suraj_bhoi_creative7 @surajbhoicreative7 Channel on Telegram

suraj_bhoi_creative7

@surajbhoicreative7


surajbhoicreative7 (English)

Welcome to surajbhoicreative7, a one-stop destination for all your creative needs! Led by the talented artist Suraj Bhoi, this channel is dedicated to showcasing the amazing world of creativity through a variety of mediums. Whether you are a fan of painting, digital art, photography, or design, there is something here for everyone. Suraj Bhoi, with his unique style and innovative approach, has gained a loyal following of art enthusiasts who appreciate his passion for creativity. Join us on this journey as we explore the endless possibilities of artistic expression. From tutorials and tips to behind-the-scenes glimpses into the creative process, surajbhoicreative7 is your go-to source for inspiration and artistic exploration. Don't miss out on the opportunity to be part of this vibrant community of like-minded individuals who share a love for all things creative. Subscribe now and unleash your own creativity with surajbhoicreative7!

suraj_bhoi_creative7

02 Feb, 04:12


वसंत पंचमी अर्थात...

महाज्ञानी, पांडुरगाचे सर्वश्रेष्ठ भक्त, श्री शिवछत्रपतींचे मार्गदर्शक गुरु, जगद्गुरु, संत तुकाराम महाराज यांचा जन्मोत्सव...🙏🏼🚩☺️🌺

दया तिचें नांव भूतांचें पाळण । अणीक निर्दळण कंटकांचें ॥१॥
धर्म नीतीचा हा ऐकावा वेव्हार । निवडिले सार असार तें ॥ध्रु.॥
पाप त्याचें नांव न विचारितां नीत । भलतें चि उन्मत्त करी सदा ॥२॥
तुका म्हणे धर्म रक्षावया साठीं । देवासही आटी जन्म घेणें ॥३॥

अर्थ:- सर्व जीवांचे पालन करणारी आणि दृष्टांचे निर्दालण करणारी जी आहे, तिचे नाव दया आहे .धर्मनितीचे अवलोकन करून मला योग्य आणि अयोग्य याची खूण पटली आहे ते निवडले आहे .अनितीने आचरण, उन्मातपना म्हणजेच पाप आहे .तुकाराम महाराज म्हणतात, अधर्माचरणी लोकांमुळे धर्माचे रक्षण करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागतो .

सर्व हिंदूंना जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या जन्मोत्सवाच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा 🙏🏻🚩🚩

तुकाराम महाराज पेंटिंग - @37omkar

suraj_bhoi_creative7

31 Jan, 18:58


०१ फेब्रुवारी...

अर्थात हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती, छत्रपती शंभूराजांच्या प्राणांचे रक्षणकर्ते, सरसेनापती संताजीराव घोरपडे यांचे पिताश्री, स्वामीनिष्ठ सेवक म्हाळोजी घोरपडे यांचा बलिदान दिवस...🙏🏻🥺🚩

विशालगडावर काही काळ मुक्काम करुन शंभुराजेंनी दुर दिसणार्या त्या पावनखिंडीकडे बघितलं आणि स्वतःशीच म्हणाले...
" का म्हणून आमच्या शी आबासाहेबांप्रमाणे निष्ठावंत माणसांची कमी आहे..?? नेमके विश्वास कुणावर करावा हाही सवालच आमच्या पुढे !! आजवर आम्ही लढतो आहे ते फक्त आबासाहेबांच्या ध्येयासाठी... !! "विशालगडावरुन मुक्काम हटला आणि पन्हाळाला म्हालोजी घोरपडे पुढे येऊन थांबला..." म्हालोजी बाबा.. !! विशालगडावर आम्ही हाच विचार करत होतो की बाजीप्रभूंनी जैसे रोखली गनिमांची खिंड आमच्या आबासाहेबांसाठी तैसी आमच्या साठी संकटाची खिंड कुणी रोखणार ?? तैसे आम्ही समर्थ आहोत संकटांना झेलण्यासाठी पण मनातील युद्धाला थांबवावे कैसै हाच खरा सवाल ज्यास जवाब नाहीच. परंतु...!!आवं राजं!! चिंता करु नगासा !! ह्यो म्हलोजी मरेल पण तुमच्या केसालाबी धक्का लागु द्यायचा न्हाय...!! आवं राजं तुमच्या चरणाशी स्वर्ग आमचं... त्या परिस मोठं काय ?? म्हालोजींच्या धिरोदात्त शब्दांना मनात साठवून राजे संगमेश्वरी पहोचले.... न्यायायलंकारमंडित बनत न्याय करत होते पण नियती मात्र पुन्हा अन्याय करण्यासाठी अवतरली.....

✍🏻अक्षय चंदेल ©

सरसेनापती म्हाळोजी घोरपडे यांना बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🚩⚔️🙏🏻🥺

#राष्ट्रप्रथम #suraj_bhoi_creative7

suraj_bhoi_creative7

31 Jan, 18:53


गणपती म्हणजे ओंकारच काय तो नव्हे.
गणपती म्हणजे गणांचा पती:
गण म्हणजे राष्ट्र, त्या शक्तिचे,
संघटनेचे जे दैवत थे गणपती!

- स्वातंत्र्यवीर सावरकर

सर्व हिंदूंना श्री गणेश जन्मोत्सवाच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा 🚩🚩🇮🇳🇮🇳

भारत मातेच्या रक्षणासाठी आणि गौरवासाठी तिची सेवा करण्यासाठी गणपती बाप्पा अर्थात स्वातंत्र्य देवता भरभरून आशीर्वाद देवो हीच प्रार्थना 🙏🏻⚔️🚩

#राष्ट्रप्रथम #suraj_bhoi_creative7

suraj_bhoi_creative7

18 Jan, 18:52


१९ जानेवारी...

