सत्यशोधक साहित्य @satyashodhak_sahitya Channel on Telegram

सत्यशोधक साहित्य

@satyashodhak_sahitya


सत्यशोधक साहित्य (Hindi)

इस हिंदी भाषा के टेलीग्राम चैनल 'सत्यशोधक साहित्य' में आपका स्वागत है। यह चैनल सत्य और विचारों के माध्यम से साहित्यिक संदेशों को साझा करने का एक मंच है। यहाँ आपको विभिन्न विषयों पर उपन्यास, कहानियाँ, कविताएँ, और अन्य साहित्यिक काम पढ़ने को मिलेगा। चैनल 'सत्यशोधक साहित्य' का उद्देश्य भारतीय साहित्य और संस्कृति को प्रोत्साहित करना और युवाओं को विचारों और सत्य की खोज में प्रेरित करना है। चैनल पर नए और पुराने लेखकों द्वारा लिखी गई रचनाएँ साझा की जाती हैं, जिनसे पाठकों को नये और विचारशील दृष्टिकोण प्राप्त होता है। अगर आप भारतीय साहित्य और संस्कृति के प्रेमी हैं और विचारों को साझा करने और उनपर चर्चा करने के शौकीन हैं, तो 'सत्यशोधक साहित्य' टेलीग्राम चैनल आपके लिए उपयुक्त है। इस चैनल में आपको भारतीय साहित्य के अद्भुत जगत में सफर का आनंद मिलेगा और आप नए सोच और विचार से रूबरू होंगे। तो जल्दी से 'सत्यशोधक साहित्य' चैनल को जॉइन करें और साहित्य के रोमांच से भरपूर यात्रा पर निकलें।

सत्यशोधक साहित्य

22 Nov, 03:38


सत्यशोधक दिनकरराव जवळकर समग्र वांग्मय

सत्यशोधक साहित्य

17 Nov, 07:46


मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांनी डिजिटाईज केलेली पुस्तके सुमारे
9000 पुस्तके आहेत...🙏



http://45.248.66.173:8080/jspui/

सत्यशोधक साहित्य

17 Nov, 07:46


पुस्तके डाऊनलोड करण्यासाठी काही महत्त्वाच्या साईट्स मला कळल्या ते मी तुम्हाला सांगत आहे....

ज्ञान उधळून देणे गरजेचे असते.....
स्वतचे महत्त्व वाढण्यासाठी त्याच्या खजिन्याची चावी आपण वागवत राहणे म्हणजे लबाडी करणे....

कदाचित आपल्याला अगोदरच ह्या साईट्स माहीत असतील....

सत्यशोधक साहित्य

17 Nov, 07:46


नगर वाचनालय, पुणे यांनी डिजिटल केलेले ग्रंथ.....





https://archive.punenagarvachan.org/collection/10

सत्यशोधक साहित्य

17 Nov, 07:46


विकीमेडिया कॉमन्स यांच्या संग्रहात असणारे आणि विविध लोकांनी अपलोड केलेले ग्रंथ......




https://commons.m.wikimedia.org/wiki/Category:Books_in_Marathi

सत्यशोधक साहित्य

17 Nov, 07:46


वरील सर्व पुस्तके कॉपी राईट फ्री आहेत......

सत्यशोधक साहित्य

17 Nov, 07:46


SP College Pune यांनी digitise केलेलं ग्रंथ.....




