🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯 @theanalystmpsc Channel on Telegram

🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯

@theanalystmpsc


💥ध्येय तुमचे ,साथ आमची💥
🎯 Avinash Shitole ('The Logic Booster' , 'The Analyst' & Combine Logic Booster पुस्तकाचे लेखक, 5 राज्यसेवा मुख्य )

☎️ @AvinashShitole

ध्येय तुमचे ,साथ आमची (Marathi)

🎯 ध्येय तुमचे ,साथ आमची 💥nnआपल्या जीवनातील लक्ष्यांचे साधन करण्यासाठी 'ध्येय तुमचे ,साथ आमची' या Telegram चॅनलवर आपले स्वागत आहे. या चॅनलवर आपण अविनाश शितोळे ('The Logic Booster' आणि 'The Analyst' पुस्तकाचे लेखक, 5 राज्यसेवा मुख्य) यांच्या मार्गदर्शनामुळे आपले ध्येय आणि साधने स्पष्ट करण्यास मदत केली जाईल. त्यांच्या विशेषज्ञतेने तुमच्या लक्ष्यांवर नियोजन करण्याची सहाय्य केली जाईल. ज्वलंत विद्यार्थ्यांसाठी, राज्यसेवा परीक्षेत आत्मविश्वास सुधारण्यासाठी आणि सर्वांसाठी जीवनातील अभ्यासाच्या प्रवासावर मार्गदर्शन करण्यासाठी हा चॅनल अत्यंत उपयुक्त आहे. आपल्या लक्ष्यांच्या दिशेने ओंकार मार्गीत आणि आत्मविश्वासाने अव्हावा करण्यास हा चॅनल आपल्याला मदत करू शकतो. या Telegram चॅनलवर जॉईन करण्याच्या वेळी, आपण अपडेट आणि मार्गदर्शनाच्या अत्यंत अद्यावत सहाय्य घेऊ शकता आणि आपल्या लक्ष्यांची प्राप्तीसाठी समर्थ असू शकता. त्यांचे मार्गदर्शन घेऊन, आपण आपल्या ध्येयाला साधारण करू शकता आणि सफळतेच्या मार्गावर चालू शकता. अशाप्रकारे हा Telegram चॅनल आपल्याला आपल्या लक्ष्यांची प्राप्तीसाठी समर्थ बनवू शकतो आणि आपल्याला स्वप्नांच्या दिशेने नेत्रित करू शकतो. त्याचाउपयोग करून आपल्या ध्येयाला व्यक्त करण्याची क्षमता वाढेल आणि आपल्याला आपल्या सपनांची प्राप्ती करण्यासाठी मदत करेल. तसेच, आपल्या ध्येयावर मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्याला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि आपल्या सपनांची प्राप्ती करण्यासाठी हा चॅनल अद्यातनित किंवा लक्ष्य साधारित समाचार आणि सोप्पे अभ्यास उपलब्ध करू शकतो.

🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯

25 Oct, 11:27


https://youtube.com/live/MtZWeMe3muw?feature=share

🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯

23 Oct, 16:22


👉 एका शिक्षकाने भावी शिक्षकांसाठी
केलेला एक छोटासा प्रयत्न.

👉 ही लिंक सर्व शिक्षक बंधू भगिनींना
शेयर करा.

🔻Open to All🔻

🔻 प्रा. दिलीप स. मुसळे ( एम ए इंग्रजी, सेट पात्र, १४ वर्ष अध्यापनाचा अनुभव)

https://youtube.com/playlist?list=PLR9sfSov2Ht62USHVG1x89VvbCT6z2IZt&si=9He4qU7m4MYzsUe1

🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯

16 Oct, 15:05


MPSC objective परीक्षेत PYQ विश्लेषण खूप महत्वाचे असते. वरील pdf मध्ये प्रत्येक प्रश्नाचे ओरिजिनल पेपरवर सखोल अथवा xerox वर विश्लेषण कसे करावे याचा नमुना दिला आहे.