अर्थात हिंदू शिरोमणी, महादेव भक्त, हिंदू धर्माभिमानी, राष्ट्रभक्त, रणधुरंदर, हिंदू नरेश, महाबली श्री महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी!
😞🚩🙏🏻🌺⚔️🇮🇳

इक्बाल था बुलंद, उसे धूल कर दिया ।
मद जिसका था प्रचंड, सारा दूर कर दिया ॥
राणा प्रताप इकलोते थे, ऐसे वीर जिसने ।
अकबर का सारा घमंड चूर चूर कर दिया ॥

वीर महाराणा प्रताप यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🥺🙏🏻⚔️🚩🇮🇳

#राष्ट्रप्रथम #suraj_bhoi_creative7

suraj_bhoi_creative7

15 Jan, 17:54


१६ जानेवारी १६८१...


पित्याची सावली धरून बालपणीच राजकारणात प्रवेश केला. कुठलीही योजना असो वा राजकारण वा कुठली मोहीम, पित्याने दिलेल्या सगळ्या कसोट्यांवर खरे उतरले. सगळ्यात तरुण राजपुत्र होऊन आशिया खंडातील सगळ्या शाह्यांमध्ये बलाढ्य मोघलशाहीला चारी मुंड्या चित केलं. समुद्रावर अफाट सत्ता भोगणार्या टोपीकर अन सियाला धूळ चारली. आपल्या कर्तृत्वाने हिमालयाच्या उंची एवढ्या पित्याचे पुढचे पाऊलच ठरले. त्यांचे नावं होते, सर्जा संभाजी राजे...

शिवपुत्र धर्मवीर छत्रपती शंभूराजांना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा 🚩🔱⚔️👑🌺

suraj_bhoi_creative7

14 Jan, 02:17


१४ जानेवारी...

*🚩अर्थात पानिपत (मराठा) शौर्य दिन🚩*

*सैन्याला रसद नाही...पोटला अन्न नाही... जनावरांना दाणागोटा नाही... लढायला शस्त्र नाही... तोफखान्याला दारूगोळा नाही....तरीही मराठे लढले प्राणपणे लढले तळहातावर शिर घेऊन लढले....पराकोटीच्या हालआपेष्टा सहन करत गनिमाच्या नरडीचा घोट घेण्यासाठी पानिपतच्या समर भुमीवर उतरलेल्या मराठा सैन्याच्या अजोड पराक्रमाला आणि देशभक्तीला आजही जगाच्या इतिहासात तोड नाही...*

*⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️*

*हे आवाज रुपी पुष्प पानिपतच्या या तिसऱ्या रणसंग्रामात देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर सदाशिव भाऊ पेशवे व ज्ञात अज्ञात मराठा वीरांच्या चरणी अर्पण 😞🎤😞🎤😞🎤😞*

#राष्ट्रप्रथम #suraj_bhoi_creative7

suraj_bhoi_creative7

11 Jan, 19:57


१२ जानेवारी....

संन्यस्त योद्धा, युगपुरुष, स्वामी विवेकानंद यांची जयंती 🙏🏼🚩🇮🇳🌺

" स्वतःला परिस्थिती चे गुलाम समजू नका,
तुम्ही स्वतःच स्वतःचे भाग्यविधाते आहात ! "

यांसारख्या असंख्य तत्त्वांनी, आणि आपल्या प्रेरणादायी विचारांनी या भारतभूमीतील तरुणांना देशासाठी लढण्याची, देशाला उत्तुंग शिखरावर नेण्याची प्रेरणा देणाऱ्या विश्वनायक स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अर्थात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त मानाचा मुजरा 🙏🏽✍🏾🇮🇳💪🏾❤️

हे आवाज रुपी पुष्प स्वामीजींच्या चरणी मनोभावे अर्पण 🎙️🌺🙏🏼🚩🇮🇳

suraj_bhoi_creative7

11 Jan, 19:56


१२ जानेवारी....

सह्याद्रीची जगदंबा,स्वराज्यप्रेरिका, स्वराज्यजननी, स्वराज्यमाऊली, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ साहेब यांची जयंती 🚩⚔️🌺🇮🇳

स्वप्न पाहून स्वराज्याचे, उरी पेटवली राष्ट्रभक्ती ची मशाल,
शिवशंभूरुपी समशेर तुम्हीच केली या पवित्र मातीस बहाल,
तुमच्या प्रेरणेनेच लढल्या कित्येक स्त्रीया रणी,
जपला स्वाभिमान परी झुकविला नाही माथा,
या जगाला ओरडून सांगेन माझ्या जिजाऊंची गाथा!

✍🏾 - सुरज सुधाकर भोई

#राष्ट्रप्रथम #suraj_bhoi_creative7

suraj_bhoi_creative7

02 Jan, 18:40


३ जानेवारी... म्हणजेच

ज्ञान शारदा,ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती 🖋️ 🚩🇮🇳

अज्ञान अडाणीपणाच्या काळ्याकुट्ट अंधारात महात्मा जोतिबा फुले यांच्या सोबतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षणाचा प्रकाश घेऊन आल्या.सावित्रीबाईंनी तत्कालीन समाजाचा प्रचंड तिटकारा,टिका सहन करुन शूद्रातिशूद्र व महिलांच्या आयुष्यात शिक्षणाची कधीही न विझणारी ज्योत प्रज्वलित केली.

"माझ्या कविता वाचल्यावर जर तुम्हाला थोडं जरी ज्ञान मिळालं तर माझे परिश्रम सार्थकी लागेल!"

