NOBLE MPSC @nmpsc Channel on Telegram

NOBLE MPSC

@nmpsc


महाराष्ट्र लोकसेवा आयोग, तलाठी, लिपिक, आरोग्य सेवक, पोलीस भरती, वनरक्षक ,इतर सर्वच स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरिता विविध विषयाची माहिती..

NOBLE MPSC (Marathi)

आपलं स्वागत आहे NOBLE MPSC च्या सोबत! या टेलिग्राम चॅनेलवर आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोग, तलाठी, लिपिक, आरोग्य सेवक, पोलीस भरती, वनरक्षक आणि इतर सर्व प्रमुख स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विविध विषयांची माहिती मिळेल. येथे आपण सर्व प्रमुख प्रश्नपत्रिका, टेस्ट सीरीज, टाईमलाईन, प्रश्नपत्रिका लेखन आणि इतर तयारी संबंधित अपडेट्स सामायिक करू शकता. त्यातूनच तयारी करणाऱ्या सर्वांना नोंद घ्यायला आणि त्यांच्यासोबत मित्र बनण्याची अवघड नसून सर्वांना मदत करण्याची अवघड मिशन आहे हा. त्यासाठी जॉईन करा NOBLE MPSC च्या सोबत आणि पदवीवर परत येऊन दिलेल्या स्पर्धांमध्ये खरंय शास्त्र होण्याची अवघडता सोडून घ्या!

NOBLE MPSC

18 Jan, 10:33


👆 इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे

NOBLE MPSC

18 Jan, 08:28


😱पोलिस दलात 33 हजार पदे रिक्त

महाराष्ट्र पोलीस दलात २ लाख २१ हजार २५९ मंजूर पदांपैकी ३३ हजारांवर पदे रिक्त आहेत.

त्यात महिला पोलिसांच्या १६.६ टक्के पदांचा समावेश, अशी माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे.

आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १ लाख लोकसंख्येमागे २२२ पोलीस कर्मचारी असायला हवेत.

जॉईन @https://t.me/kkbooks

NOBLE MPSC

18 Jan, 08:25


🕸एक होता कोळी.... आरामात जगण्यासाठी एक छानसं जाळं बनवण्याचा विचार त्याने केला आणि विचार केला की या जाळ्यात बरेच कीटक, माश्या अडकतील आणि मी त्यांना अन्न बनवून आनंदाने जगेन.

त्याला खोलीचा एक कोपरा आवडला आणि त्याने तिथे जाळे विणण्यास सुरुवात केली. काही वेळाने अर्धे जाळी विणून तयार झाले. हे पाहून कोळी खूप खुश झाला की अचानक त्याची नजर एका मांजरीवर पडली, जी त्याला पाहून हसत होती.

कोळी चिडला आणि मांजराला म्हणाला, "तू का हसतेस?"

"मी हसु नाही तर मी काय करू?" मांजरीने उत्तर दिले, "इथे माश्या येणार नाहीत, ही जागा खूप स्वच्छ आहे, इथे तुझ्या जाळ्यात कोण येईल."

कोळ्याने चांगल्या सल्ल्याबद्दल मांजराचे आभार मानले आणि जाळे अपूर्ण सोडले आणि दुसरी जागा शोधू लागला. त्याने इकडे तिकडे पाहिले. त्याला एक खिडकी दिसली आणि मग तिथे जाळे विणण्यास सुरुवात केली.

तो काही वेळ जाळे विणत राहिला, मग एक पक्षी आला आणि कोळ्याची थट्टा करत म्हणाला, "अरे कोळ्या, तू पण किती मूर्ख आहेस."

"का?" कोळ्याने विचारले.

पक्षी त्याला समजावू लागला, "अरे, इथे खिडकीतून जोराचा वारा येतोय. तुझे जाळे कुठच्याकुठं उडून जाईल."

कोळ्याने तेही जाळे तिथेच अपूर्ण सोडले आणि आता जाळे कुठे करायचे याचा विचार करू लागला. बराच वेळ निघून गेला होता आणि आता त्याला भूकही लागली होती.आता त्याला एका कपाटाचे उघडे दार दिसले आणि तो त्यात जाळे विणू लागला. तेवढ्यात त्याला एक झुरळ दिसलं, जे विस्मयकारक डोळ्यांनी जाळ्याकडे पाहत होतं.

