पर्यावरण By Indrajeet Yadav

@paryavaranbyindrajeetyadav


This Channel is for the approach based discussion of "Environment & Ecology" for UPSC / MPSC / FOREST /Agri / ENGINEERING Services Exams.

पर्यावरण By Indrajeet Yadav

17 Oct, 12:50


महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गांस प्रतिबंध) अधिनियम, २०२४ व सदर अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकासंदर्भातील अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/acts_regulations/32

पर्यावरण By Indrajeet Yadav

15 Oct, 03:51


आज वाचन प्रेरणा दिन
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन म्हणजेच 15 ऑक्टोबर हा दिवस महाराष्ट्र शासनातर्फे वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो

पर्यावरण By Indrajeet Yadav

11 Oct, 06:14


11 ऑक्टोबर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी

पर्यावरण By Indrajeet Yadav

10 Oct, 10:53


आजचा मंत्रिमंडळ निर्णय

योजना जुनीच आहे. धरणात साठलेला अतिरिक्त गाळ म्हणजेच सुपीक मृदा धरणातून काढणे आणि त्या मृदेचा वापर शेतामध्ये करणे.... म्हणूनच गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अशी यामध्ये संकल्पना आहे.



व्हॅल्यू एडिशन - जल व्यवस्थापन, मृदा प्रदूषण, नैसर्गिक शेती

पर्यावरण By Indrajeet Yadav

09 Oct, 04:35


स्वराज्य प्रबोधिनीच्या GS 2 उत्तरलेखन मॉड्यूल मध्ये फीडबॅक कसे दिले जातात आणि उत्तराची तपासणी कशी केली जाते याचा एक नमुना....

ADMISSIONS OPEN
WELCOME ALL

पर्यावरण By Indrajeet Yadav

09 Oct, 03:12


पर्यावरण संबंधित सर्व चालू घडामोडींच्या नोट्स काल लेक्चर मध्ये चर्चा केल्याप्रमाणे पाठवत आहे.

ज्यांना वाचून समजतील त्यांनी वाचून घ्या.

ज्यांना वाचून लक्षात येत नसेल त्यांनी युट्युबचा व्हिडिओ बघितला तर अधिक चांगल्या प्रकारे समजेल.

पर्यावरण By Indrajeet Yadav

09 Oct, 03:11


पर्यावरण चालू घडामोडी 2023

पर्यावरण चालू घडामोडी भाग 1 - https://www.youtube.com/live/cfe4QltemfM?si=rpsUbNirNjz3rBHu

पर्यावरण चालू घडामोडी भाग 2 - https://www.youtube.com/live/4s-o9LzrXic?si=1OwSHYTnj3UFf_bp

पर्यावरण By Indrajeet Yadav

09 Oct, 03:10


Current Affairs Assignment 2

पर्यावरण By Indrajeet Yadav

06 Oct, 15:48


"उलगुलान "

आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (TRTI) द्वारा प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या मोफत स्पर्धा परीक्षा  'गट ब आणि क 'प्रशिक्षणाकरिता यावर्षी TRTI संस्थेने आपल्या रयत प्रबोधिनीला आपल्या प्रशिक्षणाची जबाबदारी दिली आहे.
संयुक्त गट ब आणि क मध्ये रयत प्रबोधिनी च्या निकालाविषयी आणि कामाच्या पद्धतीविषयी आपण सर्वजण परिचित आहातच. तयारीच्या काळात  सर्व टप्प्यावर रयत प्रबोधिनी आपल्या पाठीशी उभी राहील याची आम्ही ग्वाही देत आहोत..

आपल्या TRTI द्वारे उपलब्ध करून दिलेल्या लींक द्वारे लॉगिन करून रयत प्रबोधिनी, पुणे नावाचा पर्याय निवडाल याची खात्री आहे.

या पुढील काळात आमच्याशी जोडलेले राहण्याकरिता कृपया हा खालील गूगल फॉर्म  भरून द्यावा जेणेकरून आपला संपर्क राहू शकेल..

👉🏻Form link: https://forms.gle/X1K8G6P3fCXDdSYn8

अर्ज भरताना संस्था निवड अथवा इतर कोणतीही अडचण आल्यास रयतशी संपर्क करा..
9762131361 / 9216950101

संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी
https://www.youtube.com/@रयतप्रबोधिनी


तुमचाच,
उमेश कुदळे
रयत सेवक 🙏🙏

(रयत च्या कामावर विश्वास असणाऱ्या मंडळींनी देखील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करावी ही विनंती 🙏)

पर्यावरण By Indrajeet Yadav

04 Oct, 17:05


पर्यावरण
All Class PPTs


https://drive.google.com/drive/folders/1hEwtdBRIr89qnXIdQUEknoW8o7KlI1BA?usp=drive_link

पर्यावरण By Indrajeet Yadav

03 Oct, 16:59


📌मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके॥🍂

🔷अभिजात दर्जा मिळण्यासाठी कोणते निकष असतात?

