वास्तव (सत्य की आभास)©® @vastavmarathi Channel on Telegram

वास्तव (सत्य की आभास)©®

@vastavmarathi


मराठी, हिंदी भाषेतील उत्कृष्ट सुविचार, motivational quotes, शेरो शायरी आणि बरंच काही.....

Contact to Admin👉 @Vastav_bot
(For Promotion and others)

वास्तव (सत्य की आभास)©® (Marathi)

वास्तव (सत्य की आभास)©® याचे मराठी भाषेतील उत्कृष्ट सुविचार, motivational quotes, शेरो शायरी आणि इतर काही माहिती देणारे चॅनल आहे. या चॅनलवर सध्या ५०००+ सदस्य आहेत आणि त्यांच्यातील एक अद्वितीय समुदाय आहे. शेअर करा आणि सोबत जोडा व विचारांची वर्धान करा. आपल्याला जे काहीपण वास्तव आवडेल, ते इथे आहे! तुम्ही काय म्हणणार आहात, वास्तवच किव्हा अनुभवणार आहात? आता तुमचं संदेश व विचार सामंजस्यपूर्णपणे वाचकांना द्या. जोडण्याचं सुअवसर गमती न घेऊन आता तुम्हीही वास्तवचं भाग बनण्याचा संकेत सादर करा. आता जॉईन करा आणि तुमच्या जीवनात लागवड करा!

वास्तव (सत्य की आभास)©®

13 Jan, 09:54


_🌸हरभऱ्याचे घाटे आणि मुठभर बोर; वाल गाजर वाटाणा आणि उसाचे पेर; लोण्याचा साथीने तीळ बाजरीची भाकर दमदार; करा देवाची प्रार्थना पीक येईल जोमदार; दिवस आनंदाचा आणि उपभोगाचा त्याचे नाव भोगी; या सर्व कडधान्याची एकत्र उसळ खाऊन शरीर होईल निरोगी_🌸

_भोगी सणाच्या खूप खूप शुभेच्छा_

वास्तव (सत्य की आभास)©®

12 Jan, 10:24


ज्याच्या हातात शक्ती, पायात गती, काळजात उर्जा आणि डोळ्यात स्वप्ने असतात, तेच खरे युवा...

स्वामी_विवेकानंद

वास्तव (सत्य की आभास)©®

11 Jan, 18:40


🚩
प्रत्येक स्त्री मध्ये एक जिजाऊ असते 🙏🏼
.
.
.
माँसाहेब जिजाऊमाता यांच्या जयंती निमित्त जगदंबा स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज श्रीक्षेत्र चौढाळा ता.पैठण ची अनोखी मानवंदना 👏
.
.
.
जिजाऊजन्मोत्सव 💐🙏

वास्तव (सत्य की आभास)©®

11 Jan, 18:38


१२ जानेवारी....

सह्याद्रीची जगदंबा,स्वराज्यप्रेरिका, स्वराज्यजननी, स्वराज्यमाऊली, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ साहेब यांची जयंती 🚩⚔️🌺🇮🇳

स्वप्न पाहून स्वराज्याचे, उरी पेटवली राष्ट्रभक्ती ची मशाल,
शिवशंभूरुपी समशेर तुम्हीच केली या पवित्र मातीस बहाल,
तुमच्या प्रेरणेनेच लढल्या कित्येक स्त्रीया रणी,
जपला स्वाभिमान परी झुकविला नाही माथा,
या जगाला ओरडून सांगेन माझ्या जिजाऊंची गाथा!

✍🏾 - सुरज सुधाकर भोई
.
.

वास्तव (सत्य की आभास)©®

11 Jan, 04:17


“एकद्याला इतकं पण torture करू नका,की तो स्वतःला हरवून बसेल.
मी कोण होते किंवा मी कोण होतो.


वास्तव (सत्य की आभास)©®

11 Jan, 04:15


शब्दांना दात नसतात, पण मनाला जखम करून जातात. भिंत उभी न करता, माणसं तोडून जातात.

वास्तव (सत्य की आभास)©®

09 Jan, 13:54


बघून मन सुन्न झाले... आपल्या कल्याण पासून काही तासावर असलेले शहापूर आणि तानसा धरण तलावतील खोल पाण्यातून तराफ्याने नदी ओलांडून रोज फक्त शिक्षणासाठी शाळेत मुलं जातात... अशा परिस्थितीत राहणाऱ्या आदिवासी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत गावातच २०० पेक्षा जास्त कुटुंबाला शाळेची गरज आहे.
या गावातील लोकांसाठी शाळेची गरज आहे...!
स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षी ही परिस्थिती, हे दुर्दैव!

वास्तव (सत्य की आभास)©®

08 Jan, 15:39


"एक नवे वर्ष,एक नवी संधी,एक नवे पर्व..
झाले गेले वाद,दुःख,द्वेष सोडून द्या सर्व..
सर्व शेवटी मातीतच जाणार,मग कसला गर्व..
नववर्षात वाढत जावो सर्वंच्या प्रगतीचा कर्व.."

नववर्षात आपण काहीतरी चांगलं वागण्याचा,करण्याचा प्रयत्न करूया,कुठपर्यंत एकमेकांबदल मनात द्वेष,वाद ठेवणार,समोरच्या व्यक्तींवर जळाऊपणा मनात ठेवणार..?हा मला असाच बोलला,त्याने मला मदतच नाही नव्हती, हा असच वागतो,तसच झाले..हे माझ्याशी बोलत नाही तर मीपण त्यांना का बोलू?मीच का कमीपणा/माघार घेवू?त्याने मला कॉल,wish केलं नव्हते मी का करू??अहो कुठपर्यंत अश्या बारीकसारीक गोष्टी मनात ठेवून चालत रहाणार?* 😔 *आपण मोकळ्या हाताने आलो व जाताही तसच जाणार त्यात आयुष्य आज आहे तर उद्या नाही त्यामुळे होतील थोडे मतभेद,वाद तुम्हाला चुकीचही समजलं जाईल मग काय आपण आपली माणुसकी सोड्याची का? आपण आपल्या ethics ने चालण्याचा प्रयत्न करावा.माणसं,नाती,यश जपायला हव नवं वर्षात..नाहीतर फक्त वर्ष बदलणार,पण आपली मनस्थिती केव्हा बदलणार?
Wish😍you all Healthy & Happy New year..😇🎊
....🦋❣️🙏....
लेखन-B.S.Kendre(stu)
Telegram-
@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
प्रतिक्रिया कळवा आणि शेअर करा🙏🏻

वास्तव (सत्य की आभास)©®

08 Jan, 15:39


खामोशी मैं खुद को इतना काबिल बनवो..🔥
और 🔥💪 तबतक खुद को काबिल बनाते रहो जबतक
आपकी काबिलतीयों🔥 की उपलब्धियां मैं सबके सामने
तुमको साबित करने के लिए सबके आँसू भी कम पडे...💪🔥

....🦋🌺🙏....
लेखन-B.S.Kendre(stu)
Telegram-
@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा

वास्तव (सत्य की आभास)©®

07 Jan, 03:14


आईने जुन्या धोतराच्या फडक्यात बांधून दिलेल्या व तेल चटणीत मुरलेल्या भाकरीच्या तुकड्याची चव जगातल्या कुठल्याही पिझ्झ्यात सापडत नाही. आईच्या हातचं अन्न फक्त पोटभर खाण्याचं साधन नसतं, तर त्यात तिचं प्रेम, कष्ट, आणि आपल्यासाठीची निस्वार्थ भावना मिसळलेली असते. त्या साध्या भाकरीतही जे समाधान आणि ऊब मिळते, ती जगातील सर्वात महागड्या पदार्थात सुद्धा मिळू शकत नाही. कारण त्यात केवळ चव नाही, तर आठवणी, जपलेलं बालपण, आणि आईच्या मायेची शिदोरी दडलेली असते.

वास्तव (सत्य की आभास)©®

06 Jan, 04:06


जगातील अनेक दुःखांची तीव्रता
मंदीराच्या घंटेलाच माहिती असते.

शब्द प्रवास✒️

वास्तव (सत्य की आभास)©®

06 Jan, 04:04


वेळ हा असा एक तराजू आहे जो वाईट काळात आपल्या माणसांचं वजन आपल्याला बिनचूकपणे दाखवितो.

वास्तव (सत्य की आभास)©®

06 Jan, 04:03


माणूस सगळीकडे फिरतो पण या गावचा पत्ता त्याला मिळता मिळत नाही.

वास्तव (सत्य की आभास)©®

01 Jan, 02:52


गुंता ओढून-ताणून कधीही सुटत नसतो... मात्र तो कसा झालाय हे एकदा समजून घेतल की मग तो लवकर सुटतो

असाच जीवनातील गुंताही सोडवायचा असतो ...!!!

वास्तव (सत्य की आभास)©®

31 Dec, 16:36


_बघता बघता कॅलेंडरच शेवटचं पान उरलं अन् कळलच नाही हे वर्ष कसं सरल काही देऊन गेलं काही घेऊन गेलं जाता जाता हे वर्ष मात्र खूप काही शिकवून गेलं काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या काही नव्या स्मृतींनी ओंजळ भरुन गेलं आयुष्य म्हणजे असचं असतं. पुढे जाण्यासाठी काही तरी मागे सोडवच लागतं. आणि पुन्हा नव्याने उगवण्यासाठी आधी सूर्यालाही मावळायला लागतं._

वास्तव (सत्य की आभास)©®

31 Dec, 12:39


माणूस स्वतःच्या पैशाने आईस्क्रीम खाताना तो झाकणही चाटतो, वीस रुपये किमतीची बिसलेरी बाटलीतील पाण्याचा थेंबही सोडत नाही मग एका बापाच्या मुलीच्या लग्नात एवढं ताट का भरता?का मग फेकून निघून जाता? कारण की आम्हास मोफत जेवण मिळाले?

🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏

वास्तव (सत्य की आभास)©®

31 Dec, 12:35


पूर्णविराम देता आला पाहिजे गड्या. किती दिवस फिरणार तू स्वल्पविराम देत. किती फरफटणार स्वतःलाच.. थांब आता. एक नवीन पान घे, नव्याने लिहायला घे हे आयुष्य. मागच्या पानांचा हट्ट सोड आता. आजवर स्वल्पविराम देत इथवर आलास पण तो ही मोकळ्या हातानेच. आता तोच मोकळा हात दे स्वतःला आणि लाग चालायला. कोणाची वाट नको बघूस. बिंधास्त जग. आयुष्याच्या शेवटच्या वाक्याला पूर्णविराम नाही तर उद्गगारवाचकच लागलं पाहिजे !!

वास्तव (सत्य की आभास)©®

31 Dec, 12:35


आयुष्यात दुःखी होण्याचे कुठलंच कारण नसते कारण आपल्या आजूजूला आनंद आनंदचं पसरलेला असतो फक्त तो आपल्याला घेता आला पाहिजे कारण संकट हे आपल्याला दुःखी करायलाच येतात मात्र त्या संकटात पण आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच आयुष्य हे योग्य पद्धतीने जगता येईल बाकी परिस्थितीचं आपल्याला खूप काही शिकवतं असते यातून तुम्ही काय घेता यावर आपलं बरेचस समाधान ठेवलेलं असते राव!,,,✍🏻

वास्तव (सत्य की आभास)©®

31 Dec, 12:34


आयुष्याच्या शर्यतीत प्रत्येकाला जिंकावं वाटतं हे स्वाभाविकचं आहे मात्र परिस्थितीकडे बघून थांबावं लागतं कारण जे परिस्थिती शिकवते ते कुठलंच विद्यापीठ शिकवू शकतं नाही स्वप्न जरूर बघा ते पूर्ण करण्याचे प्रयत्न करत रहा पण आपली वस्तुस्थिती मान्य करा जे आहे ते मान्य केलं की जे आपल्याकडे नाही त्याचा त्रास कधीच आपल्याला होतं नाही, हा एक अनुभव आहे!

वास्तव (सत्य की आभास)©®

31 Dec, 12:34


नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.

वास्तव (सत्य की आभास)©®

31 Dec, 12:33


स्वतःला हवं ते ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी दुसऱ्याला चुकीचं ठरवू नका, कधी तरी, स्वतःचा अँगल बदलून पहा, तुम्हाला हवं ते ऐकता अन पाहता येईल.

वास्तव (सत्य की आभास)©®

21 Dec, 08:16


थोडं "कटू आहे पण सत्य आहे"मुलींचे आयुष्य तर अवघड आहेच परंतु मुलाचं अस्तित्व कुणाला समजतच नाही" हीपण शोकांतिका आहे😔..मुली,स्त्रीबद्दल असणारे,लिहलेले व्हिडिओज जेव्हा सोशलमीडियावर अपलोड केले जातात तेव्हा पुष्कळ लाईक मिळतात परंतु मुलांचं आयुष्य सांगणारे लिखाण,व्हिडिओज कडे कोणी डोकावूनही पाहत नाही आणि पाहिले तरीही ते तिथेच सोडून दिले जाते..एका मुलाचे आयुष्य खडतर तर असते परंतु ते समजण्याइतपतही सरळ नसते😞कारण एक जबाबदार मुलगा त्याच्या हसऱ्या चेहाऱ्यामाघे आपले प्रंचड दुःख,कष्ट,वेदना लपवतो* 😭घरच्यांच्या सुखासाठी तो आपल्या स्वतःच्या सर्व स्वप्नांचा,इच्छांचा त्याग करतो आणि आपलं संपूर्ण आयुष्य कष्टात जगतो एवढं असूनही समाज त्याच्यकडे कठोर म्हणून पाहतो.त्यालाही गरज असते ती फक्त एका सहानभुतीची,त्याच्या खडतर प्रवासात आधार देण्याची😳प्रत्येक पुरुष हा चुकीचा नसतो व प्रेमवेडा नसतो त्यालाही हवी असते अशी जागा जिथे तो स्वतःहुन व्यक्त होईल.
कुणाच्या नकळत भावना दुखवल्या गेल्या असतील तर क्षमस्व🙏
.....🦋🇮🇳😇💞.....
शब्दांकन -B.S Kendre
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (Whats)
बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेअर करा🙏

वास्तव (सत्य की आभास)©®

21 Dec, 08:06


Keep Believing In The Process.💥

वास्तव (सत्य की आभास)©®

21 Dec, 08:06


Keep Believing In The Process.

निसर्गात अस्तित्वात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात आणि शेवट निश्चित असतो. या दोन टोकांमधील अंतर पूर्ण होण्यास प्रत्येक वेळी एक विशिष्ट प्रक्रिया (process) पूर्ण व्हावी लागते. प्रक्रियेविना कोणतीच गोष्ट सुरुवातीपासून अंताकडे जात नाही. याच प्रक्रियेला दुसऱ्या शब्दात 'प्रवास' असे म्हटल्या जाते. माणूस एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणार हे निश्चित आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की प्रवास कश्या प्रकारे केल्या जातो.?"
माणसाला जन्माला येण्यासाठी सुद्धा आईच्या पोटात राहून नऊ महिन्यांची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. नऊ महिन्याआधी जन्माला येणार बाळ हे कुपोषित किंवा कमजोर असण्याची दाट शक्यता असते. यावरून लक्षात येतं की प्रक्रिया आणि प्रक्रियेचं पूर्ण होणं याला अनन्य साधारण महत्व आहे. ध्येयासाठी लढणाऱ्या प्रत्येक लढवय्याला लागू होणारं हे उदाहरणं आहे. ध्येयप्राप्तीसाठी सुरू असणारी आपली लढाई ही सुद्धा एक प्रक्रिया आहे. प्रत्येकाची लढाई वेगवेगळी असते. ही लढाई किती वेळ चालेल हे ज्याचं त्याच्यावर अवलंबून असतं. ही प्रक्रियारुपी लढाई हिमतीने आणि तितक्याच संयमाने लढावी लागते. या प्रक्रियेत अनेकदा आपल्या संयमावर वार होतात. हे वार टाळणं फार महत्त्वाचं असतं, आपण जेव्हा ध्येयाच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात करतो तेव्हा प्रवासाच्या आधीच आपण आपल्या क्षमतांपेक्षा आपल्या अपेक्षावर जास्त लक्ष केंद्रित करतो. परिणामी क्षमतांची वाढ हवी तरी होत नाही. आणि इथेच गल्लत होते. गरजेपेक्षा जास्त अपेक्षा वाढायला लागल्या की आपल्यातला संयम आपोआप कमी होतो. आणि संयम असा एकमेव गुण आहे जो या प्रवासात रामबाण ठरत असतो. अपेक्षा नेमक्या याच रामबानावर वार करत असतात. म्हणून अपेक्षांपेक्षा जास्त आपल्या क्षमतांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. जेणेकरून ध्येयापर्यन्त पोहचण्याची प्रक्रिया नेमकी आणि तितकीच अचूक होईल.
मधेच कुठेतरी अपेक्षांचं ओझ अनावर व्हायला झाल्यास स्वतःवर आणि तेवढाच प्रक्रियेवर विश्वास ठेवायचा असत. स्वतः ला समजावून सांगायचं की प्रक्रियेवीणा यश मिळणे अशक्य आहे. प्रत्येकासाठी ही प्रक्रिया वेगवेगळी असते. कुणासाठी ती सुलभ ठरते तर कुणासाठी अत्यंत खडतर ठरते. महत्त्वाचं ठरतं ते संयमाने या सगळ्या गोष्टींना सामोरे जाणे. प्रक्रिया कशीही असूद्या आपण आपले छोटे छोटे Success मिळवायचे आणि एन्जॉय करायचे असतात.

या सगळ्यांमध्ये जगणं सोडायचं नाही. मनमुराद जगायचं. एक दोन छंद जोपासायचे. माणसाला छंदच जगवत असतात. छंद माणसाला स्वतःवर प्रेम करायला शिकवतात. अगदी मनापासून ते शिकायचं आणि जगायचं. #NDEV

©®Namdev Ankush Devkate
Gokhale Institute politics And Economics,Pune
7743887134

वास्तव (सत्य की आभास)©®

18 Dec, 01:58


"यशाच्या योजना ह्या शांततेतच आखायच्या असतात. आणि शांततेतच अमलात आणायच्या असतात.कोणताही गाजावाजा न करता. कधी कधी छोटी छोटी यश मिळाली तरी,हवेत उडायचं नसतंय. कारण मोठं यश मिळण्यासाठी खूप शांतता आणि संयम लागतो."
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वास्तव (सत्य की आभास)©®

15 Dec, 03:18


तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी काढदिवस हे आजचं समिकरण आहे.