– सावित्रीबाई फुले

ज्ञान शारदा सावित्रीमाई फुले यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा 🚩 🙏🏼 ✍🏼🇮🇳

#suraj_bhoi_creative7 #राष्ट्रप्रथम🇮🇳

suraj_bhoi_creative7

02 Jan, 18:39


*🙏🏼 ॥ श्री शिवसुर्यहृदय (अंतरंग शिवछत्रपतींचे) ॥ ⚔️*

*आजच्या या ०२ ल्या श्लोकाचा अर्थ -*

*छत्रपती शिवाजी महाराजांनी बाल वयात जेव्हा शहाजी राजे आणि आऊसाहेबांच्या मनातील हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचा संकल्प केला होता तेव्हा त्यास आधी आपल्यातीलच असंख्य लोकांनी विरोध केला होता, पण शिवरायांनी हार मानली नाही ते लढत राहिले अविरतपणे अखंडितपणे मृत्यूलाही थरकाप सुटावा अशा मोहिमा सर करत त्यांनी त्यांच्या पराक्रमाने, शौर्याने प्रसंगी मायेने रयतेच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली, आपला जन्म आपल्या मायभूमीवर अत्याचार करणाऱ्या सागराएवढ्या सर्व म्लेंच्छ शत्रूंचा न डगमगता, न खचता, पराक्रमाची शर्थ करून नायनाट करण्यासाठीच झाला आहे आणि हा विचार त्यांनी रयतेच्या मनात जागवला, त्यामुळे आधी त्यांच्या या कार्याला विरोध करणारे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सामील होऊन देव देश आणि धर्मासाठी बलीदान देण्यास सज्ज झाले होते! आजही या भारतभूमीवर म्लेंच्छ शत्रूंचे वादळ घोंघावत आहे, पण त्यांचा निर्भयपणे नायनाट करण्यासाठी आपण आजच्या या काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नरवीरांनी चेतवलेल्या विचारांचे, शौर्याचे स्मरण केले पाहिजे.*

*हे आवाज रुपी पुष्प शिवराय आणि शूर मावळ्यांच्या चरणी मनोभावे समर्पित 🎙️🌺🙏🏽🪔*

#राष्ट्रप्रथम #श्री_शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान #suraj_bhoi_creative7

suraj_bhoi_creative7

31 Dec, 15:35


*आपल्या आजच्या पिढीला, आजच्या हिंदूंना जागृत करण्याचा गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांनी दाखवलेला सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पवित्र चरित्र! आणि त्या चरित्राचा सार म्हणजे गुरुजींनी रचलेले...*

*✍🏼श्री शिवसुर्यहृदय! हे श्लोक ✍🏼*

*आजच्या या या ०१ ल्या श्लोकाचा अर्थ -*

*छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वी या हिंदुस्थानाची इतकी भयावह परिस्थिती होती की आपण त्याची कल्पना हि करु शकत नाही, चहू बाजूला केवळ आणि केवळ म्लेंच्छ सत्तेचा आणि त्यांनी चालवलेल्या गुलमीचाच अंध:कार दाटलेला होता पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने तो अनेक युगानुयुगांचा अंध:कार मिटून स्वातंत्र्याच्या सूर्याचा प्रकाश सर्वत्र पसरला, आजच्या काळातही आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या दु:खांचा, संकटांचा अंध:कार पसरलेला असतो, आपल्याला अशा परीस्थितीत काय करावे आणि काय करु नये या गोष्टी कळत नाहीत, आपलं ध्येय, लक्ष्य फार फार दूर गेल्यासारखं वाटतं.त्यावेळी न डगमगता, न घाबरता मन शांत ठेवून केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांना व त्यांच्या साथीने अतुलनीय पराक्रम गाजवणाऱ्या शूर वीर मावळ्यांना आठवायचे, त्यांच्याही आयुष्यात अनेक संकटे आली होती पण ते त्याला घाबरले नाहीत तर आई भवानीचे नाम घेऊन मोठ्या धैर्याने त्या संकटांवर तुटून पडले, त्यांचा हाच पराक्रम आपण चित्तात साठवून हर एक संकटाला निडरपणे सामोरे जाऊन लढायला शिकलं पाहिजे!*

*हे आवाज रुपी पुष्प शिवराय आणि शूर मावळ्यांच्या चरणी मनोभावे समर्पित 🎙️🌺🙏🏽🪔*

#राष्ट्रप्रथम #श्री_शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान #suraj_bhoi_creative7

suraj_bhoi_creative7

28 Dec, 05:20


धारातीर्थ यात्रा गडकोट मोहीम logo for printing and much more 🚩

suraj_bhoi_creative7

28 Dec, 05:20


🚩 धारातीर्थ यात्रा गडकोट मोहीम logo 🚩

suraj_bhoi_creative7

27 Dec, 13:08


*.... उरी शंभूराजांचा त्याग सदैव आठवावा! 🥺🙏🏼🚩🔱*

*हे आवाज रुपी पुष्प शिवपुत्र धर्मवीर छत्रपती शंभूराजांच्या चरणी मनोभावे अर्पण 🎙️ 🚩 🌺 🪔*

#राष्ट्रप्रथम #suraj_bhoi_creative7

suraj_bhoi_creative7

24 Dec, 16:32


*आपणच जर आपली संस्कृती टिकवली नाही, तर दुसरे येऊन त्यांची संस्कृती आपल्यावर लादल्या शिवाय राहणार नाहीत! 😞😞 🙏🏼🚩⚔️⚔️*

