- 📕 *विद्यार्थी मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (DV) हे येत्या 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2024 दरम्यान होणार आहे..*
- 📕 DV हे तूम्ही प्रथम पसंतिक्रम दिलेल्या संस्थांमध्येच होणार आहे. उदा., ज्या विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सल फौंडेशन हे सेंटर निवडले असेल तर त्यांचा DV युनिव्हर्सल फौंडेशन, नाशिक येथेच होईल, आणि तुम्हाला प्रत्यक्ष येऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.....
- 📕 याबाबत लागणारे डॉक्युमेंट हे खाली दिले आहेत..
- 📕 सदर डॉक्युमेंटच्या झेरॉक्स प्रति, 2 सेट प्रत्येकी, सेल्फ अटेस्टड, दोन वेगवेगळ्या फाईलमध्ये घेऊन येणे बंधनकारक असेल..
- 📕 पडताळणीसाठी ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवावे लागतील.. ते केवळ छाननी साठी आवश्यक असल्याने ओरिजिनल डॉक्युमेंट सदर विद्यार्थाला लगेच परत दिले जातील.. संस्थेकडे फक्त झेरॉक्स कॉपी ठेवण्यात येईल...
- 📕 बँक खात्याबाबत - विद्यार्थ्यांचे स्वतः बँक खाते( Bank Account) असणे बंधनकारक आहे.. जर विद्यार्थ्याचे स्वतःचे खाते नसेल तर लेगच ओपन करून घ्यावे.. संबंधित विद्यार्थ्याव्यतिरिक्त इतर कोणाचेही, जसे की वडील, भाऊ- बहीण, आई, पत्नी, इ. असे कोणत्याही इतर व्यक्तीचे बँक खाते ग्राह्य धरले जाणार नाही.. बँक खाते विद्यार्थ्यांचे स्वतःचेच पाहिजे...
- 📕 जर एखाद्या विद्यार्थी मित्राचे एखादे कागदपत्र नसेल तर त्यांनी लिखित अर्ज देणे आवश्यक आहे.
*आवश्यक कागदपत्रांची लिस्ट खालीलप्रमाणे-*
( Original + Self Attested Xerox 2 set Compulsory)
कागदपत्रे
1. अर्जदाराचा संबधित प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अपडेट केलेला मूळ विनंती अर्ज फोटोसहीत असावा. त्यावरील माहिती स्पष्ट भरलेली असावी व अर्जावर उमेदवाराची स्वाक्षरी असावी. अर्जासोबत उमेदवाराकडून 6 पासपोर्टच्या आकाराचे फोटो घ्यावेत.
( सोबत स्विकृती पत्र (Confirmation Slip) घेऊन येणे बंधनकारक आहे)
2. इ. 10 वीचे प्रमाणपत्र व गुणपत्रक(मूळ ऑनलाईन अर्जात नोंदविलेले मार्क व प्रमाणपत्रावरील जन्म दिनांक बरोबर असल्याची खात्री करणे.)
3. इ. 12 वी चे प्रमाणपत्र व गुणपत्रक (मूळ ऑनलाईन अर्जात नोंदविलेले मार्क व प्रमाणपत्रावरील मार्क बरोबर असल्याची खात्री करणे.)
4. पदवी प्रमाणपत्र (बंधनकारक नाही) (मूळ ऑनलाईन अर्जात नोंदविलेले मार्क व प्रमाणपत्रावरील मार्क बरोबर असल्याची खात्री करणे.)
5. अनुसूचित जमातीचे मूळ प्रमाणपत्र
6. अनुसूचित जमात वैधता प्रमाणपत्र
7. महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र (डोमिसाईल प्रमाणपत्र)
8. आधार कार्ड(मूळ ऑनलाईन अर्जात नोंदविलेला क्रमांक बरोबर असल्याची खात्री करणे.)
9. अर्जदाराचे पॅन कार्ड
10. अर्जदाराच्या बँक पासबुक किंवा धनादेशाची (Cancelled Cheque) सुस्पष्ट प्रत (आधार लिंक असलेला खाते क्रमांक, IFSC Code, MICR Code या सर्व बाबी स्पष्ट नमूद असल्याची खात्री करणे.)
11. अर्जदाराचा अनाथ असल्याचा दाखला, लागु असल्यास (उपायुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय यांनी निर्गमित केलेला दाखला असावा.)
12. मागील 3 वर्षाचे वार्षिक उत्पन्न रु.8 लाखापेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा मूळ दाखला (आर्थिक वर्ष : 2021-21, 2022-23, 2023-24) (तहसिलदार कार्यालयाने निर्गमित केलेला असावा.)
13. स्वयंघोषणापत्र (अर्जदाराने विहित नमुन्यात (परिशिष्ट क) देण्यात आलेले स्वयंघोषणापत्र व त्यामधील सर्व माहिती भरलेली असावी. तसेच त्यावरील फोटो हा अद्ययावत असावा.)
14. प्रवेश अर्ज (परिशिष्ट ड प्रमाणे)
15. मतदान कार्ड/ रेशन कार्ड/ लाईट बिल यापैकी कोणतेही एक
** टीप - उमेदवाराकडून वरीलपैकी अ. क्र. 1, 13 व 14 मधील कागदपत्राच्या मूळ प्रती घेण्यात येतील. तसेच उर्वरित सर्व मूळ कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित छायांकित प्रती( Xerox) घेण्यात येतील
*शारीरिक पात्रता*
*पोलीस भरती करीता शारीरिक पात्रता*
अ) उंची
■■ महिला उमेदवारांकरीता
◆● 150 से.मी. पेक्षा कमी नसावी.
■■ पुरुष उमेदवारांसाठी
◆● उंची- 160 से.मी. पेक्षा कमी नसावी.
◆●छाती- न फुगवता 79 से.मी. पेक्षा कमी नसावी व फुगवून 84 से.मी. किंवा त्यापेक्षा जास्त असावी.
*सैन्य भरती करीता शारीरिक पात्रता*
■■ महिला उमेदवारांकरीता
◆●उंची- 157 से.मी. पेक्षा कमी नसावी.
■■ पुरुष उमेदवारांसाठी
◆●उंची -168 से.मी. पेक्षा कमी नसावी.
◆● छाती- न फुगवता 77 से.मी. पेक्षा कमी नसावी व फुगवून 82 से.मी. किंवा त्यापेक्षा जास्त असावी
** *टीप* - विद्यार्थ्यांनी वरील दिलेल्या सर्व कागदपत्रांची मूळ प्रत व त्या प्रत्त्येक प्रतीच्या 2 झेरॉक्स असे सर्व कागदपत्रांचे दोन संच सोबत घेऊन यावा.