🚨MPSC OFFICER'S🚨 @officer_mpsc Channel on Telegram

🚨MPSC OFFICER'S🚨

@officer_mpsc


MPSC, गट ब, गट क, TCS IBPS, पोलीस भरती आणि सर्व सरळ सेवा परीक्षा साठी उपयुक्त चॅनेल.

MPSC OFFICER'S (Marathi)

🚨MPSC OFFICER'S🚨 या टेलिग्राम चॅनेलमध्ये आपल्याला MPSC, गट ब, गट क, TCS IBPS, पोलीस भरती आणि सर्व सरळ सेवा परीक्षा साठी उपयुक्त माहिती मिळेल. या चॅनेलमध्ये सर्व अधिकाऱ्याची सर्व सरळ मार्गदर्शन केले जाते की कशी परीक्षा द्यावी, कशी तयारी करावी आणि एक्झामची सर्व माहिती मिळेल. त्यामुळे आपल्याला परीक्षेच्या आघाडीसाठी उत्तम साहाय्य मिळेल. MPSC OFFICER'S चॅनेल एक अद्वितीय स्थान आहे जी आपल्याला त्यांची परीक्षांच्या तयारीत मदत करेल.

🚨MPSC OFFICER'S🚨

24 Nov, 16:24


♦️समाजकल्याण विभाग भरती 2024

👉 Start Date :- 10 ऑक्टोबर 2024

👉 Last Date :- 30 नोव्हेंबर 2024

👉 JOIN
@officer_mpsc

🚨MPSC OFFICER'S🚨

24 Nov, 09:17


♦️👉डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर ग्लोबल पीस पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी सन्मानीत.

(अमेरिकेत नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज संस्थेद्वारे)

🚨MPSC OFFICER'S🚨

24 Nov, 07:46


गोदावरी नदी [ महाराष्ट्रातील नदी प्रणाली ]

◼️ उगम : त्र्यंबकेश्वर - ब्रह्मगिरी डोंगरावर

◻️ एकूण लांबी : 1465 किमी (MH तील - 668 किमी)

◼️ क्षेत्र :- एकूण 3,13,389 चौ. किमी.

◻️ MH तील :- 1,53,779 चौ. किमी.

◼️संपूर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे 49% क्षेत्र व्यापलेले आहे. (भारताच्या 10% )

◻️MH तील सर्वात मोठी तसेच भारतातील दुसरी मोठी नदी

◼️या नदीला दक्षिण गंगा, वृद्धगंगा म्हणून ओळखले जाते.

🛑 उपनद्या

♦️उजव्या/दक्षिणेकडून :-
◼️ दारणा, प्रवरा, मूळा, बोर, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, तेरणा, मांजरा, मन्याड.

♦️डाव्या/उत्तरेकडून :-
◻️कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती.

◼️ प्रवास :- MH, Te, आंध्र प्रदेश राज्यातून

◻️ MH जिल्हे :- नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना,बीड, परभणी, नांदेड, गड

♦️नांदेड जिल्ह्यातील धर्माबादजवळ तेलंगणात प्रवेश - पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करते.
Join
@officer_mpsc

🚨MPSC OFFICER'S🚨

24 Nov, 07:34


राहिलेल्या जाहिराती..

• सामाजिक न्याय विभाग,
• नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'
• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
•  वित्त व लेखा कोषागार विभाग
•  नाशिक महानगरपालिका, 
•  अहमदनगर महानगरपालिका
•  नागपूर महानगरपालिका
•  ठाणे महानगरपालिका
•  कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
•  चार कृषि विद्यापीठ जाहिरात
•  महाबीज महामंडळ
•  महाराष्ट्र वखार महामंडळ 

Join
@officer_mpsc

🚨MPSC OFFICER'S🚨

24 Nov, 05:38


पंतप्रधान मोदींना अमेरिकेत 'जागतिक शांतता पुरस्कार' प्रदान

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 22 नोव्हेंबर रोजी त्यांच्या अनुपस्थितीत अमेरिकेत जागतिक शांतता पुरस्कार मिळाला.
▪️वॉशिंग्टन ॲडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी आणि असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज (एआयएएम) या संघटनेने संयुक्तपणे त्यांना 'डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर जागतिक शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
▪️समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

🚨MPSC OFFICER'S🚨

24 Nov, 04:52


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

❇️ सोप्या भाषेत समजून घ्या
◾️सुरवात - 28 जून 2024
◾️वय 21 ते 65 वर्षे
◾️दरमहा 1500 रुपये मिळणार
◾️दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
◾️अंमलबजावणी : जुलै 2024 पासून