या प्रकारे प्रत्येक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विश्लेषण केल्यास आयोगाच्या अंतीम प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी मदत होते तसेच आवश्यक data चांगल्या पद्धतीने revise होतो..

- तन्मय राधिका अनिल मांडरेकर
( Rank 10 - MPSC राज्यसेवा 2023 )

🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯

16 Oct, 15:05


PYQ analysis.pdf

🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯

14 Oct, 14:01


*"*मराठी साहित्य रचना "*

😍MAHA TET + BMC ची तयारी करणाऱ्या
तमाम महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांसाठी.
*"*मराठी साहित्य रचना "*
नोट्स PDF स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. या नोट्स मध्ये
♦️मराठी साहित्य ( संत साहित्य + तंत साहित्य + पंत साहित्य + आधुनिक साहित्य ) यावरील सर्व प्रश्नांची तयारी होईल हे नि:शंक.


सर्व विद्यार्थी मित्रांनी या नोट्स ची झेरॉक्स करून घेऊन.... आपल्या अभ्यासाची चौकट पूर्ण करून घ्यावी.
धन्यवाद..
😍व्याकरण + शब्दसंग्रह + साहित्य रचनेच्या एकत्रित तयारी साठी बॅच जॉईन करा 👇
बॅच लिंक..
https://bfwyu.on-app.in/app/oc/555504/bfwyu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯

09 Oct, 13:16


स्टेप अप अकॅडेमी" , पुणे
📢 SARTHI / MAHAJYOTI /BARTI / TRTI
"वरील संस्थेमार्फत स्कॉलरशिप साठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे *दिलीप सर स्टेप अप अॅकॅडमीच्या* वतीने हार्दिक अभिनंदन "💐


या संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण - *राज्यसेवा आणि गट ब व क यांच्या प्रशिक्षणाकरता STEP UP ACADEMY ची टीम उपलब्ध असणार आहे.* आमच्या संस्थेचा दर्जा आणि आम्ही घेत असलेले प्रयत्न विद्यार्थ्यांच्या पसंतीला नक्कीच उतरत आहेत आणि त्यातून सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा सुद्धा आम्ही जोपासली आहे.
*QUALITY LECTURES + APPROACH BUILDING + TEST SERIES* च्या माध्यमातून तुमच्या तयारीच्या काळात सर्व टप्प्यावर आमची संस्था आपल्या पाठीशी उभी राहीली आहे आणि याहिपुढे आम्ही असेच प्रामाणिक प्रयत्न करत राहू, याची ग्वाही आम्ही देत आहोत.

Step Up बरोबर join होण्यासाठी कृपया पुढे दिलेली link वरील माहिती काळजीपूर्वक भरा जेणेकरून आम्ही तुमच्याशी संपर्क साधू शकतो.

https://forms.gle/YDCmMFKfSonUYSz18

आपणास काही अडचण आल्यास आपण आमच्या संस्थेच्या 9172217440 या क्रमांकावर ती संपर्क साधू शकता.

आपल्या STEP UP च्या दर्जाबद्दल तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की कळवा, त्यासाठी आपल्या YOUTUBE चॅनेल ची LINK पुढे देत आहोत...
https://youtube.com/@stepupmpsc7386?si=5mqkEtta6oSA6E4x

तुम्ही GOOGLE FORM भरणारच आहात... त्यासाठी अगोदरच
तुमचे खूप खूप आभार...🙏Thank you very much. And all the best

🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯

28 Sep, 04:44


#BookUpdate
#4th_Reprint
#TheLogicBooster

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रथमता सर्व स्पर्धा परीक्षार्थींनी 'द लॉजिक बूस्टर '-राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2013 ते 2023 या पुस्तकावर विश्वास ठेवून दिलेल्या भरगोस प्रतिसादाबद्दल Step Up अकॅडमी, पुणे टीम कडून मनःपूर्वक आभार🙏. पुस्तक OUT OF STOCK झाले आहे . पुस्तकाची चौथी रिप्रिंट(With Minor Changes) सोमवार ,30 ऑक्टोबर 2024 पासून पुण्यात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होईल याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी .तसदीबद्दल क्षमस्व.🙏🙏