http://114.143.74.130:8080/jspui/

सत्यशोधक साहित्य

13 Nov, 02:20


Sent with Xodo

सत्यशोधक साहित्य

05 Nov, 11:49


1.पूर्ण सत्य
2.अर्धसत्य
3.असत्य
हो असत्य सुद्धा एक प्रकारचे सत्यच आहे. कारण ती एक सामाजिक निर्मिती आहे. सत्ताधारी वर्गाच्या हिताचे असत्य नेहमी सत्य म्हणून पसरवल्या जात असते. भारतातली सत्ताधारी ब्राम्हणी व्यवस्था अर्धसत्य आणि असत्याचे मायाजाल विणून बहुजनांना गुरफटवण्यात यशस्वी होत आलेली आहे. कारण सत्याची शहानिशा करण्याची कोणतीही यंत्रणा बहुजनांकडे विकसित नव्हती आणि नाही. याचे मुख्य कारण ‘सत्याचा शोध घेणे’ हिच मुळात ब्राम्हणी गोष्ट आहे हे पहिल्यापासून बिम्बवण्यात आले. उदा. अध्यात्मिक सत्याच्या, आत्मज्ञानाच्या शोधात असलेल्या शम्बुकाचा रामाने केलेला वध. सत्य शोधायला गेलं तर काय परिणाम होतील हि भीती तर होतीच शिवाय बहुजनांची सत्य शोधण्याची भूकच परंपरा आणि संस्कृतीचा डोलारा उभा करून हळूहळू संपवण्यात आली. सत्याच्या मालकीहक्काला खूप कमीवेळा आव्हान देण्यात आले. ती आव्हाने अर्धसत्य आणि असत्याचा आधार घेऊन चिरडण्यात आली. पण यावर कधीही बहुजनांकडून संघटितरीत्या प्रश्न उभे केले गेले नाहीत. कारण या गुलामीची त्यांना जाणीवच नव्हती.
ही गुलामी इतके वर्षं टिकण्याचे कारण म्हणजे सत्य प्रसारणाच्या सर्व यंत्रणा ब्राह्मणी व्यवस्थेकडे राहिलेल्या आहेत. शिलालेखांपासून बखरकारांपर्यंत व कलेपासून प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वकाही ही ब्राह्मणी व्यवस्था टिकवून धरतात. विद्रोहाचा आवाज एकतर दाबल्या जातो किंवा सामावून घेतल्या जातो. समाजमाध्यमांच्या उदयामुळे सत्याची मालकी बहुजनांकडे थोडीफार झुकते आहे. तरी त्यावरही ब्राह्मणी वरचष्माच आहे. प्रत्येक काळात प्रसाराच्या नवीन तंत्रज्ञानाला पहिल्यांदा ब्राह्मणी व्यवस्थाच हस्तगत करत राहिली आहे. ही मालकी बहुजनांकडे जाईपर्यंत तंत्रज्ञान बदललेले असते.
आता लक्षात येईल की ब्राह्मणी व्यवस्थेचे पाईक प्रत्येकवेळी धडधडीत खोटे कसे बोलतात(जसे की आपले सध्याचे सरकार) त्यांना काहीच कसा फरक पडत नाही ? याचे एकमेव कारण ब्राह्मणी व्यवस्थेला कधीही बहुजनांनी सत्याच्या मालकीसाठी जबाबदार धरले नाही. तसेच बहुजन समाजाच्या नैतिकतेत सत्याला सर्वात मोठे स्थान देण्यात आले. नेहमी सत्य बोलले पाहिजे, सत्य वागले पाहिजे हे संस्कार केले गेले. म्हणून समोरचा माणूसही खराच बोलतो, खराच वागतो या विश्वासावर बहुजन समाज चालत आलेला आहे. त्यातही तो माणूस उच्चजातीय असेल तर पहायलाच नको. उच्चजातीय, उच्चपदस्थ, महत्त्वाच्या व्यक्ती खोटं बोलूच शकत नाही याची बहुजनांना अंध खात्री असते. पण सत्य हे ब्राम्हणी व्यवस्थेसाठी फक्त सत्ता टिकवण्याचे माध्यम आहे हे कधीच बहुजनांच्या लक्षात येत नाही. म्हणून तुम्ही खरे वागा, खरे बोला पण आम्ही खरे वागूच याची शाश्वती नाही अशी ब्राम्हणी पद्धत राहिली आहे.
बहुजनांचे कुतूहल आणि प्रश्न करण्याची भूक अशी पद्धतशीर मारण्यात आली.
पण कुतूहल एकटे मरत नसते.
कुतूहल मेले की तर्क मरतो.
तर्क मेला की विवेक मरतो.
विवेक मेला की राहतात फक्त गुलाम झुंडी.
आणि तयार होतो ब्राम्हणी व्यवस्थेचा "जनाधार".
कुतूहल पुन्हा जागे केले पाहिजे. प्रत्येक बहुजन फॅक्ट चेकर बनला पाहिजे. तरच हा जनाधार जाऊ शकतो. यात एकटेपणा आहे. कारण सत्य हि सामाजिक निर्मिती आहे हे स्वीकारायला आपल्या समाजाला बराच वेळ जाऊ शकतो. त्यामुळेबहुमताचानेहमी सत्य म्हणून स्वीकार करत राहणे मूर्खपणाचे असते हे त्यांच्या लक्षात येत नाही. तोपर्यंत एकेकट लढत, प्रश्न विचारत, सत्याच्या मालकिला आव्हान देत राहण हेच आपल्या हाताशी आहे. या एकटेपणालाला पर्याय नाही.बहुजनांचा श्रेष्ठ कवी तुकाराम म्हणतात.
सत्य असत्याशी मन केले ग्वाही |
मानियले नाही बहुमता |
- अरविंद जोशी