वास्तव (सत्य की आभास)©®

15 Dec, 03:17


भलेही कौरव एकाहून एक वीर होते...पण शकूनी मामाच्या, दिशाहीन सल्यानेच आत्मघाती झाले.... त्यामुळेच सल्लागार योग्य निवडा.
प्रवास आयुष्याचा...‌........

वास्तव (सत्य की आभास)©®

15 Dec, 03:16


आयुष्य असो अथवा बुद्धिबळ, प्रत्येक कृती मागे एक विचार दडलेला असतो. म्हणुनच कुठलाही निर्णय घेतांना तो अगदी विचारपूर्वक घ्यायला हवा. कारण आयुष्याच्या कुठल्याही वळणावर किंवा बुद्धिबळाच्या पटावर आपण घेतलेला प्रत्येक निर्णय हा निर्णायक ठरत असतो.

वास्तव (सत्य की आभास)©®

14 Dec, 12:21


"ज्या वयात बऱ्याच मुलांना आयुष्याची वाट सापडत नाही त्या वयाच्या अठराव्या वर्षी मुलगा विश्वविजेता होतोय.." देशाच नाव उज्वल करणाऱ्या D.Gukesh याचे मनपुर्वक अभिनंदन 🎉🎉🎉🎉🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

वास्तव (सत्य की आभास)©®

09 Dec, 03:51


पुस्तकं आपल्याला भाकरी देत नाहीत पण आपल्या वाट्याची भाकर कोण खातो हे नक्की सांगते..!

वास्तव (सत्य की आभास)©®

09 Dec, 03:38


मातीची घरे, शेणाचा सडा शिंपलेलं अंगण, चांदणी रात्र, गोष्टी सांगणारी आजी, खेडेगावातील असं दृष्य खरचं दुर्मिळ झालंय!

वास्तव (सत्य की आभास)©®

09 Dec, 03:37


भेटाया 'भाकरीला' निघाली 'भुक' आहे, जन्मता येते 'गरिबी' कोणाची चुक आहे.😓

वास्तव (सत्य की आभास)©®

09 Dec, 03:36


_रात्रीतून श्रीमंत होणारी माणसे आपण पाहतो.तेव्हा त्यांच्या बहुतेकांना हेवा वाटतो.कमाई न करता फुकाचा पैसा हाती पडल्यावर माणूस टणाटणा उड्या मारतो.आता काय करू आणि काय नको असे त्याला वाटते.त्याच्या सभोताली चांडाळ चौकडी वावरते.ते त्याला चांगला सल्ला देण्याची शक्यता नसते.दुसऱ्या दिवशी त्याची अवस्था 'जैसे 'बनते.हा सगळा पापाचा आविष्कार आहे.असे होऊ नये यासाठी राजमार्गाने पैसा कमवावा.त्याकरिता शॉर्टकटचा अवलंब अंगलट येतो.मेहनतीच्या कमाईचे मोल कळते,मात्र असे न करता मिळवलेला पैसा व्यसनादी विषयात खर्च होऊन माणूस कंगाल व्हायला वेळ लागत नाही._

"मित्रांनो;काळजी घ्या...."

वास्तव (सत्य की आभास)©®

08 Dec, 03:47


आधार कार्ड सर्वांजवळ असल तरी आधार सगळ्यांना भेटेल अस नाही !

वास्तव (सत्य की आभास)©®

07 Dec, 03:20


थकलेल्या तिच्या शरीराला
ती आडवे करून आराम देवू शकत नाही....
बंद पाहून तिच्या डोळ्याला
ती उभ्या उभ्या झोपली असेही म्हणू शकत नाही....
हाताची घडी घालून
पहा नकळत तिने स्वतःचे दोन भाग केले आहे....
त्या दोन भागातील
एका भागाचे श्वास तिने रोखले आहे....
पायांना स्थिर करून
हृदय मात्र जागे ठेवले आहे....
हेच कारण
ज्यामुळे तिचे संपूर्ण शरीर घट्ट उभे राहिले आहे....
कुणी आले गेले
यासाठी या अवस्थेतही ती सतर्क आहे....
कानात ऐकू येईल कुणाचा श्वास
त्यानेही तिच्या पापण्या झटकन उघडतील इतकी ती तत्पर आहे....
जे स्त्रियांना जमले
ते आणखी कुणाला कुठे जमणार आहे....
नीट लक्ष द्या तिच्या डोळ्यांकडे
माझ्या लिखाणानेही तिच्या पापण्यांच्यावर तिच्या डोळ्यांचे बुबळ हलल्याचा आकार फिरला आहे....

वास्तव (सत्य की आभास)©®

07 Dec, 03:20


_जोपर्यंत लाज सोडत नाही तोपर्यंत व्यापार मोठा होत नाही लक्षात ठेवा जो लाजला तो संपला. कष्ट करा यश नक्कीच मिळेल..._

वास्तव (सत्य की आभास)©®

07 Dec, 03:18


स्वार्थी लोकांना पहिल्यादा चंद्र दिसतो, गरज पुर्ण झाली की चंद्रावर डाग दिसतो...!!

वास्तव (सत्य की आभास)©®

06 Dec, 04:21


जगाचा कोहीनुर. भारतरत्न, विश्व वंदनीय, भारतीय संविधानाचे शिल्पकार, ज्ञानाचा अथांग सागर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र कोटी कोटी अभिवादन मानवंदना 🌷🌷👏

वास्तव (सत्य की आभास)©®

05 Dec, 06:14


बाप गरीब असो वा श्रीमंत
         बाप असणं
हीच खूप मोठी श्रीमंती आहे.

वास्तव (सत्य की आभास)©®

05 Dec, 06:11


कुठल्याही गोष्टीचा शेवट गोड असावा अस म्हणतात, तू गोड जावस अशी अपेक्षा!💯

वास्तव (सत्य की आभास)©®

02 Dec, 02:50


_या जगात सगळ्यांना समान मिळणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे "वेळ" ज्याला त्या वेळेचं मूल्य कळतं, महत्त्व कळतं तो कुठलीही "वेळ" बदलू शकतो. आणि ज्याला त्याच महत्वच कळत नाही त्याला जगातलं कोणीच बदलू शकत नाही...!!

वास्तव (सत्य की आभास)©®

01 Dec, 03:55


लय अवघड हाय गड्या उमगाया बाप रं...

✍️ बाप ✍️

वास्तव (सत्य की आभास)©®

01 Dec, 03:52


खचलेला पुरुष ही केवळ त्याची वैयक्तिक समस्या नाही तर कुटुंबाच्या भावनिक आरोग्यावरही परिणाम होतो.

वास्तव (सत्य की आभास)©®

01 Dec, 03:51


जीवनाच्या नोंदी घ्या, आयुष्यातला कोणताही धडा दोनदा शिकण्यासारखा नाही.

वास्तव (सत्य की आभास)©®

01 Dec, 03:51


एचआयव्ही विरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्याचा व जनजागृतीचा निर्धार करूयात.

वास्तव (सत्य की आभास)©®

01 Dec, 03:51


तुम्ही चुकीचं वागताय, ह्याची जाणीव तुम्हाला सगळं जग ओरडून सांगत असताना ही होत नाही. त्याची जाणीव तुम्हाला तुमच्या चुकीच्या वागणुकीची शिक्षा मिळाल्यावर होते...!

वास्तव (सत्य की आभास)©®

01 Dec, 03:02


मनातून मनाची मनाला असावी लागते ओढ, तेव्हाच ते नातं होतं साखरे सारखं अगदी गोड.

वास्तव (सत्य की आभास)©®

01 Dec, 03:01


घरात छान फर्निचर पाहिजे, किचन मध्ये सगळ्या अद्ययावत गोष्टी पाहिजे, सुखसोयीची साधनं पाहिजे, चैनीच्या वस्तू पाहिजेत, मनोरंजनासाठी टिव्ही पाहिजे, मोबाईल पाहिजे, मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण सुख-सुविधा पाहिजे, अमके पाहिजे, तमके पाहिजे अगदी तसंच घरात सर्वांसाठी पुस्तकांचा आणि डोक्यात वाचनाचा एक कप्पा असावा.

मित्रहो वाचन संस्कृती वाचवाल तर वाचाल आणि वाचाल तर वाचाल. 📙📚

वास्तव (सत्य की आभास)©®

01 Dec, 03:01


📖✒️"आयुष्य" ईच्छा नसतांनाही करायला लावत..✍️

आपलं "आयुष्य" कसं असतं ना.., आपल्याला जे नाही ते ही कधी कधी करायला लावतं.., अणि जिथे जायचं नसतं तिथे ते जायला लावतं..., ज्यांच्याशी बोलायचं नसतं तिथे बोलायला लावतं..!
आणि आपण एकदा या चक्रात अडकलो तर दुनियादारीशी नंतर जुळवून घ्यावंच लागतं आणि इथे कुठलीही पळवाट नसते, निव्वळ संयमाची परीक्षा जी कायम जशी राहते....!
एकेकाळी ज्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवलेला असतो, त्यांच्यामुळे आज कळलेलं असतं की पुन्हा विश्वास हा कोणावरही ठेवायचा नाही किंवा लगेच ठेवायचा नाही...तेव्हा ही विश्वास आहे अस खोटं का होऊन दाखवाव लागत..!