आपलाच,
अविनाश शितोळे
लेखक - The Logic Booster

🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯

25 Sep, 07:25


PYQ analysis का व कसे करावे

⚙️ आधी सांगितल्या प्रमाणे PYQ हे अभ्यासात दिशादर्शनाचे काम करत असतात. काय वाचावे, काय वाचू नये, कशा पद्धतीने वाचावे ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरे PYQ मधून समजतात.

⚙️ आपण कोणताही टॉपिक वाचत असेल तर आधी त्याचे PYQ व्यवस्थित पाहून घेणे आवश्यक आहे. त्याने टॉपिक चे महत्त्व आवाका व आयोगाला या टॉपिक मधून काय वाचणे अपेक्षित आहे हे समजते.

⚙️ टॉपिक वाचल्यानंतर परत PYQ पाहिल्यास आपल्याला टॉपिक व्यवस्थित समजला आहे का हे समजते.

⚙️ जेव्हा अभ्यासक्रम पूर्ण वाचून झाला असेल तेव्हा PYQ टॉपिक wise न वाचता आयोगाच्या प्रश्नपत्रिका आहे तशा सोडवाव्या. प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे. कोणता टॉपिक कच्चा राहिला आहे. त्या विषयातील आपली बलस्थाने, कच्चे दुवे समजण्यास मदत होते. त्यानुसार अभ्यासास दिशा देता येते.

⚙️ बाजारात जी लॉजिक बूस्टर सारखी PYQ analysis ची पुस्तके उपलब्ध आहेत. त्यातून लॉजिक कसे वापरावे हे समजण्यास मदत होते. आपल्याला समजलेल्या गोष्टी लिहून ठेवल्यास त्याचा फायदा होतो.

⚙️ आपण आधी आयोगाची परीक्षा दिली असेल तर आपण परीक्षेत कोणत्या चुका केल्या होत्या हे लिहून काढावे व ह्या चुका परत होणार याची काळजी घावी.

⚙️ आयोगाचे प्रश्न तुम्ही एकदा सोडवले की परत एकदा तो प्रश्न बरोबर आला होता का की चुकला हे पहावे .जर चुकला असेल तर का चुकला? माझा कंटेंट कमी पडला का?, की माझ्या कडून silly mistake झाली की लॉजिक लावण्यात माझी चूक झाली की तो प्रश्न माझ्या कडून नीट वाचला गेला नाही. माझी घाई झाली. ह्या चुका note down कराव्यात. आपण जर mistake rectify करत गेलो तर शेवटी ह्या गोष्टींचा खूप फायदा होतो.

Join📱 @DCkwagaskar

🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯

20 Sep, 18:31


अभ्यासात syllabus चे महत्त्व

Syllabus हा अभ्यासाची मर्यादा निश्चित करतो तर PYQ अभ्यास कसा करावा याची दिशा ठरवून देतो.

अभ्यास करताना syllabus कायम नजरेसमोर ठेवावा. आपण जे वाचत आहे ते syllabus ला धरून आहे का व syllabus च्या कोणत्या मुद्द्याशी संबंधित आहे हे पाहावे म्हणजे अभ्यास करताना आपण भरकटत नाही.

Syllabus च्या कोणत्या मुद्द्याला किती महत्त्व द्यावे हे PYQ analysis ने समजते. Syllabus समोर असल्यास एखाद्या मुद्द्याचा over study होत नाही व सर्व मुद्द्यास न्याय देता येतो.