*आपली भूमी santachi नाही, युगानुयुगे जगाला मार्गदर्शन करणाऱ्या संतांची आहे 🔱🙌🏽🚩*

#राष्ट्रप्रथम #suraj_bhoi_creative7

suraj_bhoi_creative7

23 Dec, 12:53


कोण म्हणतं महाराज गेले...‌
🥹🥹🙌🏽🙌🏽🚩🚩❤️❤️

🎥 चित्रपट - सरसेनापती हंबीरराव (2022) 🎥

🚩 दिग्दर्शक - प्रवीण विठ्ठल तरडे 🚩

🚩 सादरकर्ते - @mohitepatilsandeep

निर्माते- @urvita_productions

#राष्ट्रप्रथम #suraj_bhoi_creative7

suraj_bhoi_creative7

19 Dec, 05:06


*" या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा राहिला नाही,*
*महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे...! "*

*महाराष्ट्र धर्म रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचे समर्थ*
*रामदास स्वामींनी केलेल्या या वर्णननास या जगी तोड नाही !*

*🎥 चित्रपट - छत्रपती शिवाजी (1952) 🎥*

*🚩 दिग्दर्शक - भालजी पेंढारकर 🚩*

#राष्ट्रप्रथम #suraj_bhoi_creative7

suraj_bhoi_creative7

17 Dec, 19:55


••••"आजचा उत्सव साजरा करु द्या!"••••

पराकोटीची स्वामी निष्ठा व पराकोटीचा त्याग आणि बाजी, बांदलांचा पराक्रमी इतिहास सांगणारा..

🎥 चित्रपट - पावनखिंड 🎥

🚩 दिग्दर्शक - श्री दिग्पाल लांजेकर 🚩

#राष्ट्रप्रथम #suraj_bhoi_creative7

suraj_bhoi_creative7

16 Dec, 04:03


हे आवाज रुपी पुष्प सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या चरणी मनोभावे अर्पण 🎙️🚩🌺

#राष्ट्रप्रथम #suraj_bhoi_creative7

suraj_bhoi_creative7

16 Dec, 04:02


*१६ डिसेंबर*

*अर्थात स्वामिनिष्ठ योद्धे, रणमार्तंड, शंभूरक्षक, हिंदवी स्वराज्याचे मामासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत सरसेनापती पदाची धुरा समर्थपणे सांभाणारे हंसाजी उर्फ हंबीरराव मोहिते यांची पुण्यतिथी....*

🙏🏼😢🚩⚔️💪🏼👑🔥

*सरलष्कर हंबीरराव (बाजी) मोहिते ह्यांचे खरे नाव हंसाजी हंबीरराव हि पदवी त्यांना शिवछत्रपतींनी दिली.. महाराणी सोयराबाई ह्यांचे ते भाऊ  प्रखर पराक्रमी अशा ह्या वीराने प्रतापगडाखाली आफ्जुल्ल्याच्या सैन्याची दाणादाण उडवली होती ह्या लढाईत त्यांनी ६०० हून अधिक शत्रूसैन्या कापून काढले हा पराक्रम गाजवणारी त्यांची तलवार आजही प्रतापगडच्या भवानी मंदिरात पहावयास मिळते राज्याभिषेकाच्या वेळी सरसेनापती प्रतापराव गुजर ह्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी महाराजांनी हंबीररावाची निवड केली ते त्यांच्या नात्यामुळे नाही तर ह्या वीराचे अतुलनीय शौर्य आणि स्वराज्याठाई असलेल्या निष्ठेने शिवछत्रपतींच्या निधनानंतरच्या वादळी काळात शंभूराजेंना साथ देऊन त्यांनी अफाट कर्तृत्व गाजवले १६ डिसेंबर १६८७ साली वाई सातारा येथील लढाईत तोफगोळा लागून वीरत्व प्राप्त झाले....*

*हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहीते यांना मानाचा मुजरा....*

#राष्ट्रप्रथम🇮🇳 #suraj_bhoi_creative7

suraj_bhoi_creative7

10 Dec, 19:33


*आज मार्गशीर्ष शु.एकादशी*

*यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।*
*अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥*
*परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।*
*धर्मासंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥*

*महाभारताच्या युध्दभूमीवर जगामधले श्रेष्ठ असे तत्वज्ञान श्रीभगवान योगेश्वर कृष्णांनी अर्जुनाचे निमित्ताने प्रकाशित झाले तो दिवस म्हणजे गीता जयंती!*

*सर्व हिंदूंना गीता जयंतीच्या श्री कृष्णमय शुभेच्छा! 🙌🏽🚩🦚*

#राष्ट्रप्रथम #suraj_bhoi_creative7

suraj_bhoi_creative7

05 Dec, 20:23


देख बाबर तेरी छातीपर भगवा लेहराया है ।
कसम खाई थी श्री राम की, मंदिर वहि बनाया है ॥

०६ डिसेंबर‌‌...

सर्व हिंदूंना हिंदू शौर्य दिनाच्या श्रीराममय भगव्या शुभेच्छा 🚩🏹🚩🏹🚩🏹🚩

#जयश्रीराम #राष्ट्रप्रथम

suraj_bhoi_creative7

28 Nov, 07:35


*माझी माऊली समाधीस्थ जरी झाली असली ना तरी, या देहाच्या आळंदीत, आसवांनी भिजलेल्या इंद्रायणीच्या तीरावर, हृदयाच्या गाभाऱ्यात विश्व कल्याणाचं दान मागण्यासाठी, देव देश आणि धर्म रक्षण्याचं बळ देण्यासाठी जन्मोजन्मी विराजमान असेल एका चक्रवर्ती सम्राटा समान!*

*- सुरज सुधाकर भोई*

suraj_bhoi_creative7

27 Nov, 16:50


*कार्तिक कृ. १३ अर्थात...*

*कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट, आळंदी चे महाराज, महाविष्णू अवतार, सद्गुरु श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा संजीवन समाधी दिवस...*