"आयुष्या" त जसं जसं आपण पुढे जात राहतो, आपलं वय वाढत जातं आणि असे कित्येक अनुभव येत जातात आणि कळतं सुद्धा जात असतात, प्रत्येक व्यक्ती ही काही ना काही स्वार्थासाठी आपल्या जवळ असते, निरपेक्ष अशी नाती खूप कमी अगदीच बोटांवर मोजण्यासारखी म्हणली तरी हरकत नाही..!
खरं पाहिलं तर सर्व जसं परस्पर पूरकच, जीवनात वेळीच आलेली स्पष्टता कायम आपल्या पुढच्या निर्णयांसाठी कायम सोईस्करच ठरते आणि तेव्हा आपल्या भूमिका ठाम करत जाते...!

_"शेवटी हे असे वेगवेगळे अनुभवही वेळीच आलेले गरजेच असतं.."_
_"ज्याचं कारण मी त्याच मुळे आपल्या आयुष्याचा नेमकेपणा स्पष्ट होत दिसत जातो..!"_


🎼श्रद्धा धनेश🎼

वास्तव (सत्य की आभास)©®

23 Nov, 03:36


खिसा रिकामां असला तरी पैशाला कधीही नाही न म्हणणाऱ्या वडीलांपेक्षा श्रीमंत माणूस या जगात असूच शकत नाही.

वास्तव (सत्य की आभास)©®

23 Nov, 03:35


जीवनात एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची ती म्हणजे हे की आपण आपली वस्तुस्थिती स्वीकारली कितीही बिकट परिस्थिती असली तरी तिला हाताळण्याची हिंमत आपल्यात येते फक्त स्वतःचा धीर सोडू नको!

वास्तव (सत्य की आभास)©®

23 Nov, 03:32


दुसऱ्यांना नावं ठेवणे किंवा सतत टीका करणे हे मानसिक दारिद्र्याचे स्पष्ट लक्षण आहे.

अशा वर्तनामागे बहुधा स्वतःच्या न्यूनगंडाची भावना, असुरक्षितता किंवा इतरांवर वर्चस्व गाजवण्याची गरज असते.

अशा लोकांना स्वतःची मूल्ये आणि क्षमता नीट ओळखता येत नाहीत, त्यामुळे ते इतरांना कमी लेखून स्वतःला उंचवण्याचा प्रयत्न करतात.

मन:स्वास्थ्य निरोगी असलेल्या व्यक्ती इतरांबद्दल सकारात्मक दृष्टीकोन ठेवतात आणि सहानुभूतीने वागतात.

नावं ठेवणे ही नकारात्मकता निर्माण करणारी सवय असून यामुळे स्वतःचा ताण वाढतो आणि संबंध बिघडतात. अशा वर्तनामुळे समाजात अस्थिरता आणि मतभेद निर्माण होतात.

या मानसिकतेवर मात करण्यासाठी स्व-चिंतन आणि स्वतःची मानसिक प्रगल्भता वाढवणे महत्त्वाचे आहे.

सकारात्मक संवाद, इतरांची प्रशंसा करणे, आणि स्वतःच्या कमतरतांचा स्वीकार करून त्यावर काम करणे यामुळे अशा वागणुकीत बदल घडवता येऊ शकतो.

मानसिक समृद्धीसाठी इतरांशी सुसंवाद आणि सौहार्दपूर्ण संबंध विकसित करणे गरजेचे आहे.

#RakeshVarpe

😊

वास्तव (सत्य की आभास)©®

22 Nov, 15:07


अर्थहीन गोष्टी ऐकण्यापेक्षा कान बंद करून घेणं ही बुद्धिवानांची लक्षणं असतात..!!

वास्तव (सत्य की आभास)©®

12 Nov, 03:31


आयुष्यात पुढे जाण्यासाठी चढ उतार खूप महत्वाचे आहेत, कारण ईसीजीमध्ये सरळ रेषेचा अर्थ हा आपण जिवंत नाही हेच दर्शवतो...!

🫂❣️रतन_टाटा💯

वास्तव (सत्य की आभास)©®

09 Nov, 18:31


शिवप्रताप घडला...........
आणि फाटलेल्या अंगरख्यातून रक्ताचं थारोळं बाहेर पडलं, खान धावत धावत पालखी जवळ करत होता त्या सांडलेल्या चिळकांड्या अवघ्या हिंदुस्थानच्या राजकारणावर पडल्या... दिल्लीची मोगलाई, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही, शे दीडशे वर्षाहुन अधिक सत्ता भोगणाऱ्या अवघ्या हिंदुस्तानातल्या बलाढ्य सल्तनती हादरल्या, दर्यावर अमर्याद सत्ता गाजवणारे वलन्देज, इंग्रज साऱ्या साऱ्या जलचारांना कापरं भरलं, आणि हिंदुस्तानातील भूतलावरल्या सर्व सत्ताधीशांना आणि समुद्रावरील सर्व ताम्रांना हा सिंहासारखा अभेद्य सह्याद्री आयाळे फिंजारून सांगत होता..
माझ्या नरसिंहाने हिरण्यकशिपू फाडिला •राजियाने खासा अफजल जाया केला.

💪 ऊर्जास्थान ⚔️
छत्रपती शिवाजी महाराज 🔥

शिवप्रतापदिन
प्रतापगड

वास्तव (सत्य की आभास)©®

09 Nov, 18:30


आदिलशाहीच्या जुलमी वरवंट्याखाली जेव्हा महाराष्ट्र भरडला, अन्याय निवारण्यासाठी तेव्हा कणाकणांतून बाहेर पडला सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह.....

शेर शिवराज है 💪
१० नोव्हेंबर शिवप्रताप दिन 🚩
हर हर महादेव 🔱

वास्तव (सत्य की आभास)©®

09 Nov, 03:44


माझी वेदना कुणाच्या हसण्याचे कारण असू शकते. पण माझे हसणे कधीच कुणाच्या वेदनेचे कारण ठरु नये.

चार्ली चॅप्लिन.

वास्तव (सत्य की आभास)©®

09 Nov, 03:43


मला ना...

आनंद सापडायचाय किंवा मग तडफडायचंय त्या आनंदासाठी.. त्या आनंदातल्या समाधानासाठी...

जिन्दगी मुरांबा आहे, मला मुरायचंय तिच्यात, गोडवा वाढवायचाय स्वतःचा. नी त्या दोन रेषा आहेत ना ओठांच्या त्यांना आपोआप खुलवायचंय...

वेडं व्हायचंय, खुश व्हायचंय! आनंदी राहायचंय, आनंद जगायचाय, आनंद वाटायचाय, आनंद शिंपडायचाय..

वास्तव (सत्य की आभास)©®

09 Nov, 03:42


आपल्यावर टीका करणाऱ्यांचा नेहमी आदर करत जा.. कारण आपले दोष शोधण्यासाठी ते जीवाचा खुप आटापिटा करत असतात..

वास्तव (सत्य की आभास)©®

09 Nov, 03:42


स्वभावामुळे पण कोणत्या ना कोणत्या क्षणी आपली आठवण होतच असते. म्हणूनच स्वभाव सुद्धा माणसाने कमावलेलं सर्वात मोठं धन आहे...!!

वास्तव (सत्य की आभास)©®

09 Nov, 03:41


सौभाग्याने जे मिळतं त्याने सात पिढ्यांचा उद्धार होतो तर जे हिसकावून मिळवलं जातं त्याने सात पिढ्यांना भोगावं लागतं..

वास्तव (सत्य की आभास)©®

09 Nov, 03:41


स्वतःच्या आनंदाचे मालक बना.. मग आनंद निर्माणही होईल आणि टिकेल सुद्धा!

वास्तव (सत्य की आभास)©®

09 Nov, 03:40


शब्दांना दात नसतात, पण मनाला जखम करून जातात. भिंत उभी न करता, माणसं तोडून जातात...

वास्तव (सत्य की आभास)©®

09 Nov, 03:40


अनुभवाची सावली संकटाच्या उन्हातही तुमचं आयुष्य करपु देत नाही.

वास्तव (सत्य की आभास)©®

09 Nov, 03:40


ज्या दिवशी पुस्तकातलं अक्षर ना अक्षर तुम्हाला महत्वाचं आणि लाखमोलाचं वाटेल आणि ते मनापासून वाचावसं वाटेल त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने परिपूर्ण वाचक व्हाल..

वास्तव (सत्य की आभास)©®

09 Nov, 03:40


जीवन ही एक जबाबदारी आहे, म्हणून क्षणाक्षणाला दुसऱ्याला अन् स्वतःला सांभाळावे लागते.

वास्तव (सत्य की आभास)©®

09 Nov, 03:38


प्रशंसा कर्तुत्वाचि होत असते, नाहीतर
सावली सुद्धा माणसापेक्षा मोठी असते.

ए_जिंदगी💪🖤

वास्तव (सत्य की आभास)©®

08 Nov, 12:22


ज्याच्या वाट्याला काळी रात्र येते ना,
त्याच्याच वाट्याला तो सुंदर चंद्र पण येतो...⛱️💫❣️

वास्तव (सत्य की आभास)©®

07 Nov, 03:34


📖✒️Don't be Perfect..just Be Real..✍️

आश्चर्य वाटल ना वाचून ?
"Don't be perfect...!!"
आपल्यापैकी बहुतेक जणांना "Perfect" पणाचा नाद असतो ना...!!