अभ्यास करताना वेळेचे बंधन असते. मर्यादित वेळेत आपणाला सर्व syllabus पुर्ण करुन त्याच्या जास्तीत जास्त revision करणे आवश्यक असते.

अशा वेळेस syllabus मुळे targeted व to the point reading शक्य होते. चौकटीत वाचन व जास्तीत जास्त revision हे यशाचे गमक आहे.

या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी syllabus ला दुर्लक्षित करून चालणार नाही हे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवाराने लक्षात घ्यावे.
Join @TheAnalystMPSC

🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯

20 Sep, 18:29


PYQ analysis करणे का आवश्यक
आहे
?

आपणाला एखाद्या टेकडीवर चढाई करून शिखर गाठायच आहे पण वाटाड्या नसेल तर आपण रस्ता चुकू शकतो, सोपे रस्ते आपल्याला माहित नसतील. स्पर्धा परीक्षेत सुद्धा आपण PYQ analysis करत नसू तर आपण सोपा रस्ता भरकटून उगाच कष्ट करत बसतो. परीक्षेचा अभ्यास करताना PYQ हे आपले सर्वात उत्तम मार्गदर्शक असतात.

PYQ analysis केल्याने एखाद्या मुद्द्याला परीक्षेत किती महत्त्व दिले जाते. त्या मुद्यावर कोणत्या angal ने प्रश्न विचारले जातात. एखाद्या मुद्द्याचा किती सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे अभ्यास करताना आयोगाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे समजते.

अशी कल्पना करा की तुम्हाला आयोगाची प्रश्नपत्रिका तयार करायची आहे तर तुम्ही काय कराल? सर्वात प्रथम syllabus समोर ठेवाल व आधी प्रश्नपत्रिका कशा तयार केल्या आहेत त्या संदर्भ म्हणून घ्याल. Paper setter पण हेच करतात. यावरून तुम्हाला PYQ चे महत्व समजले असेल.

अभ्यास करताना PYQ sandwich पद्धत वापरावी म्हणजे आपण कोणत्याही टॉपिक चा अभ्यास करणार असू तर सुरवातीला त्या टॉपिक वर आलेले PYQ पाहणे आवश्यक आहे. म्हणजे
टॉपिक वाचताना काय लक्षात ठेवण्याची गरज आहे हे समजते. व टॉपिक वाचून झाल्यावर परत PYQ पाहिल्यास आपला आयोगाच्या दृष्टीने व्यवस्थित अभ्यास झाला आहे का हे समजते

PYQ साठी topic wise PYQ analysis केलेली पुस्तके मार्केट मध्ये भेटतात उदा. लॉजिक बूस्टर. ती वाचताना main focus प्रश्नावर ठेवावा व EXPLAINATION कमीत कमी व आवश्यक तेवढेच वाचावे. म्हणजे PYQ वरून आपण भरकटत नाही.

एका प्रामाणिक परिक्षार्थीचे अपयशी होण्याचे कारण बहुदा PYQ कडे दुर्लक्ष करून फक्त दिवस रात्र वाचत बसणे हेच असते. तरी यशस्वी होण्यासाठी ह्या छोट्या पण खूप महत्वपूर्ण गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯

14 Sep, 12:50


🟢...Latest Updates Of GS - 4...🟢

🔥..Economics By Sachin Jagtap Sir..🔥

📱Youtube Live Today @6.30 Pm📱

🔔Click Here 🔗
https://www.youtube.com/live/rz8nEfzON28?si=_9jfGfvG64CITLqj

▶️ राज्यसेवा मुख्य परीक्षेत 60 मार्कावरून 90 मार्कापर्यंत जाण्याचा मार्ग...

▶️PYQ Analysis आणि टॉपिकनिहाय टेस्ट..

▶️आर्थिक पाहणी आणि बजेटसाठी स्वतंत्र लेक्चर...

▶️Syllabus Oriented Teaching..

🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯

12 Sep, 04:14


📚 उत्तर अमेरिकेतील मोठी सरोवरे (Great Lakes)
📝 Trick: HOMES
- H : ह्युरॉन
- O : ओंटारियो
- M : मिशिगन
- E : एरी
- S : सुपीरियर


🌊 महासागर (Oceans)
📝 Trick: PAISA
- P : पॅसिफिक
- A : आर्क्टिक
- I : इंडियन
- S : साऊथर्न ओशन
- A : अटलांटिक

🏔️ महत्त्वाचे फोल्ड पर्वत
📝 Trick: U Are A Himalaya
- U : उरल पर्वत
- A : आल्प्स पर्वत
- R : रॉकी पर्वत
- A : अँडीज पर्वत
- H : हिमालय
#Geography
Join
@TheAnalystMPSC

🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯

12 Sep, 04:12


आमदारांची पात्रता

🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯

25 Jul, 15:55


Local Winds ( स्थानिक वारे )...

Join @TheAnalystMPSC

🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯

24 Jul, 08:01


अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले 🔥
◾️विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प: 600 कोटी
◾️महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार: 400 कोटी
◾️सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर: 466 कोटी
◾️पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प: 598 कोटी
◾️महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प: 150 कोटी
◾️MUTP-3 : 908 कोटी
◾️मुंबई मेट्रो: 1087 कोटी
◾️दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर: 499 कोटी
◾️MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी: 150 कोटी
◾️नागपूर मेट्रो: 683 कोटी
◾️नाग नदी पुनरुज्जीवन: 500 कोटी
◾️पुणे मेट्रो: 814 कोटी
◾️मुळा मुठा नदी संवर्धन: 690 कोटी

Join @TheAnalystMPSC

🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯

23 Jul, 17:55


Income
1) Loans & other liabality
2) Income tax
3) GST
4) Corporate tax

Join
@TheAnalystMPSC

🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯

23 Jul, 17:39


अधिकाऱ्यांची पोरं अधिकारी झाल्यावर त्यांची खोलून चौकशी करण्यात यावी. त्यांच्यासाठी डबल फिल्टर लावण्यात यावा. जे खरे दिव्यांग आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना प्रमाणपत्रे बहाल करण्यात करावी. तसेच स्पोर्ट कोट्यातील फ्रॉड लोकांचाही शोध घेऊन त्यांना सर्विस काढण्यात यावे व त्यांना घरी जाऊन स्पोर्टस् खेळा हा सल्ला द्यावा.

स्क्राईबच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात याव्यात. आधीएखादी स्पर्धापरीक्षा दिलेल्या व्यक्तीस स्क्राईब म्हणून नेमू नये. या स्क्राईबचाच फायदा घेऊन ज्यांची काहीच लायकी नाही ते अधिकारी झालेत.

आणि सगळ्यात शेवटचा महत्वाचा सल्ला; एखादी एक्स्ट्रा डाॅटेड समिति माझ्याही अध्यक्षतेखाली नेमण्यात यावी. एक एक खोटा दिव्यांग मी खोलून शोधून काढेल. खोटे Hearing Impairment काढून अधिकारी झालेल्यांचे कान मारण्याची माझी खूप दिवसांची इच्छा आहे. ह्या निमित्ताने तरी ती इच्छा पूर्ण होईल. त्यांना समोरासमोर मी घाणघाण शिव्या देईल आणि जर त्या त्यांना ऐकू आल्या तर त्यांचं प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल.