सत्यशोधक साहित्य

05 Nov, 11:49


2019-05-08
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प छातीठोक खोट बोलण्यासाठी प्रसिद्ध झाला आहे. दि वाशिंग्टनपोस्ट च्या मोजणीनुसार डोनाल्ड ट्रम्प त्याच्या शपथविधीपासून २९ एप्रिल २०१९ पर्यंत तब्बल १० हजारवेळा असत्य किंवा अर्धसत्य बोललेला आहे. आता हि दोन्ही वाक्ये भारताच्या परिप्रेक्ष्यातून पाहू. आपले माननीय पंतप्रधानही जबर खोटे बोलतात. मग तरीही त्यांचे गारुड कायम कसे ? आणि मुख्य म्हणजे खोट बोलण्याचं नैतिक दडपण ते कसे निभावतात ? लोकांना प्रतिप्रश्न का विचारावासा वाटत नाही ? आपल्याकडे दि वाशिंग्टन पोस्ट सारखी पत्रकारिता नाही म्हणून ? कि सर्वांनीच डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे ? यामागची कारणमीमांसा भारतीय समाजाच्या जात वास्तवात आहे असे मला वाटते.

भारतात ब्राम्हण आणि ब्राह्मणेतर समाजाचा संघर्ष फक्त उत्पादन साधनांच्या मालकीपुरता मर्यादित नाही. ब्राह्मणी व्यवस्था त्याहूनही अधिक खोलवर काम करत आली आहे. सत्ता टिकवण्याचे दोन मार्ग असतात पहिला पोटावर राज्य करा आणि दुसरा मेंदूवर राज्य करा. ब्राम्हणांची सत्ता फक्त उत्पादन साधनांच्या मालकीपुर्ती मर्यादित असती तर ती केव्हाच उलथून गेली असती. अशा प्रकारच्या सरळसोट वर्गसंघर्षात ब्राम्हणी व्यवस्था टिकूच शकली नसती. म्हणून ब्राम्हणी व्यवस्थेने सुरुवातीपासूनच दुसऱ्या मार्गाचा अवलंब केला. बहुजनांच्या मेंदूवर राज्य करण्याचा मार्ग. यासाठी ब्राम्हणांनी नेहमीच ‘सत्य’ नावाच्या गोष्टीवर मालकी ठेवली आहे. ती इतकी खुबीने ठेवली गेली आहे कि आपल्या मेंदूला हे पटतच नाही कि सत्य कुणाच तरी गुलाम असू शकते. सत्यतर सत्यच असेल ना, त्याची छेडखानी कशी होईल?

ज्ञानरचनावादानुसार (constructivism) सत्यही सामाजिक निर्मिती (social construct) आहे. समाजातल्यावेगवेगळ्या वर्गातल्या अंतर्गत सत्तासंघर्षातून सत्याची निर्मिती आणि स्वीकृती होत असते. हि थिअरी भारतीय समाजाला अतिशय चपखल बसते. भारतात वर्षानुवर्षे ब्राम्हणी व्यवस्थाच सत्याची मालक राहिली आहे.
आता सत्य म्हणजे काय ते पाहू. इथे सत्याची 2 सरळ भागात विभागणी करता येईल.

लौकिक सत्य- सार्वत्रिक व्यवहाराच्या समजुती,आर्थिक उलाढालीच्या रीती, राजकीय सत्तेचा इतिहास यांना मिळून लौकिक सत्य म्हणू. यात समाजव्यवस्था, भाषा,इतिहास, अर्थशास्त्र, भूगोल, साहित्य, कला, विज्ञान, तंत्रज्ञान यांच्या अभ्यासपद्धती अंतर्भूत होतात.

अलौकिक किंवाअध्यात्मिक सत्य- धर्म आणि पारलौकिक कुतुहलातून निर्माण झालेल्या पद्धती (यात परमेश्वराच्या संकल्पनेपासून खाजगी साक्षात्कारापर्यंत व कर्मकांडापासून क्रांतिकारी संतपरंपरेपर्यंत सर्व आले) यांना अध्यात्मिक सत्य म्हणू. यात मानवी मनाचे अंतरंग, भीती, प्रेम, द्वेष, लोभइत्यादी अमूर्त भावना आणि त्यांचे कार्यकारणभाव अंतर्भूत समावेश होतो.

