीच्या माणसासाठी चॅनल आपल्याला प्रेरित करण्यासाठी एक सर्वांत मोठं साधन आहे. त्यामुळे, आपुलकीच्या माणसासाठी चॅनलला अजूनही जास्त लोक सामील होऊन त्यांच्याला समृद्ध वास्तविकता, सुख, आणि समृद्धीला येईल.

आपुलकीच्या माणसासाठी

23 Nov, 18:04


_*ज्या पायांना पुर्वीपासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवयच असते, अशी पावलं शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत...!*_

आपुलकीच्या माणसासाठी

23 Nov, 18:04


_*तुमची प्रतिष्ठा तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर चारित्र्यवान माणसांच्या सहवासात रहा. वाईट माणसांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं श्रेयस्कर.*_

आपुलकीच्या माणसासाठी

23 Nov, 18:04


_*विश्वास नसलेली नाती पत्त्याच्या घरासारखी असतात. थोडा जरी वारा आला की मोडून पडतात. त्यामुळे विश्वास आहे तर नातं आहे, नाही तर नात्याची कल्पना सुद्धा करता येतं नाही..!*_

आपुलकीच्या माणसासाठी

23 Nov, 18:04


_*काळजाला काञी लावणारी स्वप्नं बघा.. खिशाला काञी लावणारी अजिबात नको. पैशाने पूर्ण झालेली स्वप्नं मरेपर्यंतच टिकतात. कष्टाने पूर्ण झालेली स्वप्नं इतिहास घडवतात...*_

आपुलकीच्या माणसासाठी

23 Nov, 18:03


_*पुस्तके जमिनीवर विकली जातात, पण कुणालाही आकाशाच्या उंचीवर नेण्याची क्षमता फक्त त्यांच्यातच असते...!!*_

आपुलकीच्या माणसासाठी

23 Nov, 18:03


_*एकटं असणं आणि एकाकी असणं यात बराच फरक आहे. एकाकी व्यक्ती गर्दीतही पोरकी असते, एकट्या व्यक्तीस मात्र आत्मभानाची अखंड सोबत असते.*_

आपुलकीच्या माणसासाठी

23 Nov, 18:03


_*मनातील भावना व्यक्त करताना सगळ्यात महत्वाचे ते तुमचे शब्द. शब्द चुकीचे असले तर तुमच्या विचारांना काहीच अर्थ उरत नाही. आयुष्याला वळण देण्यासाठी फक्त चांगल्या वेळेची नाही तर चांगल्या सोबतीची पण गरज असते.*_

आपुलकीच्या माणसासाठी

23 Nov, 18:03


_*अशी साधी जुनी माणसं... आहे त्या परिस्थितीत समाधानाने जगायला शिकवतात.*_

आपुलकीच्या माणसासाठी

23 Nov, 18:03


*🚩 #ऊर्जामंत्र*

_*तुमच्या बोलण्यापेक्षा तुम्ही काय करता याकडे समाज सगळं लक्ष देत असतो...!*_

*#हर_हर_महादेव 🙏🏻🚩*

आपुलकीच्या माणसासाठी

23 Nov, 17:46


☸️ *" आजचे विचारपुष्प "*

_*1) समय के साथ समझ, खुश किस्मत लोगों को ही मिलती हैं । क्योंकि अक्सर 'समय' पर, 'समझ' नहीं आती, और 'समझ' आते आते, 'समय' निकल जाता है.*_

_*2) उम्र को हराना हो तो शौक सदा जिंदा रखिए घुटने चलें ना चलें, मन उडता परिंदा रखिए "नासमझ" इंसान ही जिंदगी का 'आनंद' लेता है. ज्यादा "होशियार" तो हमेशा 'उलझा' हुआ रहता है..*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
*❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞*
https://t.me/Aapulkichya_Mansasathi
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

आपुलकीच्या माणसासाठी

23 Nov, 17:46


🌅 *" आजचा सुंदर विचार "*

_*1) हुशार आणि चाणाक्ष माणसं आपल्या शत्रूकडूनही काही तरी शिकत असतात, पण मुर्ख माणसं मात्र आपल्याच माणसांना आपला शत्रू किंवा स्पर्धक समजून विरोध करत असतात.*_

_*2) कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार...! स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणूसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती...!!!*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
*❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞*
https://t.me/Aapulkichya_Mansasathi
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

आपुलकीच्या माणसासाठी

23 Nov, 17:46


🌅 *" आजचे सुविचार "*

_*1) प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला, एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक सुद्धा आहे जी आपल्याला जीवनात कधी तरी व्याजासकट नक्की परत मिळते.*_

_*2) दिखावा आणि देखावा यातला फरक कळला की आयुष्य आणि माणसं समजायला सोपं जातं.*_

_*3) विचार आणि पाणी नेहमी स्वच्छ असले पाहिजे, कारण दूषित पाणी आरोग्य बिघडवते आणि दूषित विचार जीवन बिघडवतात.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
*❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞*
https://t.me/Aapulkichya_Mansasathi
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

आपुलकीच्या माणसासाठी

22 Nov, 15:43


_*प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न नेहमी येतोचं तो म्हणजे एवढ दुःखं माझ्याच वाट्याला का येत... तो येणं स्वाभाविक आहे कारण जीवन म्हटलं की सुख दुःख हे आलंच हे वास्तविक सत्य कोणीच नाकारू शकतं नाही हा नियम सर्वांनाच लागू होत असेल जी परिस्थिती आपल्या पुढे निर्माण झाली आहे तिचा स्वीकार करून आनंदाने जगायला काय हरकत आहे उलट त्या गोष्टींचा त्रास आपल्यालाच कमी होतो हे मी स्वतःलाचं अनुभवत आहे.*_

आपुलकीच्या माणसासाठी

22 Nov, 15:43


_*एखाद्यात 'साधेपणा' असणे ही देखील गोष्ट साधी नसते.*_

आपुलकीच्या माणसासाठी

22 Nov, 15:43


_*प्रवास एकट्याने झाला तरी चालेल, परंतु वाट माञ स्वत:ची असली पाहिजे.*_

आपुलकीच्या माणसासाठी

22 Nov, 15:43


_*रद्दीतला एक कागदाचा तुकडाही तुम्हाला अनमोल माहिती देऊन जातो मग सांगा, त्या पुस्तकात किती ताकद असेल, जे अनुभवाच्या शब्दाने बनलेले असते...!*_

आपुलकीच्या माणसासाठी

22 Nov, 15:43


_*आपल्या सोबत असणारी माणसं जगायला शिकवतात, तर आपल्याला सोडून जाणारे पुढं कसं वागायचं ते शिकवतात, म्हणून माणसांचं महत्व आयुष्यात मोलाचं असतं. मग ते येणारे असोत की जाणारे...!*_

आपुलकीच्या माणसासाठी

22 Nov, 15:43


_*आठवणींच्या बाजारात काही काही भावना मनाला आनंद देऊन जातात...!*_

आपुलकीच्या माणसासाठी

22 Nov, 15:43


_*सुख मिळालं की उपभोगायचं, पण मिरवत नाही बसायचं. आणि दु:ख मिळालं की पचवायचं, पण गिरवत नाही बसायचं.*_

आपुलकीच्या माणसासाठी

22 Nov, 15:42


_*हौसेला मोल नसतं. वय तर अजिबातच नसतं. बरोबर ना..*_

4,013

subscribers

9,770

photos

2

videos