आता यापेक्षा समजा त्या वस्तूची जागा जरा बदलली तर असा काय गहजब होणार आहे का...
जी तऱ्हा वस्तूंची तिचं आयुष्याची! खास करून आपल्या मुलांचं शिक्षण "Perfect", त्यांची नोकरी "Perfect", येणारी सून "Perfect", मुलांचं वागणं "Perfect"...!!
सगळं कसं एकाद्या कथेसारख जिथल्या तिथे.. "Perfect" पणाच्या नादात अनेकदा मुलांना त्यांचं आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही.
"Perfect" असण्याच्या नादात खरा आनंद कुठेतरी हरवून तर जात नाहीये ना?
हे प्रश्न स्वत:ला विचारले तर मग आपण किती "Perfect" होतो याचीही उजळणी होईल .
"Perfect" असणं चांगल आहे पण त्याचं व्यसन नसावं इतकंच.
आयुष्यात सगळ्याच गोष्टी "परफेक्ट असतील असं नाही. त्यामुळे "Perfect" नसलेली परिस्थिती स्वीकारायची मानसिकता शिकवणही महत्वाचं आहे.
त्यासाठी "Be Real" असण्याची सवय असायला हवीच ना.....!!


🎼श्रद्धा धनेश🎼

वास्तव (सत्य की आभास)©®

07 Nov, 03:32


अशी सकाळ बघायला मोठं नशीब लागतं.. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई 😍❤️

वास्तव (सत्य की आभास)©®

06 Nov, 12:47


*lकुठे गेली ती माणसं.....?
-------------🌿-----------
कुठे गेली ती माणसं
दुःखाला सावरायची,
भांडणाऱ्याला आवरायची,
सुखाच्या एका तिळाला खायला
सात जणाला बोलवायची.

कुठे गेली ती माणसं
तहानल्याला पाणी द्यायची
भुकेल्याला घास द्यायची
सारं पुण्य मिळण्यासाठी
दोष असतात गिळण्यासाठी
असं मनातून म्हणायची.

कुठे गेली ती माणसं
सन्मान गावभर मिरवायची
अपमान क्षणात पचवायची
सारे आपण बहीण भाऊ
येथे गुण्यागोविंदाने राहू
कष्टानी कन्हायची पण
देवाला चांगलंच म्हणायची.

कुठे गेली ती माणसं
गावातलं भांडण पारावर
नाती आणायची धाऱ्यावर
लेकीबाळीला लावायची जीव
मुक्या प्राण्यांची यायची कीव
खायची चटणीभाकरी पण
इमाने इतबारे करायची चाकरी.

परत येतील का ती माणसं
जणू टच्च भरलेली कणसं
गाव बसावा पारावर
सुख नांदेल दारावर
परंपरा साऱ्या जपल्या जातील
चुका दुसऱ्याच्या लपल्या जातील
देवा माझा दे, मला परत गाव
नांदेल जिथे बालपणीचा बंधुभाव
-----------🌿---------

वास्तव (सत्य की आभास)©®

05 Nov, 06:07


वेरूळ लेणी , छत्रपती संभाजीनगर | महाराष्ट्र 🔱🚩

रावण अनुग्रह शिल्पांमध्ये रावण खाली एक गुडघा टेकून आपल्या वीस हातांनी कैलास पर्वत हलवीत आहे, तर कैलास पर्वतावर शांत चित्ताने बसलेले शिव आणि भयभीत झालेली देवी पार्वती शिवाला बिलगली आहे. रावण कैलासपर्वत हलवीत असल्यामुळे घाबरून पळणारे शिवगण, डोंगरावरचे प्राणी यांची शिल्पे हा प्रसंग जिवंत करण्यामध्ये कलाकार यशस्वी झाले आहेत. यातील नाट्यमयता वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे.

वास्तव (सत्य की आभास)©®

05 Nov, 03:05



💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖


प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस हा सुखी आहे !

पण तो हे विसरतो की, त्याच्यासाठी आपण पण समोरचाच आहे !


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

वास्तव (सत्य की आभास)©®

04 Nov, 04:27


स्वतःच्या परिनं जिवन जगण्याची इथे प्रत्येकास संधी नसते...!! प्रत्येक झाडाच्या नियती हिरवीगार फांदी नसते...!!

चिमणी_पाखरं

वास्तव (सत्य की आभास)©®

02 Nov, 05:05


जगाच्या भितीने मनातील दिवे आपण जोपर्यंत विझवत जातो, तोपर्यंत आपल्या आयुष्यातील खऱ्या दीपोत्सवाला आपण मुकलेलोच असतो.
🌿🌿🌿🌿

वास्तव (सत्य की आभास)©®

01 Nov, 02:43


लक्ष्मीची होईल कृपा एवढी, सगळीकडे होईल नाव दिवसरात्र व्यापारात वाढेल तुमचं काम सर्व इच्छा होवो पूर्ण, लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा..!😍

वास्तव (सत्य की आभास)©®

31 Oct, 03:48


दिव्याचं देवपण तो जळत असेपर्यंत असतं. त्याला बाह्य शत्रुंपासून सुरक्षित ठेवण्याचं काम असतं त्या काचेचं'. एका संरक्षका प्रमाणे ती काच ह्या 'तेज' यज्ञात आपलं काम सलोखीने करत असते.

अगदी त्याचप्रमाणे स्वतःचं घरदार सोडून राष्ट्रासाठी रक्ताचा अभिषेक करणारे तेव्हाचे मावळे असोत किंवा आत्ताचे सैनिक आपलं काम चोख बजावत आहेत 🫡

कंदिलाच्या काचेप्रमाणे त्या दिव्याचं देवपण तेवत ठेवत आहेत. आजवर राष्ट्रहितासाठी रयतसाठी तेजाच्या अग्निकुंडात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या तमाम वीरांना दीपोत्सवाच्या तेजोमय शुभेच्छा 😇🔥🎉

वास्तव (सत्य की आभास)©®

30 Oct, 02:35


कोणतीही गोष्ट मर्यादित असते तोपर्यंतच चांगली ,सुखद वाटते.. एकदा का अति व्हायला  लागली की ती  irritate करु लागते..मग ते‌ कोणतंही तत्वज्ञान असो , शहाणपण असो , विनोद असो किंवा आणखी काही.. कालांतराने आपल्याकडे असणाऱ्या चांगल्या गोष्टी बालिश वाटू लागतात. त्यामुळे संतुलन असणं गरजेचं..

वास्तव (सत्य की आभास)©®

27 Oct, 18:03


रद्दीतला एक कागदाचा तुकडाही तुम्हाला अनमोल माहिती देऊन जाते,

मग् सांगा, त्या पुस्तकात किती ताकद असेल,
जे अनुभवाच्या शब्दाने बनलेले असते.....!

वास्तव (सत्य की आभास)©®

27 Oct, 06:02


वासुबारस, ज्याला "गोवत्स द्वादशी" असेही म्हणतात, हा सण भारतीय संस्कृतीत महत्त्वपूर्ण आहे आणि विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. वसुबारस दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात करणारा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी गाई आणि वासराचे पूजन केले जाते आणि त्यांचे पावित्र्य मानले जाते.

वासुबारसचे महत्व


1. गोमातेचे पूजन: वासुबारस दिवशी गाईचे पूजन केले जाते कारण गायीला माता मानले जाते. गायीच्या उपकारांमुळे ती हिंदू संस्कृतीत पवित्र मानली गेली आहे.

2. गोकुळातील स्मरण: वासुबारस हा सण भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या काळाची आठवण करून देतो. गोकुळातील गाई आणि वासरांचे संरक्षण आणि पालन श्रीकृष्णाने केल्याची कहाणी या दिवसाशी जोडलेली आहे.

3. पर्यावरणीय संतुलन: गायीला भारतात पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते, कारण ती शेती आणि दुध उत्पादनामध्ये खूप उपयुक्त आहे. त्यामुळे गाईचे पूजन करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.

4. कुटुंबातील समृद्धी: वासुबारसच्या पूजेनंतर समृद्धीचे प्रतीक म्हणून कुटुंबातील आनंद आणि धनसंपदा वाढवण्याची कामना केली जाते.

5. परंपरा आणि संस्कृतीचे जतन: हा सण साजरा करणे हे आपल्या पारंपरिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे संरक्षण करण्याचे एक साधन आहे, जेणेकरून पुढील पिढ्यांना त्याचे महत्त्व समजावे.

वासुबारस साजरी करण्याची पद्धत

- गाईला सजवणे: गाई आणि वासराला विशेषरित्या सजवले जाते, फुलांच्या माळा आणि रंगांनी त्यांना सजवले जाते.
- *पूजन विधी*: गाईला स्नान घालून तिच्या शिंगांना रंग लावले जातात आणि तिला विशेष खाऊ दिला जातो.
- आरती आणि प्रार्थना: गाईची आरती केली जाते आणि तिच्या कल्याणाची प्रार्थना केली जाते.
- गोड पदार्थ बनवणे: या दिवशी विशेष गोड पदार्थ तयार करून प्रसाद म्हणून वितरण केला जातो.

वासुबारसचा सण आपल्या संस्कृतीतील एक आदर्श उदाहरण आहे ज्यामध्ये गाईच्या प्रति आदर व्यक्त करून पर्यावरण आणि पशु संरक्षणाचा संदेश दिला जातो.

वास्तव (सत्य की आभास)©®

27 Oct, 04:02


जपले होते कुशीत मी
बाळा तुला नऊ महिने
पुनर्जन्म झाला माझा
तुझ्या बाळा जन्माने

भाग्य थोर आहे माझे
तुझी आई मी होणे
मातृत्वाचे तू दान
झाले परिपूर्ण जगणे

स्वर्गीय सुख आहे हे
मी आईपण मिरवणे
आणखी याहून सुख
काय ते वेगळे असणे ?