अजून खूप मुद्दे आहेत पण लेखाच्या शेवटी मला Existential Crisis फिल झाल्याने ह्या जगात एक गोष्ट सोडून कशालाच अर्थ नाही ह्या मुद्यावर मी आलोय. त्यामुळेच बोटांचा उपयोग फक्त टाइपिंग करण्यासाठी केला तर त्यांचं पोटेन्शियल वाया जाईल म्हणुन ह्याठिकाणी थांबतो.
✍️Vijay Rahane

Join
@TheAnalystMPSC

🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯

23 Jul, 17:39


पूजा खेडकरचं फ्रॉड दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन IAS होणं व खऱ्या दिव्यांगाच्या समस्येवरील माझ्या लेखामुळे बरेच कॉल्स आणि मेसेज आले. काही लोकांनी कॉमेंट्समध्ये आपल्या समस्या सांगितल्या त्यातून काही गोष्टी लक्षात आल्या:

1) नॉर्मल लोकांनी दिव्यांग प्रमाणपत्र काढून सरकारी नौकरी मिळवणे ही काही एक्ससेप्शनल गोष्ट नाही तर ती सर्रास चालू आहे. असे प्रमाणपत्रं मिळवून देणारं मोठं रॅकेट कार्यरत आहे ज्यामध्ये डॉक्टर्स, सरकारी अधिकारी व अर्थातच राजकारणीही सामील आहेत.

2) जे खरे दिव्यांग आहेत त्यांना ह्या प्रमाणपत्राच्या सवलतीची नितांत गरज असते आहे तरीही त्यांना ते मिळणंही अवघड आहे. कित्येक दिव्यांग लोकांनी मेसेज आणि कॉमेंट्स केल्या आहेत की त्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही. बऱ्याच जणांचे प्रमाणपत्र तांत्रिक गोष्टीत अडकवून ठेवलेले आहेत. कित्येक डिझर्विंग कॅन्डीडेटला सुद्धा पैसे खाऊ घालूनच प्रमाणपत्र मिळवावे लागते कारण तसं केलं नाही तर ते प्रमाणपत्र अडकवण्यात येतं.

3) त्याचप्रमाणे स्पोर्ट्स कोट्याचेही सर्रास फ्रॉड प्रमाणपत्र काढलेले लोकं प्रशासनात कार्यरत आहेत. स्पोर्ट्स सर्टिफिकेट मॅनेज करणं हे दिव्यांग सर्टिफिकेट मॅनेज करण्यापेक्षा सोपं आहे त्यामुळे ते सर्टिफिकेट काढणार्‍यांची संख्याही जास्त आहे.

4) अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्क्राईबचा वापर. स्क्राईब म्हणजे लेखनिक. काही प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना पेपर लिहिण्यासाठी दुसरा व्यक्ती देण्यात येतो. दिव्यांग व्यक्ती त्याला उत्तर सांगतो व तो व्यक्ती ते लिहीत असतो. दृष्टीदोष असणाऱ्या कॅंडिडेट्सला स्क्राईब Allowed आहे म्हणूनच कदाचित पूजा खेडकरणे दृष्टीदोष सुद्धा दाखवला आहे. आता लोकं काय करतात की ज्यांनी आधी परीक्षा दिलेल्या आहेत, ज्यांचा अभ्यास चांगला आहे, त्यांनाच स्क्राईब म्हणुन घेतात. पूजा खेडकरने पण असा चांगल्या अभ्यासाचा स्क्राईब घेतला असणार कारण तिचा Unacdemy चा Mock Interview मी पाहिला आहे तिचा अभ्यास पाहता ती एक चांगली कोतवाल होऊ शकते.

5) दिव्यांगाची खोटी प्रमाणपत्रं काढणारी जी मुलं-मुली आहेत त्यातली बहुतेक मुलं-मुली ही अधिकाऱ्यांचीच अपत्ये आहेत. मला कमीत कमी अशा वीस-तीस अधिकाऱ्यांच्या मुलांची नावे कळालीत. बॉलीवूड, न्यायालये, राजकारण यामध्ये जसं नेपोटिझम चालतं त्याहीपेक्षा जास्त नेपोटिझम करून अधिकाऱ्यांची पोरं अधिकारी होतात कारण त्यांच्या पालकांना सिस्टीममधले सगळे खाचखळगे माहीत असतात आणि त्या लेव्हलचे कॉन्टॅक्ट सुद्धा असतात. असे फ्रॉड सर्टिफिकेट काढून अधिकारी झालेल्यांची संख्या शेकड्यांनी आहे.