❇️ पात्रता पहा

◾️महाराष्ट्र रहिवासी
◾️विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
◾️लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
◾️65 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
❇️ आपत्र कोण असेल
◾️2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
◾️घरात कोणी Tax भरत असेल तर
◾️कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
◾️कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
◾️कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )
❇️ लागणारी कागदपत्रे
आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्न दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , फोटो

◾️योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे:
◾️ अंगणवाडी केंद्रात सुविधा
😁 सध्या चर्चेत आहे वाचून घ्या ..
Join
@officer_mpsc

🚨MPSC OFFICER'S🚨

24 Nov, 04:50


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 

भारतीय जनता पक्ष - 132
शिवसेना/ शिंदे - 57
राष्ट्रवादी/अजित पवार - 41
शिवसेना/ठाकरे गट - 20
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 16
राष्ट्रवादी/शरद पवार गट - 10
इतर - 10
अपक्ष - 02

एकूण जागा - 288
बहुमत - 144+1

झारखंड विधानसभा निवडणूक 2024

झारखंड मुक्ती मोर्चा - 34
भारतीय जनता पक्ष - 21
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 16
इतर - 10

एकूण जागा - 81
बहुमत - 41+1

शिंदे यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्री पद?

Join
@officer_mpsc

🚨MPSC OFFICER'S🚨

24 Nov, 04:48


🛑♦️विधानसभा निवडून निकाल 2024

♦️कोणत्या पक्षाला किती जागा
♦️सर्वात जास्त मतांनी कोण आले
♦️सर्वात कमी मतांनी कोण आले

Join
@officer_mpsc

🚨MPSC OFFICER'S🚨

24 Nov, 04:46


♦️ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

👉 सुरुवात - 28 जुन 2024.

👉 मंत्रालय - महिला व बालविकास मंत्रालय

👉 वैशिष्ट्य - या योजनेत अल्प, उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रु. आर्थिक मदत शासनाकडून दिले जात आहेत.

🚨MPSC OFFICER'S🚨

24 Nov, 04:46


सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले आमदार

🚨MPSC OFFICER'S🚨

24 Nov, 04:39


_*मातीतला ओलावा जसा झाडांची मुळ पकडून ठेवतो. तस शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो.*_
Gm.....

🚨MPSC OFFICER'S🚨

23 Nov, 16:09


आजच्या निकालावरून काय शिकला?

परिस्थिती कितीही विरोधात असुदेत,हार मानायची नाही.. जिंकायचच..👍

🚨MPSC OFFICER'S🚨

23 Nov, 07:02


*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*23 नोव्हेंबर 2024*

🔖 *प्रश्न.1) भारताचे पुढील नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*

*उत्तर –* के संजय मूर्ती

🔖 *प्रश्न.2) जस्टीस कृष्ण कुमार यांची कोणत्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* मणिपूर

🔖 *प्रश्न.3) कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला भारताचे 56 वे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित केले ?*

*उत्तर –* गुरु घासीदास-तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प

🔖 *प्रश्न.4) ISRO च्या गगनयान मोहिमेला मदत करण्यासाठी नुकताच कोणत्या देशाने करार केला आहे ?*

*उत्तर -* ऑस्ट्रेलिया

🔖 *प्रश्न.5) आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेच्या किती वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा भारतात नवी दिल्ली येथे जागतिक सहकार संमेलन होत आहे ?*

*उत्तर -* 130 वर्षे

🔖 *प्रश्न.6) २०२५ वर्षाचे जी २० परिषदेचे अध्यक्षपद ब्राझील ने कोणत्या देशाकडे सोपवले आहे ?*

*उत्तर -* दक्षिण आफ्रिका

🔖 *प्रश्न.7) लंडनमध्ये कोणत्या भारतीय कंपनीला ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड २०२४ ने सन्मानित करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* कोल इंडिया लिमिटेड

🔖 *प्रश्न.8) क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स २०२५ मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे ?*

*उत्तर -* 10

🔖 *प्रश्न.9) समुद्र शिखर संमेलन सागर मंथन द ग्रेट ओशन डायलॉग २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?*

*उत्तर -* भारत

🔖 *प्रश्न.10) IBSF जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूने इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा पराभव करत सलग सातवे ऐतिहासिक, 28 वे जागतिक विजेतेपद पटकावले आहे ?*

*उत्तर -* पंकज अडवाणी

🚨MPSC OFFICER'S🚨

23 Nov, 03:49


16 वा केंद्रीय वित्त आयोग

कालावधी - 2026 ते 2031

• अध्यक्ष :-  श्री. अरविंद पनगारिया 
• सचिव :- रित्विक रंजन पांडेय

4 सदस्य
1. निरंजन राजाध्यक्ष यांनी सदस्य होण्यास असमर्थता दाखवली म्हणून मनोज पांडा यांची नियुक्ती
2. अजय नारायण झा
3. एनी जॉर्ज
4. सौम्य क्रांती घोष

🚨MPSC OFFICER'S🚨

23 Nov, 03:38


♦️हवाई वाहतूक :-

👉राज्यात 13 देशातंर्गत विमानतळे असून त्यापैकी 5 आंतरराष्ट्रीय विमानतळे कार्यान्वित आहेत.