स्वर्गीयसुख

वास्तव (सत्य की आभास)©®

27 Oct, 04:02


_सन्मानाचा दरवाजा एवढा लहान असतो. जिथे थोडे झुकल्याशिवाय प्रवेश नसतो.._❣️❣️

वास्तव (सत्य की आभास)©®

27 Oct, 04:01


_मनात समाधानाचा दिवा लावता आला तर रोजच सुखाची दिवाळी साजरी होते.._💫❣️

वास्तव (सत्य की आभास)©®

26 Oct, 16:41


घर हे जर घड्याळ असेल ना, तर आई ही त्या घड्याळातील सेकंद काटा असते. आणि सेकंद काट्याला कधीच विश्रांतीची मुभा नसते..!🤗❤️🌿

आई आयुष्य_वगैरे मनातलं भावना आवडलेलं

वास्तव (सत्य की आभास)©®

25 Oct, 04:01


जुन्या काळात माणसाकडे बोलायला वेळ खूप होता पण साधन न्हवती मात्र हल्ली साधनं तर भरपूर आहेत पण कोणाला विचारा सुद्धा वेळ नाही मान्य आहे की गतिशील जगासोबत जपाट्याने चालावं लागणार मात्र कमी झालेल्या संवादामूळे आपली माणसं एकटी पडू लागली आहेत त्यांच्या साठी थोडा वेळ काढा तुमचे दोन शब्द त्यांना मानसिक समाधान देऊ शकतात!,,,✍🏻

वास्तव (सत्य की आभास)©®

25 Oct, 03:59


अगदी काही दिवसांवर रोशनाईचा सण दिवाळी आलेली आहे.रस्तावर ठिकठिकाणी दिवे विकणारे लोक बसलेले आहेत.हे स्वाभिमानी लोकं कष्ट करून जगतात.अतिशय मेहनतीने मातीला आकार देऊन एक एक दिवा बनवतात आणि आपली दिवाळी रोशन करतात. अगोदरच त्यांच्या वस्तूची किंमत मेहनतीच्या मानाने कमीच असते त्यात आपणही अगदी त्यांचा जीव जाई पर्यंत मोल भाव करून त्यांच्या कष्टाची बोली लावतो.वर्षात एक वेळेस एखादं दोन डझन दिवे घेण्यात काहीच नुकसान नाही.आपण जेंव्हा मोठं मोठ्या दुकानात अथवा मॉल मध्ये जातो तेंव्हा सर्व काही चढ्या भावाने MRP वर घेतो आणि कसलीही तक्रार न करता बिल देऊन निघुन जातो.कष्टकऱ्यांच्या वस्तूला जर 5-10 रुपये जास्त दिले तर आपल्याला भले काही फरक पडणार नाही परंतु त्या गरिबाच्या लेकरांना भरपूर फरक पडेल.ह्या दिवाळीला मदत म्हणून का होईना त्यांनी मागेल त्या किमतीत वस्तू घ्या आणि त्यांच्या लेकरांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा आपसूक आपली दिवाळी त्यांच्या दिव्यांनी उजळून तर जाईलच सोबत भरभरून आनंद पण देईल.आपल्या हस्ते थोडं सत्कार्य झाल्याची पावती देखील नक्कीच मिळेल.
एक उदाहरण म्हणून ह्या फोटोतील व्यक्ती अपंगत्वाचा फायदा घेऊन भीक मागण्यापेक्षा कष्ट करून जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय.असे अनेक व्यक्ती रोज आपल्याला कुठे न कुठे आढळतात.पेन,कंगवे, काटा पिन अश्या छोट्या छोट्या वस्तू विकून ते आपली उपजीविका भागवत असतात.ते श्रीमंत होण्यासाठी नाहीतर स्वाभिमानाने जगण्यासाठी अपंगत्व विसरून मेहनत करत असतात.कधीतरी गरज नसताना त्यांच्या कडून वस्तू विकत घ्यावी हे पण पुण्य प्राप्त करून देते.

🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏

वास्तव (सत्य की आभास)©®

24 Oct, 06:07


अहंकाराने माणूस कुरूप दिसतो तर,
नम्रतेने सुंदर.
श्रीमंतीने उठून दिसतो,तर उदारतेने सुशोभित.
असंबंध बोलण्याने वाचाळ होतो तर,मधूर वाणीने रसाळ, नास्तिकतेने फक्त जीवन जगणे होते तर अस्तिकतेने जीवन परिपूर्ण होते.
नाती प्रेमातून अंकुरित होतात. संवादातून जिवंत रहातात. संवेदनांनी जाणवतात आणि मनापासून जपली जातात.
जे शब्द तुमच्या आत्म्याला प्रकाशमान करतात ते किंमती हिऱ्यासारखे असतात...
संस्कृती आणि नाती यामधलं महत्त्वाचं साम्य म्हणजे दोन्ही गोष्टी जपल्या तरचं बहरतात अन्यथा नष्ट होतात.

❝ आपुलकीच्या माणसांसाठी ❞

वास्तव (सत्य की आभास)©®

24 Oct, 05:07


नंदीच्या कानात का केली जाते प्रार्थना

आपण मंदिरात बघितले असेल की भक्त महादेवाचे दर्शन घेतल्यावर नंदीच्या कानात प्रार्थना करतात.

यामागील मान्यता आहे की

नंदी ‍महादेवाच्या गणांमध्ये सर्वात प्रिय आहे. महादेवाचे दर्शन घेतल्यावर नंदीच्या कानात प्रार्थना केल्याने ती सरळ महादेवाला पोहचते अशी समजूत आहे.

अधिकश्या काळ महादेव समाधिस्थ असतात असे मानले आहेत म्हणून अशा परिस्थितीत भक्त नंदीला आपली प्रार्थना सांगतात. तसेच महादेव धर्मावर आश्रित आहे कारण त्यांचे वाहन नंदी आहे. नंदीच्या कानात प्रार्थना करणे अर्थात
कानाचा गुण आहे शब्द.
सर्पाशिवाय दुनियेत असा प्राणी नाही ज्याला कान नाही. कान शब्द ऐकून पूर्ण भावाने अंतरआत्म्यापर्यंत पोहचवतो, नंतर ते सर्वव्याप्त होऊन जातं. शब्दाचा गुणही आकाश आहे. आकाश नसल्यास शब्द ऐकू येणार नाही.
म्हणून धर्माला आधार बनवून आकाशासमोर आपली गोष्ट सांगण्यात येते.
जेणेकरून महादेव समाधितून उठल्यावर नंदी भक्तांची प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहवतो आणि भक्तांची इच्छा पूर्ण होते.

वास्तव (सत्य की आभास)©®

24 Oct, 05:06


हा फोटो अप्रतिम आहे!
असे दिसते आहे की एक व्यक्ती पाण्यात पुस्तक वाचत आहे. पण जेव्हा तुम्ही फोटो झूम कराल, तेव्हा तिकडे एकही व्यक्ती नाही, पुस्तक नाही.
सर्व भ्रम आहे. आयुष्याप्रमाणे, आपण जे पाहतो ते नेहमी दिसते तसे नसते.

वास्तव (सत्य की आभास)©®

24 Oct, 05:04


आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते,
फक्त विचार Positive पाहिजेत...!

वास्तव (सत्य की आभास)©®

22 Oct, 04:15


सगळेच आपले शुभचिंतक नसतात. काही आपलं शुभ होतयं म्हणुन चिंतेत असतात..!

वास्तव (सत्य की आभास)©®

22 Oct, 04:14


देव हा जगातला सगळ्यात मोठा बहुरूपी आहे. तो कधीही, कुठेही, कुठल्याही रूपात प्रकट होतो. मला स्वतःला माणसात अनेकदा देव दिसलाय.

वास्तव (सत्य की आभास)©®

20 Oct, 05:53


पूर्वी कुणाच्या घरी मुल जन्माला आली तर आनंद साजरा करायचा म्हणून शहरातून एका टीव्ही वाल्या कडून कलर टीव्ही VCR आणि कॅसेट भाड्यानी आणून आपल्या गल्लीतल्या लोकांना बोलावून पिक्चर दाखविण्यात येत असत,तेव्हा VCR वर पिक्चर बघण्याची मजाच काही औरच होती, सकाळीच सगळ्यांना सांगण्यात होतं की आज पिक्चर ठेवण्यात आला आहे,या बघायला तेव्हा घरातील माणसं कामावरून लवकर घरी यायचे लहान मुलं लवकर अभ्यास करून वाट बघायचे आनी महिला मंडळी घाई घाईने घरातील काम आटोपून घ्यायची पिक्चर बघण्यासाठी, खरंच काय दिवस होते ते खुप आठवतात ते दिवस गेले ते राहिल्या आठवणी कोणी कोणी पाहिले आहे हे सोनेरी दिवस काही अनुभव सांगा मित्रांनो कारण हे दिवस कधीच आता आपल्या आयुष्यात येणार नाही...❤️❤️👌🏻👌🏻🫡🫡💯💯

वास्तव (सत्य की आभास)©®

12 Oct, 03:55


राम आठवणीत राहतात आणि रावण सुद्धा, कलियुगात विसर पडतो फक्त सीता मातेचा...🚩🚩🚩
_दसरा
रावण धहन

वास्तव (सत्य की आभास)©®

11 Oct, 02:01


_*"स्त्री" मुळातच सामर्थ्यवान आहे. आणि म्हणूनच परमेश्वराने महत्त्वाची सगळीच खाती तिच्याकडेच दिली आहेत. शिक्षण खाते आहे सरस्वती कडे, अर्थ खाते दिलेय लक्ष्मीकडे, तर संरक्षण खाते दुर्गामातेकडे, आणि अन्न खाते अन्नपुर्णा देवीजवळ.*_

वास्तव (सत्य की आभास)©®

10 Oct, 17:07


पोटच्या गोळ्याच्या काळजीसाठी असामान्य कर्तब घडवण्याची हिंमत पृथ्वीतलावरील एकमेव व्यक्तीमध्ये असते. तिला आई म्हणतात...!