हि दोन्ही प्रकारची सत्ये मिळून सामान्य भारतीय माणसाचे एकूण जगासंबंधी आकलन तयार होते. या दोन्ही सत्यांवर पूर्वापार ब्राह्मणी मालकी राहिलेली आहे. जसे की लौकिक सत्यावर मालकी ठेवण्यासाठी इथले इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ, साहित्यिक, कलाकार, राजकारणी, समाजकारणी हे नेहमीच ब्राह्मणी व्यवस्थेचे पाईक राहिले आहेत. उदा. प्रत्येक काळात (चंद्रगुप्त मौर्यापासून पेशवाईपर्यंत) जमीनजुमला अफाट असून सुद्धा, ‘एका गावात एक गरीब ब्राम्हण होता’ अशीच गोष्टींची सुरुवात का होते ? गरीब कुणबी का नाही ? आपली संपत्ती डोळ्यात येऊ नये म्हणून केलेली हि चलाखी लौकिक सत्यावरच्या ब्राम्हणी वर्चस्वाची पावती आहे. अलौकिक सत्यावरची ब्राम्हणी मालकी तर याहूनही छुपी आणि तीव्र आहे. सामान्य भारतीय मनाला कोणत्या गोष्टीविषयी किती, कसे, कधी, राग, लोभ, भीती, श्रद्धा,प्रेम वाटले पाहिजे हे नेहमीच ब्राम्हणी व्यवस्था ठरवत आली आहे. उदा. गाय दिसली कि तिला हात लाऊन वंदन करणे हा संस्कार. गायीविषयी इतका आदर का ? डूकराविषयीका नाही ? डुक्कर तर विष्णूचा अवतार आहे ना ? भारतीय बहुजन स्वतःच्या भावनांचे सुद्धा मालक नाहीत, आणि हे त्यांच्या गावीही नाही.
ज्या घटकांनी या व्यवस्थेला धक्के दिले त्यांच्या लिगसीला पुन्हा याच व्यवस्थेत सामावून घेतले गेले. उदा. बुद्ध विष्णूचाच अवतार होता हे सांगणे. याचे कारण इतिहास सांगणारे आणि त्याचे विश्लेषण करणारे ब्राह्मणच राहिले आहेत. म्हणून इतक्या जबर वैचारिक उलाढाली होऊनसुद्धा या देशाच्या व्यवस्थेत थोडाही बदल होऊ शकला नाही. जात संपली का? भेद संपला का? याचे कारण काय? कारण ज्या काही क्रांत्या होतात त्या तळागाळाला पोहोचेपर्यंत त्यांचे ब्राम्हणीकरणकेले गेलेले असते.
अजून यातली खरी मेख वेगळीच आहे. आता पुन्हा सत्य म्हणजे काय याकडे वळू. सत्य 3 प्रकारचे मानले जाऊ शकते.

सत्यशोधक साहित्य

04 Oct, 03:32


मराठी भाषेविषयी अत्यंत मोलाची माहिती....👍

सत्यशोधक साहित्य

30 Sep, 14:54


आमची संस्कृती
:इरावती कर्वे.

सत्यशोधक साहित्य

26 Aug, 17:06


स्वतःशी प्रामाणिक जे कृष्णमूर्ती Honesty.pdf

सत्यशोधक साहित्य

26 Aug, 16:59


स्वप्रतीमा आणि जीवन जे कृष्णमूर्ती Image Making.pdf

सत्यशोधक साहित्य

26 Aug, 16:58


शिकण्याची कला जे कृष्णमूर्ती The Art of Looking, Listening, Learning.pdf

सत्यशोधक साहित्य

26 Aug, 16:55


स्पष्टता आणि संवेदनशीलता जे कृष्णमूर्ती Clarity and Sensitivity.pdf

सत्यशोधक साहित्य

26 Aug, 16:55


बघणारा बघणे जे कृष्णमूर्ती The Observer is the Observed.pdf

सत्यशोधक साहित्य

26 Aug, 16:52


साच्यातील जीवन जे कृष्णमूर्ती Patterns of Living.pdf

सत्यशोधक साहित्य

26 Aug, 16:51


मी असणे म्हणजे अव्यवस्था जे कृष्णमूर्ती Disorder (1).pdf

सत्यशोधक साहित्य

26 Aug, 16:51


स्वातंत्र्य जे कृष्णमूर्ती Freedom.pdf

सत्यशोधक साहित्य

26 Aug, 16:49


स्वज्ञान जे कृष्णमूर्ती Self Knowledge.pdf

सत्यशोधक साहित्य

26 Aug, 16:45


धर्मशील जीवन जे कृष्णमूर्ती Religious Life.pdf

सत्यशोधक साहित्य

26 Aug, 16:43


प्रयत्न Efforts j krishnamurti.pdf

1,148

subscribers

387

photos

8

videos