*ज्ञानेश्वरापाशीं आनंदी आनंद । नाचतो गोविंद कीर्तनासी ॥१॥*
*दशमीच्या दिवशीं महोत्सव आळंकापुरीं । करितसे हरि आवडीनें ॥२॥*
*हरिदिनीं जागरण होत सारी रात्र । बसोनि पंढरीनाथ स्वयें अंगे ॥३॥*
*द्वादशी पुण्यतिथी केली ज्ञानेश्वरा । पांच दिवस सारा महोत्सव ॥४॥*
*अमावस्ये दिवशीं केला गोपाळकाला । मग वैष्णवाला लाभ मोठा ॥५॥*
*नामा म्हणे देवा आनंद आळंकापुरी । कांही दिवस हरि राहा येथें ॥६॥*

*- संतश्रेष्ठ नामदेव महाराज*

*कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट ज्ञानेश्वर माऊलींना संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त साष्टांग दंडवत... 🙏🏽🥺🙏🏽🥺🙏🏽🥺🙏🏽*

#माऊली #suraj_bhoi_creative7

suraj_bhoi_creative7

18 Nov, 18:43


*आज १९ नोव्हेंबर…*

*म्हणजे  शिवभक्त आणि राष्ट्रभक्त, ब्रिटिशांना रणांगणी धूळ चारणाऱ्या रणरागिणी राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा ⚔️🙏🏼🚩🔥👑🇮🇳*

*उखाड फेका हर दुश्मन को, जिसने झाँसी का अपमान किया, मर्दानी कि परिभाषा बनकर  आजादी का पैगाम दिया…!*

*#suraj_bhoi_creative7 #राष्ट्रप्रथम🇮🇳*

suraj_bhoi_creative7

12 Nov, 07:48


*आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने*
*शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू....*


*आज आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर घेऊन येत आहोत...*

*जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या लेखणीतून प्रसवलेल्या अमृतमयी अमर शब्दांची गाथा..*

#आनंदडोह @aananddohthefilm

#Aananddoh #2025 #suraj_bhoi_creative7 #संततुकाराममहाराज

Written By - Yogesh Soman
Dirrcted By - @digpalofficial

*🙏🏽🙏🏽 लवकरच....🙏🏽🙏🏽*

suraj_bhoi_creative7

10 Nov, 08:21


कवी भूषण यांनी अफजलखान वधाचे केलेले काव्यात्मक वर्णन एकदा आवर्जून पहाच...⚔️⚔️🙏🏼🙏🏼🎥🎥

या काव्याचा मराठी अर्थ - दगा करण्यासाठी जावळीमध्ये (अफजलखानरूपी) राक्षस आला होता. तो मोठा भयानक आणि घमेंडखोर होता. भूषणजी म्हणतात, बाहुबली शिवाजी महाराज मनात कोणतीही शंका न घेता बेधडक त्याला भेटायला गेले. बिछव्याचा घाव होताच अफजलखान खाली कोसळला आणि महाराज त्याच्यावरती दिसू लागले. ते नरेंद्र (शिवाजी महाराज) आपल्या कट्टर शत्रूला खाली दाबून त्याच्यावरती असे बसले की जसे एखाद्या हत्तीला सिंहाने खाली पाडले.

सर्व हिंदूंना शिवप्रताप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩

#suraj_bhoi_creative7 #राष्ट्रप्रथम #शिवप्रतापदिन

suraj_bhoi_creative7

10 Nov, 03:58


*१० नोव्हेंबर १६५९....*

*🔥🔥 अर्थात शिवप्रताप दिन (तारखेनुसार) 🔥🔥*

*जेव्हा तल्लख बुद्धीने केलेला जीवघेणा वार,*
*एखाद्या दाहक शस्त्राच्या वारापेक्षा घातक ठरतो,*
*तेव्हा प्रतापगडावर साजरा होतो.... #शिवप्रतापदिन*

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी श्री शिवप्रताप दिनानिमित्त मानाचा मुजरा 🚩⚔️🙏🏼🚩*

*हे आवाज रुपी पुष्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मनोभावे अर्पण 🎙️🚩🌺*

suraj_bhoi_creative7

10 Nov, 03:57


Part 2

suraj_bhoi_creative7

10 Nov, 03:56


Part 1

suraj_bhoi_creative7

09 Nov, 19:16


*"साडेसहा फूट उंचीचा धिप्पाड अफजलखान मारायला ६ फुटाच्या तलवारीचा नाही तर ४ इंचाच्या वाघनखाचा उपयोग केला."*

*नियोजन अन युक्ती.....🚩🙏*

*🔥🔥 सर्व हिंदूंना श्री शिवप्रताप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩 🚩*

#शिवप्रतापदिन #suraj_bhoi_creative7 #राष्ट्रप्रथम

suraj_bhoi_creative7

02 Nov, 20:33


*दिपावली उत्सवाचा सहावा दिवस, अर्थात...*

*❤️ भाऊबीज ❤️*

*बहिणीने "म्यान" होऊन भावाची काळजी घ्यावी,*
*भावाने "तलवार" होऊन पराक्रमाची ओवाळणी द्यावी!*
*- चंद्रहास*

*सर्व हिंदूंना भाऊबीजेच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा 🙏🏽🚩🪔*

suraj_bhoi_creative7

02 Nov, 20:33


*आमच्या आगामी भव्यदिव्य ऐतिहासिक " वीर मुरारबाजी" या चित्रपटाच्या टिमकडून सर्व शिवभक्तांना दिपावलीच्या व पाडव्याच्या शिवमय शुभेच्छा 🙏🏽🚩*