कोळ्याने विचारले - 'असे का पाहतोस?'

झुरळ म्हणाला - "अरे तू इथे कुठे जाळे विणायला आलास. हे एक निरुपयोगी कपाट आहे. तो आता इथेच पडून आहे, काही दिवसांनी विकलं जाईल आणि तुझी सगळी मेहनत व्यर्थ जाईल."

हे ऐकून कोळी तिथून दूर निघून गेला.

पुन्हा पुन्हा प्रयत्न करून तो खूप थकला होत आणि जाळे विणण्याची ताकद त्याच्यात उरली नव्हती. भुकेमुळे तो अस्वस्थ झाला होता. आधी जाळे विणले असते तर बरे झाले असते, अशी खंत त्याला वाटत होती. पण आता तो काहीच करू शकत नव्हता!

जेव्हा कोळ्याला वाटले की काहीही होणार नाही, तेव्हा त्याने तेथून जाणाऱ्या मुंगीला मदत करण्याची विनंती केली.

मुंगी म्हणाली, "मी खूप वेळ तुझ्याकडे बघत होतो, तू तुझे काम पुन्हा पुन्हा सुरू करतोस आणि दुसऱ्यांच्या सांगण्यावरून ते अपूर्ण सोडतोस. आणि हे करणार्‍यांची ही अशीच अवस्था होते."

आणि असे म्हणत ती तिच्या वाटेला निघून गेली आणि कोळी पश्चात्ताप करायला लागला .



मित्रांनो, आपल्या आयुष्यातही अनेकदा असेच काहीतरी घडते.

आम्ही काही काम सुरू करतो. सुरुवातीला आपण त्या कामासाठी खूप उत्साही असतो, पण लोकांच्या कमेंट्समुळे उत्साह कमी होऊ लागतो आणि आपण आपलं काम मध्येच सोडून देतो आणि आपण यशाच्या किती जवळ पोहोचलो होतो हे नंतर कळतं. पश्चातापाशिवाय मग हातात काहीही उरत नाही.

Join @https://t.me/kkbooks

NOBLE MPSC

18 Jan, 06:57


भारतीय बँकांविषयी महत्त्वपूर्ण माहिती

▪️भारतातील पहिली बँक: बँक ऑफ
     हिंदुस्तान   
▪️भारतीयांनी स्थापन केलेली पहिली बँक :
   अवध कमर्शिअल
▪️पहिली पूर्ण भारतीय बँक : पंजाब नॅशनल
     बँक
▪️भारतातील सर्वात मोठी बँक : SBI
▪️भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक :
     ICICI Bank
▪️भारतातील सर्वात मोठा समुह : राष्ट्रीयीकृत
     बँकांचा समूह
▪️जगातील सर्वात मोठी बँक : बँक ऑफ
     चायना
▪️भारतात सर्वाधिक शाखा परकीय बँक :
    स्टॅन्डर्ड  चार्टर्ड बँक, यु. के.
▪️परदेशात सर्वाधिक शाखा भारतीय बँक :
    SBI
▪️सर्वाधिक देशांमध्ये कार्यरत भारतीय बँक :
     SBI
▪️भारतात चेकची व्यवस्था सुरू करणारी
     पहिली बँक : बेंगाल बँक
▪️भारतात पहिली बचत बँक सुरू करणारी :
     प्रेसिडेन्सी बँक ऑफ बेंगाल
▪️इंटरनेट बँकिंग सुरू करणारी पहिली बँक :
    ICICI Bank
▪️क्रेडिट कार्ड सुरू करणारी पहिली बँक :
    Central Bank
▪️ए. टी. एम. सुरू करणारी पहिली बँक :    
    HSBC
▪️म्युच्युअल फंड सुरू करणारी पहिली बँक :
    SBI
▪️सर्वात जुनी सार्वजनिक क्षेत्रातील बँक :
    अलाहाबाद बँक

NOBLE MPSC

18 Jan, 05:31


🔷 चालू घडामोडी :- 17 जानेवारी 2025

◆ सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरुण मिश्रा यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) लोकपाल पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ 2026 वर्षापासून केंद्र शासनाचा आठवा वेतन आयोग लागू होणार आहे.

◆ सातवा वेतन आयोग फेब्रुवारी 2014 मध्ये स्थापन करण्यात आला होता.[मंजूर :- 2016]

◆ राज्यात 2022 मध्ये लागू केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाची मुदत मार्च 2025 पर्यंत आहे.