# हिरकणी
#नवरात्र
# जागर_स्त्रीशक्तीचा.

वास्तव (सत्य की आभास)©®

10 Oct, 17:02


पार्वतीचं ते रौद्ररूप बघून जग्या खजील झाला. त्याच्या नसलेल्या आधाराची तिला आता गरज नव्हती. दूर दुर्गादेवीच्या देवळात आरतीचे सूर ऐकू आले....

'त्रिभुवनी भुवनी पाहता,तुज ऐसी नाही'......

©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

#नवरात्र_कथा
कथाविश्व - आपले कथांचे अनोखे विश्व 🎉

वास्तव (सत्य की आभास)©®

10 Oct, 17:02


. ★★दुर्गा★★
#कथाविश्व
पार्वतीने ब्रेडचा छोटा पुडा विकत घेतला आणि घरी निघाली. त्या ब्रेडच्या सहा तुकडयात तिघांचे पोट कसे भरणार होते? शेवटी तिलाच उपाशी रहावं लागणार होतं. दारुडा नवरा आणि सहा वर्षाचा सत्या डोळ्यापुढे आले.

दिवसभर बांधकामाच्या ठिकाणी मोलमजुरी करून पार्वतीला जेमतेम दोनशे रुपये दिवसाला मिळत होते पण त्यातही गुजराण होत होती. निदान दिवसाचे दोन वेळचे जेवण तरी मिळत होते. उपासमार होत नव्हती.पण गेले दोन दिवस मजूर कट्ट्यावर दिवसभर उभं राहून फारसं काम मिळालं नव्हतं.

पार्वतीने झोपडीत पाऊल ठेवलं. तिचा नवरा,जग्या तारवटून झोपला होता. त्याला कशाची शुद्ध नव्हती. गावातले टवाळ मित्र रोज त्याला अड्ड्यावर घेऊन जायचे आणि दारू पाजायचे. काहीही काम करत नव्हता. त्याच्या श्वासाची दुर्गंधी सगळ्या झोपडीत पसरली होती. तिने नाकावर पदर धरला.
सत्या घरात दिसत नव्हता. खर तर तिच्या पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता पण पोटचं लेकरू उपाशी राहायला नको म्हणून ती भूक मारायला तांब्याभर पाणी प्यायली. इतक्यात सत्या झोपडीत आला.

"आये, आज काय आणलं व्ह खायला?" सत्याने पिशवी उपडी करत विचारलं.

"पाव हाय. त्यातले चार तू खा. दोन बाबूसाठी ठेव."

"चारच पाव? अन कशाशी खाऊ म्या? बटर कुठाय?"

"तुझा बाप ऑफिसरच तर हाय, बटर मागतोय. गिळ मुकाट्याने. मीठाबरोबर खा."

"मी नाही खाणार." सत्याने ब्रेड भिरकावला.

"सत्या" पार्वतीने संतापाने त्याच्यावर हात उगारला.

कशी कोण जाणे,पण सत्यावर हात उगारताना जग्याला बरोबर जाग आली.
"ए, ह्यापुढे त्याच्यावर हात उगारशील,तर माझ्यासारखा वाईट कुनी न्हाय,सांगून ठेवतो. त्यो सत्या हाय माझा. त्या शीनेमातल्या सत्यावाणी राजा होणार हाय. त्याची दहशत सगळ्या गावात पसरणार हाय." नवरा झोकांडे खात सत्याला कुरवाळत होता.

ते बघून पार्वतीला किळस आली. तिने तो ब्रेडचा पुडा नवऱ्याच्या हातात ठेवला आणि म्हणाली, "दोघे मिळून संपवा. आज इतकंच हाय."

"एवढंच खायला? तू करते काय मग दिवसभर? मजा मारते का?"

नवऱ्याचं ते वाक्य ऐकलं आणि अपमानाने,संतापाने पार्वती लाल झाली. "लाज हाय का रं तुला? मर्दासारखा मर्द,दिवसभर लोळत पडतोय. बायको कामावर जाऊन चार पैसे कमावून आणते. जगायला नालायक हायेस तू." पार्वतीला अश्रू अनावर झाले आणि ती झोपडीबाहेर पडली. समोर वडाच्या झाडाखाली बसून हुंदके देऊ लागली. शेजारच्या झोपडीतल्या सखुला तिच्या हुंदक्यांचा आवाज आला. सखू पार्वतीजवळ आली.
"पार्वती,काय ग बाय? रोजचंच का?"

पार्वती तिला बिलगून अजूनच रडायला लागली.
"पार्वती, माझ्या ओळखीने तुला एक काम मिळू शकेल पण तुझी तयारी पायजे. काम जरा वंगाळ हाय."

"सखे,अग माझ्यासाठी काम महत्वाचं! कुठलंही काम वंगाळ नसतं. कष्टाचा पैसा हाय त्यो. कुठलं काम हाय?"

"दिवसाचे पाचशे रुपये मिळतील. एका बड्या हापिसात सतत संडास स्वच्छ ठेवायचं काम हाय. तू करशील का? त्या कामाची घाण वाटते ना,म्हणून विचारलं."

"पोटाच्या खळगीपुढे कुठलं काम घाण ग? मी तयार हाय. मला घेऊन चल. माझं पोर उपाशी मी बघू शकत न्हाय. त्याचं शिक्षण मला करायचं आहे. पैशाशिवाय कशी जगू ग?" पार्वतीचे डोळे परत भरून आले.

"उगी,उद्या सकाळच्याला तयार रहा. मी घेऊन जाईन तुला. असेल नशिबात तर मिळेल तुला काम."


दुसऱ्या दिवशी पार्वतीला घेऊन सखू,आय टी ऑफिसमध्ये गेली. ते ऑफिस बघून पार्वतीचे डोळे दिपले. सखूने तिथल्या मॅनेजरशी पार्वतीची भेट घडवून आणली. मॅनेजरला पार्वतीच्या डोळ्यात खरेपणा दिला. त्यानं तिला दुसऱ्या दिवसापासून कामावर यायला सांगितलं.

कामाचा पहिलाच दिवस पण पार्वतीने चोख काम केलं. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर हातात पाचशेची नोट बघून तिला गहिवरून आलं. तिने ते कपाळाला लावले. घरी जाताना सत्याच्या आवडीची भेंडी,काकडी घेतली, चार गुलाबजाम घेतले.

आज सगळा स्वयंपाक बघून सत्या हावरटासारखं जेवला. नवऱ्याच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळायला लागला. त्याने नशेतच विचारलं, "कुठे उधळली होतीस ग? आज सगळं जेवण? एवढा पैका आला कुठून तुझ्याजवळ? माझ्या घरात फालतू गोष्टी खपवून घेणार नाही, सांगून ठेवतो."

"तुझं घर? काय करतोस रं तू ह्या घरासाठी? आरं,स्वतःची बायको आणि पोर सांभाळायची तुझ्यात हिम्मत नाय."

"लई बोललीस. पैका कुठून आला ते सांग."

"नवीन काम मिळालं हाय. एका हापिसात संडास सतत साफ करायचं."

जग्याने ते ताट ढकललं आणि म्हणाला,"त्या घाणीतून येऊन इथे स्वयंपाक करून खाऊ घालतेस होय. चालणार न्हाय."

पार्वतीने ते ताट उचललं. आणि एका निर्धाराने म्हणाली. "माझ्या पोराला नीट खायला प्यायला मिळावं,त्याचं शिक्षण व्हावं,तो एक चांगला माणूस व्हावा,ह्यासाठी मी वाटेल ते काम करेन. मला कशात कमीपणा किंवा घाण वाटत न्हाय. तुला रस्ता मोकळा हाय. चालू लाग."

वास्तव (सत्य की आभास)©®

07 Oct, 06:18


मी तुझा भुत्या खरा
पंचभूतांचा हा देह माझा!!

अनुहत चौडक वाजत धक धक
उदो उदो घोष बरा!!

अविद्येचे तेलात जळत त्रिगुण पोत
ज्ञानाग्नीने भर भरा!!

चिद्रूप तेजाचे भूषण कवड्यांचे
माणिक अंग साजिरा,!!

वास्तव (सत्य की आभास)©®

06 Oct, 03:03


रंग नाही ऐसा त्यासी, नाही आकार मातीस, जीवनाचा अर्थ सारा, घडवीते तू गं साकार जननी..! तुज ऐसी नाही..!

नवरात्र_04

जागर_स्त्रीशक्तीचा

वास्तव (सत्य की आभास)©®

06 Oct, 03:02


भक्तीच फळ केवळ तिथंच मिळतं जिथं स्त्री शक्तीचा छळ नाही, तर त्यांना जगण्यासाठी बळ दिलं जातं.

नवरात्र_04

जागर_स्त्रीशक्तीचा.