*पुरंदर चा धुरंधर येत आहे....*

*१४ फेब्रुवारी २०२५ !*

#veermurarbaji #वीरमुरारबाजी #suraj_bhoi_creative7

suraj_bhoi_creative7

02 Nov, 03:51


*दिपावली उत्सवाचा पाचवा दिवस, अर्थात...*

*🌳 बलिप्रतिपदा 🌳*

*पेरावं तेच पीक येतं । जगाची रीत, नवं नाही त्यात ।*
*सिवबा राजांनी पराक्रम पेरला । सर्जा शंभु राजं अवतरलं ॥*

*छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरलेल्या हिंदवी स्वराज्याच्या विचारांचे वटवृक्षात रुपांतर करुन, शेतकऱ्यांचे, रयतेचे हित जपत, अद्वितीय पराक्रम गाजवून देव, देश आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणारे, हिंदू धर्मरक्षक, महावीर, धर्मवीर, पोशिंदा राजे, छत्रपती शंभूराजांना बलिप्रतिपदा निमित्त मानाचा मुजरा...*

*सर्व हिंदूंना बलिप्रतिपदा आणि दिपावली पाडव्याच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा 🙏🏽🚩🌳🪔*

suraj_bhoi_creative7

31 Oct, 12:48


हनुमानाने लावलेल्या दिव्यांचा उजेड पडला दारी,
घेऊन हाती धनुष्य, जे अधर्मीयांना संहारी
सितामाईच्या हृदयाशी ज्यांची बांधली आहे गाठ,
हिंदूंनो चला करु साजरी त्या राघवांच्या
आशिर्वादाने या दिपावलीची पहाट....

🏹🪔🏹🪔🏹🪔🏹🪔🏹🪔🏹

सत्य युगात अधर्माने थैमान घातलेले असताना, सत्य, त्याग आणि धर्माच्या मार्गावर चालून, आदर्श राज्यव्यवस्था स्थापन करुन दुष्टांचा संहार करुन प्रत्येक हिंदूंच्या मनात भक्तीची आणि शक्तीची समई प्रज्वलित करणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तम, हिंदू धर्मरक्षक, दशग्रीव संहारक, दशरथ नंदन प्रभू श्रीराम यांच्या चरणी दिपावली निमित्त साष्टांग दंडवत 🙏🏽🙏🏽🙏🏽

🚩 सर्व हिंदूंना दिपावली उत्सवाच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा 🚩

#राष्ट्रप्रथम #suraj_bhoi_creative7

suraj_bhoi_creative7

28 Oct, 16:04


*आज दिपावली उत्सवाचा दुसरा दिवस अर्थात*

*🪙🪙 धनत्रयोदशी 🪙🪙*

*" रायगडावर खडे पसरले, शिवरायांच्या पायी,*
*हेच आम्हा माणिक, मोती दुसरी दौलत नाही "*

*हि धनत्रयोदशी समर्पित त्या सुवर्णसिंहासनाधिश्वर*
*छत्रपतींस ज्यांनी आपले तन, मन झिजवून*
*रयतेच्या पदरात स्वराज्यरुपी धन घातले*

#राष्ट्रप्रथम #suraj_bhoi_creative7 #श्री_शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान

suraj_bhoi_creative7

27 Oct, 12:15


आज दिवाळी उत्सवातील पहिला दिवस अर्थात

🐮🐮वसुबारस 🐮🐮

असंख्य देव देवता जिच्या ठाई आहेत, जिच्यामुळे या पवित्र देशाची ओळख आहे, जिच्यामुळे आज आपण जगत आहोत, जिला राजमाता जिजाऊ साहेब,छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती शंभूराजांनीही वंदनीय मानून तिची पूजा करत, हिंदू धर्मामध्ये जिला अनन्य साधारण महत्व आहे अशा गाईस वसुबारस निमित्त त्रिवार वंदन 🚩🙏🏽🔱🇮🇳🕉

सर्व हिंदूंना वसुबारस उत्सवाच्या हार्दिक आणि आरोग्यदायी शुभेच्छा 🌺🌺

🔴*डिझाईन कोणीही copy करु नये*🔴

#राष्ट्रप्रथम🇮🇳 #suraj_bhoi_creative7 #श्री_शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान

suraj_bhoi_creative7

27 Oct, 11:10


*आज आपल्या सर्वांची दिवाळी या सर्वांच्या त्यागामुळे, शौर्यामुळे*
*उजळून निघत आहे... याचे विस्मरण होता कामा नये! 🪔🥹🙏🏼*

*🚩 सर्व हिंदूंना दिपावलीच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा 🚩*

#suraj_bhoi_creative7

suraj_bhoi_creative7

23 Oct, 13:06


*२४ ऑक्टोबर...*

*अर्थात मराठा आरमार दिन ⛵️*

*गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊनही, स्वातंत्र्याचा महासागर निर्माण करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 🙏🏽🌊⛵️*

*छत्रपती शिवरायांनी सागरी सुरक्षेचे महत्व ओळखुन आजच्याच दिवशी कल्याण, भिवंडी जिंकले आणि जहाजबांधणी काम सुरु केले. केवळ मराठ्यांचे नाही, तर भारतातील पहिले जहाज निर्माण करुन सागरी सुरक्षेची मुहुर्तमेढ शिवरायांनी रोवली...*

*🚩 सर्व हिंदूंना मराठा आरमार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩*

suraj_bhoi_creative7

17 Oct, 12:21


सह्याद्रीचा महादेव....🔱⚔️💪🏽

छत्रपती शंभूराजांच्या धर्मरक्षणाची गाथा!

"धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज भाग - ०१"

🔱🔱 येत आहे 22 नोव्हेंबर 2024 रोजी ⚔️⚔️

#Dharmarakshak_Mahaveer_Chhatrapati_Sambhaji_Maharaj #suraj_bhoi_creative7
#November_2024

Presenter: @mohitepatilsandeep

Banner: @Urvita_Productions

Producers: @shekharmohitepatil | @dharmendrabora | @saujanya_nikam | @ketanindia2

suraj_bhoi_creative7

15 Oct, 16:06


🌝 कोजागिरी पौर्णिमा 🌝

आज आपण चंद्राच्या शितल छायेत मसालेदार,केसरयुक्त दुधाची चव घेत पितो इतरांना ही पाजतो पण आज एक ऐतिहासिक घटना घडली होती त्याचा ही आपण कधी विसर पडू देत नाही..कोजागिरी निमित्त रायगडा वर दुध विक्री करायला गेलेल्या हिरकणी या शूरविर महिलेची कथा माहिती नाही. असा महाराष्ट्रात तरी कोणी नसेल....गडाचे दरवाजे बंद झाल्यावर केवळ पुत्र प्रेमा पोटी आंधाऱ्या रात्री अवघड कड्यावरुन उतरुन आपल्या लहान बाळाला भेटण्यासाठी हिंमत दाखवणाऱ्या

🙏🏻🙏🏻शुरवीर हिरकणी मातेला मानाचा मुजरा 🙏🏽🚩🌺

#राष्ट्रप्रथम #suraj_bhoi_creative7 #श्री_शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान

suraj_bhoi_creative7

11 Oct, 16:16


💪🏾🌺☘️विजयादशमी ☘️🌺💪🏾

सदर छंदाचा अर्थ - जंभासुर नावाच्या राक्षसाचा ज्याप्रमाणे इंद्राने वध केला,समुद्रावर जसा वडवाग्नी कोसळतो,गर्विष्ठ रावणाचा जसा रघुकुलराज रामचंद्राने नाश केला;वादळ ज्याप्रमाणे मेघांचा नाश करते,मदनाचा ज्याप्रमाणे शंकराने,सहस्त्रार्जुनाचा ज्याप्रमाणे परशुरामाने संहार केला,दावाग्नी ज्याप्रमाणे वृक्षांचा नाश करतो, हरिणांच्या कळपावर चित्ता ज्याप्रमाणे तुटून पडतो,प्रकाश जसा अंधाराचा नाश करतो,कृष्णाने जसा कंसाचा वध केला त्याचप्रमाणे शिवराजे म्लेंच्छांचा (शत्रूंचा) नाश करतात

प्रभू श्रीरामचंद्रांना आदर्श मानून त्यांच्या आशिर्वादाने, मध्ययुगीन काळातील म्लेंच्छपातशाही रुपी रावणांचा संहार करुन पुन्हा एकदा रयतेचे रामराज्य निर्माण करुन, स्वराज्याचे सोने रयतेच्या पदरात घालणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना

विजयादशमीनिमित्त मानाचा मुजरा! 🙏🏽🚩👑

#suraj_bhoi_creative7

suraj_bhoi_creative7

06 Oct, 12:40


दि. ०७ ऑक्टोबर, अर्थात आमच्या जन्मदिनाचे औचित्य साधून

युगप्रवर्तक, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांना वंदन करून घेऊन येत आहोत,...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचे सार, अंतरंग उलगडून सांगणारे, क्षणोक्षणी मार्गदर्शन आणि प्रेरणा देणारे गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजींनी रचलेले,

🔱"श्री शिवसुर्यहृदय : अंतरंग श्री शिवछत्रपतींचे" ⚔️

लवकरच...!

॥ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ॥

suraj_bhoi_creative7

03 Oct, 05:52


*आज शारदीय नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी घेऊन येत आहोत आमच्या आगामी "धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज, भाग ०१" या भव्यदिव्य चित्रपटातील छत्रपती महाराजांच्या सुनबाई, छत्रपती शंभूराजांच्या अर्धांगिनी, हिंदवी स्वराज्याच्या कुलमुख्त्यार महाराणी येसूबाई साहेब यांचे हे पोस्टर*

*शिव स्मरूनी, असुरा मर्दूनी,*
*नटली असे शंभू अस्तुरी,पिवळा मळवट,*
*भगवी धरणी, सह्याद्रीची शैलपुत्री...*

#महाराणी_येसूबाई #Maharani_Yesubai
#धर्मरक्षक_महावीर_छत्रपती_संभाजी_महाराज
#Dharmarakshak_Mahaveer_Chhatrapati_Sambhaji_Maharaj
#15_November #suraj_bhoi_creative7

सादरकर्ते - श्री संदीप मोहिते पाटील

प्रस्तुतकर्ते - उर्विता प्रोडक्शन्स

निर्माते: शेखर मोहिते पाटील, धर्मेंद्र बोरा,सौजन्य निकम, केतन राजे भोसले

दिग्दर्शक - तुषार विजय शेलार

suraj_bhoi_creative7

02 Oct, 15:08


अश्विन शुद्ध १

⚔️ अर्थात घटस्थापना (नवरात्र उत्सव प्रारंभ) ⚔️

माता भवानी तू लक्ष्मी स्वराज्याची
अष्टभुजा जणू कलि च्या युगे
मावळवासिनी पुण्यनिवासिनी
राष्ट्र उभारणी तू वर दे


जगतजननी आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन ज्या माऊलींने पाच पातशाह्या मातीत गाडून, म्लेंच्छ म्हैशासूराचा संहार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज घडवले अशा रणचंडी, स्वराज्य जगदंबा राजमाता जिजाऊंच्या चरणी आणि आई अंबाबाईच्या चरणी साष्टांग दंडवत ⚔️🙏🏼🚩

