अनेक ठिकाणी उमेदवाराची स्वतःची आणि त्याच्या कुटुंबीयांची मते सुद्धा त्या मतदारसंघात पडलेली नाहीत. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनचे सील तुटलेले आढळले, मशीन बदलेल्या आढळल्या तर अनेक ठिकाणी मतदारांची नावे गायब होती, तर अनेक ठिकाणी मृतकांची नावे घुसडून मतदान केलेले होते.*.
*मतदान कसे वाढू शकते, टक्केवारी कशी वाढू शकते, कसे वाढवून देऊ, त्याकरिता किती पैसे लागतील या संदर्भामध्ये काही चॅनेल्सनी स्टिंग ऑपरेशन केले या संदर्भात निवडणूक आयोग किंवा पोलीस किंवा संबंधित विभाग कुठल्याच तक्रारीची दखल का घेत नाही? मतमोजणीच्या ठिकाणी अनेक लोकांनी तक्रारी करूनही त्याची दखल का घेतल्या गेलेली नाही*?
*हे संपूर्ण डिजिटल चे युग असतांना मतदानाचे दिवशी २० तारखेला सायं ५ वाजता ५,कोटी ६४लाख ८८ हजार ०२४ म्हणजे ५८. २२ टक्केवारी होती, तर रात्री ११.३० ला ६कोटी ३०लाख ८५हजार ७३२ म्हणजे ६५.२ टक्केवारी होती ती कशी वाढली? एवढेच नव्हे तर २३ तारखेला मत मोजणीच्या दिवशी अजून ९लाख ९९हजार ३५९ मते वाढलीत म्हणजे एकदर दोन वेळची मिळून ७५ लाख ९७ हजार ०६७ अशी एकंदरीत ७.८६% च्यावर कशी मते कशी वाढली? हरियाणा, गुजरात, मध्यप्रदेश अश्या ज्या ज्या राज्यात भाजप सरकार सत्तेवर होते तेथे तेथेच टक्केवारी वाढली आणि तेथेच भाजपा एकतर्फी निवडून कशी आली? आणि ज्या राज्यात भाजप सरकार सत्तेत नव्हते तेथे अशी टक्केवारी का वाढली नाही?
*या संदर्भात माजी "केंद्रीय चुनाव आयुक्त" कुरेशी ह्यांनी या संदर्भात अनेक शंका व्यक्त केल्या आहेत ज्या लक्ष्यात घ्याव्याच लागतील आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर सध्याचे केंद्रीय चुनाव आयुक्त म्हणजे "केचुआ" राजीव कुमार ह्यांना द्यावीच लागतील*. *महाराष्ट्राच्या निकालांमुळे सगळेच अवाक झाले आहेत. काय बोलावं कळेनासं झालं आहे. पराभव जिव्हारी लागावा असाच असल्याने सगळ्यांना आणि विशेषतः ज्यांनी खूप परिश्रम घेतले होते त्यांना जसा धक्का बसला आहे, तसाच तो मलाही बसला आहे*.
मात्र, *परिस्थिती समजून घेऊन कामाला लागले पाहिजे. सामान्य मात्र प्रामाणिक असे लोक आणि ज्यांना, "जीना यहा मरणा यहा इसके सिवा जाणा कहा " आणि आपण गेल्यावर या देशाचे आणि आपल्या कुटुंबियांचे काय होईल, अशी चिंता ज्यांना असेल अश्या देशप्रेमी लोकांना हे चित्र बदलायचे असेल, तर अगदीच किरकोळ काम करावे लागेल.*.
*आज रविवार १ डिसें आहे, तर येणाऱ्या गुरुवारी म्हणजे ५ डिसेंबरला गजानन महाराजांचे नाव घेऊन दुपारी १ ते ३ वाजता केवळ २ तास दंडावर काळ्या पट्ट्या बांधून, हातात जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधीजीचे, फोटो किंवा पोस्टर घेऊन किंवा गळ्यात तसे फ्लेक्स घालून आणि आपले हात हातात घेऊन मानवी साखळी तयार करून आपापल्या शहरातील गांधी मैदानावर किंवा गांधी पुतळ्याजवळ किंवा हुतात्मा स्मारका जवळ जमा व्हा, कारण ह्यापैकी काही तरी नक्कीच आपल्या गावात असेल, नसल्यास महत्वाचे सार्वजनिक ठिकाणी सर्वांनी ठरवून जमा व्हावे*.
*कुठलीही घोषणा नाही, केवळ शांतता आणि शांतता बाळगून हे करा. तरुणांनी त्याचे मोबाईलवर युट्युब लाईव्ह करावे, आणि ते आपल्या गावाचे नाव घेऊन सोशल मीडियावर लाइव्ह करून व्हायरल करावे. जर पोलीस अटकाव करत असतील तर त्यांच्या सोबत शांतपणे बोला, त्याचेही लाईव शूटिंग करा, आणि व्हायरल करा*.
*देशाला, जगाला हे समजू द्या की भारतात लोकशाहीचा कसा खून होतोय आणि ती कशी संकटात आहे*!
*पोलिसांनी सुद्धा अतिरेक न करता शांततामय प्रदर्शन करणाऱ्या लोकांना अटकाव करू नये, कारण ते सुद्धा लोकशाही, जीला आम्ही वाचवायला निघालोत तिचे घटक आहेत हे विसरू नये. त्यामुळे त्यांनी केवळ शांतता सुव्यवस्था राखण्याचे काम करावे हि विनंती*.
*काही शक्यता आपण गृहीत धरूयात, एक तर मला त्यापूर्वी अटक करतील, नेहमी करतात तसे शहरात जमावबंदी कलम १४१ लागू करतील, जे माहिती आहेत की हे जागृत लोक आहेत अश्या लोकांना पोलीस नोटीस देतील, त्याला घाबरायचे काही कारण नाही, हे झाले तर समजून जा की सरकार घाबरले आहे आणि त्यांच्या मनात काळे बेरे आहे*.
मात्र म्हणून *घाबरून घरात बसू नका, कारण हे प्रतिकात्मक आंदोलन आहे. मी अकोल्याच्या गांधी जवाहर बागेसमोर शांतता आंदोलनात आपली वाट पाहत सामील होणार आहे*.
*लोकांना लोकशाही वाचवायची आहे की केवळ घरी कुथत बसायचय? याची हि परीक्षा आहे, सरकार उत्तीर्ण होतय की लोक उत्तीर्ण होतात ते बघूया!*
*लेखक: प्रकाश पोहरे*
*प्रतिक्रिया देण्यासाठी* 98225 93921 वर *'थेट प्रकाश पोहरेंना संपर्क करा किंवा आपल्या प्रतिक्रिया याच व्हॉट्सअप वर पाठवा.' प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहायला विसरू नका.*