वास्तव (सत्य की आभास)©®

05 Oct, 14:04


केवळ ती मुलगी आहे म्हणून तिचं या जगात येणं नाकारू नका उद्याची बहीण पत्नी अन आई आहे ती जागे व्हा जगाला विनाशाकडे हाकरू नका.

जागर स्त्री शक्तीचा नवरात्र ३

वास्तव (सत्य की आभास)©®

05 Oct, 14:03


आयुष्यात परीक्षा पास होण्यासाठी जितकी मेहनत करायची आहे , जे जे काही करायचे आहे , जो निर्णय घेणे आवश्यक आहे ते फक्त परीक्षा पूर्वीच करा.

कारण निकालाच्या या दिवशी निकाल पाहताना डोळ्यांतुन फक्त आणि फक्त आनंदाश्रू निघाले पाहिजे. 💯🔥🏆

वास्तव (सत्य की आभास)©®

05 Oct, 06:36


आत्ताच विकिपीडिया वर काही ओळी वाचनात आल्या. त्या अशा होत्या, आपल्या मनातील भावना ह्या कदाचित संगीतानेच व्यक्त होऊ शकतात.संगीत आयुष्याला प्रेरणा देते.एकांतात स्वतःला ओळखण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे संगीत होय. आपल्या व.पुं.नी सोबतीला खूप महत्व दिले आहे. त्यांनी म्हटले आहेच, " पाऊलवाटेवरच सोबतीचा हात हवा असतो.." आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे लिहिण्याचे कारण काय? तर काही हिंदी गाणी जी या विचाराला साजेशी आहेत. बघा ना, मुलगा काय किंवा मुलगी काय, जोडीदार मिळे पर्यंत त्यांच्या आयुष्यातलं ते पान हे मोकळेच असते पण त्या पानावर जेव्हा प्रेमाचे, व्यक्तीचे नाव कोरले जाते तेव्हा ते नाते बहरते, मग पहिली गाण्याची ओळ आठवते,
" कोरा काग़ज था ये मन मेरा
लिख लिया नाम इस पे तेरा.."
नातं म्हटलं की त्यात लटका राग हा येतोच. पण त्या मागचे प्रेम हे कधीच कमी होत नाही. कारण, किनारच प्रेमाची असते ना! " मी " हा शब्द उरतोच कुठे? हा रुसवा घालवण्यासाठी देखील संगीतातले हे शब्द जर कानावर पडले तर राग जातो व प्रेम अधिक वाढते. या वर देखील व.पु. फार सुरेख व्यक्त होतात, " कित्येकदा कडाडून एकमेकांशी भांडलो, एकमेकांना सोडून नाही कुठेच रमलो.." हसरत जयपूरी यांचे शब्द, शंकर जयकिशन यांचे संगीत व लता दीदींनी गायलेले हे गाणं रागाला टिकूच देत नाही,
" अजी रुठ कर अब कहां जाइएगा?
जहाँ जाइएगा, हमें पाइएगा.."
संगीतकार मदन मोहन यांची गीतं म्हणजे अतिशय कर्ण मधूर. जेव्हा डोळे मनातलं सारं काही बोलतात तेव्हा तिथे शब्द मुके होतात. कारण, प्रियकर प्रेयसीच्या या गोड क्षणांमध्ये डोळे महत्वाची भूमिका बजावतात. तेव्हा पुन्हा व.पुं.चा विचार आठवतो, " डोळे आणि स्पर्श शब्दांपेक्षा छान बोलतात.." गाण्याच्या ओळी देखील तितक्याच अविट आहेत,
" तेरी ऑंखों के सिवा दुनिया में रखा क्या है.."
असा हा सांगितिक प्रवास प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतो. मनावर कोरलेल्या नावा पासून ते पार शपथां पर्यंत चालू असते. यात एक गोष्ट मात्र कायम असते ती म्हणजे ओढ आणि प्रेम. मराठी गाणी जशी मनाचा ठाव घेतात तशीच हिंदी जुनी गाणी आपल्याला त्या काळात घेऊन जातात. हल्ली I love you बोलून जसं प्रेम व्यक्त होते तसेच तेव्हाच्या काळात ही गाणी जरी एकमेकांसाठी म्हटली तरी प्रेमाची भावना व्यक्त व्हायची. म्हणून तर सुखी संसाराच्या सहजीवनाची कितीही वर्ष पूर्ण झाली तरी बायको मधली प्रेयसी आपले प्रेम कसे व्यक्त करेल? तर या गाण्यातून व्यक्त करेल,
" सारा प्यार तुम्हारा, मैंने बाॅंध लिया हैं ऑंचल मैं.."
... मानसी देशपांडे

वास्तव (सत्य की आभास)©®

05 Oct, 04:08


गरजेचे नसते कधी
बापाच्या वारसात
धन, पैसे, मिळाले पाहीजे...!

बापाने दिलेली प्रामाणिक पणाची शिकवण देखील आपल्याला आयुष्यभरासाठी पोसत असते...!

मनातलं आवडलेलं....!✍️

किरण

वास्तव (सत्य की आभास)©®

05 Oct, 03:59


_दुःख अडवायला उबऱ्यासारखा ,मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा_

_वाट चुकणार नाही जीवनभर कोणी, एक तू मित्र कर आरशासारखा,मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा_

_आत्महत्याच करणार नाही कोणी, मित्र असला जवळ जर मनासारखा,मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा_

_त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा,बस धडा मैत्री वाचण्यासारखा,मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा_

_मैत्री चाटते गाय होऊन मना,जा बिलग तू तिला वासरासारखा,मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा_

_कवी अनंत राऊत_

एकांतामध्ये ही कविता ऐकल्यानंतर आपल्या जिवलग मित्राची आठवण आल्याशिवाय राहत नाही जिवलग मित्राची आठवण आल्यानंतर डोळ्यांमध्ये आपोआप आश्रू येतातच_

वास्तव (सत्य की आभास)©®

05 Oct, 02:34


देवीला गर्ब्यात नाचनार्‍या पेक्षा वाचनार्‍या आदीशक्ती जास्त आवडतात.

नवरात्र_03

जागर_स्त्रीशक्तीचा

वास्तव (सत्य की आभास)©®

05 Oct, 02:32


वरवरचा दिखाऊपणा नाही,
विचारांचा जागर व्हायला हवा..
मूर्तीतल्या देवीसोबतच,
घरातल्या स्त्रीचाही आदर व्हायला हवा..!🙏🏻
जागर स्त्री_शक्तीचा

वास्तव (सत्य की आभास)©®

05 Oct, 02:32


देवीने परिधान केलेल्या रंगीत वस्त्रांऐवजी,
तिने धारण केलेली शस्त्रे स्त्री संरक्षणासाठी जास्त प्रभावी ठरतील_!
स्त्रियांचं लक्ष फक्त "वस्त्रां" ऐवजी "शस्त्रां" वर पण जायला हवं_!!
💯💯👍🏻🙏🏻

वास्तव (सत्य की आभास)©®

05 Oct, 02:31


अन्नाच्या गुणवत्तेविषयी सतर्क असणारे आपण आचार-विचार आणि शब्दांच्या गुणवत्तेविषयी कधीच सजग नसतो.... निषिद्ध अन्न जसं शरीराला हानिकारक असतं तोच नियम विचार आणि शब्दांना पण लागू होतो. फरक इतकाच आहे पहिली हानी बाह्य औषधाने अनेकदा बरी होते पण दुसरी हानी शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात येतच नाही
आत्मिक अधोगती होवू नये ह्याची जाणीवपूर्वक काळजी आपण कधीच घेत नाही.... मनाचं आणि आत्म्याचं होणारं अतोनात नुकसान आयुष्यभर इतकं दुर्लक्षित होतं की आपल्या दुःखाचे मुळ सतत बाहेर शोधण्याची आपली धडपड केविलवाणी असते....कदाचित माया,माया म्हणतो ती हीच असावी ........ मनमानसी

वास्तव (सत्य की आभास)©®

05 Oct, 02:31


आपल्याच आयुष्याचं पुस्तक निवांतपणे वाचण्यासाठी लागणारी "वेळ" नावाची श्रीमंत गोष्ट हळूहळू आपल्या कुवतीबाहेर गेली आणि तिथेच आपला माणूस म्हणून झालेला प्रवास, त्याचं सिंहावलोकन करण्याची गरज देखील मनःपटलावरुन पुसट झाली.
अगणित पानं जी न वाचताच उलटत गेलो आणि पुढे जाऊन वर्तमान जगण्याचे संदर्भ आणि अर्थ शोधत बसलो. अशा दुर्लक्षित प्रत्येक पानावर भावनांच्या , विचारांच्या भरकटलेल्या दिशांची उकल होती तशीच मनाला भुरळ घालणार्या आनंदाची बीजही....
आजवर जगलो आणि पुढे जगायचय पण ते कशासाठी ? फक्त सांसारिक व्यवहारासाठी की त्या पलीकडे खुणावत असणाऱ्या क्षितिजासाठी? त्या ध्येयाची खरी उकल योग्य वेळी होईल का? की आयुष्य नावाचं पुस्तक हे असचं संदर्भहीन , आशयविरहीत पानं उलगडण्यातच जाईल ? हे प्रश्न पडायला हवेत. जेव्हा ते पडतील तेव्हाच मिळालेल्या आयुष्याला त्याची अपेक्षित दिशा मिळेल आणि आपल्याला "पलीकडलं" काही.....मनमानसी

3,633

subscribers

8,142

photos

52

videos