◆ दर 10 वर्षांनी केंद्र सरकार वेतन आयोगाची स्थापना करत असते.

◆ चेसर आणि निशांत उपग्रह इस्रोच्या माध्यमातून यशस्वीपणे डॉकिंग करण्यात आले.

◆ भारताने स्पेस डॉकिंग साठी PSLV-C60 प्रक्षेपाचा वापर केला आहे.

◆ स्पेस डॉकिंगचे तंत्रज्ञान भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने(इस्त्रो) यशस्वी करून दाखवले आहे. [यासह अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही कामगिरी करणारा भारत चौथा देश बनला.]

◆ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपाल पदावर अरुण मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ भारताच्या फलंदाजी प्रशिक्षक पदी सितांशू कोटक यांची निवड करण्यात आली आहे.

◆ कतार व अमेरिकेने मध्यस्थी करून हमास व इजराइल या दोन देशा दरम्यानच्या युद्ध बंदीची घोषणा केली आहे.

◆ फसव्या योजनांना आवर घालण्यासाठी ‘आर्थिक गोपनीय कक्ष’ 2016 साली स्थापन करण्यात आला होता.[2020(बंद)]

◆ अवैध शस्त्र प्रतिबंधासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे.

◆ भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात केरळ राज्य प्रथम स्थानी आहे.[गोवा :- द्वितीय, महाराष्ट्र :- तृतीय]

◆ लोहखनिजांच्या निर्यातीत उडीसा राज्य प्रथम स्थानी आहे.[कर्नाटक :- द्वितीय, गोवा :- तृतीय]






JOIN TELEGRAM:-
https://t.me/kkbooks

NOBLE MPSC

17 Jan, 12:09


➡️ बुध्दिबळ Star D. गुकेश.

➡️ मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार जिंकणारा देशातील सर्वात तरुण खेळाडू.


➡️ खालील पुरस्कार व्यवस्थित करून ठेवा.

➡️ खालील खेळाडूंना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला
1. डी गुकेश (बुद्धिबळ)
2. हरमनप्रीत सिंग (हॉकी)
3. प्रवीण कुमार (पॅरा ॲथलेटिक्स)
4. मनू भाकर (शूटिंग)


32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळाला.
1. ज्योती याराजी (ॲथलेटिक्स)
2. अन्नू राणी (ॲथलेटिक्स)
3. नीतू (बॉक्सिंग)
4. स्वीटी (बॉक्सिंग)
5. वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
6. सलीमा टेटे (हॉकी)
7. अभिषेक (हॉकी)
8. संजय (हॉकी)
9. जर्मनप्रीत सिंग (हॉकी)
10. सुखजित सिंग (हॉकी)
11. राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी)
12. प्रीती पाल (पॅरा ॲथलेटिक्स)
13. जीवनजी दीप्ती (पॅरा ॲथलेटिक्स)
14. अजित सिंग (पॅरा ॲथलेटिक्स)
15. सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा ॲथलेटिक्स)
16. धरमबीर (पॅरा ॲथलेटिक्स)
17. प्रणव सुरमा (पॅरा ॲथलेटिक्स)
18. एच होकातो सेमा (पॅरा ॲथलेटिक्स)
19. सिमरन जी (पॅरा ॲथलेटिक्स)
20. नवदीप (पॅरा ॲथलेटिक्स)
21. नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन)
22. तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)
23. नित्य श्री सुमती सिवन (पॅरा बॅडमिंटन)
24. मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)
25. कपिल परमार (पॅरा ज्युदो)
26. मोना अग्रवाल (पॅरा नेमबाजी)
27. रुबिना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी)
28. स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)
29. सरबज्योत सिंग (शूटिंग)
30. अभय सिंग (स्क्वॉश)
31. साजन प्रकाश (पोहणे)
32. अमन (कुस्ती)

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/kkbooks

NOBLE MPSC

17 Jan, 11:45


JOIN TELEGRAM:-
https://t.me/kkbooks

NOBLE MPSC

17 Jan, 07:27


➡️ न्या.अरुण मिश्रा बीसीसीआयचे लोकपाल.