सर्व हिंदूंना नवरात्र उत्सवाच्या
मंगलमय शुभेच्छा 🙏🏼 🚩

#श्री_शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान #suraj_bhoi_creative7 #राष्ट्रप्रथम

suraj_bhoi_creative7

27 Sep, 17:02


*२८ सप्टेंबर....*

*अर्थात भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्वोच्च शिखर असणारे महान क्रांतीकारक, देशभक्त, वाचनप्रिय, शेर-ए-पंजाब, शेर-ए-हिंदुस्थान, शहिद-ए-आझम, भगतसिंग यांचा जन्मदिवस*

*✍🏽✍🏽 " लिख रहा हूँ मैं अंजाम, जिसका कल आकाज आऐगा,*
*मेरे लहू का हर एक कत्रा इंकलाब लाएगा 🇮🇳🚩*

*✍🏽✍🏽 - क्रांती शिरोमणी भगतसिंग ✍🏽✍🏽*

*हे आवाज रुपी पुष्प माझे मार्गदर्शक, मित्र, महान क्रांतीकारक वीर भगतसिंग यांच्या चरणी मनोभावे अर्पण 🎙️🚩🌺🎙️*

suraj_bhoi_creative7

24 Sep, 12:55


*राजे तुम्ही पुन्हा जन्माला या,असं फक्त म्हणायचे नसतं...*
*त्यासाठी मागणं मागावं लागतय, आई अंबाबाईला!*
*आणि तेच मागणं मागायला देवीच्या चरणी जाणं म्हणजे...*

*⚔️ श्री दुर्गामाता दौड 🚩*

*घटस्थापना ते विजयादशमी*

*हिंदूंनो मोठ्या संख्येने या राष्ट्रकार्यात सहभागी व्हा!*

#श्री_शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान #suraj_bhoi_creative7

suraj_bhoi_creative7

22 Sep, 04:41


दि. ०३ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीच्या निमित्ताने, ज्या जगदंबेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि धर्मवीर छत्रपती शंभूराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले, त्याच आई अंबेच्या चरणी आज देव देश आणि धर्मासाठी लढण्याचे बळ मागण्यासाठी प्रत्येक हिंदूने या दुर्गामाता दौड मध्ये सहभागी तर झालेच आणि त्याच बरोबर या नवरात्र उत्सवात हा श्री दुर्गामाता दौड चार लोगो प्रत्येक हिंदूने आपल्या dp ला, profile picture ला ही लावून आई भवानीला साकडं घालावं!

जय भवानी, जय शिवाजी!

#suraj_bhoi_creative7 #श्री_शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान

suraj_bhoi_creative7

09 Sep, 19:52


#प्रबोधनात्मक_गणेशोत्सव

🚩🚩गणेशोत्सव निमित्त खास....🚩🚩

🔱🔱आपल्या लाडक्या बाप्पाच्या अपरिचित गोष्टी!🔱🔱

व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा 🎥🚩

#राष्ट्रप्रथम #suraj_bhoi_creative7

suraj_bhoi_creative7

07 Sep, 18:06


#प्रबोधनात्मक_गणेशोत्सव

🚩🚩गणेशोत्सव निमित्त खास....🚩🚩

🔱🔱आपल्या लाडक्या बाप्पाच्या अपरिचित गोष्टी!🔱🔱

व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा 🎥🚩

#राष्ट्रप्रथम #suraj_bhoi_creative7

suraj_bhoi_creative7

06 Sep, 17:57


गणेशोत्सव निमित्त खास...

॥ स्वराज्य गणेश ॥

📷 ऐतिहासिक गडदुर्गांवरील
बाप्पाची छायाचित्रे 📷

रारगड जिल्ह्यातील कुलाबा जलदुर्गात असणारे हे ऐतिहासिक श्री सिद्धिविनायक गणेश पंचायतन मंदिर

जय गणेश 🙏🏼जय शिवराय 🚩

#suraj_bhoi_creative7 #राष्ट्रप्रथम

suraj_bhoi_creative7

06 Sep, 14:42


भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्थी...

देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदर्पितनागम् । भक्तविघ्नहनने धृतरयत्नं तं नमामि भवबालकरत्नं नमामि।।

- धर्मवीर छत्रपती शंभूराजे

सर्व हिंदूंना गणेश चतुर्थीच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा 🚩 🚩 🙏🏼

🎥🎥( सदर व्हिडिओ मध्ये राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे येथे स्थापित केलेल्या, पुण्यनगरीचे ग्रामदैवत असणाऱ्या, श्री कसबा गणपतीचे मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ) 🎥🎥

🐀🐀🐀🐀🐀🐀🐀🐀🐀🐀🐀🐀🐀

#suraj_bhoi_creative7 #राष्ट्रप्रथम

suraj_bhoi_creative7

05 Sep, 05:42


*०५ सप्टेंबर...*

*हिंदवी स्वराज्याच्या महाराणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी सईबाई साहेब यांची पुण्यतिथी 🥺🥺🙏🏼🙏🏼🚩🚩*

*साक्षात शिवपत्नी होण्याचा ज्यांना मिळाला मान*
*ज्यांनी सोपवीले स्वराज्याच्या झोळीत रौद्रशंभूरुपी दान*
*अशा मातृत्वाने केले आजच्याच दिनी कैलासासी प्रस्थान*

*शिवपत्नी, शंभूमाता, स्वराज्यलक्ष्मी,* *महाराणी सईबाई साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !! 💐💐*