* भाषेचे प्राचीन साहित्य: भाषेचे साहित्य किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावे लागते.
* साहित्याचे महत्त्व: भाषेतील प्राचीन साहित्य मौल्यवान आणि समृद्ध असावे.
* स्वतंत्र अस्तित्व: भाषेला स्वतंत्र अस्तित्व असावे. म्हणजेच ती इतर भाषेतून उधार घेतलेली नसावी.
* भाषेचे स्वरूप: भाषेचे स्वरूप इतर भाषांपेक्षा वेगळे असावे.

🔹मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय फायदे होतील?

* मराठी भाषेचे संरक्षण: यामुळे मराठी भाषेचे अधिक चांगले संरक्षण होईल.
* शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन: शैक्षणिक क्षेत्रात मराठी भाषेला अधिक प्रोत्साहन मिळेल.
* सांस्कृतिक ओळख: मराठी भाषेची सांस्कृतिक ओळख जगभर पसरेल.
* केंद्रीय स्तरावर मान्यता: मराठी भाषेला केंद्रीय स्तरावर अधिक मान्यता मिळेल.

समिती- मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी 2012 साली प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली होती.
2013 साली या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला.
- महारट्ठी-महरट्ठी-मऱ्हाटी-मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असं या अहवालात म्हटलं आहे. महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्षं जुनं असल्याचे पुरावे असल्याचं या अहवालात म्हटलं होतं.

🔸महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आपल्या वेबसाईटवर अभिजात दर्जा मिळण्याचे भाषा संवर्धनासाठी काय फायदे सांगितले आहेत.

-मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणं.
-भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं.
-प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं.
-महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करणं.
-मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणं.

: देशातल्या अभिजात भाषांचा  प्रवास 

सन 2004 मध्ये देशात तामिळ ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली.
तामिळनंतर
2005 मध्ये संस्कृत,
2008 मध्ये कन्नड आणि तेलुगू,
2013 मध्ये मल्याळम,
2014 मध्ये ओडिया भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. 
2024- मराठी,आसामी,पाली,प्राकृत,बंगाली

📖 Join- t.me/swarajyaprabodhini

पर्यावरण By Indrajeet Yadav

03 Oct, 16:42


Next Component Staring From 7th Oct 2024

पर्यावरण By Indrajeet Yadav

03 Oct, 16:41


2012 पासून प्रलंबित असलेला मुद्दा.... अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान.... 🤗🙏🏻माय मराठी
मराठी अभिजात भाषा समिती - रंगनाथ पठारे 2012
अहवाल सादर -2013

पर्यावरण By Indrajeet Yadav

02 Oct, 17:11


चालू घडामोडी ऑफलाइन मॉड्युल साठी प्रवेश सुरू.... ज्यांना डेमो लेक्चर अटेंड करायचे असेल ते 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता क्लासवर येऊन ऑफलाइन स्वरूपात डेमो लेक्चर अटेंड करू शकतात.