➡️ सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरुण मिश्रा यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) लोकपाल पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

NOBLE MPSC

17 Jan, 07:07


↪️ न्या. मिश्रा BCCI चे लोकपाल

NOBLE MPSC

17 Jan, 06:47


💐💐💐💐💐💐💐

NOBLE MPSC

17 Jan, 06:45


🛑 बूम बूम जसप्रीत बुमराह...😎

आयसीसी डिसेंबर 2024 महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू...

NOBLE MPSC

17 Jan, 06:44


➡️ 17 जानेवारी 2025 - चालू घडामोडी

1) दरवर्षी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
➡️ 16 जानेवारी

2) 'सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार' देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले ?
➡️  अपर्णा सेन

3) दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
➡️ देवेंद्र कुमार उपाध्याय

4) ग्रँडस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण ठरला आहे ?
➡️ नोव्हाक जोकोविच

5) जगातील अत्यंत गरीब देशांमध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे ?
➡️ दक्षिण सुदान

6) ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीचे नाव काय आहे ?
➡️ भार्गवस्त्र

7) नाग एमके 2 क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे ?
➡️ DRDO

8) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ची वार्षिक बैठक कोठे होणार आहे ?
➡️ दावोस

9) आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कोठे साजरा करण्यात


https://t.me/kkbooks

NOBLE MPSC

17 Jan, 05:36


➡️ अर्जुन पुरस्कार विजेत्यांची यादी...

NOBLE MPSC

17 Jan, 04:52


🔷 चालू घडामोडी :- 16 जानेवारी 2025

◆ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ची वार्षिक बैठक दावोस(स्वित्झर्लंड) येथे होणार आहे.

◆ मुंबईच्या नौदल डॉकयार्ड मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युद्ध नौका व पाणबुडींचे राष्ट्रार्पण करण्यात आले.[INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशिर]

◆ अखिल मराठा फेडरेशन चा ‘द ग्रेट मराठा’ पुरस्कार नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांना जाहीर झाला आहे.

◆ अखिल मराठा फेडरेशन ची स्थापना 2015 मध्ये झाली होती.

◆ मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी आलोक आराधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ देवेंद्र कुमार उपाध्याय दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ जगातील अत्यंत गरीब देशांमध्ये प्रथम स्थानी दक्षिण सुदान हा देश आहे.

◆ केंद्रीय नवीन व अपारंपारिक ऊर्जा मंत्रालयाच्या सचिव पदी श्रीमती निधी खरे यांची नियुक्ती झाली आहे.

◆ भारतीय रिझर्व बँकेने आपला रेपोदर 6.5 टक्के वर कायम ठेवला आहे.

◆ भारताने 2025 -26 या आर्थिक वर्षात 7.5 टक्के जीडीपी वाढीचे लक्ष ठेवले आहे.

◆ आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव अहमदाबाद याठिकाणी साजरा करण्यात आला आहे.

◆ आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे 34वे राज्य ओडिसा आहे.

◆ नोव्हाक जोकोविच(सर्बिया) हा खेळाडू ग्रँडस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे.

◆ मध्य प्रदेश राज्याने ‘स्वामी विवेकानंद युवाशक्ती मिशन’ सुरू केले आहे.

NOBLE MPSC

17 Jan, 04:48


🛑जसप्रीत बुमराहला डिसेंबर 2024 साठी ICC पुरूष खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे, भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला पुरस्कार ..👍

NOBLE MPSC

17 Jan, 03:08


Photo from [email protected]

NOBLE MPSC

17 Jan, 03:07


Photo from [email protected]

NOBLE MPSC

16 Jan, 12:18


♦️8th Pay Commission : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट देत 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आले आणि 8 वा वेतन आयोग 2026 पासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार आहे.

NOBLE MPSC

10 Jan, 07:59


🚨 MPSC राज्यसेवा (वर्णनात्मक) क्लास-1 & क्लास-2 साठी पूर्व,मुख्य आणि मुलाखतीनंतर पात्र असलेले के. के.भुतेकर सर लिखित नोबल पब्लिकेशन्सचे

👑 नोबल मेगा सामान्य ज्ञान 👑

💥 10 वी आवृत्ती  महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

🔥 MPSC राज्यसेवाआणि सयुंक्त गट ब & क-PSI/STI/ASO/Ex Insp. इत्यादी , सरळसेवा- TCS-IBPS, आरोग्य, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन,पोलीस भरती,चालक पोलीस,बँडसमन,SRPF, SSC,कारागृह MIDC,आदिवासी विभाग, जिल्हा परिषद,अन्नपुरवठा,  वनरक्षक,वनसेवक, राज्य उत्पादन शुल्क ,नगरपरिषद, मनपा, तलाठी,लिपिक, रेल्वे,SSC सर्व पदांची भरती व AtoZ ऑनलाईन व ऑफलाईन स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तक.

