महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
त्रिशूल गोल्ड फिल्ड, प्लॉट नंबर ३४, सेक्टर ११, सरोवर विहार समोर, बेलापूर सीबीडी, नवी मुंबई-४००६१४
१०२२-६९३८५९००
Email ID:
[email protected]@mpsc_office
Website: https://mpsc.gov.in, https://mpsconline.gov.in @official_mpsc
दिनांक : १६ ऑक्टोबर, २०२४
क्रमांक : सीएमए-४०२३/सीआर-१६०/२०२३/जाहिरात
-: शुद्धिपत्रक :-
संदर्भ :- (१) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, (जा.क्र. ०४८/२०२४) दिनांक ०९ ऑक्टोबर, २०२४
(२) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, (जा.क्र. ०४९/२०२४) दिनांक ०९ ऑक्टोबर, २०२४
(३) नगर रचनाकार, गट-अ, (जा.क्र.५०/२०२४), दिनांक १० ऑक्टोबर, २०२४
(४) सहायक नगर रचनाकार, गट-ब, (जा.क्र.०५१/२०२४), दिनांक १० ऑक्टोबर, २०२४
आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या उपरोक्त जाहिरातीमधील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्यासंदर्भात संदर्भिय अनुक्रमांक १ व २ येथील जाहिरातीमधील परिच्छेद ४.१४ व अनुक्रमांक ३ व ४ येथील जाहिरातीमधील परिच्छेद ६.१३ खालीलप्रमाणे वाचण्यात यावे.
" शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः बीसीसी/प्र.क्र.७५/१६-क, दिनांक २७ फेब्रुवारी, २०२४ अन्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण विहित करण्यात आले असून शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक बीसीसी-२०२४/प्र.क्र.७५/ आरक्षण-५, दिनांक २८ जून, २०२४ व दिनांक ०५ जुलै,
२०२४ मध्ये दिलेल्या सूचनेनुसार जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. "
२. दिनांक ०९ व १० ऑक्टोबर, २०२४ रोजी प्रसिद्ध उपरोक्त जाहिरातीमधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.
उपसचिव, (जाहिरात)
महाराष्ट्र लोकसेवा आयोग