पर्यावरण By Indrajeet Yadav

02 Oct, 17:09


#गांधी_जयंती
#repost
मागे यूपीएससी च्या मुख्य परीक्षेत प्रश्न विचारण्यात आला होता कि "गांधींविना भारतीय स्वातंत्र्य प्राप्ती कशी वेगळी ठरली असती?" इतिहासाकडे बघण्याचा एक ववगळाच दृष्टीकोन देणारं हे विधान आहे.खरंतर भारतात या व्यक्तीबाबत बोलायचं झालं तर "गांधीवाद" समजून न घेता "गांधी हाच एक वाद " अशीच परिस्थिती दिसते...असो इतिहास म्हटलं कि मतमतांतरं आणि वाद हा आलाच (विशेषतः भारतात)...पण आज या महात्म्याची 150 वी जयंती साजरी होत असताना हा गांधी विचार किती व्यापक व खोल आहे कि याचा तळ अजूनही गाठता येत नाही.
फार पूर्वी रवींद्र ठाकूर यांचं "महात्म्याची दुसरी हत्या" हे पुस्तक वाचनात आलं आणि त्यानंतर लक्षात आलं कि पावलोपावली महापुरुषांच्या विचारांची हत्या या देशात कशी होत आहे...अर्थात गांधी काय किंवा इतर कोणतेही महापुरुष काय याला अपवाद कसे असतील.राज्यशात्रात गांधीवाद समजून घेत असताना मला आणि एकूणच थोडाबहुत इतिहासात गांधी समजून घेताना(एकेरी उल्लेख करतोय हक्काने पण महात्म्याचा तितकाच आदर असल्याने तो करावा वाटतोय) मला गांधीवादी विचार जर जगाशी तुलना केली तर सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या जगण्याचा आधार वाटतो.खरंतर आधी वाटायचं कि गांधीवाद हा मुळात वास्तववादी नसून तो फारच आदर्शवादी आहे आणि कदाचित आदर्शवादी तत्त्वांमुळे तो आवडत असावा मात्र खोलात गेलो तर त्हेच वास्तव हे ध्यानात यायला लागले
रचनात्मक कार्यासाठी संघटनात्मक बांधणीचा विचार करता न्या.रानडे ,गोपाळकृष्ण गोखले यांची धुरा लीलया पेलणारा गांधी 1915 नंतर अधिक व्यापक आणि दृढ होताना दिसतो.अर्थात भारतीय स्वातंत्र्य या स्वातंत्र्य प्राप्तीसाठीच्या विविध प्रयत्नांचा परिपाक होता आणि प्रत्येक व्यक्ती, विचार व कृतीचे योगदान तितकेच महत्वाचे होते यात दुमत नाही.पण तरीही राष्ट्रीय पटलावर या व्यक्तीचा उदय आणि त्याच्या लढा देण्याच्या सत्याग्रही व अहिंसावादी मार्गाचा जगाने स्वीकार करणे हे अद्वितीयच.
गांधी फक्त राजकीय विचारसरणीवर बोलतो असे नाही.हिंदू धर्म हा गंगेसारखा पवित्र आहे मात्र गंगेत जसे विविध प्रवाह येऊन मिसळतात आणि हळूहळू गंगा प्रदूषित करतात त्याप्रमाणे कर्मकांड आणि भ्रामक रूढी परंपरा धर्म अपवित्र करतात हे जेव्हा गांधी बोलतो तेव्हा जगात आणि देशात धर्माबाबत असणारी मतमतांतरे आणि वाद/युद्ध...हो युद्धच म्हणावं लागेल याची उत्तरे तो देतो
भारतीय अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणारा व रोजगारनिर्मितीची अग्रस्थानी असणाऱ्या लघु उद्योगांना चालना देऊन अर्थव्यवस्थेचे ग्रामीण मॉडेल मांडणारा गांधी आधुनिकीकरणाचा विरोध करूनही मला योग्य वाटायला लागतो (कदाचित माझे आकलन चुकीचेही असेल).पण सरकारदेखील मुद्रा योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर आज भर देताना दिसते.
जातिव्यवस्तेत अस्पृश्यता न पाळणारा, हरिजन सेवक संघाची स्थापना करणारा आणि साताऱ्यातील शाहू बोर्डिंग च्या उदघाटनावेळी 'अनेक जाती एक वसतिगृह' या कर्मवीर आणांच्या प्रयोगाला मनापासून दाद देऊन आदर करणारा गांधी दलित अत्याचाराच्या बातम्या वाचल्यावर आजही उपयुक्त वाटतो.
असहकार आंदोलन उभारताना एका वर्षात स्वातंत्र्याची मागणी करणारा पण नंतर अजून खूप तयारीची जाणीव आहे हे जाणणारा व तरीही मागे न हटणारा व "चळवळ करा-थांबा-चळवळ करा" हा लढण्याचा गांधी मला अनेक स्पर्धा हारून शेवटी सुवर्ण पदक व जागतिक विक्रम मोडणाऱ्या प्रत्येक खेळाडूत दिसतो.
समोरील संकट कितीही मोठे असले तरी टप्प्याटप्प्याने आपल्यातील सामर्थ्य आजमावून प्रतिकूल परिस्थितीत आलेख उंचावून स्वतःचे इप्सित साध्य करणारा तत्वनिष्ठ गांधी मला पाऊस पडो अगर न पडो हरावं लागलं तरी पुन्हा जोमानं उभा राहणाऱ्या देशातील प्रत्येक शेतकऱ्यात दिसतो.
सरतेशेवटी स्पर्धा परीक्षेतील पूर्व परीक्षा-मुख्य परीक्षा-मुलाखत आणि त्यातून येणारे अपयश पचवताना असहकार,सविनय कायदेभंग,चलेजाव असा 1915-1948 पर्यंत निरंतर झटणारा गांधीच अनेक मित्रांना पुन्हा जोमानं उभारी घेण्याचं बळ देतो.
त्यामुळं "गांधी" हा सर्वसामान्य कष्टकरी-शेतकरी जनतेच्या जगण्याच्या व संघर्षाच्या प्रवृत्तीचा मूलाधार वाटतो.आणि"Be the change you want to see in the world." म्हणणारा गांधीच सामाजिक उत्थानासाठी व समाजवादी समाजरचना अस्तित्वात आणण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बदलाचे पाईक होण्यासाठी बाळकडू पाजतो....
शेवटी अजून खूप "गांधी" समजून घेणं बाकी आहे असं वाटतं...तो आपण सर्वांनी घेऊयात हाच या महात्म्याच्या 150 व्या जयंतीस आशावाद व्यक्त करणं आणि प्रत्येकानं त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याच्या त्याच्या मार्गाने गांधीवादी विचारांनी मार्गक्रमण करणं हीच या महात्म्यास खरी आदरांजली असेल...🙏🏻

02.10.19
©इंद्रा

3,091

subscribers

506

photos

38

videos