👑 पुस्तकांची वैशिष्ट्ये 👑

🔥 स्पर्धा परीक्षा,5 वि ते 12 वि स्टेट बोर्ड,NCERT च्या सर्व विषयांचा & अभ्यासक्रमाचा समावेश.

🔥 सामान्यज्ञान / सामान्यअध्ययन संपूर्ण तयारी, 27 घटकात बदलत्या स्वरूपानुसार मांडणी,प्रत्येक घटकात अपडेट व नवीन माहिती, अचुकतेवर भर.

🔥लक्षात ठेवायला सोपे ,सुटसुटीत,परिक्षाभिमुख, नवीनअभ्यासक्रमानुसार परिपूर्ण पुस्तक.

🔥 विविध परीक्षांमध्ये पुस्तकातून आलेल्या सा. ज्ञानाच्या प्रश्नांचा

🎉संदर्भ: MPSCराज्यसेवा 1 डिसेंबर2024 मध्ये 85 पैकी 39 प्रश्न(याची pdf NOBLE MPSC या टेलिग्राम गृप ला आहे),गट ब&क सेवा पूर्व 23 परीक्षेत 70पैकी 35 प्रश्न,Dept PSI 50 पैकी 32 प्रश्न,सरळसेवा 25 पैकी सुमारे 18 ते 23 प्रश्न,पोलीस भरती 2024 प्रत्येक जिल्ह्यात 22 ते 25 प्रश्न,सोलापूर ग्रा पोलीस 75 पैकी 71प्रश्न,ठाणे शहर पोलीस 73 पैकी 69 प्रश्न, सोलापूर ग्रा चालक 61 पैकी 57 प्रश्न,SRPF 11 मुंबई 43 पैकी 42 प्रश्न,SRPF 8 मुंबई 41 पैकी 38 प्रश्न,वनरक्षक 23 TCS 15 पैकी सुमारे 13 प्रश्न

🔖 एकूण पेजेस 672 (A4 साइज),
किंमत (MRP) 540/- ( दुकानात डिस्काउंट मिळेल )

✉️☎️ Contact : 9763726312 / 9421662760

NOBLE MPSC

10 Jan, 07:59


🔖 के. के.भुतेकर लिखित (राज्यसेवा क्लास 1 & क्लास 2 परीक्षा पास वर्णनात्मक पॅटर्न )

नोबल मेगा सामान्य ज्ञान (नोबल पब्लिकेशन्स)

🔥10 वी आवृत्ती सर्वत्र उपलब्ध

NOBLE MPSC

09 Jan, 07:03


🛑डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन...

भायखळा येथील राणीच्या बागेतील नूतनीकरण केलेल्या डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

NOBLE MPSC

09 Jan, 07:03


🛑इस्रोच्या अध्यक्षपदी डॉ. व्ही. नारायणन...

केंद्राने डॉ. व्ही. नारायणन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे नवीन अध्यक्ष आणि अवकाश विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती केली.

ते 14 जानेवारी 2025 रोजी संघटनेचे विद्यमान प्रमुख एस. सोमनाथ यांच्याकडून पदभार स्वीकारतील.

इस्रो ची स्थापना - 15/08/1969

इस्रोचे मुख्यालय अंतरीक्ष भवन, नवीन बेल (BEL) मार्ग, बंगलोर

इस्रोचे ब्रीदवाक्य मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान

भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक - डॉ. विक्रम साराभाई,

NOBLE MPSC

08 Jan, 05:41


Photo from [email protected]

NOBLE MPSC

08 Jan, 05:41


🔴के. के.भुतेकर लिखित नोबल मेगा सामान्य ज्ञान (नोबल पब्लिकेशन्स)

10 वी आवृत्ती 25 डिसेंबर पासून सर्वत्र उपलब्ध

MPSC राज्यसेवाआणि सयुंक्त गट ब & क-PSI/STI/ASO/Ex Insp,इत्यादी,सरळसेवा- TCS-IBPS, आरोग्य, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन,पोलीस भरती,चालक पोलीस,बँडसमन,SRPF, SSC,कारागृह MIDC,आदिवासी विभाग, जिल्हा परिषद,अन्नपुरवठा, वनरक्षक,वनसेवक, राज्य उत्पादन शुल्क ,नगरपरिषद, मनपा, तलाठी,लिपिक, रेल्वे,SSC सर्व पदांची भरती व AtoZ ऑनलाईन व ऑफलाईन स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तक.