👉आंतरराष्ट्रीय विमानतळ - मुंबई, पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, ओझर नाशिक (HAL).

👉देशांतर्गत विमानतळ - मुंबई, पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, जुहू (मुंबई), जळगाव, कोल्हापूर, नांदेड, शिर्डी, ओझर नाशिक (HAL), गोंदिया, सिंधुदुर्ग, सोलापूर.

👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24

👉 Join
@officer_mpsc

♦️प्रधानमंत्री मुद्रा योजना

👉 सुरुवात - 8 एप्रिल 2015

👉 योजनेचा प्रमुख उद्देश सुक्ष्म उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देणे.

👉 ही योजना उत्पन्न निर्मिती उपक्रमांमध्ये गुंतलेल्या बिगरशेती सूक्ष्म आणि लघु उद्योगांना सुलभ कर्ज उपलब्ध करण्याच्या मूलभूत गरजांना संबोधित करते.

👉 या योजनेअंतर्गत कर्जाचे 'शिशु' (50,000 रुपयेपर्यंत), 'किशोर' (50,000 रुपये ते 5 लाख रुपये) आणि 'तरुण' (5 लाख रुपये ते 10 लाख रुपये) असे वर्गीकरण करण्यात आले आहे.


♦️ प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

👉 सुरुवात - 1 जानेवारी 2017

👉 उद्देश - माता व बालकांचे आरोग्य व पोषण सुधारणे तसेच बुडित मजुरी पोटी नुकसान भरपाई देणे याकरिता केंद्रशासनातर्फे 'प्रधानमंत्री मातृ वंदना योजना' राबविण्यात येत आहे.

👉 योजनेअंतर्गत, गर्भवती महिला व स्तनदा माता यांना 5000 रुपये दोन हप्त्यांमध्ये तसेच दुसरे अपत्य मुलगी असेल तर 6000 रुपये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दिले जातात.

👉 पगारी प्रसुतीरजा उपभोगणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहेत.


♦️👉प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

♦️प्रधान मंत्री ग्राम सडक योजना – IV

👉कालावधी - 2024-25 ते 2028-29

👉 एकूण खर्च - 70,125 कोटी रुपये

👉सदर योजनेअंतर्गत पात्र 25,000 वस्त्यांना प्रथमच जोडणारे 62,500 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवले जाणार असून त्यात नव्या रस्त्यांच्या बांधकामासह पुलांचे बांधकाम/दुरुस्ती केली जाणार आहे.


♦️प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना :-

👉 सुरुवात - 25 डिसेंबर 2000

👉 प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-1:- ग्रामीण भागात 500 व अधिक, आणि आदिवासी भागात 250 व अधिक लोकसंख्या असलेल्या तसेच रस्त्याने न जोडलेल्या वस्त्यांना बारमाही रस्त्यांनी जोडणे हा प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-1 चा उद्देश होता.

👉 प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-2:- ग्रामीण व्यापारी केंद्राच्या वाढीस सहाय्यकारक अशा आर्थिक दृष्ट्या महत्वाच्या निवडक ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करणे या उद्देशाने सन 2013 मध्ये केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-2 कार्यक्रम सुरू केला.

👉 प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-3 ग्रामीण भागातील माध्यमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि बाजार समिती केंद्रे यांना जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास करणे या उद्देशाने केंद्र शासनाने सन 2019 मध्ये प्रधान मंत्री ग्राम सडक योजना 3 सुरु केली.


♦️उडे देश का आम नागरीक (उडान) :-

👉 सुरुवात - 21 ऑक्टोबर 2016

👉 उद्देश - जनतेला किफायतशीर दरात विमानसेवा उपलब्ध करुन देणे

👉 सेवा न मिळालेल्या आणि कमी सुविधा असलेल्या विमानतळांना जोडणारा आणि प्रादेशिक क्षेत्रे व आंतरभागांना सेवा देणारा प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना हा केंद्र शासनाचा एक प्रमुख कार्यक्रम आहे.

🚨MPSC OFFICER'S🚨

23 Nov, 03:34


आज माझं नाव जरी घेतलं तर एवढा मोठा दगड हाणीन 😂

3,133

subscribers

5,222

photos

4

videos