6) सगळ्यात जास्त फ्रॉड दिव्यांग प्रमाणपत्र हे Hearing Impairment ह्या कॅटेगरी मधून दिले जातात. अशा अधिकाऱ्यांचे कान मारणे गरजेचे आहे. Hearing Impairment साठी तेवढे परफेक्ट मेडिकल इन्स्ट्रुमेंट नाहीत. ऑडिओमेट्रि टेस्टमध्ये वेगवेगळ्या साऊंड व्हायब्रेशन्सचे आवाज ऐकवले जातात आणि कॅंडिडेट ऐकू आलं नाही म्हणाला तर त्याला ते प्रमाणपत्र मिळतं कारण Hearing चे बहुतेक प्रॉब्लेम हे Physiolgical असतात Anatomical नाही. Hearing Impairment चेक करण्यासाठी तेवढे परफेक्ट इन्स्ट्रुमेंट नाही त्यामुळे डॉक्टरही सर्टिफिकेट सहज देतात.

7) खोट्या दिव्यांगांमुळे खरा दिव्यांगांचे सिलेक्शन होणं अवघड होऊन बसलंय. खरंतर दिव्यांग कॅटेगरीचं मेरिट खूप कमी असतं पण खऱ्या दिव्यांगांना शारीरिक अक्षमतेमुळे तितके मार्क पाडणेही अवघड जातं आणि ह्या खेडकरवादी खोट्या दिव्यांगांमुळे दिव्यांग कॅटेगरीचं मेरिट अजून वर जात आहे. त्याचा फटका खऱ्या दिव्यांगांना बसतोय आणि त्यांचं सिलेक्शन अवघड होत चाललंय.

😎 दिव्यांग प्रमाणपत्र काढायचा अजून एक फायदा होतो. दिव्यांगांना UPSC किंवा इतर कोणताही सरकारी परीक्षेसाठी Age Limit खूप जास्त असतं त्यामुळे बरेच असे अधिकाऱ्यांचे पोरं आपल्या कॅटेगरीचं Age Limit संपल्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र काढतात. एका बातमीनुसार पूजा खेडकरचे 2018 सालीच UPSC चे Attempts संपले होते त्यानंतर तिने दिव्यांग प्रमाणपत्र काढलंय.

✔️आता यावर उपाय कायः

तर आतापर्यंतचे दिव्यांग हे स्पोर्टकोट्यातून सिलेक्ट झालेले आहेत त्यांची तपासणी करण्यासाठी एक राष्ट्रीय तसेच प्रत्येक राज्यात एक समिती तयार बसविण्यात यावी. समितीला जे फ्रॉड सर्टिफिकेट काढलेले सापडतील त्यांचा जाहीर सत्कार करून त्यांना घरी पाठवण्यात यावे व ते घरी पोहोचल्यावर त्यांच्यावर गुन्हे नोंदवून पुढची कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

काही डॉक्टर्स पैशासाठी गू सुद्धा खायला तयार असतात. अशाच भोसरीला जाण्याची आवड असलेल्या व खोटे दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टर्स व संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात यावे.
Continue...

Join
@TheAnalystMPSC

🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯

23 Jul, 08:33


♦️हा अंतरिम अर्थसंकल्प आहे
फेब्रुवारी 2024 मध्ये मांडला होता परीक्षेच्या दृष्टीने हा देखील करणे गरजेचा आहे.
👆

🎯 𝙏𝙝𝙚 𝘼𝙣𝙖𝙡𝙮𝙨𝙩 𝙈𝙋𝙎𝘾 🎯

23 Jul, 07:45


MH महिला आयोग

Join @TheAnalystMPSC

1,843

subscribers

729

photos

1

videos