🔴पुस्तकांची वैशिष्ट्ये-

🔸1)स्पर्धा परीक्षा,5 वि ते 12 वि स्टेट बोर्ड,NCERT च्या सर्व विषयांचा & अभ्यासक्रमाचा समावेश.

🔸2) सामान्यज्ञान / सामान्यअध्ययन संपूर्ण तयारी, 27 घटकात बदलत्या स्वरूपानुसार मांडणी,प्रत्येक घटकात अपडेट व नवीन माहिती, अचुकतेवर भर.

🔸3) लक्षात ठेवायला सोपे ,सुटसुटीत,परिक्षाभिमुख, नवीनअभ्यासक्रमानुसार परिपूर्ण पुस्तक.

🔸4) विविध परीक्षांमध्ये पुस्तकातून आलेल्या सा. ज्ञानाच्या प्रश्नांचा *संदर्भ: MPSCराज्यसेवा 1 डिसेंबर2024 मध्ये 85 पैकी 39 प्रश्न(याची pdf NOBLE MPSC या टेलिग्राम गृप ला आहे),गट ब&क सेवा पूर्व 23 परीक्षेत 70पैकी 35 प्रश्न,Dept PSI 50 पैकी 32 प्रश्न,सरळसेवा 25 पैकी सुमारे 18 ते 23 प्रश्न,पोलीस भरती 2024 प्रत्येक जिल्ह्यात 22 ते 25 प्रश्न,सोलापूर ग्रा पोलीस 75 पैकी 71प्रश्न,ठाणे शहर पोलीस 73 पैकी 69 प्रश्न, सोलापूर ग्रा चालक 61 पैकी 57 प्रश्न,SRPF 11 मुंबई 43 पैकी 42 प्रश्न,SRPF 8 मुंबई 41 पैकी 38 प्रश्न,वनरक्षक 23 TCS 15 पैकी सुमारे 13 प्रश्न

🔸5) ऐकून पेजेस 672(A4 साइज) 6)किंमत 540/-

📞संपर्क मो 9763726312/9421662760

NOBLE MPSC

08 Jan, 05:27


18 वा प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन 8 ते 10 जानेवारी 2025 दरम्यान भुवनेश्वर, ओडिशा येथे होणार आहे.

🛑18 व्या प्रवासी भारतीय दिवस यश थीम "विकसित भारतासाठी डायस्पोराचे योगदान" आहे.

17 वा प्रवासी भारतीय दिवस इंदूर, मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आला होता.

9 जानेवारी हा महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून 1915 मध्ये भारतात परतल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

प्रवासी भारतीय दिवस (PBD) साजरा करण्याची परंपरा 2003 मध्ये सुरू झाली. 9 जानेवारी 2003 रोजी पहिले PBD अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

NOBLE MPSC

08 Jan, 05:25


🛑इंटरपोलच्या धर्तीवर भारतात आता " भारतपोल "

देशविघात कृत्य करणाऱ्या, भ्रष्टाचारांसारख्या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांना पकडण्यासाठी आतापर्यंत इंटरपोल ची मदत घेतली जात होती.

इंटरपोल जगातील देशांमध्ये एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत होते

आता याच धर्तीवर भारत सरकारने आपले भारतपोल स्थापन केले आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीबीआयच्या या भारत पोर्टल चे उद्घाटन केले आहे

भारत पोल पोर्टल द्वारे वेगवेगळ्या राज्यातील पोलीस गुन्हेगारांची अद्यवत माहिती मिळू शकणार आहे.

हे पोर्टल सीबीआयच्या अधिपत्याखाली असणार आहे तसेच राज्यातील पोलीस या पोर्टलच्या माध्यमातून थेट इंटरपोल ची मदत घेऊ शकणार आहे.

NOBLE MPSC

07 Jan, 05:37


अणुशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन

🛑भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन

डॉ. राजगोपाल यांचा जन्म चेन्नई येथे 1936 मध्ये झाला होता.

1974 च्या अणु चाचणी टीममध्ये डॉ. राजगोपालांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

1998 मध्ये झालेल्या पोखरण अणु चाचणी-2 मध्ये त्यांनी संघाचे नेतृत्व केले.

डॉ. राजगोपालांना 1975 मध्ये पद्मश्री आणि 1999 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

1990 मध्ये त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या संचालकपदाची जबाबदारीही स्वीकारली.

डॉ. राजगोपाल 1993 मध्ये अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्षही झाले. 2000 पर्यंत ते या पदावर होते.

ते भारताचे मुख्य वैज्ञानिक सल्लागारही होते.

NOBLE MPSC

05 Jan, 03:04


Document from [email protected]

NOBLE MPSC

04 Jan, 08:38


प्रिय मित्र सहायक निबंधक( Assistant Registrar) श्री तुळशीराम भोजने सर व सोबत उपायुक्त( Dy Commissioner of GST) श्री हेमंत गांगे यांनी नोबल पब्लिकेशन्स ला सदिच्छा भेट दिली.यानिमित्त त्यांचा सत्कार केला. -के के भुतेकर,नोबल पब्लिकेशन्स

NOBLE MPSC

03 Jan, 07:53


🛑क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन..💐💐💐

✔️ 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महिला मुक्ती दिन व महिला बालिका दिन म्हणून साजरा केला जातो

NOBLE MPSC

02 Jan, 10:45


लाडका आणि आज्ञाधारक विध्यार्थी योगेश पवार हा नंदुरबार पोलीस येथून पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाल्यानंतर आज नोबल पब्लिकेशन्स ला सदिच्छा भेट देण्यासाठी आला.या प्रसंगी त्याचा सत्कार केला.-के के भुतेकर,नोबल गृप

NOBLE MPSC

02 Jan, 05:45


2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस...🚨

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन... निमित्त हार्दिक शुभेच्छा...💐💐

NOBLE MPSC

01 Jan, 05:53


🛑कन्याकुमारी देशातील पहिला काचेचा पूल सुरू..

NOBLE MPSC

30 Dec, 10:32


🛑कोकण रेल्वेने उभारला जिल्हा पूल...!!

NOBLE MPSC

27 Dec, 05:04


माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन💐

• जन्म : 26 सप्टेंबर 1932 (पाकिस्तान)

• ते देशाचे 13 वे पंतप्रधान होते. (2004 ते 2014)

• ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट

• 1966 ते 1969 : संयुक्त राष्ट्रात काम

• 1972 ते 1976 : भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार

• 1982-85 : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (15 वे)

• 1985-87 : नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष

• 1987 : पद्म विभूषण पुरस्कार

• 1991 ते 1996: केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री

• 1998 ते 2004: राज्यसभा विरोधी पक्षनेते

• 24 जुलै 1991 : देशाने खासगीकरण-उदारीकरण- जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला

देशाने एक महान अर्थतज्ञ गमावला💔😔

NOBLE MPSC

23 Dec, 14:55


Photo from [email protected]

NOBLE MPSC

23 Dec, 14:50


आज प्रिय मित्र श्री हेमंत गांगे, उपायुक्त ( Dy Commissioner of GST )छत्रपती संभाजीनगर व मा. नगरसेवक श्री रविभाऊ गांगे यांनी नोबल पब्लिकेशन्स ला सदिच्छा भेट दिली.त्यांचा सत्कार केला व नोबल मेगा सामान्य ज्ञान या पुस्तकाच्या 10 व्या आवृत्तीचे प्रकाशन केले.-के के भुतेकर,लेखक-संपादक-संचालक,नोबल पब्लिकेशन्स,छत्रपती संभाजीनगर.

NOBLE MPSC

23 Dec, 08:05


जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025

जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ :- 2 फेब्रुवारी 2025

जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४:- 4 मे 2025

NOBLE MPSC

27 Sep, 03:05


_*13 वे प्रस्तावित पोलीस आयुक्तालय नांदेड*_

NOBLE MPSC

20 Sep, 01:43


Document from [email protected]

2,076

subscribers

2,193

photos

14

videos